भक्त नरसिंह मेहता: जीवन एवं पद (वैष्णव जन तो तेने कहिये - गुजराती से हिन्दी रूपान्तरण)
Bhakta Narsi Mehta: Jeevan Aur Pad
भक्त नरसिंह मेहता (सम्पादक: रामचन्द्र तिवारी) द्वारा
पृष्ठ 77, कुल 99 में से
संदर्भ में पढ़ें६ उपसंहार
आतांपर्यंत एक गोष्ट सहज स्पष्ट झाली आहे, की प्राकृत- अपभ्रंशांचे युग संपले होते
आणि गुजरात सौराष्ट्राच्या भुमिवर लोकभाषानी आधुनिक स्वरूपाची विकासाची पावले
टाकायला सुरवात केली होती. या काळाच्या प्रारंभीच नरसिंह महेतांचा जीवन काळ सुरू
झाला होता. त्यांनी आपल्या जीवनाची रुपरेषा ठरवून, प्रभूचा भक्त म्हणून श्रीकृष्णांच्या लीला
वर्णन करण्यावर आपली दृष्टी केंद्रित केली. यांच्या आत्मचरित्रपर काव्यांत, अनेक
चमत्कारपूर्ण घटना यांनी वर्णिल्या आहेत. त्यावरून त्यांनी भक्त म्हणून परमतत्त्व परमात्म्याच्या
चरणी मस्तक ठेवून कशा रितीने जीवन निर्वाहाचा प्रयल केला होता हे पहायला मिळते.
त्यांच्या काव्यांत चमत्कारपूर्ण घटनांमागे कोणती किल्ली होती, ते ही त्यांनी विशद केले आहे.
त्यांचे ‘ दीव्य चक्षू ’ म्हणजे सामान्य भाषेत त्यांची कवी प्रतिभा चमत्कारपूर्ण घटनांचे वर्णन
म्हणजे त्यांच्या कवीप्रतिभेचे सर्जनच. त्या काळांत भारतांतील ब-याच भागांवर मुस्लिमांचे
आधिपत्य होते आणि भारतीय लोक एकप्रकारचे असहाय्य जीवन अनुभवतीत होते. लोकांना
धर्म आणि ईश्वराभक्ती ठेवण्यासाठी, वैष्णव भक्तीचे आचार्य संत, महंत, आणि भक्त मोठ्या
प्रमाणांत प्रयलशील होते. या परंपरेचा अनुभव, आपल्याला नरसिंह महेतांच्या काव्यकृतींत
येतो. यांच्या पुढें, भागवत पुराण, गीता, जयदेवांचे गीतगोविंद वगैरे वैष्णव धर्माशीं मिळते
जुळते साहित्य तर होतेंच, त्याशिवाय नामदेव आणि कबिरांचे साहित्य होते. नरसिंहांच्या
उत्कट कवीप्रतिभेने, त्यांतून प्रेरणा घेतली आणि गुजराती भाषेच्या चरणांशी तिच्या साहित्य
इतिहासातील, विस्तृत पदसमूह, खेळत ठेवला.
त्यांच्या जीवनाच्या आरंभीच आपण पाहीले की त्यांच्याबद्दल ऐकून, लहान थोर हरिभक्त
तळाजाला, त्यांच्याकडे येत असत. त्यांच्या भावा, भावजयीला ही गोष्ट आपतीच वाटे.
परिणामी, नरसिंहांनी गृहत्याग केला. नंतर भक्तिसाहित्याच्या परिचयामुळे भगवत गुणानुवाद,
काव्यांत उतरवायचा त्यांना नाद लागला आणि तोच त्यांचा आधार ठरला. संत अभ्यागताना
त्यांच्याकडून सन्मान मिळत असावा असे यात्रेकरूंच्या ‘हुंडी’ घटनेवरून वाटते. नरसिंहाच्या