दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 310, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें११ वा.] निस्पृहवर्तन. २७५
१० निस्पृहवर्तन.
श्रीगणेशाय नमः ॥ मूर्ख एकदेशी होतो । चतुर सर्वत्र पाहतो ।
जैसा बहुधा होऊनि भोगितो । नाना सुखें ॥ १ ॥ तोचि अंतरात्मा महंत ।
तो कां होईल संकोचित । प्रशस्त जाणता समस्त । विख्यात योगी ॥ २ ॥
कर्ता भोक्ता तत्वतां । भूमंडळीं सर्व सत्ता । त्या वेगळा त्यास ज्ञाता । पा-
हेसा कवण ॥ ३ ॥ ऐसें महंतें असावें । सर्व सार शोधूनि घ्यावें । पाहों
जातां न सांपडावें । एकाएकीं ॥ ४ ॥ कीर्तिरूपें उदंड ख्यात । जाणती ल-
हान थोर समस्त । वेष पाहतां शाश्वत । एकहि नाहीं ॥ ५ ॥ प्रगट कीर्ति
ते ढळेना । बहुत जनांस कळेना । पाहों जातां आढळेना । काय कैसें ॥ ६ ॥
वेषभूषण तें दूषण । कीर्तिभूषण तें भूषण । चालनेविण एक क्षण । जा-
ऊंच नेदी ॥ ७ ॥ त्यागी ओळखीचे जन । सर्वकाळ नित्य नूतन । लोक
शोधून पाहती मन । परी इच्छा दिसेना ॥ ८ ॥ पुरतें कोणाकडे पाहेना ।
पुरतें कोणासी बोलेना । पुरतें एके स्थळीं राहेना । उठोन जातो ॥ ९ ॥ जातो
स्थळ तें सांगेना । सांगितलें तरी तेथें जायेना । आपली स्थिति अनुमाना ।
येवूं च नेदी ॥ १० ॥ लोकीं केलें तें चुकवी । लोकीं भाविलें तें उलथवी ।
लोकीं तर्किले तें दावी । निष्फळ करुनी ॥ ११ ॥ लोकांस पाह्याचा आदर ।
तेथें याचा आनादर । लोक सर्वकाळ तत्पर । तेथें याची अनिच्छा ॥ १२ ॥
एवं कल्पितां कल्पेना । तर्कितांहि तर्केना । कदापि भावितां भावेना । यो-
गीश्वर ॥ १३ ॥ ऐसें अंतर सांपडेना । शरीर ठायीं पडेना । क्षण एक विसं-
बेना । कथाकीर्तन ॥ १४ ॥ लोक संकल्प विकल्प करिती । ते अवघेच नि-
ष्फळ होती । जनांची जनां लाजवी वृत्ती । तेव्हां योगेश्वर ॥ १५ ॥ बहुतीं
शोधून पाहिलें । बहुतांच्या मनास आलें । तरी मग जाणावें साधिलें । मह-
त्कृत्य ॥ १६ ॥ अखंड एकांत सेवावा । अभ्यासचि करित जावा । काळ
सार्थकाचे करावा । जनांसहित ॥ १७ ॥ उत्तम गुण तितुके घ्यावे । घेऊन
जनांस शिकवावे । उदंड समुदाय करावें । पुरी गुप्तरूपें ॥ १८ ॥ अखंड
कामाची लगबग । उपासनेस लावावें जग । लोक समजोन मग । आज्ञा
इच्छिती ॥ १९ ॥ आधीं कष्ट मग फळ । कष्टचि नाहीं तें निष्फळ । संक्षेपें-
१. वस्त्रांलंकारांची शोभा. २. कल्पिलें. ३. जाणवेना. ४. उद्योगावांचून.