सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
४. संत-महिमा व सत्संग फल
सार्थ तुकारामगाथा २२७
सब ज्वानी निकल जाये । पीछे गधडा मटी खावे ।
गांवढाळ सो क्या लेवे । हगवनि भरी नहि धोवे ॥ ५ ॥
मेरी दारु जिन्हें खाया । दिवार दरगां सो हि पाया ।
तल्हे मुंडी घाल जाये । बिगारी सोवे क्या लेवे ॥ ६ ॥
बजारका बुझे भाव । वो हि पुसता आवे ठाव ।
फुकट बाटु कहे तुका । लेवे सोहि लें हिसका ॥ ७ ॥
शब्दार्थ व टीपा :- दारू-औषध, खुमासी-विषाद, रस-औषध, मटो-माती, दिदार-दर्शन
अर्थ -- देवच देणारा अगर दुसऱ्यांकडून देवविणारा आहे. तो देवच औषध आहे. तोच औषध देणारा
आहे. अल्लाशिवाय, देवाशिवाय दुसरे कोण आहे? तो करील तेच होईल. १ जो कोणी मर्द आहे तोच हे औषध
नामरूपाचे घ्यायला तयार होईल. नामर्द हे काम करण्याचे धैर्य कसा दाखवील ? तुम्ही आपल्या मनाला प्रसन्न
करून घ्यावे. तीन दमड्यांची काय बिसाद आहे ? २ सर्व औषधी सोडून द्याव्यात व एक भगवद्भजनाची गोळी
मात्र घ्यावी. तोच सारभूत अशी आहे. विश्वास ठेवून या गोळीचे सेवन थोडे का होईना पण करावे. ३ ज्यांच्या-
पाशी नीती झोपलेली आहे तेच पुरे पुरे म्हणून रडतात, त्यांच्या सप्तधातूत्मक व पंचभूतात्मक शरीरावर भार करून
जिकणारी अशी ही भजनगोळी असल्यामुळे तिचा भवरोगावर उतार पडतो. ती पुन पुन. ते घेतात. ४ हे बादवी,
सर्व तारुण्य संपल्यावर मग मातीच खावी लागेल तुला जे मूर्ख व खेडवळ आहेत ते काय माझी ही भजनगोळी घेऊ
शकतील ? कारण त्यांच्या हगवणीचे कपडे त्यांच्याकडून धुतले जाईनात. ५ पण माझी भजनगोळी ज्याने घेतली
आहे त्याने आत्मरूपाचे दर्शन घेतले; पण खाली मुंडी घालणारा तो बिगार-कामकरी काय तिचे महत्त्व
जाणणार ? ६ तुकाराम महाराज म्हणतात, बाजारभाव विचारूनच तुम्ही माझी ही भजनगोळी घ्यावी. मी त्यांना
फुकट वाटून टाकीन. जे कुणी सज्जन असतील ते ही भजनगोळी घेऊन सुखी होतील ७
विवरण - तुकोबांच्या या किरकोळ लोकरंजनात्मक अभंगाची भाषा फारसी-उर्दू मिश्रित अशी आहे मलंग,
दरवेशी, मुढा, भजनगोळी देणारा वैदू याची भाषा अशी चमत्कारिक आहे. याचा अर्थ हा की त्यावेळी मुसलमानी
राज्याच्या संबंधाने एकंदर हिंदुसमाजातही स्थित्यंतर होत होते देवधर्म, चालीरीती, समजुती यातील संघर्ष हा एक
अभ्यासाचा विषय आहे मुसलमानी फकीर व मलंग यांचा संबंध हिंदुसंस्कृतीशी अनेक प्रसंगी येत राहिला लोक-
जीवनात स्थिर होऊन राहिलेल्या या लोकांची ही तुकोबाकृत शब्दचित्रे होत
गोंधळ - अभंग ३
४४५ राजस सुंदर बाळा । पाहों आलिया सकळा वो ।
बिंबीं बिंबोनि ठेली । माझी परब्रह्म वेल्हाळा वो ।
कोटि रविशशि माझी । परब्रह्म वेल्हाळा वो ॥ १ ॥
राजस विठाबाई । माझें ध्यान तुझे पायीं वो ।
त्यजुनियां चोधींसी । लावी आपुलिये सोई वो ॥ २ ॥
सुकुमार साजिरी । कैसीं पाऊलें गोजिरीं वो ।
कंठीं तुळसीमाळा । उभी भीवरेच्या तिरीं वो ।
दंत हिरया ज्योति । शंखचक्र मिरवे करीं वो ॥ ३ ॥
निर्गुण निराकार । वेदां न कळेचि आकार वो ।
शेषादिक श्रमले । श्रुती न कळे तुझा पार वो ।
उमारोनि बाहे । भक्तां देत अभयकर वो ॥ ४ ॥
ब्रह्मादिकासही समजत नाही २ ही सावळी विठाई अतिशय सुकुमार आहे. हिचे चार हात फारच शोभून दिसतात.
हिच्या छातीचा भाग सखोल असून त्यावर तेजस्वी असे पदक चमकत आहे. हिच्या कमरेस लहान लहान घुंगरे असून
ती अतिशय मधुर आवाज करतात हिच्या पायातील घागऱ्या मधुर ध्वनी करून गाणे गात असतात हिच्या पुढे नित्य
संगीत, नृत्य सुरू असते. ३ हिचा अष्टाय असा सुशोभित बाघा किती वर्णन करावा ! शुद्ध केलेल्या तेजस्वी रसांचीच
ही सुगंधी व सौंदर्यवान अशी मूर्तीच जणू ओतली आहे ही सर्व कलात निपुण असून हिचे मुख हसरे आहे हिचे भाषण
मधुर शब्दांनी भरलेले असते. ही नारायणी, आदिशक्ती देवी विठाबाई बहुरूपानी नटलेली आहे ४ पंढरपूरसारख्या
महानगरामध्ये हिची घटस्थापना केलेली आहे. आकाशाचा मंडप त्रैलोक्यावर घातलेला असून चंद्रभागेच्या तीरावर
हिने गोंधळ सुरू केला आहे ही कृष्णाबाई, योगेश्वरी आपल्या भक्तजनांच्या कार्यासाठी अवतीर्ण झाली आहे ५
तेहतीस कोटी देव, चामुंडादी देवी, अष्ट भैरव या सर्वांचा समुदाय हिच्या आरतीसाठी आलेला आहे आरती
ओवाळून झाल्यावर हे तिच्यावर फुलांचा वर्षाव करितात नारदतुंबर व गंधर्व गाणे गाऊन हिची स्तुती करतात.
या गायनाने सर्वांना ब्रह्मानंद होत असतो अशा या देवी विठाईचे चरणरज, पायांचे धूलिकण तुळयाबंधू मस्तकी
धारण करीत आहे. ६
विवरण- वरील तीन अभंगात तुकोबांनी गोंधळाच्या रूपाने विठाईमाऊलीचे अति रेखीव, लोभस व
सौंदर्यपूर्ण असे वर्णन मोठ्या तन्मयतेने केले आहे गोंधळाचा सर्व थाट त्यांनी येथे उभा केलेला आहे 'गोंधळा'ची
प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे इष्टकार्य सफल व्हावे म्हणून सर्व देवदेवतांना आवाहन केले जाते व त्यांची
स्तुती किंवा प्रार्थना गोंधळाच्या वेळी म्हटली जाते. लग्नासारखे मंगल कार्य झाल्यावरही गोंधळ घालण्याची प्रथा
अजूनही महाराष्ट्रात आहे गोंधळ हा मुख्यतः देवीचा असतो गोंधळी लोकांकडून देवीप्रीत्यर्थ गाणे, नृत्य भजन, स्तुती,
प्रार्थना, पोवाडे इत्यादी प्रकार गोंधळात म्हटले जातात गोंधळाची प्रथा प्राचीन काळीही असावी स्कंदपुराणात गोंडली
नृत्याचा उल्लेख असून दीपिका, माळ, टाळ, शंख, मृदंग, दिवट्या, कवड्यांची माळ इत्यादी वस्तूंचाही उल्लेख तिथे
आहे या गोंधळाच्या वेळी माहूरची रेणुका, कोल्हापूरची अंबाबाई, औंधची यमाई पालीचा खंडोबा, जेजुरीचा खंडोबा,
शिंगणापूरचा महादेव, पंढरपूरचा विठोबा इत्यादी प्रमुख देवापासून जोकाई, उगाई, तुकाई यासारख्या लहान दैव-
तांनाही पाचारण करण्यात येते 'माहूरपूरची रेणुबाई गोंधळा येई, कोल्हापूरची आंबाबाई गोंधळा येई, जेजुरीचा
खंडोबा गोंधळा येई' अशी गोंधळाची सुरुवात सर्वांना परिचयाची आहे गोंधळ ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्यास आपले
दैवत आल्याचे समाधान वाटत असल्यामुळे एकत्वाचे एक नमुनेदार साधन म्हणूनही गोंधळाकडे सामाजिक दृष्टीने
पाहण्यासारखे आहे मराठी संतांनी 'गोंधळा'चा उपयोग रूपकाच्या आधाराने फार चांगल्या रीतीने करून घेतला
आहे
ज्ञानेश्वरांनीही गोंधळावर सुरेख रचना केलेली आहे 'तुझा देव्हारा मांडिला हो करी कृपा । चौक आसनों
कळस ठेविला हो करी कृपा । प्रेम चादवा वर दिधला हो करी कृपा । ज्ञानगादी दिली बैसावया हो करी कृपा । वरी
बैसविली आदी माता हो करी कृपा । शुकसनकादिक गोंधळी हो करी कृपा । नाचताती प्रेमकल्लोळीं हो करी कृपा ।
पुढें पुंडलिक दिवटा हो करी कृपा' अशा थाटाने ज्ञानेश्वरांनी या विठाई माउलीचा गोंधळ वर्णन केलेला आहे
एकनाथांनी 'स्वर्ग मृत्यु पाताळ त्याचा मंडप घातला हो । चार वेदाचा फुलवरा बांधिला हो जीवशिव सबळ
घेऊनि आनंदे नाचती हो । अठ्याऐशी सहस्र ऋषि दिवटे तिष्ठती हो । अशा शब्दात गोंधळाचे रूप उभे करून
विठोबामाऊलीचे स्तवन केले आहे
४४८ शंख करिशी ज्याच्या नावे । त्यांचें तुज नाहीं ठावे ।
एक सांगतो एका भावें । सांपडे घरों ते जीवउनि राखें । रे विठ्ठल ॥ १ ॥
टिळे माळा करंडी सोग । धरूनि चाळविले जग ।
पसरी हात नाहीं त्याग । दावी दगड पुजी भग । रे विठ्ठल ॥ २ ॥
सार्थ तुकारामगाथा २३१
राख लावूनि अंग मळी। थाथे ठोके मी एक बळी।
वासने हातीं बांधवी नळी। त्यासि येउनि गिळी। रे विठ्ठल ॥ ३ ॥
कोण तें राहडीचें सुख । वरते पाय हारतें मुख ।
करवी पीडा भोगवी दुःख। पडे नरकीं परी न पळेचि मूर्ख। रे विठ्ठल ॥ ४ ॥
सिफला फार मारी हाका। रांडा पोरें मेळवी लोकां।
विटंबी शरीर मागे रुका। केलें तें गेलें अवघेंचि फुका। रे विठ्ठल ॥ ५ ॥
कळावें जनां मी एक बळी। उभा राहोनि मांडी फळी।
फोडोनि गुडघे कोपर चोळी। आपला घात करोनि आपणचि तळमळे। रे विठ्ठल ॥ ६ ॥
फुकट खेळें ठकलीं वांयां। धरुनि सोंग बोडण्या डोया।
शिवों नये ती अंतरीं माया। संपादणीयिण विटंबिली काया। रे विठ्ठल ॥ ७ ॥
धुळी माती कांहीं खेलोच नका। जवांदी चंदन घ्यावा बुका।
आपणा परिमळ आणिकां लोकां। मोलाची महिमा फजिती फुका। रे विठ्ठल ॥ ८ ॥
बहुत दुःखी जालिया खेळें। अंगीं बुद्धि नाहींत बळें।
पाठीवरी तोब्रा तोंड काळें। रसना द्रवे उपस्थायच्या मुळें। रे विठ्ठल ॥ ९ ॥
काय सांगतो तें ऐका तुका। मोडा खेळ कांहीं अवगोच नका।
चला जेवूं आधीं पोटों लागल्या भुका। घाल्यावरी बरा टाकमटिका। रे विठ्ठल ॥ १० ॥
शब्दार्थ व टीपा- करंडी-परडी, उथळी-ओकतो, राहडीचे-चिखलात, फारु-शिव्या, रुका-पैसा, जवांदी-
सुवासिक पदार्थ, उपस्थ-इंद्रिय, घाल्यावरी-संतुष्ट झाल्यावर, टाकमटिका-थाटमाट
अर्थ :- देव देव म्हणून ज्याच्या नावाने तू शाल करुन ओरडत आहेस, त्यासबधी तुला काहीही ज्ञान नाही.
तर तू नीट ऐक. मी एका भावाने सर्व काही तुला सांगतो तुझ्या देहरूपी घरामध्येच जे विठ्ठलरूप वसती करुन
आहे त्याचीच तू उपासना कर १ उगाच कपाळावर गंधाचे टिळे, गळ्यात माळा, हातात फुलांची परडी, असे ढोंग
करून जगाला कशाला फसवितोस ? तू नेहमीच हात पसरून आहेस, खरा त्याग तू कधीच करीत नाहीस बभ्रदाची
पूजा करून लोकांना मात्र आपल्या साधुत्वाचे ढोंग दाखवितोस. २ तू साऱ्या अंगाला राख फासून बसतोस आणि
वृथा आपल्या मोठेपणाची ऐट मिरवतोस. तू वासनेकडून आपला गळाच बांधवून घेत आहेस यामुळे अशा लोकांना
काळ गिळतो व पुन ओकून टाकतो ३ चिखलात डोके टेकून पाय वर करून उभा राहतोस तू काय ह्यात सुख ?
उलट यामुळे तुला स्वत:ला दुख व पीडाच होईल नरकात जाशील ना. पण तुला मूर्खाला समजतच नाही ४ नाना-
प्रकारचे अपशब्द व शिव्या शिकलास तू रांडापोरांना हाका मारून तू भोवती जमवतोस. आपले शरीर विटवून,
नाना प्रकारची सोंगे करून त्यांच्याजवळ पैसा मागतोस ५ सर्व लोकांना मीच एक बलवान असे समजावे म्हणून तू
एखाद्या दुकानापुढे उभा राहून मोठ्याने ओरडा करतोस व लोक जमवितोस, आपले गुडघे व कोपर फोडून ते चोळत
बसतोस अशा प्रकारे तू आपला घात आपणच करीत आहेस ६ अशा या फुकटच्या खेळाने पुष्कळ लोक फसले ना
डोकी बोडून संन्याशाची सोंगे घेणारे फार आहेत पण त्यांच्या मनात जिला शिवू नये अशी माया भरपूर असते
वेशामुळे वेषासारखी वागणूक नसल्यामुळे देहाची नुसती विटंबनाच झाली रे. ७ म्हणून अशा प्रकारे धुळीत,
मातीत खेळ खेळण्याचे काही कारण नाही कस्तुरी, चंदन किंवा बुक्याचा याचे सेवन करून तुम्ही स्वतःही सुवास घ्या
व दुसऱ्यानाही द्यांवा. यामुळे मोठी किंमत होईल नाही तर फुकट फजिती मात्र आहे. ८ वर सांगितलेल्या खेळा-
मुळे पुष्कळांना फार दु:खे झाली आहेत त्यांच्या अंगची बुद्धी नष्ट झाली, बळ संपले त्यांच्या पाठीवर एकसारखे
आघात बसून त्यांचे तोंड काळे झाले आहे. इंद्रिय पाहून त्यांच्या तोंडात पाणी सुटते. ९ तेव्हा तुकाराम महाराज
२३२ सार्थ तुकारामगाथा
काय सांगतात ते नीट ऐका. हा फजितीचा खेळ मोडून टाका. उगाच कसला तरी आचरटपणा करू नका कधी. तरी
चला, आधी ईश्वरप्रेमाचे भोजन करू. भूक फार लागली आहे ईश्वरप्राप्तीने संतुष्ट झाल्यावर मग थाटमाट करणे
शोभून दिसेल. १०
४४९ एक बाई तुज वो¹ कांहीं सांगत शकुन । निजालिया भुर होसी जागे म्हणउन ॥ १ ॥
मान्य माझें केलें सांगतें एका बोलें । न येतां हें भलें कळों कोणा लोकांप्ति ॥ २ ॥
सांगतें गुण जीवींची खुण ऐक माझी मात । येस एका भावें माझे हातीं दे वो हात ॥ ३ ॥
बरया घरचार तुज सांपडला ठाव । फळ नाहीं पोटीं येथें दिसे खोटा भाव ॥ ४ ॥
आहे तुझे हातीं एका नवसाचें फळ । भावा करीं साह्य चहूं अठरांच्या बळें ॥ ५ ॥
करीं लागपाठ चित्त वित्त नको पाहों । असई तो चुडा तुज भोगईल ना हो ॥ ६ ॥
कुळांची हे मुळीं तुझे लागलीसे देवी । पडिला विसर नेदी फळ नाहीं ठावो ॥ ७ ॥
तुका म्हणे नांद सुखें घरीं आठवण । माझ्या येती' कोणी त्यांचा राख वरा मान ॥ ८ ॥
शब्दार्थ व टीपा :- भूर-फजीत, चहू आठरांच्या-चार वेदाच्या, अठरा पुराणाच्या, असई-अखंड
अर्थ :- एक शकुन सांगणारी बाई म्हणते, 'बाई, तू ऐक, मी तुला एक शकुन सांगते भक्तीच्या वेळी तू
जर झोपी जाशील तर तुझी मोठीच फजिती होईल म्हणून तू विठ्ठलस्वरूपात जागी राहा. १ माझे हे बोलणे त्याने
एका शब्दाने मान्य केले आहे. पण माझे हे बोलणे पुष्कळ चांगल्या चांगल्या माणसांनाही समजत नाही. २ मी तुला
माझ्या जीवाची एक खूण सांगते ती नीट ऐक. तू त्या गोष्टीवर भावना ठेवून ऐक व माझ्या हातात हात दे पाहू. ३
तुला घरसंसार व व्यवसाय चांगलाच मिळालेला दिसतो. पण येथे काहीही खरी फलप्राप्ती नसून सर्वत्र खोटा
भावच व्यक्त झालेला दिसतो. ४ तुझ्या नशिबात मात्र एक नवसाचे फळ तुला मिळणार आहे. चार वेद व अठरा
पुराणे यांच्या साहाय्याने मान तू विठ्ठलाची भक्ती वाढीव. ५ वर सांगितलेले काही लागपाठ कर. द्रव्याकडे चित्त देऊ
नकोस यामुळे तुला अखंड सौभाग्याचा चुडा मिळेल व तुला ईश्वररूपाचा पती प्राप्त होईल. ६ तुझ्या कुळाची ही
असणारी ही देवी तुझ्या मागे लागली आहे. तिचा तुला विसर पडलेला असल्यामुळे तुला काही फळ मिळत नाही. ७
तुकाराम महाराज म्हणतात, तू सुखाने आपल्या घरी नांद, असा या देवीचा आदेश आहे. पण तिची आठवण मात्र
धर व तुझ्या घरी माझे जे भक्त येतील त्यांचा आदरसत्कार मात्र नीट कर त्याचा मान ठेव ८
कावडे - अभंग ५
४५० आहा रे भाई । प्रथम नमूं तो विनायक । ठेवुनि गुरुचरणीं मस्तक ।
वदेल प्रासादिक वाणी । हरिहरांचे पवाडे ॥ १ ॥
माझी ऐसी ब्रीदावळी । दासें दासत्वें आगळी ।
पान्हेरीनें मार्ग मळी । जीवन घ्या रे कापडि हो ॥ २ ॥
जें या शीतलाहुनी सीतळ । पातळाहुनि जें पातळ ।
प्रेमामृत रसाळ । तें हें सेवा अहो भाग्याचे ॥ ३ ॥
जिंकाल तरी जिंका रे अभिमान । दवडाल तरी दवडा लज्जा आणि मान ।
धराल ते धरा शंभूचे चरण । दावाल पण ऐसा दावा तो ॥ ४ ॥
काळा घेऊं नेदीं वाव । आला तो राखें धावडाव ।
शुद्ध सत्वीं राखोनि भाव । म्हणा महादेव हरिहर वाणी गर्जो द्या ॥ ५ ॥
१ येथील.
सार्थ तुकारामगाथा २३३
पराविया नारी माउली समान । परधनीं बाटो नेदीं मन ।
जीवित्त्व तें तृणासमान । स्वामिकाजी जाण शूर म्हणो तया ॥ ६ ॥
क्षपित्त येचाविया परउपकारा । खोटें खोट्याचा पसारा ।
सत्य ते भवनदीचा तारा । आळस तो न करा येथें अहो सांगतो ॥ ७ ॥
व्रत करा एकादशी सोमवार । कथा पूजन हरिजागर ।
पुण्य ते असे गाता नाचता बहु फार । पुन्हा योलिला संसार नाहीं नाहीं सत्यत्वें ॥ ८ ॥
संग संताचा करिता बरवा । उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा ।
पथ तो सुपंथ चालावा । उगवा वासना लिंगाड ॥ ९ ॥
तुका चालवितो कावडी । प्रवृत्ति निवृत्ति चोलडी ।
पुढती पुढती अधिक गोडी । भरुनि कळस भजन आवडी केशवदास नटतसे ॥ १० ॥
शब्दार्थ व टीपा - कावडे-पाण्याची कावड घालणारे पान्हेरी-पाणपोई, कापटि-यात्रेकरू पण-पैज,
घाडघाय-अधिकार, सधी, लिंगाड-लचाड, खटपट
अर्थ - अहो बंधुनो, प्रथम गुरुचरणांना वंदन करुन गणपतीस नमस्कार करु त्याच्या कृपेने प्रासादिक वाणीत
हरिहराचे गुणसंकीर्तन करु १ असे दास्यत्व करण्याची माझी योदावड्टी विशेष प्रकारची आहे पाणपोई घालून
मी मार्ग आक्रमत आहे, सेवा करुन जीवन जगत आहे यात्रेकरू बंधुनो, तुम्ही हे पाणी खुशाल घ्यावे २ हे प्रेमा-
मृताचे जीवन शीतलाहून शीतल, पातळाहून पातळ असे रसाळ व गोष्ट आहे याचे सेवन मोठ्या भाग्याने घडते ३
अगोदर तुम्ही अभिमान जिंका, लज्जा आणि मानसन्मानाची हौस सोडून द्या आणि घरणध धरावयाचे असतील तर
महादेवाचे धरावेत काही पैज दाखवयाची असेल तर ती अशी असू द्यात ४ तुमच्या जीवनात काळाला शिरकाव
करु देऊ नका त्याचा अधिकार नीट राखून मनात शुद्ध, सात्त्विक भाव धारण करून हरिहर महादेव अशी गर्जना
याणीने करा ५ दुसऱ्याची स्त्री मातेसमान माना दुसऱ्याच्या धनसंपत्तीवर मन ठेवू नका आणि स्वामीच्या
कामासाठी आपले जीवन तुम्ही गवतएवढे क्षुद्र समजा तरच मी तुम्हांस शूर म्हणेन ६ तुमची सर्व शक्ती दुसऱ्या-
वर उपकार करण्यासाठी खच व्हावी, प्रपंच हा सर्व खोट्याचा पसारा आहे असे तुम्ही माना भवनदी तरून जाणे
हेच एक सत्याचे रूप आहे असे समजा याबाबतीत आळस मुळीच करू नका असे मी तळमळीने सांगत आहे हो ७
एकादशी व सोमवार ही दोन व्रते नियमाने करा कथा, पूजा, हरिजागर करून नामसंकीर्तनाचा लाभ घ्या या
नृत्यगीतात फार मोठे पुण्य आहे असा विश्वास धरा याच्यायोगे पुन संसार करण्यासाठी जन्म घेण्याचा प्रसंग
येणार नाही हे सत्य आहे ८ संताची संगत धरणे हेच फार चांगले आहे यामुळे थोर कीर्तीचा लाभ होतो व
वासनेचे लचाड दूर होऊन चांगल्या मार्गाचे आचरण ठेवावे ९ तुकाराम महाराज म्हणतात, मी प्रवृत्ती व निवृत्ती
अशी कावड चालवीत आहे पुढे आणखी भजनातील गोडीने कळस भरलेले दिसतील केशवदासाच्या प्रीतीने मीही
कायदयाच्या निमित्ताने सेवा करीत आहे १०
४५१ आहा आहा रे भाई । हे अन्नदानाचे सत्र । पन्हे घातली सर्वत्र ।
पर्थी अवघे पथ मात्र । इच्छाभोजनाचे आर्त पुरवावया ॥ १ ॥
यावे तेणे घ्यावे । न सरेसे केले सदाशिवे ।
पात्र शुद्ध पाहिजे वरवे । मगळभावे सकळ हरि म्हणा रे ॥ २ ॥
मध्ये हे काहीं मोकळें । साक्षी चौघांचिया वेगळें । नेदी नाचो मतांचिया थळें ।
अणु अणोरणीया आगळें । महदि महदा साक्षित्वे हरि म्हणा रे ॥ ३ ॥
तु गाथा ३०
२३४ सार्थ तुकारामगाथा
हे हरि नामाची आंबिली । जगा पोटभरी केली । विश्रांति कल्पतरूची साउली ।
सकळां वर्णां सेवितां भली । म्हणा हर हर महादेव ॥ ४ ॥
तुका हरिदास तराळ । अवघे हाकारी सकळ ।
या रे वंदूं शिखरातळ । चैत्रमास पर्वकाळ महादेवदर्शने ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- सत्र-अन्नछत्राचे स्थान, पन्हे-पाणपोई, आर्त-इच्छा, न सरेसे-न संपणारे, आंबिली-
नबील, नाचणीचे पीठ आंबवून केलेला पातळ पदार्थ, तराळ-सेवक, महार
अर्थ - बंधुनो, मी हे अन्नाचे सत्र घाटात मार्गाने जाणाऱ्या यात्रेकरूसाठी घातले आहे ही पाणपोई
त्याच्यासाठीच आहे इच्छामोजनाची इच्छा पुरविण्यासाठी हे माझे अन्नसत्र आहे. १ ज्याने येथे यावे त्याने त्याचा
लाभ घ्यावा सदाशिवाच्या, महादेवाच्या कृपेने हे कधी न संपेल असे आहे. पण तुमचे पात्र मात्र चांगले व शुद्ध हवे
मगल भावाने सर्वजणांनी श्रीहरीच्या नावाचा उच्चार करावा २ हे नाम काही एकटेच मुक्त असे नाही चार
वेदाच्या साक्षीहून हे निराळे आहे एवढेच निरनिराळ्या मताच्या मळावर हे कुणात नाचू देत नाही हे अणुरेणूपेक्षाही
सूक्ष्म व महान तत्त्वापेक्षाही महान असे आहे यासाठी श्रीहरीच्या साक्षीने याचा जयजयकार करा ३ ही
हरिनामाची आंबोल असून सर्व जगास पोटभर पुरेल एवढी केलेली आहे ही कल्पतरूची सावली विश्रांती देणारीच
समजा ना सर्व वर्णांनी हिचे सेवन केल्यास उत्तमच आहे. चला यासाठी सर्वजण हरहर महादेव म्हणू या ४
तुकाराम महाराज म्हणतात, मी या श्रीहरीचा दवंडी देणारा सेवक महार आहे. सर्वजणांना हाका मारून सांगत आहे,
या सर्वजण. या महादेवाच्या शिखराच्या तळाचे दर्शन घेऊ चैत्राच्या पर्वकाळात या महादेवाचे दर्शन घेऊ या ५
विवरण - या अभंगातील महादेवाचा संबंध शिखर शिंगणापूरचा आहे तेथे चैत्रात मोठी यात्रा भरते
महादेवास पाणी घालून अभिषेक करण्यात येतो सर्व वर्णाना ही उपासना सुलभ असल्याची घोषणा वारकरी पंथाच्या
धोरणास अनुसरूनच आहे. 'अणु अगोरणीया आगळें । महदि महदा' हे शब्द कठोपनिषदातील 'अणोरणीयान्महतो
महीयान्' या सूत्राशी जुळणारे आहेत 'अणुरेणा थोडरा । तुका आकाशाएवढा' असे त्यांनी दुसऱ्या एका अभंगात
म्हटले आहेच वरील दान व पुढील एक असे तीन अभंग कावडीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत या सबंधीची थोड-
क्यात हकीकत अशी की तुकाराम महाराज एकदा शंभुमहादेवाच्या यात्रेस निघाले होते गंगाधरपंत मवाळ व मताजी
तेली असे दोघेजण बरोबर होते सातव्या दिवशी त्यांना शंभुमहादेवाचे शिखर दिसले. पायथ्याशी शिंगणापूर क्षेत्र
लागले तेथील सरोवरात त्या सर्वांनी स्नाने केली स्वयंपाक करून भोजनास बसणार, इतक्यात एक अतिथी
भिक्षेकर्याच्या वेषाने तेथे आला व भोजन करून तृप्त होऊन अदृश्य झाला बुवांना वाटले, अतिथीच्या रूपाने प्रत्यक्ष
कैलासपतीच भोजन करून गेला जेवण करून मग डोंगरावर जाऊन सर्वांनी शंभूचे दर्शन घेतले तुकाराम महाराजांनी
महाद्वारात कीर्तन केले व त्यावेळी वरील कावडीचे अभंग प्रेमाने म्हटले पाच रात्र तेथे राहून मग त परत
देहूस आले
४५२ आहा रे भाई । नमो उदासीन जाले देहभावा । आळवितो देवा तया नमो ॥ १ ॥
नमो तीर्थपंथें चालती तयासी । येती त्यांसी बोळविती त्यां नमो ॥ २ ॥
नमो तया सत्यवचनीं विश्वास । नमो भावे दास्य गुरूचें त्यां ॥ ३ ॥
नमो तया मातापित्यांचे पाळण । नमो त्या वचन सत्य वदे ॥ ४ ॥
नमो तया जाणे आणिकांचें सुखदुःख । राखे तान भूक तया नमो ॥ ५ ॥
परोपकारी नमो पुण्यवंता । नमो त्या दमित्या इंद्रियासि ॥ ६ ॥
तुका म्हणे नमो हरिचिया दासा । तेथें सर्व इच्छा पुरलीसे ॥ ७ ॥
शब्दार्थ व टीपा :- बोल्हावितो-बोलावितात, आणिकांचे-दुसऱ्यांचे, तान-तहान, राखो-दूर करतो.
अर्थ :- बंधूंनो, जे देहभावाविषयी उदासीन झाले आहेत व जे त्या देवास सदैव आळवीत असतात त्यांना
नमस्कार असो. १ जे तीर्थयात्रा करण्यासाठी त्या मार्गाने चालतात व जे त्या मार्गास येतात त्यांना बोलावितात
त्यांना नमस्कार असो. २ ज्यांचा विश्वास संतवचनांवर नेहमी असतो व भक्तिभावाने जे सद्गुरूचे दास्य करितात
त्यांना नमस्कार असो. ३ जो आपल्या मातापित्याचे नीट पालनपोषण करतो व जो नेहमी सत्यवचन बोलत असतो
त्यास नमस्कार असो. ४ जो दुसऱ्यांचे दुःख जाणून त्यांची तहान भूक दूर करतो त्यासही नमस्कार असो. ५
जो परोपकारी पुण्यवंत आहे व जो इंद्रियांचे दमन करतो त्यास नमस्कार असो. ६ तुकाराम महाराज म्हणतात,
हरीच्या दासास नमस्कार असो. कारण माझे सर्व इच्छा त्यांच्याजवळच पूर्ण होत असते. ७
४५३ आहा रे भाई । तयावरी माझी ब्रीदावळी । भ्रष्ट ये फळीं क्रियाहीन ॥ १ ॥
थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी । वर्णिली ते थोरी दवडा वांयां बाहेरी ॥ २ ॥
बाइलेचा दास पित्रांस उदास । भीक भिकाऱ्यास नये दारा ॥ ३ ॥
विद्याबळें वाद सांगोनियां छळी । आणिकांस फळी मांडोनियां ॥ ४ ॥
गांविचिया देवा नाहीं दंडवत । ब्राह्मण अतीत घडेचि ना ॥ ५ ॥
सदा¹ सर्वकाळ करितोचि निंदा । स्वप्नीं ही गोविंदा आठवीना ॥ ६ ॥
खासेमध्यें धन पोटासि बंधन । येणें ऐसा दानधर्म कांही ॥ ७ ॥
तुका म्हणे नटे दावूनियां सोंग । लवों नेदी अंग भक्तिभावें ॥ ८ ॥
शब्दार्थ व टीपा :- फळीं-कलियुगात, पित्रांस-वडील माणसांस, अतीत-अतिथी, खासेमध्ये-स्वतःचे.
अर्थ :- बंधूंनो, या कलियुगात जे कोणी क्रियाभ्रष्ट झाले आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी मी ब्रीद
घेतले आहे. १ असे जे कुणी असतील त्यांच्या तोंडावर थुंकावे. त्यांची थोरवी कुणी वर्णन केली तरी ती अगदी
व्यर्थ आहे असे समजून सोडून द्या. २ हा अधम मनुष्य बायकोचा दास झालेला असून वडील माणसांविषयी मात्र
पूर्ण उदास असतो यांच्या दारात भिकाऱ्यांना कधीही भिक्षा मिळत नाही. ३ काही थोडीफार विद्या शिकून
निरनिराळे वाद खेळतो व दुसऱ्यांना हा छळोत असतो. ४ गावातील देवाला हा चुकूनही नमस्कार करीत नाही.
ब्राह्मण, अतिथी यांचा हा कधीच सत्कार करीत नाही ५ सदासर्वकाळ हा साधुसंतांची निंदा करीत असतो व
गोविंदाचे स्मरण स्वप्नातही हा कधी करीत नाही ६ याचे स्वतःचे असे पुष्कळ धन असते; पोट बांधून त्याचे हा
जतन करतो, पण कधी दानधर्म करावा असे याच्या मनात येत नाही ७ तुकाराम महाराज म्हणतात, हा नाना-
प्रकारची सोंगे दाखवून नटत असतो पण भक्तिभावाने कधी याचे अंग लवले आहे असे दिसत नाही ८
४५४ आहा रे भाई । गंगा नव्हे जळ । वृक्ष नव्हे वड पिंपळ ।
तुळसी रुद्राक्ष नव्हे माळ । श्रेष्ठ तनु देवाचिया ॥ १ ॥
समुद्र नदी नव्हे पैं गा । पाषाण म्हणों नये लिंगा ।
संत नव्हती जगा । मानसा त्या सारिखे ॥ २ ॥
काठी म्हणों नये वेतु । अन्न म्हणों नये सांतु ।
राम राम हे मातु । नये म्हणों शब्द हे ॥ ३ ॥
चंद्र सूर्य नव्हती तारांगणें । मेरु तो नव्हे पर्वता समान ।
शेष वासुकी नव्हे सर्प जाण । विखारयाच्या सारिखे ॥ ४ ॥
१ सर्व काळ करी संतांचिया निंदा.
७३६ सार्थ तुकारामगाथा
गरुड नव्हे पाखरू । ढोर नव्हे नंदिकेश्वरु ॥
झाड नव्हे कल्पतरू । कामधेनु गाय न म्हणावी ॥ ५ ॥
कूर्ूम नव्हे कासव । डुकर नव्हे वराह ।
ब्रह्मा नव्हे जीव । स्त्री नव्हे लक्ष्मी ॥ ६ ॥
गवाक्ष नव्हे हाड । पाटाव नव्हे कापड ।
परीस नव्हे दगड । सगुण ते ईश्वरीचे ॥ ७ ॥
सोने नव्हे धातु । मीठ नव्हे रेतु ।
नाहीं नाहीं चमांतु । कृष्णाजिन व्याघ्रांबर ॥ ८ ॥
मुक्ताफळें नव्हेति गारा । खड्याऐसा नव्हे हिरा ।
जीव नव्हे सोइरा । बोळवीजे स्वेच्छेनें ॥ ९ ॥
गाव नव्हे द्वारावती । रणसोड नव्हे मूर्ति ।
तीर्थ नव्हे गोमती । मोक्ष घडे दर्शनें ॥ १० ॥
कृष्ण नव्हे भोगी । शकर नव्हे जोगी ।
तुका पाडुरंगीं । हा प्रसाद लाधला ॥ ११ ॥
शब्दार्थ व टीपा - तनु-शरीर, मातु-गोष्ट, शेष-सर्पांचा राजा, वासुकी-सर्पाचा राजा नंदिकेश्वरु-
शंकराचा नंदी, गवाक्ष-गाईचा डोळा पाटाव-रेशमी वस्त्र कृष्णाजिन-हरणाचे कातडे व्याघ्रांबर-वाघाचे कातडे,
गोमती-द्वारूर येथील तीर्थ
अर्थ - अहो बहुनो, गंगेचे पाणी हे काही इतर नद्याच्या पाण्यासारखे नाही त्याचे पावित्र्य विशेष
प्रकारचे आहे तसेच वड व पिंपळ याची झाडे इतर झाडासारखी नव्हेत तुळशीची व रुद्राक्षाची माळ इतर माळा-
सारखी नव्हे ५, सर्व गोष्टी त्या श्रेष्ठ परमेश्वराच्या शरीराप्रमाणेच होत १ समुद्र हा इतर नद्याप्रमाणे नव्हे.
शिवलिंग पाषाणाचे असले तरी तो काही पाषाण नव्हे, त्याचप्रमाणे संत हे जगातील इतर लोकासारखे नव्हेत २
वेताची काठी ही इतर काठीसारखी म्हणू नये सातु इतर धान्याप्रमाणे समजू नयेत राम राम हा जप इतर
शब्दासारखा नाही ३ इतर ताऱ्याप्रमाणे चंद्र व सूर्य यांना समजू नये मेरु पर्वत इतर पर्वताप्रमाणे सांधा नाही, शेष
व वासुकी हे इतर सामान्य विषारी सर्पाप्रमाणे नाहीत ४ गरुड हा काही सामान्य पक्षी नव्हे शंकराचा नंदी
हा काही इतर बैलासारखा नाही, इतर झाडाप्रमाणे कल्पतरूही नव्हे, इतर गाईसारखीच कामधेनू समजू नये ५
भगवंताचा अवतार कूर्मकासव हे इतर कासवाप्रमाणे नाही, वराह म्हणजे डुक्कर खरा, पण तो इतर डुकरा-
प्रमाणे नाही सर्व जीवाप्रमाणे वासुदेव नव्हे ही लक्ष्मी साधी स्त्री म्हणू नये ६ इतर सामान्य हाडात गवाक्ष-
गाईच्या डोळयाची गणना करू नये रेशमी वस्त्र हे इतर कापडाप्रमाणे कसे असेल ? परीस इतर दगडासारखा
नाही जे जे सगुण म्हणजे विशेष गुणांनी युक्त आहे ते ते ईश्वराचे अंग मानावेत ७ सोने हा धातु इतर धातू-
पासून वेगळाच मानायला हवा साध्या रेतीवाळूपेक्षा मीठ वेगळेच असते कृष्णाजिन व व्याघ्रांबर हे इतर प्राण्याच्या
चामड्याप्रमाणे नाही ८ मुक्ताफळांची, मोत्याची किंमत गारगोटीशी कशी होईल ? हिऱ्याची सर खड्यांस कशी
येईल ? जीव हा त्या शिवाचा अंश असल्याने तो आपलाच समजून सोप्याप्रमाणे त्यास वाटेल तसे वागविणे युक्त
होणार नाही ९ द्वारका हे गाव इतर गावाप्रमाणे नव्हे रणछोडाची मूर्ती ही इतर मूर्तीसारखी नाही गोमती हे
तीर्थ इतर तीर्थांहून फारच वेगळे आहे तिच्या दर्शनानेच मोक्ष घडतो १० श्रीकृष्ण हा काही वरवर दिसतो तसा
भोगी नाही, शंकरही त्याने अंगाला राख फासली असली तरी इतर जोग्याप्रमाणे तो नव्हे तुकाराम महाराज
म्हणतात, पाडुरंगाच्या प्रसादाने हा फरक मला समजला आहे ११
विवरण - या सुदर अभंगात एक तत्त्व तुकारामबुवांनी फार चांगल्या प्रकारे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट
केले आहे श्रीकृष्ण व शिवशंकर यांची एकरूपता वर्णन करणे व तसे ऐक्य प्रस्थापित करणे हे तर भागवत संप्रदा-
याचे धोरण होते. पण कृष्ण व शिव यांच्या वरवरच्या आचरणावरून त्यांना इतर सामान्य माणसाप्रमाणे समजू
नये हे पटविण्यासाठी तुकारामबुवांनी अनेक उदाहरणे या अभंगात दिलेली आहेत. ज्या वस्तूस ईश्वराचा स्पर्श झाला
आहे, अथवा जीत ईश्वरी तत्त्वाचा वास अंम आहे ती स्वजातीयापासून वेगळीच मानावयास हवी तुकोबांचा हा
सामर्थ्याने शोभणारा अभंग वाचून भगवद्गीतेमधील विभूतिविस्ताराच्या निरुपणाचा प्रसंग आठवतो सर्व जगत्,
स्थिरचर वस्तू यांची अभिव्यक्ती एकाच ईश्वरी तत्त्वापासून असली तरी ज्या वस्तूत परमेश्वराचा दिव्यांश विशेष
रूपाने असतो त्या वस्तू आपल्या वैशिष्ट्याने वेगळयाच दिसतात व असतात, जी जी वस्तू वैभव, लक्ष्मी, प्रभाव,
ईश्वरसान्निध्य, किंवा ईश्वरस्पर्शित आहे ती वेगळीच म्हटली पाहिजे
सौऱ्या – अभंग ११
४५५ वेसन गेले निष्काम जाले नर नव्हे नारी ।
आपल्या तुटी पारख्या भेटी सौरियांचे फेरी ॥ १ ॥
त्याचा वेध लागला छंद हरि गोविंद वेळोवेळां ।
आपुलेमागें हासत रागें सावले घालिती गळां ॥ २ ॥
जन वेपा भीते तोडा आमुच्या भांडपणा ।
कर कटीं भीमा तटीं पंढरीचा राणा ॥ ३ ॥
वेगळया याति पडिलो संतीं अवघ्या एका भावे ।
टाकियेली चाड देहभाव जीवें शिवे ॥ ४ ॥
सकळांमधीं आगळी बुद्धि तिची करूं सेवा ।
धाय तुंबामूढासवे भक्ती नाचो भावा ॥ ५ ॥
म्हणे तुका टाक रुका नाचो निर्लज्जा ।
बहु जाले सुख काम चुकलो या काजा ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- सौरी-निर्लज्ज स्त्री, चोचाल स्त्री, भावीण, मुरळी, देवदासी, वेसन-व्यसन,
सावलें-वस्त्र, धाय-व्यर्थ
अर्थ :- सकामातेचे माझे व्यसन आता संपले. मी आता निष्काम झाले आहे त्यामुळे मी नारीही नव्हे व
पुरुषही नव्हे, अशा स्थितीत आहे आपल्या स्वरूपाची संगत कमी होऊन परपुरुषाची म्हणजे परमेश्वराची जडू
लागली की सौऱ्याच्या संगतीने असा प्रकार घडून येतो १ त्या श्रेष्ठ पुरुषाचा मला छंद एकसारखा लागल्यामुळे
मी हरी, गोविंदा असे पुनः पुनः म्हणत आहे मग माझ्या पाठीमागे माझे सगेसोयरे मला हसत असतात व रागाने
गळघात वस्त्र घालतात २ लोक आमच्या वेषाला भितात, आमच्या भाडखोर स्वभावामुळे कोणी आमच्या तोंडास
लागत नाहीत. पण कमरेवर हात ठेवून भीमा नदीच्या तीरावर जो पंढरीराया उभा आहे, त्याच्याशी मी रमले
आहे ३ त्याचीच एकाची भाव धरून भक्ती केल्यामुळे आमची जात वेगळी झाली. आम्ही देहभावाची व
संसाराची लाज जीवाशिवाच्या ऐक्यासाठी सर्व सोडून दिली आहे. ४ सर्वांहून जी श्रेष्ठ बुद्धीची आहे तिची सेवा
आम्ही मनोभावे करू, मोठ्या भक्तिभावाने नाचू व्यर्थ मूर्खाबरोबर न राहू ५ तुकाराम महाराज म्हणतात,
पैशासाठी निर्लज्जपणे नाचण्याचे सोडून दे या कामातील तुझे लक्ष कमी झाले म्हणजे कायमचे सुख होईल ६
२३८ सार्थ तुकारामगाथा
४५६ आणिकां उपदेशूं नेणें नाचों आपण ।
मुंढा¹ वांयां मारगेली वांयां हांसे जन ॥ १ ॥
तैसा नव्हे घाला आवरों मन डोळा ।
पुढिलांच्या कळा कवतुक जाणोनी ॥ २ ॥
बाहिरल्या येषें आंत जसें तसें ।
झाकलें तों बरें पोट भरे तेणें मिसें ॥ ३ ॥
तुका म्हणे केला तरी करीं शुद्ध भाव ।
नाहीं तरी जासी यांयां हा ना तोसा ठाव ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- मुंढा-हिजड्याचा सोबती, हा ना तोसा-ना स्वार्थाचा, ना परमार्थाचा.
अर्थ :- दुसऱ्यांना उपदेश देऊ नये. आपणच काय नाचायचे ते नाचावे. या मार्गास लागलेला सोबती मुढा
हाही वायाच गेलेला असतो. त्याला लोक हसतात १ तेव्हा त्याच्याप्रमाणे खोटाच चाळा न करता मन आवरून
धरावे. दृष्टी सावरावी. पुढे गेले आहेत त्यांचे गुण कौतुकाने घ्यावेत. २ बाहेरचा चांगला वेष काय उपयोगाचा ?
आतील विकार जसेच्या तसेच असले तर ते झाकलेले बरे. बाह्य वेषाने पोट तरी भरेल. ३ तुकाराम महाराज
म्हणतात, तुम्ही आपला भाव शुद्ध कराल तर बरे. नाही तर वाया जाल. ना स्वार्थ, ना परमार्थ अशी अवस्था तुमची
होईल ४
४५७ टाक रुका चाल रांडे कां गे केली गोवी ।
पुसोनियां आलें ठाव म्हणोनि देतें शिवी ॥ १ ॥
आतां येणें छंदें नाचों विनोदें ।
नाही या गोविंदें माझें मजसी केलें ॥ २ ॥
कोरडे ते बोल कां गे वेचितेसी वांयां ।
थतें करूनि दावीं तुझ्या मुळींचिया ठाया ॥ ३ ॥
याजसाठीं म्या डोर धरियेला हातीं ।
तुका म्हणे तुम्हा गांठी सोडायाची खांती ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- रुका-अभिमान, गोवी-गुंतवणूक, डौर-एक वाद्य, डमरू
अर्थ :- अग रांडे, तू देहाचा अभिमान सोडून दे ना ह्या गुंतवणुकीत का राहतेस ? चल मजबरोबर मी ह्या
अभिमानाचे स्थान सोडून दिले आहे म्हणून तर तुला शिवी देत आहे १ या गोविंदाने माझा मीपणा नाहीसा केला;
म्हणून आता याच्याच नादाने मोठ्या मस्तीने व गमतीने याच्या संगतीत नाचू या. २ तू तुझ्या अंतःकरणांतील
हे कोरडे बोल व्यर्थ का खर्च करतेस ? तुझ्या मूळच्या ठिकाणी ते प्रकट करून दाखोव ना. ३ यासाठीच मी हातात
हा डोर धरला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देहाच्या अभिमानाची ही गाठ मला आता सोडवायची आहे. ४
४५८ मोकळी गुंत रितो कुंथ्ये नाहीं भार दावें ।
घेडवाडा बैसली खोडा घेतली आपुल्या भावें ॥ १ ॥
ऐका बाई लाज नाहीं² आणिकां त्या गरतीची ।
समाधानों उंच स्थानीं जाणे सेवा पतीची ॥ २ ॥
१ मुदा, २ काही
न बोलतां करी चिंता न मारितां पळे ।
वादला सेज नावडे निजे जगझोडीचे चाळे ॥ ३ ॥
देखत आंध बहिर कानों बोल बोलतां मुकें ।
तुका म्हणे पतन सोयरीं ऐसीं जालीं एकें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- रिती-रिकामी, धेडवाडा-महारवाडा, गरतीबो-कुलीन स्त्रीची
अर्थ :- ही मोकळी असून गुंतली आहे. दर डोक्यावर कांही ओझे नसूनही भाराने कुथत आहे आणि
आपल्याच देहभावाच्या छोडघामध्ये, देहरूपाम्च्या महारवाड्यात अडकून बसली आहे. १ आणि एक बाई, त्या
कुलीन स्त्रीची लाज तुला वाटत नाही का ? ती पतीची सेवा करुन कशी समाधानात उंच ठिकाणी असते. २
कुणी काही रागाने बोलत नसताही चिंता करणे व कुणी मारीत नसताना पळून जाणे, शेजेवर आपला नवरा न
आवडणे हे जगझोडीचे, चवचाल स्त्रीचे चाळे असतात. ३ देव पाहात नसल्यामुळे याचे डोळे आंधळेच
असतात. त्यांची कीर्ती कानावर येत नसल्याने ते बहिरेच असतात, त्याची स्तुती तोंडात नसल्याने ते मुके असतात.
तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारची माणसे नरकलोकाचेच पाहुणे झाले आहेत ४
४५९ सातें चला काजळ घाला तेल फणी करा ।
दिवाणदारीं बैसले पारों नाचों फेर घरा ॥ १ ॥
या साहेबाचें जालें देणें वेळोवेळां न लगे येणें ।
आतां हाटों काशासाठीं हिंडों पाटी बुकानें ॥ २ ॥
अवघ्या जणी मुंडा धणी नाचों एकें घाईं ।
सरसावलें सुख कैसा चाळा एके ठायीं ॥ ३ ॥
तुका म्हणे वोळगों एका तोड चिंता माया ।
देऊं उद्गार आतां जाऊं मुळींचिया ठाया ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- सातें-बाजारात, वोळगो-शरण जाऊं
अर्थ :- शायांनो, चला बाजारात जाऊ डोळ्यात काजळ घाला, तेलफणी नीट करा. समोर पारावर
दारात दिवाणजी बसले आहेत त्याच्या भोवती फेर धरून नाचू या. १ या साहेबाचे आपणांस वरचेवर कर्ज झाले
आहे, देणे आहे. ते एकदा देऊन टाकले म्हणजे मग पुनः वरचेवर यायला नको. आता बाजारात त्याच्यासाठी मग
दुकानांतून हिंडावे लागणार नाही. २ या निर्विकार धन्याभोवती आपण सर्वजण फेर धरून नाच करू या या एका
ठिकाणी जर सुख मिळाले तर मग निरनिराळ्या ठिकाणी जाण्याचा चाळा उगाच कशासाठी ? ३ तुकाराम
महाराज म्हणतात, चिंता व मायाममता सोडून यासच शरण जाऊ. याच्यापाशी सर्व काही सांगून याच्या मूळ गांवे
जाऊ या. ४
४६० सोरी सुर जालें दुर डोर घेतला हातीं ।
माया मोह सांडवले तीही लोकीं जालें सरती ॥ १ ॥
चाल धिठाबाई अवघो पांज¹ देईं ।
न घरीं गूज कांहीं वाळवंटीं सांपडतां ॥ २ ॥
हिंडोनि चौऱ्याशी घरें आलें तुझ्या दारा ।
एक्या रूपयासाठीं आंचवलें संसारा ॥ ३ ॥
१ पाच.
२४० सार्थ तुकारामगाथा
लाज मेली शंका गेली नाचोँ महाद्वारीं।
भ्रांति सावलें फिटोनि गेलें आतां कैची उरी ॥ ४ ॥
जालें भांडीं जगा सांडी नाहीं भीड चाड।
घालीन चरणीं मिठी पुरविन जीविंचें तें कोड ॥ ५ ॥
तुका म्हणे रुकारो संसारतुटी।
आतां तुम्हां आम्हां कैसी जालो जीवे साटीं ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- सुर-शूर, दुर-दुरावले, पांज-पंचभूतात्मक देह, सावले-वस्त्र, भांडी-भांडण
अर्थ :- हातामध्ये ढोर घेऊन मी शूर सौरी झाले आहे. सर्व प्रकारचे मायामोह सोडून मी तीनही लोकांना
श्रेष्ठ ठरले आहे. १ विठाबाई, हा देह पंचभूतात्मक आहे. पण वाळवंटात या पंढरपुरास आले असता काही गुप्त
गोष्ट मनात ठेवू नकोस. २ चौऱ्याऐंशी लक्ष योनींचे जन्म हिंडून मी आज शेवटी तुझ्या घरी आले आहे; तुझ्या
नामाच्या एका रुक्यासाठी मी माझा संसारही सोडून दिलेला आहे. ३ माझी सर्व लाज संपली; शंकाही दूर झाली;
मी आता या महाद्वारात नाचत आहे. भ्रांतीचे वस्त्रही मी आता टाकून दिले आहे. आता देहभावाचे काय तसे उरले
आहे ? ४ सर्वांशी माझे भांडण झाल्यामुळे मी सर्व जगाचा संबंध सोडून दिलेला आहे. मला आता कुणाचीच
भीडभाड नाही. आता मी तुझ्याच चरणांवर मिठी घालून माझ्या जीवाची इच्छा पूर्ण करीन. ५ तुकाराम महाराज
म्हणतात, तुझ्या नामाचा रुका मला प्राप्त झाला म्हणजे संसार संपून जाईल व जीवावर उदार होऊन तुमची-आमची
कशीतरी भेट होईल. ६
४६१ सम सपाट बेसरूकाट निःसंग जालें सौरी ।
कुडपीयेला देश आतां येऊं नेदीं दुसरी ॥ १ ॥
गाऊं रघुरामा हेंच उरलें आम्हां ।
नाहीं जीवतमा वित्तगोतासहीत ॥ २ ॥
ठाव जाला रिता झाकुनि काय आतां ।
कोणासवें लाज कोण दुजा पाहता ॥ ३ ॥
सौरीयांचा संग आम्हां दुरावलें जग ।
भिन्न जालें सुख भाव पालटला रंग ॥ ४ ॥
लाज भय क्षणो नाहीं तजियेली दोन्ही ।
फिराविला वेष नव्हों कोणाचींच कोणी ॥ ५ ॥
तुका म्हणे हा आम्हां वेष दिला जेणें ।
जनाप्रचित सर्वै असों एकपणें ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - कुडपीयेला-व्यापून टाकला, सर्वे-बरोबर.
अर्थ :- सर्व संग सोडून, सर्व व्यसने संपवून मी निःसंगपणाने सौरी झाले आहे. आता हा देश मीच एकटीने
व्यापला असल्याने दुसऱ्या कुणास येऊ देणार नाही इथे. १ आता त्या रघुरामाचे नामस्मरण गाऊ हेच एक काम
आम्हांस उरले आहे. आता आम्हास आमच्या जिवाचीही काळजी नाही, की धनदौलत व नातेवाईक लोक यांची
चिंता नाही. २ हा सर्वच देहभाव संपलेला असल्यामुळे आता त्यास झाकून काय उपयोग ? आता कुणासाठी लाज
धारण करायची ? त्याच्यावाचून आता पाहणारे तरी दुसरे कोण आहे ? ३ सौऱ्यांच्या संगतीने आम्हांला हे जग
दुरावले आहे; पण त्यामुळे फार वेगळ्या प्रकारचे सुख आम्हांस मिळून त्याने आमच्या मनाचा भाव पालटला
आहे. ४ आता लोकांची भीती व लाज दोन्ही आम्ही सोडून दिली आहे. आता आम्ही पूर्वीचा वेषही टाकून देऊ.
सार्थ तुकारामगाथा २४१
दुसरा वेष धारण केल्यामुळे आम्ही आतां कुणाचेही नव्हें ५ तुकाराम महाराज म्हणतात की, ही सोरी म्हणते,
हा वेष ज्याने आम्हांस दिला त्याच्या भावाने आम्ही या जनाबरोबर एकट्याने राहू. ६
४६२ नव्हे नरनारी संवसारीं अंतरलों ।
निर्लज्ज निष्काम जना वेगळेचि ठेलों ॥ १ ॥
चाल रघुरामा ने आपुल्या गांवा ।
तुजविण आम्हां कोण सोयरा सांगाती ॥ २ ॥
जनवाद लोकनिंद्य पिशुनाचे चेरे ।
साहूं तुजसाठीं अंतरलीं सहोदरें ॥ ३ ॥
बहुता पाठीं निरोप हातीं पाठविला तुज ।
तुका म्हणे आतां सांडुनि लौकिक लाज ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- पिशुनाचे-चहाडखोराचे, सहोदरें-सख्खे भावंडे
अर्थ - आम्ही पुरुषही नाही व स्त्रीही नाही. आम्ही संसारासही आंचवलो आहोत. लाज टाकून देऊन,
निष्काम होऊन, आम्ही या लोकांपेक्षा निराळेच झालो आहोत. १ रघुनाथा, तू आम्हास तुझ्या गावी घेऊन जा.
तुझ्याशिवाय आम्हास कोण रे आता सोबतीचे सोयरे आहेत ? २ या लोकांचे प्रवाद, लोकांची निंदा, चहाडखोर
लोकांचे फजितीचे बोलणे, देवा, तुझ्यासाठीच सहन करू रे. आमची भावंडेही तुजसाठीच अंतरली आहेत. ३ आज
पुष्कळ मोठ्यांच्या बरोबर तुला मला घेऊन जाण्यासाठी निरोप पाठविला तुकाराम महाराज म्हणतात, ही सोरी
लौकिक लाज सोडून तुझ्यासाठीच भक्तिभावाने उत्सुक आहे. ४
४६३ नीट पाट करूनि थाट । दावीतसे तोरा ।
आपणाकडे पाहो कोणी । निघाली बाजारा ॥ १ ॥
ते सोरी नव्हे निकी । भक्तीविण फिकी ॥ २ ॥
चांग भांग करूनि सोंग । दावी माळा मुदी ।
रुपयाची आस धरूनि । हालवी ती फुदी ॥ ३ ॥
थोरे घरीं करी फेरी । तेथें नाचे बरी ।
जेथें निघे रुका । तेथें हालवी टिरी ॥ ४ ॥
आंत मांग बाहेर चांग । सोरी ती नव्हे तेग ।
तुका दास नटतसे । न करी त्याचा संग ॥ ५ ॥
२४२ सार्थ तुकारामगाथा
४६४ चाल माझ्या राघो । डोंगरीं दिवा लागो ॥ १ ॥
घर केलें दार केलें । घरीं नाहीं वरो ।
सेजारणी पापिणीचीं पांच पोरें मरो ॥ २ ॥
घरीं पांच पोरें । तीं मजहूनि आहेत थोरें ।
पांचांच्या बळें । खादलीं बावन केळें ॥ ३ ॥
घर केलें दार केलें । दुकान केला मोठा ।
पाटाची राणी धांगडधिंगा तिचा मोठा ॥ ४ ॥
दुकान केला मोठा । तर पदरीं रुका खोटा ।
हिजडा म्हणसी जोगी । तर सोळा सहस्र भोगी ।
तुका म्हणे वेगीं । तर हरि म्हणा जगीं ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - वरो~पुत्रकळ
अर्थ :- माझ्या राघो, तू माझ्याबरोबर चल. डोंगरावर दिवा लागू द्यात. १ मी घर केले, दार केले;
म्हणजे लग्न केले. पण घरात मूलबाळ नाही झाले. परंतु शेजारणीस मात्र पाच पोरे आहेत. ती मरून जाऊ द्या. २
माझ्याही घरी पाच पोरे माझ्यापेक्षा थोर आहेत या पाचांच्या बळावर मी बावन्न केळी खाल्ली आहेत. या पच
कर्मेंद्रियांनी उत्तम भोग घेतले. ३ मी घरदार केले, प्रपंच उभारला, मोठे दुकान घालून व्यापार केला. पाट लावून
पट्टराणी एक आणली. पण तिचा धांगडधिंगाच फार आहे. ४ मी मोठे दुकान घातले खरे, पण माझ्या पदरात
मात्र खोटा रुपयाच पडला. मला हिजडा, योगी म्हणू लागले. तुकाराम महाराज म्हणतात, मग अशा वेळी
सोळासहस्र नारी भोगूनही जो खराच जोगी राहिला, त्या श्रीहरीचे नामस्मरण घटकन करा. ५
४६५ जन्मा आलिया गेलिया परी । भक्ति नाहीं केली ।
माझें माझें म्हणोनियां । गुंतगुंतों मेलीं ॥ १ ॥
येथें कांहीं नाहीं । लव गुरूच्या पायीं ।
चाल रांडे टाकीं रुका । नको करूं बोल ।
गुरुविण मार्ग नाहीं । करिसी तें फोल ॥ २ ॥
खाउनी जेउनि लेउनि नेसुनि । म्हणती आम्ही धन्या ।
साधु संत घरा आल्या । होती पाठमोऱ्या ॥ ३ ॥
वाचोनि पढोनि जाले शाहणे । म्हणती आम्ही संत ।
परनारी देखोनि त्यांचें । चंचळ जालें चित्त ॥ ४ ॥
टिळा टोपी घालुनि माळा । म्हणती आम्ही साधू ।
दयाधर्म चित्तीं नाहीं । ते जाणावे भोंदु ॥ ५ ॥
कलियुगीं घरोघरीं । संत जाले फार ।
वीतिभरी पोटासाठीं । हिंडती दारोदार ॥ ६ ॥
संत म्हणती केली निंदा । निंदा नव्हे माई ।
तुका असे अनन्य भावें शरण संतां पायीं ॥ ७ ॥
सार्थ तुकारामगाथा २४७
पैसा सर्व टाकून दे. उगाच व्यर्थ बडबड करू नकोस श्रीगुरूच्या प्राप्तीशिवाय दुसरा मार्ग नाही. इतर सर्व करशील ते
फोल आहे. २ चांगले खातेस, नेसतेस आणि वर म्हणतेस, आम्ही देवाच्या दासी आहोत. पण साधुसंत घरी येताच
पाठमोऱ्या होऊन पळून जाता, नाही का ? ३ असेच सत वरवरचे झाले आहेत वाचून, पडून शहाणे झाले व
आम्ही सत झालो असे म्हणतात, पण दुसऱ्याची स्त्री पाहताच याचे चित्त विचलित होते. ४ याच्या कपाळावर
टिळा असतो, टोपी डोक्यावर साधूंसारखी असते, गळयात माळा असतात. आम्ही साधू असेही हे म्हणतात, पण
याच्या चित्तात दयाधर्म नसल्यामुळे हे भोंदूच समजायला हवेत ५ या कलियुगात संत घरोघरी फारच झाले
आहेत पण गोतभर पोट भरण्यासाठी ते दारोदार हिंडत राहिले आहेत. ६ संत म्हणतील याने आमची निंदा केली,
पण तुकाराम महाराज म्हणतात, बधूनो, ही निंदा नव्हे खऱ्या सतांच्या पायी हा मी नेहमी अनन्य भावाने
शरण आहे ७
विवरण - मराठी संतांच्या भारूड वाङ्मयात निरनिराळे धंदे करणाऱ्या लोकांच्या बरोबर सौरी ही एक
असते सौरी म्हणजे वाईट चालीची, पण देवाची नाते जोडणारी बाजारबसवी स्त्री असाच वरवरचा अर्थ आहे
जगतीने वा कुणाच्या फसवणुकीने ही स्त्री वाईट नादी लागने व मग मनात विकार असून देवाच्या नावावर देवदासीचा
व माधुर्याचा आविर्भाव आणते हिच्याभोवती अनेक माणसे टपून असतात देवाच्या भावाखाली चाललेल्या या
विक्षिप्त प्रकाराची तुकारामबुवांनी कडाडून हजेरी घेतली आहे पायातळूकू लावून, नट्टापट्टा करुन जाणाऱ्या व
केवळ पैशावर नजर ठेवणाऱ्या सौरीचा बुवांनी निषेधच केलेला आहे या सौरीच्या भोवती जमणारा गोतावळा मोठा
चमत्कारिकच असतो ना पुरुष, ना स्त्री अशांपैकी हिजडे गळ्यात कवडयाची माल घालून देवीचे, खंडोबाचे भक्त
स्वतःस म्हणवितात त्याच्या मनातील दुःखाचा, त्यांच्या संसाराचा निर्देश तुकोबांनी मोठ्या मार्मिकतेने वरील
काही अभंगातून केलेला आहे
खरोखरच चुकून फसली गेली आहे मनातूनच लौकिकाला विटून देवाच्या दारी आलेली आहे मनात
ईश्वरप्रेम दाटून आले आहे अशा सौरीबद्दल तुकोबाच्या मनात नक्की आस्था आहे, किंवा एखाद्या वेळेस वाकडे
पाऊल पडले असेल, पण आता पश्चात्तापाने दग्ध झाल्यावर जर ईश्वरभक्तीची जोड मिळाली तर सौरी सौरी राहू नये
असाही या अभंगाच्या मागचा हेतू असावा 'सौरी' सुद्धा शुद्ध भाव धरून ईश्वरकृपेस पात्र होऊ शकते अशी
उदाहरणे पिंगळा, कान्होपात्रा इत्यादी पतित समजल्या जाणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीतीलच माहीत काय ?
'सौरी'वर एकनाथ, ज्ञानेश्वर यांसारख्या संतांनीही पद्यरचना केलेली आहे ज्ञानेश्वरांच्या 'सौरीने' 'होय
सौरी आता उघडा घाली माथा । परपुरुषां रमल्या वाई त्याची पतिव्रता' असे म्हटले आहे दुसरी एक सौरी म्हणते,
'धर्मास्तव झालों सोरा । मेलों पंढरपुरा । संत सनकादिका मेळीं ठोर वाईला पुरा-।' या शब्दांतून सौरीचे पश्चात्ताप-
युक्त अंतःकरण स्पष्ट दिसते परंतु एकनाथतुकारामांनी सौरीचे धाष्ट्र्य व फसवे चाळेही वर्णन केले आहेत
मुसलमानी सत्तेत नाना आपत्ती स्त्री जातीवर आल्या 'मी मुल्लाची कन्यका झाले वाढविली घरीं । देखतां देखतां
उचलून नेली चोरी ॥ सौरी झाले बाई आता करू तरी बाई ?' असे अगतिक होऊन एक सौरी म्हणत आहे, तर
दुसरीचे वर्णन पाहा कसे आहे ते ' येणी फणी वानाळ कुंकू केला टाकनटिका । बांधुनि बुचडा उघडा माथा
विभूतीचा पट्टा । आला गेला म्हटला नाहीं धरल्या चारी वाटा । जानी भ्रष्ट झाली सौरी हिंडे दारोदारीं ॥' अशाच
सौरीचे तुकोबांनीही वरील काही अभंगात वर्णन केलेले दिसून येईल सारांश, वरवरच्या सोंगपेक्षा, देखाव्यापेक्षा,
अंतरंगातील भावभक्तीला महत्त्व आहे ती जर असेल तर 'सौरी'ला सुद्धा आयुष्याचे सार्थक करता येण्यासारखे आहे
वाघा-अभंग १
४६६ अनंत जुगाचा देव्हारा । निजबोधांचा घुमारा ।
अवचिता भरला वारा । या मल्हारी देवाचा ॥ १ ॥
शुद्धसत्त्वाचा कवडा मोठा । बोधबिरडें वाघला गांठा ।
गळां वैराग्याचा पट्टा । वाटा दावूं या भक्तीच्या ॥ २ ॥
सार्थ तुकारामगाथा २४५
४६८ तुम्ही तरी सांगा कांहीं । आम्हांविशीं रखुमाबाई ॥ १ ॥
कांहीं उरले तें ठायीं । वेगीं पाठवूनी देईं ॥ २ ॥
टोकत बैसलो देखा । इच्छीतसे ग्रासा एका ॥ ३ ॥
प्रेम देउनि बहुडा जाला । तुका म्हणे विठ्ठल बोला ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- टोकत-टुकुटुकू बघत, बहुडा-बदली
अर्थ - रुक्मिणी आई, रखुमाई, तुम्ही तरी या विठ्ठलास आमच्याबद्दल काही सांगा ना १ काही उरले
असेल तर सत्वर पाठवून द्या ना आमच्यासाठी २ पाहा ना मी कसा तुमच्याकडे टुकुटुकू पाहात बसलो आहे.
एकाच घासाची इच्छा धरून मी आहे. ३ प्रेमभक्ती देऊन मी या पाडुरंगास बदली म्हणून घेतले आहे. तुकाराम
महाराज म्हणतात, या विठ्ठलाचा जयजयकार करा ना ४
४६९ वाट पाहें वाहे निडळीं ठेवुनियां हात । पंढरीचे वाटे दृष्टि लागले चित्त ॥ १ ॥
कईं येतां देखें माझा मायबाप । घटिका बोटें दिवस लेखीं धरुनियां माप ॥ २ ॥
डावा डोळा लवे उजवी स्फुरते बाहे । मन उताविल भाव सांडुनियां देहे ॥ ३ ॥
सुखसेजे गोडचित्तीं न लगे आणीक । नाठवे घर दार तान पळाली भूक ॥ ४ ॥
तुका म्हणे धन्य दिवस ऐसा तो कोण । पंढरीचे वाटे येतां मूळ देखेन ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - वाहे-डोलावतो, निडळीं-कपाळावर, बाहे-बाहू, मूळ-आमंत्रण
अर्थ :- मी कपाळावर हात ठेवून या विठ्ठलाची वाट पाहात आहे माझी दृष्टी पंढरीच्या वाटेस लागली
असून माझ्या चित्तात तोच एक विषय आहे १ हा माझा विठ्ठल मायबाप आलेला मी कधी बरे पाहीन ? घटिका,
बोटे वगैरेंच्या साहाय्याने मी दिवस मोजून, लिहून ठेवीत आहे. २ मला शकुनही फार चांगले होत आहेत डावा
डोळा लवंत आहे आणि उजवा हात स्फुरण पावत आहे माझे मन उतावीळ बनून देह सोडून जणू भावभक्तीने त्याला
भेटायला निघाले आहे. ३ सुखाच्या शय्येवर मला काहीही गोड लागत नाही. मला घरदारसुद्धा आठवत नाही
माझी तहानभूक पळून गेली आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, असा धन्यतेचा दिवस कधी उगवेल ? पंढरपूरच्या
वाटेचे आमंत्रण मला केव्हा येईल ? तो पंढरीराणा मला केव्हा बोलावील ? ५
४७० तुझें दास्य करूं आणिका मागों खावया ।
धिग् १ जाले जिणे माझें पंढरीराया ॥ १ ॥
काय गा विठोबा तुज म्हणावें ।
थोराच्या दैवे गोड शुभअशुभ ॥ २ ॥
संसाराचा धाक निरंतर आम्हांसी ।
मरण भले परि काय अवकळा तैसी ॥ ३ ॥
तुझे शरणागत शरण जाऊं आणिकांसी ।
तुका म्हणे कवणा लाज हे कां नेणसी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- आणिका-दुसऱ्याना
अर्थ - देवा, तुझी भक्ती आम्ही करावी, तुझे दास्य करावे व खायला मात्र दुसऱ्याना मागावे असे माझे
जगणे पंढरीनाथा, धिक्कारयुक्त बनले आहे. १ विठोबा, तुला म्हणावे तरी काय ? तुझ्यासारख्या थोराच्या
सहवासात सर्व शुभ अथवा अशुभ आम्हाला गोडच आहे. २ देवा, या संसाराची धास्ती आम्हास निरंतर
असते. आणि या संसारात अशी दशा प्राप्त झाली आहे की ती अवस्था पाहून मरण बरे असे वाटावे. ३ तुकाराम
१ धन्य जिणे झाले
२४४ सार्थ तुकारामगाथा
हृदय कोटवा सागातें । घोळ वाजवू अनुहाते ।
ज्ञानभंडाराचे पोते । रिते नव्हे कल्पातीं ॥ ३ ॥
लक्ष चौऱ्याशीं घरे चारी । या जन्माची केली वारी ।
प्रसन्न जाला देव मल्हारी । सोहंभाव्यों राहिलो ॥ ४ ॥
या देवाचे भरता वारे । अगीं प्रेमाचे फेंपरे ।
गुरुगुरु करी वेडे चारे । पाहा तुके भुकविले ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - जुगाचा-युगाचा, घुमारा-संचार बिरडें-माळ कोटबा-लाकडी भिक्षापात्र, घोळ-वाद्य
अर्थ - अनंत युगाचा देव्हारा मी मांडला आहे यात निजबोधाचा संचार झालेला आहे या मल्हारी
देवाचा भाव अप्रतिहतपणे यात भरून राहिला आहे १ शुद्ध सत्याची मोठी कवडी येथे असून बोधाच्या माळेची
गाठ पक्की आहे गळध्यात वैराग्याचा पट्टा आहे आणि हा वाघ्या भक्तीच्या वाटा दाखवीत उभा आहे २ याने
आपल्याबरोबर हृदयरूपी लाकडी भिक्षापात्र घेतले आहे घटाच्या घोषाने हा जणू अनुहाताचा नादच करीत आहे
याच्या ज्ञानभांडाराचे पोते कल्पान्तीही कधी रिकामे होणारे नाही ३ चौऱ्यांशी लक्ष योनीत जन्म घेऊन या
माणसाच्या जन्मी याने चार घराची वारी केली आहे व त्यामुळे याला मल्हारी देव प्रसन्न झाला आहे, म्हणून तो
सोहम्भाव धारण करून आहे ४ या मल्हारी देवाचे वारे अंगात भरताच अंगात प्रेमाचे फेंफरे येते गुरुगुरु
करून वेडे चाळे केले तेव्हा त्याची गुरुभक्ती पाहून तुकारामाने त्यास बोलते केले आहे ५
विवरण - वाघ्या हा खंडोबाचा भक्त मुरळीबरोबर असतो देवीचे जसे गोंधळी, भुत्ये तसेच खंडोबाचे,
मल्हारीचे हे वाघे खांद्यावर घोंगडी, गळ्यात वाघाच्या कातड्याची भंडाऱ्याने भरलेली पिशवी असा हा वाघ्या
मल्हारीची गाणी गात हिंडत असतो वाघ्या व मुरळी ही खंडोबास अर्पण केलेली असतात मुलगा वाघ्या होतो
मुलगी मुरळी होते नवसास खंडोबा पावल्यास ही मुले देवास अर्पण करण्याची चाल असे वाघ्या स्वतःस खंडोबाचे
कुत्रे समजून गुरगुर आवाज काढतात याही अभंगात 'गुरुगुरु करी वेडे चारें' म्हणून तुकोबांनी उल्लेख केलेला
आहेच या वाघ्याच्या रूपावर एकनाथांनी काही भारूडे रचली आहेत 'अह वाघ्या सोह वाघ्या प्रेमनगरा वारी।
सावध होऊनि भजनी लागा । देव करा कंवारी' अस एकनाथांचा वाघ्या म्हणत आहे या वाघ्यांनी व मुरळ्यांनी
खंडोबाच्या भक्तीचा प्रसार महाराष्ट्रात केला असला तरी त्याच्या वागणुकीविषयी लोकांच्या मनात सदैव शंका
असे तुकोबांनी सोरी च्या निमित्तान देवदासीचे अंतरंग स्पष्ट केलेले आहेच
लळित - अभंग ११
४६७ आजी दिवस जाला । धन्य सोनियाचा भला ॥ १ ॥
झाले सत्ताचे पंगती । बरवे भोजन निगुती ॥ २ ॥
रामकृष्णनामें । बरवीं मोहियेली प्रेमें ॥ ३ ॥
तुका म्हणे आला । चवी रसाळ हा काला ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - लळित-देवाच्या उत्सवप्रसंगा शेवटी सोंगे वगैरे आणून कीर्तन करतात ते, निगुती-
सावधतेने
अर्थ - आज मोठ्या धन्यतेचा दिवस उगवला आहे हा सोन्याचाच दिवस आहे १ आज सताच्या
पंगतीचे भोजन सावकाशपणे झाले २ रामकृष्ण या नामस्मरणाने सर्व वातावरण मोठ्या प्रेमाने मोहित होऊन
गेले ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा भोजनसमारंभाचा कालाही ईश्वरी प्रसादाच्या चवीने मोठा रसाळ
झाला आहे ४
सार्थ तुकारामगाथा २४५
४६८ तुम्ही तरी सांगा कांहीं । आम्हांविशीं रखुमाबाई ॥ १ ॥
कांहीं उरलें तें ठायीं । वेगीं पाठवुनी देईं ॥ २ ॥
टोकत बैसलों देखा । इच्छीतसें ग्रासा एका ॥ ३ ॥
प्रेम देउनि यहुडा जाला । तुका म्हणे विठ्ठल बोला ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- टोकत-टुकुटुकू बघत, बहुडा-बदली.
अर्थ :- रुक्मिणी आई, रखुमाई, तुम्ही तरी या विठ्ठलास आमच्याबद्दल काही सांगा ना. १ काही उरले
असेल तर सत्वर पाठवून द्या ना आमच्यासाठी. २ पाहा ना मी कसा तुमच्याकडे टुकुटुकू पाहात बसलो आहे.
एकाच घासाची इच्छा धरून मी आहे. ३ प्रेमभक्ती देऊन मी या पांडुरंगास बदली म्हणून घेतले आहे. तुकाराम
महाराज म्हणतात, या विठ्ठलाचा जयजयकार करा ना. ४
४६९ वाट पाहें बाहे निडळीं ठेवुनियां हात । पंढरीचे वाटे दृष्टि लागलें चित्त ॥ १ ॥
कईं येतां देखें माझा मायबाप । घटिका घोटें दिवस लेखीं धरुनियां माप ॥ २ ॥
डावा डोळा लवे उजवी स्फुरते बाहे । मन उताविल भाव सांडुनियां देहे ॥ ३ ॥
सुखसेजे गोडचित्तीं न लगे आणीक । नाठये घर दार तान पळाली भूक ॥ ४ ॥
तुका म्हणे धन्य दिवस ऐसा तो कोण । पंढरीचे वाटे येतां मूळ देखेन ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- बाहे-बोलावतो, निडळीं-कपाळावर, बाहे-बाहू, मूळ-आमंत्रण.
अर्थ :- मी कपाळावर हात ठेवून या विठ्ठलाची वाट पाहात आहे. माझी दृष्टी पंढरीच्या वाटेस लागली
असून माझ्या चित्तात तोच एक विषय आहे १ हा माझा विठ्ठल मायबाप आलेला मी कधी बरे पाहीन ? घटिका,
बोटे वगैरेंच्या साहाय्याने मी दिवस मोजून, लिहून ठेवीत आहे. २ मला शकुनही फार चांगले होत आहेत. डावा
डोळा लवत आहे आणि उजवा हात स्फुरण पावत आहे. माझे मन उतावीळ बनून देह सोडून जणू भावभक्तीने त्याला
भेटावला निघाले आहे. ३ सुखाच्या खाटेवर मला काहीही गोड लागत नाही. मला घरदारसुद्धा आठवत नाही.
माझी तहानभूक पळून गेली आहे. ४ तुकाराम महाराज म्हणतात, असा धन्यतेचा दिवस कधी उगवेल ? पंढरपूरच्या
वाटेचे आमंत्रण मला केव्हा येईल ? तो पंढरीराणा मला केव्हा बोलाविल ? ५
४७० तुझें दास्य करूं आणिका मागों खावया ।
धिग्¹ जालें जिणें माझें पंढरीराया ॥ १ ॥
काय गा विठोबा तुज म्हणावें ।
थोराच्या दैवें गोड शुभअशुभ ॥ २ ॥
संसाराचा धाक निरंतर आम्हांसी ।
मरण भलें परि काय अयफळा तैसी ॥ ३ ॥
तुझे शरणागत शरण जाऊं आणिकांसी ।
तुका म्हणे कवणा लाज हें कां नेणसी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- आणिकां-दुसऱ्याना.
अर्थ :- देवा, तुझी भक्ती आम्ही करावी, तुझे दास्य करावे व खायला मात्र दुसऱ्यांना मागावे. असे माझे
जगणे पंढरीनाथा, धिक्कारयुक्त बनले आहे. १ विठोबा, तुला म्हणावे तरी काय ? तुझ्यासारख्या थोराच्या
सहवासात सर्व शुभ अथवा अशुभ आम्हांला गोडच आहे. २ देवा, या संसाराची धास्ती आम्हांस निरंतर
असते. आणि या संसारास अशी दशा प्राप्त झाली आहे की ती अवस्था पाहून मरण बरे असे वाटावे. ३ तुकाराम
१ धन्य जिणे झाले
२४६ सार्थ तुकारामगाथा
महाराज म्हणतात, देवा, आता दुसऱ्या देवांना मी शरण जाऊ काय ? देवा, ही लज्जेची गोष्ट आहे हे तुम्ही जाणीत
नाही काय ? ४
४७१ पुरविली आळी । जे जे केली ते ते काळीं ॥ १ ॥
माय तरी ऐसी सांगा । कृपाळुवा पांडुरंगा ॥ २ ॥
घेतलें नुतरी उचलोनि कडियेवरी ॥ ३ ॥
तुका म्हणे घास । मुखीं घाली ब्रह्मरस ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - आळी-हट्ट, कृपाळुवा-अत्यंत कृपाळू, नुतरी-न उत्तरी
अर्थ :- देवा, ज्या ज्या वेळीं जो जो हट्ट केला तो तो तू पुरविलास. १ विठ्ठला, जन्म देणारी प्रत्यक्ष आई
तरी एवढी कृपाळू असते का कधी ? २ देवा, तू आता मला उचलून काडेवर घेतले आहेस आता मी कांही खाली
उतरणार नाहीं. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठलाने माझ्या मुखात ब्रह्मरसाचा घास घातला आहे. ४
४७२ कथेची सामग्री । देह अवसानावरी ॥ १ ॥
नको जाऊं देऊं भंगा । गात्रें माझीं पांडुरंगा ॥ २ ॥
आयुष्य करों उणें । परी मज आवडो कीर्तन ॥ ३ ॥
तुका म्हणे हानी । या वेगळी मना नाणीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- अवसानावरी-सपल्यावर, गात्रे-अवयव, नाणीं-न आणी
अर्थ :- देवाचे कथाकीर्तन ऐकल्याचा उपयोग देह संपल्यावर लाभदायक आहे. १ देवा, तुझी कथा
ऐकता यावी म्हणून माझे सर्व अवयव शेवटपर्यंत शाबूत ठेवा. त्यांचा भंग करू नकोस. २ देवा, माझे आयुष्य
वाटले तर कमी कर, पण माझी कीर्तनाची आवड मात्र वाढीस लागू दे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, जर
कीर्तनाची आवड माझी कमी झाली तर त्यावेगळी दुसरी मोठी हानी नाही असेच माझ्या मनात येईल ४
४७३ गळित झाली काया । हेचि ललित पंढरिराया ॥ १ ॥
आलें अवसानापासीं । रूप राहिलें मानसीं ॥ २ ॥
पाहिला कळस । तेथें स्थिरावला रस ॥ ३ ॥
तुका म्हणे गोड जालें । नारायणीं पोट धाले ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- गळित-थकलेली, पाहिला-पहिला
अर्थ - देवा, माझे शरीर आता थकले आहे रे. आता हेच ललित समजायचे काय ? १ माझा आता देह-
पतनाचा शेवट जवळ आला असून माझे चित्त मात्र तुझ्याच रूपावर जडून राहिले आहे. २ आता दुरूनच मी तुझ्या
मंदिराचा कळस पाहिला. त्याच स्थानावर माझा भक्तिभाव स्थिरावून राहिला आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात,
या नारायणात सर्व वृत्ती स्थिरावल्यामुळे सारेच गोड गोड होऊन गेले पोट भरून राहिले. ४
४७४ रत्नजडित सिंहासन । वरी बैसले आपण ॥ १ ॥
कुंचे ढळती दोहीं बाहीं । जबळी रखुमाई राही ॥ २ ॥
नाना उपचारीं । सिद्धि डोळगती कामारी ॥ ३ ॥
हातीं घेऊनि पादुका । उभा बंदिजन तुका ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :-कुंचे-चवऱ्या, बोळगती-तत्पर आहेत, कामारी-काम करणारी
अर्थ :- या रत्नजडित सिंहासनावर स्वतः पंढरीनाथ बसला आहे. १ दोन्ही बाजूनी चवऱ्या ढळत
आहेत. जवळच राहीरुखमाई उभ्या आहेत २ नाना प्रकारचे उपचार करीत अनेक सिद्धी काम करण्यास तत्पर
झाल्या आहेत. ३ अशा वेळी स्वामीच्या पादुका घेऊन तुकोबा सेवकासारखा उभा आहे. ४
सार्थ तुकारामगाथा २४७
४७५ हिरा शोभला कोंदणीं । जडित माणिकांची खाणी ॥ १ ॥
तैसा दिसे नारायण । मुख सुखाचें मंडण ॥ २ ॥
कोटि चंद्रलीळा१ । पूर्णिमेच्या पूर्णकळा ॥ ३ ॥
तुका म्हणे दृष्टि धाये । परतोनि माघारी तें न ये ॥ ४ ॥
शब्दार्थ वटीपा :- धाये-संतुष्ट होते.
अर्थ :- रत्नजडित कोंदणात एखादा हिरा शोभून दिसावा, किंवा खाणीत माणीक शोभून दिसावे, १
तसा हा नारायण शोभून दिसतो आहे सर्व सुखाने हे श्रीमुख तेजस्वी व शोभिवंत दिसत आहे. २ पौर्णिमेच्या
कोटी चंद्रांच्या कळा याच्यापुढे फिक्याच वाटतील. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या सुंदर मूर्तीकडे पाहताच
दृष्टी सुखावून गेली आहे. ती तेथून परत माघारी फिरतच नाही. ४
४७६ पतित पतित । परी मी त्रियाचा पतित ॥ १ ॥
परी तूं आपुलिया सत्ता । मज करावे सरता ॥ २ ॥
नाहीं चित्तशुद्धि । स्थिर पायांपाशीं बुद्धि ॥ ३ ॥
अपराधाचा फेलो । तुका म्हणे किती बोलों ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- सरता-परिपूर्ण, त्रियाचा-तीन वेळा.
अर्थ:- देवा, मी पतित आहे असे त्रिवार, तीन वेळा मी म्हणत आहे. १ पण तू तुझी सत्ता गाजवून
मला परिपूर्ण करावे माझे पाप दूर करावे २ माझे चित्त शुद्ध नाही. तुझ्या पायांशी बुद्धिही स्थिर होत नाही. ३
देवा, मी अपराधाचाच जणू बनलो आहे आणखी तुला सांगू तरी किती ? ४
४७७ उभारिला हात । जगीं जाणविली मात ॥ १ ॥
देव बैसले सिंहासनीं । आल्या याचका होय२ धनी ॥ २ ॥
एकाच्या केंवाडें । उगवे बहुतांचें कोडें ॥ ३ ॥
दोहीं ठायीं तुका । नाहीं पडों देत चुका ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - केंवाडे-कैवारे, अंगीकार
अर्थ:- या देवाने अभयासाठी हात वर केला आहे. सर्व जगात ही गोष्ट समजून आली आहे, १ हा देव
आज सिंहासनावर बसून शोभत आहे. जो याचक भक्त येईल त्याचा तो धनी बनत आहे. २ एकाच्या अंगीकारामुळे
त्याने पुष्कळांना निवारण दिला आहे पुष्कळांच्या आयुष्याचे कोडे सोडविली आहेत. ३ तुकाराम महाराज म्हणतात,
या देवाच्या व त्याच्या भक्ताच्या ठिकाणी मी कधी चुका करीत नाही. किंवा हा चुका करू देत नाही ४
आशीर्वाद-अभंग
४७८-जीवेसाटीं यत्नभाव । त्याची नाव बळकट ॥ १ ॥
पैल तीरा जातां कांहीं । संदेह नाहीं भवनदी ॥ २ ॥
विश्वासाची धन्य जाती । तेथें वस्ती देवाची ॥ ३ ॥
तुका म्हणे भोळियांचा । देव साचा अंकित ॥ ४ ॥
ब्दार्थ व टीपा - सदेह-शंका.
अर्थ :- कोणताही प्रयत्न जीव समर्पण करण्याच्या भावनेने करावा. तरच बळकट नावेचे स्वरूप त्या प्रयत्नास
येते. १ या नावेतून तो पैलतीराला जाईल यात काहीच शंका नाही २ श्रीहरीवर विश्वास ठेवणाऱ्याची जात धन्य
१ चंद्रकला, २ पुरे