सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 274, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 274

२४२ सार्थ तुकारामगाथा
४६४ चाल माझ्या राघो । डोंगरीं दिवा लागो ॥ १ ॥
घर केलें दार केलें । घरीं नाहीं वरो ।
सेजारणी पापिणीचीं पांच पोरें मरो ॥ २ ॥
घरीं पांच पोरें । तीं मजहूनि आहेत थोरें ।
पांचांच्या बळें । खादलीं बावन केळें ॥ ३ ॥
घर केलें दार केलें । दुकान केला मोठा ।
पाटाची राणी धांगडधिंगा तिचा मोठा ॥ ४ ॥
दुकान केला मोठा । तर पदरीं रुका खोटा ।
हिजडा म्हणसी जोगी । तर सोळा सहस्र भोगी ।
तुका म्हणे वेगीं । तर हरि म्हणा जगीं ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - वरो~पुत्रकळ
अर्थ :- माझ्या राघो, तू माझ्याबरोबर चल. डोंगरावर दिवा लागू द्यात. १ मी घर केले, दार केले;
म्हणजे लग्न केले. पण घरात मूलबाळ नाही झाले. परंतु शेजारणीस मात्र पाच पोरे आहेत. ती मरून जाऊ द्या. २
माझ्याही घरी पाच पोरे माझ्यापेक्षा थोर आहेत या पाचांच्या बळावर मी बावन्न केळी खाल्ली आहेत. या पच
कर्मेंद्रियांनी उत्तम भोग घेतले. ३ मी घरदार केले, प्रपंच उभारला, मोठे दुकान घालून व्यापार केला. पाट लावून
पट्टराणी एक आणली. पण तिचा धांगडधिंगाच फार आहे. ४ मी मोठे दुकान घातले खरे, पण माझ्या पदरात
मात्र खोटा रुपयाच पडला. मला हिजडा, योगी म्हणू लागले. तुकाराम महाराज म्हणतात, मग अशा वेळी
सोळासहस्र नारी भोगूनही जो खराच जोगी राहिला, त्या श्रीहरीचे नामस्मरण घटकन करा. ५
४६५ जन्मा आलिया गेलिया परी । भक्ति नाहीं केली ।
माझें माझें म्हणोनियां । गुंतगुंतों मेलीं ॥ १ ॥
येथें कांहीं नाहीं । लव गुरूच्या पायीं ।
चाल रांडे टाकीं रुका । नको करूं बोल ।
गुरुविण मार्ग नाहीं । करिसी तें फोल ॥ २ ॥
खाउनी जेउनि लेउनि नेसुनि । म्हणती आम्ही धन्या ।
साधु संत घरा आल्या । होती पाठमोऱ्या ॥ ३ ॥
वाचोनि पढोनि जाले शाहणे । म्हणती आम्ही संत ।
परनारी देखोनि त्यांचें । चंचळ जालें चित्त ॥ ४ ॥
टिळा टोपी घालुनि माळा । म्हणती आम्ही साधू ।
दयाधर्म चित्तीं नाहीं । ते जाणावे भोंदु ॥ ५ ॥
कलियुगीं घरोघरीं । संत जाले फार ।
वीतिभरी पोटासाठीं । हिंडती दारोदार ॥ ६ ॥
संत म्हणती केली निंदा । निंदा नव्हे माई ।
तुका असे अनन्य भावें शरण संतां पायीं ॥ ७ ॥