सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

शब्दार्थ व टीपा :- बोल्हावितो-बोलावितात, आणिकांचे-दुसऱ्यांचे, तान-तहान, राखो-दूर करतो.
अर्थ :- बंधूंनो, जे देहभावाविषयी उदासीन झाले आहेत व जे त्या देवास सदैव आळवीत असतात त्यांना
नमस्कार असो. १ जे तीर्थयात्रा करण्यासाठी त्या मार्गाने चालतात व जे त्या मार्गास येतात त्यांना बोलावितात
त्यांना नमस्कार असो. २ ज्यांचा विश्वास संतवचनांवर नेहमी असतो व भक्तिभावाने जे सद्गुरूचे दास्य करितात
त्यांना नमस्कार असो. ३ जो आपल्या मातापित्याचे नीट पालनपोषण करतो व जो नेहमी सत्यवचन बोलत असतो
त्यास नमस्कार असो. ४ जो दुसऱ्यांचे दुःख जाणून त्यांची तहान भूक दूर करतो त्यासही नमस्कार असो. ५
जो परोपकारी पुण्यवंत आहे व जो इंद्रियांचे दमन करतो त्यास नमस्कार असो. ६ तुकाराम महाराज म्हणतात,
हरीच्या दासास नमस्कार असो. कारण माझे सर्व इच्छा त्यांच्याजवळच पूर्ण होत असते. ७
४५३ आहा रे भाई । तयावरी माझी ब्रीदावळी । भ्रष्ट ये फळीं क्रियाहीन ॥ १ ॥
थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी । वर्णिली ते थोरी दवडा वांयां बाहेरी ॥ २ ॥
बाइलेचा दास पित्रांस उदास । भीक भिकाऱ्यास नये दारा ॥ ३ ॥
विद्याबळें वाद सांगोनियां छळी । आणिकांस फळी मांडोनियां ॥ ४ ॥
गांविचिया देवा नाहीं दंडवत । ब्राह्मण अतीत घडेचि ना ॥ ५ ॥
सदा¹ सर्वकाळ करितोचि निंदा । स्वप्नीं ही गोविंदा आठवीना ॥ ६ ॥
खासेमध्यें धन पोटासि बंधन । येणें ऐसा दानधर्म कांही ॥ ७ ॥
तुका म्हणे नटे दावूनियां सोंग । लवों नेदी अंग भक्तिभावें ॥ ८ ॥
शब्दार्थ व टीपा :- फळीं-कलियुगात, पित्रांस-वडील माणसांस, अतीत-अतिथी, खासेमध्ये-स्वतःचे.
अर्थ :- बंधूंनो, या कलियुगात जे कोणी क्रियाभ्रष्ट झाले आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी मी ब्रीद
घेतले आहे. १ असे जे कुणी असतील त्यांच्या तोंडावर थुंकावे. त्यांची थोरवी कुणी वर्णन केली तरी ती अगदी
व्यर्थ आहे असे समजून सोडून द्या. २ हा अधम मनुष्य बायकोचा दास झालेला असून वडील माणसांविषयी मात्र
पूर्ण उदास असतो यांच्या दारात भिकाऱ्यांना कधीही भिक्षा मिळत नाही. ३ काही थोडीफार विद्या शिकून
निरनिराळे वाद खेळतो व दुसऱ्यांना हा छळोत असतो. ४ गावातील देवाला हा चुकूनही नमस्कार करीत नाही.
ब्राह्मण, अतिथी यांचा हा कधीच सत्कार करीत नाही ५ सदासर्वकाळ हा साधुसंतांची निंदा करीत असतो व
गोविंदाचे स्मरण स्वप्नातही हा कधी करीत नाही ६ याचे स्वतःचे असे पुष्कळ धन असते; पोट बांधून त्याचे हा
जतन करतो, पण कधी दानधर्म करावा असे याच्या मनात येत नाही ७ तुकाराम महाराज म्हणतात, हा नाना-
प्रकारची सोंगे दाखवून नटत असतो पण भक्तिभावाने कधी याचे अंग लवले आहे असे दिसत नाही ८
४५४ आहा रे भाई । गंगा नव्हे जळ । वृक्ष नव्हे वड पिंपळ ।
तुळसी रुद्राक्ष नव्हे माळ । श्रेष्ठ तनु देवाचिया ॥ १ ॥
समुद्र नदी नव्हे पैं गा । पाषाण म्हणों नये लिंगा ।
संत नव्हती जगा । मानसा त्या सारिखे ॥ २ ॥
काठी म्हणों नये वेतु । अन्न म्हणों नये सांतु ।
राम राम हे मातु । नये म्हणों शब्द हे ॥ ३ ॥
चंद्र सूर्य नव्हती तारांगणें । मेरु तो नव्हे पर्वता समान ।
शेष वासुकी नव्हे सर्प जाण । विखारयाच्या सारिखे ॥ ४ ॥
१ सर्व काळ करी संतांचिया निंदा.

७३६ सार्थ तुकारामगाथा
गरुड नव्हे पाखरू । ढोर नव्हे नंदिकेश्वरु ॥
झाड नव्हे कल्पतरू । कामधेनु गाय न म्हणावी ॥ ५ ॥
कूर्ूम नव्हे कासव । डुकर नव्हे वराह ।
ब्रह्मा नव्हे जीव । स्त्री नव्हे लक्ष्मी ॥ ६ ॥
गवाक्ष नव्हे हाड । पाटाव नव्हे कापड ।
परीस नव्हे दगड । सगुण ते ईश्वरीचे ॥ ७ ॥
सोने नव्हे धातु । मीठ नव्हे रेतु ।
नाहीं नाहीं चमांतु । कृष्णाजिन व्याघ्रांबर ॥ ८ ॥
मुक्ताफळें नव्हेति गारा । खड्याऐसा नव्हे हिरा ।
जीव नव्हे सोइरा । बोळवीजे स्वेच्छेनें ॥ ९ ॥
गाव नव्हे द्वारावती । रणसोड नव्हे मूर्ति ।
तीर्थ नव्हे गोमती । मोक्ष घडे दर्शनें ॥ १० ॥
कृष्ण नव्हे भोगी । शकर नव्हे जोगी ।
तुका पाडुरंगीं । हा प्रसाद लाधला ॥ ११ ॥
शब्दार्थ व टीपा - तनु-शरीर, मातु-गोष्ट, शेष-सर्पांचा राजा, वासुकी-सर्पाचा राजा नंदिकेश्वरु-
शंकराचा नंदी, गवाक्ष-गाईचा डोळा पाटाव-रेशमी वस्त्र कृष्णाजिन-हरणाचे कातडे व्याघ्रांबर-वाघाचे कातडे,
गोमती-द्वारूर येथील तीर्थ
अर्थ - अहो बहुनो, गंगेचे पाणी हे काही इतर नद्याच्या पाण्यासारखे नाही त्याचे पावित्र्य विशेष
प्रकारचे आहे तसेच वड व पिंपळ याची झाडे इतर झाडासारखी नव्हेत तुळशीची व रुद्राक्षाची माळ इतर माळा-
सारखी नव्हे ५, सर्व गोष्टी त्या श्रेष्ठ परमेश्वराच्या शरीराप्रमाणेच होत १ समुद्र हा इतर नद्याप्रमाणे नव्हे.
शिवलिंग पाषाणाचे असले तरी तो काही पाषाण नव्हे, त्याचप्रमाणे संत हे जगातील इतर लोकासारखे नव्हेत २
वेताची काठी ही इतर काठीसारखी म्हणू नये सातु इतर धान्याप्रमाणे समजू नयेत राम राम हा जप इतर
शब्दासारखा नाही ३ इतर ताऱ्याप्रमाणे चंद्र व सूर्य यांना समजू नये मेरु पर्वत इतर पर्वताप्रमाणे सांधा नाही, शेष
व वासुकी हे इतर सामान्य विषारी सर्पाप्रमाणे नाहीत ४ गरुड हा काही सामान्य पक्षी नव्हे शंकराचा नंदी
हा काही इतर बैलासारखा नाही, इतर झाडाप्रमाणे कल्पतरूही नव्हे, इतर गाईसारखीच कामधेनू समजू नये ५
भगवंताचा अवतार कूर्मकासव हे इतर कासवाप्रमाणे नाही, वराह म्हणजे डुक्कर खरा, पण तो इतर डुकरा-
प्रमाणे नाही सर्व जीवाप्रमाणे वासुदेव नव्हे ही लक्ष्मी साधी स्त्री म्हणू नये ६ इतर सामान्य हाडात गवाक्ष-
गाईच्या डोळयाची गणना करू नये रेशमी वस्त्र हे इतर कापडाप्रमाणे कसे असेल ? परीस इतर दगडासारखा
नाही जे जे सगुण म्हणजे विशेष गुणांनी युक्त आहे ते ते ईश्वराचे अंग मानावेत ७ सोने हा धातु इतर धातू-
पासून वेगळाच मानायला हवा साध्या रेतीवाळूपेक्षा मीठ वेगळेच असते कृष्णाजिन व व्याघ्रांबर हे इतर प्राण्याच्या
चामड्याप्रमाणे नाही ८ मुक्ताफळांची, मोत्याची किंमत गारगोटीशी कशी होईल ? हिऱ्याची सर खड्यांस कशी
येईल ? जीव हा त्या शिवाचा अंश असल्याने तो आपलाच समजून सोप्याप्रमाणे त्यास वाटेल तसे वागविणे युक्त
होणार नाही ९ द्वारका हे गाव इतर गावाप्रमाणे नव्हे रणछोडाची मूर्ती ही इतर मूर्तीसारखी नाही गोमती हे
तीर्थ इतर तीर्थांहून फारच वेगळे आहे तिच्या दर्शनानेच मोक्ष घडतो १० श्रीकृष्ण हा काही वरवर दिसतो तसा
भोगी नाही, शंकरही त्याने अंगाला राख फासली असली तरी इतर जोग्याप्रमाणे तो नव्हे तुकाराम महाराज
म्हणतात, पाडुरंगाच्या प्रसादाने हा फरक मला समजला आहे ११

विवरण - या सुदर अभंगात एक तत्त्व तुकारामबुवांनी फार चांगल्या प्रकारे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट
केले आहे श्रीकृष्ण व शिवशंकर यांची एकरूपता वर्णन करणे व तसे ऐक्य प्रस्थापित करणे हे तर भागवत संप्रदा-
याचे धोरण होते. पण कृष्ण व शिव यांच्या वरवरच्या आचरणावरून त्यांना इतर सामान्य माणसाप्रमाणे समजू
नये हे पटविण्यासाठी तुकारामबुवांनी अनेक उदाहरणे या अभंगात दिलेली आहेत. ज्या वस्तूस ईश्वराचा स्पर्श झाला
आहे, अथवा जीत ईश्वरी तत्त्वाचा वास अंम आहे ती स्वजातीयापासून वेगळीच मानावयास हवी तुकोबांचा हा
सामर्थ्याने शोभणारा अभंग वाचून भगवद्गीतेमधील विभूतिविस्ताराच्या निरुपणाचा प्रसंग आठवतो सर्व जगत्,
स्थिरचर वस्तू यांची अभिव्यक्ती एकाच ईश्वरी तत्त्वापासून असली तरी ज्या वस्तूत परमेश्वराचा दिव्यांश विशेष
रूपाने असतो त्या वस्तू आपल्या वैशिष्ट्याने वेगळयाच दिसतात व असतात, जी जी वस्तू वैभव, लक्ष्मी, प्रभाव,
ईश्वरसान्निध्य, किंवा ईश्वरस्पर्शित आहे ती वेगळीच म्हटली पाहिजे

सौऱ्या – अभंग ११

४५५ वेसन गेले निष्काम जाले नर नव्हे नारी ।
आपल्या तुटी पारख्या भेटी सौरियांचे फेरी ॥ १ ॥
त्याचा वेध लागला छंद हरि गोविंद वेळोवेळां ।
आपुलेमागें हासत रागें सावले घालिती गळां ॥ २ ॥
जन वेपा भीते तोडा आमुच्या भांडपणा ।
कर कटीं भीमा तटीं पंढरीचा राणा ॥ ३ ॥
वेगळया याति पडिलो संतीं अवघ्या एका भावे ।
टाकियेली चाड देहभाव जीवें शिवे ॥ ४ ॥
सकळांमधीं आगळी बुद्धि तिची करूं सेवा ।
धाय तुंबामूढासवे भक्ती नाचो भावा ॥ ५ ॥
म्हणे तुका टाक रुका नाचो निर्लज्जा ।
बहु जाले सुख काम चुकलो या काजा ॥ ६ ॥

शब्दार्थ व टीपा :- सौरी-निर्लज्ज स्त्री, चोचाल स्त्री, भावीण, मुरळी, देवदासी, वेसन-व्यसन,
सावलें-वस्त्र, धाय-व्यर्थ

अर्थ :- सकामातेचे माझे व्यसन आता संपले. मी आता निष्काम झाले आहे त्यामुळे मी नारीही नव्हे व
पुरुषही नव्हे, अशा स्थितीत आहे आपल्या स्वरूपाची संगत कमी होऊन परपुरुषाची म्हणजे परमेश्वराची जडू
लागली की सौऱ्याच्या संगतीने असा प्रकार घडून येतो १ त्या श्रेष्ठ पुरुषाचा मला छंद एकसारखा लागल्यामुळे
मी हरी, गोविंदा असे पुनः पुनः म्हणत आहे मग माझ्या पाठीमागे माझे सगेसोयरे मला हसत असतात व रागाने
गळघात वस्त्र घालतात २ लोक आमच्या वेषाला भितात, आमच्या भाडखोर स्वभावामुळे कोणी आमच्या तोंडास
लागत नाहीत. पण कमरेवर हात ठेवून भीमा नदीच्या तीरावर जो पंढरीराया उभा आहे, त्याच्याशी मी रमले
आहे ३ त्याचीच एकाची भाव धरून भक्ती केल्यामुळे आमची जात वेगळी झाली. आम्ही देहभावाची व
संसाराची लाज जीवाशिवाच्या ऐक्यासाठी सर्व सोडून दिली आहे. ४ सर्वांहून जी श्रेष्ठ बुद्धीची आहे तिची सेवा
आम्ही मनोभावे करू, मोठ्या भक्तिभावाने नाचू व्यर्थ मूर्खाबरोबर न राहू ५ तुकाराम महाराज म्हणतात,
पैशासाठी निर्लज्जपणे नाचण्याचे सोडून दे या कामातील तुझे लक्ष कमी झाले म्हणजे कायमचे सुख होईल ६

२३८ सार्थ तुकारामगाथा
४५६ आणिकां उपदेशूं नेणें नाचों आपण ।
मुंढा¹ वांयां मारगेली वांयां हांसे जन ॥ १ ॥
तैसा नव्हे घाला आवरों मन डोळा ।
पुढिलांच्या कळा कवतुक जाणोनी ॥ २ ॥
बाहिरल्या येषें आंत जसें तसें ।
झाकलें तों बरें पोट भरे तेणें मिसें ॥ ३ ॥
तुका म्हणे केला तरी करीं शुद्ध भाव ।
नाहीं तरी जासी यांयां हा ना तोसा ठाव ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- मुंढा-हिजड्याचा सोबती, हा ना तोसा-ना स्वार्थाचा, ना परमार्थाचा.
अर्थ :- दुसऱ्यांना उपदेश देऊ नये. आपणच काय नाचायचे ते नाचावे. या मार्गास लागलेला सोबती मुढा
हाही वायाच गेलेला असतो. त्याला लोक हसतात १ तेव्हा त्याच्याप्रमाणे खोटाच चाळा न करता मन आवरून
धरावे. दृष्टी सावरावी. पुढे गेले आहेत त्यांचे गुण कौतुकाने घ्यावेत. २ बाहेरचा चांगला वेष काय उपयोगाचा ?
आतील विकार जसेच्या तसेच असले तर ते झाकलेले बरे. बाह्य वेषाने पोट तरी भरेल. ३ तुकाराम महाराज
म्हणतात, तुम्ही आपला भाव शुद्ध कराल तर बरे. नाही तर वाया जाल. ना स्वार्थ, ना परमार्थ अशी अवस्था तुमची
होईल ४
४५७ टाक रुका चाल रांडे कां गे केली गोवी ।
पुसोनियां आलें ठाव म्हणोनि देतें शिवी ॥ १ ॥
आतां येणें छंदें नाचों विनोदें ।
नाही या गोविंदें माझें मजसी केलें ॥ २ ॥
कोरडे ते बोल कां गे वेचितेसी वांयां ।
थतें करूनि दावीं तुझ्या मुळींचिया ठाया ॥ ३ ॥
याजसाठीं म्या डोर धरियेला हातीं ।
तुका म्हणे तुम्हा गांठी सोडायाची खांती ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- रुका-अभिमान, गोवी-गुंतवणूक, डौर-एक वाद्य, डमरू
अर्थ :- अग रांडे, तू देहाचा अभिमान सोडून दे ना ह्या गुंतवणुकीत का राहतेस ? चल मजबरोबर मी ह्या
अभिमानाचे स्थान सोडून दिले आहे म्हणून तर तुला शिवी देत आहे १ या गोविंदाने माझा मीपणा नाहीसा केला;
म्हणून आता याच्याच नादाने मोठ्या मस्तीने व गमतीने याच्या संगतीत नाचू या. २ तू तुझ्या अंतःकरणांतील
हे कोरडे बोल व्यर्थ का खर्च करतेस ? तुझ्या मूळच्या ठिकाणी ते प्रकट करून दाखोव ना. ३ यासाठीच मी हातात
हा डोर धरला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देहाच्या अभिमानाची ही गाठ मला आता सोडवायची आहे. ४
४५८ मोकळी गुंत रितो कुंथ्ये नाहीं भार दावें ।
घेडवाडा बैसली खोडा घेतली आपुल्या भावें ॥ १ ॥
ऐका बाई लाज नाहीं² आणिकां त्या गरतीची ।
समाधानों उंच स्थानीं जाणे सेवा पतीची ॥ २ ॥
१ मुदा, २ काही

न बोलतां करी चिंता न मारितां पळे ।
वादला सेज नावडे निजे जगझोडीचे चाळे ॥ ३ ॥
देखत आंध बहिर कानों बोल बोलतां मुकें ।
तुका म्हणे पतन सोयरीं ऐसीं जालीं एकें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- रिती-रिकामी, धेडवाडा-महारवाडा, गरतीबो-कुलीन स्त्रीची
अर्थ :- ही मोकळी असून गुंतली आहे. दर डोक्यावर कांही ओझे नसूनही भाराने कुथत आहे आणि
आपल्याच देहभावाच्या छोडघामध्ये, देहरूपाम्च्या महारवाड्यात अडकून बसली आहे. १ आणि एक बाई, त्या
कुलीन स्त्रीची लाज तुला वाटत नाही का ? ती पतीची सेवा करुन कशी समाधानात उंच ठिकाणी असते. २
कुणी काही रागाने बोलत नसताही चिंता करणे व कुणी मारीत नसताना पळून जाणे, शेजेवर आपला नवरा न
आवडणे हे जगझोडीचे, चवचाल स्त्रीचे चाळे असतात. ३ देव पाहात नसल्यामुळे याचे डोळे आंधळेच
असतात. त्यांची कीर्ती कानावर येत नसल्याने ते बहिरेच असतात, त्याची स्तुती तोंडात नसल्याने ते मुके असतात.
तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारची माणसे नरकलोकाचेच पाहुणे झाले आहेत ४
४५९ सातें चला काजळ घाला तेल फणी करा ।
दिवाणदारीं बैसले पारों नाचों फेर घरा ॥ १ ॥
या साहेबाचें जालें देणें वेळोवेळां न लगे येणें ।
आतां हाटों काशासाठीं हिंडों पाटी बुकानें ॥ २ ॥
अवघ्या जणी मुंडा धणी नाचों एकें घाईं ।
सरसावलें सुख कैसा चाळा एके ठायीं ॥ ३ ॥
तुका म्हणे वोळगों एका तोड चिंता माया ।
देऊं उद्गार आतां जाऊं मुळींचिया ठाया ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- सातें-बाजारात, वोळगो-शरण जाऊं
अर्थ :- शायांनो, चला बाजारात जाऊ डोळ्यात काजळ घाला, तेलफणी नीट करा. समोर पारावर
दारात दिवाणजी बसले आहेत त्याच्या भोवती फेर धरून नाचू या. १ या साहेबाचे आपणांस वरचेवर कर्ज झाले
आहे, देणे आहे. ते एकदा देऊन टाकले म्हणजे मग पुनः वरचेवर यायला नको. आता बाजारात त्याच्यासाठी मग
दुकानांतून हिंडावे लागणार नाही. २ या निर्विकार धन्याभोवती आपण सर्वजण फेर धरून नाच करू या या एका
ठिकाणी जर सुख मिळाले तर मग निरनिराळ्या ठिकाणी जाण्याचा चाळा उगाच कशासाठी ? ३ तुकाराम
महाराज म्हणतात, चिंता व मायाममता सोडून यासच शरण जाऊ. याच्यापाशी सर्व काही सांगून याच्या मूळ गांवे
जाऊ या. ४
४६० सोरी सुर जालें दुर डोर घेतला हातीं ।
माया मोह सांडवले तीही लोकीं जालें सरती ॥ १ ॥
चाल धिठाबाई अवघो पांज¹ देईं ।
न घरीं गूज कांहीं वाळवंटीं सांपडतां ॥ २ ॥
हिंडोनि चौऱ्याशी घरें आलें तुझ्या दारा ।
एक्या रूपयासाठीं आंचवलें संसारा ॥ ३ ॥
१ पाच.

२४० सार्थ तुकारामगाथा
लाज मेली शंका गेली नाचोँ महाद्वारीं।
भ्रांति सावलें फिटोनि गेलें आतां कैची उरी ॥ ४ ॥
जालें भांडीं जगा सांडी नाहीं भीड चाड।
घालीन चरणीं मिठी पुरविन जीविंचें तें कोड ॥ ५ ॥
तुका म्हणे रुकारो संसारतुटी।
आतां तुम्हां आम्हां कैसी जालो जीवे साटीं ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- सुर-शूर, दुर-दुरावले, पांज-पंचभूतात्मक देह, सावले-वस्त्र, भांडी-भांडण
अर्थ :- हातामध्ये ढोर घेऊन मी शूर सौरी झाले आहे. सर्व प्रकारचे मायामोह सोडून मी तीनही लोकांना
श्रेष्ठ ठरले आहे. १ विठाबाई, हा देह पंचभूतात्मक आहे. पण वाळवंटात या पंढरपुरास आले असता काही गुप्त
गोष्ट मनात ठेवू नकोस. २ चौऱ्याऐंशी लक्ष योनींचे जन्म हिंडून मी आज शेवटी तुझ्या घरी आले आहे; तुझ्या
नामाच्या एका रुक्यासाठी मी माझा संसारही सोडून दिलेला आहे. ३ माझी सर्व लाज संपली; शंकाही दूर झाली;
मी आता या महाद्वारात नाचत आहे. भ्रांतीचे वस्त्रही मी आता टाकून दिले आहे. आता देहभावाचे काय तसे उरले
आहे ? ४ सर्वांशी माझे भांडण झाल्यामुळे मी सर्व जगाचा संबंध सोडून दिलेला आहे. मला आता कुणाचीच
भीडभाड नाही. आता मी तुझ्याच चरणांवर मिठी घालून माझ्या जीवाची इच्छा पूर्ण करीन. ५ तुकाराम महाराज
म्हणतात, तुझ्या नामाचा रुका मला प्राप्त झाला म्हणजे संसार संपून जाईल व जीवावर उदार होऊन तुमची-आमची
कशीतरी भेट होईल. ६
४६१ सम सपाट बेसरूकाट निःसंग जालें सौरी ।
कुडपीयेला देश आतां येऊं नेदीं दुसरी ॥ १ ॥
गाऊं रघुरामा हेंच उरलें आम्हां ।
नाहीं जीवतमा वित्तगोतासहीत ॥ २ ॥
ठाव जाला रिता झाकुनि काय आतां ।
कोणासवें लाज कोण दुजा पाहता ॥ ३ ॥
सौरीयांचा संग आम्हां दुरावलें जग ।
भिन्न जालें सुख भाव पालटला रंग ॥ ४ ॥
लाज भय क्षणो नाहीं तजियेली दोन्ही ।
फिराविला वेष नव्हों कोणाचींच कोणी ॥ ५ ॥
तुका म्हणे हा आम्हां वेष दिला जेणें ।
जनाप्रचित सर्वै असों एकपणें ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - कुडपीयेला-व्यापून टाकला, सर्वे-बरोबर.
अर्थ :- सर्व संग सोडून, सर्व व्यसने संपवून मी निःसंगपणाने सौरी झाले आहे. आता हा देश मीच एकटीने
व्यापला असल्याने दुसऱ्या कुणास येऊ देणार नाही इथे. १ आता त्या रघुरामाचे नामस्मरण गाऊ हेच एक काम
आम्हांस उरले आहे. आता आम्हास आमच्या जिवाचीही काळजी नाही, की धनदौलत व नातेवाईक लोक यांची
चिंता नाही. २ हा सर्वच देहभाव संपलेला असल्यामुळे आता त्यास झाकून काय उपयोग ? आता कुणासाठी लाज
धारण करायची ? त्याच्यावाचून आता पाहणारे तरी दुसरे कोण आहे ? ३ सौऱ्यांच्या संगतीने आम्हांला हे जग
दुरावले आहे; पण त्यामुळे फार वेगळ्या प्रकारचे सुख आम्हांस मिळून त्याने आमच्या मनाचा भाव पालटला
आहे. ४ आता लोकांची भीती व लाज दोन्ही आम्ही सोडून दिली आहे. आता आम्ही पूर्वीचा वेषही टाकून देऊ.

सार्थ तुकारामगाथा २४१
दुसरा वेष धारण केल्यामुळे आम्ही आतां कुणाचेही नव्हें ५ तुकाराम महाराज म्हणतात की, ही सोरी म्हणते,
हा वेष ज्याने आम्हांस दिला त्याच्या भावाने आम्ही या जनाबरोबर एकट्याने राहू. ६
४६२ नव्हे नरनारी संवसारीं अंतरलों ।
निर्लज्ज निष्काम जना वेगळेचि ठेलों ॥ १ ॥
चाल रघुरामा ने आपुल्या गांवा ।
तुजविण आम्हां कोण सोयरा सांगाती ॥ २ ॥
जनवाद लोकनिंद्य पिशुनाचे चेरे ।
साहूं तुजसाठीं अंतरलीं सहोदरें ॥ ३ ॥
बहुता पाठीं निरोप हातीं पाठविला तुज ।
तुका म्हणे आतां सांडुनि लौकिक लाज ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- पिशुनाचे-चहाडखोराचे, सहोदरें-सख्खे भावंडे
अर्थ - आम्ही पुरुषही नाही व स्त्रीही नाही. आम्ही संसारासही आंचवलो आहोत. लाज टाकून देऊन,
निष्काम होऊन, आम्ही या लोकांपेक्षा निराळेच झालो आहोत. १ रघुनाथा, तू आम्हास तुझ्या गावी घेऊन जा.
तुझ्याशिवाय आम्हास कोण रे आता सोबतीचे सोयरे आहेत ? २ या लोकांचे प्रवाद, लोकांची निंदा, चहाडखोर
लोकांचे फजितीचे बोलणे, देवा, तुझ्यासाठीच सहन करू रे. आमची भावंडेही तुजसाठीच अंतरली आहेत. ३ आज
पुष्कळ मोठ्यांच्या बरोबर तुला मला घेऊन जाण्यासाठी निरोप पाठविला तुकाराम महाराज म्हणतात, ही सोरी
लौकिक लाज सोडून तुझ्यासाठीच भक्तिभावाने उत्सुक आहे. ४
४६३ नीट पाट करूनि थाट । दावीतसे तोरा ।
आपणाकडे पाहो कोणी । निघाली बाजारा ॥ १ ॥
ते सोरी नव्हे निकी । भक्तीविण फिकी ॥ २ ॥
चांग भांग करूनि सोंग । दावी माळा मुदी ।
रुपयाची आस धरूनि । हालवी ती फुदी ॥ ३ ॥
थोरे घरीं करी फेरी । तेथें नाचे बरी ।
जेथें निघे रुका । तेथें हालवी टिरी ॥ ४ ॥
आंत मांग बाहेर चांग । सोरी ती नव्हे तेग ।
तुका दास नटतसे । न करी त्याचा संग ॥ ५ ॥

२४२ सार्थ तुकारामगाथा
४६४ चाल माझ्या राघो । डोंगरीं दिवा लागो ॥ १ ॥
घर केलें दार केलें । घरीं नाहीं वरो ।
सेजारणी पापिणीचीं पांच पोरें मरो ॥ २ ॥
घरीं पांच पोरें । तीं मजहूनि आहेत थोरें ।
पांचांच्या बळें । खादलीं बावन केळें ॥ ३ ॥
घर केलें दार केलें । दुकान केला मोठा ।
पाटाची राणी धांगडधिंगा तिचा मोठा ॥ ४ ॥
दुकान केला मोठा । तर पदरीं रुका खोटा ।
हिजडा म्हणसी जोगी । तर सोळा सहस्र भोगी ।
तुका म्हणे वेगीं । तर हरि म्हणा जगीं ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - वरो~पुत्रकळ
अर्थ :- माझ्या राघो, तू माझ्याबरोबर चल. डोंगरावर दिवा लागू द्यात. १ मी घर केले, दार केले;
म्हणजे लग्न केले. पण घरात मूलबाळ नाही झाले. परंतु शेजारणीस मात्र पाच पोरे आहेत. ती मरून जाऊ द्या. २
माझ्याही घरी पाच पोरे माझ्यापेक्षा थोर आहेत या पाचांच्या बळावर मी बावन्न केळी खाल्ली आहेत. या पच
कर्मेंद्रियांनी उत्तम भोग घेतले. ३ मी घरदार केले, प्रपंच उभारला, मोठे दुकान घालून व्यापार केला. पाट लावून
पट्टराणी एक आणली. पण तिचा धांगडधिंगाच फार आहे. ४ मी मोठे दुकान घातले खरे, पण माझ्या पदरात
मात्र खोटा रुपयाच पडला. मला हिजडा, योगी म्हणू लागले. तुकाराम महाराज म्हणतात, मग अशा वेळी
सोळासहस्र नारी भोगूनही जो खराच जोगी राहिला, त्या श्रीहरीचे नामस्मरण घटकन करा. ५
४६५ जन्मा आलिया गेलिया परी । भक्ति नाहीं केली ।
माझें माझें म्हणोनियां । गुंतगुंतों मेलीं ॥ १ ॥
येथें कांहीं नाहीं । लव गुरूच्या पायीं ।
चाल रांडे टाकीं रुका । नको करूं बोल ।
गुरुविण मार्ग नाहीं । करिसी तें फोल ॥ २ ॥
खाउनी जेउनि लेउनि नेसुनि । म्हणती आम्ही धन्या ।
साधु संत घरा आल्या । होती पाठमोऱ्या ॥ ३ ॥
वाचोनि पढोनि जाले शाहणे । म्हणती आम्ही संत ।
परनारी देखोनि त्यांचें । चंचळ जालें चित्त ॥ ४ ॥
टिळा टोपी घालुनि माळा । म्हणती आम्ही साधू ।
दयाधर्म चित्तीं नाहीं । ते जाणावे भोंदु ॥ ५ ॥
कलियुगीं घरोघरीं । संत जाले फार ।
वीतिभरी पोटासाठीं । हिंडती दारोदार ॥ ६ ॥
संत म्हणती केली निंदा । निंदा नव्हे माई ।
तुका असे अनन्य भावें शरण संतां पायीं ॥ ७ ॥

सार्थ तुकारामगाथा २४७
पैसा सर्व टाकून दे. उगाच व्यर्थ बडबड करू नकोस श्रीगुरूच्या प्राप्तीशिवाय दुसरा मार्ग नाही. इतर सर्व करशील ते
फोल आहे. २ चांगले खातेस, नेसतेस आणि वर म्हणतेस, आम्ही देवाच्या दासी आहोत. पण साधुसंत घरी येताच
पाठमोऱ्या होऊन पळून जाता, नाही का ? ३ असेच सत वरवरचे झाले आहेत वाचून, पडून शहाणे झाले व
आम्ही सत झालो असे म्हणतात, पण दुसऱ्याची स्त्री पाहताच याचे चित्त विचलित होते. ४ याच्या कपाळावर
टिळा असतो, टोपी डोक्यावर साधूंसारखी असते, गळयात माळा असतात. आम्ही साधू असेही हे म्हणतात, पण
याच्या चित्तात दयाधर्म नसल्यामुळे हे भोंदूच समजायला हवेत ५ या कलियुगात संत घरोघरी फारच झाले
आहेत पण गोतभर पोट भरण्यासाठी ते दारोदार हिंडत राहिले आहेत. ६ संत म्हणतील याने आमची निंदा केली,
पण तुकाराम महाराज म्हणतात, बधूनो, ही निंदा नव्हे खऱ्या सतांच्या पायी हा मी नेहमी अनन्य भावाने
शरण आहे ७
विवरण - मराठी संतांच्या भारूड वाङ्मयात निरनिराळे धंदे करणाऱ्या लोकांच्या बरोबर सौरी ही एक
असते सौरी म्हणजे वाईट चालीची, पण देवाची नाते जोडणारी बाजारबसवी स्त्री असाच वरवरचा अर्थ आहे
जगतीने वा कुणाच्या फसवणुकीने ही स्त्री वाईट नादी लागने व मग मनात विकार असून देवाच्या नावावर देवदासीचा
व माधुर्याचा आविर्भाव आणते हिच्याभोवती अनेक माणसे टपून असतात देवाच्या भावाखाली चाललेल्या या
विक्षिप्त प्रकाराची तुकारामबुवांनी कडाडून हजेरी घेतली आहे पायातळूकू लावून, नट्टापट्टा करुन जाणाऱ्या व
केवळ पैशावर नजर ठेवणाऱ्या सौरीचा बुवांनी निषेधच केलेला आहे या सौरीच्या भोवती जमणारा गोतावळा मोठा
चमत्कारिकच असतो ना पुरुष, ना स्त्री अशांपैकी हिजडे गळ्यात कवडयाची माल घालून देवीचे, खंडोबाचे भक्त
स्वतःस म्हणवितात त्याच्या मनातील दुःखाचा, त्यांच्या संसाराचा निर्देश तुकोबांनी मोठ्या मार्मिकतेने वरील
काही अभंगातून केलेला आहे
खरोखरच चुकून फसली गेली आहे मनातूनच लौकिकाला विटून देवाच्या दारी आलेली आहे मनात
ईश्वरप्रेम दाटून आले आहे अशा सौरीबद्दल तुकोबाच्या मनात नक्की आस्था आहे, किंवा एखाद्या वेळेस वाकडे
पाऊल पडले असेल, पण आता पश्चात्तापाने दग्ध झाल्यावर जर ईश्वरभक्तीची जोड मिळाली तर सौरी सौरी राहू नये
असाही या अभंगाच्या मागचा हेतू असावा 'सौरी' सुद्धा शुद्ध भाव धरून ईश्वरकृपेस पात्र होऊ शकते अशी
उदाहरणे पिंगळा, कान्होपात्रा इत्यादी पतित समजल्या जाणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीतीलच माहीत काय ?
'सौरी'वर एकनाथ, ज्ञानेश्वर यांसारख्या संतांनीही पद्यरचना केलेली आहे ज्ञानेश्वरांच्या 'सौरीने' 'होय
सौरी आता उघडा घाली माथा । परपुरुषां रमल्या वाई त्याची पतिव्रता' असे म्हटले आहे दुसरी एक सौरी म्हणते,
'धर्मास्तव झालों सोरा । मेलों पंढरपुरा । संत सनकादिका मेळीं ठोर वाईला पुरा-।' या शब्दांतून सौरीचे पश्चात्ताप-
युक्त अंतःकरण स्पष्ट दिसते परंतु एकनाथतुकारामांनी सौरीचे धाष्ट्र्य व फसवे चाळेही वर्णन केले आहेत
मुसलमानी सत्तेत नाना आपत्ती स्त्री जातीवर आल्या 'मी मुल्लाची कन्यका झाले वाढविली घरीं । देखतां देखतां
उचलून नेली चोरी ॥ सौरी झाले बाई आता करू तरी बाई ?' असे अगतिक होऊन एक सौरी म्हणत आहे, तर
दुसरीचे वर्णन पाहा कसे आहे ते ' येणी फणी वानाळ कुंकू केला टाकनटिका । बांधुनि बुचडा उघडा माथा
विभूतीचा पट्टा । आला गेला म्हटला नाहीं धरल्या चारी वाटा । जानी भ्रष्ट झाली सौरी हिंडे दारोदारीं ॥' अशाच
सौरीचे तुकोबांनीही वरील काही अभंगात वर्णन केलेले दिसून येईल सारांश, वरवरच्या सोंगपेक्षा, देखाव्यापेक्षा,
अंतरंगातील भावभक्तीला महत्त्व आहे ती जर असेल तर 'सौरी'ला सुद्धा आयुष्याचे सार्थक करता येण्यासारखे आहे
वाघा-अभंग १
४६६ अनंत जुगाचा देव्हारा । निजबोधांचा घुमारा ।
अवचिता भरला वारा । या मल्हारी देवाचा ॥ १ ॥
शुद्धसत्त्वाचा कवडा मोठा । बोधबिरडें वाघला गांठा ।
गळां वैराग्याचा पट्टा । वाटा दावूं या भक्तीच्या ॥ २ ॥

सार्थ तुकारामगाथा २४५
४६८ तुम्ही तरी सांगा कांहीं । आम्हांविशीं रखुमाबाई ॥ १ ॥
कांहीं उरले तें ठायीं । वेगीं पाठवूनी देईं ॥ २ ॥
टोकत बैसलो देखा । इच्छीतसे ग्रासा एका ॥ ३ ॥
प्रेम देउनि बहुडा जाला । तुका म्हणे विठ्ठल बोला ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- टोकत-टुकुटुकू बघत, बहुडा-बदली
अर्थ - रुक्मिणी आई, रखुमाई, तुम्ही तरी या विठ्ठलास आमच्याबद्दल काही सांगा ना १ काही उरले
असेल तर सत्वर पाठवून द्या ना आमच्यासाठी २ पाहा ना मी कसा तुमच्याकडे टुकुटुकू पाहात बसलो आहे.
एकाच घासाची इच्छा धरून मी आहे. ३ प्रेमभक्ती देऊन मी या पाडुरंगास बदली म्हणून घेतले आहे. तुकाराम
महाराज म्हणतात, या विठ्ठलाचा जयजयकार करा ना ४
४६९ वाट पाहें वाहे निडळीं ठेवुनियां हात । पंढरीचे वाटे दृष्टि लागले चित्त ॥ १ ॥
कईं येतां देखें माझा मायबाप । घटिका बोटें दिवस लेखीं धरुनियां माप ॥ २ ॥
डावा डोळा लवे उजवी स्फुरते बाहे । मन उताविल भाव सांडुनियां देहे ॥ ३ ॥
सुखसेजे गोडचित्तीं न लगे आणीक । नाठवे घर दार तान पळाली भूक ॥ ४ ॥
तुका म्हणे धन्य दिवस ऐसा तो कोण । पंढरीचे वाटे येतां मूळ देखेन ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - वाहे-डोलावतो, निडळीं-कपाळावर, बाहे-बाहू, मूळ-आमंत्रण
अर्थ :- मी कपाळावर हात ठेवून या विठ्ठलाची वाट पाहात आहे माझी दृष्टी पंढरीच्या वाटेस लागली
असून माझ्या चित्तात तोच एक विषय आहे १ हा माझा विठ्ठल मायबाप आलेला मी कधी बरे पाहीन ? घटिका,
बोटे वगैरेंच्या साहाय्याने मी दिवस मोजून, लिहून ठेवीत आहे. २ मला शकुनही फार चांगले होत आहेत डावा
डोळा लवंत आहे आणि उजवा हात स्फुरण पावत आहे माझे मन उतावीळ बनून देह सोडून जणू भावभक्तीने त्याला
भेटायला निघाले आहे. ३ सुखाच्या शय्येवर मला काहीही गोड लागत नाही. मला घरदारसुद्धा आठवत नाही
माझी तहानभूक पळून गेली आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, असा धन्यतेचा दिवस कधी उगवेल ? पंढरपूरच्या
वाटेचे आमंत्रण मला केव्हा येईल ? तो पंढरीराणा मला केव्हा बोलावील ? ५
४७० तुझें दास्य करूं आणिका मागों खावया ।
धिग् १ जाले जिणे माझें पंढरीराया ॥ १ ॥
काय गा विठोबा तुज म्हणावें ।
थोराच्या दैवे गोड शुभअशुभ ॥ २ ॥
संसाराचा धाक निरंतर आम्हांसी ।
मरण भले परि काय अवकळा तैसी ॥ ३ ॥
तुझे शरणागत शरण जाऊं आणिकांसी ।
तुका म्हणे कवणा लाज हे कां नेणसी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- आणिका-दुसऱ्याना
अर्थ - देवा, तुझी भक्ती आम्ही करावी, तुझे दास्य करावे व खायला मात्र दुसऱ्याना मागावे असे माझे
जगणे पंढरीनाथा, धिक्कारयुक्त बनले आहे. १ विठोबा, तुला म्हणावे तरी काय ? तुझ्यासारख्या थोराच्या
सहवासात सर्व शुभ अथवा अशुभ आम्हाला गोडच आहे. २ देवा, या संसाराची धास्ती आम्हास निरंतर
असते. आणि या संसारात अशी दशा प्राप्त झाली आहे की ती अवस्था पाहून मरण बरे असे वाटावे. ३ तुकाराम
१ धन्य जिणे झाले

२४४ सार्थ तुकारामगाथा
हृदय कोटवा सागातें । घोळ वाजवू अनुहाते ।
ज्ञानभंडाराचे पोते । रिते नव्हे कल्पातीं ॥ ३ ॥
लक्ष चौऱ्याशीं घरे चारी । या जन्माची केली वारी ।
प्रसन्न जाला देव मल्हारी । सोहंभाव्यों राहिलो ॥ ४ ॥
या देवाचे भरता वारे । अगीं प्रेमाचे फेंपरे ।
गुरुगुरु करी वेडे चारे । पाहा तुके भुकविले ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - जुगाचा-युगाचा, घुमारा-संचार बिरडें-माळ कोटबा-लाकडी भिक्षापात्र, घोळ-वाद्य
अर्थ - अनंत युगाचा देव्हारा मी मांडला आहे यात निजबोधाचा संचार झालेला आहे या मल्हारी
देवाचा भाव अप्रतिहतपणे यात भरून राहिला आहे १ शुद्ध सत्याची मोठी कवडी येथे असून बोधाच्या माळेची
गाठ पक्की आहे गळध्यात वैराग्याचा पट्टा आहे आणि हा वाघ्या भक्तीच्या वाटा दाखवीत उभा आहे २ याने
आपल्याबरोबर हृदयरूपी लाकडी भिक्षापात्र घेतले आहे घटाच्या घोषाने हा जणू अनुहाताचा नादच करीत आहे
याच्या ज्ञानभांडाराचे पोते कल्पान्तीही कधी रिकामे होणारे नाही ३ चौऱ्यांशी लक्ष योनीत जन्म घेऊन या
माणसाच्या जन्मी याने चार घराची वारी केली आहे व त्यामुळे याला मल्हारी देव प्रसन्न झाला आहे, म्हणून तो
सोहम्भाव धारण करून आहे ४ या मल्हारी देवाचे वारे अंगात भरताच अंगात प्रेमाचे फेंफरे येते गुरुगुरु
करून वेडे चाळे केले तेव्हा त्याची गुरुभक्ती पाहून तुकारामाने त्यास बोलते केले आहे ५
विवरण - वाघ्या हा खंडोबाचा भक्त मुरळीबरोबर असतो देवीचे जसे गोंधळी, भुत्ये तसेच खंडोबाचे,
मल्हारीचे हे वाघे खांद्यावर घोंगडी, गळ्यात वाघाच्या कातड्याची भंडाऱ्याने भरलेली पिशवी असा हा वाघ्या
मल्हारीची गाणी गात हिंडत असतो वाघ्या व मुरळी ही खंडोबास अर्पण केलेली असतात मुलगा वाघ्या होतो
मुलगी मुरळी होते नवसास खंडोबा पावल्यास ही मुले देवास अर्पण करण्याची चाल असे वाघ्या स्वतःस खंडोबाचे
कुत्रे समजून गुरगुर आवाज काढतात याही अभंगात 'गुरुगुरु करी वेडे चारें' म्हणून तुकोबांनी उल्लेख केलेला
आहेच या वाघ्याच्या रूपावर एकनाथांनी काही भारूडे रचली आहेत 'अह वाघ्या सोह वाघ्या प्रेमनगरा वारी।
सावध होऊनि भजनी लागा । देव करा कंवारी' अस एकनाथांचा वाघ्या म्हणत आहे या वाघ्यांनी व मुरळ्यांनी
खंडोबाच्या भक्तीचा प्रसार महाराष्ट्रात केला असला तरी त्याच्या वागणुकीविषयी लोकांच्या मनात सदैव शंका
असे तुकोबांनी सोरी च्या निमित्तान देवदासीचे अंतरंग स्पष्ट केलेले आहेच
लळित - अभंग ११
४६७ आजी दिवस जाला । धन्य सोनियाचा भला ॥ १ ॥
झाले सत्ताचे पंगती । बरवे भोजन निगुती ॥ २ ॥
रामकृष्णनामें । बरवीं मोहियेली प्रेमें ॥ ३ ॥
तुका म्हणे आला । चवी रसाळ हा काला ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - लळित-देवाच्या उत्सवप्रसंगा शेवटी सोंगे वगैरे आणून कीर्तन करतात ते, निगुती-
सावधतेने
अर्थ - आज मोठ्या धन्यतेचा दिवस उगवला आहे हा सोन्याचाच दिवस आहे १ आज सताच्या
पंगतीचे भोजन सावकाशपणे झाले २ रामकृष्ण या नामस्मरणाने सर्व वातावरण मोठ्या प्रेमाने मोहित होऊन
गेले ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा भोजनसमारंभाचा कालाही ईश्वरी प्रसादाच्या चवीने मोठा रसाळ
झाला आहे ४

सार्थ तुकारामगाथा २४५
४६८ तुम्ही तरी सांगा कांहीं । आम्हांविशीं रखुमाबाई ॥ १ ॥
कांहीं उरलें तें ठायीं । वेगीं पाठवुनी देईं ॥ २ ॥
टोकत बैसलों देखा । इच्छीतसें ग्रासा एका ॥ ३ ॥
प्रेम देउनि यहुडा जाला । तुका म्हणे विठ्ठल बोला ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- टोकत-टुकुटुकू बघत, बहुडा-बदली.
अर्थ :- रुक्मिणी आई, रखुमाई, तुम्ही तरी या विठ्ठलास आमच्याबद्दल काही सांगा ना. १ काही उरले
असेल तर सत्वर पाठवून द्या ना आमच्यासाठी. २ पाहा ना मी कसा तुमच्याकडे टुकुटुकू पाहात बसलो आहे.
एकाच घासाची इच्छा धरून मी आहे. ३ प्रेमभक्ती देऊन मी या पांडुरंगास बदली म्हणून घेतले आहे. तुकाराम
महाराज म्हणतात, या विठ्ठलाचा जयजयकार करा ना. ४
४६९ वाट पाहें बाहे निडळीं ठेवुनियां हात । पंढरीचे वाटे दृष्टि लागलें चित्त ॥ १ ॥
कईं येतां देखें माझा मायबाप । घटिका घोटें दिवस लेखीं धरुनियां माप ॥ २ ॥
डावा डोळा लवे उजवी स्फुरते बाहे । मन उताविल भाव सांडुनियां देहे ॥ ३ ॥
सुखसेजे गोडचित्तीं न लगे आणीक । नाठये घर दार तान पळाली भूक ॥ ४ ॥
तुका म्हणे धन्य दिवस ऐसा तो कोण । पंढरीचे वाटे येतां मूळ देखेन ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- बाहे-बोलावतो, निडळीं-कपाळावर, बाहे-बाहू, मूळ-आमंत्रण.
अर्थ :- मी कपाळावर हात ठेवून या विठ्ठलाची वाट पाहात आहे. माझी दृष्टी पंढरीच्या वाटेस लागली
असून माझ्या चित्तात तोच एक विषय आहे १ हा माझा विठ्ठल मायबाप आलेला मी कधी बरे पाहीन ? घटिका,
बोटे वगैरेंच्या साहाय्याने मी दिवस मोजून, लिहून ठेवीत आहे. २ मला शकुनही फार चांगले होत आहेत. डावा
डोळा लवत आहे आणि उजवा हात स्फुरण पावत आहे. माझे मन उतावीळ बनून देह सोडून जणू भावभक्तीने त्याला
भेटावला निघाले आहे. ३ सुखाच्या खाटेवर मला काहीही गोड लागत नाही. मला घरदारसुद्धा आठवत नाही.
माझी तहानभूक पळून गेली आहे. ४ तुकाराम महाराज म्हणतात, असा धन्यतेचा दिवस कधी उगवेल ? पंढरपूरच्या
वाटेचे आमंत्रण मला केव्हा येईल ? तो पंढरीराणा मला केव्हा बोलाविल ? ५
४७० तुझें दास्य करूं आणिका मागों खावया ।
धिग्¹ जालें जिणें माझें पंढरीराया ॥ १ ॥
काय गा विठोबा तुज म्हणावें ।
थोराच्या दैवें गोड शुभअशुभ ॥ २ ॥
संसाराचा धाक निरंतर आम्हांसी ।
मरण भलें परि काय अयफळा तैसी ॥ ३ ॥
तुझे शरणागत शरण जाऊं आणिकांसी ।
तुका म्हणे कवणा लाज हें कां नेणसी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- आणिकां-दुसऱ्याना.
अर्थ :- देवा, तुझी भक्ती आम्ही करावी, तुझे दास्य करावे व खायला मात्र दुसऱ्यांना मागावे. असे माझे
जगणे पंढरीनाथा, धिक्कारयुक्त बनले आहे. १ विठोबा, तुला म्हणावे तरी काय ? तुझ्यासारख्या थोराच्या
सहवासात सर्व शुभ अथवा अशुभ आम्हांला गोडच आहे. २ देवा, या संसाराची धास्ती आम्हांस निरंतर
असते. आणि या संसारास अशी दशा प्राप्त झाली आहे की ती अवस्था पाहून मरण बरे असे वाटावे. ३ तुकाराम
१ धन्य जिणे झाले

२४६ सार्थ तुकारामगाथा
महाराज म्हणतात, देवा, आता दुसऱ्या देवांना मी शरण जाऊ काय ? देवा, ही लज्जेची गोष्ट आहे हे तुम्ही जाणीत
नाही काय ? ४
४७१ पुरविली आळी । जे जे केली ते ते काळीं ॥ १ ॥
माय तरी ऐसी सांगा । कृपाळुवा पांडुरंगा ॥ २ ॥
घेतलें नुतरी उचलोनि कडियेवरी ॥ ३ ॥
तुका म्हणे घास । मुखीं घाली ब्रह्मरस ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - आळी-हट्ट, कृपाळुवा-अत्यंत कृपाळू, नुतरी-न उत्तरी
अर्थ :- देवा, ज्या ज्या वेळीं जो जो हट्ट केला तो तो तू पुरविलास. १ विठ्ठला, जन्म देणारी प्रत्यक्ष आई
तरी एवढी कृपाळू असते का कधी ? २ देवा, तू आता मला उचलून काडेवर घेतले आहेस आता मी कांही खाली
उतरणार नाहीं. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठलाने माझ्या मुखात ब्रह्मरसाचा घास घातला आहे. ४
४७२ कथेची सामग्री । देह अवसानावरी ॥ १ ॥
नको जाऊं देऊं भंगा । गात्रें माझीं पांडुरंगा ॥ २ ॥
आयुष्य करों उणें । परी मज आवडो कीर्तन ॥ ३ ॥
तुका म्हणे हानी । या वेगळी मना नाणीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- अवसानावरी-सपल्यावर, गात्रे-अवयव, नाणीं-न आणी
अर्थ :- देवाचे कथाकीर्तन ऐकल्याचा उपयोग देह संपल्यावर लाभदायक आहे. १ देवा, तुझी कथा
ऐकता यावी म्हणून माझे सर्व अवयव शेवटपर्यंत शाबूत ठेवा. त्यांचा भंग करू नकोस. २ देवा, माझे आयुष्य
वाटले तर कमी कर, पण माझी कीर्तनाची आवड मात्र वाढीस लागू दे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, जर
कीर्तनाची आवड माझी कमी झाली तर त्यावेगळी दुसरी मोठी हानी नाही असेच माझ्या मनात येईल ४
४७३ गळित झाली काया । हेचि ललित पंढरिराया ॥ १ ॥
आलें अवसानापासीं । रूप राहिलें मानसीं ॥ २ ॥
पाहिला कळस । तेथें स्थिरावला रस ॥ ३ ॥
तुका म्हणे गोड जालें । नारायणीं पोट धाले ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- गळित-थकलेली, पाहिला-पहिला
अर्थ - देवा, माझे शरीर आता थकले आहे रे. आता हेच ललित समजायचे काय ? १ माझा आता देह-
पतनाचा शेवट जवळ आला असून माझे चित्त मात्र तुझ्याच रूपावर जडून राहिले आहे. २ आता दुरूनच मी तुझ्या
मंदिराचा कळस पाहिला. त्याच स्थानावर माझा भक्तिभाव स्थिरावून राहिला आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात,
या नारायणात सर्व वृत्ती स्थिरावल्यामुळे सारेच गोड गोड होऊन गेले पोट भरून राहिले. ४
४७४ रत्नजडित सिंहासन । वरी बैसले आपण ॥ १ ॥
कुंचे ढळती दोहीं बाहीं । जबळी रखुमाई राही ॥ २ ॥
नाना उपचारीं । सिद्धि डोळगती कामारी ॥ ३ ॥
हातीं घेऊनि पादुका । उभा बंदिजन तुका ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :-कुंचे-चवऱ्या, बोळगती-तत्पर आहेत, कामारी-काम करणारी
अर्थ :- या रत्नजडित सिंहासनावर स्वतः पंढरीनाथ बसला आहे. १ दोन्ही बाजूनी चवऱ्या ढळत
आहेत. जवळच राहीरुखमाई उभ्या आहेत २ नाना प्रकारचे उपचार करीत अनेक सिद्धी काम करण्यास तत्पर
झाल्या आहेत. ३ अशा वेळी स्वामीच्या पादुका घेऊन तुकोबा सेवकासारखा उभा आहे. ४

सार्थ तुकारामगाथा २४७
४७५ हिरा शोभला कोंदणीं । जडित माणिकांची खाणी ॥ १ ॥
तैसा दिसे नारायण । मुख सुखाचें मंडण ॥ २ ॥
कोटि चंद्रलीळा१ । पूर्णिमेच्या पूर्णकळा ॥ ३ ॥
तुका म्हणे दृष्टि धाये । परतोनि माघारी तें न ये ॥ ४ ॥
शब्दार्थ वटीपा :- धाये-संतुष्ट होते.
अर्थ :- रत्नजडित कोंदणात एखादा हिरा शोभून दिसावा, किंवा खाणीत माणीक शोभून दिसावे, १
तसा हा नारायण शोभून दिसतो आहे सर्व सुखाने हे श्रीमुख तेजस्वी व शोभिवंत दिसत आहे. २ पौर्णिमेच्या
कोटी चंद्रांच्या कळा याच्यापुढे फिक्याच वाटतील. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या सुंदर मूर्तीकडे पाहताच
दृष्टी सुखावून गेली आहे. ती तेथून परत माघारी फिरतच नाही. ४
४७६ पतित पतित । परी मी त्रियाचा पतित ॥ १ ॥
परी तूं आपुलिया सत्ता । मज करावे सरता ॥ २ ॥
नाहीं चित्तशुद्धि । स्थिर पायांपाशीं बुद्धि ॥ ३ ॥
अपराधाचा फेलो । तुका म्हणे किती बोलों ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- सरता-परिपूर्ण, त्रियाचा-तीन वेळा.
अर्थ:- देवा, मी पतित आहे असे त्रिवार, तीन वेळा मी म्हणत आहे. १ पण तू तुझी सत्ता गाजवून
मला परिपूर्ण करावे माझे पाप दूर करावे २ माझे चित्त शुद्ध नाही. तुझ्या पायांशी बुद्धिही स्थिर होत नाही. ३
देवा, मी अपराधाचाच जणू बनलो आहे आणखी तुला सांगू तरी किती ? ४
४७७ उभारिला हात । जगीं जाणविली मात ॥ १ ॥
देव बैसले सिंहासनीं । आल्या याचका होय२ धनी ॥ २ ॥
एकाच्या केंवाडें । उगवे बहुतांचें कोडें ॥ ३ ॥
दोहीं ठायीं तुका । नाहीं पडों देत चुका ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - केंवाडे-कैवारे, अंगीकार
अर्थ:- या देवाने अभयासाठी हात वर केला आहे. सर्व जगात ही गोष्ट समजून आली आहे, १ हा देव
आज सिंहासनावर बसून शोभत आहे. जो याचक भक्त येईल त्याचा तो धनी बनत आहे. २ एकाच्या अंगीकारामुळे
त्याने पुष्कळांना निवारण दिला आहे पुष्कळांच्या आयुष्याचे कोडे सोडविली आहेत. ३ तुकाराम महाराज म्हणतात,
या देवाच्या व त्याच्या भक्ताच्या ठिकाणी मी कधी चुका करीत नाही. किंवा हा चुका करू देत नाही ४
आशीर्वाद-अभंग
४७८-जीवेसाटीं यत्नभाव । त्याची नाव बळकट ॥ १ ॥
पैल तीरा जातां कांहीं । संदेह नाहीं भवनदी ॥ २ ॥
विश्वासाची धन्य जाती । तेथें वस्ती देवाची ॥ ३ ॥
तुका म्हणे भोळियांचा । देव साचा अंकित ॥ ४ ॥
ब्दार्थ व टीपा - सदेह-शंका.
अर्थ :- कोणताही प्रयत्न जीव समर्पण करण्याच्या भावनेने करावा. तरच बळकट नावेचे स्वरूप त्या प्रयत्नास
येते. १ या नावेतून तो पैलतीराला जाईल यात काहीच शंका नाही २ श्रीहरीवर विश्वास ठेवणाऱ्याची जात धन्य
१ चंद्रकला, २ पुरे

२४८ सार्थ तुकारामगाथा
होय त्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष देवाचीच वस्ती असते ३ तुकाराम महाराज म्हणतात खरोखर भोळ्या भावाने
भक्ती करणाऱ्याच्या स्वाधीन देव असतो ४
४७९ आशीर्वाद तया जाती । आवडी चित्तीं देवाची ॥ १ ॥
कल्याण तें असे क्षेम । वाढे प्रेम आगळें ॥ २ ॥
भक्तिभाग्यगाठी धन । त्या नमन जीवांसी ॥ ३ ॥
तुका म्हणे हरिचे दास । तेथें आस सकळ ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - क्षेम-सुखदायक स्थिती आस-आशा
अर्थ - ज्याच्या चित्तात देवाची अपार आवड असते त्यास पुढीलप्रमाणे आशीर्वाद असोत १ त्याचे कल्याण
असावे त्याला सुखदायक स्थिती प्राप्त व्हावी देवाविषयींचे त्याचे प्रेम असेच विशेष रूपाने वाढावे २ ज्याच्या
जवळ भक्तिभावाचे धन असेल त्या जीवाला माझा नमस्कार असो ३ तुकाराम महाराज म्हणतात जेथे हे हरीचे
दास असतात त्याच्या ठिकाणी माझी सर्व आशा आहे ४
४८० तया साटीं वेचू वाणी । आइकू कानीं वारता ॥ १ ॥
क्षेम माझे हरिजन । समाधान पुसता त्या ॥ २ ॥
परत्रींचे जे सांगाती । त्याची याती न विचारीं ॥ ३ ॥
तुका म्हणे धैर्यवंतें । निर्मळचित्तें सर्व्वीं तीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - वेचू-खर्च करून, परत्रीचे-परलोकाचे, याती-जात
अर्थ - पुढे दिलेल्या कार्यासाठी आम्ही आमची वाणी खर्च करू व कानांनी त्याचीच हकीगत आम्ही ऐकू १
माझे सर्व कुशल ते हरीचे दासच आहेत त्यांना विचारल्यास मला पूर्ण समाधान आहे २ परलोकीचे जे माझे
सांगाती, सोबती आहेत त्याची जात मी विचारणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व हरीचे सेवक
मोठे ध्येयवंत व निर्मळ असे आहेत ४
४८१ अभय उत्तर सती केले दान । जाले समाधान चित्त तेणे ॥ १ ॥
आता प्रेमरसे न घडे खंडण । द्यावे कृपादान नारायणा ॥ २ ॥
आले जें उचित देहविभागासी । तेणे पायांपासीं उभी असो ॥ ३ ॥
तुका म्हणे करी पूजन वैखरी । बोबडा उत्तरीं गातो गीत ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - वैखरी-वाणीन
अर्थ - तू काही भिऊ नकोस अशा शब्दांनी या संतांनी मला अभयदान दिले आहे त्यामुळे माझ्या मनास
फार समाधान झाले आहे १ आता या भक्तिप्रेमाच्या रसास खड पडणार नाही नारायणा, हीच कृपा आपण मला
द्यावी २ या देहाचे म्हणून जे जे उपचार असतील ते सर्व कर्तव्य म्हणून आम्ही करू याच्यासाठी आम्ही आपल्या
पायाशी उभे आहोत ३ तुकाराम महाराज म्हणतात मी देवाची पूजा माझ्या वाणीने करीत असतो व माझ्या
बोबड्या वाणीने त्याचे गीत गात असतो ४
४८२ असो मनहीन क्रिया । नका चर्या विचारू ॥ १ ॥
सेवेमधीं जमा धरा । कृपा करा शेवटीं ॥ २ ॥
विचारूनि ठाया ठाव । येथें भाव राहिला ॥ ३ ॥
आता तुक्यापाशीं हेवा । नाहीं देवा तातडी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - चर्या-रोजचे आचार, दिनचर्या

सार्थ तुकारामगाथा २४१
अर्थ :- देवा, आम्ही मंत्रतंत्र जाणीत नाही, आम्हांस विधिपूर्वक क्रियाकर्म माहीत नाही. त्यासंबंधी आम्हांस
काही विचारू नकोस. तरीसुद्धा तुला विनंती अशी की आमच्या दिनचर्येचा तू फार विचार करू नकोस २ आमचे
जे काही कमी पडेल ते आमची जी सेवा तुमचेकडे रुजू आहे त्यात जमा करून घ्यावे; व शेवटी आमच्यावर
कृपाच करावी. ३ देवा, आता या तुकारामापाशी कसलाही हेवादावा नाही, कसलीही हाव नाही किंवा कशाच्याही
विषयी घाई नाही. ४
४८३ ऐकें वचन कमळापती । मज रंकाची विनंती ॥ १ ॥
कर जोडितों कथाकाळों । आपण असावें जवळी ॥ २ ॥
घेईं ऐसी भाक । मागेन जरि कांहीं आणिक ॥ ३ ॥
तुकयाबंधु म्हणे देवा । शब्द इतुका^१ राखावा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - कमळापती-श्रीविष्णू, रंकाची-गरीबाची, भाक-वचन.
अर्थ :- कमळापती विष्णू, माझे एवढे वचन ऐका ना. माझी गरिबाची एक विनंती ऐका १ कथेच्या वेळी
हात जोडून मी विनवितो की आपण मजजवळ असावे. २ याशिवाय मी आणखी काही दुसरे मागणार नाही असे
वचन देतो देवा ३ तुकयाबंधू म्हणत आहे, देवा एवढे वचन पूर्णपणे राखावे. ४
४८४ आली लळिताची वेळ । असा सावध सकळ ॥ १ ॥
लाहो करा वेगीं स्मरा । टाळी भाउनि^२ विश्वंभरा ॥ २ ॥
जालिया अवसान । न संपडती चरण ॥ ३ ॥
तुकयाबंधु म्हणे थोडे । अवधि उरली आहे पुढें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - लळिताची-फजितीची, लाहो-लाभ, अवसान-शेवट
अर्थ:- एकदा का फजितीची वेळ आली की मग काही उरत नाही. म्हणून सावध असा. १ पटकन त्या
ईश्वराचे स्मरण करून त्याचा लाभ करून घ्या. त्या विश्वंभरास टाळी वाजवून संतुष्ट करा. २ एकदा का देहाचे
पतन झाल्यावर मग काही या ईश्वराची पावले दिसणार नाहीत. ३ तुकयाबंधू म्हणत आहे, या गोष्टीस दिवस
काही फार उरले नाहीत थोडाच अवधी आहे. ४
४८५ नेणें गाऊं कांहीं घड बोलतां वचन ।^१
कायावाचामनेंसहित आलों शरण ॥ १ ॥
करीं अंगीकार नको मोकलूं हरी ।
पतितपावन ब्रिदैं करावीं खरीं ॥ २ ॥
नेणे भक्तिभाव तुझा म्हणवितों दास ।
जरि देसी अंतर तरि लज्जा कोणास ॥ ३ ॥
म्हणे तुकयाबंधु तुझे धरियेले पाये ।
आतां कोण दुजा ऐसा आम्हांसी आहे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपाः- अंगीकार-स्वीकार, मोकलूं-दूर करु, ब्रीदें-प्रतिज्ञा.
अर्थ - देवा, मला कांही सुस्वर गळ्याने गाता येत नाही. धड चार शब्द बोलता येत नाहीत. कायावाचा-
मनासहित मी तुम्हांस शरण आलो आहे. १ तेव्हा माझा तुम्ही स्वीकार करावा. श्रीहरी, मला तुम्ही दूर करू नये
पतिताला पावन करण्याची तुमची प्रतिज्ञा आहे. हा तुमचा लौकिक तुम्ही खरा करून दाखवावा. २ देवा, मी
१ इतुकाचि, २ वाहोनि
तु. गाथा ..३२

२५० सार्थ तुकारामगाथा
भक्तिभावही नीटसा जाणीत नाही, फक्त तुझा सेवक मात्र मी आहे पण आता मला जर अंतर देशील तर मग
याची लाज कुणाला वाटणार आहे ? ३ तुकयाबंधू म्हणत आहे, म्हणून देवा, तुझे पाय धरून ठेविले आहेत आता
तुझ्यासेशेज आमचे रक्षण करणारा दुसरा कोण आहे ? ४

४८६ तूच मायबाप बंधु सखा आमचा । वित्त गोत जीवलग जीवाचा ॥ १ ॥
आणीक प्रमाण नाही दुसरे आता । योगक्षेमभार तुझे घातला माथा ॥ २ ॥
तूच क्रियाकर्म धर्म देव तू कुळ । तूच तप तीर्थ व्रत गुरु सकळ ॥ ३ ॥
म्हणे तुकयाबंधु करिता कार्यता देवा । तूच भाव भक्ति पूजा पुनस्कार¹ आघवा ॥ ४ ॥

शब्दार्थ व टीपा - वित्त-संपत्ती, गोत-नातेवाईक
अर्थ - देवा, तूच माझी आई आहेस बाप, बंधू, मित्र सारी नाती तुझ्यातच माझी आहेत संपत्ती, नातेवाईक
जीवाचा जीवलग सर्व काही तूच आहेस १ तुझ्याशिवाय मला दुसरे कसलेही प्रमाण नाही माझ्या सर्व चरितार्था-
चाही तुझ्यावर भार टाकून मी आहे २ माझे क्रियाकर्म धर्म, देव, कुळधर्म सर्व काही देवा, तूच आहेस तूच
तपश्चर्या, व्रते, गुरूनाराय, सर्व काही तूच आहेस ३ तुकयाबंधू म्हणत आहे, देवा तूच सर्व कार्य करविता व काय
करणारा असून माझी सर्व पूजा व भावभक्तीही तूच आहेस ४

विवरण - संतानी ईश्वराशी, सगुण परमेश्वराशी जी अनेक नाती जोडली आहेत त्यात आईबापाच
विशेषत आईचे नात विशेष प्रकारचे आहे ईश्वर आपली आई आहे असे मानल्यावर मग त्यात सर्व आले रडिक-
बाळपणा आला, हट्ट आला, आग्रह आला, रुसणफुगण आले, करुणा भाकणे आले आईचे हृदय किती कोमल व
विशाल ! म्हणून मराठी संतानी विठ्ठलाला आई, माऊली म्हणून हाक मारिली आहे दुसऱ्या एका अभंगात
' कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता ' असे तुकोबांनीच म्हटले आहे तू मायबाप आहेस, तू सखा आहेस, तू गुरू
आहेस असा आर्ततेचा भाव तुकोबांच्या अनेक अभंगातून प्रकट झालेला दिसतो ज्या ब्रह्मत्तत्त्वापासून हे सर्व चराचर
जगत् आकारास आले त्याच्या सगुण रूपास जनकत्वाचा मान आपोआपच येतो भगवद्गीतेतही ' पिताहमस्य जगतो
माता धाता पितामह ' या जगाचा मी पिता, माता, धाता ( आधारा ) पितामह ( आजा ) आहे असे भगवंतानेच
आपल्या मुखाने सांगितले आहे आणि पुढे अकराव्या अध्यायात विश्वरुपदर्शनाच्या नतर अर्जुनाने श्रीकृष्णाची जी
स्तुती केली आहे त्यातही ' पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् ' तूच या चराचराचा पिता
असून पूज्य व गुरूचा गुरू तूच आहेस असे म्हटले आहे *

मराठी संताना याच भावनचा अनुवाद आपल्या भक्तितत्त्वविवेचनात व पारमार्थिक अनुभवात केलेला
दिसून येतो याच वृत्तीन ज्ञानदेवानी अनुभवामृताच्या प्रारंभीच ' ऐशीं इयें निरुपाधिके । जगाचीं जियें जनके
म्हणून सृष्टीच्या आदिकारणाना आईबाप म्हणून वंदन कत आहे हा ईश्वरच सर्व चराचराच जन्मस्थान असल्याने
मातृभावान त्याच्याकडे पाहण्यास संताना सकाम वाटला नाही मीच सर्व व्यक्त जगताचा पिता व मीच माता या
नात्याचे स्पष्टीकरण ज्ञानेश्वरानी देताना म्हटले आहे गं जयाचेनि अगसगँ । इये प्रकृतीस्तव अष्टागें । जन्म
पाविजत असे जगें । तो पिता मी गा ॥ अधनारी नटेश्वरों । जो पुरुष तोचि नारी । तेवि मी चराचरीं माताही
होय ' हे मातृत्वचेि पितृत्वाचे नाते ध्यानात ठेवूनच मराठी संतानी या ईश्वराम मनोभावे आळविले आहे

४८७ करुन उचित । प्रेम घालों हृदयात ॥ १ ॥
आलो दान मागायास । थोरी करुनियां आस ॥ २ ॥
चिंतन समयीं । सेवा आपुलीच देई ॥ ३ ॥
तुकयाबंधु म्हणे भावा । मज निरवावे देवा ॥ ४ ॥

१ पुरस्कार अथवा

सार्थ तुकारामगाथा २५१
शब्दार्थ व टीपा :- पोरी-मोठी, आस-इच्छा, आसार, निरवावें-सोपवावे.
अर्थ :- देवा, तुझ्याविषयीचे उचित असे प्रेम माझ्या हृदयात निर्माण होऊ दे. १ हेच दान देवा, मी तुला
मागायला आलो आहे. मला तुझी फार मोठी आशा आहे. २ देवा, मी तुझे चिंतन जेव्हा करीन तेव्हा तुझीच सेवा
माझ्या हातून व्हावी. ३ तुकयाबंधू म्हणत आहे, देवा, तुझ्याविषयीच्या भावाजवळच मला सोपवावे. तो भाव
सतत माझ्या चित्तात असावा. ४
४८८ गाऊं वाऊं टाळी रंगों नाचूं उदास ।
सांडोनि भय लज्जा शंका आस निरास ॥ १ ॥
बळियाचा बळी तो कैवारी आमुचा ।
भुक्तिमुक्तिदाता सकळां ही सिद्धींचा ॥ २ ॥
मारूं शब्दशस्त्रबाण निःशंक अनिवार ।
कंटकांचा चुर शिर फोडूं काळाचें ॥ ३ ॥
म्हणे तुकयाबंधु नाहीं जीवाची चाड ।
आपुलिया तेथें काय आनिकांची भीड ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- कंटकांचा-दुष्टांचा, चुर-चुरा, शिर-डोके
अर्थ :- श्रीहरीच्या भक्तिप्रेमाच्या रंगात येऊन, टाळी वाजवून त्याचे नाम गाऊ. त्याच्या नादात उदास
वृत्तीचे होऊन नृत्य करू. यावेळी लौकिकाची आशा, भीती, लाज, शंका, इच्छा, निराशा इत्यादी वृत्तींचा त्याग
करू. १ सर्व बलवंतांचा बलवंत असणारा हा श्रीहरी आता आमचा कैवारी झाला आहे. तोच आम्हांस भक्ती,
मुक्ती देणार असून सर्व सिद्धी त्याच्याच कृपेने आम्हांस प्राप्त होणार आहेत. २ आता कुणाचीही शंका व भीती
न धरता शब्दशस्त्रांच्या व तीक्ष्ण बाणांच्या साहाय्याने दुष्टांचे चूर्ण करून टाकू प्रत्यक्ष काळाचेही डोके आम्ही
फोडू. ३ तुकयाबंधू म्हणत आहे, या बाबतीत आम्हाला आमच्या जीवाची काही पर्वा नाही. येथे इतरांची भीड
धरण्याचे कारण तरी काय आहे ? ४
४८९ सांडूनि वैकुंठ । उभा विटेवरी नीट ॥ १ ॥
आला आला रे जगजेठी । भक्ता पुंडलिकाचे भेटी ॥ २ ॥
पैल चंद्रभागे तीरीं । कट धरूनियां करीं ॥ ३ ॥
तुकयाबंधु म्हणे अंबर । गजर होतो जयजयकार ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- सांडूनि-सोडून, अंबर-आकाश
अर्थ :- प्रत्यक्ष वैकुंठ सोडून हा श्रीहरी या पृथ्वितलावर येऊन एका साध्या विटेवर उभा राहिला
आहे. १ हा जगन्नायक या भक्त पुंडलिकासाठी या भूमीवर आला आहे २ चंद्रभागेच्या पलीकडच्या तीरावर
कमरेवर हात ठेवून हा उभा आहे. ३ तुकयाबंधू म्हणत आहे की, याच्या जयजयकाराने सारे आकाश भरून गेले
आहे. ४
४९० कृपाळु भक्तांचा । ऐसा पति गोपिकांचा ॥ १ ॥
उभा न पाचारितां दारी । न सांगतां काम करी ॥ २ ॥
भाव देखौनि निर्मळ । रजां बोडवी कपाळ ॥ ३ ॥
तुकयाबंधु म्हणे न भजा । कां रे ऐसा भोळा राजा ॥ ४ ॥

२५२ सार्थ तुकारामगाथा
शब्दार्थ व टीपा - पाचारितां-बोलाविता, रजां-धूलिकणासाठी, घोडवी-पुढे परितो
अर्थ - हा गोपियांचा पती श्रीहरी आपल्या भक्तावर मोठा कृपाळू आहे १ न बोलविताही हा भक्ताच्या
दारात त्याच्या साह्यार्थ उभा असतो न सांगता तो त्याचे काम करीत असतो २ आपल्या भक्ताच्या मनातील
निर्मळ भाव पाहून हा देव त्याच्या चरणांच्या धूलिकणासाठी आपले कपाळ पुढे करीत असतो ३ तुकयाबंधू असे
म्हणत आहे की, अशा या मोकळ्या देवाच्या राजास तुम्ही का नाही भजत ? ४
४९१ केला अंगीकार पंढरीच्या देवे ।
आता काय करिती काळ मशक मानवे ॥ १ ॥
घातलीं बाहेर तों भय होते ज्याने ।
बैसला आपण तेथें घालुनिया ठाणे ॥ २ ॥
लागे नेदी वारा दुजियाचा अंगासी ।
हा पुरता निर्धार कळो आला आम्हासी ॥ ३ ॥
म्हणे तुकयाबंधु न लगे करावी चिंता ।
कोणेविशीं आतां बैसलो हस्तीवरी माथा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - अंगीकार-स्वीकार, मशक-चिलट, निर्धार-निश्चय
अर्थ - आता या पंढरीच्या देवाने एकदा माझा स्वीकार आपला म्हणून केल्यावर आता कसली भीती ?
आता तो प्रत्यक्ष काळसुद्धा क्षुद्र चिलटासारखा मानावा १ शरीरात कामक्रोधादिक वृत्ती ज्या भीती निर्माण
करणाऱ्या होत्या त्याना बाहेर घालवून तो स्वतःच हृदयामध्ये ठाण मांडून बसला आहे २ दुसऱ्या कुठल्याही
वाऱ्याचा स्पर्श अंगास होऊ नये म्हणून हा काळजी घेत असतो हा त्याचा निश्चय आम्हास पूर्णपणे समजला
आहे ३ तुकयाबंधू म्हणत आहे की, आता आम्हास कसलीही चिंता करावी लागत नाही याच्या कृपेने आम्ही
आता जणू हत्तीच्याच मस्तकावर बसलो आहोत एवढे श्रेष्ठ झालो आहोत ४
विवरण - एकदा ईश्वराने आपला स्वीकार केल्यावर मग आपणास कसलीही चिंता उरत नाही हा भाव
संतांच्या अभंगात वारंवार प्रकट झालेला आहे मज का लागणे करावा विचार। ज्याचा भारभार त्याच्या माथा'
असा निर्वाळा तुकोबांनी इतरत्र दिलेला आहे आपल्या भक्ताचे सर्व दाढी कोडकौतुक परमेश्वर करतो त्याची
टाच हृदयावर धारण करण्यात परमेश्वरास धन्यता वाटत त्याला आपल्या माथ्यावरील मुकुट वरून नाचण्यात तो
तृप्त होतो 'तैसा मी वाचूनि कांहीं । आणिक गोमटेंचि नाहीं । मजचि नाम पाहीं । जिणे या ठेविलें ॥ ऐसे अनन्य
गतिके चित्तें । चिंतितसाते माते । जे उपासिती त्यातें । मीचि सेवी ॥ आपुली तहानभूक नेणे । तान्हया निके तें
माउलीसीचि करणे । तैसे अनुसरले जे मज प्राणे । तयांचे न काइसेनिहि न लजे मो?' इतकी चिंता ईश्वर आपल्या
भक्ताची करीत असता आपल्या हृदयाचा पिंजरा करुनच जणु तो त्यास जपत असतो एखादा भक्त शरीराने
विकल असेल तर त्याची काळजी भगवंत अधिकच घेतात अशी साक्ष आहे ' देहदुबळ्याचा वारा । क्षणे लागेल या
सुकुमारा । म्हणोनि आत्मबोधाचे पांजिरा । सुर्ये तयाते' असे श्रीज्ञानेश्वरांनी भगवंताच्या मुखातील वक्तव्य प्रकट
केले आहे एकदा या परमेश्वराने हृदयामध्ये स्थान केले, तथे निवास केला म्हणजे मग तुकारामबुवा म्हणतात
त्याप्रमाणे कामक्रोधादी वृत्ती निघून जातात त्याचे वास्तव्यच तिथे उरणार नाही याविषयीही ज्ञानदेवांनी निर्णय
दिला आहे 'तैसा हृदयामध्ये मी रामु । असता सर्वसुखाचा आरामु । का भ्रातासि कामु विषयपायरी' मी एकदा
हृदयात असता तेथे कामादिव वृत्तीच उमटणार नाहीत असा भावार्थ एकनाथांनीही भागवतात म्हटले आहे,
' जेथें भी श्रीढे आत्मारामु । तेथ केवी रिघे बापुडा कामु ? जेथ मी रमेँ पुरुषोत्तमु । तेथें कामकर्म रिघेना ।'

सार्थ तुकारामगाथा २५३
४९२ अगोचरी बोलिलों आज्ञेविण आगळें ।
परी तें आतां न' संडावें राउळें ॥ १ ॥
जाईल रोकडा बोल न पुसती आम्हां ।
तुझा तुझें म्हणविले पाहा पुरुषोत्तमा ॥ २ ॥
न व्हावा न वजावा न कळतां अन्याय ।
न धरावें तें मनीं भलता करा उपाय ॥ ३ ॥
म्हणे तुक्याबंधु हीन मी म्हणोनि लाजसी ।
वारा लागों पाहातोहे उंचया झाडासी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा -अगोचरी जास्त वायफळ, मर्यादा सोडून, राउळें देवाने, वजावा-जावा
अर्थ :- देवा, मी काही मर्यादा सोडून बोललो असेन तर, आज्ञेशिवाय काही जास्त न बोलावे ते बोललो
असेन तरी त्यासाठी तुम्ही माझा आता त्याग करू नये. मला सोडू नये. १ हे पुरुषोत्तमा, तू मला आपले म्हटले
आहेस. आता मला जर न विचारशील तर तुझा हा लौकिक व्यर्थ होईल ना? २ होऊ नये तो अन्याय, होऊन जाऊ
नये तो माझ्याकडून जरी झाला असेल तरी मनात न धरता कोणत्याही उपायाने माझे रक्षणच करावे ३ तुक्या-
बंधू म्हणतो की देवा, मी फार हीन आहे म्हणून का तू लाजतोस ? पण उंच असलेल्या झाडासच जसा वारा लागतो
तसा जो अवगुणांनी उंच व श्रेष्ठ आहे त्यावरच तुझे लक्ष अधिक हवे ४
४९३ जाली पाकसिद्धि वाट पाहे रखुमाई । उदक तापलें डेरां चौकसा मर्दुनि पाईं ॥ १ ॥
उठा पांडुरंगा उशीर जाला भोजनीं । उभ्या आंचवणा गोपी कळस घेउनी ॥ २ ॥
अवघ्या सावचित्त सेवेलागीं सकळा । उद्धव अक्रूर आले पाचारुं मुळा ॥ ३ ॥
सावरिली सेज सुमनपांति सुगंधा । रत्नदीप ताटी वाळा विडिया विनोदा ॥ ४ ॥
तुका विनंती करी पाहे पंढरीराणा । असा सावचित्त सांगे सकळा जना ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- चौकसा - उटणे, सुगंधी पदार्थ, कळस-कलश, तांब्या
अर्थ :- पंढरीराया, स्वयंपाक आता तयार असून रखुमाई आता तुमचीच वाट पाहात आहे. हंडा भरून
पाणी तापले आहे. तुमच्या पायांस सुगंधी पदार्थ व उटणे वगैरे लावू द्या ना. १ पांडुरंगा, आता उठा ना !
भोजनास फार उशीर झाला आहे तुमच्या हातावर पाणी घालण्यासाठी या गोपी हातात पाण्याचे तांबे घेऊन उभ्या
आहेत २ या सर्वजणी सावधान चित्ताने तुमच्या सेवेसाठी तत्पर आहेत. उद्धव, अक्रूर हेही तुम्हास आमंत्रण
देण्यास आले आहेत. ३ नाना प्रकारच्या सुगंधित फुलांनी तुमची शेज तयार करून ठेविली आहे ताटात रत्नाचे
दिवे लावून तुला ओवाळण्याची तयारी आहे, तबकात वाळा वगैरे सुगंधी द्रव्ये व तुमच्या संतोषासाठी विडे वाट
पाहात आहेत. ४ तुकारामबुवा विनंती करीत आहेत की, हा पंढरीचा राणा सांगत आहे की सर्वांनी सावध
चित्ताने असावे. ५
४९४ उठा सकळ जन उठिले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥ १ ॥
करा जयजयकार वाद्यांचा गजर । मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥ २ ॥
जोडोनि दोन्ही कर मूळ पाहा सादर । पायावरी शिर ठेवूनियां ॥ ३ ॥
तुका म्हणे काय पढियंतें ते मागा । आपुलाले सागा सुख दुःख ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - पढियंते आवडते
१ न संडावे कृपाळू राउळें.