भक्त नरसिंह मेहता: जीवन एवं पद (वैष्णव जन तो तेने कहिये - गुजराती से हिन्दी रूपान्तरण)
Bhakta Narsi Mehta: Jeevan Aur Pad
भक्त नरसिंह मेहता (सम्पादक: रामचन्द्र तिवारी) द्वारा
70 नरसी मेहता
उमरा तो डुंगरा थया रे, पादर थयां परदेस
गोळी तो गंगा थई रे, अंगे उजळा थया छे केश
न होतुं जोइतुं ने शीद आवियुं रे न होती जोई ती तारी वाट
घरांमांथी हलवां थयां रे, एनी खुणे हळाओ ने खाट
नव नाडी जुजवी पडी ने आवी पोहो च्चो काळ,
बैरां छोकरां फट्फट् करे रे, नाना बालक दे छे गाळ
(म्हातारपण कोणी पाठवले ? वाटत होतें सदा सर्वकाळ तारुण्य राहील - उंबरठा,
डोंगरासारखा वाटायला लागला; आणि गावाची सरहद्द परदेशासारखी झाली. पाण्याचा माठ
गंगेसारखा वाटायला लागला आणि अंगावरचे सारे केस पांढरे झाले. नको होते ते कशाकरतां
आलें ? मी तुझी वाट पाहिली नव्हती. घरांत कांही मान राहिला नाही. याची खाट कोपऱ्यात
हलवा (असा अपमान होऊ लागला) नऊ नाड्या विभक्त झाल्या आणि काळ येऊन पोचला
बायका पोरे तिरस्कार करू लागली. छोटी मुले (सुद्धा) शिव्या देऊं लागली) 'नरसिंहाची'
भक्तीनो उपदेश आपनारां झांन नुं महत्व गानारां तसेच रझळती राडना रडवडतां छोकरां
जुवानीने दहाडा रे हरिने जाण्या नहि- यमुनना घेला रे, आवरदा तो वही गई - वगैरे पदे शांत
रसाची उदाहरणे म्हणतां येतील.
अलंकार - अर्थपूर्ण अलंकारांबद्दल बोलावयाचे झाल्यास, उपमा, उत्प्रेक्षा रुपक,
अतिशयोक्ति, प्रतीक, व्यतिरेक, अप्रस्तुतप्रशंसा असे अलंकार सहज सहज उपयोगांत आले
आहेत. नरसिंहाच्या आत्मचरित्रपर काव्यांत स्वभावोक्ति सूचकपणे वर्णिली आहे. नरसिंहाचे
हे वैशिष्ठ आहे. की शब्दालंकारामध्ये पण ते आंतरिक प्रास मिळवतात. ही एक सिध्दीच
म्हणावी लागेल. जयदेवांच्या गीतगोविंद मधे आणि नामदेवांच्या अभंगात सहजपणाने
वापरांत आलेला प्रकार नरसिंहानी तेवढ्याच स्वाभाविकपणे आत्मसात केलेला पाहायला
मिळतो. प्रत्येक ओळीच्या अर्ध्या भागातला प्रास सर्व पदांत ओवल्यासारखा ठेवला असलेली
पदेपण पहावयाला मिळतात. दोन्ही प्रकारची उदाहरणे या पूर्वीच दिली गेली आहेत. केसर
भीना कहानजी, कुसुंमे भीनी नार, सुरत शोभागी शामला सहको यश गाय अशा पदामंधे
वर्णाची साखरपुडाही झालेला दिसतो.
गरबीओ- (स्त्रियांची फेर धरून गाणी)
इ. स. १६६९ चे एक हस्तलिखित मिळाले आहे. या हस्तलिखितांत भाणदास नावाच्या
गरबीकाराने (गरबी गीते लिहिणारा) रचलेल्या जवळ जवळ ८० रचना, त्याच्या भावाच्या
हस्ताक्षरांत, सापडल्या आहेत. त्याने या वर्णनात्मक प्रकारच्या गेय रचनाना 'गरबुं' असें नाव
दिले आहे, विशेष करून आश्विनांतल्या नवरात्र उत्सवांत देवी (माता) ला उद्देशून, या प्रकारच्या
‘नवनवोन्मेषशाली कवी 71
गेय रचना, स्त्रीपुरुष, किंवा केवळ स्त्रीया अगर केवळ पुरुष, समूहरूपांत, नृत्य आविष्कारांत
गोलाकार फिरतात, आणि, म्हणतात. भाणदासानंतर लवकरच उदयास आलेल्या
अहमदाबादच्या वल्लभधोळांच्या आणि अन्य गायकांच्या अशा प्रकारच्या रचना, गुजराती
साहित्यांत खूपच प्रसिद्ध आहेत.
१९ साव्या शतकाच्या पूर्वार्धात उदयास आलेल्या चाणोद-डभोई च्या, सुप्रसिद्ध भक्तकवी
दयारामानी पण, वर्णनात्मक प्रकारांत मोडणा-या असंख्य गरबा रचना रचल्या आहेत. परंतु
कांही आत्मलक्षी प्रकारांच्या मर्यादित ओळींच्या गरबी रचनांतच त्यांचे वैशिष्ट्य आहे. गरबी
असो की गरबा समूहनृत्याचा हा गेय प्रकार आहे. सामान्यपणे मधोमध दिव्यांची मांडणी
करून- म्हणजे गरबी मांडून- त्यांच्या भोवती गोल गोल फिरता फिरतां या रचना गायच्या
असतात. कांही गरब्यांच्या प्रकारांत, कच्च्या मातीच्या छिद्रे असलेल्या घड्यांत, पेटल्या पणत्या
ठेवून, ते घडे डोक्यावर घेऊन स्त्रीया, समूहनृत्यांत भाग घेतात. ज्या समूहनृत्यांत आत्मलक्षी
पदें गायली जातात, त्याना ‘गरबी’ म्हणतात- आणि ज्यांत परलक्षी गीते गायली जातात त्यांना
‘गरबा’ म्हणतात. राससहस्रपदी ना समुद्धार काव्यसंग्रहांत
दिलेल्या आणि न. मे. काव्यसंग्रहांत सापडलेल्या खालील रचना त्यांचा एक नमुना आहे.
वहाला मारा, वृंदाक्यन रे चोक्य के विहिला पधारजो
गोकूल ग्रामतणी व्रजनारय के, वेगी बोलाकजो रे लोल- (१)
अम्हेने रास रम्याना कोडके नाथ- संगि बेवडीरे बोल
लेवा मुखडाना मकरंद के, म्यली तेवतेवडी रे लोल- (२)
कडो वंसीक्टने चोक के कुंज शोषा घणी रे लोल,
कहुं जमुनाजीनुं तीर के तटि रलियामणी रे लोल (३)
यलिओ व्रजवनितानो साथ के, टाळी दिई हाय श्युं रे लोल (४)
फरतां गान करें व्रजनार के वचमां बालमो रे लोल,
कडी शरदपुनमनी रात्य के सुंदर सोहामणी रे लोक (५)
जोवा मलिया चौद लोक के इंद्र तिहां आविया रे लोल
कडां पारिजातना पुष्पि के प्रभुनीं बधाविया रे लोल- (६)
ब्रम्हारुद्र परि एनुं ध्यान के पार पामे नहि रे लोल
ब्रम्हा रुद्र परि एनुं ध्यान के पार पामे नही रे लोल
नाथे नरसैयो सुख जोई के लीला नामनी रे लोल- (७)
(माझ्या प्रिय कृष्णा, वृंदावनांत अवश्य, आणि लौकर या. गोकुळ गावच्या गोपिंना
ताबडतोब बोलावुन घे(१) कृष्णाबरोबर जोडीने रास क्रीडा करायची आम्हाला मोठी हौस
72 नरसी मेहता
आहे. त्याच्या मुखांतील मध घेण्यासाठी आम्ही जशा होतो तशाच आलों (२) बांबुच्या
वनातला चौक आणि कुजवनाची शोभा अपार आहे. यमुनेचा काठ, आणि तीर शोभायमान
आहे (३) गोकुळच्या नारींची साथ मिळाली- हातानी काय टाळी देताहेत. (वाः वाः) मदन
मानिनीची मिठी पडली. काय कोमल हात आहेत. (४)
गोल फिरत व्रजनारी गात आहेत, मध्ये प्रियकर (कृष्ण) आहे. शरद पौर्णिमेची सुंदर रात्र
आहे. (५) ही रास पहायला चौदा भुवनें, आणि इंद्र तिथे एकत्र झाले. सुंदर अशा
पारिजातकांच्या फुलांनी, कृष्णाचें त्यांनी स्वागत केले. (६) ब्रम्हा, रुद्र यांचे ध्यान करतात, पण
त्यांना याचा पार लागत नाही- या लीलानाथाचें (कृष्ण भगवानाचें) दर्शन करून नरसिंह
(आनंदाने) नाचूं लागतात (७)
आम्ही पूर्वी सांगितले आहे कीं नरसिंह महेतांचे कितीतरी साहित्य अजुनही अप्रसिध्द
आहे. त्या अप्रसिध्द रचनांतून, वरील, शुध्द गेय रचनेसारखी, समूहनृत्याला अनुरूप, अशी
गरबी, सापडली आहेः-
“शरद निशाए श्री महाराज के वनमां आविया रे, लोल-
मध निशाए वगाडी वेण के गोपिका चालियां रे- लोल १
श्रवणे सुणी मोरलीनो नाद के गोपी व्याकुल थयां रे- लोल
जे ज्यम हुंता पोताने धाम के, ते त्यम नीसर्यां रे - लोल
जुए नैणांभरी भरी नार के, गोपिका सुकोमली रे - लोल ३
वचन बोल्या श्रीममहाराज के कोहो केम आवियां रे- लोल
वलती बोली व्रजनी नार के तम आसरे आवियां रे- लोल - ४
रंगभर रास रमाडो नाथ के, शरद सोहामणी रे लोल,
उग्यो सोल कलानो चंद्र के अति रलियामणो रे- लोल ५
पूरण प्रीत जोई परब्रम्ह क रुहिया भीडीया रे लोल
------रे लोल- ६
वाजे ताल परवाज ने झांझ के वेणा वांसली रे, लोल
नाचे नरहरी नंदकुमार के गोपिका सहुं मली रे लोल- ७
चौकमां फरती व्रजनी नार के, वचे राधा- हरि रे लोल,
नव सत सजिया छे शणगार के पालव घुघरी रे लोल ८
हमची ले हरिजीनी साथ के ताली ले हाथमां रे लोल
नाचे नटवर मदनगोपाळ के युवतीनां साथमां रे लोल- ९
अंतरिख देवता रहीने जोय के पुष्पे वधावता रे लोल
नवनवोन्मेषशाली कवी 73
रूपे रुंडो नरसैयानो नाथ के मनमे भावना रे लोल- १०
(या शरद रात्रीं श्री महाराज (कृष्णभगवान) वनांत आले. मध्यरात्री - मुरली वाजवली आणि
गोपिका निघाल्या (१) कानानी मुरलीचा आवाज ऐकला आणि गोपिका व्याकुळ झाल्या,
स्वतःच्या घरीं, त्या ज्या स्थितीत होत्या, त्याच स्थितीत, त्या बाहेर पडल्या (२) पूर्णानंद
परब्रम्हाला पाहिलें आणि शुध्दबुध्द हरपून गेली, सुकोमल गोपिका डोळे भरभरून पहातच
राहिल्या- (३) श्री महाराज (कृष्णभगवान) म्हणाले सांगा, कां आलांत ? उलट बोलीने
गोकुळच्या नारी म्हणाल्या “तुमचा आधार, म्हणून आलो” (४) शरदऋतू मोठा रमणीय, नाथ,
आनंद पूर्ण क्रीडा करवा.” १६ कलांनी परिपूर्ण चंद्र उगवला आहे. तो फारच सुंदर दिसंत
आहे.(५) गोपिकांची पूर्ण प्रीती पाहून परब्रम्ह श्रीकृष्णांनी त्याना हृदयाशीं धरले- (६) (मधली
ओळ नाही)
टाळ, पखवाज, झांज, वेणु, मुरली- वाजत आहेत. नरहरी नंदकुमार, गोपिका सर्व मिळून
नाचत आहेत- (७) चौकांत गोपिका फिरत आहेत (गोलाकार) आणि राधाकृष्ण मध्यें आहेत.
घुंघरे- साड्यांचे पदर एकंदरीत १६ शृंगार करून सारे सजले आहेत (८) हरीच्या बरोबर
आम्ही टाळी देतो, आमची टाळी हातावर घे. नटवर मदनगोपाल, युवतीना बरोबर घेऊन नाचत
आहे (९) अंतरीक्षांतून देवता पहात आहेत आणि फुलें उधळीत आहेत. रूपाने नरसिंहाचा
स्वामी सुंदर आहे. मनांत प्रेमभावना आहेत)
या पूर्वीच्या गरबीत ‘रास रम्याना कोड’ ची गोष्ट आहे तर या गरबी गीतांत ‘रास रमाडो’
(क्रीडा करवा) च्या बरोबर ‘हमची ले हरीजीनी साथ (हरीच्या बरोबर आमची साथ घे) अशी,
रास आणि ‘हमची’ दोन्ही सूचना आहेत. स्त्रीपुरुष एकत्र जमून समूह नृत्य करतात, तेव्हां हमची
(आमच्या) टाळीचा ताल घे, असे खूप सुचकतेने म्हटले आहे. एक तिसरी ‘गरबी’ पण मिळाली
आहे. ती पण अजून अप्रसिध्द आहे.
“रुडो आव्यो आसो मास के नवरंग शरद भली रे लोल
गरबे रमे श्री गोकुलनाथ के संग गोपी बनी रे लोल - १
पलक्ट वाली के पावडीए चडो रे लोल
प्रभुजीने कुंडल झलके कान के मुगट हीरे जडो रे लोल- २
वा'लो मारो वाहे मधुरो वांस के गोपी सहु सांभळे रे लोल
अबला नाहानी मोटी नार के सहु टोले मले रे लाल- ३
पेहेरां चरणां ने वली चरी के चाली फसमसे रें लोल
पेहारा मोतीना शणगाट के मेहेला- मन हसे रे लोल- ४
मस्तक लीधां महीना पाट के चतुरु चालती रे लोल
74 नरसी मेहता
अमरीत वेणने चंचलनेत्र के प्रभुने निहालती रे लोल ५
आव्यां बंसीवटने चोक के रमवा नाथ शुंरे लोल
वा'ले मारे बलवंत भीडी बाथ के कोमल हाथ शुं रे लोल -६
कडी रमत रमे रंगीलो के राधा रस भरां रे लोल
ताहां तो थई रह्यो थेहिकार के वागे घुघरी रे लोल- ७
(रमणीय, आश्विन मास आला. नवरंगी शरद ऋतू मस्त वाटतो आहे. श्री गोकुलनाथ गरबा
खेळत आहे, बरोबर गोपी आहेत- १) प्रभु (कृष्ण) ने पितांबराचा शेव बांधला आणि पायांत
खडावा चढवल्या. कृष्णप्रभूच्या कानांत कुंडले झळकत आहेत, आणि मुगुटांत हिरे जडवलेले
आहेत- (२) प्रिय कृष्ण मधुर मुरली वाजवत आहे आणि सर्व गोपी ऐकत आहेत, लहान, मोठ्या
सर्व अबला नारी, मेळाव्यांत सामील झाल्या आहेत. (३) कोणी घागरा (परकर) नेसल्या, कोणी
रेशमी चोळ्या घातल्या. मोत्यांचे दागिने घालून सजल्या. त्यांचे आनंद पूर्ण मन हसत होते.
(४) हृदयाची हंडी डोक्यावर घेऊन, चतुर स्त्री चालु लागली. चंचल नेत्रांनी अमृत पूर्ण बांसरी
आणि कृष्णप्रभुला पहात राहीली (५) बांबूंच्या बनांतल्या चौकांत, कृष्णनाथाबरोबर क्रीडा
करण्यासाठी गोपी आल्या, माझा प्रिय बलशाली कृष्ण त्यांना भेटला, कवेढे कोमल हात (६)
सुंदर क्रीडेत रंगेल रसीक कृष्ण रमला आणि राधा रसमय झाली. तितक्यात तिथे थै थै आवाज,
आणि घुंगरांचा झणकार दुमदुमला. (७)
या गरबीची सोडून दिलेली दोन कडवी वाहाला मारा वृंदवन रे चोक' या गरबी गीताच्या
शेवटच्या दोन कडव्यांशी साम्य असणारी आहेत. अश्विन महिन्यांत श्री गोकुळ नाथ आणि
गोपी गरबी खेळतात अर्थात् गरबा प्रकारातले समूहनृत्य करतात, हे या गरबी गीतांत, कवीला,
सांगायचे आहे. पांचशे वर्षांपासून गुजरात, सौराष्ट्र भूमीवर 'गरबा' प्रकारचे समूहनृत्य
अस्तित्वांत होते, या धारणेला, दुजोरा मिळतो आहे आणि तो पण 'नरसिंहांच्या काव्यवाणींत'.
६ उपसंहार
आतांपर्यंत एक गोष्ट सहज स्पष्ट झाली आहे, की प्राकृत- अपभ्रंशांचे युग संपले होते
आणि गुजरात सौराष्ट्राच्या भुमिवर लोकभाषानी आधुनिक स्वरूपाची विकासाची पावले
टाकायला सुरवात केली होती. या काळाच्या प्रारंभीच नरसिंह महेतांचा जीवन काळ सुरू
झाला होता. त्यांनी आपल्या जीवनाची रुपरेषा ठरवून, प्रभूचा भक्त म्हणून श्रीकृष्णांच्या लीला
वर्णन करण्यावर आपली दृष्टी केंद्रित केली. यांच्या आत्मचरित्रपर काव्यांत, अनेक
चमत्कारपूर्ण घटना यांनी वर्णिल्या आहेत. त्यावरून त्यांनी भक्त म्हणून परमतत्त्व परमात्म्याच्या
चरणी मस्तक ठेवून कशा रितीने जीवन निर्वाहाचा प्रयल केला होता हे पहायला मिळते.
त्यांच्या काव्यांत चमत्कारपूर्ण घटनांमागे कोणती किल्ली होती, ते ही त्यांनी विशद केले आहे.
त्यांचे ‘ दीव्य चक्षू ’ म्हणजे सामान्य भाषेत त्यांची कवी प्रतिभा चमत्कारपूर्ण घटनांचे वर्णन
म्हणजे त्यांच्या कवीप्रतिभेचे सर्जनच. त्या काळांत भारतांतील ब-याच भागांवर मुस्लिमांचे
आधिपत्य होते आणि भारतीय लोक एकप्रकारचे असहाय्य जीवन अनुभवतीत होते. लोकांना
धर्म आणि ईश्वराभक्ती ठेवण्यासाठी, वैष्णव भक्तीचे आचार्य संत, महंत, आणि भक्त मोठ्या
प्रमाणांत प्रयलशील होते. या परंपरेचा अनुभव, आपल्याला नरसिंह महेतांच्या काव्यकृतींत
येतो. यांच्या पुढें, भागवत पुराण, गीता, जयदेवांचे गीतगोविंद वगैरे वैष्णव धर्माशीं मिळते
जुळते साहित्य तर होतेंच, त्याशिवाय नामदेव आणि कबिरांचे साहित्य होते. नरसिंहांच्या
उत्कट कवीप्रतिभेने, त्यांतून प्रेरणा घेतली आणि गुजराती भाषेच्या चरणांशी तिच्या साहित्य
इतिहासातील, विस्तृत पदसमूह, खेळत ठेवला.
त्यांच्या जीवनाच्या आरंभीच आपण पाहीले की त्यांच्याबद्दल ऐकून, लहान थोर हरिभक्त
तळाजाला, त्यांच्याकडे येत असत. त्यांच्या भावा, भावजयीला ही गोष्ट आपतीच वाटे.
परिणामी, नरसिंहांनी गृहत्याग केला. नंतर भक्तिसाहित्याच्या परिचयामुळे भगवत गुणानुवाद,
काव्यांत उतरवायचा त्यांना नाद लागला आणि तोच त्यांचा आधार ठरला. संत अभ्यागताना
त्यांच्याकडून सन्मान मिळत असावा असे यात्रेकरूंच्या ‘हुंडी’ घटनेवरून वाटते. नरसिंहाच्या
76 नरसी मेहता
घरी जी जी मंगल कार्ये झाली, तीं कोणत्या ना कोणत्या प्रकारें, उत्तम प्रकारे पार पडली. त्या
मागे ईश्वर कृपा नियामक मानून नरसिंहांनी गीतेतला अनन्य भगवत् शरणाचा सिद्धांत
आचरणांत आणला. आजच्या २० व्या शतकांतल्या युगांत, या प्रकारची भगवत- शरण-
भावना बुध्दिवादी लोकांच्या गळी उतरणे शक्य नाही. तरीपण संकट येते, आणि सर्व उपाय
हरतात, म्हणून अत्यंत नैराश्य येते, तेव्हां अनन्य शरण भावना काय असेल, त्याचा विचार येऊ
शकतो.
'वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड पाई जाणे रे' - अशा राष्ट्रीय पातळीवरील भक्तिगीतांत
वैष्णव भक्तांची जी व्याख्या दिली आहे ती, नरसिंहांच्या स्वानुभवांचा 'परिपाक' आहे. असे
जीवन मानव मात्रांना जरुरी आहे असा सारांश हे पद रुजु करीत आहे.
नरसिंहांपासून सुरु झालेले भारताचे हे युग भक्ती चे होते. विशाल भक्तिसाहित्य निर्माण
करून भारतांतील अनेक भागांत, ३०० वर्षांपर्यंत, भक्तीप्रवृत्तिद्वारे दीन दुःखींत लोकांना नरसिंह
दिलासा देणारे ठरले. राष्ट्रीय जीवनाला उदात्त बनवण्यासाठी ज्या निरनिराळ्या तत्त्वांची जरुर
असते. त्यामध्ये अनासक्तिपूर्वक भगवानाप्रित्यर्थ अनन्य शरणभावना हेंही आदरणीय तत्त्व
आहे, असे नरसिंह मेहतानी व्यतित केलेल्या जीवनावरून लक्षात येते. असा एक महान भक्त
कवी गुजरात सौराष्ट्राच्या भुमीला विभुषित करून गेला, ही या भूमीची धन्यता आहे. याच
भुमीने आपले जीवन म्हणजे मूर्तिमंत 'अनन्यशरणभावना' करुन टाकले. अनासक्त योगी,
कर्मनिष्ठ, गांधीजीना जन्म दिला. नरसिंह महेता पण गांधीजींच्या जीवनांत एक आदर्श रूप
होते.
निवडक पदें
वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड पराई जाणे रे,
परदुःखे उपकार करें, पण मन अभिमान न आणे रे- १
सकळ लोकमां सहुने वंदे, निंदा न करे केहेनीरे,
वाच काछ मन निर्मळ राखे, धन जननी तां तेहेनी रे, -२
समदृष्टी ने तृष्णा त्यागी, परस्त्री जेहेने माता रे
जिव्हाए असत्य नव बोले, परद्रव्य न झाले हात रे -३
माया मोह लोपे नहि तेहेने, चित वेराग मन मोहे रे
कृष्णनामनी ताळी राखे, अडसठ तीरथ तेहेने तन मोहरे -४
वणलोभी वळी कपट रहित कामक्रोध जेणे मार्यां रे
भणे नरंसियो तेहनुं दरसण करतां कुल एकोत्तर तारयारे- ५
(दुस-यांची पीडा जो ओळखतो, त्याला वैष्णव म्हणावे. दुस-यांच्या दुःखांत जो उपकार
करतो, पण, मनांत त्याचा (कधीही) अभिमान बाळगत नाही- सर्व ठिकाणी, जो सगळ्याना
वंदन करतो, निंदा कोणाचीही करीत नाही. वाचा, काया, मन जो शुध्द ठेवतो- त्याची जननी
धन्य - जो समदृष्टी आहे आणि ज्याने आसक्तीचा त्याग केला आहे, परस्त्री ज्याला माते समान
आहे - जो असत्य वाणी उच्चारत नाही, दुस-याच्या द्रव्याला जो शिवत नाही- माया मोहाचा
ज्याला लेश नाही. ज्याच्या मनात वैराग्य आहे, कृष्णनामाशी जो एकरूप झाला आहे, अडसठ
तीर्थे त्यांच्या मनांत आहेत. ज्याला लोभ नाही, शिवाय जो कपटरहित आहे, काम क्रोध ज्याने
मारून टाकले आहेत, नरसिंह म्हणतात, अशा माणसाचे दर्शन केले तर एकाहत्तर कुळे तरून
गेली समजावे.
वास नही ज्यां वैष्णव केरो, त्यां नव वसिये वासडियां
श्वासोश्वास हरिस्मरण न करे जो, श्वास धमण केरो श्वासडियां -१
जीभ लडी जपमाळ न जपे तो, जीभलडी नहि खासडिया
78 नरसी मेहता
जनम तेहेनो नहि लेखामां, जे न कहेवाय हरि- दासडियां- २
मोहनमीनी माया पाखे, अवट माया जम फांसडिया,
भणे नरसियो भारे मारी मावलडी दस मासडिया- ३
(जिथे वैष्णव राहात नाही, तिथे मुरलीधर रहात नाही. श्वासोच्छ्वासात जो हरी-स्मरण करीत
नाही, तो श्वास म्हणजे लोहारा भाता- जिभेने जो जप करीत नाही, ती जीभ म्हणजे चामड्याची
वहाण. जो स्वतःला हरीभक्त म्हणवत नाही, त्याचा जन्म दखल देण्यासारखा नाही. मोहनाची
(कृष्णाची) माया सोडून दूसरी माया म्हणजे फासच. नरसिंह म्हणतात, १० महिने माझ्या
आईला माझा (फुक्कट) भार झाला)
बाई, मुने हरि जोवानी टेव पडी
मारा नाथने न मुकुं एक घडी
वेधतुं मन अलगुं न रहे, एवी हरजी शुं प्रीत जडी- १
आखा धाडानो रळी खळी आव्यो, भाभीए मुक्युं न पाणी
मे जाणंु धु तणी पेरे करूं, भाभी नही गोराणी- २
नामानुं छापरुं छाही आपयुं कबीरानी अविच्ल वाणी
ते पाईता हुं हएश भलेरो छबिलोजी मुकशे पाणी ३
धन्य वृंदावन्, धन्य ए भाभी, धन्य जमुनाजीनु पाणी
धन्य नरसैयानी जिभळडी, पछे छबीलाजीनी वाणी- ४
(बाई, मला हरीला पहायची सवय झाली. एक क्षणही मी माझ्या नाथाला सोडणार नाही.
माझें त्याच्याकडे वेधले गेलेले मन, दूर रहात नाही. हरीवर माझी अशी प्रीती जडली आहे.
दिवस भराचा मी थकून भागून आलों, भावजयीने पाणी दिलें नाही. मी समजलों, धृवाप्रमाणे
मी करावे. माझी वहिनी, वहिनी नाही, माझी गुरु आहे (२) नामदेवांचे छप्पर चाळून दिले.
कबीराला अविचल (काव्य) वाणी दिली. ती मला मिळाली तर मी मोठा होईन - मला कृष्ण
पाणी देईल. धन्य ते वृंदावन धन्य ती वहिनी, धन्य यमुनेचें पाणी- धन्य नरसिंहाची जीभ,
जिच्यामागे कृष्णाची वाणी आहे.)
संतो, अमे रे वेहपारिया श्री रामनामना
वेपारी आवे छे बधा गामगामना
अमारुं वसाणुं साधु सहुकोने भावे
अठारे वरण जेहेने वोहोरवाने आवे
अमारु वसाणु काल दुकाळे न खुटे
जेहेने राजा न दंडे जेहेने चोर न लुटे- २
निवडक पदे ७९
लाख दिनाना लेखां नहि, ने पार विनानी पुंजी,
वोहोरखुं होय तो वोहारी लेजो, कस्तुरी छे सूंघी- ३
राम नाम धन हमारे वाजे ने गाजे
छप्पर उपर बेर भेरी पुंगळ वाजे
आवरो ने खातावहीमां लक्ष्मीवरनुं नाम
चिठीमां चतुर्भुज लिखियां, नरसेयानुं काम- ४
(संतजनहो, आम्ही रामनामाचे व्यापारी आहोत. गांव, गांवचे सर्व व्यापारी येत राहातात(१)
आमचा माल साधू लोकांना आणि इतरांनाही आवडतो. अठरा पगड जातीचे लोक हा माल
भरभरून घ्यायला येतात. कोणत्याही काळांत दुष्काळांतही आमचा माल उणा पडत नाही.
याला राजा दंड देत नाही की चोर लुटत नाही. (२) लाख शिवाय मालाचा हिशोब नाही. अपार
अशी पुंजी आहे. घ्यायचा असेल तर माल भरभरून घ्या. ही स्वस्त कस्तुरी आहे(३) राम
नामाच्या आमच्या धनाचा मोठा गाजावाजा आहे. भरभेरी, पिपाणी अशी छप्पन्नच्या वर वाद्यें
वाजत राहतात. खातेवहीत लक्ष्मीवराचें ' नाव लिहा. चतुर्भज नाव नोंद वहीत लिहिण्याचे
काम नरसिंहाचे आहे)
प्रेमरस पाने, तुं. मारेनां पिछधर
तत्वनुं तुं 'पण' तुच्छ लागे
दुबळा ढोरनुं कुशले मन चले, चतुरधा मुक्ती तेओन मागे.
प्रेमनी वात परीक्षित श्री छयो नही, शुकजीए समझी रस सताडया
ज्ञान वैराग्य करी ग्रंथ पुरो करयो, मुक्तीनो मार्ग सूधो देखार्डया
मारीने मुक्ती आपी घणा दैत्याने, ज्ञानी विज्ञानी बहुमुनीरे जोगी
प्रेमने जोग तो व्रजतणी गोपिका, अवर विरला कोई भक्त भोगी
प्रीतने मुक्ती तो परम वल्लभ सदा, हेतुना जीव तो हेतु मुडे
जन्मोजनम लीलारस गावतां लहाणना बाहाण जेम द्वारछुटे- ४
मे ग्रहयो हाथ गोपिनाथ गरवा तळी, अवर बीजं कोईये नहि भावे
नरसिया महामती गाय छे गुणकथी, जतीसतीने तो स्वप्ने आवे
(मोराचे पीस धरणा-या, (केसांत) मला प्रेमरस पाज- त्याच्यापुढें मला तत्त्वचर्चा तुच्छ
वाटते. दुबळ्या ढोरांचे मन गवताकडेच ओढ घेणार- ती ढोरें चतुर्विधा मुक्ती नाही मागणार
(१) प्रेमाची महती परीक्षितीने ओळखली. मुक्ती नाही, शुक मुनींना तें समजले आणि त्यांनी
प्रेमरस लपवला (सांगितला) नाही ज्ञान वैराग्य समजावून ग्रंथ पुरा केला आणि मुक्तीचा सरळ
मार्ग दाखवला. (२) अनेक राक्षसाना ठार मारून (कृष्णाने) मुक्ती दिली. अनेक ज्ञानी, विज्ञानी,
80 नरसी मेहता
मुनी आणि योगी, जनाना पण मुक्ती दिली. गोकुळच्या गोपींना प्रेमयोगाने मुक्ती मिळाली.
क्वचित् कोणी भोगी भक्ताला मुक्ती दिली(३) प्रीतीची अत्यंत प्रीय म्हणजे मुक्ती (जिथे प्रेम
तिथे मुक्ती हा ईश्वरी नियम) जीवांच्या हेतुनुसार त्यांचे हेतु पुरे होतात. जन्मोजन्मी लीलारस
गातांगातां, कोड कौतुकाच्या नावे प्रमाणे, जन्म मृत्यूचे दार सुटून जाऊन मुक्ती येते (४) अत्यंत
श्रेष्ठ अशा गोपीनाथाचा हात मी धरला आहे, मला याहून दुसरे कांहींही आवडत नाही. नरसिंह
मोठा बुध्दिवान, भगवंतांच्या गुण- कथा गातो. अशा गुण- कथा की ज्या एकाद्या जातीच्या
(साधू) अगर सतीच्या स्वप्नांतही येणार नाहीत
(मधुर भक्तीचीं पदें)
ध्यान धर हरितणुं, अल्पमती आळसु
जे थकी जन्मनां दुः ख जाये
अवर धंदो करिय कैं नव सरे
माया देखडिने मृत्यु वहायेत्र १
सकल कल्याण श्रीकृष्णनां चरणमां
शरण आवे सुख पार होये
अवर वेपार तुं मेहल्य मिथ्या करी
कृष्णनुं नाम तुं राख मों ओ- २
पटक माया परी, अटक चरणे- हरि
वटकथमां वात सुणतांज साची
आशनुं भवन आकाश सुधी रच्युं
मूढ, ए मूळथी भींत काची- ३
अंग जोबन गयुं, पलित पिंजर थयुं
तोय नथी लेतो 'श्रीकृष्ण' केहेवु
चेत रे चेत, दिन चार छे लाभना
लींबु लेहकावतो राज लेवुं- ४
सरस गुण हरितणा जे जन अनुसरया
ते तणा सुजश तो जगत बोले
नरसिंया रंकने प्रीत प्रभु- शुं घणी
अवर वेपार नहि भजन- तोले- ५
(हे मंदबुध्दी आळशी माणसा, हरीचें ध्यान धरं. तुझ्या जन्मभराचें दुः ख ज्यामुळे नाहीसे
होईल. दुसरा धंदा करून कांही अर्थ निघणार नाही. संसार मायेत फसून गरज ओढवेल - (१)
निवडक पदे 81
कृष्णाच्या चरणांशी सारे कल्याण आहे. जो श्रीकृष्णाचा आश्रय घेतो तो सुखाच्याही पार जातो.
असत्य मानून तूं दुसरें धंदे सोडून दे. कृष्णाचे नामस्मरण तुझ्या मुखांत राहूंदे (२) माया परी,
निग्रहाने सोड आणि श्रीकृष्ण- चरणांशी बध्द रहा. कथेमध्ये कथाकार सांगतात ती गोष्ट अगदी
सत्य आहे. आशेचा महाल आकाशापर्यंत बांधलास, पण हे मूर्खा, पायांपासून त्याची भींत
कधी आहे. अंगांतले तारुण्य संपले, शरीर एक अस्थिपंजर झालें तरीपण श्रीकृष्णाचे नाम हा
घेत नाही. जागा हो अरे बाबा, जागा हो, लाभ करून घ्यायचे दिवस चार (फार कमी) राहिले.
लींबु उडवून झेलायचे आणि राज्य घ्यायचे (तितकाच वेळ आहे) हरीच्या उत्कृष्ट गुणांचे ज्यांनी
अनुकरण केले, त्यांची कीर्ति, जगाने गायली या दरिद्री नरसिंहाला कृष्णाची इतकी प्रीति, वाटते,
कीं दुसरा कोणताही उद्योग भजनाच्या तुलनेत, येत नाही)
जे गमे जगत- गुरुदेव जगदीशने
ते तणो खरखरो फोक करवो.
आपणो चिंतव्यो अर्थ काई नव सरे
उगरे एक उद्वेग धरयो
हु करूं हुं करूं एज अज्ञानता
शकटनो भार ज्यम श्वान ताणे
सृष्टी गंडाण छे सर्व एणी परे
जोगी जोगेश्वरा कोक जाणे- २
नीमजे नरथी तो कोई रेहे ना दुखी
शत्रु मारीने सहु मित्र राखे
राय ने रंक कोई दृष्टे आवे नही
भवन पर भवन पर छत्र दाखे- ३
ऋतु लता पत्र फल फूल आपे यथा
मानवी मूर्ख मन व्यर्थ शोचे
जेहना भाग्य मां जे समे जे लख्युं
तेहने ते समे ते ज पहुंचे- ४
सुख संसारी गिथ्या करी मानजो
कृष्ण बिना बीजुं सर्व काचुं
जुगल कर जोडी करी, नरसिंयो एम कहे
जन्म प्रतिजन्म हरि ने ज जाचुं- ५
(विश्वाच्या गुरुस्थानी असणा-या जगदीशाला जे आवडते, त्याचे दुःख तूं करूं नको.
82 नरसी मेहता
आपण विचार करून कांहींच अर्थ निष्पन्न होत नाही, उगीच उद्वेग मात्र निर्माण होतो. मी कर्ता
मी धर्ता हेंच अज्ञान. गाडीचा भार तोच उठवतो आहे, असें कुत्र्याला वाटावे तसें सृष्टीचें सर्व
कार्य त्याच्या (ईश्वराच्या) भरवशावर चालत आहे. योगी, योगेश्वराला एकादाच ओळखतो.
माणसाने निर्मिती केली असती, तर कोणी दुःखी राहिला नसता. शत्रूला मारून सर्वांनी मित्र
शिल्लक ठेवले असते. श्रीमंत आणि गरीब यांत फरक राहिला नसता, आणि घराघरावर छप्पर
राहिले असते(३) ऋतूनुसार लता, पाने, फळें आणि फुलें देते. मानवाचें मूर्ख मन उगीच विचार
करत रहाते. ज्याच्या भाग्यांत जें, ज्या वेळी, मिळायचे असते, त्याला तें त्या वेळींच मिळते.(४)
संसारातले सुख खरे नाही हे समजून राहा. एका कृष्णाशिवाय बाकी सर्व अपुरें आहे. दोन्ही
हात जोडून नरसिंह म्हणतात, जन्मोजन्मी मी हरीलाच भजत जाईन.)
शरीर शोध्या विना सार नहि सापडे
पंडिता पार नहि पामो पाये
तांदुला मेहेलीने तूषने वळगी रहयो
भुख नहि भागे एम ठाले थोथे- १
रसना स्वादमां सर्व रुंधाई रहया
विगति गुरु- ज्ञान विना रे गुंथे
वाणी- विलासमां विविध वाणी वडे
परहरी वस्त्रने वळगे चुंथे शरीर- २
शास्त्र कथा कहे रजनिमां आथडे
एम अज्ञानमां शीश गोठे
प्रपंच पिंडमां रहयो अहंकार नव गयो
आथडयो एम अनंत कोठे- ३
शब्द शीखे खरो, सकल विद्या भण्ये,
अध्यात्म उचरे आवी आये
भणे नरसियो, जे भेद जाणी जुओ
में तो रची कहयुं पद चोथे- ४
(शरीर शुध्द केल्याशिवाय तत्त्व सापडणार नाही. पंडिताला त्याचा पार कधी लागला नाही.
तांदूळ सोडून कोंड्याला चिकटून बसले. तोंडात चोथा कोंबून भुख भागत नाही (१) जिभेच्या
चोचल्यांत सर्व राहून गेले. गुरु ज्ञाना अभावी दुर्गती होत जाते. विविध शब्दांनी वाणी विलास
करते आणि नेसलेल्या वस्त्राला चिकटून बसून शरीर त्रासवते. शास्त्र सांगते, कथा सांगते पण
काळोखांत (अज्ञानात) धडपडते. अज्ञानांत बुध्दी खर्च करते. मुळापासून संसारी, त्याचा
निवडक पदे ८३
अहंकार गेला नाही. असाच अगणित गोष्टींत अडकला. शब्दज्ञान घेतलं खरं, सगळ्या विद्या
संपादन केल्या. त्यांतून अध्यात्म वरवर येत गेले. नरसिंह म्हणतात हे भेद ओळखून पहा
(शब्द पंडीत आणि आत्मज्ञानी मधला) मी तर चौथे पद रचून, हें सांगितले)
ज्यां- लगी आतमा तत्व चीन्यो नही, त्यां- लगी साधना सर्व जुठी
मानुष देह माहरो एम एणे गयो, मावडांनी जेम वृष्टी वुठी- १
शुं थयुं स्नान सेवा ने पूजा थकी ? शुं थयुं घेर रही दान दीधे ?
शुं थयुं धरी जटा भस्मलेप करये ? शुं थयु वाळ- लोचंन कीधे ?
शुं- थयुं तप ने तीरथ कीधा थकी ? शुं थयुं माळ ग्रही नाम लीधे ?
शुं थयुं तिलक ने तुलसी धार्या थकी ? शुं थयुं गंगजळ पान लीधे ?
शुं थयुं वेदव्याकरण वाणी वधे ? शु थयुं राग ने रंग जाण्ये ?
शुं थयुं खट दर्शन - सेवा थकी ? शुं- थयुं वरणना भेद आण्ये ?-४
ए जे परपंच सहू पेट भरुवा तणा, आत्माराम परब्रम्ह न जोयो
जाणे नरसिंगा जे तत्त्वदर्शन विना, रत्न चिंतामणी जन्म खोयो- ५
(जोपर्यंत आत्मतत्त्व ओळखलें नाही, तोंपर्यंत सर्व साधना झूट आहे. तुझा मानव देह
असाच वाया गेला- जशी पाण्याशिवाय ढगांची वृष्टी, फुकट असते (पाऊस येईल असें वाटण्या
सारखे वातावरण होते पण पाऊस पडत नाही, त्याला मावडोनी वृष्टी म्हणतात) स्नान, सेवा
आणि पूजा करून काय झाले ? (कोणता आध्यात्मिक फायदा झाला ?) घरांत राहून दान
दिले, पण काय झालं ? जय वाढवून, भस्म चोळून, काय झाले ? मुंडण करून काय झाले ?
(२) तप करून तीर्थयात्रा करून काय झाले ? माळ घेऊन नामजप केला- काय झाले ? टिळा
लावून तुळशीची माळ गळ्यांत घालून काय झाले ? गंगाजळ सेवन केले, काय पडले
पदरांत ? (३) वेद सांगून, व्याकरण सांगून, मोठेमोठे शब्दज्ञान सांगून काय झाले ? राग, तसे
रंग ओळखून काय झाले ? धार्मिक नित्यकर्म केले दर्शन केले, सेवा केली, पण काय झाले ?
वर्णभेद स्पष्ट केले (पण) काय झाले ? - (४) हे सारे उद्योग केवळ पोट भरण्यासाठी- आत्माराम
परब्रम्ह यांनीं कधी अभ्यासला (पाहिला) नाही. नरसिंह म्हणतात तत्त्वदर्शनाशिवाय, चिंतामणी
रत्नासारखा, मानव जन्म फुकट गेला)
एक तुं एक तुं एम सहुको स्तवे
कोण हुं ए नही को विचारे
कोण छुं क्यां थकी आवियो जग विषे
जेश क्यां छुटशे देह त्यारे ?- १
प्रतिदिन जड कने जै करी मागतो
84 नरसी मेहता
ईश तु साह्य थाजे सदारे
लोहय पण दुः ख तो लेश टळतुं नथी
थाकतो तो नथी तुं कदा रे - २
कोई तो उदधी गगनमां ताकता
भाखता जोवुं हुं नम्र वाणी
कोण हुं कोहोनी कने मागं शा हक थकी,
ए नथी जाणता मूर्ख प्राणी- ३
एण करतां कदी लाभ जो पामियो
तो कहे, हरी तणी साह्य थै रे
काम कथण्या थकी भविषने भांडतो,
पूर्वना कर्म जो हरि भजे नव टले
तो कहो, कोण ए काम करशे ?
सत्य समझी कदी परमपद परखशे
भव- भय- भ्रमने ते ज हरशे- ५
आकना वृक्षथी अमृत फल तोडवां
मूर्खो जो कदी आश धरशे
श्रमवृथा तेहनो तो जई जगविशे
ज्ञान हीणो सदा ते ज ठरशे- ६
जीव ईश्वर अने ब्रह्मना भेदमां
सत्यवस्तु नही सद्य जडशे
हुं अने तुं पणु तजीश, नरसियां तुं
गुरुतणी हर्षथी पार पडशे- ७
( तूं एक तूं एक अशी सर्व प्रार्थना करतात. मी कोण हा विचार कोणी करीत नाही. कोण
आहे मी, कुठून आलों, या जागांत. शरीर सुटेल तेव्हां मी कुठे जाईन (हा विचार कोणी करीत
नाही) - १ रोज जयजयकार करून, ' प्रभू मला सतत साह्य कर' असें मागणे तूं 'जडा' शी
मागतोस. दुः ख लेशमात्रही टळत नाही. तरीही तूं कधींच थकत नाही रे - (२) कोणी मान
वर करून आकाशांत पहातो आणि नम्र वाणीने प्रार्थना करताना मी पहातो. मी कोण, कोणाशी,
कोणत्या हक्काने, मागत राहूं हें मूर्ख प्राणी जाणीत नाही- (३) असं करतां करतां कधी फायदा
झाला तर म्हणतो हरीने साह्य केले. काम बिघडले तर पूर्व कर्माला दोष लावून, भविष्याशी
भांडतो - (४) हरीचें भजन करून पूर्वकर्म टळले नही, तर सांगा हें काम (हरीभक्ती करणे) कोण
निवडक पदे 85
करील ? सत्य लक्षांत घेऊन, केव्हांतरी परमपद जर ओळखील, तरच त्यांचे संसार भय आणि
त्यांचा संसाराचा भ्रम नाहीसा होईल- (५) रुईच्या झाडावरून अमृत फळें तोडायची आशा,
जर मूर्ख कधी करील, तर या जगांत त्याचे श्रम फुकट जातील. आणि तो सतत अज्ञानीच
राहील. (६) जीव, ईश्वर आणि ब्रम्ह यांच्या भेदभावांत, सत्यवस्तु सापडणार नाही. नरसिंहा,
मी- तूं- पण जर सोडशील, तर तूं गुरु उपदेशाने आनंद पूर्वक, संसार पार होशील)
हुं खरे तु खरो हु विना तुं नही,
हुं रे हैश तांहालगी तु रे हैशे
हुं जते, तुं गयो, अनिर्वचनी रह्यो
हुं विना कहे तुं ने कोण कहेशे - १
सगुण होय जहांलगी, निर्गुण तांहालगी,
एम कहे सदगुरु वात साची
सगुण शमतां निर्गुण गयुं छे शमी
शेष छे पूर्ण तांहां अनिर्वाची- २
जीव ने शीव तो नायक छे एक जो
जीवन होये तांहां लगे शीव होये
जीव शमतां शीव सेहेजे समाई गयो
टळी जाये द्वंद्व - हे नाम दोये- ३
ताहारा माहरा नामनो नाश छे
लूण ने नीर दृष्टांत जोते
महेतो नरसैं केहे, वस्तु विचारतां
वस्तुरूप थारो वस्तु पोते- ४
(मी सत्य तर तू सत्य, माझ्या अस्तित्वाशिवाय तुला अस्तित्व नाही. जोंवर मी आहे, तोवर
तूं असशील. मी गेल्यास तू गेल्यासारखाच आहेस- राहलास शेवटी अनिर्वचनीय. सांग,
माझ्याशिवाय, तुला कोण हाक मारणार ? (१) जोपर्यंत सगुण आहे, तोपर्यंत निर्गुण आहे. हें
सदगुरु सांगतात ते अगदी सत्य आहे. सगुण नाहीसें झाले की निर्गुण संपते- शेवटी रहातें ते
पूर्ण अनिर्वाची.(२) शीव आणि जीव पहा, एकच तत्त्व आहे. जीव आहे तिथे त्याला संलग्न
शीव आहे. जीव शमतो तिथे आपोआपच शीव शमतो. द्वंद्व संपते आणि दोन्ही नावेंही संपतात.
(३) तुझें, माझें हा निर्देश नष्ट होतो. मीठ आणि पाणी यांचा दृष्टांत लक्षांत घ्या. नरसिंह
म्हणतात वस्तूचा विचार करतां करतां, वस्तू स्वतः वस्तूरूप होऊन जोते(४)
निरख- ने गगनमां, कोण घुमी रहयो ?
'ते ज हुं', 'ते ज हुं' शब्द बोले
शामनां चरणमां इच्छु धुं मरण रे
अहिया कोई नथी कृष्ण तोले- १
श्याम - शोभा घणी, बुध्दी ना शके कळी
अनंत ओच्छवमां पंथ भूली
जड अते चैतन रस करी जाणवो
पकडी प्रेमे सजीवंत मूळी - २
जळहळ ज्योत उद्योत रवि कोटिमां
हेमनी कोर ज्यां निसरे तोलो
सच्चितानंद आनंद क्रीडा करें
सोनानां पारणा मांह्य झुले- ३
बत्ती विण, तेल विण, सूत्र विण जो वळी
अचळ झळके सदा अनंत दीवो
नेत्र विण निरखवो, रूप विण परखवो
वण जिह्वाए रस सरस पीवो- ४
अकल अविनाशी ए नव ज जाए कल्पे
अरध- उरधनी मांह्य माहाले
नरसिंयारो स्वामी, सकळ व्यापी रहयो
प्रेमनां तंतमां संत झाले- ५
(पहा ना, आकाशांत (हृदयांत) कोण फिरत आहे ? मीच तो मीच तो असे म्हणत आहे .
कृष्णाच्या चरणांशी मरावे अशी माझी इच्छा आहे. कृष्णाच्या तुलनेत इथे कोणी नाही (१)
बुध्दीला आकलन होणार नाही, अशी कृष्णाची शोभा (महती) आहे. अगणित समारंभांत
(ईश्वरानिमित्त) मार्ग विसरली आहे (बुध्दी) जड आणि चैतन्य यांचा एकरस करून (कृष्णाची
महती) जाणावी. प्रेमाने, ही संजीवन मुळी — (कृष्ण) पकड- (३) कोटी सूर्याचे तेज तिथे
झगमगत आहे. (परब्रम्हांत) जिथे ज्योत झाली आहे, परब्रम्ह कृष्णरूपाने अवतरल्यावर
सोन्याची कांति बाहेर आली आहे. बरोबरी करायला सोन्याच्या पाळण्यांत झोके घेण्याची
आनंदपूर्ण क्रीडा, सच्चितानंद करीत आहे. बत्तीशिवाय, तेलाशिवाय, वाती शिवाय पहा तर
खरं, अविरत, अचल, अग्नीचा दिवा कसा झगमगतो आहे डोळ्यांशिवाय पहावा, रूपाशिवाय
ओळखावा आणि याचा रसास्वाद जिभेशिवाय घ्यावा(४) हा अचल, अविनाशी कळला
जाणार नाही. हा वर (इकडे) खाली (तिकडे) आणि त्यांच्या मध्ये, मजा करीत आहे. नरसिंहाचा
निवडक पदे 87
स्वामी सर्व व्यापी आहे. संत, याला प्रेमरज्जुनी बध्द करतात(५)
अखिल ब्रम्हांडमा एक तूं श्रीहरी, जुजवे रूपे अनंत भासे
देहमां देव तुं, तेज मां तत्व तुं, शुन्यमा शब्द थई वेद वासे- १.
पवन तुं पाणी तुं भुमि तुं भूधरा, वृक्ष थई फुली रह्यो छे आकाशे
विविध रचना करी अनेक रस लवाने, शीव थकी जीव थयो एज आशे २
वेद तो एम कहे, श्रुतिस्मृती साख दे, कनक कुंडल विषे, भेद नोहिये
घाट घडिया पछी नामरूप जुजवां, अंत्ये तो हेमनु हेम होये- ३
ग्रंथ गडबड करी वात न करी खरी, जेहेने जे गमे तेहेने पूजे
मन कर्म वचनथी आप मानी लेहे, सत्य छे एज मत एम सुजे- ४
वृक्षमां बीज तुं, बीजमां वृक्ष तुं, जोऊ पटंतरो एज पासे
भणे नरसियो ए मन तणी शोधना प्रीत करू प्रेमथी प्रगट थाशे- ५
(संपूर्ण ब्रम्हांडांत वेगवेगळ्या रूपानी अनंत भासणारा श्रीहरी, तूं एक आहेस. देहांत तूं
देव आहेस. तेजांतले तूं (प्रकाश) तत्त्व आहेस. आकाशांत शब्द होऊन वेद बोलतोस (तूं)
(१) वायू तूं, पणी तु हे भुधरा, भुमि तूं आहेस. वृक्ष होऊन तूं आकाशांत फुलला आहेस.
अनेक रसास्वाद घेण्यासाठी तूं विविध रचना केल्यास. याच आशेने तूं शिवांचा जीव
झालास(२) सोने आणि सोन्याचे कुंडल यांत (तत्त्व) भेद नाही असे वेद म्हणतात आणि
श्रुतिस्मृति त्याला साथ देतात. घाट घडवल्यानंतर (त्या सोन्याची) नामे, रूपे, वेगवेगळी झाली.
शेवटी सोने तें सोनेच रहाणार (३) ग्रंथांत घोटाळे असतात, सत्य समजत नाही. ज्याला जें
आवडते ते त्याला पुजनीय वाटते. मन, कर्म आणि (ग्रंथ) वचनानुसार स्वतःला जें वाटतें तेच
सत्य आहे असें त्याचे मत होते(४) तूं वृक्षांतले बीज आहेस, आणि बीजांतला वृक्ष तूंच आहेस.
तुझ्यातच सामावलेले हे विभक्तपण मी पाहतो. नरसिंह म्हणतात, मनांत शोध कर. मी कृष्णावर
प्रेम करतो. प्रेमानेच तो प्रगट होईल- ५)
जागीने जोऊं तो जगत दीसे नही
ऊंघमां अटपटा भोग भासे
चित्त चैतन्य विलास तद्रुप छे
ब्रह्म लटकां करे ब्रह्म पासे- १
पंच महाभूत परब्रम्ह विशे उपनां,
अणुं अणुं मोहे रहया रे वळगी
फुलनां फळ ते तो वृक्षना जाणवा
थड थकी डाळ ते नहि रे अळगी २
जीव ने शिव ती आप इच्छाए ध्या
रची परपंच चौद लोक कीया
भणे नरसियो, ए तेज तुं तेज तुं
एहेने समरवाथी कै संत सीध्यां- ३
(जागृत अवस्थेत (ज्ञानी अवस्थेत) जग दिसत नाही. झोपेतच (अज्ञानी अवस्थेत) अटपटे
(गुंतागुंतीचे) भोग भासतात. मनांतल्या चैतन्याचे मनाशी तद्रुप होऊन केलेले विलास आहेत.
ब्रम्हाचे, ब्रम्हापाशीं हे (सारे) चाळे चालले आहेत. परब्रम्हातुन पंचभुते वर आली आहेत, आणि
अणुरेणुत, त्याना बिलगुन राहीली आहेत. वृक्षांची ओळख पटण्यासाठी फुल आणि फळ
असते. धडापासून फांदी वेगळी होत नाही. जीव आणि शीव स्वेच्छेने (जीवशीव) झाले, आणि
त्यांनी १४ भुवनांचा संसार थाटला. नरसिंह म्हणतात, हें सारे ते तूंच आहेस तोच तूं आहेस.
याचे (निरंतर) स्मरण करून कित्येक संत तरून गेले.)
मोहिनी - स्वरूप
आ जोने कोई उभी रे, आळस मोडे ।
बांहे बाजुबंद बोरखो, -होची, मनडुं मोहयुं छे एने मोढे
झांझर झमके ने वींछुआ ठमके हीडे छें वांके आंबोडे
सोवण झारी ते - अति - रे समारी, मांहे नीर गंगोदक होडे,
नरसिंयाने पाणी पावाने, हरिजी पधार्या कोडे- २
मोहया मोहया मुनिवरराया रे, गोरी तारे गाजुडे
रूप- स्वरूप कल्युं न जाये, में तो जाणी छे ईश्वरी माया- १
रुमझुम रुमझुम नेपुर वाजे, पावले अनि चीर ति चोपे रे
घुंघटमां मुख एणी पेर शोभे, मोटां मुनिजनना मन कांपे रे- २
गोरूं- शुं वदन ने गळस्थळ झळके उपर दांमणी लळके रे
साकुदाणी - कोर एणी पेर शोभे, जाणे गगनमां वीज चलके
वशीकरण वेणी तम्यो किहां गुंथावी, सुंदरी शणगटवाडी रे ?
आ चोळी तम्यो किहा सिवडावी जेने मोही व्रजनारी रे ?- ४
चंचल दृष्टे चौ- दश निहाळे, मोहे मदननो चाळो रे
नरसिंया-यो स्वामी जोवा सरीखडो कोई ए सुंदरी नु वदन- ५
(ही पहा ना, आळोखे पिळोखे देत कुणी उभी आहे. हिच्या दंडावर बाजुबंद आहेत, हातात
कांकणे आणि पोची आहे. हिच्या मुखाकडे पाहून माझें मन अगदी मोहित झाले आहे. हिचे
पैंजण झुणझुणत आहेत आणि जोडवी छुमछुम करीत आहेत. सैलसा आंबाडा घालून ही चालत
निवडक पदे 89
आहे. हिने सुवर्ण झारी खूप सजवली आहे. त्यांत गंगोदक झाकले आहे. नरसिंहाला पाणी
देण्यासाठी मोठ्या लाडानी कृष्ण आले आहेत - (२) हे सुंदरी, तुझ्या सौंदर्याच्या प्रिसिध्दिने
मोठेमोठे मुनी अत्यंत मोहित झाले. तुझ्या सौंदर्याने वर्णन शब्दांत सांगतां येत नाही. मला
तर वाटते, (तू) इश्वरी माया आहेस (१) तुझ्या पायांतली नुपुरे रुणझुण रुणझुण वाजताहेत.
तुझ्या पावलांखाली तुझे वस्त्र दबत आहे. हिचा घुंघटांतला चेहरा, स्वसौंदर्यानेच शोभतो आहे,
आणि मोठ्यामोठया मुनीजनांचे मन विचलित होत आहे.(२) हिच्या पावलांवर साडीचा काठ,
चमकतो आहे. (३) शृंगार करणा-या हे सुंदरी, वशीकरण करणारी ही वेणी तूं घातलीस तरी
कुठे ? ब्रजनारीला मोह पाडील अशी ही चोळी तू कुठे शिवून घेतलीस ? (४) ही चंचल
दृष्टीने, चारी दिशांकडे पहात आहे- मदनाचा चाळाच आहे हा. नरसिंहाच्या स्वामीसारखा,
हिचा सुंदर चेहरा कोणीतरी पहा ना- ५)
आ शो चतुरांना चितनो चाळो रे, एने कोई निहाळो रे- १
ब्रम्हाए तो नथी घडी भामिनी, ए तो आपे बनीने आवी रे- २
त्रणे लोकनुं तेज तारुणी, ए तो छबी, छवीले बनावी रे- १
घडयुं घरेणु एने रे हाथे, हाथे भरी छे चोळी रे,
साळुडे भात नव नारीकुंजरनी, कसूंबाना रंग मां बोली रे - २
श्वास पुरयो एने वृंदावनमां, गोवर्धन थकी आवे रे
ए नारीनी जात जे को जाणे, तेनो फेरो फावे रे- ३
कहिये छिये पण कह्युं नव माने, ए तो नारी नही गिरीधारी रे
ब्रम्हा इंद्र शेष शारदा, एना चरणतण अधिकारी रे,
अंतर हेत पोतानु जाणी, ए तो आपे छे, अंतरजानी रे,
व्यभिचार मुकी जुवो विचारी, ए तो नरसिंग्या-यो स्वामी रे
(कुणी पहा तर खरा, काय हा चतुर मनाचा चाळा. ही सुंदर स्त्री ब्रम्हदेवाने घडवली नाही.
ही स्वतः स्वतः ला निर्माण करून आली आहे. या तरुणीत तिन्हीं लोकांचे तेज आहे. ती तर
त्या छेलछबिल्याने (कृष्णाने) बनवली आहे (१) आपल्या हाताने कृष्णाने हिचे दागिने
घडवले, आपल्या हाताने हिच्या चोळीवर भरतकाम कले, या गज (गामिनी) स्त्रीची नव्या
प्रकारची साडी कुंसुबी रंगात बुडवून रंगवली आहे (२) वृंदावनाला याने जीवन दिले.
गोवर्धनच्या तिथून येतो आहे. या स्त्रीची जात (ओळख) जर कुणी जाणली, तर त्याचा हा
जन्मफेरा सफल झाला. (३) सांगितले पण सांगितलेले ऐकत नाहीत, ही स्त्री नाही, हा गिरीधारी
ब्रम्हदेव, इंद्र, शेषनाग, शारदा, याच्या चरणांशी बसायच्या योग्यतेच्या आहेत. (४) हा
अंतर्यामी, माझ्या मनांतला हेतू ओळखून, मला देत आहे. अनेक विचारांशी तद्रूप होण्यापेक्षां,