सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 163, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 163

१२८ श्रीदासबोध. [ दशक
म्हणोनि साधक बोलिजे । आतां सिद्ध तोचि जाणिजे । पुढिले समासीं
॥ ६० ॥ येथें संशय उठिला । निस्पृह तोचि साधक झाला । त्याग न घडे
संसारिकाला । तरी तो साधक नव्हे कीं ॥ ६१ ॥ ऐसें श्रोत्यांचें उत्तर ।
त्याचें कैसें प्रत्युत्तर । पुढिले समासीं तत्पर । होऊनि ऐका ॥ ६२ ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचमदशके साधकलक्षणनिरूपणं नाम नवमः
समासः ॥ ९ ॥

१०. सिद्धलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ मागें बोलिला संसारिक । त्यागेंविण नव्हे कीं सा-
धक । ऐका याचा विवेक । ऐसा असे ॥ १ ॥ सन्मार्ग तोचि जीवीं धरणें ।
असन्मार्गाचा त्याग करणें । संसारिका त्याग येणें । प्रकारें ऐसा ॥ २ ॥
कुबुद्धित्यागाविणें कांहीं । सुबुद्धि लागणार नाहीं । सांसारिका त्याग पाहीं ।
ऐसा असे ॥ ३ ॥ प्रपंचीं वीट मानिला । मनें विषयत्याग केला । तरीच
पुढें अवलंबिला । परमार्थमार्ग ॥ ४ ॥ त्याग घडे अभावाचा^१ । त्याग घडे
संशयाचा । त्याग घडे अज्ञानाचा । शनैःशनैः^२ ॥ ५ ॥ ऐसा सूक्ष्म अंतर-
त्याग^३ । उभयतांस घडे सांगें^४ । निस्पृहास बाह्यत्याग^५ । विशेष घडे ॥ ६ ॥
संसारिका ठायीं ठायीं । बाह्यत्याग घडे कांहीं । नित्यनेम श्रवण नाहीं ।
त्यागेंविण ॥ ७ ॥ फिटली आशंका स्वभावें । त्यागेंविण साधक नव्हे ।
पुढें कथेच्या अन्वयैं । सावध ऐका ॥ ८ ॥ मागां झालें निरूपण । साध-
काची वोळखण । आतां सांगिजेल खूण । सिद्ध लक्षणाची ॥ ९ ॥ साधु
वस्तु^६ होऊनि ठेला । संशय ब्रह्मांडाबाहेर गेला । निश्चय चळैना ऐसा झाला ।
या नांव सिद्ध ॥ १० ॥ बद्धपणाचे अवगुण । मुमुक्षुपणीं नाहीं जाण ।
मुमुक्षुपणाचें लक्षण । साधकपणीं नाहीं ॥ ११ ॥ साधकास संदेहवृत्ती ।
पुढें होतसे निवृत्ती^७ । याकारणें निःसंदेह श्रोतीं । साधु वोळखावा ॥ १२ ॥
संशयरहित जें ज्ञान । तेंचि साधूचें लक्षण । सिद्धाअंगीं संशय जाण । ला-
गेल कैसा ॥ १३ ॥ कर्ममार्ग संशयैं भरला । साधनें संशय कालवला ।


१. अश्रद्धेचा. २. हळूहळू. ३. आसक्तीचा त्याग. ४. समग्र. ५. विषयांचा
प्रत्यक्ष त्याग. ६. ब्रह्म. ७. संशयाचें निवारण.