सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 279, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 279

२४६ सार्थ तुकारामगाथा
महाराज म्हणतात, देवा, आता दुसऱ्या देवांना मी शरण जाऊ काय ? देवा, ही लज्जेची गोष्ट आहे हे तुम्ही जाणीत
नाही काय ? ४
४७१ पुरविली आळी । जे जे केली ते ते काळीं ॥ १ ॥
माय तरी ऐसी सांगा । कृपाळुवा पांडुरंगा ॥ २ ॥
घेतलें नुतरी उचलोनि कडियेवरी ॥ ३ ॥
तुका म्हणे घास । मुखीं घाली ब्रह्मरस ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - आळी-हट्ट, कृपाळुवा-अत्यंत कृपाळू, नुतरी-न उत्तरी
अर्थ :- देवा, ज्या ज्या वेळीं जो जो हट्ट केला तो तो तू पुरविलास. १ विठ्ठला, जन्म देणारी प्रत्यक्ष आई
तरी एवढी कृपाळू असते का कधी ? २ देवा, तू आता मला उचलून काडेवर घेतले आहेस आता मी कांही खाली
उतरणार नाहीं. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठलाने माझ्या मुखात ब्रह्मरसाचा घास घातला आहे. ४
४७२ कथेची सामग्री । देह अवसानावरी ॥ १ ॥
नको जाऊं देऊं भंगा । गात्रें माझीं पांडुरंगा ॥ २ ॥
आयुष्य करों उणें । परी मज आवडो कीर्तन ॥ ३ ॥
तुका म्हणे हानी । या वेगळी मना नाणीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- अवसानावरी-सपल्यावर, गात्रे-अवयव, नाणीं-न आणी
अर्थ :- देवाचे कथाकीर्तन ऐकल्याचा उपयोग देह संपल्यावर लाभदायक आहे. १ देवा, तुझी कथा
ऐकता यावी म्हणून माझे सर्व अवयव शेवटपर्यंत शाबूत ठेवा. त्यांचा भंग करू नकोस. २ देवा, माझे आयुष्य
वाटले तर कमी कर, पण माझी कीर्तनाची आवड मात्र वाढीस लागू दे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, जर
कीर्तनाची आवड माझी कमी झाली तर त्यावेगळी दुसरी मोठी हानी नाही असेच माझ्या मनात येईल ४
४७३ गळित झाली काया । हेचि ललित पंढरिराया ॥ १ ॥
आलें अवसानापासीं । रूप राहिलें मानसीं ॥ २ ॥
पाहिला कळस । तेथें स्थिरावला रस ॥ ३ ॥
तुका म्हणे गोड जालें । नारायणीं पोट धाले ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- गळित-थकलेली, पाहिला-पहिला
अर्थ - देवा, माझे शरीर आता थकले आहे रे. आता हेच ललित समजायचे काय ? १ माझा आता देह-
पतनाचा शेवट जवळ आला असून माझे चित्त मात्र तुझ्याच रूपावर जडून राहिले आहे. २ आता दुरूनच मी तुझ्या
मंदिराचा कळस पाहिला. त्याच स्थानावर माझा भक्तिभाव स्थिरावून राहिला आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात,
या नारायणात सर्व वृत्ती स्थिरावल्यामुळे सारेच गोड गोड होऊन गेले पोट भरून राहिले. ४
४७४ रत्नजडित सिंहासन । वरी बैसले आपण ॥ १ ॥
कुंचे ढळती दोहीं बाहीं । जबळी रखुमाई राही ॥ २ ॥
नाना उपचारीं । सिद्धि डोळगती कामारी ॥ ३ ॥
हातीं घेऊनि पादुका । उभा बंदिजन तुका ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :-कुंचे-चवऱ्या, बोळगती-तत्पर आहेत, कामारी-काम करणारी
अर्थ :- या रत्नजडित सिंहासनावर स्वतः पंढरीनाथ बसला आहे. १ दोन्ही बाजूनी चवऱ्या ढळत
आहेत. जवळच राहीरुखमाई उभ्या आहेत २ नाना प्रकारचे उपचार करीत अनेक सिद्धी काम करण्यास तत्पर
झाल्या आहेत. ३ अशा वेळी स्वामीच्या पादुका घेऊन तुकोबा सेवकासारखा उभा आहे. ४