सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 268, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें७३६ सार्थ तुकारामगाथा
गरुड नव्हे पाखरू । ढोर नव्हे नंदिकेश्वरु ॥
झाड नव्हे कल्पतरू । कामधेनु गाय न म्हणावी ॥ ५ ॥
कूर्ूम नव्हे कासव । डुकर नव्हे वराह ।
ब्रह्मा नव्हे जीव । स्त्री नव्हे लक्ष्मी ॥ ६ ॥
गवाक्ष नव्हे हाड । पाटाव नव्हे कापड ।
परीस नव्हे दगड । सगुण ते ईश्वरीचे ॥ ७ ॥
सोने नव्हे धातु । मीठ नव्हे रेतु ।
नाहीं नाहीं चमांतु । कृष्णाजिन व्याघ्रांबर ॥ ८ ॥
मुक्ताफळें नव्हेति गारा । खड्याऐसा नव्हे हिरा ।
जीव नव्हे सोइरा । बोळवीजे स्वेच्छेनें ॥ ९ ॥
गाव नव्हे द्वारावती । रणसोड नव्हे मूर्ति ।
तीर्थ नव्हे गोमती । मोक्ष घडे दर्शनें ॥ १० ॥
कृष्ण नव्हे भोगी । शकर नव्हे जोगी ।
तुका पाडुरंगीं । हा प्रसाद लाधला ॥ ११ ॥
शब्दार्थ व टीपा - तनु-शरीर, मातु-गोष्ट, शेष-सर्पांचा राजा, वासुकी-सर्पाचा राजा नंदिकेश्वरु-
शंकराचा नंदी, गवाक्ष-गाईचा डोळा पाटाव-रेशमी वस्त्र कृष्णाजिन-हरणाचे कातडे व्याघ्रांबर-वाघाचे कातडे,
गोमती-द्वारूर येथील तीर्थ
अर्थ - अहो बहुनो, गंगेचे पाणी हे काही इतर नद्याच्या पाण्यासारखे नाही त्याचे पावित्र्य विशेष
प्रकारचे आहे तसेच वड व पिंपळ याची झाडे इतर झाडासारखी नव्हेत तुळशीची व रुद्राक्षाची माळ इतर माळा-
सारखी नव्हे ५, सर्व गोष्टी त्या श्रेष्ठ परमेश्वराच्या शरीराप्रमाणेच होत १ समुद्र हा इतर नद्याप्रमाणे नव्हे.
शिवलिंग पाषाणाचे असले तरी तो काही पाषाण नव्हे, त्याचप्रमाणे संत हे जगातील इतर लोकासारखे नव्हेत २
वेताची काठी ही इतर काठीसारखी म्हणू नये सातु इतर धान्याप्रमाणे समजू नयेत राम राम हा जप इतर
शब्दासारखा नाही ३ इतर ताऱ्याप्रमाणे चंद्र व सूर्य यांना समजू नये मेरु पर्वत इतर पर्वताप्रमाणे सांधा नाही, शेष
व वासुकी हे इतर सामान्य विषारी सर्पाप्रमाणे नाहीत ४ गरुड हा काही सामान्य पक्षी नव्हे शंकराचा नंदी
हा काही इतर बैलासारखा नाही, इतर झाडाप्रमाणे कल्पतरूही नव्हे, इतर गाईसारखीच कामधेनू समजू नये ५
भगवंताचा अवतार कूर्मकासव हे इतर कासवाप्रमाणे नाही, वराह म्हणजे डुक्कर खरा, पण तो इतर डुकरा-
प्रमाणे नाही सर्व जीवाप्रमाणे वासुदेव नव्हे ही लक्ष्मी साधी स्त्री म्हणू नये ६ इतर सामान्य हाडात गवाक्ष-
गाईच्या डोळयाची गणना करू नये रेशमी वस्त्र हे इतर कापडाप्रमाणे कसे असेल ? परीस इतर दगडासारखा
नाही जे जे सगुण म्हणजे विशेष गुणांनी युक्त आहे ते ते ईश्वराचे अंग मानावेत ७ सोने हा धातु इतर धातू-
पासून वेगळाच मानायला हवा साध्या रेतीवाळूपेक्षा मीठ वेगळेच असते कृष्णाजिन व व्याघ्रांबर हे इतर प्राण्याच्या
चामड्याप्रमाणे नाही ८ मुक्ताफळांची, मोत्याची किंमत गारगोटीशी कशी होईल ? हिऱ्याची सर खड्यांस कशी
येईल ? जीव हा त्या शिवाचा अंश असल्याने तो आपलाच समजून सोप्याप्रमाणे त्यास वाटेल तसे वागविणे युक्त
होणार नाही ९ द्वारका हे गाव इतर गावाप्रमाणे नव्हे रणछोडाची मूर्ती ही इतर मूर्तीसारखी नाही गोमती हे
तीर्थ इतर तीर्थांहून फारच वेगळे आहे तिच्या दर्शनानेच मोक्ष घडतो १० श्रीकृष्ण हा काही वरवर दिसतो तसा
भोगी नाही, शंकरही त्याने अंगाला राख फासली असली तरी इतर जोग्याप्रमाणे तो नव्हे तुकाराम महाराज
म्हणतात, पाडुरंगाच्या प्रसादाने हा फरक मला समजला आहे ११