सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 406, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 406

३७० सार्थ तुकारामगाथा
संतसंगति सर्वकाळ । थोर प्रेमाचा सुकाळ ॥ ३ ॥
तुका म्हणे नाम । तेणें पुरे माझें काम ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - आन-दुसरे, नेघो-घेणार नाही.
अर्थ - देवा, तुझी चरणसेवा मला दे. एवढेच तुझ्यापाशी माझे मागणे आहे १ दुसरे तू काहीही दिलेस
तरी ते मी घेणार नाही. रिद्धी, सिद्धी किंवा चारही प्रकारच्या मुक्ती मला नको आहेत. २ नेहमी मला संतांचीच
संगत देत जा. त्यांच्याच संगतीत प्रेमाचा मोठा सुकाळ असतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझे एक
नामच मला पुरे आहे. त्यायोगे माझे सर्व काम होईल. ४
७६२ तुझा शरणागत । जन्मोजन्मींचा अंकित ॥ १ ॥
आणीक नेणें कांहीं हेवा । तुजवांचूनि केशवा ॥ २ ॥
हेचि माझें गाणें । तुझें नामसंकीर्तन ॥ ३ ॥
तुझ्या नामाचीं भूषणें । तुका म्हणे ल्यालों लेणें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - हेवा-हाव, ल्यालों-धारण केली.
अर्थ - देवा, मी तुला शरण आलेलो असून मी तुझा जन्मोजन्मींचा सेवक झालो आहे. १ आणखी देवा,
तुझ्या प्राप्तीवाचून मला दुसरी कसलीही हाव नाही. २ तुझे मोठ्या आवडीने नामसंकीर्तन करणे हेच माझे गाणे
आहे ३ तुझ्या नामाची भूषणे देवा, मी मोठ्या प्रीतीने माझ्या अंगावर धारण केली आहेत ४
७६३ उतरलों पार । सत्य झाला हा निर्धार ॥ १ ॥
तुझें नाम धरिले कंठीं । केली संसाराची तुटी ॥ २ ॥
आतां नव्हे बाधा । कोणेविशीं कांहीं कदा ॥ ३ ॥
तुका म्हणे कांहीं । आतां उरलें ऐसें नाहीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - पार-पैलतीर.
अर्थ- देवा, मी या भवसागरातून सुखरूपपणे पैलतीर गाठले आहे. हाच माझा थोर निश्चय आहे. १ तुझे
नाम माझ्या मुखात असल्याने आता संसाराचा लोभ संपल्यासारखाच आहे. २ आता यापुढे कधी कसलीही बाधा
मला होणार नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता काही मिळवावयाचे उरले आहे असे नाही. ४
७६४ क्रियामतिहीन । एक मी गा तुझें दीन ॥ १ ॥
देवा करावा सांभाळ । वारीं माझी तळमळ ॥ २ ॥
नको माझें ठायीं । गुणदोष घालूं कांहीं ॥ ३ ॥
अपराधाच्या कोटी । तुका म्हणे घालीं¹ पोटां ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- क्रियामतिहीन-सत्कृत्य, सुबुद्धी यांच्या खेरीज, वारीं-दूर कर.
अर्थ - देवा, नानाप्रकारची सत्कृत्ये व सुबुद्धी याच्या विरहित असे माझे जीवन आहे. मी एक दीन असा
तुझा दास मात्र आहे १ देवा, तू माझा प्रेमाने सांभाळ करावास. माझ्या मनातील दुःखाची तळमळ तू दूर
कर २ माझ्या ठिकाणी कसलेही गुणदोष तू आता निर्माण करु नकोस ३ माझे कोट्यवधी अपराध असतील
तरी देवा, तू दयावंत होऊन ते पोटात घालावेस. ४
७६५ नाहीं निर्मळ जीवन । काय करील साबण ॥ १ ॥
तेंसी चित्तशुद्धि नाहीं । तेथें बोध करील काई ॥ २ ॥
वृक्ष न धरीं पुष्पफळ । काय करील वसंतकाळ ॥ ३ ॥
१ घाला.