दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 312, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें. १२ वा. ] प्रत्यय. २७७
परमार्थ चालवणें । ऐसें न करितां भोगणें । नाना दुःखें ॥ १० ॥ पेंर्णाळी
पाहोन ऊंचले । जीवसृष्टि विवेकें चाले । आणि पुरुष होऊन श्रमले । या-
सि काय म्हणावें ॥ ११ ॥ म्हणोन असावी दीर्घसूचना । अखंड करावी
चाळणी । पुढील होणार अनुमाना । आणून सोडावें ॥ १२ ॥ सुखी असतो
खबरदार । दुःखी होतो बेखबर । ऐसा हा लौकिक विचार । दिसतचि आहे
॥ १३ ॥ म्हणोन सर्व सावधान । धन्य तयाचें महिमान । जनीं राखे समा-
धान । तोचि एक ॥ १४ ॥ चालनेचा आळस केला । तरी अवचितां पडेल
घाला । ते वेळे सांवरायाला । अवकाश कैंचा ॥ १५ ॥ म्हणोन दीर्घसूच-
नेचे लोक । त्यांचा पाहावा विवेक । लोकांकरितां लोक । शहाणे होती
॥ १६ ॥ परी ते शहाणे वोळखावे । गुणवंताचे गुण घ्यावे । अवगुण दे-
खोन सांडावे । जनांमध्यें ॥ १७ ॥ मनुष्य पारखूं रहेना । आणि कोणाचें
मन तोडीना । मनुष्यमात्र अनुमाना । आणून पाहे ॥ १८ ॥ दिसे सक-
ळांसि सारिखा । पाहतां विवेकीं नेटका । कामी निकामी लोकां । बरें पाहे
॥ १९ ॥ जाणोन पाहिजे सर्व । हेंचि तयाचें अपूर्व । ज्याचें त्यापरी गौ-
रव । राखो जाणे ॥ २० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वादशदशके
विमललक्षणनिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥
२. प्रत्यय.
श्रीगणेशाय नमः ॥ ऐका संसारासि आले हो । स्त्री पुरुष निस्पृह हो ।
सुचित्तपणें पाहो । अर्थांतर ॥ १ ॥ काय म्हणते वासना । काय कल्पिते
कल्पना । अंतरींचे तरंग नाना । प्रकारें उठती ॥ २ ॥ बरें खावें बरें जे-
वावें । बरें ल्यावें बरें नेसावें । मनासारिखेंच असावें । सकळ कांहीं ॥ ३ ॥
ऐसें आहे मनोगत । परी तें कांहींच न होत । बरें करितां अकस्मात । वा-
ईट होतें ॥ ४ ॥ एक सुखी एक दुःखी । प्रत्यक्ष वर्ततें लोकीं । कष्टी होऊ-
निया शेखीं । प्रारब्धावारि घालिती ॥ ५ ॥ अचूक यत्न करवेना । म्हणोन
केलें तें सजेना । आपुला अवगुण जाणवेना । कांहीं केल्या ॥ ६ ॥ जो
आपुला आपण नेणे । तो दुसऱ्याचें काय जाणे । न्याय सोडितां दैन्यवाणे ।
१. झाडावरील कीड. २. पाऊल उचलते. ३. मनुष्येतर जीव. ४. विचार.