सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 308, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 308

११ वा.] उपदेश. २७३
मोठें ॥ १५ ॥ ऐसे लोक अविवेकी । आणि म्हणती आम्ही विवेकी । बरें
ज्याची जैसी टांकी । तैसें करावें ॥ १६॥ मूर्ख अंतर राखो नेणे । म्हणोन
असावे शाहणे । ते शाहणेहि दैन्यवाणे । होऊन गेले ॥ १७॥ अंतरीं ठेवणें
चुकलें । दारोदारीं धुंडूं लागले । तैसें अज्ञानासि झालें । देव न कळे ॥ १८॥
या देवाचें ध्यान करी । ऐसा कोण रे संसारीं । वृत्ति एकदेशी तरी । पवों-
डेल कोठें ॥ १९ ॥ ब्रह्मांडीं दाटले प्राणी । बहुरूपें बहुवाणी । भूगर्भी
आणि पाषाणीं । कितीएक ॥ २० ॥ इतुक्या ठायीं पुरवला । अनेकीं एकच
वर्तला । गुप्त आणि प्रगटला । किती एक ॥ २१ ॥ चंचळ न होइजे नि-
श्चळ । प्रचीत जाणावी केवळ । चंचळ नव्हे निश्चळ । परब्रह्म तें ॥ २२ ॥
तत्त्वें तत्त्व जेव्हां उडे । तेव्हां देहबुद्धि झडे । निर्मळ निश्चळ चहूकडे ।
निरंजन ॥ २३ ॥ आपण कोण कोठें कैंचा । ऐसा मार्ग विवेकाचा । प्राणी
जो स्वयें काचा । त्यास हें कळेना ॥ २४ ॥ भल्यानें विवेक धरावा ।
दुस्तर संसार तरावा । अवघा वंश उद्धरावा । हरिभक्ति करूनी ॥ २५ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकादशदशके अंतरात्माविवरणनिरूपणं
नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥
९. उपदेश.
श्रीगणेशाय नमः ॥ आधीं कर्माचा प्रसंग । कर्म केलें पाहिजे सांग ।
कदाचित् पडलें व्यंग । तरी प्रत्यवाय घडे ॥ १ ॥ म्हणोन कर्म आरंभिलें ।
कांहीं एक सांग घडलें । जेथें जेथें अंतर पडलें । तेथें हरिसमरण करावें
॥ २ ॥ तरी तो हरि आहे कैसा । विचार पाहावा ऐसा । संध्येपूर्वी
जगदीशा । चोवीस नामें स्मरावें ॥ ३॥ चोवीस नामीं सहस्र नामीं । अनंत्-
नामीं तो अनामी । तो कैसा आहे अंतर्यामीं । विवेकें ओळखावा ॥ ४॥
ब्राह्मण स्नान करून आला । मग तो देवार्चनास बैसला । यथासांग तो
पूजिला । प्रतिमादेव ॥ ५ ॥ नाना देवांच्या नाना प्रतिमा । लोक पूजिती
धरूनि प्रेमा । ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा । कैसा आहे ॥ ६ ॥ ऐसें
ओळखिलें पाहिजे । ओळखून भजन कीजे । जैसा साहेब नमस्कारिजे ।
१. भावना. २. शिरेल ३. भूमीचे पोटांत. ४. पूर्ण. ५. दोष. ६. अधिकारी.