सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
३६० सार्थ तुकारामगाथा
अंधार प्रकाशी । जाय दिवस पावे निशी ॥ ३ ॥
बीज पृथिवीच्या पोर्टी । तुका म्हणे दावी दृष्टी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- नाड-अडचण, खोड-न बोलणारा, मूकस्तंभ.
अर्थ :- फार बोलत राहिल्यासही अडचण निर्माण होते. बरे, काहीच न बोलले तर, मग एखाद्या खोडा-
सारखे मूकस्तंभ म्हटले जाते. १ या दोहोंपेक्षा वेगळेच वागले तर, ते फायद्याचे होईल, बोलणेच असे असावे की,
त्यात अबोलाचे गुण असावेत, अशी नीती आहे. २ दिवस मावळायला लागला की, प्रकाशालाच अंधार येऊन रात्र
येत असते. तसे अबोलातच बोलणे वा बोलण्यात अबोलत्व असावे. ३ पृथ्वीच्या पोटीच असणारे बीज वरील संपन्न
झालेली व फुलांफळांनी बहरलेली सृष्टी दाखविते, त्याप्रमाणे बोलीतच अबोलत्वाचे गुण असावेत. ४
७२७ विचारा वांचून । न पवीजे समाधान ॥ १ ॥
देह त्रिगुणांचा बांधा । माजी नाहीं गुण सुदा ॥ २ ॥
देवाचिया चाडें । देवा द्यावें जें जें घडें ॥ ३ ॥
तुका म्हणे होतें । बहु गोमटें उचितें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- बांधा-बांधलेला समुदाय, गोमटें-चांगले.
अर्थ :- आत्मविचाराशिवाय मनास खरे समाधान व्हायचे नाही. १ हा देह सत्व, रज व तम या गुणांचा
एकत्र बांधलेला समुदाय असून, त्यात एकही चांगला गुण नाही २ देवाची इच्छा मनात ओळखून जे काही द्यायचे
असेल, ते देवाला समर्पण करावे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे करणे हेच मोठे उचित व चांगले होते. ४
७२८ तुटे भवरोग । संचितक्रियमाणभोग ॥ १ ॥
ऐसें विठोबाचें नाम । उच्चारितां खंडे जन्म ॥ २ ॥
बसों न सके पाप । पळे त्रिविध तो ताप ॥ ३ ॥
तुका म्हणे माया । होय दासी लागे पायां ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपाः-खंडे-संपतात, त्रिविधताप-आधिदैविक, आध्यात्मिक, आधिभौतिक अशा तीन प्रकारचे ताप.
अर्थ :- विठ्ठलाच्या नामामुळे भवरोगाचा नाश होतो, तो संपतो. संचित, क्रियमाण यांचे भोगही त्यामुळे
संपतात. १ विठोबाच्या नामाचा असा हा प्रभाव असून त्याचा उच्चार करिताच जन्ममरणाच्या फेऱ्या संपतात. २
त्याच्या सान्निध्यात पापाचा निवास असू शकत नाही, व मनास होणाऱ्या त्रिविध तापांचा नाश होतो. ३ तुकाराम
महाराज म्हणतात, माया ही दासी होऊन मग त्याच्या पायास स्पर्श करू लागते. ४
७२९ मुसावलें अंग । रंगीं मेळविला रंग ॥ १ ॥
एकीं एक दृढ जालें । मुळा आपुलिया आलें ॥ २ ॥
सागरीं थेंबुडा । पडिल्या निवडे कोण्या वाटा ॥ ३ ॥
तुका म्हणे नवें । नव्हे जाणवे हें देवें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- मुसावले-भरून गेले, थेंबुडा-थेंब
अर्थ :- ब्रह्माच्या रंगात जीवाचा रंग मिळविल्यामुळे सर्व अंगच ब्रह्मभावाने अथवा प्रेमभावाने भरून गेले
आहे. १ आत्मा परमात्म्याच्या स्वरूपात, जीव शिवाच्या स्वरूपात दृढ झाल्यामुळे आपल्या मूळच्या स्थानावर
आल्याचेच समाधान वाटले. २ मोठ्या सागरातील पाण्याचा थेंब, हा त्या पाण्यापासून वेगळा कधी काढता येईल
का ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे मी काही नवीन तत्त्वज्ञान सांगत आहे असे नाही. हे पूर्वापासुनचे, मूळचेच
आहे, असे देवाने जाणावे. ४
सार्थ तुकारामगाथा ३६१
७३० अनुतापें दोष । जाय न लगता निमिष ॥ १ ॥
परि तो राहे विसावला । आदीं अवसानीं भला ॥ २ ॥
हेचि प्रायश्चित्त । अनुतापी न्हाय चित्त ॥ ३ ॥
तुका म्हणे पापा । शिवो नये अनुतापा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - अनुतापें-पश्चात्तापाने निमिष-क्षण
अर्थ - खरोखरचा पश्चात्ताप झाला तर मग एका क्षणाचाही विलंब न लागता सर्व दोष नाहीसे होतात १
पण जन्माच्या आरंभापासून नीट स्थिर असलेला पश्चात्ताप असेल तर तो चांगला २ पश्चात्तापाच्या जलामध्ये
स्नान करणे हेच खरे प्रायश्चित्त ३ तुकाराम महाराज म्हणतात, पश्चात्तापाच्या वृत्तीस पाप शिवत सुद्धा
नाही ४
७३१ चहू आश्रमाचे धर्म । न राखता जोडे कर्म ॥ १ ॥
तेंसी नव्हे भोळी सेवा । एक भावचि कारण देवा ॥ २ ॥
तपें इंद्रिया आघात । क्षणे एका वाताहात ॥ ३ ॥
मत्र चले थोडा । तरि घडचि होय वेडा ॥ ४ ॥
व्रतें करिता सांग । तरी एक चुकता भंग ॥ ५ ॥
धर्म सत्वचि कारण । नाहीं तरी केला सिण ॥ ६ ॥
भूतदयेसि आघात । उच्चनीच वाताहात ॥ ७ ॥
तुका म्हणे दुजें । विधिनिषेधाचें ओझें ॥ ८ ॥
शब्दार्थ व टीपा - घड-शहाणा, सांग-पूर्ण
अर्थ - ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व सन्यासी या चार आश्रमाचे धर्म न राखताच नुसतेच कर्म करीत
राहिल्यास त्यात त्याचा काय उपयोग ? १ तशी या विठ्ठलाची भोळी सेवा नाही एकनिष्ठ भावानेच हा देव प्रसन्न
होतो २ उग्र तपश्चर्येने इंद्रियावर आघात होतो, पण एखाद्या क्षणी विपरीत प्रसंग आला की, मग सर्व तपाचा
नाश होतो ३ मंत्राने काही फायदा होईल हे खरे, पण त्यात थोडी जरी चूक झाली तरी, शहाणा मनुष्य वेडा
होईल ४ व्रते-वैकल्ये पूर्णपणे केली तरच ठीक पण थोडे जरी त्यात चुकले तरी त्याचा भंग होतो ५ सत्व गुणाने
युक्त असा धर्म केला तरच तो उपयुक्त होतो नाही तर विनाकारण त्रासच्च होतो ६ भूतदया चांगली खरी, पण
तीमध्येही हा उच्च, हा नीच असा भाव निर्माण झाला तर मग त्याही उपायाची वाताहत होते ७ म्हणून तुकाराम
महाराज म्हणतात, एका भक्तीशिवाय इतर मार्गांनी जाण्यात विधिनिषेधाचे ओझे फार मोठे आहे ८
विवरण - यज्ञयाग, जपतपादी साधने, तीर्थयात्रा, कर्मकांड, तपश्चर्या, योगादि निष्ठा यासारख्या मार्गापेक्षा
भक्ती फार सोपी, अशी ग्वाही भगवद्गीतेने दिली तिचाच पाठपुरावा साधुसंत नेहमी करीत असतात भोळया-
भाबड्या भाविकांना खडतर साधने व क्लेशकारक उपाय जमण्यासारखे नसल्यामुळे त्यांना हरिभक्ती हाच एक सहज
व सोपा असा उपाय असतो 'नामसंकीर्तन साधन पै सोपें । जळतील पापें जन्मांतरें' असे तुकारामबुवांनी म्हटल
आहे 'जरी तुज व्हावा देव । तरि हा सुलभ उपाय', 'भावाचि कारण भावाची कारण । मोक्षाचें साधन बोलियेलें'
यासारख्या वचनातून भक्तीची सुलभता तुकाराम महाराजांनी वर्णन केली आहे
७३२ सोडिला ससार । माया तयावरि फार ॥ १ ॥
धावत चाले मागें मागें । सुखदु ख साहे अगें ॥ २ ॥
तु गाथा ४६
३६२ सार्थ तुकारामगाथा
याने घ्यावे नाम । तीसीकरणें त्याचें काम ॥ ३ ॥
तुका म्हणे भोळी । विठ्ठलकृपेची कोवळी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - साहे-सहन करतो, अगें-स्वत
अर्थ - ज्याने या श्रीहरीच्या प्राप्तीसाठी संसाराचा लोभ सोडला, त्याच्यावर देवाची फार मोठी माया
असते १ अशा भक्ताचे काम देव त्याच्यामागे धावत जाऊन करीत असतो त्याचे सुखदु ख तो स्वतः होऊन सहन
करीत असतो २ या भक्ताने ईश्वराचे नाव घ्यावे व ईश्वराने त्याची सर्व कामे करावीत असे नाते मग निर्माण
होत असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशी ही विठ्ठल माउली मोठी कृपाळू असून मनाची मोठी भोळी पण
कोवळी आहे ४
७३३ बैसो खेळूं जेवू । तेथें नाम तुझें गाऊ ॥ १ ॥
रामकृष्णनाममाळा । घालू ओवुनियां गळा ॥ २ ॥
विश्वास हा धरू । नाम बळकट करू ॥ ३ ॥
तुका म्हणे आता । आम्हा जीवन शरणागता ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - शरणागतां-शरण आलेल्यांना
अर्थ - बसत असताना, खेळत असताना, जेवण करीत असताना, प्रत्येक हालचालीत देवा, तुझे नाम
आम्ही घेत राहू १ रामकृष्ण या नामाची माळ ओवून आम्ही आमच्या गळ्यात धारण करू २ याच नामाचा
विश्वास धरून नामस्मरणाच्या भक्कम मार्गाने आम्ही जाऊ ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा शरण आले-
ल्यांना या विठ्ठलाचे नाव हेच एक जीवन आहे ४
७३४ पाठीं पोटीं देव । कैंचा हरिसा भेव ॥ १ ॥
करा आनंदें कीर्तन । नका आशंकितमन ॥ २ ॥
एथें कोठें काळ । करील देवापाशीं बळ ॥ ३ ॥
तुका म्हणे धनी । सपुरता काय वाणी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - भेव-भय, आशंकित-संशयित, सपुरता-पूर्णत्व, वाणी-कमतरता
अर्थ - हा देव मागे, पुढे, आत, बाहेर सर्वत्र वसलेला असल्यामुळे हरिदासांना भय कसले आहे ? १
आनंदाने तुम्ही कीर्तन करून त्या प्रभूचे गुणगान करावे मन कधीच संशयित असे ठेवू नका २ या देवापाशी
प्रत्यक्ष काळाचेही बळ काही करू शकणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा धनी जर प्रसन्न झाला तर
मग पूर्णत्वास काय कमतरता आहे ? ४
७३५ मनोमय पूजा । हेचि पढीयेँ¹ केशीराजा ॥ १ ॥
घेतो कल्पनेचा भोग । न मानेती बाह्य रग ॥ २ ॥
अंतरींचें जाणे । आदिवर्तमान खुणे ॥ ३ ॥
तुका म्हणे कुडें । कोठें सरे त्याच्या पुढें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - पडीयें-आवडती, कुडें-खोटा
अर्थ - मनातील शुद्ध भावाने होणारी पूजा त्या श्रीहरीला फारच आवडते १ त्याच्या विषयी मनात
ज्या विविध भावाच्या कल्पना असतात, त्याच्या भोगातच तो सुखावतो मग त्याला बाह्य रंगाचा थाटमाट नको
असतो २ हा देव मागचे, चालू व पुढचे काळात जे जे मनात असेल ते जाणतो ३ तुकाराम महाराज म्हणतात,
खोटा भाव त्यापुढे कसा टिकून राहील ? ४
१ पडीये
सार्थ तुकारामगाथा ३६३
७३६ जाणे भक्तीचा जिव्हाळा । तोचि देवाचा १ पुतळा ॥ १ ॥
आणीक नये माझ्या मना । हो का पंडित शाहाणा ॥ २ ॥
नामरूपी जडले २ चित्त । त्याचा दास मी अंकित ॥ ३ ॥
तुका म्हणे नवविध । भक्ति जाणे तोचि शुद्ध ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - नवविध - श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य व आत्मनिवेदन
अशा नऊ प्रकारांनी भक्ती.
अर्थ - जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो, जिव्हाळ्याने भक्ती करितो, तो प्रत्यक्ष देवाचाच पुतळा आहे, असे
समजावे. १ मग तो पंडित आहे की नाही, शहाणा आहे की नाही, हे काही माझ्या मनात येत नाही. २ माझे
चित्त त्याच्या नामरूपात जडलेले असते. मी त्याचा अंकित दास बनलेलो असतो ३ तुकाराम महाराज म्हणतात,
श्रवण, कीर्तन, स्मरण इत्यादी नऊ प्रकाराची भक्ती जो जाणतो तोच खरा शुद्ध होय ४
७३७ याजसाठीं वनान्तर । जातो सांडुनियां घर ॥ १ ॥
माझें दिठावेल प्रेम । बुद्धि होईल निष्काम ॥ २ ॥
अद्वैताची वाणी । नाहीं ऐकत मी कानीं ॥ ३ ॥
तुका म्हणे अहंब्रह्म । आड येऊं नेदीं भ्रम ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - सांडुनिया - सोडून, दिठावेल - दृष्ट लागेल
अर्थ - मी घर सोडून वनात यासाठीच जातो की, १ श्रीहरीच्याबद्दल माझ्या मनात जो प्रेमभाव आहे
त्यास दृष्ट लागेल, अशी एकसारखी भीती मला असते या वनवासाने माझी बुद्धीही निष्काम होत राहील. २
अद्वैताचे बोलणे मी माझ्या कानानी कधी ऐकत नाही ३ मीच ब्रह्म आहे, अशा भ्रमास मी माझ्या सगुण प्रेमाच्या
आड येऊ देणार नाही ४
विवरण - सगुणभक्तीच्या आवडीचा हा एक लहानसा पण गोड असा अभंग अर्थपूर्ण आहे तत्त्वज्ञानाच्या
दृष्टीने अद्वैत हेच खरे, पण त्याची अनुभूती घ्यायची ती द्वैती भूमिकेवरील भक्तीमध्ये लवथून परमार्थ भोगा-
साठी अगेव झाला याची अनुभूती भक्तीच्या प्रेमसुखात मोठी असते तुकारामबुवा म्हणत आहेत, माझे हे सगुणाचे
प्रेम दृष्ट लागून कमी होईल, म्हणून मी रानावनात जातो तेथे मग माझी बुद्धीही इतर विषयातून कमी कमी होऊन
केवळ त्याच्या रूपातच जडेल अद्वैताच्या प्राप्तीचा ध्यास लागला की, मग मीच ब्रह्म अशी भावना होईल तत्त्वज्ञानाच्या
दृष्टीने ही भावना ठीक असली तरी, भक्तिसुखास तिने उणेपणा येतो मीच ब्रह्म आहे अशी धारणा झाली तर मग
भक्ती कुणी कुणाची करायची ? म्हणून तुकोबा म्हणतात की, असल्या अहंब्रह्माची बाधा मला होऊ नये
७३८ बुडतां आवरीं । मज भवाचे सागरीं ॥ १ ॥
नको मानूं भार । पाहो दोषांचे डोंगर ॥ २ ॥
आहे तें सांभाळीं । तुझी कैसी ब्रीदावळी ॥ ३ ॥
तुका म्हणे दोषी । मी तो पातकाची राशी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - आवरीं - सावरून धर, रक्षण कर
अर्थ - देवा, मी या भवसागरात बुडून जात आहे तू त्यातून माझे रक्षण कर १ माझ्या दोषांचे किंवा
अपराधांचे डोंगर पाहून त्याचे ओझे तू मानू नकोस २ पतित लोकांना पावन करून घेण्याचे जे तुझे ब्रीद आहे
त्याचा तू सांभाळ कर ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी तर पातकाची रास असून दोषी आहेच, पण
तू पतितपावन आहेस ना ? ४
१ देवाचा, २ मीनले
३६४ सार्थ तुकारामगाथा
७३९ अक्षई तें झालें । आतां न मोडे रचिले ॥ १ ॥
पाया पडिला खोले ठायीं । तेथें पुढें चाली नाहीं ॥ २ ॥
होतें विखुरलें । ताळा जमे झडती आलें ॥ ३ ॥
तुका म्हणे बोली । पुढें कुटितचि जाली ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा – अक्षई-कायम टिकणारी
अर्थ - या भक्तिमार्गाची इमारत आम्ही उभी केली आहे, ती कायम टिकणारी आहे आता जी उभी
राहिली आहे, ती काही केल्या मोडणार नाही १ चांगला खोल असा तिचा पाया असल्यामुळे तेथे कुणाचे काही
चालणार नाही २ आजवर सर्व हिशेब पसरून राहिला होता काही तपास लागत नव्हता, पण आता तपास
करता सर्व हिशेब नीट लागला व ताळाही जमून आला ३ तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून या मार्गाविषयीचे
पुढील बोलणेही आमचे सपत्यासारखे झाले ४
७४० तुझे थोर थोर । भक्त करिती विचार ॥ १ ॥
जपतपादि साधने । मज चिंतवेना मनें ॥ २ ॥
करुणावचनें । म्या भाकावीं तुम्हा दीने ॥ ३ ॥
तुका म्हणे घेईं । माझें थोडें फार ठावीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - भाकावीं-बोलावीत
अर्थ - देवा, तुझे मोठे मोठे भक्त तुझ्याविषयी फार मोठा विचार करतात. १ देवा, त्यांच्यासारखी
जपतपादी साधनेही मला माझ्या मनात सुद्धा आणता येत नाहीत २ करुण अशा वाणीने मी दीनाने तुमच्याशी
बोलावे, कृपा मागावी, एवढेच मला येते ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अशी जी काही माझी थोडीफार
सेवा असेल ती तू घ्यावीस ४
७४१ लावुनि काहाळा । सुखें करितो सोहळा ॥ १ ॥
सादवीत गेलो जना । भय नाहीं सत्य जाणा ॥ २ ॥
गात नाचत विनोदें । टाळघागऱ्याच्या छंदें ॥ ३ ॥
तुका म्हणे भेव । नाहीं पुढें येतो देव ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - काहाळा-झांजा, सादवीत-सावध करीत, सागत, भेव-भीती
अर्थ - मी झांजा वगैरे वाजवून मोठ्या सुखाने भजनाचा सोहळा करितो १ याच मार्गाने मी लोकांना
सावध करीत गेलो आहे सत्यास कधीही भय नाही, असे मी सागत आलो आहे २ मोठ्या तल्लीनतेने मी गातो,
नाचतो, टाळघागऱ्याच्या छंदावर माझे कीर्तन सुरू असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता मला कसली
भीती आहे ? प्रत्यक्ष देव माझ्या पुढेच आहे ना ४
७४२ मुक्त फासया म्हणावे । बंधन तें नाहीं ठावें ॥ १ ॥
सुखें करितो कीर्तन । भय विसरले मन ॥ २ ॥
देखिजेना नास । घालू कोणावरि कास ॥ ३ ॥
तुका म्हणे साहे । देव आहे तंसा आहे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - फासया-वधास, साहे-नाह्य,
अर्थ :- बंधन म्हणजे काय हेच मला माहीत नसल्याने, मुक्तता किंवा मोक्ष कशास म्हणावे, हेच मला समजत
नाही १ मी या ठिकाणी आता सुखाने कीर्तन करीत असून मला कसलीही भीती नाही २ आता कुणाचा नाश
सार्थ तुकारामगाथा ३६५
करावा अशी वस्तूच समोर दिसत नसल्यामुळे कास घालून आता कुणाचा प्रतिकार करावा ? ३ तुकाराम महाराज
म्हणतात, हा देव मला सदैव साह्य करीत असून तो आहे तसाच कृपाळू आहे. ४
७४३ ओनाम्याच्या काळें १ । खडे मांडविले २ वाळें ॥ १ ॥
तेंचि पुढें पुढें काई । मग लागलिया सोई ॥ २ ॥
रज्जु सर्प होता । तोंवरीचि न कळतां ॥ ३ ॥
तुका म्हणे साचें । भय नाहीं वागुलाचें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा.- ओनाम्याच्या काळें-ओनामा शिकण्याच्या वेळेस, लहानपणी, रज्जु-दोर
अर्थ :-लहानपणी ओनामा किंवा श्रीगणेशा शिकत असताना प्रथम एकेक अक्षरावर खडा ठेवून शिकवले
जाते. लहान मुलांसाठी ही रीत असते. १ पण मग पुढे चांगला अभ्यास झाल्यावरही खडे मांडून शिकविण्याची
काय जरूरी आहे ? २ दोर हा सर्प आहे अशी भावना होती, तोपर्यंतच त्याची भीती होती. ३ तुकाराम महाराज
म्हणतात, बागुलाचे भय तो केवळ बागुलबुवा आहे, हे सत्यज्ञान होताच नाहीसे होते. ४
७४४ आतां पुढें धरीं । माझे आठव वैखरी ॥ १ ॥
नको बडबडूं भांडे । फोडीं वाउगें तें रांडे ॥ २ ॥
विठ्ठल विठ्ठल । ऐसे सांडुनियां बोल ॥ ३ ॥
तुका म्हणे आण । तुज स्वामीची हे जाण ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :-आठव-स्मरण, वैखरी-वाणी
अर्थ :- माझ्या वाणीने आता यापुढे स्मरण म्हणून त्या विठ्ठलाचेच नाम घ्यावे. १ हे वाचे, उगाच बडबड
करून भांडणे उकरू नकोस. २ विठ्ठल विठ्ठल असे शब्द सोडून तू दुसरे काहीही बोलू नकोस. ३ तुकाराम महाराज
म्हणतात, असे जर न करशील तर तुला देवाची शपथ आहे. ४
७४५ काय नव्हे करितां तुज । आतां राखें माझी लाज ॥ १ ॥
मी तों अपराधाची राशी । शिखा अंगुष्ट तोंपाशीं ॥ २ ॥
त्राहें त्राहें त्राहें । मज कृपादृष्टी पाहेँ ॥ ३ ॥
तुका म्हणे देवा । सत्य घ्यावी आतां सेवा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- शिखा-शेंडी, अंगुष्ट-पायाचा अगठा, त्राहि-रक्षण कर
अर्थ:- देवा, तू मनात आणशील तर काय करणार नाहीस ? आता माझी लाज तू राख ना. १ देवा,
मी तर अपराधांची रास असून शेंडीपासून पायाच्या अंगठ्यापर्यंत पापांनी भरून गेलो आहे. २ देवा, तू माझे रक्षण
करावेस, अशी मी त्रिवार प्रार्थना करीत आहे. मजवर कृपा दृष्टीने पाहा ना. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा,
माझी ही सत्य स्वरूपाची सेवा घ्या ना तुम्ही ४
७४६ वंदीन मी भूतें । आतां अघौंचि समस्तें ॥ १ ॥
तुमची करीन भावना । पदोपदीं नारायणा ॥ २ ॥
गाळुनियां भेद । प्रमाण तो ऐसा वेद ॥ ३ ॥
तुका म्हणे मग । नव्हे दुजयाचा संग ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा:- भूतें-प्राणिमात्र, गाळुनिया -सोडून.
१ वेळें, २ माहवले.
३६६ सार्थ तुकारामगाथा
अर्थ:- देवा, आता सर्व प्राणिमात्रांना मी नमस्कार करीन. १ नारायणा, पदोपदी मी तुमच्याच भावनेने
पाहीन २ लहानमोठा असा भेद सोडून मी वागेन मी याबद्दल वेदास प्रमाण मानीन. ३ तुकाराम महाराज
म्हणतात, देवा, एवढे झाल्यावर मला दुसऱ्या कुणाची संगत सहन होणार नाही ४
७४७ पूजा पुज्यमान । कथे उभे हरिजन ॥ १ ॥
ज्याची कीर्ती वाखाणिती । तेथें ओतली ते मुर्ती ॥ २ ॥
देहाचा विसर । केला आनंदें संचार ॥ ३ ॥
गेला अभिमान । लाज वोळविला मान ॥ ४ ॥
शोक मोह चिंता । याची नेणती ते वार्ता ॥ ५ ॥
तुका म्हणे सखे । विठोबाच ते सारिखे ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - पुज्यमान-पूजा करण्यास योग्य असे. ओतली-निर्माण झाली, बोळविला-नाहीसा केला.
अर्थ - पूजा करण्यास योग्य असे जे हे हरिभक्त कथेसाठी उभे आहेत, १ आणि कीर्तनामधून ज्याचे
गुणगान ते करीत आहेत, त्याची मूर्तीच त्यांच्यासमोर उभी आहे, निर्माण झाली आहे. २ या हरिभक्तांना स्वतःच्या
देहाचा विसर पडला असून त्यांनी केवळ आनंदातच संचार केला आहे. ३ त्यांच्यामधील सर्व अभिमान संपला
असून लाज व मान यांचाही प्रभाव नाहीसा झाला आहे. ४ शोक, मोह, चिंता यांचे नाव सुद्धा आता ते जाणीत
नाहीत. ५ तुकाराम महाराज म्हणतात, असे हे विठ्ठलभक्त केवळ विठ्ठलच बनून गेले आहेत. ६
७४८ भाव तैसें फळ । न चले देवापाशीं बळ ॥ १ ॥
धांवे जातीपाशीं जाती । खुण येरयेरां चित्तीं ॥ २ ॥
हिरा हिरकणी । काढी आंतुनि अहिरणी ॥ ३ ॥
तुका म्हणे केलें १ । मन २ शुद्ध हें चांगलें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - येरयेरां-एकमेकाना, अहिरणी-ऐरण
अर्थ :- जैसा भक्तिभाव असेल, तसे फळ आपणांस प्राप्त होईल. इतर बळाचा काही उपयोग देवाच्या
प्राप्तीसाठी होणार नाही. १ जो ज्या जातीपाशी असेल, त्या जातीपाशी तो धावून जाईल. कारण परस्परांचे चित्त
एकमेकांना समजत असते. २ वरून घाव बसले असताना न फुटता हिरा ऐरणीतच अडकतो; पण हिरकणीने तो
बाहेर येतो. ३ त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, आपले मन शुद्ध, चांगले व ईश्वरभक्ताच्या जातीस
मिळणारे असावे. ४
७४९ वरि बोला रस । कथी ज्ञान माजी फोस ॥ १ ॥
ऐसे लटके जे ठक । तयां इह ना पर लोक ॥ २ ॥
परिस एक सांगे । अंगा धुळी हे न लगे ॥ ३ ॥
तुका म्हणे हाडें । कुत्र्या लाविलें झगडें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - फोस-पोकळ, व्यर्थ, ठक-फसविणारे.
अर्थ :- वरवर परमार्थज्ञान सांगणाऱ्याचे बोल चांगले रसाळ वाटतात; पण खऱ्या व शुद्ध ज्ञानाच्या
दृष्टीने पाहिल्यास त्याचे अंतरंग पोकळच असते. १ असे हे लोक फसविणारे असतात. त्यांना घड हाही लोक मिळत
नाही व परलोकही उरत नाही. २ तो ऐकतो एक व सांगतो दुसरे भलतेच. ३ अंगाला परमार्थविचाराची धूळ
धडही लागू देत नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हाडकाच्या तुकड्यासाठी भांडणाऱ्या कुत्र्यांसारखी त्यांची
स्थिती असते ४
१ भले, २ मन शुद्ध जीही केले.
सार्थ तुकारामगाथा ३६७
७५० हेचि तुझी पूजा । आतां करीन केशीराजा ॥ १ ॥
अवघीं तुझीं पदें । नमस्कारीन अभेदें ॥ २ ॥
न वर्जितादिशा । जाय तेथेंचि सरिता ॥ ३ ॥
नव्हे एकदेशी । तुका म्हणे गुणदोषीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - अभेदें-अभेद समजून, न वर्जित-न सोडता
अर्थ :- देवा, आता मी तुझी पूजा अशाच प्रकारे करीन. १ मी अभेदत्व समजून, सर्वत्र तुझेच पावले
आहेत, असे समजून नमस्कार करीन. २ कोणत्याही दिशेस न वगळता, न सोडता, सर्वत्र समत्वाच्या भावाने जाऊन
पाहीन. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी गुणदोषाच्या बाबतीत एकदेशी होणार नाही ४
७५१ आपले तो कांहीं । येथें सांगिजेंसें नाहीं ॥ १ ॥
परि हे वाणी वायचळ । छंद करविते बरळ ॥ २ ॥
पंचभूतांचा हा मेळा । देह सत्यत्वे निराळा ॥ ३ ॥
तुका म्हणे भुली । इच्छ्या उफराट्या चाली ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - वायचळ-वाचाळ, बरळ-बडबड, भुली-चुकीने
अर्थ - या मानवी जन्मात आपले असे काही आहे, हे सांगता यायचे नाही. १ पण ही माझी वाणी
वाचाळ असून व्यर्थ बडबड करण्याचा छंद घेते. २ हा देह म्हणजे पंचमहाभूतांचा एक मेळावा असून आत्मतत्त्वा-
पासून तो निराळाच आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, पण या वाणीमुळे देह व आत्मा एकच मानण्याची चूक
होत असते. ४
७५२ विठ्ठल नावाडा फुकाचा । आळविल्या साठीं वाचा ॥ १ ॥
कटीं कर जैसे तैसे । उभा राहिला न बैसे ॥ २ ॥
न पाहे सिदोरी । जाती¹ कुळ न विचारी ॥ ३ ॥
तुका म्हणे भेटी । हाका देतां उठाउठीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - नावाडा-नावाडी, फुकाचा-फुकटचा.
अर्थ - भवसागरातून तरून नेणारा हा विठ्ठल फुकटचा नावाडी आहे. मात्र त्याची आळवणी आपण
आपल्या वाणीने सतत केली पाहिजे १ हा देव कमरेवर हात ठेवून जशाचा तसा उभा असून खालीही बसत नाही. २
पारपुण्याची शिदोरी किती आहे किंवा भक्ताची जातकूळी कोणती आहे, याचा विचार न करता हा भक्तावर कृपा
करतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, भक्तानी हाक मारल्याबरोबर हा देव त्वरित त्याला भेट देतो. ४
७५३ कृपावंत किती । दीनैं बहु आवडती ॥ १ ॥
त्यांचा भार वाहे माथां । करी योगक्षेमचिंता ॥ २ ॥
भुलो नेदी वाट । करीं धरुनि दावी नीट ॥ ३ ॥
तुका म्हणे जीवे । अनुसरता एका भावें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - योगक्षेमचिंता-कल्याणाविषयी सर्व प्रकारची काळजी.
अर्थ - हा ईश्वर किती कृपाळू आहे । याला आपले दीन भक्त नेहमी आवडतात. १ तो स्वतः त्यांचा
सर्व भार शिरावर घेऊन त्याची सर्व कल्याणदायक चिंता तोच वाहतो. २ तो कधी सन्मार्ग चुकू देत नाही हात
धरून नीट वाट दाखवितो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, याला एकनिष्ठेने आपण शरण जावे. ४
१ याती.
३६८ सार्थ तुकारामगाथा
७५४ नेणती वेद श्रुति कोणी । आम्हां भाविकां वांचुनी ॥ १ ॥
रूप आवडे आम्हांसी । तैसी जोडी हृषीकेशी ॥ २ ॥
आम्हीं भावें बळिवंत । तुज घालूं हृदयांत ॥ ३ ॥
तुका म्हणे तुज धाक । देतां पावसील हाक ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा – जोडी-प्राप्ती, धाक-भीती.
अर्थ - या ईश्वरास आम्ही भाविक भक्त जितके ओळखतो, तितके कोणीही, वेदश्रुतीसुद्धा याला जाणीत
नाहीत. १ याचे रूप आम्हास फार आवडते. त्याप्रमाणे आम्ही याची प्राप्ती करून घेतली आहे २ आम्ही भक्ति-
भावामुळे बलवान झालो असून त्यायोगे देवा, तुला आमच्या हृदयात घालून ठेवू. ३ तुकाराम महाराज म्हणतात,
देवा, आमची तुला मोठीच भीती असल्याने हाक देताच तू आम्हास पावतोस. ४
७५५ मन गुंतलें लुलयां । जाय धांवोनि त्या ठाया ॥ १ ॥
मागें परतावी१ तो बळी । शूर एक भूमंडळीं ॥ २ ॥
येउनिषां घाली घाला । नेणों काय होई२ तुला ॥ ३ ॥
तुका म्हणे येणें । बहु नाडिले शाहाणे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा – लुलया-विषयात, नाडिले-फसविले.
अर्थ - मन या विषयाच्या ठिकाणी गुंतून राहिले आहे ते पुन पुन त्याच ठिकाणी जात आहे १ त्या
मनास तेथून मागें फिरवील तोच या पृथ्वीवर मोठा शूर समजावा लागेल. २ हे मन जेव्हा घाला घालील तेव्हा
काय होईल ते समजणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, या अवखळ मनाने पुष्कळ शहाण्याना फसविले
आहे. ४
७५६ घेईं३ माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥ १ ॥
तुम्हीं घ्या रे डोळे सुख । पाहा विठोबाचें मुख ॥ २ ॥
तुम्हीं ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥ ३ ॥
मना तेथें धांव घेईं । राहें विठोबाचे पायीं ॥ ४ ॥
तुका म्हणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - तेथे-विठ्ठलचरणी.
अर्थ:- माझ्या वाचे, तू या विठोबाचे गोड नाम सतत घेत जा १ डोळ्यानो, तुम्ही पोट भरून असे याच
विठोबाचे मुख पाहून सुखी व्हा. २ कानानो, या माझ्या विठोबाचेच गुण तुम्ही सदैव ऐका ३ माझ्या मना, त
या विठ्ठलाच्या चरणीच धाव घेऊन तेथेच स्थिर राहा. ४ तुकाराम महाराज म्हणतात, जीवा, आता या विठ्ठलास
तू कधी सोडू नकोस ५
७५७ धणी न पुरे गुण गातां । रूप दृष्टीं न्याहाळितां ॥ १ ॥
बरवा बरवा पांडुरंग । कांति सांवळी सुरंग ॥ २ ॥
सर्वमंगळाचें सार । मूळ सिद्धींचें भांडार ॥ ३ ॥
तुका म्हणे सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपाः- धणी-तृप्ती, बरवा-चांगला, सुरंग-सुंदर, अतपार-सीमा, लेखा-समजा.
१ परतवी, २ होईल, ३ घेई घेई
सार्थ तुकारामगाथा ३६९
अर्थ:- या श्रीहरीचे गुण कितीही गायिले तरी मनाची कधी तृप्ती होत नाही याचे रूप न्याहाळून पाहताना
दृष्टीचे सुखही अपार होते. १ हा पांडुरंग फारच चांगला आहे. याची कांती सावळी व सुंदर अशी आहे २ याचे
रूप म्हणजे सर्व मंगल पदार्थांचे सार असून सर्व सिद्धींचे ते एक उत्तम भांडार आहे. ३ तुकाराम महाराज
म्हणतात, या श्रीहरीच्या सुखाला काही सीमा नाही असेच समजा. ४
७५८ जरी मी नव्हतों पतित । तरि तूं पावन कैंचा येथ ॥ १ ॥
म्हणोनि माझें नाम आधीं । मग तूं पावन कृपानिधी ॥ २ ॥
लोहो महिमान परिसा । नाहीं तरीं दगड¹ जैसा ॥ ३ ॥
तुका म्हणे याचकभावें । कल्पतरू मान² पावे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - कैंचा-कसा, कृपानिधी-कृपेचा साठा, लोहो-लोखंडाने.
अर्थ:- देवा, मी जर येथे पतित नसतो, तर तुझी पतितपावन म्हणून येथे कीर्ती कशी झाली असती? तू
पतितपावन कसा बनला असतास? १ म्हणून माझे पतित हे नाव तुझ्या आधी असून मग तू पतितपावन असा
कृपेचा साठा आहेस. २ लोखंडामुळे खरे म्हणजे परिसाला महत्त्व आले आहे. नाहीतर तो दगडाप्रमाणेच
झाला असता. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी याचकभाव धरून उभा आहे म्हणून त्या कल्पतरूला महत्त्व व
मान मिळत आहे नाही तर तो इतर वृक्षाप्रमाणेच झाला असता, तसे देवा, माझ्यामुळे तुम्हास महत्त्व आहे. ४
७५९ एक भाव चित्तीं । तरीं न लगे कांहीं युक्ती ॥ १ ॥
कळों आलें जीवें । मज माझियाचि भावें ॥ २ ॥
आठवचि पुरे । सुख अवघें मोहोरे ॥ ३ ॥
तुका म्हणे मन । पूजा इच्छी नारायण ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - मोहोरे-प्राप्त होते.
अर्थ :- या प्रभूविषयी एकनिष्ठेचा भाव चित्तात असावा. मग इतर युक्त्यांची काही जरूरी लागत नाही. १
हे सर्व मला माझ्या शुद्ध भावामुळे समजून आले आहे २ नुसती त्याची आठवण झाली तरी ती पुरी आहे.
तिच्यामुळे सर्व सुखांची प्राप्ती होत असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा नारायण मनोमय पूजेची इच्छा
करीत असतो. ४
७६० मज संतांचा आधार । तूं एकलें निर्विकार ॥ १ ॥
पाहा विचारुनि देवा । नको आम्हांसवें दावा ॥ २ ॥
तुज बोल न बोलवे । आम्हां भांडायाची सवे ॥ ३ ॥
तुका म्हणे तरी । ऐक्यभाव उरे उरी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - सवे-सवय.
अर्थ :- देवा, मला या संतांचा तरी केवढा आधार आहे. पण तू मात्र एकटाच असून निर्विकार आहेस १
देवा, तुम्हीच नीट विचार करून पाहा, उगीच आमच्या बरोबर दावा धारण करू नका. २ तुम्हाला एक शब्दही
बोलायला नको व आम्हास मात्र भांडण करण्याची सवय आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, यासाठी
ऐक्यभाव उरेल असे कर. ४
७६१ तुज मागणे तें देवा । आम्हां तुझी चरणसेवा ॥ १ ॥
आन नेघों देसी तरी । रिद्धि सिद्धि मुक्ति चारी ॥ २ ॥
१ दगडा ऐसा, २ नाम.
तु गाथा .४७
३७० सार्थ तुकारामगाथा
संतसंगति सर्वकाळ । थोर प्रेमाचा सुकाळ ॥ ३ ॥
तुका म्हणे नाम । तेणें पुरे माझें काम ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - आन-दुसरे, नेघो-घेणार नाही.
अर्थ - देवा, तुझी चरणसेवा मला दे. एवढेच तुझ्यापाशी माझे मागणे आहे १ दुसरे तू काहीही दिलेस
तरी ते मी घेणार नाही. रिद्धी, सिद्धी किंवा चारही प्रकारच्या मुक्ती मला नको आहेत. २ नेहमी मला संतांचीच
संगत देत जा. त्यांच्याच संगतीत प्रेमाचा मोठा सुकाळ असतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझे एक
नामच मला पुरे आहे. त्यायोगे माझे सर्व काम होईल. ४
७६२ तुझा शरणागत । जन्मोजन्मींचा अंकित ॥ १ ॥
आणीक नेणें कांहीं हेवा । तुजवांचूनि केशवा ॥ २ ॥
हेचि माझें गाणें । तुझें नामसंकीर्तन ॥ ३ ॥
तुझ्या नामाचीं भूषणें । तुका म्हणे ल्यालों लेणें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - हेवा-हाव, ल्यालों-धारण केली.
अर्थ - देवा, मी तुला शरण आलेलो असून मी तुझा जन्मोजन्मींचा सेवक झालो आहे. १ आणखी देवा,
तुझ्या प्राप्तीवाचून मला दुसरी कसलीही हाव नाही. २ तुझे मोठ्या आवडीने नामसंकीर्तन करणे हेच माझे गाणे
आहे ३ तुझ्या नामाची भूषणे देवा, मी मोठ्या प्रीतीने माझ्या अंगावर धारण केली आहेत ४
७६३ उतरलों पार । सत्य झाला हा निर्धार ॥ १ ॥
तुझें नाम धरिले कंठीं । केली संसाराची तुटी ॥ २ ॥
आतां नव्हे बाधा । कोणेविशीं कांहीं कदा ॥ ३ ॥
तुका म्हणे कांहीं । आतां उरलें ऐसें नाहीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - पार-पैलतीर.
अर्थ- देवा, मी या भवसागरातून सुखरूपपणे पैलतीर गाठले आहे. हाच माझा थोर निश्चय आहे. १ तुझे
नाम माझ्या मुखात असल्याने आता संसाराचा लोभ संपल्यासारखाच आहे. २ आता यापुढे कधी कसलीही बाधा
मला होणार नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता काही मिळवावयाचे उरले आहे असे नाही. ४
७६४ क्रियामतिहीन । एक मी गा तुझें दीन ॥ १ ॥
देवा करावा सांभाळ । वारीं माझी तळमळ ॥ २ ॥
नको माझें ठायीं । गुणदोष घालूं कांहीं ॥ ३ ॥
अपराधाच्या कोटी । तुका म्हणे घालीं¹ पोटां ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- क्रियामतिहीन-सत्कृत्य, सुबुद्धी यांच्या खेरीज, वारीं-दूर कर.
अर्थ - देवा, नानाप्रकारची सत्कृत्ये व सुबुद्धी याच्या विरहित असे माझे जीवन आहे. मी एक दीन असा
तुझा दास मात्र आहे १ देवा, तू माझा प्रेमाने सांभाळ करावास. माझ्या मनातील दुःखाची तळमळ तू दूर
कर २ माझ्या ठिकाणी कसलेही गुणदोष तू आता निर्माण करु नकोस ३ माझे कोट्यवधी अपराध असतील
तरी देवा, तू दयावंत होऊन ते पोटात घालावेस. ४
७६५ नाहीं निर्मळ जीवन । काय करील साबण ॥ १ ॥
तेंसी चित्तशुद्धि नाहीं । तेथें बोध करील काई ॥ २ ॥
वृक्ष न धरीं पुष्पफळ । काय करील वसंतकाळ ॥ ३ ॥
१ घाला.
सार्थ तुकारामगाथा ३७१
वांजे न होती लेकरें । काय करावें भ्रतारें ॥ ४ ॥
नपुंसका पुरुषासी । काय करील बाइल त्यासी ॥ ५ ॥
प्राण गेलिया शरीर । काय करील वेव्हार ॥ ६ ॥
तुका म्हणे जीवनेंविण । पीक नव्हे नव्हे जाण ॥ ७ ॥
शब्दार्थ व टोपा - जीवन-पाणी किंवा जीवित, वांजे-वांझोट्या स्त्रीस
अर्थः- पाणी जर स्वच्छ नसेल, तर साबणाचा काय उपयोग ? माणसाचे जीवन जर स्वच्छ व पापरहित
नसेल तर वरवर साबण लावून काय उपयोग ? १ त्याप्रमाणे जर चित्ताची शुद्धता नसेल तर तेथे बोध काय करील
मग ? २ फूल किंवा फळ धारण करण्याची कुवतच जर वृक्षामध्ये नसेल तर वसंतऋतूच्या आगमनाचा उपयोग
तरी मुले होत नसली तर तिच्या पतीने तरी काय करावे ? ४ पुरुष नपुंसक
असे ५ एकदा शरीरातून प्राण गेल्यावर त्याच्याकडून काय नेहमीसारखे
व्यव म्हणतात, पाणीच जर नसेल तर शेतातील पीक कधीच पिकणार नाही ७
तुम्हासी वाणीचीं ॥ १ ॥
[१]वा पिडदान देतें ॥ २ ॥
[तु]जें बोलाया रोकडें ॥ ३ ॥
कोणा घेतासि वो संगा ॥ ४ ॥
[फ]ळ असलेली.
म्हणून तर दुर्मिळ असे आम्ही तुला झालो ? नाही तर तुझे नाम तरी
तरी कुणी दिले असते रे ? २ तुझ्या मागेपुढे कोण उभे राहिले असते ?
कोण ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्ही नसतो तर तुम्ही
[कुणा]स घेतले असते हो ? ४
मग भोगलें२ कणीस ॥ १ ॥
लहानथोरांवरी जीव ॥ २ ॥
केल्याविण जीवासाठीं ॥ ३ ॥
देतां लाभ दुणी ॥ ४ ॥
दुणी-दुप्पट
[भा]च्या दाण्याचा नाश झाल्यासारखा दिसतो, पण त्यातूनच टपोरे कणीस
पर्यंत सर्वांना ही गोष्ट समजते २ जीवावर उदार होऊन काम करावे
तुकाराम महाराज म्हणतात, रणांगणावर जीव समर्पण झाल्यास
। होतो. ४
घोर झाली नागवण ॥ १ ॥
[का]य पाहातोसि हरी ॥ २ ॥
[दि]वस गेले तोंडीं माती ॥ ३ ॥
पाहे भवनदी ॥ ४ ॥
पडिला विषयाचा घाला । तेणें नागविलें मला ॥ ५ ॥
शरण आलो आतां धांवें । तुका म्हणे मज पावें ॥ ६ ॥
१ वांज, २ भोगिल.
३७२ सार्थ तुकारामगाथा
शब्दार्थ व टीपा - नागवण-फसवणूक, ठाव-विसावा
अर्थ - देवा, आता हे आयुष्य असेच काहीही न साधता वाया जाणार ना ? फार मोठी फसवणूक या
आयुष्यात झाली १ देवा, आता तू रक्षणासाठी धाव ना आता वाट तरी कसली व कुणाची पाहतोस ? २ तुझे
व माझे याच गतीने दिवस मात्र वाया चालले आहेत, व अखेर तोंडात माती पडण्याचा प्रसंग आला आहे ३ हे
ओढाळ मन एका क्षणाचाही विसावा घेऊ देत नाही भवसागरात बुडवायला तत्पर झाले आहे ४ नाना विषयाचा
घाला आता मजवर पडत असून या सर्वानी मला चांगलेच फसविले आहे ५ तुकाराम महाराज म्हणतात, देवा,
आता धाव तू मी तुला मनोभावे शरण आलो आहे ६
७६९ सोसोनि विपत्ती । जोडी दिली तुझे हातीं ॥ १ ॥
त्याचा हाचि उपकार । अतों आम्हाशीं वेव्हार ॥ २ ॥
नामरूपा केला ठाव । तुज कोण म्हणतें देव ॥ ३ ॥
तुका म्हणे हरी । तुज ठाव दिला घरीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - जोडी-प्राप्ती ठाव-स्थान
अर्थ - देवा, आजपर्यंत आम्ही अनेक हालअपेष्टा भोगल्या व तुला तुझ्या स्थानाची प्राप्ती करून दिली १
त्याचा तू असाच उपकार फेडणार वाटते ? अंतकाळी आम्हास सोडून जाण्याचा व्यवहार तुला शोभतो काय ? २
तुला नामरूपाचे स्थान आम्हीच प्राप्त करून दिले ना ? नाही तर तुला देव तरी कुणी म्हटले असते रे ? ३
तुकाराम महाराज म्हणतात देवा, तुला तुझ्या घरात नीट स्थान प्राप्त करून दिले ते आम्हीच ना ? ४
७७० आपुले मागता । काय नाहीं आम्हा सत्ता ॥ १ ॥
परि या लौकिकाकारणे । उरी ठेविले बोलणें ॥ २ ॥
येचि आता घडी । करु बैसो तेची फडी ॥ ३ ॥
तुका म्हणे करितो तुला । ठाव नाहींसे विठ्ठला ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - उरीं-शिल्लक, फडी-निकाल
अर्थ - देवा, आमचीच वस्तू मागायला आम्हास अधिकार नाही असे झाले की काय ? १ देवा, आम्ही
हे बोलणे चांगले मोठयानेही केले असते पण तुझा नावलोकिक मोठा, म्हणून आम्ही मोठयाने बोलणे शिल्लक
ठेविले आहे २ पण आता याच वेळेस ये पाहू थोडा वेळ बसू व आपल्या व्यवहाराचा निकाल लावून टाकू ३
तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमचा या जगात ठावठिकाणा लागणार नाही असे करू का ? ४
७७१ असो आता किती । तुज यावे काकुलती ॥ १ ॥
माझें प्रारब्ध हे गाढें । तू बापुडें तयापुढें ॥ २ ॥
सोडवीन आता । बीदें तुझीं पंढरीनाथा ॥ ३ ॥
तुका म्हणे बळी । तो गाढपाचे कान पिळी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - गाढपाचे-निर्बळाचे, गरिबाचे
अर्थ - असो देवा, आता मी काकुळतीस तरी किती यावे रे ? १ माझे हे प्रारब्धकर्म फार मोठे असून
तू त्याच्या पुढे अगदीच क्षुल्लक दिसत आहेस २ पंढरीनाथा, पतितपावन वगैरे जी बीदे तुझी आहेत, ती मी आता
दूर करून टाकतो कारण त्याचा उपयोग दिसत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, बलवान माणसाने, निर्बळाचा,
गरिबाचा कान धरावा असा नियमच आहे की ४
सार्थ तुकारामगाथा ३७३
७७२ काय नव्हे केलें । एका चिंतितां विठ्ठलें ॥ १ ॥
सर्वसाधनांचें सार । भवसिंधु उतरी पार ॥ २ ॥
योगयागतपें । केलीं तयानें अमूपें ॥ ३ ॥
तुका म्हणे जपा । मंत्र तीनअक्षरी सोपा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- अमूपें-अमाप, कित्येक, तीन अक्षरी-तीन अक्षरांचा.
अर्थ :- या एका विठ्ठलाचे चिंतन केल्यानंतर काय हस्तगत होत नाही ? १ या विठ्ठलाच्या नामात सर्व
साधनाचे सार असून याच्याचमुळे भवसागर तरून जाण्यात मदत होते. २ योगयाग, तपश्चर्या इत्यादी अनेक
साधने या नामातच आलेली असतात. ३ तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून विठ्ठल हा तीन अक्षरांचा सोपा मंत्र
जपा ना. ४
७७३ हो कां दुराचारी । वाचे नाम जो उच्चारी ॥ १ ॥
त्याचा दास मी अंकित । कायावाचामनेंसहित ॥ २ ॥
नसो भाव चित्तीं । हरिचे गुण गातां गीतीं ॥ ३ ॥
करी' अनाचार । वाचे हरिनामोच्चार ॥ ४ ॥
हो कां भलतें कुळ । शुचि अथवा चांडाळ ॥ ५ ॥
म्हणवी हरिचा दास । तुका म्हणे धन्य त्यास ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- अंकित-स्वाधीन झालेला, शुचि-शुद्ध, पवित्र.
अर्थ :- वाणीने जो विठ्ठलाचे नाम उच्चारीत आहे तो दुराचारी असला तरी काय झाले ? १ मी त्याचाही
दास, स्वाधीन असलेला होईन. काया, वाचा, मनासहित त्याची मी सेवा करीन. २ त्याच्या चित्तात जरी भाव नसला
तरी तो हरीचे गुणगान करीत असला म्हणजे झाले ३ तो अनाचार करीत असला व त्याच्या मुखात श्रीहरीच्या
नामाचा उच्चार असला तरी दोष पुष्कळच कमी होतो ४ त्याचे कोणतेही भय कुळ असो. ते पवित्र असो की
अपवित्र चांडाळाचे असो. ५ तो जर श्रीहरीचा दास असे स्वतःस म्हणून घेत असेल, तर तो खरोखरच धन्य होय,
असे तुकाराम महाराज म्हणतात. ६
७७४ हाकेसरिसी उडी । घालुनियां स्तंभ फोडी ॥ १ ॥
ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवांचून ॥ २ ॥
करितां आठव । धांवोनियां घाली कव ॥ ३ ॥
तुका म्हणे गीती गातां । नामें द्यावी सायुज्यता ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- स्तंभ-खांब, प्रल्हादाच्या रक्षणार्थ धावून येणाऱ्या नृसिंहाचा संदर्भ आहे. कव-मिठी
अर्थ :- हा विठ्ठल किती कनवाळू आहे ? नुसती आर्त मायाने हाक मारताच तो खांब फोडून बाहेर येऊन
भक्ताच्या रक्षणार्थ उडी घेतो. १ अशी कृपावंत माउली माझ्या विठाईवाचून दुसरी कोण असणार ? २ त्याची
नुसती आठवण करताच हा धावून येतो व आपल्या भक्तांना मिठी घालतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, याचे
गीत गातानाच सायुज्यता नावाची मुक्ती मिळाल्याचे श्रेय प्राप्त होते. ४
७७५ लोह चुंबकाच्या बळें । उभे राहिलें निराळें ॥ १ ॥
तंसा तूं चि आम्हांठायीं । पेळतोसी अंतर्वाहीँ ॥ २ ॥
मक्ष अनीचा तो दोरा । त्यासि वांचवी मोहरा ॥ ३ ॥
तुका म्हणे अघोलपणे । नेली लांकडें चंदनें ॥ ४ ॥
फ.रो.
३७४ सार्थ तुकारामगाथा
शब्दार्थ व टीपा :- लोह-लोखंड, चुंबकाच्या--लोखंडास ओढून घेणाऱ्या धातूच्या, मोहरा-दोऱ्यास अग्नीच्या
मुखातून वाचविणारा दगड, अधील्पणें-पूर्वीच्या गुणांना.
अर्थ :- लोखंडास वेधून घेणाऱ्या, आकर्षित करणाऱ्या गुणामुळे ते लोखंड निराळेच उभे राहिलेले दिसते. १
तसा देवा, तू आमच्या ठिकाणी निरंतर असून अंतर्बाह्य खेळत राहतोस. २ खरे म्हणजे दोरा हे अग्नीचे भक्ष्य होय.
पण तोच मोहरा नावाच्या दगडाबरोबर दोरा अग्नीत टाकला तर मग काही जळून जात नाही. ३ तुकाराम महाराज
म्हणतात, आधी असलेल्या लाकडांच्या गुणांना चंदनाच्या सहवासाने नाहीसे व्हावे लागते ४
७७६ डोई वाढवूनि केश । भूतें आणिली अंगास ॥ १ ॥
तरी ते नव्हती संतजन । तेथें नाहीं आत्मखुण ॥ २ ॥
मेळवूनि नरनारी । शकुन सांगती नानापरी ॥ ३ ॥
तुका म्हणे मंद । नाहीं त्यापासीं गोविंद ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा .- मंद-कपटी, ढोंगी.
अर्थ :- डोक्यावर मोठमोठे केस वाढवून अंगात भूत आल्यासारखा संचार करतात. १ पण अशी माणसे
काही संत सज्जन नव्हेत. कारण त्यांच्याजवळ स्वसुखाची आत्मखूण नसते. २ भोवती अनेक स्त्रीपुरुष जमवून नाना
प्रकारचे शकुन सांगणारेही पुष्कळ असतात. ३ परंतु तुकाराम महाराज म्हणतात, ही सर्व माणसे ढोंगी असतात.
त्यांच्याजवळ परमेश्वर कधीही नसतो ४
७७७ गाढवाचे घोडे । आम्ही करूं दृष्टीपुढें ॥ १ ॥
चघळी वाहाणा । माघारिया बांडा सुना ॥ २ ॥
सोंगसंपादणी । तरि करूं शुद्ध वाणी ॥ ३ ॥
तुका म्हणे खळ । करूं समयीं निर्मळ ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- बांडा-काळया-पाढऱ्या रंगाचा, सुना-कुत्रा, खळ-दुष्ट
अर्थ :- मनास मानेल तसे इंद्रियाधीन होणाऱ्या गाढवास आम्ही सुजाण अशा घोड्याप्रमाणे नीट रूप
देऊ. त्याला सन्मार्ग दाखवू. १ काळया-पांढऱ्या रंगांच्या कुत्र्याप्रमाणे वाहणा चघळणारासही आम्ही नीट करू. २
कुणी खोटांच सोंगसंपादनी करीत असले तरी त्यांनाही आम्ही शुद्ध करू. ३ तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्यक्ष
दुष्ट स्वभावाचा मनुष्य असला तरी त्याला प्रसंगी आम्ही निर्मळ करू ४.
७७८ बाईल मेली मुक्त जाली । देवें माया सोडविली ॥ १ ॥
विठो तुझें माझें राज्य । नाहीं दुसऱ्याचें काज ॥ २ ॥
पोर मेलें बरें जालें । देवें मायाविरहित केलें ॥ ३ ॥
माता मेली मज देखतां । तुका म्हणे हरली चिंता ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा .- बाईल-बायको, काज-काम
अर्थ :- देवा, बायको मरण पावली. बरे झाले. मुक्त होऊन गेली. देवाने मला मायेतून सोडविले. १
आता विठ्ठला, तुझे व माझेच असे राज्य असून यात दुसऱ्याचे काही काम नाही. २ पोरगे मरून गेले, तरी ठीक
झाले. देवाने याही पाशातून मुक्त केले. ३ माझी आई पाहता पाहता मरून गेली; तुकाराम महाराज म्हणतात,
बरे झाले, ही पण चिंता माझी दूर झाली. ४
७७९ योग तप याचि नांवें । गळित व्हावें अभिमानें ॥ १ ॥
करणें तें हेंचि करा । सत्यें खरा व्यापार ॥ २ ॥
सार्थ तुकारामगाथा ३७५
तरि खंडे येरझार । निघे भार देहाचा ॥ ३ ॥
तुका म्हणे मानामान । हें बंधन नसावें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- गळित व्हावे-संपावा, व्यापार-व्यवहार.
अर्थ :- आपला सर्व अभिमान संपावा. याच स्थितीचे नाव योग व तप असे आहे. १ जे काही तुम्हांस,
करावचे असेल ते हेच करा, की सत्याला धरून सर्व व्यवहार असावा. २ तरच तुमची जन्ममृत्यूची येजा संपेल व
देहबुद्धीचा भार कमी होईल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मानापमानाचेही ओझे आपणावर कधी घेऊ नये. ४
७८० करी संध्यास्नान । वारी खाउनियां अन्न ॥ १ ॥
तया नाहीं लाभहानी । आदा वेंचाचिये मानीं १ ॥ २ ॥
मजुराचें धन । विळा दोरचि जतन ॥ ३ ॥
तुका म्हणे नाहीं । अधीरासी देव कांहीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- वारी-व्यर्थ घालवितो, आदा-जमा, वेंचा-खर्च.
अर्थ :- हा स्नानसंध्या वेळच्या वेळी करतो, पण दुसऱ्याचे अन्न खाऊन सारे व्यर्थ घालवितो. १ त्याला
मग कसलाच लाभ किंवा तोटा होत नाही. त्याच्या जमेचा व खर्चाचा हिशेब सारखाच राहतो. २ मजुराचे शेवटी
धन कोणते? तर त्याने आपल्या विळ्याचे किंवा दोराचे जतन केले असते तेच. ३ तुकाराम महाराज म्हणतात,
अधीर होणाऱ्या माणसांस देव कसा भेटणार ? ४
७८१ वाखर घेउनि आलें । त्यासी तरवारेनें हालें ॥ १ ॥
नव्हे आपुलें उचित । करुनि टाकावें फजित ॥ २ ॥
अंगुलिया मोडी । त्यासी काय सिलें घोडीं ॥ ३ ॥
नपुंसकासाठीं । तुका म्हणे न लगे जेठी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- वाखर-वस्तरा, अंगुलिया-बोटाच्या दावाने, सिलें-हत्यार, शस्त्र, जेठी-पहिलवान.
अर्थ :- कोणी एक मनुष्य हातातील वस्तारा घेऊनच धावून आला, तर त्यास तरवार घेऊन मारण्यास
जाण्याची काय जरूरी आहे ? १ 'हे काही ठीक नव्हे' असे म्हणूनही त्याला फजित करता येते. २ नुसत्या
बोटांच्या दाबानेच ज्याचा मोड होईल त्याच्यासाठी हत्यारांची किंवा घोडेस्वारांची काय जरूरी आहे ? ३
नपुंसकाच्या, नामर्दाच्या पराभवासाठी पहिलवानाची काय जरूरी आहे ? ४
७८२ वर्णाश्रम करिसी चोख । तरि तूं पावसी उत्तम लोक ॥ १ ॥
तुजला तें नाहीं ठावें । जेणें अंगेंचि ब्रह्म व्हावें ॥ २ ॥
जरि तूं जालासी पंडित । करिसी शब्दांचें पांडित्य ॥ ३ ॥
गासी तान मान बंध । हाव भाव गीत छंद ॥ ४ ॥
जाणसील तूं स्वतंत्र । आगमोक्त पूजामंत्र ॥ ५ ॥
साधनाच्या ओढी । डोलियांच्या मोडामोडी ॥ ६ ॥
तुका म्हणे देहीं । संत जाहाले विदेही ॥ ७ ॥
शब्दार्थ व टीपा :- वर्णाश्रम-ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे चार वर्ण, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व
सन्यासी हे चार आश्रम.
अर्थ :-धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे तू वर्णाधर्मांचे धर्म पाळशील तर तू उत्तम लोकांस पावशील एवढेच. १
पण स्वतःच्या देहानेच ब्रह्मपदाचा अनुभव कसा घ्याया हे मात्र तुला समजणार नाही. २ तू जरी मोठा पंडित
१ मनीं
३७६ सार्थ तुकारामगाथा
झालास तरी फार तर तुला शब्दाचे पांडित्य दाखविता येईल ३ चांगल्या ताना घेऊन गायन शिकलास तर
हाथभावयुक्त असे नाना गीताचे य छंदाचे प्रकार तू गाशील एवढेच ४ तू शास्त्रप्रणीत असे स्वतंत्र पूजायंत्र
जाणशील ५ किंवा साधनाच्या नाना प्रकारांनी डोळ्यांची उघडझाप करशील; पण याच्या योगे काय साधणार
आहे ? ६ तुकाराम महाराज म्हणतात, तू संतांच्याकडे पाहाना, ते या देहीच विदेही म्हणजे मुक्त झालेले असतात ७
७८३ प्रेमसूत्र दोरी। नेतो तिकडे जातो हरी ॥ १ ॥
मनेसहित वाचा काया। अवघें दिले पढरीराया ॥ २ ॥
सत्ता सकळ तया हाती। माझी काँच काकुलती ॥ ३ ॥
तुका म्हणे ठेवी तैसे। आम्ही राहो त्याचे इच्छे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- वाचा-वाणी, काया-शरीर
अर्थ - प्रभूविषयी गाढ प्रेम हाच एक बळकट अशा प्रेमसूत्राचा धागा आहे या धाग्यामुळे भक्ताच्यासाठी
श्रीहरी तो जिकडे नेईल तिकडे जातो १ आम्ही आपल्या मनासहित आमची वाणी व आमचे शरीर भगवंताला,
पढरीरायाला अर्पण केल्या आहेत या बाबीं २ त्याच्या हातात आता सर्व सत्ता असून मी त्यापुढे काकुळतीस येत
असतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, तो जसे ठेवील तसेच आम्ही त्याच्या इच्छेने राहू ४
७८४ पाववील ठाया। पांडुरंग चिंतलिया ॥ १ ॥
त्यासी चिंतलिया मनी। चित्ता करी गवसणी ॥ २ ॥
पावावया फळ। अंगीं असावे हे बळ ॥ ३ ॥
तुका म्हणे तईं। सिद्धि वोळगती पायीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - ठाया-ठिकाणास, गवसणी-झांकण, वोळगती-प्राप्त होतात
अर्थ :- ज्या स्थानाची आपण इच्छा करीत आहोत, त्या ठिकाणास या पांडुरंगाच्या चिंतनामुळे पोचता
येते १ या श्रीहरीस मनात चिंतल्याबरोबर तो आपल्या चित्ताचे झांकण करुन आपल्या भक्ताचे रक्षण करतो २
असे हे इच्छिलेले फळ मिळविण्यासाठी आपल्या अंगात भक्तीचे मोठेच बळ असावे लागते ३ तुकाराम महाराज
म्हणतात, तेव्हाच सर्व सिद्धी पायाशी प्राप्त होतात ४
७८५ धन्य भावशीळ। ज्याचे हृदय निर्मळ ॥ १ ॥
पूजी' प्रतिमेचे देव। संत म्हणती तेथें भाव ॥ २ ॥
विधिनिषेध नेणतो। एक निष्ठा धरूनी चित्तीं ॥ ३ ॥
तुका म्हणे तैसे देवा। होणे लागे त्याच्या भावा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - भावशीळ-शुद्ध भावाचे
अर्थ :- जे शुद्ध भावाचे आहेत व ज्याचे हृदय निर्मळ आहे ते धन्य होत १ जे लोक प्रतिमेच्या देवाची
पूजा प्रेमाने करतात त्या ठिकाणी भावभक्ती आहे असे सतपुरुष म्हणतात २ हे लोक कोणत्याही प्रकारचा विधि-
निषेध मनात न आणता ईश्वरावर एक निष्ठा ठेवून, चित्तात भाव ठेवून वागत असतात ३ तुकाराम महाराज
म्हणतात, मग देवासही आपल्या भक्ताच्या भावाप्रमाणे व्हावे लागले ४
७८६ आधींच आळशी। वरी गुरूचा उपदेशो ॥ १ ॥
मग त्या कैंची आडकाठी। विधिनिषेधाची भेटी ॥ २ ॥
नाचरवे धर्म। न करवे विधिकर्म ॥ ३ ॥
तुका म्हणे ते गाढव। घेती मनासवें धाव ॥ ४ ॥
१ मानी
सार्थ तुकारामगाथा ३७७
शब्दार्थ व टीपा :- नाचरवे-आचरीत जाऊ नयेत.
अर्थ :- आधीच आळशी असणाऱ्या शिष्याला गुरुही तसाच आळसाला प्रोत्साहन देणारा भेटावा. १ मग
त्यास विधिनिषेधाची कसलीच आडकाठी राहात नाही २ शास्त्राने सांगितलेले धर्म आचरीत जाऊ नये असेच
त्यास वाटते. काही विधी अथवा पवित्र कर्मे करावीत असेही त्यास वाटत नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात,
अशी माणसे मनाच्या वेगानुसार धाव घेणाऱ्या गाढवाप्रमाणेच असतात. ४
७८७ नाचे टाळी पिटी । प्रेमें अंग धरणीं लोटी ॥ १ ॥
माझे सखे ते सज्जन । भोळे भाविक हरिजन ॥ २ ॥
न धरिती लाज । नाहीं जनासयें काज ॥ ३ ॥
तुका म्हणे दाटे । कंठ नेत्रीं जळ लोटे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- काज-काम.
अर्थ :- जे भक्त भक्तिप्रेमात येऊन नाचतात, टाळी पिटतात, प्रेमाने अंग धरणीवर लोटून देतात १ हे
भोळे, भाविक भक्त सज्जन माझे सखे वाटतात मला. २ त्यांना कसलीही लाज घराचीशी वाटत नाही. लोक काय
म्हणतील याशीही त्यांना काम नसते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा भक्तांचा कंठ दाटून येतो. त्यांच्या
डोळ्यांतून पाणी ओघळत असते. ४
७८८ टिळा टोपी माळा देवाचें गबाळें । वागवी वोंगळें पोटासाठीं ॥ १ ॥
तुळसी खोवी कानीं दर्भ खोवी शेंडी । लटिकी धरी बोंडी नासिकाची ॥ २ ॥
कीर्तनाचे वेळे रडे पडे लोळे । प्रेमेंविण डोळे १ गळताती ॥ ३ ॥
तुका म्हणे ऐसे मावेचे भांड । त्यांपाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- गबाळे-खोटे ओझे, वोंगळे-वाईट, बोंडी-टोंक, मावेचे-मायेचे, खोटे, भांड-ढोंगी.
अर्थ :- काही माणसे नुसतीच कानटोपी घालतात, कपाळावर चंदनाचे टिळे लावतात व देवाचे खोटे ओझे
आपण धारण केल्याचे सांगतात. १ कानामध्ये तुळसीपत्र खोवतात, शेंडीला दर्भ बांधतात व नाकाचा शेंडा खोट्याने
हातात धरून जप केल्याचे भासविततात. २ आणि कीर्तन करीत असताना हे रडतात, धरणीवर पडतात, लोळतात,
ईश्वरप्रेमाशिवायही यांच्या डोळ्यांतून खळाळा पाणी येत असते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे खोट्या
आचरणाचे व ढोंगीच समजावेत, त्याच्यापाशी ईश्वर निश्चित नसतो असे समजून असावे ४
७८९ धन्य देहूँ गांव पुण्य भूमि ठाव । तेथें नांदे देव पांडुरंग ॥ १ ॥
धन्य क्षेत्रवासी लोक ते दैवाचे । उच्चारिती वाचे नामघोष ॥ २ ॥
कर कटीं उभा विश्वाचा जनिता । वामांगीं तें २ माता रखुमादेवी ॥ ३ ॥
गरुड पारों उभा जोडुनियां कर । अश्वत्थ समोर उत्तरामुख ॥ ४ ॥
दक्षिणे शंकर लिंग हरेश्वर । शोभे गंगातीर इंद्रायणी ॥ ५ ॥
लक्ष्मीनारायण बल्लाळाचें वन । तेथें अधिष्ठान सिद्धेश्वर ॥ ६ ॥
विघ्नराज द्वारीं बहिरव बाहेरी । हनुमंत शेजारीं सहित दोघे ॥ ७ ॥
तेथें दास तुका करितो कीर्तन । हृदयीं चरण विठोबाचे ॥ ८ ॥
शब्दार्थ व टीपा :- ठाव-स्थान, विश्वाचा जनिता-विश्वास जन्म देणारा, वामांगीं-डाव्या अंगास,
अश्वत्थ-पिंपळ.
१ गळे दाटतानी, २ हे
तु. गाथा....४८
३७८ सार्थ तुकारामगाथा
अर्थ :- हे माझें देहू गाव धन्य असून मोठ्या पुण्याचे स्थान आहे. कारण या ठिकाणीं प्रत्यक्ष देवाची,
पांडुरंगाची वसती कायमची आहे १ या क्षेत्रांतील लोकही धन्य व दैववान होत कारण त्याच्या मुखातून सारखा
विठ्ठलाचा नामघोष होत असतो. २ या विश्वात जन्म देणाऱ्या विठ्ठलाचे हात त्याच्या कमरेवर असून तो उभा आहे
त्याच्या डाव्या अंगास माता रखुमादेवी उभी आहे. ३ जवळच पारावर गरुड उभा असून त्याने हात जोडले आहेत.
समोर उत्तरेस पिंपळाचा वृक्ष उभा आहे. ४ दक्षिण दिशेस हरेश्वर नावाचे शंकराचे लिंग असून या गावास असणारे
इंद्रायणी नावाच्या नदीचे तीर शोभून दिसते ५ जवळच लक्ष्मीनारायणाचे व बल्लाळाचे वन असून तेथे सिद्धेश्व-
राचे स्थान प्रसिद्ध आहे. ६ दारात विघ्न दूर करणाऱ्या गणपतीचे स्थान असून बाहेर ग्रामदेव बहिरोबा आहे
हनुमंतही रक्षणार्थ शेजारीच आहे. ७ तुकाराम महाराज म्हणतात, याच गावात हा दास कीर्तन करीत असून
हृदयाशी विठोबाचे चरण धरीत आहेत. ८
विवरण :- या अतिशय प्रसिद्ध अशा अभंगात तुकारामबुवांनी आपल्या देहू या गावचे तपशीलवार असे
वर्णन केले आहे तुकोबांच्या संगती पवित्र व प्रसिद्ध झालेल हे गाव पुण्यापासून जवळच बसलेले एक लहान खेडे
आहे पुणे मुबंई रस्त्यावरच पंधराव्या मैलावर उत्तरेस जाणारा देहूचा रस्ता लागतो या रस्त्याने तीन मैलावर
इंद्रायणी नदीच्या काठी हे देहू क्षेत्र बसले आहे हे क्षेत्र आळंदीपासून पाच कोस, तळेगावपासून चार कोस, चिंचवड-
पासून तीन-चार कोस दूर असून याच्या सभोवती लहान लहान डोंगर आहेत
ज्ञानेश्वराच्यामुळे आळंदी पंढरपूर याचे नाव पुन्हा एकदा महाराष्ट्रात झाले एकनाथामुळे पैठणचे नाव
झाले रामदासामुळे सज्जनगड, चाफळ, जाय ही स्थाने उदयास आली आणि तुकोबांच्यामुळे देहूचे भाग्य उदयास
येऊन अवघ्या महाराष्ट्रात त्याची कीर्ती पसरून राहिली या गावात तुकोबाच्या आधीही चारदोन लहानलहान
मंदिरे नेहमीप्रमाणे होतीच बुवांचे आठवे पूर्वज विश्वंभरबुवा यानी या गावी श्रीविठ्ठलरखुमाईचे मंदिर बाधले
तेव्हापासून या घराण्याचा विठ्ठलाशी संबंध जडला गेला त्याच्या घरी पंढरीची वारीही प्रथमपासून होतीच
या अभंगातील सर्व वर्णन ऐतिहासिक वस्तुस्थितीस धरून आहे विठ्ठलाच्या देवळाचा भाग व त्याचा
विस्तार हा नंतरचा असला तरी विठ्ठलरखुमाईच्या मूर्ती मात्र विश्वंभरबुवांनी स्थापन केलेल्या आहेत याच
मंदिराचा तुकोबांनी जीर्णोद्धार केला देहूम श्रीविठ्ठल व रखुमाई शेजारी शेजारी असून त्यांच्या मूर्ती उत्तरेस तोंड करून
आहेत समोर गरुडपार आहे गरुडहनुमंत नेहमीप्रमाणे हात जोडून देवासमोर उभे आहेत पूर्वेकडील दरवाजावर
दक्षिणेस तोंड असलेले विघ्नराज असून बाहेर बहिरोबांचे छोटे मंदिर आहे मंदिराच्या पश्चिमेस हरेश्वर मंदिर
असून थोड्या अंतरावर तुकोबांचेही घर आहे पश्चिमेच्या बाजूस बल्लाळाचे वन असून या सिद्धेश्वराच्या मंदिराच्या
थोडे पूर्वेस लक्ष्मीनारायणाचे मंदिर आहे ही मंदिरे तुकोबांच्या आधीपासूनची आहेत देहूक्षेत्राला लागूनच इंद्रायणी
नदी असून उत्तराभिमुख होऊन वहात आहे
या अभंगात वर्णन केल्याप्रमाणे सर्व स्थानांचे विशेष आजही मिळतात, पण तुकोबांच्या इतर अभंगातून
ज्याचा उल्लेख आला आहे त्याची स्थानेही दृष्टीस पडतात अर्थात या स्थानांना तुकारामबुवाच्या नंतर महत्त्व येत
राहिले मबाजीबुवांचे घर, त्याची वाव, प्रदक्षिणेचा रस्ता, पुंडलिकाचे देऊळ, वह्या उदकावर तरल्या तो डोह,
गोपाळपूर, जुनाट पिंपरीचा वृक्ष, गरजाईच स्थान, मुरलीधराचे देऊळ, पहिल्या स्त्रीचे, रखुमाईचे वृंदावन, थोड्या
दूर अंतरावर भामनाथचा डोंगर ही सर्व स्थाने नंतरच्या काळात विशेष रूपांनी प्रसिद्ध झाली
शाक्तावर-अभंग १३
७९० टंवकारूनि दृष्टी लावुनिया रंग । दावी झगमग डोळ्यापुढें ॥ १ ॥
म्हणती शिष्यासी लागली समाधी । लटकीचि उपाधी झकविती ॥ २ ॥
दीपाचिया ज्योती फोडियेलें तेज । उपदेश साजरात्रीमाजी ॥ ३ ॥
सार्थ तुकारामगाथा ३७९
रांगोळिया चौक शृंगारुनी वोजा । आवरण पूजा यंत्र करी ॥ ४ ॥
पडदा लावूनियां दीप चहूं कोनीं । बैसोनि आसनीं मुद्रा दावी ॥ ५ ॥
नैवेद्यासी म्हणे करावें पक्वान्न । पात्रासी दिव्यान्न परवडी ॥ ६ ॥
जाला उपदेश कवळ घ्या रे मुखीं । आपोशन शेखीं बुडविलें ॥ ७ ॥
पाषांड करोनी मांडिली जीविका । बुडवी भाविकां लोकांप्रती ॥ ८ ॥
कायावाचामनें सोडवी संकल्प । गुरु गुरु जप प्रतिपादी ॥ ९ ॥
शुद्ध परमार्थ बुडविला तेणें । गुरुत्वभूषणें भोग भोगी ॥ १० ॥
विधीचा ही लोप बुडविला वेद । शास्त्रांचा ही बोध हरविला ॥ ११ ॥
योगाची धारणा नाहीं प्राणायाम । सांडी यम नेम नित्याद्रिक ॥ १२ ॥
वैराग्याचा लोप हरिभजनीं विक्षेप । वाढविलें पाप मतिलंटें ॥ १३ ॥
तुका म्हणे गेलें गुरुत्व गुखाडी । पूर्वजांसी धाडी नर्कवासा ॥ १४ ॥
शब्दार्थ व टीपा :- झगमग-चमक, झकविती-फसवितात, सांजरात्रीमाजी-संध्याकाळी, रात्रीच्या वेळेस,
वोजा-सहज, परवडी-नाना प्रकारची, पाषांड-नास्तिक, गुखाडी-नरकात जाणारे.
अर्थ :- शाक्त मार्गामधील हे गुरू कसे असतात ? तर शिष्यावर डोळे वटारून त्याच्यापुढे नाना रंगांची
चमक दिसेल असे करतात. १ आणि डोळ्यांस एक प्रकारची अंधारी आली म्हणजे शिष्याला सांगतात की, तुझी
समाधी लागली आहे. अशा प्रकारे लबाडी करून शिष्याला हे लोक फसवितात २ दिव्याच्या ज्योतीने घरामध्ये
तेज कोंदले आहे असे मानून हे गुरू संध्याकाळी व रात्री शिष्यांना उपदेश देतात. ३ भोवती रांगोळ्या वगैरे
काढून धान्याने चौक भरून सहज असा शृंगार करतात व त्रिकोणी यंत्राची पूजा करतात. ४ समोवती पडदे लावून
आत चहूबाजूंनी दिवे लावतात व आपण स्वतः आसनावर बसून मुद्रा लावतात. ५ शिष्याला नैवेद्यासाठी पक्वान्ने
करावया सांगतात व नाना प्रकारची ही पक्वान्ने पात्रांत वाढून देवापुढे ठेवल्याचा देखावा करतात. ६ मग शिष्यांस
म्हणतात, झाला आता उपदेश. आता तोंडांत एकेक घास घ्या आपोशन घेण्याची यांना काही जरूरी वाटत नाही ७
अशा प्रकारे हे गुरू नास्तिक्य पसरवून पोट भरण्याचा उद्योग जीविकात आरंभतात व लोकांना फसवितात. ८
काया, वाचा, मन गुरूला अर्पण करण्याचा संकल्प सोडवून गुरूच्या नामाचा जप वारंवार करायला सांगतात. ९
खराखुरा परमार्थ यानी बुडविलेला असून गुरुपणाच्या भूषणाने हे केवळ ऐश्वर्य भोगत असतात. १० वेदात
असलेला सर्व शास्त्रविधीचा यांनी लोप केलेला असून सर्व शास्त्रांचाही बोध नाहीसा केलेला असतो. ११ यांना
योगयाग व ध्यानधारणा यांची नीट माहिती नसते; कारण नित्यकर्म व यमनियमादी साधने यांचा यांनी त्यागच
केलेला असतो. १२ यांच्या वैराग्याचा लोपच झालेला असून यांना श्रीहरीच्या भजनाविषयी त्रास वाटतो अशा
या नास्तिकांनी जगात मुद्दामच पाप वाढविलेले असते. १३ तुकाराम महाराज म्हणतात, असा याचा गुरुपणा
नरकात जावो कारण हे त्यांचे कृत्य त्यांच्या पूर्वजांसहही नरकात धाडणारे आहे. १४