सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 412, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 412

३७६ सार्थ तुकारामगाथा
झालास तरी फार तर तुला शब्दाचे पांडित्य दाखविता येईल ३ चांगल्या ताना घेऊन गायन शिकलास तर
हाथभावयुक्त असे नाना गीताचे य छंदाचे प्रकार तू गाशील एवढेच ४ तू शास्त्रप्रणीत असे स्वतंत्र पूजायंत्र
जाणशील ५ किंवा साधनाच्या नाना प्रकारांनी डोळ्यांची उघडझाप करशील; पण याच्या योगे काय साधणार
आहे ? ६ तुकाराम महाराज म्हणतात, तू संतांच्याकडे पाहाना, ते या देहीच विदेही म्हणजे मुक्त झालेले असतात ७
७८३ प्रेमसूत्र दोरी। नेतो तिकडे जातो हरी ॥ १ ॥
मनेसहित वाचा काया। अवघें दिले पढरीराया ॥ २ ॥
सत्ता सकळ तया हाती। माझी काँच काकुलती ॥ ३ ॥
तुका म्हणे ठेवी तैसे। आम्ही राहो त्याचे इच्छे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- वाचा-वाणी, काया-शरीर
अर्थ - प्रभूविषयी गाढ प्रेम हाच एक बळकट अशा प्रेमसूत्राचा धागा आहे या धाग्यामुळे भक्ताच्यासाठी
श्रीहरी तो जिकडे नेईल तिकडे जातो १ आम्ही आपल्या मनासहित आमची वाणी व आमचे शरीर भगवंताला,
पढरीरायाला अर्पण केल्या आहेत या बाबीं २ त्याच्या हातात आता सर्व सत्ता असून मी त्यापुढे काकुळतीस येत
असतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, तो जसे ठेवील तसेच आम्ही त्याच्या इच्छेने राहू ४
७८४ पाववील ठाया। पांडुरंग चिंतलिया ॥ १ ॥
त्यासी चिंतलिया मनी। चित्ता करी गवसणी ॥ २ ॥
पावावया फळ। अंगीं असावे हे बळ ॥ ३ ॥
तुका म्हणे तईं। सिद्धि वोळगती पायीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - ठाया-ठिकाणास, गवसणी-झांकण, वोळगती-प्राप्त होतात
अर्थ :- ज्या स्थानाची आपण इच्छा करीत आहोत, त्या ठिकाणास या पांडुरंगाच्या चिंतनामुळे पोचता
येते १ या श्रीहरीस मनात चिंतल्याबरोबर तो आपल्या चित्ताचे झांकण करुन आपल्या भक्ताचे रक्षण करतो २
असे हे इच्छिलेले फळ मिळविण्यासाठी आपल्या अंगात भक्तीचे मोठेच बळ असावे लागते ३ तुकाराम महाराज
म्हणतात, तेव्हाच सर्व सिद्धी पायाशी प्राप्त होतात ४
७८५ धन्य भावशीळ। ज्याचे हृदय निर्मळ ॥ १ ॥
पूजी' प्रतिमेचे देव। संत म्हणती तेथें भाव ॥ २ ॥
विधिनिषेध नेणतो। एक निष्ठा धरूनी चित्तीं ॥ ३ ॥
तुका म्हणे तैसे देवा। होणे लागे त्याच्या भावा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - भावशीळ-शुद्ध भावाचे
अर्थ :- जे शुद्ध भावाचे आहेत व ज्याचे हृदय निर्मळ आहे ते धन्य होत १ जे लोक प्रतिमेच्या देवाची
पूजा प्रेमाने करतात त्या ठिकाणी भावभक्ती आहे असे सतपुरुष म्हणतात २ हे लोक कोणत्याही प्रकारचा विधि-
निषेध मनात न आणता ईश्वरावर एक निष्ठा ठेवून, चित्तात भाव ठेवून वागत असतात ३ तुकाराम महाराज
म्हणतात, मग देवासही आपल्या भक्ताच्या भावाप्रमाणे व्हावे लागले ४
७८६ आधींच आळशी। वरी गुरूचा उपदेशो ॥ १ ॥
मग त्या कैंची आडकाठी। विधिनिषेधाची भेटी ॥ २ ॥
नाचरवे धर्म। न करवे विधिकर्म ॥ ३ ॥
तुका म्हणे ते गाढव। घेती मनासवें धाव ॥ ४ ॥
१ मानी