सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

कॉपीराइट समस्या बताएँ

DevanagariHindipublished467 पृष्ठ

इस ग्रन्थ के बारे में

दासबोध महाराष्ट्र के सन्त समर्थ रामदास स्वामी (1608–1681) का मराठी ओवी छन्द में रचित ग्रन्थ है। यह गुरु-शिष्य संवाद के रूप में है और बीस दशकों में बँटा है, जिनमें से प्रत्येक में दस समास हैं। इसमें भक्ति, ज्ञान और वैराग्य के साथ-साथ व्यावहारिक जीवन, प्रयत्न, चतुराई, लोक-संग्रह और नेतृत्व पर भी विस्तार से उपदेश है। मूर्ख और पढ़त-मूर्ख के लक्षण, उत्तम पुरुष और महन्त के लक्षण, तथा राजनीति-विषयक समास इसकी विशेष पहचान हैं।

सूची में इसे हिन्दी टीका सहित बताया गया है, लेकिन स्कैन का मुखपृष्ठ इसे मराठी में छपा 'श्रीदासबोध (श्रीसमर्थांचें चरित्र व शिकवण यांसह)' बताता है। इसे भट आणि मंडळी, बुधवार पेठ, पुणे ने अक्टूबर 1915 में प्रकाशित किया और अच्युत चिंतामण भट ने अपने यशवन्त छापखाने में छापा; मूल्य एक रुपया था।

मराठी उपोद्घात में समर्थ का संक्षिप्त चरित्र है, जिसमें 'श्रीसमर्थप्रताप' की प्रस्तावना और न्यायमूर्ति रानडे के मराठा इतिहास का हवाला देकर बताया गया है कि महाराष्ट्र की सन्त-परम्परा में समर्थ रामदास का स्थान अग्रणी है। पुस्तक 467 पृष्ठों की है।

पृष्ठ 305
स्थायी लिंक
पृष्ठ 305 स्कैन

२७० श्रीदासबोध. [ दशक
शुद्ध वाचावें । चुकों नये ॥ १ ॥ विस्कलित मातृका नेमस्त कराव्या । धो-
ट्या जाणोनि सदृढ धराव्या । रंग राखोन भराव्या । नाना कथा ॥ २ ॥
जाणायाचें सांगतां न ये । सांगायाचें नेमस्त न ये । समजल्याविण कांहींच
न ये । कोणी एक ॥ ३ ॥ हरिकथा निरूपण । नेमस्तपणें राजकारण । वर्ता-
याचें लक्षण । तेंहि असावें ॥ ४ ॥ पुसों जाणे सांगों जाणे । अर्थांतर
करूं जाणे । सकळिकांचें राखो जाणे । समाधान ॥ ५ ॥ दीर्घसूचने आ-
धींच कळे । सावधपणें तर्क प्रबळे । जाणजाणोनि वळे । यथायोग्य ॥ ६ ॥
ऐसा जाणे जो समस्त । तोचि महंत बुद्धिवंत । या वेगळें अंतवंत । सकळ
कांहीं ॥ ७ ॥ ताल वेळ तान मानें । प्रबंध कविता जाड वचनें । मजा-
लैसी नाना चिन्हैं । सुचत जावीं ॥ ८ ॥ जो एकांतास तत्पर । आधीं करी
पाठांतर । अथवा शोधी अर्थांतर । ग्रंथगर्भीचें ॥ ९ ॥ आधींच शिकोन जो
शिकवी । तोचि पावे श्रेष्ठ पदवी । गुंतल्या लोकांस उगवी । विवेकबळें
॥ १० ॥ अक्षर सुंदर वाचणें सुंदर । बोलणें सुंदर चालणें सुंदर । भक्ति
ज्ञान वैराग्य सुंदर । करूनि दावी ॥ ११ ॥ जयास प्रयत्नाचि आवडे ।
नाना प्रसंगीं पवाडे । धीटपणें प्रगटे दडे । ऐसा नव्हे ॥ १२ ॥ सांकडीं-
मध्यें वर्तो जाणे । उपाधीमध्यें मिळों जाणे । अलिप्तपणें राखो जाणे । आ-
पणासी ॥ १३ ॥ आहे तरी सर्वां ठायीं । पाहों जातां कोठेंच नाहीं । जैसा
अंतरात्मा ठायींचा ठायीं । गुप्त जाहला ॥ १४ ॥ त्या वेगळें कांहींच नसे ।
पाहों जातां तो न दिसे । न दिसोन वर्तवीतसे । प्राणिमात्रांसी ॥ १५ ॥
तैसाचि हााहि नानापरी । बहुत जनांसि शाहणे करी । नाना विद्या त्या
विवरी । स्थूळ सूक्ष्म ॥ १६ ॥ आपणाकरितां शाहाणे होती । ते सहजचि
सोयें धरिती । जाणतेपणाची महंती । ऐसी असे ॥ १७ ॥ राखो जाणे
नीति न्याय । न करी न करवी अन्याय । कठिन प्रसंगीं उपाय । करूं जाणे
॥ १८ ॥ ऐसा पुरुष धारणेचा । तोचि आधार बहुतांचा । दास म्हणे रघुना-
थाचा । गुण घ्यावा ॥ १९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकादशदशके
महंतलक्षणनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥
१. अक्षरें. २. दूरवर विचार. ३. सभा. ४. शिरतो. ५. अगत्य. ६. निश्चयी.

पृष्ठ 306
स्थायी लिंक
पृष्ठ 306 स्कैन

११ वा. ] चंचळ नदी. २७१
७. चंचळ नदी.
श्रीगणेशाय नमः ॥ चंचळ नदी गुप्त गंगा । स्मरणें पावन करी जगा ।
प्रचीत रोकडी पहा गा । अन्यथा नव्हे ॥ १ ॥ केवळ अचंचळीं निर्माण
झाली । अधोमुखें बळें चालिली । अखंड वाहे परी देखिली । नाहींच
कोणीं ॥ २ ॥ लवणे वाकाणें भोवरें । उखळया तरंग झरे । लादा लाटा
कातरे । ठायीं ठायीं ॥ ३ ॥ शुष्क जलाचे चळाळ । धारा धबावे खळाळ ।
चिपळया चळक्या भळाळ । चपळ पाणी ॥ ४ ॥ फेनें¹ फुगे हेलावे । सैरा-
वैरा उदक धांवे । थेंब भुईं मोजावे । अणुरेणु किती ॥ ५ ॥ वोसणे वाहती
उदंड । झोलावे दर्कुटे² दगड । खडके बेटें आड । वळसा³ उठे ॥ ६ ॥ मृदु
भूमि तुटोन गेल्या । कठिण तैशाच राहिल्या । ठायीं ठायीं उदंड पाहिल्या ।
सृष्टीमध्यें ॥ ७ ॥ एक ते वाहतचि गेले । एक ते वळशामध्यें पडिले । एक
सांकडींत अडकले । अधोमुखें ॥ ८ ॥ एक आपट आपटोनच गेलीं । एक
चिरड चिरडोनीच मेलीं । कितीएक तीं फुगलीं । पाणी भरलें ॥ ९ ॥ एक
बळाचे निवडिले । ते पोहतचि उगमासि गेले । उगमदर्शनें पवित्र झाले ।
तीर्थरूप ॥ १० ॥ तेथें ब्रह्मादिकांचीं भुवनें । ब्रह्मांडदेवतांचीं स्थानें । उफ-
राटी गंगा पाहतां मिळणें । सकळांस तेथें ॥ ११ ॥ त्या जळाऐसें नाहीं
निर्मळ । त्या जळाऐसें नाहीं चंचळ । आपो⁴नारायण केवळ । बोलिजे त्यासी
॥ १२ ॥ महानदी परी अंतराळीं । प्रत्यक्ष वाहे सर्वकाळीं । स्वर्गमृत्युपा-
ताळीं । पसरली पाहा ॥ १३ ॥ अधोध्र्व अष्टहि दिशा । तिचें उदक करी व-
ळसा⁵ । जाणते जाणती जगदीशा- । सारिखीचि ते ॥ १४ ॥ अनंत पात्रीं
उदक भारिलें । कोठें पाझरपाझरोनि गेलें । कितीएक तें वेंचलेँ । संसारासी
॥ १५ ॥ एकासंगें तें कडवट । एकासंगें तें गुळवट । एकासंगें तिखट । तुरट
खार ॥ १६ ॥ ज्या ज्या पदार्थास मिळे । तेथें तद्रूपचि मिसळे । सखोल
भूमीस तुंबळे⁶ । सखोलपणें ॥ १७ ॥ विषामध्यें विषचि होतें । अमृता-
मध्यें मिळोन जातें । सुगंधीं सुगंध तें । दुर्गंधीं दुर्गंध ॥ १८ ॥ गुणीं अव-
गुणीं मिळे । ज्याचें त्यापरी निवळे । त्या उदकाचा महिमा न कळे । उद-
केंविण ॥ १९ ॥ उदक वाहे अपरंपार । न कळे नदी कीं सरोवर । जळ-
१. फेस. २. पाचोळा. ३. भोंवरा. ४. जलरूप ईश्वर. ५. वेष्टण. ६. सांचतें.

पृष्ठ 307
स्थायी लिंक
पृष्ठ 307 स्कैन

२७२ श्रीदासबोध. [ दशक

वास करून नर। राहिले कितीएक ॥ २० ॥ उगमापैलीकडे गेलें। तेथें परतोनि
पाहिलें। तंव तें पाणीच आटलें। कांहींच नाहीं ॥ २१ ॥ वृत्तिशून्य योगीश्वर।
याचा पाहावा विचार। दास म्हणे वारंवार। किती सांगों ॥ २२ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकादशदशके चंचलनदीनिरूपणं नाम
सप्तमः समासः ॥ ७ ॥
८. अंतरात्मविवरण.
श्रीगणेशाय नमः ॥ आधीं वंदूं सकळ कर्ता। समस्त देवांचा जो भर्ता।
त्याचे भजनीं प्रवर्ता। कोणी तरी ॥ १ ॥ तेणेंविण कार्य न चले।
पडिलें पर्ण तेंहि न हाले। अवघें त्रैलोक्यचि चाले। जयाचेनी ॥ २ ॥ तो
अंतरात्मा सकळांचा। देव दानव मानवांचा। चार खाणी चार वाणींचा।
प्रवर्तक ॥ ३ ॥ तो एकलाचि सकळां घटीं। करी भिन्नभिन्न राहटी।
सकळ सृष्टीची गोष्टी। किती म्हणोन सांगावी ॥ ४ ॥ ऐसा जो गुप्तेश्वर।
त्यास म्हणावें ईश्वर। सकळ ऐश्वर्य थोर थोर। जयाचेनि भोगिती ॥ ५ ॥
ऐसा जेणें वोळखिला। तो विश्वंभराच झाला। समाधि आणि सहज-
स्थितीला। कोण पुसे ॥ ६ ॥ अवघें त्रैलोक्य विवरावें। तेव्हां वर्म पडे
ठावें। अवचटें घबाडें सिणावें। नलगेचि कांहीं ॥ ७ ॥ पाहतां ऐसा कोण
आहे। जो अंतरात्मा विवरोन पाहे। अल्प स्वल्प कळोन राहे। समाधानें
॥ ८ ॥ अरे हें पाहिलेंचि पाहावें। विवरलेंचि मागुती विवरावें। वाचिलेंचि
वाचावें। पुनःपुन्हा ॥ ९ ॥ अंतरात्मा केवढा कैसा। पाहाणाराची कोण
दशा। देखिल्या ऐकिल्या ऐसा। विवेक सांगे ॥ १० ॥ उदंड देखिलें ऐकिलें।
अंतरात्म्यास न वचे पुरवलें। प्राणी देहधारी बाहुलें। काय जाणे ॥ ११ ॥
पूर्णास अपूर्ण पुरवेना। कां जें अखंड विवरेना। विवरतां विवरतां उरेना।
देवावेगळा ॥ १२ ॥ विभक्तपणें नसावें। तरीच भक्त म्हणवावें। नाहीं
तरी व्यर्थचि शिणावें। खटाटोपें ॥ १३ ॥ उगाच घर पाहोन गेला। घर-
धनी नाहीं ओळखिला। राज्यामधूनचि आला। परी राजा नेणे ॥ १४ ॥
देहसंगें विषय भोगिले। देहसंगें प्राणी मिरवलें। देहहत्यांस चुकलें। नवल
१. संकल्पविकल्परहित. २. आधार. ३. पदार्थांत. ४. अदृश्य ईश्वर. ५. पुष्कळ.

पृष्ठ 308
स्थायी लिंक
पृष्ठ 308 स्कैन

११ वा.] उपदेश. २७३
मोठें ॥ १५ ॥ ऐसे लोक अविवेकी । आणि म्हणती आम्ही विवेकी । बरें
ज्याची जैसी टांकी । तैसें करावें ॥ १६॥ मूर्ख अंतर राखो नेणे । म्हणोन
असावे शाहणे । ते शाहणेहि दैन्यवाणे । होऊन गेले ॥ १७॥ अंतरीं ठेवणें
चुकलें । दारोदारीं धुंडूं लागले । तैसें अज्ञानासि झालें । देव न कळे ॥ १८॥
या देवाचें ध्यान करी । ऐसा कोण रे संसारीं । वृत्ति एकदेशी तरी । पवों-
डेल कोठें ॥ १९ ॥ ब्रह्मांडीं दाटले प्राणी । बहुरूपें बहुवाणी । भूगर्भी
आणि पाषाणीं । कितीएक ॥ २० ॥ इतुक्या ठायीं पुरवला । अनेकीं एकच
वर्तला । गुप्त आणि प्रगटला । किती एक ॥ २१ ॥ चंचळ न होइजे नि-
श्चळ । प्रचीत जाणावी केवळ । चंचळ नव्हे निश्चळ । परब्रह्म तें ॥ २२ ॥
तत्त्वें तत्त्व जेव्हां उडे । तेव्हां देहबुद्धि झडे । निर्मळ निश्चळ चहूकडे ।
निरंजन ॥ २३ ॥ आपण कोण कोठें कैंचा । ऐसा मार्ग विवेकाचा । प्राणी
जो स्वयें काचा । त्यास हें कळेना ॥ २४ ॥ भल्यानें विवेक धरावा ।
दुस्तर संसार तरावा । अवघा वंश उद्धरावा । हरिभक्ति करूनी ॥ २५ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकादशदशके अंतरात्माविवरणनिरूपणं
नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥
९. उपदेश.
श्रीगणेशाय नमः ॥ आधीं कर्माचा प्रसंग । कर्म केलें पाहिजे सांग ।
कदाचित् पडलें व्यंग । तरी प्रत्यवाय घडे ॥ १ ॥ म्हणोन कर्म आरंभिलें ।
कांहीं एक सांग घडलें । जेथें जेथें अंतर पडलें । तेथें हरिसमरण करावें
॥ २ ॥ तरी तो हरि आहे कैसा । विचार पाहावा ऐसा । संध्येपूर्वी
जगदीशा । चोवीस नामें स्मरावें ॥ ३॥ चोवीस नामीं सहस्र नामीं । अनंत्-
नामीं तो अनामी । तो कैसा आहे अंतर्यामीं । विवेकें ओळखावा ॥ ४॥
ब्राह्मण स्नान करून आला । मग तो देवार्चनास बैसला । यथासांग तो
पूजिला । प्रतिमादेव ॥ ५ ॥ नाना देवांच्या नाना प्रतिमा । लोक पूजिती
धरूनि प्रेमा । ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा । कैसा आहे ॥ ६ ॥ ऐसें
ओळखिलें पाहिजे । ओळखून भजन कीजे । जैसा साहेब नमस्कारिजे ।
१. भावना. २. शिरेल ३. भूमीचे पोटांत. ४. पूर्ण. ५. दोष. ६. अधिकारी.

पृष्ठ 309
स्थायी लिंक
पृष्ठ 309 स्कैन

२७४ श्रीदासबोध. [ दशक
ओळखिल्या उपरी ॥७॥ तैसा परमात्मा परमेश्वर । बरा ओळखावा पाहोनी
विचार । तरीच पाविजे पार । भवसागराचा ॥ ८ ॥ पूजा घेताती प्रतिमा ।
अंगा येतो अंतरात्मा । अवतारी तरी निजधामा । येऊनि गेले ॥ ९ ॥ परी
ते निजरूपें असती । तें निजरूप जगज्योती । सत्वगुण तयेस म्हणती ।
जाणती कळा ॥ १० ॥ तये कळेचे पोटीं । देव असती कोट्यानकोटी ।
या अनुभवाच्या गोष्टी । प्रत्ययें पाहाव्या ॥ ११ ॥ देहपुरामध्ये ईश ।
म्हणोन तया नांव पुरुष । जगामध्यें जगदीश । तैसा ओळखावा ॥ १२॥
जाणीवरूपें जगदाकारें । प्रस्तुत वर्तवी शरीरें । अंतःकर्णी विष्णु येणें-
प्रकारें । ओळखावा ॥ १३ ॥ तो विष्णु आहे जगदंतरीं । तोचि आपुले
अंतरीं । कर्ता भोक्ता चतुरीं । अंतरात्मा ओळखावा ॥१४॥ ऐके देखे हुंगे
चाखे । जाणोन विचारें ओळखे । कितीक आपुलें पारखें । जाणताहे ॥१५॥
एकचि जगाचा जिव्हाळा । परी देहलोभाचा अडथळा । देहसंबंधें वेगळा ।
अभिमान धरी ॥१६॥ उपजे वाढे मरे मारी । जैशा उसळती लहरीवरी
लहरी । चंचळसागरीं भरोवरी । त्रैलोक्य होत जातें ॥ १७ ॥ त्रैलोक्य
वर्तवितो एक । म्हणोनि त्रैलोक्यनायक । ऐसा प्रत्ययाचा विवेक । पाहाना
कैसा ॥ १८ ॥ ऐसा अंतरात्मा बोलिला । परी तोहि तत्त्वांमध्ये आला ।
पुढें विचार पाहिजे केला । महावाक्याचा ॥१९॥ आधीं देखिला देहधारी ।
मग पाहिला जगदंतरीं । तयाचेनि याउपरी । परब्रह्म

पृष्ठ 310 स्कैन

११ वा.] निस्पृहवर्तन. २७५
१० निस्पृहवर्तन.
श्रीगणेशाय नमः ॥ मूर्ख एकदेशी होतो । चतुर सर्वत्र पाहतो ।
जैसा बहुधा होऊनि भोगितो । नाना सुखें ॥ १ ॥ तोचि अंतरात्मा महंत ।
तो कां होईल संकोचित । प्रशस्त जाणता समस्त । विख्यात योगी ॥ २ ॥
कर्ता भोक्ता तत्वतां । भूमंडळीं सर्व सत्ता । त्या वेगळा त्यास ज्ञाता । पा-
हेसा कवण ॥ ३ ॥ ऐसें महंतें असावें । सर्व सार शोधूनि घ्यावें ।

इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ

पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।

खाता बनाएँ या साइन इन करें
पृष्ठ 311 स्कैन

विण केवळ । वृथा पुष्ट ॥ २० ॥ लोक बहुत शोधावे । त्यांचे अधिकार
जाणावे । जाणजाणोनि धरावे । जवळीं दुरीं ॥ २१ ॥ अधिकारपरत्वें कार्य
होतें । अधिकार नसतां व्यर्थ जातें । जाणोन शोधावीं चित्तें । नानाप्रकारें
॥ २२ ॥ अधिकार पाहून कार्य सांगणें । साक्षेप पाहून विश्वास धरणें ।
आपला मेंगज राखणें । कांहीं तरी ॥ २३ ॥ हें

इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ

पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।

खाता बनाएँ या साइन इन करें
पृष्ठ 312 स्कैन

. १२ वा. ] प्रत्यय. २७७
परमार्थ चालवणें । ऐसें न करितां भोगणें । नाना दुःखें ॥ १० ॥ पेंर्णाळी
पाहोन ऊंचले । जीवसृष्टि विवेकें चाले । आणि पुरुष होऊन श्रमले । या-
सि काय म्हणावें ॥ ११ ॥ म्हणोन असावी दीर्घसूचना । अखंड करावी
चाळणी । पुढील होणार अनुमाना । आणून सोडावें ॥ १२ ॥ सुखी असतो
खबरदार । दुःखी होतो बेखबर । ऐसा हा लौकिक विचार । दिसतचि आहे

इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ

पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।

खाता बनाएँ या साइन इन करें
पृष्ठ 313 स्कैन

[२७८] श्रीदासबोध. [ दशक

होती लोक ॥ ७ ॥ लोकांचें मनोगत कळेना । लोकांसारिखें वर्त्तवेना ।
मूर्खपणें लोकीं नाना । कलह उठती ॥ ८ ॥ मग ते कलह वाढती । पर-
स्परें कष्टी होती । प्रयत्न राहतां अंतीं । श्रमचि होय ॥ ९ ॥ ऐसी नव्हे
वर्तणुक । परीक्षावे नाना लोक । समजले पाहिजे नेमक । ज्याचें त्यापरी
॥ १० ॥ शब्दपरीक्षा अंतरपरीक्षा । कांहीं एक कळे दक्षा । मनोगत नेत-
दक्षा । काय

इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ

पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।

खाता बनाएँ या साइन इन करें
पृष्ठ 314 स्कैन

१२ वा. ] देवभक्त. २७९
येतें । आतां पुढें सांगावें तें । कोणास काय ॥ २८ ॥ हरिकथा निरूपण ।
बरेपणें राजकारण । प्रसंग पाहिल्याविण । सकळ खोटें ॥ २९ ॥ विद्या
उदंडचि शिकला । प्रसंगमान चुकतचि गेला । मग तये विद्येला । कोण
पुसे ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वादशदशके प्रत्ययनिरूपणं
नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥
३. देवभक्त.
श्रीगणेशाय नमः ॥

इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ

पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।

खाता बनाएँ या साइन इन करें
पृष्ठ 315 स्कैन

आपें नसतां पृथ्वि नाहीं । तेज नसतां आप नाहीं । वायु नसतां तेज
नाहीं । ऐसें जाणावें ॥ १६ ॥ अंतरात्मा नसतां वायु कैंचा । विकार न-
सतां अंतरात्मा कैंचा । निर्विकारीं विकार कैंचा । बरें पाहा ॥ १७ ॥ पृथ्वी
नाहीं आप नाहीं । तेज नाहीं वायु नाहीं । अंतरात्मा विकार नाहीं । नि-
र्विकारीं ॥ १८ ॥ निर्विकार जें निर्गुण । तेचि शाश्वताची खूण । अष्टधा
प्रकृति

इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ

पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।

खाता बनाएँ या साइन इन करें
पृष्ठ 316 स्कैन

१२ वा.] विवेकवैराग्य. २८१
४. विवेकवैराग्य.
श्रीगणेशाय नमः ॥ महद्भाग्य हातासि आलें । परी भोगूं नाहीं जाणि-
तलें । तैसें वैराग्य उत्पन्न झालें । परी विवेक नाहीं ॥ १ ॥ आदळतें आफ-
ळतें । कष्टी होतें दुःखी होतें । ऐकतें देखतें येतें । वैराग्य तेणें ॥ २ ॥
नाना प्रपंचाच्या वोढी । नाना संकटें सांकडीं । संसार सांडून देशधडी ।
होय तेणें ॥ ३ ॥ तो चिंतेपासून सुटला । पराधीनतेपासून

इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ

पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।

खाता बनाएँ या साइन इन करें
पृष्ठ 317 स्कैन

२८२ श्रीदासबोध. [ दशक
आणि वैराग्य । तेंचि जाणिजे महद्भाग्य । रामदास म्हणे योग्य । साधु
जाणती ॥ २० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वादशदशके विवेक-
वैराग्यनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥
५. आत्मनिवेदन.
श्रीगणेशाय नमः ॥ १रेघेचें गुंडाळें केलें । मातृकोक्षरीं शब्द झाले । शब्द
मिळवून चाले । श्लोक गद्य प्रबंध ॥ १ ॥ वेद शास्त्रं पुराणे । नाना काव्यें
निरूपणें ।

इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ

पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।

खाता बनाएँ या साइन इन करें
पृष्ठ 318 स्कैन

१२ वा.] सृष्टिक्रम. २८३
होय ॥ १५ ॥ पदार्थ मनें काया वाचा । मी हा अवघा देवाचा । जड आत्म-
निवेदनाचा । विचार ऐसा ॥ १६ ॥ चंचळकर्ती तो जगदीश । प्राणिमात्र
त्याचा अंश । त्याचा तोचि आपणास । ठाव नाहीं ॥ १७ ॥ चंचळ आत्म-
निवेदन । याचें सांगीतलें लक्षण । कर्ता देव तो आपण । कोठेंचि नाहीं
॥ १८ ॥ चंचळ चले स्वभाकार । निश्चळ देव तो निराकार । आत्मनिवेद-
नाचा

इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ

पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।

खाता बनाएँ या साइन इन करें
पृष्ठ 319 स्कैन

२८४ श्रीदासबोध. [ दशक
झालें चळण । तेंचि वायूचें लक्षण । पंचभूतें आणि त्रिगुण । सूक्ष्म अष्टधा
॥ ११ ॥ आकाश म्हणिजे अंतरात्मा । प्रत्ययें पाहावा महिमा

इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ

पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।

खाता बनाएँ या साइन इन करें
पृष्ठ 320 स्कैन

१२ वा.] विषयत्याग. २८५
बोलीं लागला । तो नेमस्त जाणावा बुडाला । एक साहेब¹ नसतां कोणाला ।
मुशारा मागावा ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वादशदशके
सृष्टिकमानिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥
७. विषयत्याग.
श्रीगणेशाय नमः ॥ न्यायनिष्ठुर बोलणें । बहुतांस वाटे कंटाळवाणें ।
मळमळ करितां जेवणें । विहित नव्हे ॥ १ ॥ बहुतीं विषय निंदिले । आणि
तेचि सेवीत

इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ

पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।

खाता बनाएँ या साइन इन करें
पृष्ठ 321 स्कैन

२८६ श्रीदासबोध. [ दशक
वैराग्य नसतां योग्य । परमार्थ नव्हे ॥ १७ ॥ प्रत्ययज्ञानी वीतरागी ।
विवेकबळें सकळ त्यागी । तो जाणिजे महायोगी । ईश्वरी पुरुष ॥ १८ ॥
अष्टसिद्धींची उपेक्षा । करून घेतली योगदीक्षा । घरोघरीं मागें भिक्षा ।
महादेव ॥ १९ ॥ ईश्वराची बराबरी । कैसा करील वेषधारी । म्हणोनियां
सगटसरी । होत नाहीं ॥ २० ॥ उदासवृत्ति आणि विवेक । त्यासि

इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ

पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।

खाता बनाएँ या साइन इन करें
पृष्ठ 322 स्कैन

१२ वा.] काल. २८७
चळ आहे तावत्काळ । काळ म्हणावें ॥ ४ ॥ आकाश म्हणिजे अवकाश ।
अवकाश बोलिजे विलंबास । त्या विलंबरूप काळास । जाणोन घ्यावें ॥ ५ ॥
सूर्याकरितां विलंब कळे¹ । गणना सकळांची आकळे । पळापासून निवडेले ।
युगपर्यंत ॥ ६ ॥ पळ घटिका प्रहर दिवस । अहोरात्र पक्ष² मास । षण्मास
वर्ष युगास । ठाव जाहला ॥ ७ ॥ कृत त्रेत द्वापार केली । संख्या चालली
भूमंडळीं । देवाचीं आयुष्यें

इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ

पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।

खाता बनाएँ या साइन इन करें
पृष्ठ 323 स्कैन

भाषण । परलोक कैंचा ॥ २४ ॥ बरें आमचें काय गेलें । जें केलें तें फळास
आलें । पेरिलें तें उगवलें । भोगती आतां ॥ २५॥ पुढेंहीू करी तो पावे । भक्ति-
योगें भगवंत फावे । देवभक्त मिळतां दुणावें । समाधान ॥ २६ ॥ कीर्ति करून
मेले । उगेचि आले आणि गेले । शाहाणे होऊन अमले । काय सांगावें ॥ २७॥
येथील येथें अवघेंचि राहतें । ऐसें प्रत्ययास येतें । कोण काय घेऊनि

इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ

पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।

खाता बनाएँ या साइन इन करें
पृष्ठ 324 स्कैन

१२ वा. ] यत्नशिक्षा. २८९
आळस सोडावा । यत्न साक्षेपें जोडावा । दुश्चितपणाचा मोडावा । थारा
बळें ॥ ८ ॥ १] प्रातःकाळीं उठत जावें । प्रातःस्मरोंनि करावें । नित्य नेमें
करावें । पाठांतर ॥ ९ ॥ मागील उजळणी पुढें पाठ । नेम धरावा निकट ।
बाष्कळपणाची वटवट । करूंांच नये ॥ १० ॥ दिशेकडे दुरी जावें । शुचि-
ष्मंत होऊन यावें । येतां कांहीं तरी आणावें । रितें खोटें ॥ ११ ॥ धूत-
वस्त्रें घालावीं पिळून

इस पृष्ठ का पूरा पाठ पढ़ने के लिए निःशुल्क खाता बनाएँ

पृष्ठ का स्कैन सभी के लिए निःशुल्क है।

खाता बनाएँ या साइन इन करें