दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 316, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१२ वा.] विवेकवैराग्य. २८१
४. विवेकवैराग्य.
श्रीगणेशाय नमः ॥ महद्भाग्य हातासि आलें । परी भोगूं नाहीं जाणि-
तलें । तैसें वैराग्य उत्पन्न झालें । परी विवेक नाहीं ॥ १ ॥ आदळतें आफ-
ळतें । कष्टी होतें दुःखी होतें । ऐकतें देखतें येतें । वैराग्य तेणें ॥ २ ॥
नाना प्रपंचाच्या वोढी । नाना संकटें सांकडीं । संसार सांडून देशधडी ।
होय तेणें ॥ ३ ॥ तो चिंतेपासून सुटला । पराधीनतेपासून पळाला । दुः-
खत्यागें मोकळा झाला । रोगी जैसा ॥ ४ ॥ परी तो होऊं नये मोकाट ।
नष्ट भ्रष्ट आणि चाट । सीमाचि नाहीं सैराट । गुरुं जैसें ॥ ५ ॥ विवेकें-
विण वैराग्य केलें । तरी अविवेकें अनर्थी घातलें । अवघें व्यर्थचि गेलें ।
दोहींकडे ॥ ६ ॥ ना प्रपंच ना परमार्थ । अवघें जिणेंचि झालें व्यर्थ । अ-
विवेकें अनर्थ । ऐसा केला ॥ ७ ॥ कां व्यर्थचि ज्ञान बडबडिला । परी
वराग्ययोग नाहीं घडला । जैसा कारागृहीं अडकला । पुरुषार्थ सांगे ॥
८ ॥ वैराग्येंविण ज्ञान । तो व्यर्थचि साभिमान । लोभदंभें घोळसून । का-
सावीस केला ॥ ९ ॥ श्वान बांधिलें तरी भुंके । तैसा स्वार्थमुळे थिंके¹ ।
परौधिक देखों² न शके । साभिमानें ॥ १० ॥ हें एकेंविण एक । तेणें उ-
गाच वाढे शोक । आतां वैराग्य आणि विवेक-। योग ऐका ॥ ११ ॥ विवेकें
अंतरीं सुटला । वैराग्यें प्रपंच तुटला । अंतर्बाह्य मोकळा झाला । निःसंग
योगी ॥ १२ ॥ जैसें मुखें ज्ञान बोले । तैशीच सर्व क्रिया चाले । दीक्षा
देखोन चकित झाले । शुचिष्मंत ॥ १३ ॥ आस्था नाहीं त्रैलोक्याची ।
स्थिति बाणली वैराग्याची । यत्न विवेक धारणेची³ । सीमा नाहीं ॥ १४ ॥
संगीत रसाळ हरिकीर्तन । तालबद्ध तानमान । प्रेमळ आवडीचें भजन । अं-
तरापासूनी ॥ १५ ॥ तात्काळचि सन्मार्ग लागे । ऐसा अंतरीं विवेक जागे ।
वक्तृत्व करितां न भंगे । साहित्य प्रत्ययाचें ॥ १६ ॥ सन्मार्गें जगास मि-
ळाला । म्हणजे जगदीश वोळला । प्रसंग पाहिजे कळला । कोणीएक ॥
१७ ॥ प्रखर वैराग्य उदासीन । प्रत्ययाचें ब्रह्मज्ञान । ज्ञान संध्या भगव-
द्भजन । पुण्यमार्ग ॥ १८ ॥ विवेकवैराग्य तें ऐसें । नुसतें वैराग्य हेंकाड-
पिसें । शब्दज्ञान वेळीलेंसें⁴ । आपणचि वाटे ॥ १९ ॥ म्हणोन विवेक
१. उसळतो. २. दुसऱ्याचें बरें. ३. चित्ताच्या एकाग्रतेची. ४. मिळमिळीत.