सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 270, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें२३८ सार्थ तुकारामगाथा
४५६ आणिकां उपदेशूं नेणें नाचों आपण ।
मुंढा¹ वांयां मारगेली वांयां हांसे जन ॥ १ ॥
तैसा नव्हे घाला आवरों मन डोळा ।
पुढिलांच्या कळा कवतुक जाणोनी ॥ २ ॥
बाहिरल्या येषें आंत जसें तसें ।
झाकलें तों बरें पोट भरे तेणें मिसें ॥ ३ ॥
तुका म्हणे केला तरी करीं शुद्ध भाव ।
नाहीं तरी जासी यांयां हा ना तोसा ठाव ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- मुंढा-हिजड्याचा सोबती, हा ना तोसा-ना स्वार्थाचा, ना परमार्थाचा.
अर्थ :- दुसऱ्यांना उपदेश देऊ नये. आपणच काय नाचायचे ते नाचावे. या मार्गास लागलेला सोबती मुढा
हाही वायाच गेलेला असतो. त्याला लोक हसतात १ तेव्हा त्याच्याप्रमाणे खोटाच चाळा न करता मन आवरून
धरावे. दृष्टी सावरावी. पुढे गेले आहेत त्यांचे गुण कौतुकाने घ्यावेत. २ बाहेरचा चांगला वेष काय उपयोगाचा ?
आतील विकार जसेच्या तसेच असले तर ते झाकलेले बरे. बाह्य वेषाने पोट तरी भरेल. ३ तुकाराम महाराज
म्हणतात, तुम्ही आपला भाव शुद्ध कराल तर बरे. नाही तर वाया जाल. ना स्वार्थ, ना परमार्थ अशी अवस्था तुमची
होईल ४
४५७ टाक रुका चाल रांडे कां गे केली गोवी ।
पुसोनियां आलें ठाव म्हणोनि देतें शिवी ॥ १ ॥
आतां येणें छंदें नाचों विनोदें ।
नाही या गोविंदें माझें मजसी केलें ॥ २ ॥
कोरडे ते बोल कां गे वेचितेसी वांयां ।
थतें करूनि दावीं तुझ्या मुळींचिया ठाया ॥ ३ ॥
याजसाठीं म्या डोर धरियेला हातीं ।
तुका म्हणे तुम्हा गांठी सोडायाची खांती ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- रुका-अभिमान, गोवी-गुंतवणूक, डौर-एक वाद्य, डमरू
अर्थ :- अग रांडे, तू देहाचा अभिमान सोडून दे ना ह्या गुंतवणुकीत का राहतेस ? चल मजबरोबर मी ह्या
अभिमानाचे स्थान सोडून दिले आहे म्हणून तर तुला शिवी देत आहे १ या गोविंदाने माझा मीपणा नाहीसा केला;
म्हणून आता याच्याच नादाने मोठ्या मस्तीने व गमतीने याच्या संगतीत नाचू या. २ तू तुझ्या अंतःकरणांतील
हे कोरडे बोल व्यर्थ का खर्च करतेस ? तुझ्या मूळच्या ठिकाणी ते प्रकट करून दाखोव ना. ३ यासाठीच मी हातात
हा डोर धरला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देहाच्या अभिमानाची ही गाठ मला आता सोडवायची आहे. ४
४५८ मोकळी गुंत रितो कुंथ्ये नाहीं भार दावें ।
घेडवाडा बैसली खोडा घेतली आपुल्या भावें ॥ १ ॥
ऐका बाई लाज नाहीं² आणिकां त्या गरतीची ।
समाधानों उंच स्थानीं जाणे सेवा पतीची ॥ २ ॥
१ मुदा, २ काही