भक्त नरसिंह मेहता: जीवन एवं पद (वैष्णव जन तो तेने कहिये - गुजराती से हिन्दी रूपान्तरण)
Bhakta Narsi Mehta: Jeevan Aur Pad
भक्त नरसिंह मेहता (सम्पादक: रामचन्द्र तिवारी) द्वारा
पृष्ठ 78, कुल 99 में से
संदर्भ में पढ़ें76 नरसी मेहता
घरी जी जी मंगल कार्ये झाली, तीं कोणत्या ना कोणत्या प्रकारें, उत्तम प्रकारे पार पडली. त्या
मागे ईश्वर कृपा नियामक मानून नरसिंहांनी गीतेतला अनन्य भगवत् शरणाचा सिद्धांत
आचरणांत आणला. आजच्या २० व्या शतकांतल्या युगांत, या प्रकारची भगवत- शरण-
भावना बुध्दिवादी लोकांच्या गळी उतरणे शक्य नाही. तरीपण संकट येते, आणि सर्व उपाय
हरतात, म्हणून अत्यंत नैराश्य येते, तेव्हां अनन्य शरण भावना काय असेल, त्याचा विचार येऊ
शकतो.
'वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड पाई जाणे रे' - अशा राष्ट्रीय पातळीवरील भक्तिगीतांत
वैष्णव भक्तांची जी व्याख्या दिली आहे ती, नरसिंहांच्या स्वानुभवांचा 'परिपाक' आहे. असे
जीवन मानव मात्रांना जरुरी आहे असा सारांश हे पद रुजु करीत आहे.
नरसिंहांपासून सुरु झालेले भारताचे हे युग भक्ती चे होते. विशाल भक्तिसाहित्य निर्माण
करून भारतांतील अनेक भागांत, ३०० वर्षांपर्यंत, भक्तीप्रवृत्तिद्वारे दीन दुःखींत लोकांना नरसिंह
दिलासा देणारे ठरले. राष्ट्रीय जीवनाला उदात्त बनवण्यासाठी ज्या निरनिराळ्या तत्त्वांची जरुर
असते. त्यामध्ये अनासक्तिपूर्वक भगवानाप्रित्यर्थ अनन्य शरणभावना हेंही आदरणीय तत्त्व
आहे, असे नरसिंह मेहतानी व्यतित केलेल्या जीवनावरून लक्षात येते. असा एक महान भक्त
कवी गुजरात सौराष्ट्राच्या भुमीला विभुषित करून गेला, ही या भूमीची धन्यता आहे. याच
भुमीने आपले जीवन म्हणजे मूर्तिमंत 'अनन्यशरणभावना' करुन टाकले. अनासक्त योगी,
कर्मनिष्ठ, गांधीजीना जन्म दिला. नरसिंह महेता पण गांधीजींच्या जीवनांत एक आदर्श रूप
होते.