दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 422, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१८ वां. ] 'देहदुर्लभता. ३८७
देहाकरितां गुरु सज्जन । संत श्रोते ॥ १/॥ देहाकरितां कवित्वें चालती ।
देहाकरितां अध्ययनें करिती । देहाकरितां अभ्यासिती । नाना विद्या ॥२॥
देहाकरितां ग्रंथलेखन । नाना लिपी वोळखण । नाना पदार्थ शोधन ।
देहाकरितां ॥ ३ ॥ देहाकरितां महाज्ञानी । सिद्ध साधु ऋषि मुनी । देहा-
करितां तीर्थाटणीं । फिरती प्राणी ॥४॥ देहाकरितां श्रवण घडे । देहाकरितां
मननीं पवाडे । देहाकरितां देहीं आतुडे । परमात्मा ॥५॥ देहाकरितां कर्ममार्ग ।
देहाकरितां उपासनामार्ग। देहाकरितां ज्ञानमार्ग । भूमंडळीं ॥६॥ योगी वीत-
रागी तापसी । देहाकरितां नाना सायासी । देहाकरितां आत्मयासी । प्रग-
टणें घडे ॥७॥ इह लोक आणि परलोक । देहाकरितां सकळ सार्थक । देहा-
विण निरर्थक । सकळ कांहीं ॥८॥ पुरश्चरणें अनुष्ठानें । गोरांजनें धूम्रपानें ।
शीतोष्ण पंचाग्निसाधनें । देहाकरितां ॥ ९ ॥ देहाकरितां पुण्यशीळ । देहा-
करितां पापी केवळ । देहाकरितां अनर्गळ । ५शुचिष्मंत ॥ १०॥ देहाकरितां
अवतारी । देहाकरितां वेषधारी । नाना बंडें पाषांडें करी । देहाकरितां ॥११॥
देहाकरितां विषयभोग । देहाकरितां सकळ त्याग । होती जाती नाना रोग ।
देहाकरितां ॥१२॥ देहाकरितां नवविधाभक्ती । देहाकरितां चतुर्विधामुक्ती ।
देहाकरितां नाना युक्ती । नाना मतें ॥ १३ ॥ देहाकरितां दान धर्म ।
देहाकरितां नाना वर्म । देहाकरितां पूर्वकर्म । म्हणती जनीं ॥१४॥ देहा-
करितां नाना स्वार्थे । देहाकरितां नाना अर्थ । देहाकरितां होइजे व्यर्थ ।
आणि धन्य ॥ १५ ॥ देहाकरितां नाना कळा । देहाकरितां उणा आगळा ।
देहाकरितां जिव्हाळा । भक्तिमार्गाचा ॥ १६ ॥ नाना सन्मार्ग साधनें ।
देहाकरितां तुटती बंधनें । देहाकरितां निवेदनें । मोक्ष लाभे ॥ १७ ॥ देह
सकळांमध्यें उत्तम । देहीं राहिला आत्माराम । सकळां घटीं पुरुषोत्तम ।
विवेकी जाणती ॥१८॥ देहाकरितां नाना कीर्ती । अथवा नाना अपकीर्ती ।
देहाकरितां होती जाती । अवतारमालिका ॥ १९ ॥ देहाकरितां नाना
श्रम । देहाकरितां नाना संभ्रम । देहाचेनि उत्तमोत्तम । भोगिती पदें ॥२०॥
देहाकरितां सकळ कांहीं । देहाविण कांहीं नाहीं । आत्मा विरे ठायींचा
१. प्राप्त होतो. २. वैराग्यशील. ३. भगवत्प्रीत्यर्थ आपणास जाळून घेणें. ४०
आचारशून्य. ५. सदाचारी. ६. दशक ४ पहा. ७. समारंभ.