भक्त नरसिंह मेहता: जीवन एवं पद (वैष्णव जन तो तेने कहिये - गुजराती से हिन्दी रूपान्तरण)
Bhakta Narsi Mehta: Jeevan Aur Pad
भक्त नरसिंह मेहता (सम्पादक: रामचन्द्र तिवारी) द्वारा
५ भावगीत गायक (भावगीताने गानारो)
गुजराथी साहित्याचा इतिहास लिहिला जाऊं लागला, तेव्हापासून नरसिंहांना आदिकवी
म्हणून मान्यता देण्यात आली आहे. मध्ये एकदा एक असा विरोधी स्वर उमटला की,
नरसिंहाच्या पूर्वी पण प्राचीन गुजराथी साहित्य निर्माण झाले होते, म्हणून त्याना आदिकवी
म्हणता येणार नाही. जैन साहित्यिकांनी रास-फागु-बारमासी इत्यादी रचना केल्या. एक गोष्ट
स्पष्ट आहे की, त्या सर्व रचनांत उत्तरकालीन गुर्जर भाषेचे अपभ्रष्ट रूप, कोणत्या ना कोणत्या
प्रकारे, प्रयत्नपूर्वक समाविष्ट करण्यांत आले होते. व्यावहारिक भाषेचा कल, नवीनतेकडे
संपूर्णपणे झुकला होता तरीपण लेखनांत जुन्या भाषेचा वापर करायचा प्रघात होता. हे खरं की
नरसिंहाच्या काळांतली, त्यांच्या रचनांची हस्तलिखिते उपलब्ध नाहीत. वि.स. १६५०-५५
इ.स. १५९४-९९ ची एक प्रत (मुंबई गुजराती प्रिप्रेस ची) आणि दुसरी, सं. १६६८ इ.स. १६१२
(अहमदाबाद-गुजराथ विद्यासभाची नं.६९ ची, प्रत, अशा या दोन प्रती, अजून पर्यंत
सापडलेल्या जुन्यांत जुन्या प्रती होत. ज्या काळात गुजर (भाषा किंवा मध्यकालीन गुजराथी
भाषेशिवाय एक तिसरी भाषा लेखन प्रचारांत होती, ह्या काळात अर्वाचीन बोली भाषा जतन
करणाऱ्या या प्रती पाहून असा संभव वाटतो की, ) नरसिंहांनी आपल्या काळांतल्या
बोलीभाषेचा आपल्या लेखनांत आदरपूर्वक वापर केला असला पाहिजे.
ही गोष्ट समजा आपण विचारात घेतली नाही तरीही काव्यरचनेत भावगीतांचा जो प्रकार
नरसिंहानी हाताळला तो गुजराती साहित्यात सर्वप्रथम होता. या भावगीतांची संख्या थोडी
थोडकी नाही. शेंकडोनी आहे. गुजराती हस्तलिखितांच्या संग्रहात आणि खाजगी मालकीच्या
हस्तलिखित भांडारात, अजूनहि अज्ञात असलेली भावगीते सापडत आहेत. हे लक्षांत घेतले
की वाटते विवाह काव्यात लक्ष सवा तणुं नाम कीर्तन करूं (तुझे सव्वालक्ष नामकिर्तन करतो)
ही प्रतिज्ञा थोडी जरी अर्थपूर्ण मानली तरी हजारो पदे, नरसिंहांनी रचली असली पाहिजेत.
निरनिराळ्या चालीत बसणारी असंख्य पदें आणि झुलणाना ढाळ (झोपाळ्यावरची गीतांच्या
चालीवर) ची अनेक पदें त्यांच्या हातून रचली गेली.
भावगीत गायक (भावगीताने गानारो ) [51]
हा प्रकार हाताळणारे नरसिंह प्रथम कवी होते, म्हणूनच त्याना सुरवातीला मिळालेला
आदिकवी चा मान ढळू शकत नाही. गुजराती साहित्याला पद्य साहित्याने समृद्ध करणारे
नामी अनामी शेकडो साहित्यिक झाले आणि शेकडो अज्ञातही आहेत. त्या सर्वांमध्ये आपल्या
विशिष्ट प्रतिभेने चमकणारे ३ कवी प्रथम श्रेणीत बसतात. १५ व्या शतकातले नरसिंह, सर्वोत्तम
आख्यानकार म्हणून, १७ व्या शतकाच्या उत्तरार्धातले, प्रेमानंद आणि श्रेष्ठ दर्जाची पदे आणि
गरबागीतांमुळे प्रसिद्ध असलेले १९ साव्या शतकाच्या पूर्वार्धातील दयाराम, हे ते कवी होत.
दुसरे सारे कवी या कवींच्या तुलनेत कमी दर्जाचे वाटतात.
नरसिंह महेतांनी आपली आदिकवी ही पदवी सिद्ध केली ती त्यांच्या भावगीतांमुळे ही
भावगीते कृष्णाचा विहार या विषयाशी संलग्न आहेत. जयदेवाच्या गीतगोविंद काव्यातूनच
नरसिंहाना, आपल्या भावगीतांच्या विचाराला खाद्य मिळाले. नरसिंहाच्या चातुरी गीतांत
वर्णनात्मक भाग मुख्यतः आहे, याची आपल्याला थोडीशी कल्पना आली आहे. गीतगोविंद
काव्यांतही वर्णनात्मक भागच मुख्य आहे. नरसिंहाच्या विशाल साहित्यातून पूर्वी सांगितलेली
वर्णनात्मक पदे वजा केली तर, वेगळ्याच थाटाची आत्मलक्षित अशी भरपूर भावगीते नजरेत
भरतात. त्याचा विचार केला, तर आपण स्वतः त्या त्या ठिकाणी एक पात्र म्हणून आहोत, अशा
वर्णनांची, गोपींच्या तोंडून घातलेल्या पदांचे आपण विच्छेदन करू शकतो. १) रास शरदना
पद (शरदऋतुतील रास क्रीडा पदे) २) वसंतना (वसंत ऋतुतील) ३) हिंडोळाना
(झोपाळ्यावरची) ४) दाणना (दान वसुली ची) ५) शृंगारमाळा (शृंगाराची ) ६) चांदलाना
(चंद्राची )
वरील ६ ही प्रकारांत मुख्यतः वियोग शृंगार रचना भरपूर प्रमाणांत आढळतात, अर्थात
कांही काव्यरचनांत संयोग शृंगाराचेही दर्शन होते. आपण क्रमशः त्यांचा परिचय करून घेऊ.
१ रास शरदनां पद (शरद ऋतुतील रासक्रीडा पदावली )
शरदऋतूतील - खास करून आश्विन महिन्यांतल्या श्रीकृष्णाच्या वनक्रीडेची यांत वर्णने
आहेत. कथाभागाऐवजीं पात्राच्या तोंडी घातलेल्या गीतांमुळे, या रचना आपोआपच
भावगीतांच्या सदरांत येतात. रासक्रीडेसाठी व्याकुळ झालेल्या गोपींचे शब्द
सजनी रे, श्यामलीओ वेण वाहे
रही न सकुं मारा तन मांहे
जागो मिलवाने मन थाए -
जल -जमुना -मसि आपण्य बहिनी, चालो जोवा जेईई-
सास मारी घेरय नयी, कानजीने कहिईं
जे किहिरो ते सिहिस्युं आपण्यात चालो जोवा जेईई
52 नरसी मेहता
नरसैयांच्या स्वामीने संगि रासलडा रे लही ई
(सखी गं श्याम मुरली वाजवतो आहे. माझ्या शरीरांत मी राहूं शकत नाही. ऐक, त्याला
भेटायची माझ्या मनांत इच्छा होते आहे. चल ग बहिणी, पाण्याने भरलेल्या यमुना नदीवर,
कृष्णाला पहायला जाऊं -कन्हैयाला सांगू, माझी सासू घरी नाही म्हणून जे बोलेल, ते सहन
करूं पण आपण कृष्णाला पहायला जाऊं. नरसिंहाच्या स्वामी बरोबर आपण रासक्रीडा खेळूं.)
नायकाचा विरह यात स्पष्ट होत आहे.
बाटडी जोऊं नाथ, नाहली
संगम रमवा माटेय जात मींबालीरे
पिहिलं अम्ह-स्यूं प्रीत करीने शुं मेहलु विसारी रे
मननी वात तु कुहुने कहिई ? अम्हने वेदनं भारी रे
आगे अम्हने बपैडा मारे, अम्हे अबला किम रहिये रे
नरसिंग्याच्या स्वामी विन बाई धीरज क्यटलं धरीई रे ?
(नाथ, मी प्रिया तुमची वाट पहात आहे. तुमच्याबरोबर क्रीडा करावी या इच्छेने मी 'माझेपण'
संपवून आले आहे. प्रथम आमच्यावर प्रिती केली, आतां सारे विसरून आमचा त्याग करता
का ? मनांतली गोष्ट आम्ही कोणाला सांगावी ते सांगा. आम्हाला केवढ्या यातना होताहेत.
अगोदरच आम्हाला बाप मारतो आहे. आम्ही अबला कसे दिवस काढायचे. नरसिंहाच्या
स्वामी शिवाय बाई ग किती धीर धरायचा.)
आणि नायकाचे मीलन झाल्यावर परत फिरायला नायक सांगतो तेव्हां नायिकेचा मनःक्षोभ
होतो
'श्या माटे शामलिया वा' ला शान करी वन्य तेडी रे ?
व्याकुल विनता थई शहु अंगे, वेण वजाडी रूडी रे.
आणि वेळा अधराते वला परवरिया परवार रे
शामुं आल चडावो अमने, लीलज नंदकुमार रे,
बोल विचारी बोलण्यो रे अमे अबला बल थोडूं रे
नरसिंग्याच्या स्वामी, रस पुरो दीन थई कर जोडुं रे-
(लाडक्या शामसुंदरा, शृंगार करून आम्हाला, कशासाठी वनांत आणलेस. सर्व बाजूंनी
गोपी व्याकुळ झाली. तू मुरली अशी सुंदर वाजवलीस सर्व संसार सोडायला लाऊन तूं
आम्हाला अर्ध्या रात्री आणलेंस. आता लीलाधर नंदकुमारा, शामा आमचे रक्षण कर. नीट
विचार करून सांग आम्ही कमी शक्ती असणाऱ्या अबला आहोत. नरसिंहाच्या स्वामी क्रीडा
रस पुरा कर. काकुळतीने आम्ही हात जोडतो.)
ज्ञानी भक्त उपदेशक 53
आणि नायकाच्या केवळ दर्शनानेच मीलनाचा अनुभव -
वाहलो आलिंगन सरखो, नयण भरी भरी निरखो जोई जोई मन हरखो-
सकल विश्व शीखंतां, बाई, मुख उपर्यु मुथ मुकवूं लाल
ए विषय आता न जाणुं कहो सखी अमृत कुणी पिरूला
ज्या एहवुं त्या स्नेहसमक्ष शी अम्हेने तां अलगां मेहलो
नरसिंयाच्या स्वामी जशी, यौवना अण तेड्यो आवे वेहलो
(रा. रा. समुद्धार पृ.३७६ )
(प्रियाने आलिंगन देताना नेत्र भरभरून मला पाहिले आणि मनं हर्षभरीत झाले सर्व
विश्वाला शिकवणारा त्याने माझ्या ओठांवर ओठ ठेवले ग बाई, या विषयांत मला काहींच
समजत नाही. सखी अमृत कोणी कोणाला पाजले ?
जिथे हे असे तिथे प्रेम, किंवा समजण्याची बुद्धी कुठली आम्हाला तर त्याने वेगळंच ठेवलं
नरसिंहाच्या स्वामी यौवनपूर्ण सुंदरी पहातांच न बोलवतांच त्वरीत येतो.)
आणि नायकाच्या मीलनात परमतृप्तीचा अनुभव
[
54 नरसी मेहता
जमुना तटि सरोवर छाया रास रमी गुण गायो रे
(माझ्या मैत्रिणी, हरिशिवाय मी राहूं शकत नाही. प्रियाने मला नयनबाणांनी जखमी केले
आहे. चतुर्भुज हरीने माझे चित्त चोरले आहे. कन्हैयाने मला कामविव्हल केले आहे. माझं मन
माधवाने कसे बांधून टाकले आहे. सुंदर बांसरी तीन प्रकारांनी वाजते आहे. यमुनेच्या तिरी
वृक्षांच्या छायेत गुणगान करीत मी कृष्णाशी रास क्रीडा केली.)
खास करून शरदातील रात्रीच्या समयी सुयोग्य ठरतील असे राग, कंदार, कालेरी सामेरी
मालव गोडी चा उपयोग करून वर्णनात्मक गीतांबरोबर आत्मलक्षी भावगीतें पण लिहीली
आहेत.
(२) वसंतनां पदु (वसंतऋतुतील पदे)
पूर्वी सांगितल्याप्रमाणे वसंत पंचमी पासून होळीच्या दुसऱ्या दिवशीच्या फूलडोळ
(धुळवड) च्या दिवसापर्यंतच्या काळातली फागुन्लीला (वसंत ऋतुतील क्रीडा) ची अनेक गीते
नरसिंहांनी लिहिली आहेत. ही गीतें मुख्यतः 'वसंत' रागात निबद्ध आहेत. या गीतात
वर्णनात्मक गीते आहेत. तशी आत्मलक्षीत भावगीतेही आहेत. या गीतांत विप्रलंभ (वियोग)
आणि संयोग हे दोन्ही शृंगाररस मूर्त करण्याचा कवीचा प्रयत्न आहे. शरदऋतुतील लीला,
चंद्राशी आणि रात्रीशी संबंधित होत्या तर वसंत ऋतुतील क्रीडागीतांमधे, वन वनांतले वृक्ष
आणि पळस, वगैरेतील, मन चाळवणारे रंग दर्शन देतात. पदे वर्णनात्मकच आहेत. पण
नायिकेच्या तोंडी घातल्यामुळे सहजच मनोवेधक होतात.
प्रथम दिवस व्रण वसंतपंचमी मध्य सखीधर शोहे
ते पाछष्य व्रज सुंदररियारे माहारा बा लानुं मन मोहे
कनक कलश पाट पथराव्यो वा' लाने पथराव्यो
अबलाए केश - माट भरयारे अभीनवि सेवा करायो
चिरंजीए तुं नाहोलिया रे कोडे वसंत रमिजे
नारसिंयाच्या स्वामी भले मलियो भामिनी भुवन भामिजे.
(गोकुळातला वसंतपंचमीचा प्रथम दिवस आहे. कृष्ण मध्ये शोभत आहे. त्याच्या भोवती
गोकुळांतल्या सुंदरी आहेत. त्यांना पाहून माझ्या प्रिय कृष्णाचे मन मोहित होते आहे. सुवर्ण
कलश ठेवला. पाट मांडला आणि प्रिया ला (कृष्णाला) बसवले. नंतर केशमाट (केसांना
सुगंधीत तेल माखणे केस विंचरणे भांग पाडणे वगैरे) केले. अशी विषेश सेवा त्या सुंदरीनी
केली. तूं चिरंजीव हो, आमच्या लाडक्या आणि मोठ्या कौतुकाने वसंत-क्रीडा कर रे-
नरसिंहाच्या स्वामी तूं सुंदरीच्या घरी जाऊन तिला खुशाल भेट.)
ज्ञानी भक्त उपदेशक 55
वसंत ऋतूच्या आगमनाबरोबरच नायिकेची नायकाबरोबर विहार करायची आतुरता
आणि आशा -
चाल्य रमिए सखी मेल्य मथंक मही
वसंत आव्यो वन वेल फुली
मोरिया अंब कोकीळा कदंब लवे
कुसुम कुसुम रह्या भमर झुली
करो शणगार ने हार, गजगामिनी
क्या रयनी कहु छुं जो चाल्य उठी -
रसिक मुख चुंबिये वलगिए झुंबिये
आज तो लाजनी द्राहि छुटी
हेत हरि वश करी, लाहोले उर धरी
कर ग्रही कृष्णाजी प्रीत्य पलशे
नारसिओ रंगमां अंग उनमद हशे
खोहेला दिवसनो खंग वलशे-
(दही घुसळणे राहूं दे ग, चल सखी, खेळूंया वसंत ऋतु आला. वन वेली बहरल्या आहेत.
आंबा मोहरला आहे. कोकिळा कुहू कुहू करीत आहे. फुलांफुलांवर भ्रमर झुलत आहे.
गजगामिनी नट्टा पट्टा कर, हार घाल, अग ती केव्हा पासून सांगते आहे. उठ आणि चल त्या
रसिक कृष्णाचे चुंबन घेऊ, त्याला मिठी मारून ओठंगु. आज लज्जेची गाठ सुटली आहे.
प्रेमाने त्याला वश करूं, छातीशी धरायची संधी घेऊ (लाडालाडाने त्याला छातीशी घेऊ)
कृष्णा. हात हातांत घेतलास तर प्रीती जोपासेल. नरसिंह अशा प्रणयरंगात अंगअंग उन्मद
होईल. त्याच्या हरवलेल्या दिवसांची भरपाई होईल.)
आतां नायकाला वसंत क्रीडा करायची विनंती :
वसंत रमिए रे मारा वाला वसंत रत्य छे रूडी
कानजी रे कांकणियो घडाओ, ज्यम खलकांनु चुडी
एक एक पाए अधिक माहारे लाखीणी चूडी
सामलियां शुं रंग भरय् रमतां दिशु छुं रूडी
यौवन विना मान नव्य लहिये कुंकुमना रंगरोल .
नार्सिया या स्वामी भले मलियो, करशुं झाझमझोल
(माझ्या प्रिया, वसंतक्रीडा करूं या. वसंताची ही रात्र रमणीय आहे. मी बांगड्या जशा
खळखळावते. अशी खळखळणारी कांकणे बनव ना रे. कान्हा एकाहून एक जरा मोठ्या अशा
56 नरसी मेहता
माझ्या लाखेच्या बांगड्या आहेत. हे श्याम अगदी रंगात येऊन आपण वसंत क्रीडा करू- तेव्हा
मी खूप सुंदर दिसेन.तारुण्य नसेल तर लाल रंगाची उधळण करण्याचा मान घेऊ नये. नरसिंहाचे
स्वामी भेटले, फार आनंद वाटतो. आता अगदी आनंदच आनंद करू या.)
अशाच तऱ्हेचे होळी खेळण्यासाठी नायकाला निमंत्रण
ओरा आवो अलबेला वाहाला रंगभरी रमिये होळी
तम साथे रमवाने आवी सरस बनीने टोळी-१
लाल गुलाल अबीर उडाडिये. नाखिये लईलई झोळी
कनकनी पिचकारी भरीभरी छेडिये केशर घोळी -२
तमारो वाघो करिये भीनो तेल फुलेल मां बोली
अमारी नीलांबर साडी रसबरा करीये चोळी -३
बाहर माहर सरखां थई ऐ माहें माहें झकोळा
नरसैयाच्या स्वामी रंग रमता अबला ते बाल भोळी -४
(अहो या, अलबेल्या प्रिया कृष्णा, आपण रंगात येऊन होळी खेळू या. तुमच्याबरोबर होळी
खेळण्यासाठी मस्त टोळी बनवली आहे. गुलाल अबीर घेऊन हात भरभरून विखरु या. सुवर्णा
च्या पिचकारीत केशर मिसळून, भरभरून शिंपू या. तुमचा अंगरखा आम्ही भिजवतो, तेलांत
आणि फुलेलात- आमची निळ्या रंगाची साडी आणि चोळी तुम्ही ओलीचिंब करा. आंत बाहेर
आपआपसांत मिसळून, आपण सारे एकसारखे एक होऊयां. नरसिंहाच्या स्वामीबरोबर
भोळ्या अबलांनी क्रीडा केली.)
या काव्यात होळीत वापरली जाणारी गुलाल अबीर रंगाची पिचकारी, तेल, फुले वगैरे
सामुग्री आणि तिचा समयोचित उपयोग पण सांगितलेला आढळतो. यावरून ५०० वर्षांहूनही
जास्त वर्षांपूर्वी आजवर चालत आलेल्या रिती भाती प्रमाणेच होळी खेळली जात होती, हे स्पष्ट
आहे. हा रिवाज ५०० वर्षे जुना आहे. हे आपण समजू शकतो.
'घेरैया' व्हायचा रिवाज पण तितकाच जुना आहे हे खालील काव्यावरून दिसते.
गुलाल भारिया गोविंदजी रे घेरैया थई आवो
वसंतनी वरणासी करीने मारे ते मंदीर आवो
(गुलालाने माखून गेलेल्या गोविंदा घेरैया (सोंगाड्यानी घेरलेला ) होऊन ये. वसंत ऋतू
चा थाटमाट करून माझ्या घरी ये.)
वसंत ऋतूचे हर्षभरीत होऊन स्वागत करण्याचा रिवाज आज भारतांत कुठे आहे की नाही,
ठाऊक नाही, परंतु तसा भाव व्यक्त करणारे पद, पहायला मिळतेच.
ज्ञानी भक्त उपदेशक 57
वसंत वधावा चालो जईये सजनी निराखिये नंदकुमार
श्यामसुंदरने मळी लईए मीठडां लईए वारंवार
कनक कलश मोर आंबानो श्रीफळ लो माथे लो थाळ,
लो चंदन चर्ची शरीरे पे राववा पुष्पना हार
अबीर गुलाल लो उराडवा नंद तणे दरबार
फगुवाने मिसे मोहनने वरसुं ए आपणे निरधार
वागा ल्यो वहालाने पे रावना करो केशर छंटकार
नरसैयाना नाथने अर्थे सजोने सोळ शृणगार
(सखी, चल वसंताचे हर्षभराने स्वागत करायला जाऊ. शामसुंदराला भेटू आणि वारंवार
त्याची दृष्ट काढू (कानावर बोटे मोडून) आंब्याचा मोहोर सुवर्ण कलश घे, नारळ घे, डोक्यावर
थाली घे अंगाला चंदन लावून घे, गळ्यात घालायला फुलांचा हार घे. नंदाच्या दरबारात उधळण
करण्यासाठी अबीर आणि गुलाल घे, होळीचे निमित्त करून मोहनांवर वर्षाव करूं, हाच
आपला निर्धार आहे. लाडक्याला (नंदकुमाराला) घालायला डगला घे, त्यावर केशर शिंपड
नरसिंहाच्या नाथाप्रीत्यर्थ १६ शृंगारांनी सजा.)
होळीच्या लाह्यांचा निर्देश ध्यान आकर्षून घेतो. वसंत क्रीडेनिमित्त अशा अनेक पदांचे
आयोजन केलेले दिसते. हुबेहुब प्रसंग चित्र उभे करायची कवीची प्रतिभा, सर्वत्र अनुभवास
येते.
( ३ ) हिंडोळाना पद ( झोपाळ्यावरची गीते )
यापूर्वीच आपण पाहिले आहे की 'वर्षाऋतूत, वनातल्या वृक्षांना झोपाळे बांधून तिथे
श्रीकृष्ण आणि गोपींचा विहार' हा या प्रकारातील काव्यांचा विषय आहे. वर्णनात्मक पदांत
परोक्ष चित्रण असते, तर भावगीतांत पात्रे स्वतः मी पणाने भाग घेतांना अनुभवास येतात ।
हिंडोले तो हींचु मारा वाला अपने घुमण चलाव रे ।
घुनणडी घालीने मारा वाला प्रेमे शुं बोलावे रे ।
हिडोळे तो हिंचु नारा वा'ला घूमण घाली लांबी रे ।
पडखो पडखो मारा वा' ला शंभारूं पगनी कांबी रे
पालव छुटे चीर वछुटे वेण उघाडी थाए रे,
पडखो रे पडखो मारा वा 'ला हींडोले न रैहवाय रे ।
तमारे पितांबर, अमारे चीर वा 'ला आपण बेहु बांधेशु रे
तमे नानडिया हुं नानकडी, नवनवा रंग रमेशु रे ।
आंबा डाले-सरोवर पाले शहियर रमतो रंग लागोरे ।
58 नरसी मेहता
आवो रे आवो शाहेली कांन कनै कांई मारो रे ।
चुआ चंदन ने कस्तुरी घंटावो लई अंगे रे ।
आवो रे आवो शाहेली, काहाना सुं रमिये रंगे रे ।
श्रावण केरी मध्य श्रवणी रे हींची हींची छाया रे
नारसैयाच्या स्वामी भले मलिया. श्री गोकुल केरो रायरे
(झोपाळ्यावर तर झोका घेते. माझ्या राजा (प्रिय) आम्हाला गोल गोल फिरव. फुगडी घालून
माझ्याशी प्रेमाने आणि स्नेहाने बोल. झोपाळ्यावर तर झोके घेते, प्रिय (कृष्णा) मोठा लांब
गोल झोका दे. लाडक्या, मदत कर रे मदत कर. माझ्या पायांतल्या कडा (दागिना) मी संभाळते.
पदर पडतो आहे, साडी निसटते आहे, वेणी उघडी पडते आहे. माझ्यापाशी सोबतीला ये, मदत
कर रे राजा झोपाळ्यावर तोल संभाळला जात नाही. तुमचे पितांबर आमच्या साड्या दोन्ही
आपण बांधून टाकू. तुम्ही छोटेसे मी छोटीसी नव्या नव्या रंगानी खेळूयां आंब्याच्या डहाळ्या
सरोवराचे किनारे, मित्रा खेळतांना रंगून गेले. ये ना ग ये माझ्या मैत्रीणी, कन्हैयाजवळ कांही
माग ना चुआ. चंदन आणि कस्तुरी घेऊन अंगावर उडवून घे, ये ये सखी काय रंगात येऊन
कान्हा खेळतो आहे- श्रावणांतली ही वनक्रीडा पौर्णिमेपर्यंत झाली. नंतर वाऱ्याने झाडाच्या
छाया झोक्यावर झोके घेऊ लागल्या नरसिंहाचे स्वामी भेटले. फार आनंद वाटला. त्यांनी ही
क्रीडा श्री गोकुळात केली.
झोपाळ्यावरच्या या क्रीडा गीतांत चुवा वगैरे, साधनांचा पण निर्देश केला आहे. अखेरीस
पूर्णतृप्तीचा भाव पण दर्शविला आहे. अशी आत्मलक्षी पदे थोडीशीच पहायला सापडतात.
वर्णनात्मक पदांची विपुलता आहे.
(४) दाणना पद (दान -पदे )
मथुरेला दही ताक विकायला जाणाऱ्या गोपींना रस्त्यांत अडवून दाण (जकात) मागायच्या
बहाण्यांनी त्यांच्याशी 'प्रेमगोष्टी करणे' हा या पदांचा विषय आहे. संस्कृत साहित्यांत अथवा
प्राकृत अपभ्रंशातही हा विषय कुठेही आढळत नाही. हा प्रकार नरसिंहाना कुठून प्राप्त झाला,
हा प्रश्नच आहे. यांचे, ३९ ओव्यांचे 'दाणलील' हे खंडकाव्य आहे. त्याच्या उत्तरार्धात
श्रीकृष्ण-राधेचा दाणा 'जकात' चें निमित्त करून एक संवाद आहे. या दाण गीतावलीत
वर्णनात्मक पदें फारशी ज्ञात नाहीत. भावगीते तर जवळ जवळ नाहीतच. इथे दिलेली पर्दे
ग्रंथकारानी प्रसिद्ध केलेल्या संग्रहात सापडत नाहीत. दोन्ही तन्हेच्या पदांत मुख्य भाग संवाद
आहे, हा खालील 'संवाद' हेच स्पष्ट करीत आहे-
आडुं कोई नथी बोलतो, देने दाण तुं मारुं ।
नैं तो विखास्ये वाटते मैं आडुं तारुं -१
द्वितीय भाग: शृङ्गार एवं रस-पद, मामेरा प्रसंग व उपसंहार
ज्ञानी भक्त उपदेशक ५९
गरब भरी तुं गुजरी जोबननी माती
दांडि दांडी सौ देखतां दाण चोरीने जाती -२
कें जे तुं जइने कंसने दाण लागे ते दैने,
मोवड आवे मानिनी, वे 'लि दल लेने -३
करिये नैं झाझी का' न जी परनारीनी हांसी
बल तो तमारूं जाणिये, आल्या छो नासी -४
दा 'डी आगे आई चालिये, दाण केदी ना दिधुं-४
खोस्या मा ठाला आवरू कैय छैय सीधुं -५
लाडकवाया लालजी, एलपेल म बोलो
नरसी मे तो केहे, जोरावरि सीद बाझता डालो -६
(मी आडवे तिडवे काही बोलत नाही. तूं माझे दाण (जकात) दे, नाहीतर मी तुझ्या वाटेत
तुझ्या आड येईन. (१) तुझ्या तारुण्याची माती फारच गर्विष्ट आहे. हे गुजरी तूं सर्वांच्या समक्ष
माझे देणे (दाण) चोरून पळते आहेस (२) जाऊन सांग कंसाला इथे जकात द्यावी लागते म्हणून.
(गोपींचे) दल घेऊन पुढारी बनून मानिनि, घाई घाई येतेस हं (३) राग संताप आणि पर खीयांचे
हंस करू नको. कन्हैया तुझा पराक्रम तर आम्हाला ठाऊक आहे. पळून आला आहेस तो (४)
आजवर ही जकात आम्ही कधी दिली नाही. आम्ही अशाच जलद चालणार. बाजूला हो, फुकट
अब्रू घालवू नको, सरळ सरळ तुला सांगतो आहोत, लाडालाडाच्या बाळा, भलते सलते बोलूं
नको ? नरसिंह महेता म्हणतात, कशासाठी जोरदार बाचाबाची, फुकट घालवता अहात ?
खालील पदांत नायिकेचे नायकाबद्दलचे प्रेम तिच्या भावपूर्णतेचे सुचवले गेले आहे:
उधो रे' ने रे गोवालिया, तारी मोरली मीठा वाय
छेल छबीला नंदना तुं तो गीत मधुरा गाय ।
एवा नमणा न थईए नाथणी तमने नंदबावानी आण
मधुरी -सी वाय मोरली तो आपुं महीनां दाण
सजनी चाल चतुरो जोइने मारां नेनां निरफ्त थाय
नाची देरवाडो नाथजी मारां भवना पातक जाय ।
कामण टुमण तारा दिलमां भरियां आंखडीमां छे जंन
वश कीधी व्रजवान्ता एवां क्यां सीख्य ता मंत्र ?
मारा सम जो मने न सीखव्यो तमे जाणो सर्वे पेर
सोझ सवारे। सामला, तमे आवजो मोरे घेर-
तुं तो नंद लणे नानडियो ने कान'जी तारु नाम
60 नरसी मेहता
दाण लीधांना खप करो तो आवजो गोकूलगाम-
राजनुं मुख दीठडे सुख उपजे तमे घणी राखो छो में 'र
नरसिंना स्वामी सामला तमे करणे लीला ले'र
(ए गवळ्या, जरा थांब ना, तुझी मुरली गोड वाजवत आहे. मस्त गोडस (छेल छबीला )
पोरा, तूं तर मधूर गातोस. महाशय तुम्हाला नंदबाबाची शपथ, एवढे नम्र नका होऊं ! मधुरशी
मुरली वाजवाल, तर दह्याचे दान (जकात) देईन - चतुरा तुझी राजस चाल पाहून माझे डोळे
पवित्र होताहेत. महाराज, नाचून दाखवा, माझी जन्माची पातके नष्ट होतील, तुझ्या मनांत
मंत्रतंत्र भरले आहेत. आणि डोळ्यात वशीकरण गोकुळातल्या स्त्रीयांना वश केले. हा मंत्र कुठे
शिकलात ? तुम्हाला सर्व कांही ठाऊक आहे, ते मला न शिकवाल तर तुम्हाला माझी शपथ.
संध्याकाळी सकाळी, श्यामसुंदर माझ्या घरी तुम्ही या- तूं तर नंदाकडचा छोटा आणि कन्हैया
तुझे नाव घेतलेले दान (जकात म्हणून) संपवून टाकाल तर गोकुळांत या - कृष्णाचे दर्शन होते.
त्यामुळे खूपच सुख मिळते. तुम्ही खूप कृपा ठेवता अहात. नरसिंहाचे स्वामी शामसुंदर, तूम्ही
आनंद (लीलातर) करा.)
अशा प्रसंगात कवीने श्रीकृष्णांच्या मुखानेही वदवले आहे-
उभी रे 'ने में वाली, चाली जाय छे क्यां चरित्रवाली ?
वाटे लाघे दाण अमारूं तेमां लेशूं नै 'हु तारुं
प्रिती रीते मैं हु पाने, मटुकी मूक्ती वूही जाने
गुजरी, गर्वभरी तुं घेली, चोरी दाण तणी नै'सेली
नरसी महेता केहे, मटुकी लैने मेलिस घेर सिखामण दैने ?
(दही वाली, थांब ना चाललीस कुठे, चरित्रवाली (किंवा चरवी वाली) या वाटेने दान द्यावे
लागते. ते गान म्हणून आम्ही तुझे गोरस घेऊ. प्रेमाने तूं आम्हाला गोरस पाज. ही मटकी ठेवून
निघुनजा. दानाची जकात सहज चोरी करून जाऊ पहातेस. नरसी मेहता म्हणतात, तुझी मटकी
घेऊन मी तुला धडा शिकवतो आणि घरी पोचवून देतो,
भालण कवीच्या दशमस्कंधांत पण दाण'ची असंख्य पदे, भालणकवींची आहेत. नरसिंह आणि
भालण कवींच्या पूर्वी पासूनच देशात 'दाणलीला' वर्णन केली जात होती असे स्पष्ट दिसते.
वज्रभाषेत साहित्य रचले गेले, त्या काळातला भालण कवी 'खरा-पण नरसिंह त्या काळातील
नव्हते. म्हणून, भारतांत, 'दाणलीला' वर्णन करणारा प्रथम कवी नरसिंह म्हटले पाहिजेत.
(५) शृंगारमाळांना पद ( शृंगार गीतांची माळा )
'शृंगार माळा' या शीर्षकाखाली नरसिंहानी पदसंग्रह बनवला नाही. निरनिराळ्या
क्रीडा-गीतांमधे ज्यांचा समावेश नाही आणि जी गीते स्वतंत्र क्रीडागीते - विहार गीते म्हणून
ज्ञानी भक्त उपदेशक 61
वर्णन केली आहेत. तसेच आत्मलक्षी प्रकारांतली जी शेकडों गीते सापडली आहेत. ती सर्व
गीते एकत्र करून स्व. इच्छाराम् सं. देसाई च्या, नरसिंह मेहता कृत काव्यसंग्रहात 'शृंगारमाळा'
या शीर्षकाने दिली आहेत.
त्यांची संख्या ५४१ आहे. यांत 'रास' ची जीं पदें होती, ती मी (लेखक स्वतः) : 'रास
सहस्रपदीना समुद्धार' मधे वेगळी काढली आहेत. याखेरीज नंतर मिळालेलीं पदे स्व. देसाई
नी 'न. मे. काव्यसंग्रहाच्या', परिशिष्टात दिली आहेत. माझ्या माहितीत असणाऱ्या अप्रसिद्ध
गीतांची संख्या कमी नाही. इथे आत्मलक्षी प्रकारांतली पदे, भावगीतांतून बाजूला काढायचा
प्रयत्न आहे. ज्यात नरसिंहाची 'प्रतिभा' पहायला मिळते. वियोग आणि संयोग दोन्ही
प्रकारांतला शृंगार यांत वर्णीला आहे. विप्रलंभाचे हे पद-
मारो नाथ न बोले अबोला मरिये रे
हुं क्यम करी वेतुं वियोग ? हवे शुं करिये रे ?
सांभळ सहियर विनवी आ दुःख केम सेहेवाये रे ?
मेली गया मुने मा'वजी मारो जन्मारो क्यम जाये रे ?
शेरडीए सामो मळे तो वाट मरोडी जाये रे,
उंचु जोउं त्यां नीचु जुए मळवाने विमासण थाये रे
मोर मुगुट पीतांबर सोहिये कुंडल झळके कान रे
नरसैयाच्या स्वामी मल्यो रे वहाले, वाह्यां अमारा वान रे
(माझा नाथ (कृष्ण) कांही बोलत नाही, त्याच्या अबोल्यामुळे मरतो आहोत. हा वियोग
कसा सहन करायचा ? आतां करायचे तरी काय ? सख्या ऐक माझी विनंती. हे दुःख कसे
सहन होणार रे ? मला माझा माधव मला सोडून गेला. माझा जन्म कसा जाणार.
(एखाद्या) बोळीत समोर भेटला तर वाट बदलून जातो. मी त्याच्याकडे वर पाहिले तर तो
खाली पहातो (दृष्टीस दृष्टी देत नाही); त्यामुळे भेटायला मला संकोच वाटत आहे. मोर मुगूट
पितांबर शोभतो आहे. कुंडले कानांत झळकत आहेत. नरसिंहाचे स्वामी भेटले. प्रिय कृष्णाने
आमची अब्रू राखली.
शेवटच्या ओळीत संयोगभाव सांगितला आहे. पुढील पदांत संयोगरसांचे सुख वर्णन करीत
आहेत।
वांसलडी वाहाते महारे वहाले सामुं जोयुं रे ।
लटके बांहुडी झाली मारी त्यम मारुं मन मोह्युं रे.
कंठ विलागी वहालजीएने मंदिर मांहे लावी रे ।
मननां मोहन माये महारे, आरती अगर उवारी रे ।
62 नरसी मेहता
प्रेमे घरी बेसारियो में सोवण-पाट ढळावी रे
वहाला केरुं वदन नेहाली। घामकडे हुं चाली रे
गाय दोहिने दूध कढेलुं सरसी शाकर मेलुं रे
भणे नरसैयो पान करे हरि, वलजी उरपर झेलुरे -
(मुरली वाजवीत असताना माझ्या प्रिय कृष्णाने समोर (माझ्याकडे) पाहिले. रसिकपणाने
माझे हात धरले आणि माझे मन मोहून गेले. माझ्या गळ्याला मिठी मारून कृष्णाने मला
मंदिरांत नेले. माझ्या मनांत मोहन राहतो. मी त्याला धुपारती ओवाळली. सुवर्णाचा पाट
सरकवला आणि मोठ्या प्रेमाने मी त्याला हात धरून बसवला. कृष्णाचे मुख मी निरखून
पाहिले आणि गाय हंबरल्यामुळे मी निघाले. गायीला दोहून मी दूध काढले. त्यात चांगली
साखर मिसळली. नरसिंह म्हणतात, हरि पितो आहे. तो वलजी (दूध) मी त्याला माझ्या हृदयात
सामावून घेतले.
वियोगात पण संयोगाच्या आनंदाचा अनुभव -
सुण सजनी सूता मोहे झबकीने जागी
जाण्युं म्हरा वांलाजी ने कंठडे विलागी
अती रंग कीधा, अध रस पीधो
सेजडी उपर थया सतो, वहालो उर पर लीधो, -
सहीसमाणी, म्हारुं स्वरूप न विचारो
नरसैयान्यो स्वामी मारा मंदिरिये पधारो
(ऐक सखी, झोपेतून मी खडबडून उठले. मला कळले. मी माझ्या प्रिय कृष्णाच्या गळ्याला
मिठी मारली आहे. खूप प्रणयरंग केला, ओठांचे अमृत मी प्यायले. शय्येवर असलेल्या
कृष्णाला मी हृदयाशी घेतले. सखी गं, माझ्या त्या स्वरूपाचा विचार करूं नकोस-नरसिंहाचे
स्वामी माझ्या मंदिरांत आले.)
असाच भाव दर्शविणारे -
आंखलडीथी न करूं अळगो, माहारा जीवनप्राण रे
हृदया सरसो भीडी राखुं सामालियो सुजाण रे
रातदिवस म्हाले मंदिरमां, त्यम् म्हारुं मंदिर मोह्युं रे
मवको करीने आगळ आवुं वहाले सामुं जोयुं रे
दुध कढियल घसमस्ती लावुं शाकर सरसुं पीये रे
हार कुसुमनो कंठे घालुं जेम हुं हरखुं हैयेरे
मनगमतो शणगार करिने कर दरपण लई देखाडुं रे
ज्ञानी भक्त उपदेशक 63
भणे नरंसैयो-मान करीने शणगटडो संकोरुं रे
(माझ्या नजरेपासून दूर करणार नाही, तो माझा जीवन प्राण आहे. शहाण्या शामसुंदराला
मी हृदयाशी घट्ट धरुन ठेवीन. रात्रंदिवस तो माझ्या मंदिरांत मौज करतो. तसंतसे माझे मंदीर
मोहून जाते. मुरका मारीत मी पुढे आले. (तर प्रिय कृष्णाने समोर (माझ्याकडे) पाहिले. मी
लगबगीने गरम दूध, झकास साखर घातलेले आणले, आणि कृष्णाने ते प्यायले. फुलांचा हार
त्याच्या गळ्यांत घातला आणि माझे मन आनंदून गेले. मनपसंत शृंगार करून हातांत आरसा
घेऊन त्याला दाखवले, नरसिंह म्हणतात त्याला सन्मान देऊन शृंगार आटपता घेतो.)
६. चांदलानां पद (चंद्र तद्वत सौभाग्य तिलकांची पर्दे)
स्व. इच्छाराम देसाई नी 'शृंगार माळाच्या पदांत' ११ पदांचा समावेश केला आहे. दुसरी
तीन एक नवी पदे माझ्या न. मे. पदांत छापली आहेत. जास्त संख्येत तीं पर्दे नाहीत - जी आहेत
ती बहुतेक वर्णनपद आहेत. तरीपण आत्मलक्षी पदेही सापडतात. जशी-
चांदलो शाहे भ्रगानयणी वालाजी शुं रंगभरय रमिये रेणी
टीली कीधी कुंकुम केरी, झाल्य झबुके काने,
प्रेम धरीने वदन निहाळुं कंठ बळगी का ने रे,
नाना भाव धरुं पियु साथे करती केलीविलास रे,
नरसैयाच्यो स्वामी भले मालियो पूरी मारा मनडाती आसरे
(मृगनयनी चंद्र शोभतो आहे. कृष्णाबरोबर, रात्री आनंदमय क्रीडा करूंया. कुंकवाची
टिकली लावली आहे. कानात कर्णफुले चमचम करताहेत. प्रेमानें कृष्णाकडे पाहतें आणि
कन्हैयाच्या गळ्याला मिठी मारते -१ प्रियकराबरोबर नाना भावनांनी राहते आणि क्रीडा
विलास करते. आनंद झाला नरसिंहाचे स्वामी भेटले. माझ्या मनांतली आशा सफळ झाली.)
“चांदलो घूंघटडामां झलके" ते जोईने पियुंनु मन चलके १ ।
कंठ धरी बेहू बांदालडी रे दरपण मांहे निहातु रे २ ॥
ज्यम ज्यम रीझे शामालियां रे त्यम त्यम संगे भालुं रे
रोजडिए सुंदर वर पामी वामी वेदना भारी रे
नारसियाच्या स्वामी रोज शुहाव्यो, राखिश उर पर धारी रे ३ ॥
(घुंघटातून माझ्या कुंकवाची टिकली चमकते. आणि ती पाहून माझ्या प्रियकराचे मन चळते.
दोन्ही हातांनी गळ्याला मिठी मारून मी आरशात निरखून पहाते. श्यामसुंदरचे जसे जसे मन
रमते, तसतसे त्याच्या बरोबर मी आनंद करते. असा सुंदर स्वामी प्रतिदिन मला भेटतो आणि
माझ्या वेदना कमी होतात. नरसिंहाचे स्वामी रोज मला सौभाग्यदान करताहेत. त्याना हृदयाशी
धरून ठेवीन)
64 नरसी मेहता
हा चांदलो (कुंकुम टिकली) तर सौभाग्यवतीने आपल्या कपाळावर केलेला आहे. परंतु
आकाशातील चंद्राला उद्देशून संबोधन केलेले पहायला मिळते.-
थिर थिर चांदला म करिश वेंणु प्राणजीवन घेर आव्या.
वालि वालि अवतार घरीने पूरण पुण्ये पाम्यां रे
चांदो शाह्य चांदणिये रे, ज्यम सरोवर शोभे वेण्यरे
गोविंदो शोभे गोरणिये, ज्यम हंसागवनी हे त्य रे-
बापहडो पियु पियु करे रे कोयल मधुरी वाशे रे
हुं तुजने वारूं कुरककडा रे, रखे तुं वयण प्रकाशे रे,
शाहार शोहे लेहेरडिये लेहेरे लेहेरतरंगा रे,
नरसियाच्या स्वामी भले मालियो गोपीवर गोविंदा रे ।
(चंद्रा, थांब थांब पहाट करूं नको. माझा प्राणजीवन (कृष्ण) घरी आला आहे. परत परत
जन्म घेऊन पूर्ण पुण्याईने मला हा मिळाला आहे. चंद्र चंद्राणीसह शोभतो आणि सरोवर
वेलवेलीनी. गोविंदा गोपी (राधा) बरोबर शोभतो आणि स्त्रीला हंसगती शोभते-बापैडा पक्षी
'पियुं पियुं' करतो आहे आणि कोकीळा मधुर गात आहे. कोंबड्या मी तुला मना करते आहे.
राहुं दे पहाटेचा प्रकाश (तूं आरवुं नको !) कवी काव्यलहरींनी शोभतात. आणि काव्यलहरी
आनंदतरंगांनी शोभतात. नरसिंहाचे स्वामी गोपीधर गोपाल भेटले, फार आनंद वाटला.'
'इंदू, उतावलो या रखे आकलो' आणि 'हे रहे रे चांदला, मान मागूं' ही यां प्रकारची गीते
आहेत.
हे नीट समजून घेतले पाहिजे की न्याहायच्या वेळी हे परलक्षी वर्णनात्मक गीत आहे, की
या भावांच्या आविष्काराचे हे आत्मलक्षी भावगीत आहे. अशी कोणतीही भेदरेषा नरसिंहाच्या
मनात होती, असे मानायचे कारण नाही. त्यांच्या हृदयातून काव्यवाणीचा ओघ वहातो आणि
त्या त्या वेळी दोन्ही प्रकारच्या, कधी वेगळ्या वेगळ्या, कधी मिश्र अशा काव्यरचना बनत
जातात. व्रजभाषेचे अष्टछाप आणि इतर भक्तकवींच्या मनोगतांतून जसा कीर्तनप्रवाह वाहात
राहिला होता, तसाच प्रकार नरसिंहाच्या बाबतीत पहायला मिळतो. भालण कवींची पदे
पहातांना आपल्याला हा अनुभव जरूर येतो; परंतु एक 'सर्वतंत्र स्वतंत्र' कक्षेचा कवी आहे तर
दुसरा अमूक चौकटीत बांधला गेलेला कवी आहे. हे नक्की सांगू शकतो की दोघांनाही
शास्त्रीय रागांची माहिती आहे, आणि त्या त्या वेळच्या त्या त्या रागांची त्यांना उत्तम समज
आहे.
६ नवनवोन्मेषशाली कवी
नरसिंहाच्या काव्यप्रतिभेचा उत्स्फूर्त आविष्कार कसा होत गेला ते आम्ही मागील प्रकरणांत
सोपे करून सांगितले आहे. ११व्या १२ व्या शतकापासून सुसंस्कारीत भारतीय भाषा
घुसळल्यासारख्या झाल्या आणि सर्व भाषीय साहित्यरचनांना एक प्रकारची गती आली.बंगाल
बिहार, उत्तर प्रदेश, विशाल राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, आणि महाराष्ट्रांत अशा प्रकारच्या
भाषारचना वापरांत येत होत्या. मुख्यतः जैन रचना व्यवस्थित संभाळून ठेवणाऱ्या भांडारांमुळे,
विशाल राजस्थान, गुजराथ च्या रचना मोठ्या प्रमाणात संभाळल्या गेल्या आहेत. दुसऱ्या
ठिकाणी सर्व रचना संभाळल्या गेल्या नाहीत. निरनिराळ्या राजवाड्यांतून, राजाश्रय
मिळालेल्या कवींच्या रचना संग्रहीत केल्या गेल्या, परंतु विदेशी आक्रमणांमुळे जिथे जिथे
सत्तापालट झाला, तिथे तिथे मोठ्या प्रमाणांत साहित्याचा नाश झाला, त्यामुळेच साहित्याची
विपुलता पहायला मिळत नाही. जयदेवांचे गीतगोविंद प्रथम स्थानिक भाषेत होते. आणि नंतर
ते संस्कृत भाषेत संस्कारीत झाले असा अभिप्राय सुप्रसिद्ध भाषातत्त्वज्ञानी डॉ. सुनीतिकुमार
चॅटरजीनीं दिला आहे. १३ व्या शतकांत 'गीतगोविंद' चा व्यापक प्रसार झाला. थोड्या
कालावधीतच उत्कल (आरिसा) पासून तो थेट गुजराथपर्यंत 'गीतगोविंद' चा प्रसार झाला. या
नंतरच्या विद्यापतींच्या रचना, कांही कारणास्तव कां होईना पण जपून ठेवल्या गेल्या. महाराष्ट्रात
साहित्याची जपणूक बऱ्याच प्रमाणांत झाली. महनुभाव संप्रदायाच्या कीर्तन रचना आणि नंतर
वारकरी संप्रदायाचे ज्ञानेश्वर आणि त्यांचे शिष्य नामदेव, या दोघांच्याही रचना सुरक्षित ठेवल्या
गेल्या, उलट गुजराथमध्ये जैन साहित्य सोडून इतर जुन्या रचना जपलेल्या नाहीत. जपणूक
झाली ती लौकिक कथाप्रकारच्या रचनांची जसे असाइतची 'हंसाउली' आणि भीमाची
(सदयवत्सकथा) अशा रचनाची जपणूक जैन भंडारांमुळे झाली. नरसिंह महेतांच्या पण सर्व
रचना संभाळल्या गेल्या असे म्हणायला आपल्यापाशी काही पुरावा नाही. यांच्या जवळच्या
उत्तर समकालीन आणि उत्तरकालीन साहित्यकारांच्या रचनांच्या पोथ्या मिळाल्या आहेत. तर
नरसिंहाच्या त्यांच्या नंतर सव्वाशे दिडशे वर्षांनंतरच्या पोथ्या मिळाल्या आहेत. त्यात फारश्या
66 नरसी मेहता
रचनाही नाहीत. कारण स्पष्ट आहे. यांच्या जीवनकालांत आणि नंतरही लोकांच्या
उपयोगांनुसार, यांच्या रचनांच्या नव्यानव्या नकला केल्या गेल्या आणि जुन्या पोथ्यांची
दरकार राहिली नाही. या नव्या नव्या नकलांमुळेच, नरसिंहाच्या रचना अजूनपर्यंत बऱ्याच अंशी
सुलभतेने उपलब्ध आहेत. या रचनांमधे नरसिंहाच्या अद्भुत कवी प्रतिभेचे सहज दर्शन होते.
नरसिंह भक्त होते.भालण कवीप्रमाणे त्यांचे कवित्व आगंतुक नव्हते, परंतु सहज होते.
यांच्या अनेक पदांमधे लिहितां लिहीतां ते, त्या त्या प्रसंगात सहभागी झाल्याचे आढळून येते.
हे त्यांच्या उत्कट तन्मयतेचे द्योतक आहे.तसे पाहिले तर नरसिंहाचा मुळपिंड भक्तकवीचाआहे
आणि कवी असल्यामुळे यांचा स्वाभाविक कल ‘रसा’ कडे आहे. यांच्या काव्यांत सहजपणा
आहे. परिश्रम नाहीत. रस आणि अलंकार यांच्या व्यवस्थित मांडणीचा, यांनी विचार केला
नाही ते स्वाभाविकपणेच, यांच्या काव्यांत येतात. शृंगाररसाचे तर नरसिंह स्वामीच आहेत.
श्रीकृष्णलीलेच्या काव्यांत त्यांनी विप्रलंभ आणि संयोग या प्रकारांची रेलचेल केली आहे.
विप्रलंभ शृंगारांत नायकाच्या गैरहजेरीतला वियोग आणि त्याच्या हजेरीत ही वियोग तर
संयोग शृंगारांत नायकाच्या प्रत्यक्ष हजेरीत पण संयोगाचा आनंद आणि गैरहजेरीत पण
संयोगाचा आनंद असे चारी प्रकार त्यांनी वर्णिले आहेत. इतर रसांपैकीं हास्य ‘करुण’ अद्भुत
बीभत्स आणि शांत हे रस त्यांनी प्रसंगोपात वर्णन केलें आहेत. हास्य हे खरे आहे कीं नरसिंहाना
‘हास्य’ रसाची तशी कुठेही जरुर वाटली नाही. क्वचित असा एखादा प्रसंग त्यानी हस्तगत
केला आहे.
भोळा भोळा शंभु तमने विश्व वरवाणे रे
मूळनी वातो तमारी कोई नव जाणे रे ।
जोगिंद्रपणु शिवजी ने तमारूं जाप्युं रे
जयमां घालीने शिवजी क्यांथी तमे आणि रे ?
पीळी पटोळी ने अंगे छे गोरी रे
सीदने छुपावो शिवजी छती थई छे चोरी रे
ना रे मानो तो शिवजी जराओं छोडो वुं रे
जटा माथी बीकले तो करी ना बोलवुं रे
भभुन चोळीत शिवाजी वाल्यां आडा आकरे
एक एवा लक्षणे पाणी न पाऊं टाक रे
आंकडो धंतुरो शिवजी विजयाना भोगीरे
महेता नरसेंयाने स्वामीना तमे जूना छो जोगी रे
(शंकर मोठे भोळे म्हणून सर्व जग तुमची स्तुती करते. पण मुळांतली गोष्ट काय आहे हे
नवनवोन्मेषशाली कवी 67
कोणालाच ठाऊक नाही. शंकरा, तुमचे योगीपण मला कळले आहे. तुमच्या जटांत घालून हे
तुम्ही कुठून आणले आहे ? कोणी आपल्या मागे घालून जाणते, कोणी हाताने धरून आणते,
तुम्ही शंकरा, डोक्यात घालून ही कुठून आणलीत. पिवळी पटोळी साडी नेसली आहे आणि
गोरी आहे, कशासाठी लपवता अहात शंकरा. तुमची चोरी तर उघडकीस आली आहे. तुम्ही
मानीत नसाल शंकरा, तर तुमच्या जप मी सोडतो, जटांमधून निघेल तर या पुढे मी तुमच्याशी
बोलणार नाही. (मानणार नाही). भस्म चोळून शंकरा तुम्ही अगदी कमाल केलीत. अशा तऱ्हेच्या
तुमच्या लक्षणामुळे तुम्हाला एक टांकभर पाणी सुद्धा मी पाजणार नाही. चिमटा धत्तुरो ठेवणारे
तुम्ही शंकरा, यशस्वितेचे तुम्ही भोगी आहात. नरसिंह महेतांच्या स्वामीचे तुम्ही जुने योगी
आहात.
करुण
नायकाच्या अगर नायिकेच्या तसेच नातेवाईकांच्या अगर संबंधिताच्या मृत्यूमुळे जे
वातावरण निर्माण होते. त्यात करुण रस मूर्त होऊ शकतो. विरहाची तीव्रता नसावी आणि
मीलनाचा योग यावा तिथही करुण रसाची आशा करणे बरोबर नाही. म्हणून नरसिंहाच्या
रचनामध्ये करूण रसाची आशा करणे बरोबर नाही. एकाच प्रसंगात करुणरसाची शक्यता
आहे. जिथे नायक जगांत आहे पण वियोग कायमचा आहे. गोपींना कायमचे सोडून श्रीकृष्ण
मथुरेला राहू लागले तो प्रसंग गोपींचे सांत्वन करायला श्रीकृष्णांनी उद्धवाला पाठवले तेव्हा
गोपींनी जो 'निरोप' पाठवला आहे त्यांत करुणरस मूर्त झाला आहे.
आधव कहेजो रे हरिने एट्सुं रे के अमने तमारो आधार.
विखंडा पाईने रे वाहरी जी शे न गया रे के दुख देखाइयां दीनदयाळ
दुखडानी दाझी रे ओधव देह केम वले हरि विना हार्ळी हड्डा मोह
रे वेह तण भडका रे ओधव, बेसमे रे के बळवंत आवई झाले बाहे
माहरा मन विशे रे हरिनी दास छु रे के घणां तमो साधो मानव सार
के जीवो तेने जोवा आवज़ा रे के मुआ पछी ले जो रे संभाल
के साधुवे कळावीने रे ओधव, आविया रे मथुरा नगरानी मोझारय
गोपीजन नित्ये रे नरसैया स्वामीने कहिये रे के नयणे वहे आंसुडानी धार
(उद्धवा, हरिला एवढेच सांगा) की आम्हाला तुमचा आधार आहे. प्रिय कृष्णा, तूं अलग
झालेला अनुभवून आमचे जीवनच संपल्यासारखे झाले, (हरीला सांगा) की दीनदयाळा तूं
आम्हाला दुःख दिले आहेस. उद्धवा, दुखावल्या गेलेलो आम्ही करपून गेलो आहोत. देहाची
कशी स्थिती झाली आहे. (त्याला सांगा) की हरीशिवाय हृदयांत होळी पेटली आहे. उद्धवा
सांगा की जखमेत नुसता भडका उडत आहे, बलवंता (हरी) येईल आमचा हात घर आणि
68 नरसी मेहता
आम्हाला उल्लसित कर. मी हरीची दासी आहे. हीच भावना माझ्या मनात आहे रे, तुम्ही मानव
जन्माचे कल्याण खुशाल भरपूर साधीत रहा सांगा तुझ्या दर्शनासाठी जीवित आहेत. त्यांना
भेटायला ये आणि नाहीतर सांगा मेल्यावर सांभाळ कर. उद्धवा त्यांना सांगा साधु माणसाला
इकडे वळवून तुम्ही मथुरा नगरांत मौज करायला गेलात. नरसिंहाच्या स्वामीना सांगा गोपीच्या
डोळ्यातुन सतत आसंवांची धार वहात आहे.)
नरसिंहानी आत्मचरित्रपर काव्यांत करुणतेचा मामुली स्पर्श असलेले अनेक प्रसंग वर्णन
केले आहेत. जसे मामेरू काव्यांत पित्याच्या गरीबीचे मुलीने केलेले वर्णन विवाह काव्यांत
दीक्षित गोर जुनागडला येऊन सामळदासांची सगाई जमवून आल्याची बातमी सांगताना
आणि मदन महेता त्यांची पत्नी दोघेही धरणीवर कोसळतात तिथे मदनमहेताच्या पत्निने
केलेला पश्चात्ताप दीक्षित गोर ने लग्नाची निमंत्रणपत्रिका देतांच माणेक महेतांचे लग्न कसे
पार पडेल त्याचे दुःख निरनिराळ्या प्रसंगी सहाय्य करण्यासाठी नरसिंहानी केलेली
काकुळतीची प्रार्थना आणि सुदाम चरित्रात त्याच्या पत्नीने सुदामाला दिलेली प्रेरणा हे ते प्रसंग
आहेत. या प्रसंगात करुण रस नाही म्हटलं तरी चालेल फक्त औत्सुक्य ग्लानी अशासारखे
मनांत उभरलेले भावच आहेत.
अद्भुत - आत्मचरित्रपर काव्यांत थोड्या अधिक उच्च कक्षेने, हा रस व्यवस्थित दिलेला
आहे. अर्थात कुठेही या रसासाठी खास प्रयत्न केलेला नाही.
बीभत्स - वीर रौद्र आणि भयानक रसांच्या परिणामातूनच बीभत्स रस (पाहून शहारे येतील
असे घाणेरडे चित्र) मूर्त होतो. नरसिंहाच्या रचनांत असा कोणता युद्धप्रसंग शक्य झालाच
नाही. 'बीभत्स' रसाचे उदाहरण म्हणून स्वीकाराायचे झाल्यास असे एकच पद मिळते. यांत
रूपक आणि अतिशयोक्ति या दोन्ही अलंकारांचा स्पर्श झाल्यामुळे बिभत्सता थोड्या प्रमाणांत
मागे पडते (झाकली जाते) या पदांत मृत्यू पावलेल्या माणसांचे अंतीम चित्रण देण्यांत आले
आहे.
बाळा रे वदनी पालखी, जोतां वनिताने थाय उलास
नाहीधोईने पढियारे, तिलक कीधां भाल
वरना जानैयां शोभी रह्यां रे, माथे नारव्यां छे अबीर गुलाल
लीला ते वासंती पालखी रे, तेना उचकनारा चार
माथे ते बांध्या भीना पोतियांरे मोठे रामनाम पोकार
चोरी ते बोधी चोकमां रे, छाणो ते लाव्या जाय
गोलपपडी ते देखे कुतरां रे ते तो मनमां घणु मलकाय
बाळा रे आगळ चाले लाकडां रे पाछल चाले लाहाय
नवनवोन्मेषशाली कवी 69
जमायी तो चाल्या सासरे, रे एने सासुने हरख न माय.
तोरणे तनखां डडियां रे, मांडवे लागी लार
उठ रे सासु तुं शंखणी रे, तोरो जमाई आव्या बहार,
पंधरसे पहेरामणी रे मसाणां नामनु गाम
लालबाईनी दिकरी रे, चित्ताकुवरी एनु नाम
जमायी तो रह्या सासरे रे, जानइयां आव्यां घेर
टको पैसो सर्वे खायी गयारे, विवाह कीधो छे रूडी पेर
बार घडा बार कोंडियां रे, उपर पैसो मेलो शेक
जई ने कहो एने बापने रे, हवे ताणीने मेलो पोरू
जीवने जमडा लेई गयां रे, देहीने कीधी ये हाल
नरसैयान्यो स्वामी मल्यो रे, ते तो उतरिया भवपार
(बालिकेच्या पतीची पालखी पाहून वनितेला (मृत्युदेवतेला) आनंद वाटला. स्वच्छ
आंघोळ घालून त्याला झोपवला आणि कपाळावर टिळा लावला. वराकडची वऱ्हाडी माणसे
सुंदर दिसत आहेत. त्यांनी डोक्यावर अबीर गुलाल लावला आहे. हिरव्या बांबूची पालखी
आहे आणि उचलणारे चौघे आहेत त्यांच्या डोक्याला रुमाल बांधलेले आहेत आणि ते मुखाने
रामनाम उच्चारित आहेत चौघांत मंडप घातला आहे. जाळण्यासाठी गोवऱ्या आणल्या आहेत.
गोलपापड्या पाहून कुत्र्यांच्या तोंडाला पाणी सुटले आहे. नवऱ्यामुलापुढे लाकडें चालली
आहेत, पाठीकडून निखारे चलले आहेत. जावयी सासरी चालला आहे, आणि याच्या सासूचा
आनंद पोटात मावेनासा झाला आहे. मांडवाच्या तोरणाशीं ठिणग्या उडत आहेत. आणि
मांडवात लांब रांग लागली आहे. (माणसांची) अग शंखीणी सासु उठ, तुझा जावयी बाहेर
आला आहे. स्मशान नावाच्या गावांत १५ लोकांना पोशाख घालायचे आहेत. लालबाईची
(अग्नीची) मुलगी आहे. तिचे नाव 'चिताकुवरी' आहे. अरे जावई राहिला सासरी, त्यांचे वऱ्हाड
घरी परतले. पैसे टक्के, सर्वजण खाऊन गेले. विवाह उत्तम तऱ्हेने केला.
बारा घडे आणि बारा पणत्यांवर रोख पैसे ठेवले. त्यांच्या बापाला आतां सांगा, 'भरपूर
रडून घे.' यमदूत जीवन घेऊन गेले आणि शरीराची ही स्थिती केली. नरसिंहाचे स्वामी भेटलें
आणि ते भवपार झाले.
शांत - शांत 'रसाला स्वतंत्ररस' म्हणून स्वीकारायचे असेल, तर नरसिंहाची जी भक्ती
ज्ञानाचीं पदे आहेत, त्यातील 'संसाराबद्दलची अनासक्ति' ची जी पदें आहेत. त्यांच्या समावेश
शांत रसात होऊं शकेल.
घडपण केणे मोकल्युं, जाण्युं जोबन रहे सौ काळ