सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 165, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 165

१३० श्रीदासबोध. [ दशक
करी समाधानाचा क्षय । तरी चळों न द्यावा निश्चय । आत्मत्वाचा ॥ ३५॥
सिद्ध असतां आत्मज्ञान । संदेह वाढवी देहाभिमान । याकारणें समाधान ।
आत्मनिश्चयें राखावें ॥ ३६ ॥ आठवतां देहबुद्धी । उडे विवेकाची शुद्धी ।
या कारणें आत्मबुद्धी । सदृढ धरावी ॥ ३७॥ आत्मबुद्धि निश्चयाची । तेचि
दशा मोक्षश्रीची । अहमात्मा १ हें कधींचि । विसरूं नये ॥ ३८ ॥ निरू-
पिलें निश्चयाचें लक्षण । परी हें न कळे सत्संगेंविण । संतांसि गेलिया शरण ।
संशय तुटती ॥ ३९ ॥ आतां असो हें बोलणें । ऐका सिद्धाचीं लक्षणें ।
मुख्य निःसंदेहपणें । सिद्ध बोलिजे ॥ ४० ॥ सिद्धस्वरूपीं नाहीं देहो । तेथें
कैंचा हो संदेहो । याकारणें सिद्ध पाहा हो । निःसंदेही ॥ ४१ ॥ देहसंबं-
धाचेनि गुणें । लक्षणांसि काय उणें । देहातीतांचीं २ लक्षणें । काय म्हणोनि
सांगावीं ॥ ४२ ॥ जें लक्षवेना चक्षूंसी । त्याचीं लक्षणें सांगावीं कैसीं ।
निर्मळ वस्तु सिद्ध त्यासी । लक्षणें कैंचीं ॥ ४३ ॥ लक्षणें म्हणिजे केवळ
गुण । वस्तु ठायींच निर्गुण । तेंचि सिद्धाचें लक्षण । वस्तुरूपें ॥ ४४ ॥
तथापि ज्ञानदशकीं ३ बोलिलें । म्हणोनि वक्तृत्व आटोपिलें । न्यूनपूर्ण क्षमा
केलें । पाहिजे श्रोतीं ॥ ४५ ॥ इतिश्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचमद-
शके सिद्धलक्षणनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी ५७२.
दशक सहावा.
१. देवशोधन.
श्रीगणेशाय नमः ॥ चित्त सूचित करावें । बोलिलें तें जीवीं धरावें ।
सावध होऊन बैसावें । निमेष एक ॥ १ ॥ कोणी एके ग्रामीं अथवा देशीं ।
राहणें आहे आपणाशीं । न भेटतां तेथिल्या प्रभूशीं । सौख्य कैंचें ॥ २ ॥
म्हणोन ज्यास जेथें राहणें । तेणें त्या प्रभूची भेटी घेणें । म्हणिजे होय
श्लाघ्यवाणें ४ । सर्व कांहीं ॥ ३ ॥ प्रभूची भेटी न घेतां । तेथें कैंची मान्यता ।
आपुलें महत्व जातां । वेळ नाहीं ॥ ४ ॥ म्हणोन रायापासून रंक । कोणी
एक तरी नायक । त्यास भेटणें हा विवेक । विवेकी जाणती ॥ ५ ॥ त्यास
१. मी आत्मा आहें, देह नव्हे. २. देहाहंभाव गळलेल्या साधूंचीं. ३. आठव्या
दशकांत. ४. चांगलें.