दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 319, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२८४ श्रीदासबोध. [ दशक
झालें चळण । तेंचि वायूचें लक्षण । पंचभूतें आणि त्रिगुण । सूक्ष्म अष्टधा
॥ ११ ॥ आकाश म्हणिजे अंतरात्मा । प्रत्ययें पाहावा महिमा । त्या आका-
शापासून जन्मा । वायु आला ॥ १२ ॥ तया वायूच्या दोन्ही झुळुका ।
उष्ण शीतळ ऐका । शीतळापासुनि तारा मृगांका¹ । जन्म जाहला ॥ १३ ॥
उष्णापासून रवि वन्ही । विद्युल्लता आदिकरूनी । शीतळ उष्ण मिळोनी ।
तेज जाणावें ॥ १४ ॥ तया तेजापासून झालें आप । आप आळोनि पृ-
थ्वीचें रूप । पुढें औषधी अमूप । निर्माण जाहल्या ॥ १५ ॥ औषधींपा-
सून नाना रस । नाना बीजें अन्नरस । चौऱ्यांशी लक्ष योनींचा वास । भूमं-
डळीं ॥ १६ ॥ ऐशी झाली सृष्टिरचना । विचार आणिला पाहिजे मना ।
प्रत्ययेंविण अनुमाना² । पात्र होइजे ॥ १७ ॥ ऐसा झाला आकार । येणेंचि
न्यायें संहार । सारासार विचार । यासि बोलिजे ॥ १८ ॥ जें जें जेथूनि
निर्माण झाल