सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 280, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा २४७
४७५ हिरा शोभला कोंदणीं । जडित माणिकांची खाणी ॥ १ ॥
तैसा दिसे नारायण । मुख सुखाचें मंडण ॥ २ ॥
कोटि चंद्रलीळा१ । पूर्णिमेच्या पूर्णकळा ॥ ३ ॥
तुका म्हणे दृष्टि धाये । परतोनि माघारी तें न ये ॥ ४ ॥
शब्दार्थ वटीपा :- धाये-संतुष्ट होते.
अर्थ :- रत्नजडित कोंदणात एखादा हिरा शोभून दिसावा, किंवा खाणीत माणीक शोभून दिसावे, १
तसा हा नारायण शोभून दिसतो आहे सर्व सुखाने हे श्रीमुख तेजस्वी व शोभिवंत दिसत आहे. २ पौर्णिमेच्या
कोटी चंद्रांच्या कळा याच्यापुढे फिक्याच वाटतील. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या सुंदर मूर्तीकडे पाहताच
दृष्टी सुखावून गेली आहे. ती तेथून परत माघारी फिरतच नाही. ४
४७६ पतित पतित । परी मी त्रियाचा पतित ॥ १ ॥
परी तूं आपुलिया सत्ता । मज करावे सरता ॥ २ ॥
नाहीं चित्तशुद्धि । स्थिर पायांपाशीं बुद्धि ॥ ३ ॥
अपराधाचा फेलो । तुका म्हणे किती बोलों ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- सरता-परिपूर्ण, त्रियाचा-तीन वेळा.
अर्थ:- देवा, मी पतित आहे असे त्रिवार, तीन वेळा मी म्हणत आहे. १ पण तू तुझी सत्ता गाजवून
मला परिपूर्ण करावे माझे पाप दूर करावे २ माझे चित्त शुद्ध नाही. तुझ्या पायांशी बुद्धिही स्थिर होत नाही. ३
देवा, मी अपराधाचाच जणू बनलो आहे आणखी तुला सांगू तरी किती ? ४
४७७ उभारिला हात । जगीं जाणविली मात ॥ १ ॥
देव बैसले सिंहासनीं । आल्या याचका होय२ धनी ॥ २ ॥
एकाच्या केंवाडें । उगवे बहुतांचें कोडें ॥ ३ ॥
दोहीं ठायीं तुका । नाहीं पडों देत चुका ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - केंवाडे-कैवारे, अंगीकार
अर्थ:- या देवाने अभयासाठी हात वर केला आहे. सर्व जगात ही गोष्ट समजून आली आहे, १ हा देव
आज सिंहासनावर बसून शोभत आहे. जो याचक भक्त येईल त्याचा तो धनी बनत आहे. २ एकाच्या अंगीकारामुळे
त्याने पुष्कळांना निवारण दिला आहे पुष्कळांच्या आयुष्याचे कोडे सोडविली आहेत. ३ तुकाराम महाराज म्हणतात,
या देवाच्या व त्याच्या भक्ताच्या ठिकाणी मी कधी चुका करीत नाही. किंवा हा चुका करू देत नाही ४
आशीर्वाद-अभंग
४७८-जीवेसाटीं यत्नभाव । त्याची नाव बळकट ॥ १ ॥
पैल तीरा जातां कांहीं । संदेह नाहीं भवनदी ॥ २ ॥
विश्वासाची धन्य जाती । तेथें वस्ती देवाची ॥ ३ ॥
तुका म्हणे भोळियांचा । देव साचा अंकित ॥ ४ ॥
ब्दार्थ व टीपा - सदेह-शंका.
अर्थ :- कोणताही प्रयत्न जीव समर्पण करण्याच्या भावनेने करावा. तरच बळकट नावेचे स्वरूप त्या प्रयत्नास
येते. १ या नावेतून तो पैलतीराला जाईल यात काहीच शंका नाही २ श्रीहरीवर विश्वास ठेवणाऱ्याची जात धन्य
१ चंद्रकला, २ पुरे