सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 320, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 320

१२ वा.] विषयत्याग. २८५
बोलीं लागला । तो नेमस्त जाणावा बुडाला । एक साहेब¹ नसतां कोणाला ।
मुशारा मागावा ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वादशदशके
सृष्टिकमानिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥
७. विषयत्याग.
श्रीगणेशाय नमः ॥ न्यायनिष्ठुर बोलणें । बहुतांस वाटे कंटाळवाणें ।
मळमळ करितां जेवणें । विहित नव्हे ॥ १ ॥ बहुतीं विषय निंदिले । आणि
तेचि सेवीत गेले । विषयत्यागें देह चाले । हें तों घडेना ॥ २ ॥ बोलणें
एक चालणें एक । त्याचें नांव हीनविवेक² । येणें करितां सकळ लोक ।
हांसों लागती ॥ ३ ॥ विषयत्यागेंविण तों कांहीं । परलोक तो प्राप्त नाहीं ।
ऐसें बोलणें ठायीं ठायीं । बरें पाहा ॥ ४ ॥ प्रपंची खाती जेविती । परमार्थी
काय उपास करिती । उभयतां सारखे दिसती । विषयाविषयीं ॥ ५ ॥ देह
चालतां विषयत्यागी । ऐसा आहे कोण जगीं । त्याचा निर्वाह मजलागीं ।
देवें निरूपावा ॥ ६ ॥ विषय अवघा त्यागावा । तरीच परमार्थ करावा ।
ऐसें पाहतां गोवां । दिसतो कीं ॥ ७ ॥ ऐसा श्रोता अनुवादला । वक्ता
उत्तर देता झाला । सावध होऊन मन घाला । एतद्विषयीं ॥ ८ ॥ वैराग्यें
करावा त्याग । तरीच परमार्थयोग । प्रपंचत्यागें सर्व सांग । परमार्थ घडे
॥ ९ ॥ मार्गे ज्ञानी होऊन गेले । तिहीं बहुत कष्ट केले । तरी मग विख्यात
झाले । भूमंडळीं ॥ १० ॥ येरें मत्सर करितांच गेलीं । अन्न अन्न करितांचि
मेलीं । कित्येक तीं भ्रष्टलीं । पोटासाठीं ॥ ११ ॥ वैराग्य मुळींहून नाहीं ।
ज्ञान प्रत्ययाचें नाहीं । शुचि आचार तोहि नाहीं । भजन कैंचें ॥ १२ ॥ ऐसे
प्रकारिचे जन । आपणांस म्हणती सज्जन । पाहों जातां अनुमान³ । अवघेंच
दिसे ॥ १३ ॥ जयास नाहीं अनुताप⁴ । हेंच एक पूर्व पाप । क्षणक्षणा
विक्षेप⁵ । पराधिकपणें ॥ १४ ॥ मज नाहीं तुज साजेना । हें तों अवघें
ठाउकें आहे जनां । खात्यास न खातें देखों शकेना । ऐसें आहे ॥ १५ ॥
भाग्य पुरुष थोरथोर । त्यांस निंदिती दिवाळखोर । सांवास देखतां चोर ।
चरफडी जैसा ॥ १६ ॥ वैराग्या परतें नाहीं भाग्य । वैराग्य नाहीं तें अभाग्य ।
१. धनी. २. विचारशून्य. ३. संशय. ४. वैराग्य. ५. मनाचें चांचल्य.