दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 430, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१८ वा.] श्रोता-अवलक्षण. ३९५
॥ ७ ॥ एक हात हालविती । एक पाय हालविती । एक दांत खाती । क-
केरटें ॥ ८ ॥ एकांचीं वस्त्रें निघोन गेलीं । तीं नागवीं च लोळों लागलीं ।
एकांचीं मुंडाशीं गडबडलीं । चहूं कडे ॥ ९ ॥ एक निजलीं अस्ताव्यस्तें ।
एक दिसती जैशीं प्रेतें । दांत पसरोन जैशीं भूतें । वाईट दिसती ॥ १० ॥
एक वोसणतेचि उठिले । एक अंधारीं फिरों लागले । एक जाऊनि निजले ।
उकिरड्यावरी ॥ ११ ॥ एक मडकीं उतरती । एक भूमि चांचपती । एक
उठोन वाटा लागती । भलतीकडे ॥ १२ ॥ एक प्राणी वोसणती । एक
स्फुंदस्फुंदों रडती । एक खदखदां हांसती । सावकाश ॥ १३ ॥ एक हाका
मारूं लागले । एक बोंबलत उठिले । एक वचकोन राहिले । आपुले ठायीं
॥ १४ ॥ एक क्षणक्षणां खुरडती । एक डोई खाजविती । एक कण्हों लागती ।
सावकाश ॥ १५॥ एकांच्या लाळा गळल्या । एकांच्या पिका सांडल्या । एकीं
लघुशंका केल्या । सावकाश ॥ १६॥ एक राऊतें सोडिती । एक कर्पट डेंकर देती ।
एक खांकरून थुंकती । भलतीकडे ॥ १७ ॥ एक हगती एक ओकिती । एक
खोकती एक शिंकती । एक ते पाणी मागती । निदसुरे ॥ १८ ॥ एक दुः-
स्वप्नें निबुंजेले । एक सुस्वप्नें संतोषिले । एक ते गाढमूर्छी पडिले । सुषुप्ती-
मध्यें ॥ १९ ॥ इकडे उजेडाया झालें । कोणीं पठन आरंभिलें । कोणीं प्रातः-
स्मरामि आरंभिलें । हरिकीर्तन ॥ २० ॥ कोणीं आठविल्या ध्यानमूर्ती ।
कोणी एकांतीं जप करिती । कोणी पाठांतरें उजळिती । नाना प्रकारें ॥ २१॥
नाना विद्या नाना कळा । आपलालया शिकती सकळा । तान मान गायन-
कळा । एक गाती ॥ २२ ॥ मागें निद्रा संपली । पुढें जागृती प्राप्त झाली ।
व्यवसायीं बुद्धि आपली । प्रेरित झाले ॥ २३॥ ज्ञाता तत्त्वें सांडून पळाला ।
तुरियेपलीकडे गेला । आत्मनिवेदनें झाला । ब्रह्मरूप ॥ २४ ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके निद्रानिरूपणं नाम नवमः
समासः ॥ ९ ॥
१०. श्रोता-अवलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ कोणी एक कार्याचा साक्षेपं । कांहीं तरी वडे विक्षेप ।
१. घाबरून. २. अपान वायु. ३. भ्याले. ४. महत्तत्त्व वगैरे. ५. प्रयत्न.