दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 433, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें३९८ श्रीदासबोध. [ दशक
ला । विवेकी कैसा ॥ ४० ॥ न्याय पर्याय उपाय । मूर्खास हें कळे काय ।
मूर्खाकरितां चिवडा होय । मजालसींचा ॥ ४१ ॥ मग ते शाहणे नीट
करिती । स्वयें साहोनि साहविती । स्वयें करून करविती । लोकांकरवीं
॥ ४२ ॥ पृथ्वीमध्यें उदंड जन । जनांमध्येंचि असती सज्जन । जयांकरितां
समाधान । प्राणिमात्रांसी ॥ ४३ ॥ तो मनोगतांचीं अंगें जाणे । नाना
प्रसंग समय जाणे । संतसालागीं निववूं जाणे । नानाप्रकारें ॥ ४४ ॥ ऐसा
तो जाणता लोक । समर्थ तयाचा विवेक । त्याचें करणें कांहींएक । जनास
कळेना ॥ ४५ ॥ बहुत जनांस चाळवी । नाना मंडळी हालवी । ऐसी हे
समर्थ पदवी । विवेकें होते ॥ ४६ ॥ विवेक एकांतीं करावा । जगदीश-
धारणेनें करावा । लोक आपला आणि परावा । म्हणोंचि नये ॥ ४७ ॥
एकांतीं विवेक ठायीं पडे । एकांतीं यत्न सांपडे । एकांतीं तर्क वावंडे ।
ब्रह्मांडगोळीं ॥ ४८ ॥ एकांतीं स्मरण करावें । चुकलें निधान पडे ठावें ।
अंतरात्म्यासरिसें फिरावें । कांहीं तरी ॥ ४९ ॥ जयास एकांत मानला ।
अवघ्या आधीं कळे त्याला । त्या वेगळा वडीलपणाला । ठावाचि नाहीं ॥५०॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके श्रोता-अवलक्षणनिरूपणं
नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी २८८.
दशक एकोणिसावा.
१. लेखनक्रिया.
श्रीगणेशाय नमः ॥ ब्राह्मणें बाळबोध अक्षर । घडसूनै करावें सुंदर । जें
देखतांचि चतुर । समाधान पावती ॥ १ ॥ वाटोळें सरळ मोकळें । वोतलें
मषीचें काळें । कुळकुळीत ओळी चालिल्या ढाळें । मुक्तामाळा जैशा ॥२॥
अक्षरमात्र तितुकें नीट । नेमस्त पैस काने नीट । आडव्या मात्रा त्याहि
बीट । अर्कुलीं वेलांव्या ॥ ३ ॥ पहिलें अक्षर जें काढिलें । ग्रंथ संपे तों
पाहात गेलें । एक टांकेंचि लिहिलें । ऐसें वाटे ॥ ४ ॥ अक्षरांचें काळेपण ।
१. समुदायाचा. २. चालतो. ३. वळवून. ४. शाईचें. ५. सहज. ६. रेफ.