दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 431, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें३९६ श्रीदासबोध. [ दशक
काळसाह्य तें आपेंआप । होत जातें ॥ १ ॥ कार्यभाग होत चालिला ।
तेणें प्राणी सुखी झाला । विचारहि सुचों लागला । दिवसेंदिवस ॥ २ ॥
कोणी एक प्राणी जन्मास येतो । कांहीं तरी काळ साह्य होतो । दुःखा-
उपरी सुख देतो । देव कृपाळूपणें ॥ ३ ॥ अवघाचि काळ जरी साजे । तरी
अवघेच होती राजे । कांहीं साजे कांहीं न साजे । ऐसें आहे ॥ ४ ॥ इह-
लोक आणि परलोक । साधतां कोणी एक विवेक । अद्भुत होय स्वाभा-
विक । देणें ईश्वराचें ॥ ५ ॥ ऐकिल्याविण कळलें । शिकविल्याविण शाहाण-
पण आलें । हें देखिलें ना ऐकिलें । भूमंडळीं ॥ ६ ॥ सकळ कांहीं ऐकतां
कळे । कळतां कळतां वृत्ति निवळे । नेमस्त मध्यें आकळे । सारासार ॥ ७ ॥
श्रवण म्हणिजे ऐकावें । मनन म्हणिजे मनीं धरावें । येणें उपायें स्वभावें ।
त्रैलोक्य चाले ॥ ८ ॥ श्रवणाआड विक्षेप येती । नानाजिन्नस सांगों किती ।
सावध असतां प्रत्यय येती । सकळ कांहीं ॥ ९ ॥ श्रवणीं लोक बैसले ।
बोलतां बोलतां एकाग्र झाले । त्या उपरी जे नूतन आले । ते एकाग्र न
होती ॥ १० ॥ मनुष्य बाहेर हिंडून आलें । नाना प्रकारांचें ऐकिलें । उदंड
गलबलूं लागलें । उगें असेना ॥ ११ ॥ प्रसंग पाहोन चालती । ऐसे लोक
थोडे असती । श्रवणीं नाना विक्षेप होती । ते हे ऐका ॥ १२ ॥ श्रवणीं
बैसले ऐकाया । अडों लागलीसे काया । येती कडकडा जांभया । निद्राभरें
॥ १३ ॥ बैसले सुचित्त करूनि मना । परी तें मनचि ऐकेना । मागें होतें
ऐकिलें नाना । तेंचि धरून बैसलें ॥ १४ ॥ तत्पर केलें शरीर । परी मनामध्यें
आणिक विचार । कल्पना कहिपते विस्तार । किती म्हणोन सांगावा ॥ १५ ॥
जें जें कांहीं श्रवणीं पडलें । तितुकें समजोन विवरलें । तरीच कांहीं सार्थक
झालें । निरूपणीं ॥ १६ ॥ मन दिसतें मा धरावें । ज्याचें त्याणें आव-
रावँ । आवरून विवेकें धरावें । अर्थांतरीं ॥ १७ ॥ निरूपणीं येऊन बै-
सला । परी तो उदंड जेवून आला । बैसतांचि कासावीस झाला । तृषा-
क्रांत ॥ १८ ॥ आधीं उदक आणिविलें । घळघळां उदंड घेतलें । तेणें मळ-
मळों लागलें । उठोनि गेला ॥ १९ ॥ कर्पट ढेंकर उचक्या देती । वारा
सरतां मोठी फजिती । क्षणक्षणां उठोन जाती । लघुशंकेसी ॥ २० ॥ दि-
सेनें कासावीस केला । अवघें सांडून धांवला । निरूपणप्रसंग निघोन गेला ।