दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 313, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें[२७८] श्रीदासबोध. [ दशक
होती लोक ॥ ७ ॥ लोकांचें मनोगत कळेना । लोकांसारिखें वर्त्तवेना ।
मूर्खपणें लोकीं नाना । कलह उठती ॥ ८ ॥ मग ते कलह वाढती । पर-
स्परें कष्टी होती । प्रयत्न राहतां अंतीं । श्रमचि होय ॥ ९ ॥ ऐसी नव्हे
वर्तणुक । परीक्षावे नाना लोक । समजले पाहिजे नेमक । ज्याचें त्यापरी
॥ १० ॥ शब्दपरीक्षा अंतरपरीक्षा । कांहीं एक कळे दक्षा । मनोगत नेत-
दक्षा । काय कळे ॥ ११ ॥ दुसऱ्यास शब्द ठेवणें । आपला कैपक्ष घेणें ।
पाहों जातां लौकिक लक्षणें । बहुतैक ऐसीं ॥ १२ ॥ लोकीं बरें म्हणाया-
कारणें । भल्यास लागतें सोसणें । न सोसितां भंडवाणें । सहजचि होय
॥ १३ ॥ आपणास जें मानेना । तेथें कदापि राहवेना । डैरी तोडून जा-
वेना । कोणी एकें ॥ १४ ॥ बोलतो खरें चालतो खरें । त्यास मिळती ल-
हान थोरें । न्याय अन्याय परस्परें । सहजचि कळे ॥ १५ ॥ लोकांस कळेना
तंववरी । विवेकें क्षमा जो न करी । तेणें करितां बराबरी । होत जाते
॥ १६ ॥ जंववरी चंदन झिजेना । तंववरी तो सुगंध कळेना । चंदन आणि
वृक्ष नाना । संगत होती ॥ १७ ॥ जंव उत्तम गुण न कळे । तों या जनास
काय कळे । उत्तम गुण देखतां निवळे । जगदंतर ॥ १८ ॥ जगदंतर निव-
ळत गेलें । जगदंतरीं सख्य झालें । तरी मग जाणावे वोळले । विश्वजन
॥ १९ ॥ जरी जनार्दन वोळला । तरी काय उणें तयाला । राजी राखावें
सकळांला । कठिन आहे ॥ २० ॥ पेरितें तें उगवतें । उसणें द्यावें घ्यावें
लागतें । वर्म काढितां भंगतें । परांतर ॥ २१ ॥ लौकिकीं बरेपण केलें ।
तेणें सौख्य वाढलें । उत्तरासारिखें आलें । प्रत्युत्तर ॥ २२ ॥ हें अवघें आप-
णापासीं । येथें बोल नाहीं जनांसी । शिकवावें आपुल्या मनासी । क्षणक्षणां
॥ २३ ॥ खळ दुर्जन भेटला । क्षमेचा धीर बुडाला । तरी मौनेंचि स्थळ-
त्याग केला । पाहिजे साधकें ॥ २४ ॥ लोक नाना परीक्षा जाणती । परी
अंतरपरीक्षा नेणती । तेणें प्राणी करंटे होती । संदेह नाहीं ॥ २५ ॥ आप-
णास आहे मरण । म्हणोन राखावें बरेपण । कठिन आहे लक्षण । विवेकाचें
॥ २६ ॥ थोर लहान समान । आपुले पारिखे सकळ जन । चढतें वाढतें
समाधान । करितां बरें ॥ २७ ॥ बरें करितां बरें होतें । हें तों प्रत्ययास
१. मूर्खास. २. बाजू. ३. भीड. ४. समान.