दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 317, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२८२ श्रीदासबोध. [ दशक
आणि वैराग्य । तेंचि जाणिजे महद्भाग्य । रामदास म्हणे योग्य । साधु
जाणती ॥ २० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वादशदशके विवेक-
वैराग्यनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥
५. आत्मनिवेदन.
श्रीगणेशाय नमः ॥ १रेघेचें गुंडाळें केलें । मातृकोक्षरीं शब्द झाले । शब्द
मिळवून चाले । श्लोक गद्य प्रबंध ॥ १ ॥ वेद शास्त्रं पुराणे । नाना काव्यें
निरूपणें । ग्रंथभेद २अनुवादणें । किती म्हणोनी ॥ २ ॥ नाना ऋषि नाना
मतें । पाहों जातां असंख्यातें । भाषा लिपी जेथें तेथें । काय उणें ॥ ३ ॥
वर्ग ३ऋचा श्रुति स्मृती । अध्याय सर्ग स्तबक जाती । प्रसंगमानें समास
पोथी । बहुधा नामें ॥ ४ ॥ नाना पदें नाना श्लोक । नाना बीर नाना क-
डक । नाना साख्या दोहरे अनेक । नामाभिधानें ॥ ५ ॥ डफगाणें माची-
गाणें । दिंडीगाणें कथागाणें । नाना मानें नाना जैसणें । नाना खेळ ॥ ६ ॥
ध्वनि घोष नाद रेखा । चहूं वाचामध्यें देखा । वाचारूपेंहि ऐका । नाना-
भेद ॥ ७ ॥ ५उन्मेष ६परा ध्वनि पश्यंती । नाद मध्यमा शब्द चौथी । 'वैख-
रीपासून उमटती । नाना शब्दरत्नें ॥ ८ ॥ अकार उकार मकार । अर्धमा-
त्रांचे अंतर । ७औटेंमात्रा तदनंतर । बावन ८मातृका ॥ ९ ॥ नाना भेद राग-
ज्ञान । नृत्यभेद तान मान । अर्थभेद तत्वज्ञान । विवंचना ॥ १० ॥ तत्वां-
मध्यें मुख्य तत्व । तें जाणावें शुद्ध सत्व । अर्धमात्रा महत्तत्व । मूळमाया
॥ ११ ॥ नाना तत्वें लहान थोरें । मिळोन अष्टहि शरीरें । अष्टधा प्रकृ-
तीचें वारें । निघोन जातें ॥ १२॥ वारें नसतां गगन । तैसें परब्रह्म सघन ।
अष्टदेहांचें निरसन । करून पाहावें ॥ १३ ॥ ब्रह्मांडपिंडउभार । पिंड-
ब्रह्मांडसंहार । दोहीं वेगळें सारासार । विमळ ब्रह्म ॥ १४ ॥ पदार्थ जड
आत्मा चंचल । विमळ ब्रह्म तें निश्चळ । विवरोनि विवरे तात्काळ । तद्रूप
१. रेषांचें गुंडाळें करून अक्षरें बनविलीं, अक्षरांपासून शब्द झाले. २. सांगणें.
३. वेदांतील वाक्यें म्हणजे ऋचा, व कांहींएक ऋचा मिळून वर्ग. ४. मनोरंजक
गोष्टी. ५. अंतःस्फुरण. ६. उन्मेष ही परा, ध्वनि ही पश्यंती, नाद ही मध्यमा
व शब्द ही वैखरी या चार वाणी. ७. साडेतीन अक्षरें, ॐकार. ८. अ ते ज्ञपर्यंत.