दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 314, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१२ वा. ] देवभक्त. २७९
येतें । आतां पुढें सांगावें तें । कोणास काय ॥ २८ ॥ हरिकथा निरूपण ।
बरेपणें राजकारण । प्रसंग पाहिल्याविण । सकळ खोटें ॥ २९ ॥ विद्या
उदंडचि शिकला । प्रसंगमान चुकतचि गेला । मग तये विद्येला । कोण
पुसे ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वादशदशके प्रत्ययनिरूपणं
नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥
३. देवभक्त.
श्रीगणेशाय नमः ॥ पृथ्वीमध्यें बहुत लोक । तिहीं पाहावा विवेक ।
इहलोक आणि परलोक । बरा पाहावा ॥ १ ॥ इहलोक साधावयाकारणें ।
जाणत्याची संगति धरणें । परलोक साधावयाकारणें । सद्गुरु पाहिजे ॥ २ ॥
सद्गुरूसि काय पुसावें । हेंहि कळेना स्वभावें । अनन्यभावें एकभावें । दोन्ही
गोष्टी पुसाव्या ॥ ३ ॥ दोन्ही गोष्टी त्या कोण । देव कोण आपण कोण ।
त्या दों गोष्टींचें विवरण । केलेंचि करावें ॥ ४ ॥ आधीं मुख्य देव तो कोण ।
मग आपण भक्त तो कोण । पंचीकरण¹ महावाक्य विवरण । केलेंचि करावें
॥ ५ ॥ सकळ केलियाचें फळ । शाश्वत ओळखावें निश्चळ । आपण कोण
हा केवळ । शोध घ्यावा ॥ ६ ॥ सारासार विचार घेतां । पदार्थास नाहीं
शाश्वतता । आदिकारण भगवंता । वोळखिलें पाहिजे ॥ ७ ॥ निश्चळ चं-
चळ आणि जड । अवघा मायेचा पेंवाड² । यामध्यें वस्तु जाड³ । जाणारे
नाहीं ॥ ८ ॥ तें परब्रह्म धुंडावें । विवेकें त्रैलोक्य हिंडावें । मायिक विचारें
खंडावें । परीक्षवंतीं ॥ ९ ॥ खोटें सांडून खरें घ्यावें । परीक्षवंतीं परीक्षावें ।
मायेचें अवघेंचि जाणावें । रूप मायिक ॥ १० ॥ पंचभौतिक हे माया ।
मायिक जाय विलया । पिंड ब्रह्मांड अष्टकार्ये⁴ । नाशवंत ॥ ११ ॥ दिसेल
तितुकें नासेल । उपजेल तितुकें मरेल । रचेल तितुकें खचेल । रूप मायेचें
॥ १२ ॥ वाढेल तितुकें मोडेल । येईल तितुकें जाईल । भूतांस भूत खा-
ईल । कल्पांतकाळीं ॥ १३ ॥ देहधारक तितुके नासती । हे तों रोकडी
प्रचीती । मनुष्यांविण उत्पत्ती । रेत कैंचें ॥ १४ ॥ अन्न नसतां रेत कैंचें ।
औषधी नसतां अन्न कैंचें । औषधीस जिणें कैंचें । पृथ्वी नसतां ॥ १५ ॥
१. पंचभूतांचा विचार. २. विस्तार. ३. श्रेष्ठ. ४. आठ शरीरें.