दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
१७ वा. ] सिद्ध. ३८१
१०. सिद्ध.
श्रीगणेशाय नमः ॥ आवरणोदकीं हाटकेश्वर । त्यास न घडे नम-
स्कार । महिमा अत्यंतचि थोर । तया पाताळलिंगाचा ॥ १ ॥ परंतु तेथें
जाववेना । शरीरें दर्शन घडेना । विवेकें आणावें अनुमाना । तया ईश्वरासी
॥ २ ॥ सातां समुद्रांचे वेढे । उदंड भूमि पैलीकडे । शेवटीं तुटले कडे ।
भूमंडळाचे ॥ ३ ॥ सात समुद्र बोलांडावे । तेथें जाणें कैसें फावे । म्हणोनि
विवेकीं असावें । साधुजनें ॥ ४ ॥ जें आपणास नव्हे ठावें । तें जाणत्यास
पुसावें । मनोगतीनें फिरावें । हें तों घडेना ॥ ५ ॥ जें चर्मदृष्टीस नव्हे
ठावें । तें ज्ञानदृष्टीनें पाहावें । ब्रह्मांड विवरोन राहावें । समाधानें ॥ ६ ॥
मध्यें आहे भूमीचें पडळें । म्हणोन आकाश आणि पाताळ । तें पडळ न-
सूतां अंतराळ । चहूंकडे ॥ ७ ॥ तयास परब्रह्म म्हणावें । जें उपाधीवेगळें
स्वभावें । जेथें दृश्यमायेच्या नांवें । शून्याकार ॥ ८ ॥ दृष्टीचें देखणें दृश्य ।
मनाचें देखणें भास । मनातीत निराभास । विवेकें जाणावा ॥ ९ ॥ दृश्य-
भास अवघा बिघडे । विवेकी तेथें पहुंडे । भूमंडळीं ज्ञाते । थोडे सूक्ष्मदृष्टी-
चे ॥ १० ॥ वाच्यांश वाचेनें बोलांवा । न बोलतां लक्ष्यांश जाणावा । नि-
र्गुण अनुभवास आणावा । गुणाचेनि योगें ॥ ११ ॥ नाना गुणांस आहे
नाश । निर्गुण तें अविनाश । डोबळ्याहून विशेष । सूक्ष्म देखणें ॥ १२ ॥
जें दृष्टीस न पडे ठावें । तें ऐकोन जाणावें । श्रवणमननें पडे ठावें । सकळ
कांहीं ॥ १३ ॥ अष्टधेचे जिन्नस नाना । उदंड पाहतां कळेना । अवघें सगत
पिटावेना । कोणी एक ॥ १४ ॥ सगत सारिखी स्थिति झाली । तेथें परी-
क्षाच बुडाली । चवी नेणतां कालविली । नाना अन्नें ॥ १५ ॥ टोणपा
नव्हे गुणग्राहक । मूर्खास कळेना विवेक । विवेक आणि अविवेक । एकचि
म्हणती ॥ १६ ॥ उंच नीच कळेना ज्याला । तेथें अभ्यासचि बुडाला ।
नाना अभ्यासेंविण प्राणियाला । सुटका कैची ॥ १७ ॥ वेड लागोन झाले ओं-
गाळ । त्यांस सारिखेंच वाटे सकळ । ते जाणावे बाष्कळ । विवेकी नव्हेती
॥ १८ ॥ ज्यास अखंड होतो नाश । त्यासीच म्हणती अविनाश । बहूर्च-
१. पृथ्वीला उदकाचें जें आवरण आहे, त्यांत. २. पाताळांतील एक शिवाचें
स्थान. ३. पडदा. ४. विसांवा घेतो. ५. अष्टधा प्रकृतीचे. ६. वाचाळ.
काँचया लोकांस । काय म्हणावें ॥ १९ ॥ ईश्वरें नाना भेद केले । भेदें स-
कळ सृष्टि चाले । आंधळे परीक्षकवंत मिळाले । तेथें परीक्षा कैंची ॥ २० ॥
जेथें परीक्षेचा अभाव । तो टोणपा समुदाय । गुणचि नाहीं गौरवें¹ । येईल
कैंचें ॥ २१ ॥ खरें खोटें एकचि झालें । तरी विवेकानें काय केलें । असार
सांडून सार घेतलें । साधुजनीं ॥ २२ ॥ उत्तम वस्तूची परीक्षा । कैसी घडे
नतद्रक्षा² । दीक्षाहीनापाशीं दीक्षा । येईल कैंची ॥ २३ ॥ आपलेंन वोंग-
ळपणें । दिशा³ करून शौच नेणे । वेदशास्त्रें पुराणें । त्यास काय करिती ॥
२४ ॥ आधीं राखावा आचार । मग पाहावा विचार । आचार विचारें पैल-
पार । पाविजेतो ॥ २५ ॥ जें नेमकास न कळे । तें बाष्कळास केव्हीं कळे ।
डोळस ठकती आंधळे । कोणत्या कामाचे ॥ २६ ॥ पाप पुण्य स्वर्ग नरक ।
अवघेंच मानिलें एक । विवेक आणि अविवेक । काय मानावे ॥ २७ ॥
अमृत विष एक म्हणती । परी विष घेतां प्राण जाती । कुकर्मीं होते फ-
जिती । सत्कर्मीं कीर्ति वाढे ॥ २८ ॥ इहलोक आणि परलोक । जेथें नाहीं
साकल्यविवेक । तेथें अवघें निरर्थक । सकळ कांहीं ॥ २९ ॥ म्हणोनि
सत्संगति जावें । वेदशास्त्रांचि श्रवण करावें । उत्तम गुणास अभ्यासावें ।
नाना प्रयत्नें ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके सिद्ध-
निरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी २९७.
दशक अठरावा.
१. बहु देवस्थान⁴.
श्रीगणेशाय नमः ॥ तुज नमूं गजवदना । तुझा महिमाहि कळेना ।
विद्या बुद्धि देसी जनां । लहान थोरांसी ॥ १ ॥ तुज नमूं सरस्वती । चारी
वाचा तुझेनि स्फूर्ती । तुझें निजस्वरूप जाणती । ऐसे थोडे ॥ २ ॥ धन्य
धन्य चतुरानना⁵ । त्वां केली सृष्टिरचना । वेद शास्त्रं भेद नाना । प्रगट
केले ॥ ३ ॥ धन्य विष्णु पालन करिसी । एकांशें सकळ जीवांसी । वाढ-
१. महत्त्व. २. भिकाऱ्यास. ३. शौचविधि. ४. पुष्कळ देवस्थानें. ५. ब्रह्मदेवा.
१८ वा. ] बहु देवस्थान . ३८३
विशीं वर्तविशी । जाणजाणों ॥ ४ ॥ धन्य धन्य भोळा शंकर । जयाच्या
देण्यास नाहीं पार । रामनाम निरंतर । जपत आहे ॥ ५ ॥ धन्य धन्य
इंद्रदेव । सकळ देवांचाहि देव । इंद्रलोकींचें वैभव । काय म्हणोन सांगावें ॥
६ ॥ धन्य धन्य यमधर्म । सकळ जाणती धर्माधर्म । प्राणिमात्रांचें वर्म ।
ठायीं पाडिती ॥ ७ ॥ व्यंकटेशीं महिमा किती । भले उभ्यां अन्न खाती ।
वडे धिरडीं स्वाद घेती । आतळेंस अपालांचा¹ ॥ ८ ॥ धन्य तूं वो बन-
शंकरी । उदंड शाकांचीया हारी । विवरांविवरों भोजन करी । ऐसा कैंचा
॥ ९ ॥ धन्य भीम गोलांगुला³ । कोरवड्यांच्या² उदंड माळा । दहीं वडे
खातां सकळां । समाधान होय ॥ १० ॥ धन्य तूं गा खंडेराया । भंडारें
होय पिंवळी काया । कांदे भरीत रोडगे खाया । सिद्ध होती ॥ ११ ॥ धन्य
तुळजा भवानी । भक्तांस प्रसन्न होते जनीं । गुणवैभवास गणी । ऐसा
कैंचा ॥ १२ ॥ धन्य धन्य पांडुरंगा । अखंड कथेचा होतो धिंगा⁴ । तान
मान राग रंगा । नाना प्रकारीं ॥ १३ ॥ धन्य तूं गा क्षेत्रपाळा । उदंड
जनां लाविला चाळा । भावें भक्ति करितां फळा । वेळ नाहीं ॥ १४ ॥
रामकृष्णादिक अवतार । त्यांचा महिमा अपार । उपासनेस बहुत नर । त-
त्पर झाले ॥ १५ ॥ सकळ देवांचें मूळ । तो हा अंतरात्माचि केवळ । भू-
मंडळीं भोग सकळ । त्यासीच घडे ॥ १६ ॥ नाना देव होऊन बैसला ।
नाना शक्तिरूपें झाला । भोक्ता सकळ वैभवाला । तोचि एक ॥ १७ ॥
याचा पाहतां विचार । उदंड लांबला जोजार । होती जाती देव नर । किती
म्हणोनी ॥ १८ ॥ कीर्ति आणि अपकीर्ती । उदंड निंदा उदंड स्तुती । सर्वत्रांची भो-
गप्राप्ती । अंतरात्म्यासचि घडे ॥ १९ ॥ कोणे देहीं काय करितो । कोणे देहीं काय
भोगितो । भोगी त्यागी वीतरागी तो । एकचि आत्मा ॥ २० ॥ प्राणी साभिमानें
भुलले । देहाकडे पाहत गेले । मुख्य अंतरात्म्यास चुकले । अंतरीं असोनी ॥ २१ ॥
अरे या आत्म्याची चळवळ पाहे । ऐसा भूमंडळीं कोण आहे । अगाध पुण्यें
अनुसंधान राहे । कांहीं एक ॥ २२ ॥ त्या अनुसंधानासारिसें । जळोन जा-
इजे किल्बिषें⁵ । अंतर्निष्ठ ज्ञानी ऐसें । विवरोन पाहती ॥ २३ ॥ अंतर्निष्ठ
तितुके तरले । अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले । बाह्यात्कारें भरंगळले । लोकाचारें
१. एक पक्वान्न. २. उडदांचे पिठाच्या वड्या. ३. हनुमंता. ४. गजर. ५. पापें.
३८४ श्रीदासबोध. [ दशक
॥ २४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके बहुदेवस्थान-
निरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥
२. सर्वज्ञसंग.
श्रीगणेशाय नमः ॥ नेणपणें झालें तें झालें । झालें तें होऊनि गेलें ।
जाणतेपणें वर्तलें । पाहिजे नेमस्त ॥ १ ॥ जाणत्याची संगति धरावी । जा-
णत्याची सेवा करावी । जाणत्याची सद्बुद्धि घ्यावी । हळूहळू ॥ २ ॥ जाण-
त्यापाशीं लिहों शिकावें । जाणत्यापाशीं वाचों शिकावें । जाणत्यापाशीं
पुसावें । सकळ कांहीं ॥ ३ ॥ जाणत्यास करावे उपकार । जाणत्या ऐसें झिज-
वावें शरीर । जाणत्याचा पाहावा विचार । कैसा आहे ॥ ४ ॥ जाणत्याचे संग-
तीनें भजावें । जाणत्याचे संगतीनें झिजावें । जाणत्याचे संगतीनें रिझावें ।
विवरविवरों ॥ ५ ॥ जाणत्यापाशीं गावें गाणें । जाणत्यापाशीं वाजवणें ।
नाना आलाप शिकणें । जाणत्यापाशीं ॥ ६ ॥ जाणत्याच्या कासेस लागावें ।
जाणत्याचें औषध घ्यावें । जाणता सांगेल तें करावें । पथ्य आधीं ॥ ७ ॥
जाणत्यापाशीं परीक्षा¹ शिकणें । जाणत्यापाशीं तालीम करणें । जाणत्यापाशीं
पोहणें । अभ्यासावें ॥ ८ ॥ जाणता बोलेल तैसें बोलावें । जाणता सांगेल
तैसें चालावें । जाणत्याचें ध्यान ध्यावें । नाना प्रकारीं ॥ ९ ॥ जाणत्याच्या
कथा शिकाव्या । जाणत्याच्या युक्ति समजाव्या । जाणत्याच्या गोष्टी विव-
राव्या । सकळ कांहीं ॥ १० ॥ जाणत्याचे पेंच जाणावे । जाणत्याचे पीळ
उकलावे । जाणता राखेल तैसे राखावे । लोक राजी ॥ ११ ॥ जाणत्याचे
जाणावे प्रसंग । जाणत्याचे घ्यावे रंग । जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग । अभ्या-
सावे ॥ १२ ॥ जाणत्याचा साक्षेप² घ्यावा । जाणत्याचा तर्क जाणावा । जा-
णत्याचा उल्लेख³ समजावा । न बोलतांची ॥ १३ ॥ जाणत्याचें धूर्तपण ।
जाणत्याचें राजकारण । जाणत्याचें निरूपण । ऐकत जावें ॥ १४ ॥
जाणत्याचीं कवित्वें शिकावीं । गद्य पद्यें ओळखावीं । माधुर्य वचनें सम-
जावीं । अंतर्यामीं ॥ १५ ॥ जाणत्याचे पाहावे प्रबंध⁴ । जाणत्याचे वचन-
भेद⁵ । जाणत्याचे नाना संवाद । बरे शोधावे ॥ १६ ॥ जाणत्याची तीक्षणता ।
१. कौशल्य. २. प्रयत्न. ३. अभिप्राय. ४. कविता. ५. वाक्चातुर्य.
१८ वा. ] निस्पृह. ३८५
जाणत्याची सहिष्णुता । जाणत्याची उदारता । समजोन घ्यावी ॥ १७ ॥
जाणत्याची नाना कल्पना । जाणत्याची दीर्घसूचना । जाणत्याची विवंच-
ना समजोन घ्यावी ॥ १८ ॥ जाणत्याचा काळ सार्थक । जाणत्याचा अ-
ध्यात्मविवेक । जाणत्याचे गुण अनेक । अवघेच घ्यावे ॥ १९ ॥ जाणत्याचा
भक्तिमार्ग । जाणत्याचा वैराग्ययोग । जाणत्याचा अवघा प्रसंग । समजोन
घ्यावा ॥ २० ॥ जाणत्याचें पाहावें ज्ञान । जाणत्याचें शिकावें ध्यान । जा-
णत्याचें सूक्ष्म चिन्ह । समजोन घ्यावें ॥ २१ ॥ जाणत्याचें अलिप्तपण ।
जाणत्याचें विदेहलक्षण । जाणत्याचें ब्रह्मविवरण । समजोन घ्यावें ॥ २२ ॥
जाणता एक अंतरात्मा । त्याचा काय सांगावा महिमा । विद्या कळा गुण-
सीमा । कोणें करावी ॥ २३ ॥ परमेश्वराचे गुणानुवाद । अखंड करावा
गुणसंवाद । तेणें करितां आनंद । उदंड होतो ॥ २४ ॥ परमेश्वरें निर्मिलें
तें । अखंड दृष्टीस पडतें । विवरविवरों समजावें तें । विवेकी जनीं ॥२५॥
जितुकें कांहीं निर्माण झालें । तितुकें जगदीश्वरें निर्मिलें । निर्माण वेगळें स-
मजलें । पाहिजे आधीं ॥ २६ ॥ तो निर्माण करितो जनां । परी पाहों
जातां दिसेना । विवेकबळें अनुमाना । आणिंत जावें ॥ २७ ॥ त्याचें अ-
खंड लागतां ध्यान । कृपाळूपणें देतो दर्शन । सर्वकाळ संभाषण । तेंदांशेंचि
करावें ॥ २८ ॥ ध्यान धरीना तो अभक्त । ध्यान धरील तो भक्त । सं-
सारापासून तो मुक्त । भक्तांस करी ॥ २९ ॥ उपासनेचे शेवटीं । देवां
भक्तां अखंड भेटी । अनुभवी जाणेल गोष्टी । प्रत्ययाची ॥ ३० ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके सर्वज्ञसंगनिरूपणं नाम द्वितीयः
समासः ॥ २ ॥
३. निस्पृह.
श्रीगणेशाय नमः ॥ दुर्लभ शरीरीं दुर्लभ आयुष्य । याचा करूं नये
नाश । दास म्हणे सावकाश । विवेक पाहावा ॥ १ ॥ न पाहतां उत्तम
विवेक । अवघा होतो अविवेक । अविवेकें प्राणी रंक । ऐसा दिसे ॥ २ ॥
हें आपलें आपण केलें । आळसें उदास नागविलें । वाईट संगतीनें बुड-
१. सहनशीलता. २. दूरदृष्टि. ३. देहाभिमान नसणें. ४. त्यासंबंधांच.
३८६ श्रीदासबोध. [ दशक
विलें । देखत देखतां ॥ ३ ॥ मूर्खपणाचा अभ्यास केला । बाष्कळपणें
घातला घाला । काम चांडाळ उठिला । तरुणपणीं ॥ ४ ॥ मूर्ख आळसी
आणि तरुणा । सर्वांविषयीं दैन्यवाणा । कांहीं मिळेना कोणा । काय
म्हणावें ॥ ५ ॥ जें जें पाहिजे तें तें नाहीं । अन्न वस्त्र तेंहि नाहीं । उत्तम
गुण कांहींच नाहीं । अंतर्यामीं ॥ ६ ॥ बोलतां येइना बैसतां येइना । प्रसंग
कांहींच कळेना । शरीर मन हें वळेना । अभ्यासाकडे ॥ ७ ॥ लिहिणें नाहीं
वाचणें नाहीं । पुसणें नाहीं सांगणें नाहीं । नेमस्तपणाचा अभ्यास नाहीं ।
बाष्कळपणें ॥ ८ ॥ आपणास कांहींच येईना । आणि शिकविलेंहि मानेना ।
आपण वेडा आणि सज्जना । बोल ठेवी ॥ ९ ॥ अंतरीं एक बाहेरी एक ।
ऐसा जयाचा दंडक १ । परलोकाचें सार्थक । कैसें घडे ॥ १० ॥ आपला संसार
नासला । मनामध्यें पस्तावला । तरी मग अभ्यास केला । पाहिजे विवे-
काचा ॥ ११ ॥ एकाग्र करूनियां मन । बळेंच धरावें साधन । यत्नीं
आळसाचें दर्शन । होऊंच नये ॥ १२ ॥ अवगुण अवघेचि सांडावे । उत्तम
गुण अभ्यासावे । प्रबंध पाठ करीत जावे । जाड अर्थे ॥ १३ ॥ पदप्रबंध
श्लोकप्रबंध । नाना घाटी मुद्रा छंद । प्रसंगज्ञानेंचि आनंद । होत आहे ॥ १४ ॥
कोणे प्रसंगीं काय म्हणावें । ऐसें समजोन जाणावें । उगेंच वाउगें शिणावें ।
कासयासी ॥ १५ ॥ दुसऱ्याचें अंतर जाणावें । आदर देखोन म्हणावें । जें
आठवेल तें गावें । तेंचि मूर्खपण ॥ १६ ॥ ज्याची जैसी उपासना । तेंचि
गावें चुकावें ना । रागज्ञान तालज्ञाना । अभ्यासावें ॥ १७ ॥ साहित्य संगीत
प्रसंगमानें । करावी कथेचीं घमशानें २ । अर्थांतर श्रवण मननें । काढीत जावें
॥ १८ ॥ पाठ उदंडचि असावें । सर्वकाळ उजळीत जावें । सांगीतले गोष्टीचें
असावें । स्मरण अंतरीं ॥ १९ ॥ अखंड एकांत सेवावा । ग्रंथमात्र धांडो-
ळावा । प्रतीत येईल तो घ्यावा । अर्थ मनीं ॥ २० ॥ इति श्रीदासबोधे
गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके निस्पृहनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥
४. देहदुर्लभता.
श्रीगणेशाय नमः ॥ देहाकरितां ३ गणेशपूजन । देहाकरितां शारदा४-वंदन ।
१. वागणूक. २. लयलूट. ३. देहाच्या अस्तित्वावर. ४. सरस्वती.
१८ वां. ] 'देहदुर्लभता. ३८७
देहाकरितां गुरु सज्जन । संत श्रोते ॥ १/॥ देहाकरितां कवित्वें चालती ।
देहाकरितां अध्ययनें करिती । देहाकरितां अभ्यासिती । नाना विद्या ॥२॥
देहाकरितां ग्रंथलेखन । नाना लिपी वोळखण । नाना पदार्थ शोधन ।
देहाकरितां ॥ ३ ॥ देहाकरितां महाज्ञानी । सिद्ध साधु ऋषि मुनी । देहा-
करितां तीर्थाटणीं । फिरती प्राणी ॥४॥ देहाकरितां श्रवण घडे । देहाकरितां
मननीं पवाडे । देहाकरितां देहीं आतुडे । परमात्मा ॥५॥ देहाकरितां कर्ममार्ग ।
देहाकरितां उपासनामार्ग। देहाकरितां ज्ञानमार्ग । भूमंडळीं ॥६॥ योगी वीत-
रागी तापसी । देहाकरितां नाना सायासी । देहाकरितां आत्मयासी । प्रग-
टणें घडे ॥७॥ इह लोक आणि परलोक । देहाकरितां सकळ सार्थक । देहा-
विण निरर्थक । सकळ कांहीं ॥८॥ पुरश्चरणें अनुष्ठानें । गोरांजनें धूम्रपानें ।
शीतोष्ण पंचाग्निसाधनें । देहाकरितां ॥ ९ ॥ देहाकरितां पुण्यशीळ । देहा-
करितां पापी केवळ । देहाकरितां अनर्गळ । ५शुचिष्मंत ॥ १०॥ देहाकरितां
अवतारी । देहाकरितां वेषधारी । नाना बंडें पाषांडें करी । देहाकरितां ॥११॥
देहाकरितां विषयभोग । देहाकरितां सकळ त्याग । होती जाती नाना रोग ।
देहाकरितां ॥१२॥ देहाकरितां नवविधाभक्ती । देहाकरितां चतुर्विधामुक्ती ।
देहाकरितां नाना युक्ती । नाना मतें ॥ १३ ॥ देहाकरितां दान धर्म ।
देहाकरितां नाना वर्म । देहाकरितां पूर्वकर्म । म्हणती जनीं ॥१४॥ देहा-
करितां नाना स्वार्थे । देहाकरितां नाना अर्थ । देहाकरितां होइजे व्यर्थ ।
आणि धन्य ॥ १५ ॥ देहाकरितां नाना कळा । देहाकरितां उणा आगळा ।
देहाकरितां जिव्हाळा । भक्तिमार्गाचा ॥ १६ ॥ नाना सन्मार्ग साधनें ।
देहाकरितां तुटती बंधनें । देहाकरितां निवेदनें । मोक्ष लाभे ॥ १७ ॥ देह
सकळांमध्यें उत्तम । देहीं राहिला आत्माराम । सकळां घटीं पुरुषोत्तम ।
विवेकी जाणती ॥१८॥ देहाकरितां नाना कीर्ती । अथवा नाना अपकीर्ती ।
देहाकरितां होती जाती । अवतारमालिका ॥ १९ ॥ देहाकरितां नाना
श्रम । देहाकरितां नाना संभ्रम । देहाचेनि उत्तमोत्तम । भोगिती पदें ॥२०॥
देहाकरितां सकळ कांहीं । देहाविण कांहीं नाहीं । आत्मा विरे ठायींचा
१. प्राप्त होतो. २. वैराग्यशील. ३. भगवत्प्रीत्यर्थ आपणास जाळून घेणें. ४०
आचारशून्य. ५. सदाचारी. ६. दशक ४ पहा. ७. समारंभ.
३८८ श्रीदासबोध. [ दशक
ठायीं । नव्हता जैसा ॥ २१ ॥ देह परलोकींचें तारूं । नाना गुणाचा
आगरू १ । नाना रत्नांचा विचारू । देहाचेनी ॥२२॥ देहाचेनि गायनकळा ।
देहाचेनि संगीतकळा । देहाचेनि अंतर्कळा । ठायीं पडे ॥ २३ ॥ देह ब्रह्मा-
डाचें फळ । देह दुर्लभचि केवळ । परि देहास निवळ । उमजवावें ॥ २४ ॥
देहाकरितां लहान थोर । करिती आपुलाले व्यापार । त्यांहीमध्ये लहान
थोर । कितीएक ॥ २५ ॥ जे जे देह धरोन आले । ते ते कांहीं करून गेले ।
हरिभजनें पावन झाले । किती ५ क ॥ २६ ॥ अष्टधा प्रकृतीचें मूळ । संक-
ल्परूप २ चि केवळ । नाना संकल्प देहफळ । घेऊनि आले ॥ २७ ॥ ४ हरिसं-
कल्प मुळीं होता । तोचि फळीं पाहावा आतां । नाना देहांतरीं तत्त्वता ।
शोधितां कळे ॥ २८ ॥ वेलाचे मुळीं बीज । उदकरूप वेली समज । पुढें
फळामध्यें बीज । मुळींच्या अंशें ३ ॥ २९ ॥ मुळाकरितां फळ येतें । फळा-
करितां मूळ होतें । येणें रीती होत जातें । भूमंडळ ॥३०॥ असो कांहींएक
करणें । कैसें घडे देहाविणें । देह सार्थकीं लावणें । म्हणिजे बरें ॥ ३१ ॥
आत्म्याकरितां देह झाला । देहाकरितां आत्मा तगला । उभययोगें उदंड
चालिला । कार्यभाग ॥३२॥ चोरून गुप्तरूपें करावें । तें आत्म्यास पडे
ठावें । कर्तृत्व याचेनि स्वभावें । सकळ कांहीं ॥ ३३ ॥ देहामध्यें आत्मा
असतो । देह पूजितां आत्मा तोषतो । देह पीडितां आत्मा क्षोभतो । प्रत्यक्ष
आतां ॥ ३४ ॥ देहावेगळी पूजा पावेना । देहाविण पूजा फावेना । जनीं
जनार्दन म्हणोनि जनां । संतुष्ट करावें ॥ ३५ ॥ उदंड प्रगटला विचार ।
धर्मस्थापना तदनंतर । जेथें पूजेसि अधिकार । पुण्यशरीरीं ॥ ३६ ॥ सगट
भजन करूं येतें । परी मूर्खपण अंगीं लागतें । गाढवास पूजितां कळतें ।
काय त्याला ॥३७॥ पूज्य पूजेसि अधिकार । उगेचि तोषवावे इतर । दुखवूं
नये कोणाचें अंतर । म्हणिजे बरें ॥३८॥ सकळ जगदंतरींचा देव । क्षोभतां
राहावया कैंचा ठाव । जनांवेगळा जनांस उपाव । आणिक नाहीं ॥ ३९ ॥
परमेश्वराचे अनंत गुण । मनुष्यें काय सांगावी खुण । परंतु अध्यात्मग्रंथ-
श्रवण । होतां उमजे ॥ ४० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादश-
दशके देहदुर्लभतानिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥
१. खाण. २. स्फूर्तिरूप. ३. वासनेमुळें. ४. ईशसंकल्प. ५. महात्मे.
१८ वा. ] करंटपरीक्षा. ३८९
५. करंटपरीक्षा.
श्रीगणेशाय नमः ॥ धान्य उदंड मोजिलें । घरीं त्या मापें नाहीं भ-
क्षिलें । विवरिल्याविण तैसें झालें । प्राणियासी ॥ १ ॥ पाठ म्हणतां आव-
रेना । पुसतां कांहींच कळेना । अनुभव पहतां अनुमाना-। मध्यें पडे
॥ २ ॥ शब्दरत्नें परीक्षावीं । प्रत्ययाचीं पाहोन घ्यावीं । येर तीं अवघीं
सांडावीं । एकीकडे ॥ ३ ॥ नांव रूप अवघें सांडावें । मग अनुभवास मां-
डावें । सार असार एकचि करावें । हें मूर्खपण ॥४॥ लेखेकें कुशळ समजावें ।
किंवा उगोंचि वाचावें । येणें दृष्टांतें समजावें । कांहीं तरी ॥ ५ ॥ जेथें नाहीं
समजावीस । तेथें अवघी कुसमुस । पुसों जातां वसवस । वक्ता करी
॥ ६ ॥ नाना शब्द एकवटिले । प्रचीतीवीण उपाव केले । परी ते अवघे
व्यर्थ गेले । फैडप्रसंगीं ॥ ७ ॥ पसेवरी वैरणं घातलें । तांतडीनें जातें वो-
दिलें । तेणें पीठ बारीक आलें । हें तों घडेना ॥ ८ ॥ घासामागें घास घे-
तला । अवकाश नाहीं चावायाला । अवघा बोकणा भरिला । पुढें कैसें
॥ ९ । फैडनिशीचें लक्षण । विरंगं जाऊं नेदी क्षण । समस्तांचें अंतःकरण ।
सांभाळीत जावें ॥ १० ॥ सूक्ष्मनामें सुखें घ्यावी । तितुकीं रूपें ओळखावीं ।
ओळखून समजवावीं । श्रोतयांस् ॥ ११ ॥ समस्या पुरतां सुखी होती ।
श्रोते अवघे आनंदती । अवघे क्षणक्षणां वंदिती । गोसावियासी ॥ १२ ॥
समस्यां पुरतां वंदिती । समस्यां न पुरतां निंदिती । गोसावी चिणचिण
करिती । कोण्या हिशेबें ॥ १३ ॥ शुद्ध सोनें पाहून घ्यावें । कसीं लाऊनि
तावावें । श्रवण मननें जाणावें । प्रत्ययासी ॥ १४ ॥ वैद्याची प्रचीती ये-
ईना । व्यथा परती होईना । आणि रागेजावें जाणा । कोण्या हिशेबें ॥१५॥
खोटें कोठेंचि चालेना । खोटें कोणास मानेना । या कारणें अनुमाना । खरें
आणावें ॥ १६ ॥ लिहिणें न येतां व्यापार केला । कांहींएक दिवस चा-
लिला । पुसतां सुरनिस भेटला । तेव्हां खोटें ॥ १७ ॥ सर्व अवघें हिशेबीं
ठावें । प्रत्ययसाक्षीनें बोलावें । मग सुरनिसें काय करावें । सांगाना कां
॥ १८ ॥ स्वयें आपणाचि गुंते । समजावीस कैसी होते । नेणतां कोणीएक
१. पत्रानें. २. समजूत. ३. चारचीं दांत. ४. जात्याचे तोंडचें भरण. ५.
लोकनाकत्वाचें. ६. रिकामा. ७. गूढ प्रश्न. ८. हिशोब तपासणारा अंमलदार.
३९० श्रीदासबोध. [ दशक
ते । आपदां लागती ॥ १९ ॥ बळाविण युद्धास गेला । तो सर्वस्वें नाग-
वला । शब्द ठेवावा कोणाला । कोण कैसा ॥ २० ॥ जें प्रतीतीस आलें
खरें । तेंचि घ्यावें अत्यादरें । अनुभवाविण जीं उत्तरें । तीं फलकटें जाणावीं
॥२१॥ शिकवून जातां राग चढे । परंतु पुढें अद्दल घडे । खोटा निश्चय तात्काळ
उडे । लोकांमध्यें ॥२२॥ खरें सांडून खोटें घेणें । बकध्यानास काय उणें । त्रिभू-
वनीं नारायणें । न्याय केला ॥२३॥ तो न्याय सोडितां शेवटीं । अवघें जगाचि
लागे पाठीं । जनीं भांडभांडोनि हिंपुटी । किती व्हावें ॥२४॥ अन्याय बहुतांस
पुरवले । हें देखिलें ना ऐकलें । वेडें उगेंच भरीं भरलें । असत्याचे ॥ २५ ॥
असत्य म्हणिजे तेंचि पाप । सत्य म्हणिजे स्वरूप । दोहोंमध्यें साक्षेप ।
कोणाचा करावा ॥ २६ ॥ मायेमध्यें बोलणें चालणें साचें । माया नसतां
बोलणें कैंचें । या कारणें निःशब्दांचें । मूळ शोधावें ॥ २७ ॥ वाच्यांश
जाणोन सांडावा । लक्ष्यांश विवरोन घ्यावा । या कारणें निःशब्दमूळाचा
गोवां । आढळना ॥ २८ ॥ अष्टधा प्रकृति पूर्वपक्ष । सांडून अलक्षीं ला-
वावें लक्ष । मननशीळ परम दक्ष । तोचि जाणे ॥ २९ ॥ नाना भूस आणि
कण । एकाचि म्हणणें अप्रमाण । रस सांडून चोइटिया कोण । शाहणा से-
वी ॥ ३० ॥ पिंडीं नित्यानित्यविवेक । ब्रह्मांडीं सारासार अनेक । सकळ
शोधूनियां एक । सार घ्यावें ॥ ३१ ॥ मायेकरितां कोणी एक । अन्वय आणि
व्यतिरेक । ते माया नसतां विवेक । कैसा करावा ॥ ३२ ॥ तत्त्वें तत्त्व
शोधावें । महावाक्यीं प्रवेशावें । आत्मनिवेदनें पावावें । समाधान ॥ ३३ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके करंटपरीक्षानिरूपणं नाम
पंचमः समासः ॥ ५ ॥
६. उत्तम पुरुष.
श्रीगणेशाय नमः ॥ नाना वस्त्रे नाना भूषणें । येणें शरीर शृंगारणे ।
विवेकें विचारें राजकारणें । अंतर शृंगारिजे ॥ १ ॥ शरीर सुंदर सतेज ।
वस्त्रे भूषणें केलें सज्ज । अंतरीं नसतां चातुर्यबीज । कदापि शोभा न पा-
१. हाल भोगतात. २. ढोंगास. ३. कष्टी. ४. शब्दातीत ब्रम्हाचें. ५.
भ्रम, गोंधळ. ६. निरास पावणारी. ७. ब्रह्माचे ठिकाणीं. ८. हा समास शिवाजी
महाराजांस अनुलक्षून लिहिला आहे.
विजे ॥ २ ॥ तुंदे¹ हेकेंड² कठोरवचनी । अखंड बोले साभिमानीं । न्याय
नीति अंतःकरणीं । घेणार नाहीं ॥ ३ ॥ तऱ्हेई³ शीघ्रकोपी सदा । कदापि न
धरी मर्यादा । राजकारण संवादा । मिळोंच नेणे ॥ ४ ॥ ऐसे लोंद⁴ बेह्-
मानी । कदापि सत्य नाहीं वचनीं । पापी अपस्मार⁵ जनीं । राक्षस जाणावे
॥ ५ ॥ समयासारिखा समय येइना । नेम सहसा चालेना । नेम धरितां
राजकारणा । अंतर पडे ॥ ६ ॥ अति सर्वत्र वर्जावें । प्रसंग पाहून चालावें ।
हटनिय्रहीं न पडावें । विवेकी पुरुषें ॥ ७ ॥ बहुतचि करितां हट । तेथें ये-
ऊन पडले तट । कोणी एकाचा शेवट । झाला पाहिजे ॥ ८ ॥ बरें ईश्वर
आहे साभिमानी । विशेष तुळजा भवानी । परंतु विचार पाहोनी । कार्य
करणें ॥ ९ ॥ अखंडचि सावधाना । बहुत काय करावी सूचना । परंतु
कांहींएक अनुमाना । आणिले पाहिजे ॥ १० ॥ समर्थापाशीं बहुत जन ।
राहिला पाहिजे साभिमान । निश्चळ करूनियां मन । लोक असती ॥ ११ ॥
म्लेंच्छ दुर्जन उदंड । बहुतां दिवसांचें माजलें बंड । याकारणें अखंड । सा-
वधान असावें ॥ १२ ॥ सकळ कर्ता तो ईश्वर । तेणें केला अंगिकार ।
तया पुरुषाचा विचार । विरळा जाणे ॥ १३ ॥ न्याय नीति विवेक विचार ।
नाना प्रसंग प्रकार । परीक्षणें परांतर । देणें ईश्वराचें ॥ १४ ॥ महायत्न
सावधपणें । समयीं धारिष्ट धरणें । अद्भुतचि कार्य करणें । देणें ईश्वराचें
॥ १५ ॥ यश कीर्ति प्रताप महिमा । उत्तम गुणांसि नाहीं सीमा । नाहीं
दुसरी उपमा । देणें ईश्वराचें ॥ १६ ॥ देव ब्राह्मण आचार विचार । कितीक
जनांस आधार । सदा घडे परोपकार । देणें ईश्वराचें ॥ १७ ॥ इहलोक प-
रलोक पाहणें । अखंड सावधपणें राहणें । बहुत जनांचें साहणें । देणें
ईश्वराचें ॥ १८ ॥ देवाचा कैपक्ष⁶ घेणें । ब्राह्मणाची चिंता वाहणें । बहुत
जनांस पाळणें । देणें ईश्वराचें ॥ १९ ॥ धर्मस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अ-
वतार । झाले आहेत पुढें होणार । देणें ईश्वराचें ॥ २० ॥ उत्तम गुणांचा
ग्राहक । तर्क तीक्ष्ण विवेक । धर्मस्थापना पुण्यश्लोकें⁷ । देणें ईश्वराचें ॥ २१ ॥
सकळ गुणांमध्यें सार । तजबिजा विवेक विचार । जेणें पाविजे पैलपार ।
१. मस्त. २. एककल्ली. ३. तऱ्हेवाईक. ४. दांडगे. ५. दुःखदायक. ६. कैवार.
७. पुण्यकारक कीर्ति.
३९२ श्रीदासबोध. [ दशक
अरंत्रपरत्रांचा ॥ २२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके उ-
त्तमपुरुषनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥
७. जनस्वभाव.
श्रीगणेशाय नमः ॥ जनाचा लालुची स्वभाव । आरंभींच म्हणती देव ।
म्हणजे मजला कांहीं देईल देव । ऐसी वासना ॥ १ ॥ कांहींच भक्ति केली
नसतां । आणि इच्छिती प्रसन्नता । जैसें कांहींच सेवा न करितां । स्वा-
मीस मागती ॥ २ ॥ कष्टेंविण फळ नाहीं । कष्टेंविण राज्य नाहीं । केल्या-
विण होत नाहीं । साध्य जनीं ॥ ३ ॥ आळसें काम नासतें । हें तों प्रत्य-
यास येतें । कष्टाकडे चुकवितें । हीन जन ॥ ४ ॥ आधीं कष्टाचें दुःख सो-
सिती । ते सुखाचें फळ भोगिती । आधीं आळसें सुखावती । त्यांसि पुढें
दुःख ॥ ५ ॥ इहलोक अथवा परलोक । दोहींकडे सारखाच विवेक । दीर्घ-
सूचनेचें कौतुक । कळलें पाहिजे ॥ ६ ॥ मेळविती तितुकें भक्षिती । ते क-
ठिण काळीं मरोन जाती । दीर्घसूचनेनें वर्तती । तेचि भले ॥ ७॥ इहलोकींचा
संचितार्थ । परलोकींचा परमार्थ । संचितेंविण व्यर्थ । जितेचि मेले ॥ ८ ॥
एकदां मेल्यानें सुटेना । पुनः जन्मोजन्मीं यातना । आपणास मारी वांच-
वीना । तो आत्महत्यारा ॥ ९ ॥ प्रतिजन्मीं आत्मघात । कोणीं करावें
गणित । या कारणें जन्म मृत्यु । केवीं चुके ॥ १० ॥ देव सकळ कांहीं करि-
तो । ऐसें प्राणिमात्र बोलतो । याचे भेटीचा लाभ तो । अकस्मात् झाला
॥ ११ विवेकाचा लाभ घडे । जेणें परमात्मा ठायीं पडे । विवेक पाहतां
सांपडे । विवेकी जनीं ॥ १२ ॥ देव पाहतां आहे एक । परंतु करितो अ-
नेक । त्या अनेकांस ऐक । म्हणों नये कीं ॥ १३ ॥ देवाचें कर्तृत्व आणि
देव । कळला पाहिजे अभिप्राय । कळल्याविण कित्येक जीव । उगेच बोल-
ती ॥ १४ ॥ उगेच बोलती मूर्खपणें । शहाणपण वाढवावयाकारणें । तृप्ती-
लागीं उपाव करणें । ऐसें झालें ॥ १५ ॥ जिहीं उदंड कष्ट केले । ते भाग्य
भोगून गेले । येर ते बोलतचि राहिले । करंटे जन ॥ १६ ॥ करंठ्याचें क-
रंटलक्षण । समजोन जाती विचक्षण । भल्याचें उत्तम लक्षण । करंट्यास
१. इहपरलोकीं. २. दूरदृष्टीचें. ३. देव. ४. चतुर.
१८ वा.] अंतर्देव. ३९३
कळेना ॥ १७ ॥ त्याची पैसावली कुबुद्धी । तेथें कैंची असेल शुद्धी ।
कुबुद्धी तेचि सुबुद्धी । ऐसी वाटे ॥ १८ ॥ मनुष्यें बुद्धीस सांडावें । त्याचें
काय खरें मानावें । तेथें विचाराच्या नांवें । शून्याकार ॥ १९ ॥ विचारें
इहलोक परलोक । विचारें होतसे सार्थक । विचारें नित्यानित्य विवेक ।
पाहिला पाहिजे ॥ २० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके
जनस्वभावनिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥
८. अंतर्देव.
श्रीगणेशाय नमः ॥ ब्रह्म निराकार निश्चळ । आत्मा सविकार चंचळ ।
तयास म्हणती सकळ । देव ऐसें ॥ १ ॥ देवाचा ठावचि लागेना । एक देव
नेमस्त कळेना । बहुत देवीं अनुमानेना । एक देव ॥ २ ॥ म्हणोनि विचार
असावा । विचारें देव शोधावा । बहुत देवांचा गोथा । पडोंच नये ॥ ३ ॥
देव क्षेत्रीं पाहिला । त्यासारिखा धातूचा केला । पृथ्वीमध्यें दंडक चालिला ।
येणें रीती ॥ ४ ॥ नाना प्रतिमादेवांचें मूळ । तो हा क्षेत्रदेवचि केवळ ।
नाना क्षेत्रें भूमंडळ । शोधून पाहावें ॥ ५ ॥ क्षेत्रदेव पाषाणाचा । विचार
पाहतां तयाचा । तंत लागला मुळाचा । अवतारांकडे ॥ ६ ॥ अवतारी देव
संपले । देह धरून वर्तों लागले । त्याहून थोर अनुमानले । ब्रह्मा विष्णु
महेश ॥ ७ ॥ त्या तिन्ही देवांस ज्याची सत्ता । तो अंतरात्माचि पाहतां ।
कर्ता भोक्ता तत्वतां । प्रत्यक्ष आहे ॥ ८ ॥ युगानुयुगें तिन्ही लोक । एक-
ला चालवी अनेक । हा निश्चयाचा विवेक । वेदशास्त्रीं पाहावा ॥ ९ ॥
आत्मा वर्तवितो शरीर । तोचि देव उत्तरोत्तर । जाणीवरूपें कलेवर । विवेकें
वर्तवी ॥ १० ॥ तो अंतर्देव चुकती । धांवा घेऊन तीर्थां जाती । प्राणी
बापुडे कष्टती । देवास नेणतां ॥ ११ ॥ मग विचारिती अंतःकरणीं । जेथें
तेथें धोंडा पाणी । उगेंच वणवण हिंडोनी । काय होतें ॥ १२ ॥ ऐसा
ज्यासि विचार कळला । तेणें सत्संग धरिला । सत्संगें देव सांपडला । बहुत
जनांसी ॥ १३ ॥ ऐशीं हीं विवेकाचीं कामें । विवेकी जाणतील नेमें । अवि-
वेकी भुलले भ्रमें । त्यांस हें कळेना ॥ १४ ॥ अंतरवेधी अंतर जाणे । बाहेर-
१. घोटाळा. २. परिपाठ. ३. शरीर. ४. अंतर्निष्ठ. ५. बहिर्मुख.
३९४ श्रीदासबोध. [ दशक
सुद्धा कांहींच नेणे । म्हणोनि विवेकी शहाणे । अंतर शोधिती ॥ १५॥ विवेका-
विणें जो भाव । तो भावचि अभाव । मूर्खास प्रतिमादेव । ऐसें वचन
॥ १६ ॥ पाहत समजत शेवटास गेला । तोचि विवेकी म्हणावा भला ।
तत्त्वें सांडूनि पावला । निरंजनीं १ ॥ १७ ॥ येर जें आकारासि येतें । तें अव-
घें नासोन जातें । मग गलबल्या वेगळें तें । परब्रह्म जाणावें ॥ १८ ॥ चंचळ
देव निश्चळ ब्रह्म । परब्रह्मीं नाहीं भ्रम । प्रत्ययज्ञानें निष्भ्रम । होइजेतें
॥ १९ ॥ प्रचीतीविण जें केलें । तें अवघें व्यर्थ गेलें । प्राणी कष्टकष्टेंचि मेले ।
कर्मेकचाटें ॥ २० ॥ कर्मावेगळें न व्हावें । तरी देवास कासया भजावें ।
विवेकी जाणती स्वभावें । मूर्ख नेणे ॥ २१ ॥ कांहीं अनुमानलें विचारें ।
देव आहे जगदंतरें । सगुणाकरितां निर्धारें । निर्गुण पाविजे ॥ २२ ॥ सगुण
पाहतां मुळास गेला । सहजचि निर्गुण पावला । संगत्यागें मोकळा झाला ।
वस्तुरूप ॥ २३ ॥ परमेश्वरीं अनुसंधान । लावितां होइजे पावन । मुख्य
ज्ञानेंचि विज्ञान । पाविजेतें ॥ २४ ॥ ऐशीं हीं विवेकाचीं विवरणें । पाहावीं
सुचित्त अंतःकरणें । नित्यानित्यविवेकश्रवणें । जगदुद्धार ॥ २५ ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके अंतर्देवनिरूपणं नाम अष्टमः
समासः ॥ ८ ॥
९. निद्रा.
श्रीगणेशाय नमः ॥ वंदूनियां आदिपुरुष । बोलों निद्रेचा विलास । निद्रा
आलिया सावकाश । जाणार नाहीं ॥ १ ॥ निद्रेनें व्यापिली काया ।
आळस अंगमोडे जांभया । तेणें करितां बैसावया । धीर नाहीं ॥ २ ॥ कड-
कडां जांभया येती । चटाचटां चुटक्या वाजती । डकडकां डुलक्या येती ।
सावकाश ॥ ३ ॥ एकाचे डोळे झांकती । एकाचे डोळे लागती । एक ते
वचकून पाहती । चहूंकडे ॥ ४ ॥ एक उलथोन पडिले । तिहीं ब्रह्मविणे
फोडिले । हुडकांचे तुकडे झाले । शुद्ध नाहीं ॥ ५ ॥ एक टेंकोन बैसले ।
तेथेंचि घोरों लागले । एक उताणे पसरले । सावकाश ॥ ६ ॥ कोणी सुर-
कुंडी घालिती । कोणी कानवैंडे निजती । कोणी चक्रीं फिरती । चहूंकडे
१. उपाधिशून्य ब्रह्मपदीं. २. एका जातीचे वाद्य, त्याचे. ३, कुशीवर.
१८ वा.] श्रोता-अवलक्षण. ३९५
॥ ७ ॥ एक हात हालविती । एक पाय हालविती । एक दांत खाती । क-
केरटें ॥ ८ ॥ एकांचीं वस्त्रें निघोन गेलीं । तीं नागवीं च लोळों लागलीं ।
एकांचीं मुंडाशीं गडबडलीं । चहूं कडे ॥ ९ ॥ एक निजलीं अस्ताव्यस्तें ।
एक दिसती जैशीं प्रेतें । दांत पसरोन जैशीं भूतें । वाईट दिसती ॥ १० ॥
एक वोसणतेचि उठिले । एक अंधारीं फिरों लागले । एक जाऊनि निजले ।
उकिरड्यावरी ॥ ११ ॥ एक मडकीं उतरती । एक भूमि चांचपती । एक
उठोन वाटा लागती । भलतीकडे ॥ १२ ॥ एक प्राणी वोसणती । एक
स्फुंदस्फुंदों रडती । एक खदखदां हांसती । सावकाश ॥ १३ ॥ एक हाका
मारूं लागले । एक बोंबलत उठिले । एक वचकोन राहिले । आपुले ठायीं
॥ १४ ॥ एक क्षणक्षणां खुरडती । एक डोई खाजविती । एक कण्हों लागती ।
सावकाश ॥ १५॥ एकांच्या लाळा गळल्या । एकांच्या पिका सांडल्या । एकीं
लघुशंका केल्या । सावकाश ॥ १६॥ एक राऊतें सोडिती । एक कर्पट डेंकर देती ।
एक खांकरून थुंकती । भलतीकडे ॥ १७ ॥ एक हगती एक ओकिती । एक
खोकती एक शिंकती । एक ते पाणी मागती । निदसुरे ॥ १८ ॥ एक दुः-
स्वप्नें निबुंजेले । एक सुस्वप्नें संतोषिले । एक ते गाढमूर्छी पडिले । सुषुप्ती-
मध्यें ॥ १९ ॥ इकडे उजेडाया झालें । कोणीं पठन आरंभिलें । कोणीं प्रातः-
स्मरामि आरंभिलें । हरिकीर्तन ॥ २० ॥ कोणीं आठविल्या ध्यानमूर्ती ।
कोणी एकांतीं जप करिती । कोणी पाठांतरें उजळिती । नाना प्रकारें ॥ २१॥
नाना विद्या नाना कळा । आपलालया शिकती सकळा । तान मान गायन-
कळा । एक गाती ॥ २२ ॥ मागें निद्रा संपली । पुढें जागृती प्राप्त झाली ।
व्यवसायीं बुद्धि आपली । प्रेरित झाले ॥ २३॥ ज्ञाता तत्त्वें सांडून पळाला ।
तुरियेपलीकडे गेला । आत्मनिवेदनें झाला । ब्रह्मरूप ॥ २४ ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके निद्रानिरूपणं नाम नवमः
समासः ॥ ९ ॥
१०. श्रोता-अवलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ कोणी एक कार्याचा साक्षेपं । कांहीं तरी वडे विक्षेप ।
१. घाबरून. २. अपान वायु. ३. भ्याले. ४. महत्तत्त्व वगैरे. ५. प्रयत्न.
३९६ श्रीदासबोध. [ दशक
काळसाह्य तें आपेंआप । होत जातें ॥ १ ॥ कार्यभाग होत चालिला ।
तेणें प्राणी सुखी झाला । विचारहि सुचों लागला । दिवसेंदिवस ॥ २ ॥
कोणी एक प्राणी जन्मास येतो । कांहीं तरी काळ साह्य होतो । दुःखा-
उपरी सुख देतो । देव कृपाळूपणें ॥ ३ ॥ अवघाचि काळ जरी साजे । तरी
अवघेच होती राजे । कांहीं साजे कांहीं न साजे । ऐसें आहे ॥ ४ ॥ इह-
लोक आणि परलोक । साधतां कोणी एक विवेक । अद्भुत होय स्वाभा-
विक । देणें ईश्वराचें ॥ ५ ॥ ऐकिल्याविण कळलें । शिकविल्याविण शाहाण-
पण आलें । हें देखिलें ना ऐकिलें । भूमंडळीं ॥ ६ ॥ सकळ कांहीं ऐकतां
कळे । कळतां कळतां वृत्ति निवळे । नेमस्त मध्यें आकळे । सारासार ॥ ७ ॥
श्रवण म्हणिजे ऐकावें । मनन म्हणिजे मनीं धरावें । येणें उपायें स्वभावें ।
त्रैलोक्य चाले ॥ ८ ॥ श्रवणाआड विक्षेप येती । नानाजिन्नस सांगों किती ।
सावध असतां प्रत्यय येती । सकळ कांहीं ॥ ९ ॥ श्रवणीं लोक बैसले ।
बोलतां बोलतां एकाग्र झाले । त्या उपरी जे नूतन आले । ते एकाग्र न
होती ॥ १० ॥ मनुष्य बाहेर हिंडून आलें । नाना प्रकारांचें ऐकिलें । उदंड
गलबलूं लागलें । उगें असेना ॥ ११ ॥ प्रसंग पाहोन चालती । ऐसे लोक
थोडे असती । श्रवणीं नाना विक्षेप होती । ते हे ऐका ॥ १२ ॥ श्रवणीं
बैसले ऐकाया । अडों लागलीसे काया । येती कडकडा जांभया । निद्राभरें
॥ १३ ॥ बैसले सुचित्त करूनि मना । परी तें मनचि ऐकेना । मागें होतें
ऐकिलें नाना । तेंचि धरून बैसलें ॥ १४ ॥ तत्पर केलें शरीर । परी मनामध्यें
आणिक विचार । कल्पना कहिपते विस्तार । किती म्हणोन सांगावा ॥ १५ ॥
जें जें कांहीं श्रवणीं पडलें । तितुकें समजोन विवरलें । तरीच कांहीं सार्थक
झालें । निरूपणीं ॥ १६ ॥ मन दिसतें मा धरावें । ज्याचें त्याणें आव-
रावँ । आवरून विवेकें धरावें । अर्थांतरीं ॥ १७ ॥ निरूपणीं येऊन बै-
सला । परी तो उदंड जेवून आला । बैसतांचि कासावीस झाला । तृषा-
क्रांत ॥ १८ ॥ आधीं उदक आणिविलें । घळघळां उदंड घेतलें । तेणें मळ-
मळों लागलें । उठोनि गेला ॥ १९ ॥ कर्पट ढेंकर उचक्या देती । वारा
सरतां मोठी फजिती । क्षणक्षणां उठोन जाती । लघुशंकेसी ॥ २० ॥ दि-
सेनें कासावीस केला । अवघें सांडून धांवला । निरूपणप्रसंग निघोन गेला ।
१८ वा. ] श्रोता-अवलक्षण. ३९७
अखंड ऐसा ॥ २१ ॥ दृष्टांतीं कांहीं अपूर्व आलें । अंतःकरण तेथेंचि रा-
हिलें । कोठवरी काय वाचिलें । कांहीं कळेना ॥ २२ ॥ निरूपणीं येऊन
बैसला । तों विंचवें फणकाविला । कैचें निरूपण झाला । कासावीस
॥ २३ ॥ पोटामध्यें तिडीक उठली । पाठीमध्यें करकें भरलीं<sup>१</sup> । चाळकें<sup>२</sup>
चिकुल्याँ पुळी झाली । बैसवेना ॥ २४ ॥ पिसोळाँ चावून पळाला । तेणें
प्राणी दुश्चित झाला । कोणे नेटें गलबला केला । तेथेंचि धांवे ॥ २५ ॥
विषयी लोक श्रवणीं येती । ते बायकांकडेच पाहती । चोरटे लोक चोरून
जाती । पादरक्षां ॥ २६ ॥ होय नव्हे वाद विवाद । तेणें उदंड झाला खेद ।
शिष्या गाळी अप्रमाद । होतां चुकला ॥ २७ ॥ कोणी निरूपणीं बैसती ।
सावकाश गोष्टी लाविती । हरिदास रें रें करिती । पोटासाठीं ॥२८॥ बहुत जा-
णते मिळाले । एकापुढें एक बोले । लोकांचे आश्चर्य राहिले । कोण जाणे॥२९॥
माझें होय तुझें नव्हे । ऐशी अखंड जनां सवे । न्यायनीति सांडूनि धांवे ।
अन्यायाकडे ॥ ३० ॥ आपल्या थोरपणासाठीं । अचावचा तोंड पिटी ।
न्याय नाहीं तें शेवटीं । परम अन्यायी ॥ ३१ ॥ एकीकडे अभिमान उठे ।
दुसरीकडे उदंड पेटे । ऐसे श्रोते खरे खोटे । कोण जाणे ॥ ३२ ॥ म्हणोनि
जाणते विचक्षण । ते आधींच धरती नेणपण । मूर्ख टोणपा आपण । कां-
हींच नाहीं ॥ ३३ ॥ आपणासून देव थोर । ऐसा जयास कळला विचार ।
सकळ कांहीं जगदंतर । तेंचि राखावें ॥ ३४ ॥ सभेमध्यें कल्होळ झाला ।
शब्द येतो जाणत्याला । अंतरें राखो नाहीं शिकला । कैसा योगी
॥ ३५ ॥ अखंड आपणास सांभाळिती । क्षुल्लकपण येऊं न देती । थोर
लोकांस क्षमा शांती । अगत्य करणें ॥ ३६ ॥ वैर करितां वैरचि वाढे ।
आपणास दुःख भोगणें घडे । म्हणोनि शाहाण्याचें कुर्डे<sup>६</sup> । कळों
आलें ॥ ३७ ॥ अवगुणापाशीं बैसला गुणी । अवगुण कळतो तत्क्षणीं ।
विवेकी पुरुषाची करणी । विवेकें होते ॥३८॥ उपाय पर्याय दीर्घ प्रयत्न ।
विवेकबळें नाना यत्न । करील तयाचें महिमान । तोचि जाणे ॥ ३९ ॥
दुर्जनीं वेढवेढोनि घेतला । बाष्कळ लोकीं घसरिला । विवेकापासून च्येव-
१ लचक. २. चाळकवाऊ. ३. चिखलापासून पायांच्या बोटांस फोड येतात ते.
४. जोडे, वाहणा. ५. मनांतील अभिप्राय. ६. कोडें, मर्म.
३९८ श्रीदासबोध. [ दशक
ला । विवेकी कैसा ॥ ४० ॥ न्याय पर्याय उपाय । मूर्खास हें कळे काय ।
मूर्खाकरितां चिवडा होय । मजालसींचा ॥ ४१ ॥ मग ते शाहणे नीट
करिती । स्वयें साहोनि साहविती । स्वयें करून करविती । लोकांकरवीं
॥ ४२ ॥ पृथ्वीमध्यें उदंड जन । जनांमध्येंचि असती सज्जन । जयांकरितां
समाधान । प्राणिमात्रांसी ॥ ४३ ॥ तो मनोगतांचीं अंगें जाणे । नाना
प्रसंग समय जाणे । संतसालागीं निववूं जाणे । नानाप्रकारें ॥ ४४ ॥ ऐसा
तो जाणता लोक । समर्थ तयाचा विवेक । त्याचें करणें कांहींएक । जनास
कळेना ॥ ४५ ॥ बहुत जनांस चाळवी । नाना मंडळी हालवी । ऐसी हे
समर्थ पदवी । विवेकें होते ॥ ४६ ॥ विवेक एकांतीं करावा । जगदीश-
धारणेनें करावा । लोक आपला आणि परावा । म्हणोंचि नये ॥ ४७ ॥
एकांतीं विवेक ठायीं पडे । एकांतीं यत्न सांपडे । एकांतीं तर्क वावंडे ।
ब्रह्मांडगोळीं ॥ ४८ ॥ एकांतीं स्मरण करावें । चुकलें निधान पडे ठावें ।
अंतरात्म्यासरिसें फिरावें । कांहीं तरी ॥ ४९ ॥ जयास एकांत मानला ।
अवघ्या आधीं कळे त्याला । त्या वेगळा वडीलपणाला । ठावाचि नाहीं ॥५०॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके श्रोता-अवलक्षणनिरूपणं
नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी २८८.
दशक एकोणिसावा.
१. लेखनक्रिया.
श्रीगणेशाय नमः ॥ ब्राह्मणें बाळबोध अक्षर । घडसूनै करावें सुंदर । जें
देखतांचि चतुर । समाधान पावती ॥ १ ॥ वाटोळें सरळ मोकळें । वोतलें
मषीचें काळें । कुळकुळीत ओळी चालिल्या ढाळें । मुक्तामाळा जैशा ॥२॥
अक्षरमात्र तितुकें नीट । नेमस्त पैस काने नीट । आडव्या मात्रा त्याहि
बीट । अर्कुलीं वेलांव्या ॥ ३ ॥ पहिलें अक्षर जें काढिलें । ग्रंथ संपे तों
पाहात गेलें । एक टांकेंचि लिहिलें । ऐसें वाटे ॥ ४ ॥ अक्षरांचें काळेपण ।
१. समुदायाचा. २. चालतो. ३. वळवून. ४. शाईचें. ५. सहज. ६. रेफ.
१९ वा.] लेखनक्रिया. ३९९
टांकाचें ठोंसरपण । तैसेंचि लवण वांकण । सारिखेंचि ॥ ५ ॥ ओळीस
ओळी लागेना । अर्कुलीं मात्रा भेदीना । खालींचे ओळीस स्पर्शेना । अथवा
लंबाक्षर ॥ ६ ॥ पान शिशानें रेखाटावें । त्यावरी नेमेंचि लिहावें । दूर
जवळी न व्हावें । अंतर ओळींचें ॥ ७ ॥ कोठें शोधासि आठलेना । चुकी
पाहतां सांपडेना । गरज केली हें घडेना । लेखकापासुनी ॥ ८ ॥ ज्याचें वय
आहे नूतन । त्यानें लिहावें जपून । जनासि पडे मोहन । ऐसें करावें ॥ ९ ॥
बहु बारीक तरुणपणीं । कामा न ये म्हातारपणीं । मध्यम लिहिण्याची
करणी । केली पाहिजे ॥ १० ॥ भौवतें स्थळ सोडून द्यावें । मध्येंच चम-
चमीत लिहावें । कागद झडतांहि झडावें । नलगोचि अक्षर ॥ ११ ॥ ऐसा
ग्रंथ जपोन लिहावा । प्राणिमात्रास उपजे हेवा । ऐसा पुरुष पाहावा ।
म्हणती लोक ॥ १२ ॥ काया बहुत कष्टवावी । उत्कट कीर्ति उरवावी ।
चटक लावून सोडावी । कांहीं एक ॥ १३ ॥ घट्ट कागद आणावे । जपोन
नेमस्त खळौवे । लिहिण्याचे सांमे असावे । नानापरी ॥ १४ ॥ सुऱ्या
१ कातऱ्या जागाईत । खळी घोटाळी तागाईत । नाना सुरंगमिश्रित ।
जाणोनि घ्यावे ॥ १५ ॥ नाना देशींचे बोरू आणावे । घट्ट बारीकसर
घ्यावे । नाना रंगांचे आणावे । नानाजिनसी ॥ १६ ॥ नानाजिनसी टांक-
तोडणी । नाना प्रकारें रेखाटणी । चित्र विचित्र करणी । सिसेंलोळ्या
॥ १७ ॥ हिंगूळ संग्रहीं असावे । वाळले आँलींतें पाहोनि घ्यावे । सोपे
भिजवून वाळवावे । संग्रह मैषीचे ॥ १८ ॥ तगंटीं इतिश्रीयौ कराव्या ।
बंदरी फळ्या घोटाव्या । नाना चित्रीं चिताराव्या । उंच चित्रे ॥१९॥ नानार
गोफ नाना वासैनें । मेणकापडें सिंदूरवर्णं । पेट्या कुलपें जपणें । पुस्तका-
कारणें ॥ २० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशतिदशके लेखन-
क्रियानिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥
१. तुरटीचे पाण्यांत भिजवून वाळवावे. २. सामान. ३. समास-फळी. ४.
तुरटी. ५. घोटकवडा. ६. कागद चिकट करण्याचें सामान. ७. अलिता. ८. शाईचें.
९. शेवटीं. १०. 'इति श्री...' इत्यादि ग्रंथसमाप्तिसूचक शब्द. ११. वेष्टनें.
४०० श्रीदासबोध. [ दशक
२. विवरण.
श्रीगणेशाय नमः ॥ मागां बोलिले लेखनभेद । आतां ऐका अर्थभेद ।
नाना प्रकारांचे संवाद । समजोन पाहावे ॥ १ ॥ शब्दभेद अर्थभेद । मुद्राभेद
प्रबंधभेद । नाना शब्दांचे शब्दभेद । जाणोनि घ्यावे ॥ २ ॥ नाना आशंका
प्रत्युत्तरें । नाना प्रतीत साक्षात्कारें । जेणेंकरितां जगदंतरें । चमत्कारती
॥ ३ ॥ नाना पूर्वपक्ष सिद्धांत । प्रत्यय पाहावा नेमस्त । अनुमानाचें अस्ता-
व्यस्त । बोलोंच नये ॥ ४ ॥ प्रवृत्ति अथवा निवृत्ति । प्रचीतीविण अवघी
भ्रांती । गळ्यामधील जगज्योती । चेतेल कोठें ॥ ५ ॥ हेतु समजोन उत्तर
देणें । दुसऱ्याचे जीवींचें समजणें । मुख्य चातुर्याचीं लक्षणें । तीं हीं ऐसीं
॥ ६ ॥ चातुर्याविण खटपट । ते विद्याचि फळकूट । सभेमध्यें आट-
वांट । समाधान कैंचें ॥ ७ ॥ बहुत बोलणें ऐकावें । तेथें मौनचि धरावें ।
अल्पचिन्हें समजावें । जगदंतर ॥ ८ ॥ बाष्कळामध्यें बैसों नये । उद्धटासि
तंडों नये । आपणाकरितां खंडों नये । समाधान जनाचें ॥ ९ ॥ नेणपण
सोडूं नये । जाणपणें फुगों नये । नाना जनांचें हृदय । मृदुशब्दें उकलावें
॥ १० ॥ प्रसंग जाणावा नेटका । बहुतांसि जाजूं घेऊं नका । खरें अस-
तांचि नासका । फड होतो ॥ ११ ॥ शोध घेतां आळसों नये । भ्रष्ट-
लोकीं बैसों नये । बैसलें तरी टाकूं नये । मिथ्या दोष ॥ १२ ॥ अंतर
आर्ताचें शोधावें । प्रसंगीं थोडेंचि वाचावें । चटक लावून सोडावें । भल्या
मनुष्यासी ॥ १३ ॥ मजालसींत बैसों नये । समाराधनेसि जाऊं
नये । जातां येळिळेंवाणें होय । जिणें आपुलें ॥ १४ ॥ उत्तम
गुण प्रगटवावे । मग भल्यासि बोलतां फावे । भले पाहोन करावे ।
शोधून मित्र ॥ १५ ॥ उपासनेसारिखें बोलावें । सर्व जन तोषवावे । सगट
बरेपण राखावें । कोणी एकासी ॥ १६ ॥ ठायीं ठायीं शोध घ्यावा ।
मग ग्रामीं प्रवेश करावा । प्राणिमात्र ओळखावा । आसपणें ॥ १७ ॥ उंच
नीच म्हणों नये । सकळांचें निववावें हृदय । अस्तमानीं जाऊं नये । कोठें
तरी ॥ १८ ॥ जगामध्यें जगमित्र । जिव्हेपाशीं असे सूत्र । कोठें तरी स-
१. लोकांचीं मनें. २. प्रपंच. ३. परमार्थ. ४. जगदंतर. ५. व्यर्थ. ६. भ्रम.
७. तक्रार. ८. आळ. ९. रिकाम्या लोकांत. १०. पराधीन.