दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
देह वाढे जाण। यदर्थी संशय नाहीं ॥ २५॥ पोटीं नसतां मळ मूत्र
चोक। तरी मरोन जाती सकळ लोक। झाला राव अथवा रंक। पोटीं
विष्ठा चुकेना ॥ २६॥ निर्मळपणें काढूं जातां। तरी देह पडेल तत्वतां।
एवं देहाची व्यवस्था। ऐसी असे ॥ २७॥ ऐसा हा घड असतां। यथा-
भूत पाहूं जातां। मग ते दुर्दशा सांगतां। शंका बाधी ॥ २८॥ ऐसिया
कारागृहें१ वस्ती। नवमास भोगिल्या बहु विपत्ती। नवहि द्वारें निरो-
धिती। वायु कैंचा येथें ॥ २९॥ वोकानरकाचे रस झरपती। ते जठराग्नी-
स्तव तापती। तेणें सर्वांहि उकडती। अस्थि मांस ॥३०॥ त्वचेविण गर्भ लोळे२
तंव मातेसि उठती डोहळे। कटु आम्ल तीक्ष्णें सर्वांग पोळे। तया बाळ-
काचें ॥ ३१॥ बांधलें चर्माचें मोटालें३। तेथें विष्ठेचें पोटालें४। रसउपाय
बंकेंनाळें। होत असे ॥ ३२॥ विष्ठा मूत्र वात पित्त। नाकीं तोंडीं नि-
घती जंत। तेथें निर्बुजलें६ चित्त। अतिशयेंसीं ॥ ३३॥ ऐसिये कारागृहीं
प्राणी। पडिला अत्यंत दाटणीं। कळवळोनि म्हणे चक्रपाणी। सोडवी
येथूनि आतां ॥ ३४॥ देवा सोडविसी येथून। तरी मी स्वहित करीन।
गर्भवास हा चुकवीन। पुन्हा न ये येथें ॥ ३५॥ ऐसी दुखवूनि प्रतिज्ञा
केली। तंव जन्मवेळ पुढें आली। माता आक्रंदों लागली। प्रसूतीकाळीं
॥ ३६॥ नाकीं तोंडीं बैसलें मांस। मस्तकद्वारें सांडी श्वास। तेंही बुजलें
निःशेष। जन्मकाळीं ॥ ३७॥ मस्तकद्वार तें बुजलें। तेणें चित्त निर्बुजिलें।
प्राण तळमळूं लागले। चहूंकडे ॥ ३८॥ श्वासोच्छ्वास कोंडला। तेणें प्राणी
जाजांविला। मार्ग दिसेनासा जाहला। कासावीस ॥ ३९॥ चित्त बहु
निर्बुजिलें। तेणें आडभरीं भरलें। लोक म्हणती आडवें आलें। खांडोनि
काढा ॥ ४०॥ मग तें खांडोनि काढिती। हस्त पाद छेदूनि घेती। हातीं
सांपडलें तेंचि कापिती। मुख नासिक उदर ॥ ४१॥ ऐसे टंवके तोडले।
बाळकें प्राण सोडिले। मातेनेंही सांडिलें। कळेवर१० ॥ ४२॥ मृत्यु पावला
आपण। मातेचा घेतला प्राण। दुःख भोगिलें दारुण गर्भवासीं ॥ ४३॥
१. तुरुंगांत. २. गर्भवेष्टनांत, उदरांत. ३. मोटली. ४. सांठा. ५. मातेचे
अन्नरस मुलास गर्भांत पोंचविणारें नाळ, त्यानें. ६. घाबरलें. ७. दडपणांत.
८. त्रासिला. ९. तुकडे. १०. शरीर.
४८ श्रीदासबोध. [ दशक
तथापि सुकृतेंकरूनी । मार्ग सांपडला योनी । तरी अडकला जाऊनी ।
कंठीं स्कंधीं मागुता ॥ ४४ ॥ तये संकुचित पंथीं । बळेंचि ओढूनि का-
ढिती । तेणें गुणें प्राण जाती । बाळकाचे ॥ ४५ ॥ बाळकाचा जातां प्राण ।
अंतीं होय विस्मरण । तेणें पूर्वील स्मरण । विसरोनि गेला ॥ ४६ ॥ गर्भीं
म्हणे सोहं सोहं । बाहेर पडतां म्हणे कोहं । ऐसा कष्टी जाहला बहु ।
गर्भवासीं ॥ ४७ ॥ दुःखा परवडौ होता जाहला । थोर कष्टीं बाहेर
आला । सर्वैचि कष्ट विसरला । गर्भवासाचे ॥ ४८ ॥ शून्याकार जाहली
वृत्ती । कांहीं आठवेना चित्तीं । अज्ञानें पडली भ्रांती । तेणें सुखचि मा-
निलें ॥ ४९ ॥ देह विकार पावलें । सुखदुःखें झेंळंबलें । असो ऐसें गुंडा-
ळलें । मायाजाळीं ॥ ५० ॥ ऐसें दुःख गर्भवासीं । होतें प्राणिमात्रासी ।
म्हणोनियां भगवंतासी । शरण जावें ॥ ५१ ॥ जो भगवंताचा भक्त । तो
जन्मापासून मुक्त । ज्ञानबळें विरक्त । सर्वकाळ ॥ ५२ ॥ ऐशा गर्भवासीं
विपत्ती । निरूपिल्या यथामती । सावध होऊनियां श्रोतीं । पुढें अवधान
द्यावें ॥ ५३ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृतीयदशके जन्मदुःख-
निरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥
प्रथमसंबंध.
श्रीगणेशाय नमः ॥ संसार हाचि दुःखमूळ । लागती दुःखाचे इंगळ ॥
मागां बोलिली तळमळ । गर्भवासाची ॥ १ ॥ गर्भवासी दुःख झालें । तें
बाळक विसरलें । पुढें वाढों लागलें । दिवसेंदिवस ॥ २ ॥ बाळपणीं त्व-
चा कोंवळी । दुःख होतांचि तळमळी । वाचा नाहीं तये काळीं । दुःख
सांगावया ॥ ३ ॥ देहास कांहीं दुःख झालें । अथवा क्षुधेनें पीडिलें । तरी
तें परम आक्रंदलें । परी अंतर नेणवे ॥ ४ ॥ माता कुरवाळी वरिवरी ।
परी जे पीडा जाहली अंतरीं । ते मायेसि न कळे अभ्यंतरीं । दुःख होय
बाळकांसी ॥ ५ ॥ मागुतें मागुतें रँफुंदे रडे । माता बुर्जावी घेऊनि कडे ।
व्यथा नेणती बापुडें । तळमळी जीवीं ॥ ६ ॥ नाना व्याधींचे उमाळे ।
१. तो मी, तो मी. २. कोण मी, कोण मी. ३. व्याप्त. ४. त्रासलें. ५. चा-
मडी. ६. ओरडतें. ७. हुंदके देई. ८. समजावी. ९. रोगांचे.
तेणें दुःखें आंदोळे । रडे पडे कां पोळे । अग्निसंगें ॥ ७ ॥ शरीर रक्षितां
न ये । घडती नाना अपाय । खोडी आधांतरीं होय । अवयवहीन बालक
॥ ८ ॥ अथवा अपाय चुकले । पूर्व पुण्य पुढें ठाकलें । मातेसि वोळखूं
लागलें । दिवसेंदिवस ॥ ९ ॥ क्षणभरी मातेसि न देखे । तरी आक्रंदोनि
रुदन करी दुःखें । ते समयीं मातेसारिखें । आणिक कांहींच नाहीं
॥ १० ॥ आस करूनि वासें पाहे । मातेविण कदा न राहे । वियोग पळ-
मात्र न साहे । स्मरण झाल्यानंतर ॥ ११ ॥ जरी ब्रह्मादिक देव आले ।
अथवा लक्ष्मीनें अवलोकिलें । तरी न वचे बुझाविलें । मातेवांचुनी ॥ १२ ॥
कुरूप अथवा कुलक्षण । सकळांहूनि करंटेपण । तरी नाहीं ती-
समान । भूमंडळीं कोणी ॥ १३ ॥ ऐसें तें केविलवाणें । मातेविण दिसें
उणें । रागें परतें केलें तिणें । तरी आक्रंदोनि मिठी घाली ॥ १४ ॥
सुख पावे मातेजवळी । दुरी करितांचि तळमळी । अति प्रीति तये काळीं ।
मातेवरी लागली ॥ १५ ॥ तंव ते मातेसि मरण आलें । प्राणी पोरटें
जाहलें । दुःखें झुरणी लागलें । आई आई म्हणोनी ॥ १६ ॥ आई पाहतां
दिसेना । दीनरूप पाहे जना । आस लागलीसे मना । आई येईल म्हणोनी
॥ १७ ॥ माता म्हणोनि मुख पाहे । तंव ती आपुली माता नोहे । मग हिंव-
सेंलेंसें राहे । दैन्यवाणें ॥ १८ ॥ मातावियोगें कष्टलें । तेणें मानसीं दुःख झालें।
देहहि क्षीणत्व पावलें । अतिशयेंसी ॥ १९ ॥ अथवा माताहि वांचली । माय-
लेंकरां भेटी झाली । बाळदशा ते राहिली । दिवसेंदिवस ॥ २० ॥ बाळपण
जाहलें उणें । दिवसेंदिवस होय शहाणें । मग तें मायेचें अत्यंत पेखणें ।
होतें तें राहिलें ॥ २१ ॥ पुढें लोभ लागला खेळाचा । कळप मेळवी पोरांचा ।
आल्या गेल्या डौयाचा । आनंद शोक वाहे ॥ २२ ॥ मायबापें शिकविती
पोटें । तयाचें दुःख परम वाटे । चट लागली न सुटे । संगति लेंकुरांची
॥ २३ ॥ लेंकुरांमध्यें खेळतां । नाठवे माता आणि पिता । तंव तेथेंहि अव-
चिता । दुःख पावला । २४ ॥ पडिले दांत फुटला डोळा । मोडला पाय
झाला खुळां । गेला माज अवकळा । ठाकोनि आली ॥ २५ ॥ निघाल्या देवी
१. कांपतो. २. मध्येंच. ३. वाट. ४. दूर. ५. हिरमुसलेंसें. ६. भोळा, लळा.
७. डावांचा. ८. पोटाच्या काळजीमुळे. ९. लंगडा.
५० श्रीदासबोध. [ दशक
आणि गोंवर । उठलें कपाळ लागला ज्वर । पोटशूळ निरंतर । वायगोळा
॥ २६ ॥ लागलीं भूतें जाहली झडपणी । जळींच्या¹ मेसको मायरौणी ।
मुंज्या झोटिंग करणी । म्हसोबाची ॥ २७ ॥ वेताळ खंकाळें² लागला ।
ब्रम्हग्रह³ संचरला । नेणों चेडा वोलांडिला । कांहीं कळेना ॥ २८ ॥ एक
म्हणती बीरदेव । एक म्हणती खंडेराव । एक म्हणती सर्व वार्वे⁴ । हा ब्रह्म-
संबंध ॥ २९ ॥ एक म्हणती कोणीं केलें । अंगीं दैवत घातलें । एक म्हणती
चुकलें । सटवाईचें ॥ ३० ॥ एक म्हणती कर्मभोग । अंगीं जडले नाना
रोग । वैद्य पंचाक्षरी चांग⁵ । बोलावूनि आणिले ॥ ३१ ॥ एक म्हणती हा
वांचेना । एक म्हणती हा मरेना । भोग भोगितो यातना । पापास्तव ॥
३२ ॥ गर्भदुःख विसरला । तो त्रिविधतापें पोळला । प्राणी बहुत कष्टी
जाहला । संसारदुःखें ॥ ३३ ॥ इतकेंहि चुकोनि वांचला । तरी मारमा-
रोनि शाहणा केला । लौकिकीं नेटका झाला । नांव राखे ऐसा ॥ ३४ ॥
पुढें मायबापीं लोभास्तव । संभ्रमें मांडिला विवाह । दाऊनियां सकळ वै-
भव । नोवरी पाहिली ॥ ३५ ॥ वऱ्हाडी वैभव दाटलें । देखोनि परम सुख
वाटलें । मन हें रंगोनि गेलें । सासुरवाडीकडे ॥ ३६ ॥ मायबापीं भलतैसें
असावें । परी सासुरवाडीकडे नेटकें जावें । द्रव्य नसेल तरी घ्यावें । ऋण
कळांतरें⁶ ॥ ३७ ॥ अंतरभाव ते सासुरवाडी । मायबापें राहिलीं बापुडीं ।
होताति सर्वस्वें कुडकुंडीं⁷ । तितुकेंचि कार्य त्यांचें ॥ ३८ ॥ नोवरी आलिया
घरा । अति हृष्यास वाटे बरा । म्हणे मजसारिखा दुसरा । कोणीच नाहीं
॥ ३९ ॥ माय बाप बंधु बहिणी । नोवरी न देखतां वाटती कांणी⁸ । अत्यं-
त लोधलां⁹ पापी प्राणी । अविद्यानें¹⁰ भुलविला ॥ ४० ॥ संभोग नसतां इ-
तुका प्रेमा । योग झालिया उल्ंघी सीमा । प्रीति वाढविती कामा- । करितां
प्राणी गुंतला ॥ ४१ ॥ जरी न देखे क्षण एक डोळां । तरी जीव होय उता-
वळा । प्रीतिपात्र अंतरकळा । होऊनि गेली ॥ ४२ ॥ कोंवळे कोंवळे शब्द
मंजुळ । मर्यादा लज्जा मुखकमळ । वक्त्रावलोकनें केवळ । मन ज्याचें मैं-
दौवें¹¹ ॥ ४३ ॥ कळवळा येतां सांवरवेना । शरीरविकलता आवरेना । अन्यत्र
१. जळदेवता. २. उग्र. ३. ब्रह्मराक्षस. ४. व्यर्थ. ५. चांगले. ६. व्याजानें.
७. निकामी. ८. कंटाळवाणीं. ९. लुब्ध झाला. १०. अज्ञानानें. ११. गुंग होतें.
३ रा. ] जन्मदुःख. ५१
व्यवसायीं क्रमेनों । हुरहुर वाटे ॥ ४४ ॥ व्यवसाय करितां बाहेरी । मन
लागलेंसें घरीं । क्षणक्षणा अभ्यंतरीं । स्मरण होय कामिनीचें ॥ ४५ ॥ तु-
ह्मी माझिया जिवांतील जीव । म्हणोनि अत्यंत लाघवें । दाउनियां चित्त
सर्व । हिरूनि घेतलें ॥ ४६ ॥ मैंदें सोयरीक काढिती । फांसे घालोनि प्राण
घेती । तैसें आयुष्य गेलिया अंतीं । प्राणियास होय ॥ ४७ ॥ प्रीति कामि-
नीसि लागली । जरी तियेसि कोणी रागेजली । तरी परम क्षिती वाटली ।
मानसीं गुतरूपें ॥ ४८ ॥ तये भार्येचेनि कैवारें । मायबापांसी नीच उत्तरें ।
बोलेनियां तिरस्कारें । वेगळा निघे ॥ ४९ ॥ स्त्रीकारणें लाज सांडिली ।
स्त्रीकारणें सखीं सोडिलीं । स्त्रीकारणें बिघडलीं । सकळही जिवलगें ॥ ५० ॥
स्त्रीकारणें देह विकिला । स्त्रीकारणें सेवक जाहला । स्त्रीकारणें सांडविला ।
विवेकासी ॥ ५१ ॥ स्त्रीकारणें लोलंगतां । स्त्रीकारणें अतिनम्रता । स्त्रीकारणें
पराधीनता । अंगिकारिली ॥ ५२ ॥ स्त्रीकारणें लोभी जाहला । स्त्रीकारणें ध-
र्म सांडिला । स्त्रीकारणें अंतरला । तीर्थयात्रा स्वधर्म ॥ ५३ ॥ स्त्रीकारणें
सर्वथा कांहीं । शुभाशुभ विचारिलें नाहीं । तन मन धन सर्वही । अनन्य-
भावें अर्पिलें ॥ ५४ ॥ स्त्रीकारणें परमार्थ बुडविला । प्राणी स्वहितासि
नागवला । ईश्वरीं कानकोंडा जाहला । स्त्रीकारणें कामबुद्धी ॥ ५५ ॥ स्त्री-
कारणें सोडिली भक्ती । स्त्रीकारणें सोडिली विरक्ती । स्त्रीकारणें सायुज्यमु-
क्ती । तेही तुच्छ मानिली ॥ ५६ ॥ एके स्त्रियेचेनि गुणें । ब्रह्मांड मानिलें
उणें । जिवलगें तीं पिसुणें । ऐसीं वाटलीं ॥ ५७ ॥ ऐसी अंतरीं प्रीति ज-
डली । सर्वस्वाची सांडी केली । तंव ते मरोनि गेली । अकस्मात भार्या ॥
५८ ॥ तेणें मनीं शोक वाटिला । म्हणे थोर घात झाला । आतां कैंचा बुडा-
ला संसार माझा ॥ ५९ ॥ जिवलगाचा सोडिला संग । अवचितां झाला
घरेंभंग । आतां करूं देहत्याग । म्हणे दुःखें ॥ ६० ॥ स्त्री घेऊनि आडवी ।
ऊर बडवी पोट बडवी । लाज सांडोनि गौरवी । लोकां देखतां ॥ ६१ ॥
म्हणे माझें बुडालें घर । आतां न करीं हा संसार । दुःखें ओंकंदे थोर । घोर
१. करमेना. २. दिखाऊ प्रीति. ३. घातकी, फांसेगार. ४. खंती. ५.
अंतरलीं. ६. आसक्ति. ७. चोरटा. ८. ब्रह्मनिर्वाण. ९. शत्रु. १०. संसाराची
नासाडी. ११. ओरडूं लागला.
५२ श्रीदासबोध. [ दशक
घेणें ॥ ६२ ॥ तेणें जीव वार्यो¹ वेधला । संसाराचा डबगें² आला । तेणें दुः-
ख झाला । जोगी कां महात्मा ॥ ६३ ॥ कां तें निघोन जाणें चुकलें । पुनः
मागुतें लग्न केलें । तेणें अत्यंतचि निमग्न झालें । मन द्वितीयसंबंधीं ॥ ६४ ॥
जाहला द्वितीय संबंध । सवेंचि मानिला आनंद । श्रोतीं व्हावें सावध ।
पुढिलिये समासीं ॥ ६५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृतीयदशके
प्रथमसंबंधनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥
३. द्वितीयसंबंध.
श्रीगणेशाय नमः ॥ द्वितीय संबंध जाहला । दुःख मागील विसरला ।
सुख मानोनि राहिला । संसाराचें ॥ १ ॥ झाला अत्यंत कृपण । पोटा न खाय
अन्न । ³पैक्याकारणें सोडी प्राण । ⁴ऐकसरा ॥ २ ॥ कदा कल्पांतीं न
वंची⁵ । संचिलेंचि पुनः साँची⁶ । अंतरीं असेल कैंची । सद्वासना ॥ ३ ॥
स्वयें धर्म न करी । धर्मकर्त्यासही वारी⁷ । सर्वकाळ निंदा करी । साधु-
जनांची ॥ ४ ॥ नेणे तीर्थ नेणे व्रत । नेणे अतीत अभ्यागत । मुंगी-
मुखींचें शीत । तेंही वेंचून⁸ साँची ॥ ५ ॥ स्वयें पुण्य करवेना ।
केलें तरी देखवेना । उपहास करी मना । न ये म्हणोनि ॥ ६ ॥ देवां भ-
क्तांस उच्छेदी । अंगबळें सकळांसि खेदी । निष्ठुर शब्दे अंतर भेदी । प्राणि-
मात्रांचें ॥ ७ ॥ नीति सांडोनि मागें । अनीतीनें वर्तों लागे । गर्व धरून फुगे ।
सर्वकाळ ॥ ८ ॥ पूर्वजांसि सिंतरलें⁹ । पक्ष श्राद्ध नाहीं केलें । कुळदैवत
टाकिलें । कोणे परी ॥ ९ ॥ अक्षतें¹⁰ भैरली भाणीं । दुजा ब्राह्मण मेहुणा ।
आला होता पाहुणा । स्त्रियेसि मूळ ॥ १० ॥ कदा नावडे हरिकथा । देव नलगे
सर्वथा । स्नान संध्या म्हणे वृथा । कासया करावी ॥ ११ ॥ अभिलाषें सांची
वित्त । स्वयें करी विश्वासघात । मदें मातला उन्मत्त । तारुण्यपणें ॥ १२ ॥ तारुण्य
अंगीं भरभरलें । धारिष्ट न वचे धरिलें । करूं नये तेंचि केलें । महापाप ॥ १३ ॥
स्त्री केली परी धाकुटी । धीर न धरवे पोटीं । विषयलोभें शेवटीं । वोळखी
१. वायुचक्रासारखा भ्रसूं लागला. २. कंटाळा. ३. पैकरितां. ४. एकदम.
५. खर्च करी. ६. सांठवितो. ७. आडवा येतो. ८. निवडून, टिपून. ९. ठकाविलें.
१०. बहिणीला केंस भरली, सवाष्ण बोलाविली.
सांडीली ॥ १४ ॥ मायबहिणी न विचारी । जाहला पापी परद्वारीं । दंड
पावला राजद्वारीं । तरी पालटेना ॥ १५ ॥ परस्त्री देखोन दृष्टीं । अभिलाष
उपजे पोटीं । अकर्तव्यें हिंपुटी । पुनः होय ॥ १६ ॥ ऐसें पाप उदंड केलें ।
शुभाशुभ नाहीं उरलें । तेणें दोषें दुःख भरलें । अकस्मात अंगीं ॥ १७ ॥
व्याधि भरली सर्वांगीं । प्राणी जाहला क्षयरोगी । केले दोष आपुले भोगी ।
शीघ्रकाळें ॥ १८ ॥ दुःखें सर्वांग फुटलें । नासिक आवघेंच बैसलें । लक्षण
जाऊनि झालें । कुलक्षणें ॥ १९ ॥ देहास क्षीणता आली । नाना व्यथा उ-
द्भवली । तारुण्यशक्ति राहिली । खंगला प्राणी ॥ २० ॥ सर्वांगीं लागल्या
कळा । देहास आली अवकळा । प्राणी कांपे चळचळा । शक्ति नाहीं ॥ २१ ॥
हस्तपादादिक झडले । सर्वांगीं किडे पडले । देखोन थुंकों लागले । लहान
थोर ॥ २२ ॥ जाहली विष्टेची सारणी । भोवतीं उठली वैढाणी । अत्यंत
खंगला प्राणी । जीव न वचे ॥ २३ ॥ आतां मरण दे गा देवा । बहुत कष्ट
झाले जीवा । जाहला नाहीं नेणों ठेवा । पातकांचा ॥ २४॥ दुःखें घळघळां
रडे । जों जों पाहे अंगाकडे । तों तों दैन्यवाणें बापुडें । तळमळी जीवीं
॥ २५ ॥ ऐसे कष्ट झाले बहुत । सकळ झालें वाताहत । दरवडा घालुनि
वित्त । चोरटीं नेलें ॥ २६॥ झालें ऐरत्र ना परत्र । प्रारब्ध ठाकलें विचित्र ।
आपलें आपण मळमूत्र । सेविलें दुःखें ॥ २७॥ पापसामुग्री सरली । दिवसें-
दिवस व्यथा हरली । वैद्यें औषधें दीधलीं । उपचार झाला ॥ २८ ॥ मरत
मरत वांचला । यास पुनः जन्म झाला । लोक म्हणती पडिला । माणसां-
मध्यें ॥ २९ ॥ येरें स्त्री आणिली । पुन्हा बरवात मांडीली । अति स्वार्थे-
बुद्धि धरिली । पुन्हा मागुति ॥ ३० ॥ कांहीं वैभव मिळविलें । पुन्हा सर्वहि
संचिलें । परंतु गृह बुडालें । संतान नाहीं ॥ ३१ ॥ पुत्रसंतान नसतां
दुःखी । वांझ नांव पडलें लोकीं । तें न फिटे म्हणोनि लेंकी । तरी हो
आतां ॥ ३२ ॥ म्हणोनि नाना सायास । बहुत देवांस केले नवस । तीर्थे
व्रतें उपवास । धरणें पारणें मांडिलें ॥ ३३ ॥ विषयसुख तें राहिलें । वांझपणें
दुःखी केलें । तंव तें कुलदैवत पावलें । झाली वृद्धि ॥ ३४ ॥ त्या लेकरावरी
१. व्यभिचारी २ विरस. ३. शोभाहीन. ४. दुर्गंधी. ५. इहलोक. ६. परलोक.
७. देवळाच्या दारांत उपाशीं बसून देवावर संकट घालणें.
५४ श्रीदासबोध. [ दशक
अतिप्रीती । दोघेंहि क्षण एक न विसंबती । कांहीं जाह्या आक्रंदती । दीर्घ-
स्वरें ॥ ३५ ॥ ऐसीं ती परम दुःखित । पूजित होती नाना दैवत । तंव
तेंहि मेलें अवचित । पूर्वपापेंकरूनी ॥ ३६ ॥ तेणें बहुत दुःखी झाले ।
घरीं अंधारें पडिलें । म्हणती आम्हांस कां ठेविलें । देवें वांझ करुनी ॥
३७ ॥ आम्हां द्रव्य काय करावें । तें जावें परी अपत्य व्हावें । अपत्यालागीं
व्यजावें । लागे सर्व ॥ ३८ ॥ वांझपण संदिसें¹ गेलें । तों मरतवांझ नांव
पडलें । तें न फिटे कांहीं केलें । तेणें दुःखें आक्रंदती ॥ ३९ ॥ आमुची
वेली कां खुंटली । हा हा देवा वृत्ति² बुडाली । कुळस्वामिनी कां क्षोभली ।
विझाला कुळदीप ॥ ४० ॥ आतां लेंकराचें मुख देखेन । तरी आनंदें रोंडी³
चालेन । आणि गळही टोचीन । कुळस्वामिनीपाशीं ॥ ४१ ॥ आई भुल्या
करीन तुझा । नांव ठेवीन केरपुंजा⁴ । वेसंनीं⁵ घालीन माझा । मनोरथ पुरवीं
॥ ४२ ॥ बहुत देवांस नवस केले । बहुत गोसांवी धुंडिले । गटगटां गिळूं
लागले । सगळे विंचू ॥ ४३ ॥ केले समंधाचे सायास । राहाणें⁶ घातलें
बहुवस । केलें नारिकेलें⁷ ब्राह्मणांस । आम्रदानें दिधलीं ॥ ४४ ॥ केलीं
नाना कौटिलें⁸ । पुत्रलोभें केलीं ढाळें⁹ । तरी अदृष्टें¹⁰ फिरलें । पुत्र नाहीं ॥
४५ ॥ वृक्षाखालें जाऊनि नाहाती । फळतीं झाडें करपती । ऐसे नाना
दोष करिती । पुत्रलोभाकारणें ॥ ४६ सांडोनि सकळ वैभव । त्यांचा वारया
वेंधलों¹¹ जीव । तंव तो पावला खंडेराव । आणि कुळस्वामिनी ॥ ४७ ॥
आतां मनोरथ पुरती । स्त्रीपुरुषें आनंदती । सावध होऊनि श्रोतीं । पुढें
अवधान द्यावें ॥ ४८ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृतीयदशके
द्वितीयसंबंधनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥
४. संपत्तिवेध.
श्रीगणेशाय नमः ॥ लेंकुरें उदंड झालीं । तंव ते लक्ष्मी निघोन गेली ।
बापुडीं भिकेस लागलीं । कांहीं खावयासी मिळेना ॥ १ ॥ लेंकुरें
१. नुकतेंच. २. वतन. ३. धगधगीत निखाऱ्यांची खाई. ४. केराचा ढीग,
केरोपंत. ५. नथणी ६. अंगांत दैवत आणून बोलविलें. ७. नारळ. ८. मंत्रतंत्र,
जारणमारणादि साधनें. ९. क्षुद्र साधनें. १०. नशीब. ११. झुरू लागला.
खेळती धाकुटीं । एक रांगती एक पाठीं । ऐसी घरभरी झाली दाटी ।
कन्या आणि पुत्रांची ॥ २ ॥ दिवसेंदिवस खर्च वाढला । यार्वा होता तो
खुंटोनि गेला । कन्या उपवेर झाल्या त्यांला । उजवावया द्रव्य नाहीं ॥३॥
मायबापें होतीं संपन्न । त्यांचें उदंड होतें धन । तेणेंकरितां प्रतिष्ठा मान ।
जनीं झाला होता ॥ ४ ॥ भ्रम आहे लोकाचारीं । पहिली नांदणूक
नाहीं घरीं । दिवसेंदिवस अभ्यंतरीं । दरिद्र आलें ॥ ५ ॥ ऐसी घरवात
वाढली । खातीं तोंडें मिळालीं । तेणें प्राणियासि लागली । काळजी
उद्वेगाची ॥ ६ ॥ कन्या उपवेर झाल्याँ । पुत्रांस नोवऱ्या आल्या । आतां
उजवण्या केल्या । पाहिजेत कीं ॥ ७ ॥ जरी मुलें तैसींच राहिलीं । तरी
पुन्हा लोकलाज लागली । ह्मणती कायसा व्यालीं । जन्मदरिद्रीं ॥ ८ ॥
ऐसी लोकलाज होईल । वडिलांचें नांव जाईल । आतां ऋण कोण
देईल । लग्नापुरतें ॥ ९ ॥ मागें ऋण ज्याचें घेतलें । त्याचें परतून
नाहीं दिधलें । ऐसें आभाळ कोसळलें । उद्वेगाचें ॥ १० ॥ आपण
खातों अन्नासी । अन्न खातें आपणासी । सर्वकाळ मानसीं । चिंतात्तुर
॥ ११ ॥ पत अवघीच मोडली । वस्तुभाव गहाण पडली । हाहा देवा वेळ
आली । आतां दिवाळ्याची ॥ १२ ॥ कांहीं केला ताडामोडा । विकिला घ-
रचा रेडापाडा । कांहीं पैका रोकडा । कैलांतरें काढिला ॥ १३ ॥ ऐसें ऋण
घेतलें । लौकिकीं दंभ केलें । सकळ ह्मणती नांव राखिलें । वडिलांचें
॥ १४ ॥ ऐसें ऋण उदंड झालें । ऋगाईतीं वेढूनि घेतलें । मग प्रयाणें
आरंभिलें । विदेशाप्रती ॥ १५ ॥ दोन वर्षे बुडी मारिली । नीचसेवा अं-
गिकारली । शरीरीं आपदा भोगिली । अतिशयेंसी ॥ १६ ॥ कांहीं
मिळविलें विदेशीं । जीव लागला मनुष्यांपाशीं । मग पुसोनियां स्वामीसी ।
मुरडता झाला ॥१७॥ तंव तीं अत्यंत पीडा पावलीं । वाट पाहात बैसलीं ।
म्हणती दिवसगती कां लागली । काय कारण देवा ॥ १८ ॥ आतां आम्हीं
काय खावें । किती उपवासी मरावें । ऐसियाचे संगतीस देवें । कां पां-
घातलें आम्हांसी ॥ १९ ॥ ऐसें आपुलें सुख पावती । परी त्याचें दुःख
१. मिळकत. २. वयांत आल्या. ३. व्याजाने. ४. आव, थाटमाट. ५. साव-
कारांनीं. ६. गमन, जाणें.
५६ श्रीदासबोध. [ दशक
नेणती । आणि शक्ति गेलिया अंतीं । कोणीच कामा न येती ॥ २० ॥
असो ऐसी वाट पाहातां । दृष्टीं देखिला अवचितां । मुलें धांवती ताता
ताता । भागलासी म्हणोनी ॥ २१ ॥ स्त्री देखोनि आनंदली । म्हणती आ-
मुचीं दैन्य फिटलीं । तंव येरें दीधली । गांठोडी हातीं ॥ २२ ॥ सकळांस
आनंद झाला । म्हणती आमुचा वडील आला । तेणें तरी आह्मांला ।
आंगडया टोप्या आणिल्या ॥ २३ ॥ ऐसा आनंद चारी दिवस ॥ सर्वैचि
मांडिली कुमसुम । म्हणती हे गेलिया आह्मांस । पुनः आपदा लागती
॥ २४ ॥ म्हणोनि आणिलें तें असावें । याणें मागुती विदेशास जावें । आह्मीं
हें खाऊ तों यावें । द्रव्य मेळवूनि ॥ २५ ॥ ऐसी वासना सकळांची ।
अवघीं सोयरीं सुखाचीं । स्त्री अत्यंत प्रीतीची । तेहि सुखा लागली
॥ २६ ॥ विदेशीं बहुत दगदगला । विश्रांति घ्यावया घरीं आला । श्वासहि
नाहीं टाकिला । तों जाणें वोढवलें ॥ २७ ॥ पुढें अपेक्षा जोश्याची ।
केली विवंचना मुहूर्तांची । वृत्ति गुंतली तयाची । जातां प्रशस्त न वाटे
॥ २८ ॥ माथां मात्रा सिद्ध केली । कांहीं सामुग्री बांधिली । लेंकुरें दृष्टीं
पाहिलीं । नागस्थ झाला ॥ २९ ॥ स्त्रियेसि अवलोकिलें । वियोगें परम
दुःख वाटलें । प्रारब्धसूत्र तुटलें । ऋणानुबंधाचें ॥ ३० ॥ कंठ
सद्गदित जाहला । न सांवरेचि गहिवर आला । लेंकुरें आणि पित्याला ।
ताडातोडी जाहली ॥ ३१ ॥ जरी ऋणानुबंध असेल । तरी मागुती भेटी
होईल । नाहीं तरी संगति पुरेल । येच भेटीनें तुमची ॥ ३२ ॥ ऐसें बो-
लोनि स्वार होये । मागुती फिरफिरोनि पाहे । वियोगदुःख न साहे ।
परंतु कांहीं न चले ॥ ३३ ॥ आपुला गांव राहिला मागें । चित्त भ्रमलें
संसारउद्वेगें । दुखावला प्रपंचसंगें । अभिमानास्तव । ३४ । ते समयीं
माता आठवली । म्हणे धन्य धन्य ते माउली । मजकारणें बहुत कष्टली ।
परी मी नेणेंचि मूर्ख ॥ ३५ ॥ आजि जरी ते असती । तरी मला कदा न
विसंबती । वियोग होतां आक्रंदती । ते पोटआगी वेगळीच ॥ ३६ ॥
पुत्र वैभवहीन भिकारी । माता तैसाचि अंगिकारी । दगदगला देखोन अंत-
रीं । त्याच्या दुःखें दुखावे ॥ ३७ ॥ प्रपंचविचारें पाहतां । हें सकळ जोडे न
१. कुरकूर. २. मन. ३. द्रव्य. ४. फराळाचें सामान.
३ रा. ] संपत्तीवेध. ५७
जोडे माता । हें शरीर जयेकरितां । निर्माण जाहलें ॥ ३८ ॥ लांव तरी
ते माया । काय कराव्या सहस्त्र जायो । परी भुलोनि गेलों वायां । मकर-
ध्वजाचेनी ॥ ३९ ॥ या एका कामाकारणें । जिवलगांसी द्वंद्व घेणं । सखीं
तींच पिसुनें । ऐशीं वाटती ॥ ४० ॥ म्हणोनि धन्य धन्य प्रपंची जन । जे
मायबापांचें भजन । करिती न करिती मन । निष्ठुर जिवलगासी ॥ ४१ ॥
संगती स्त्रियाबाळकांची । आहे सोंठी जन्मांची । परी मायबापें कैंचीं
मिळतील पुढें ॥ ४२ ॥ ऐसें पूर्वी होतें ऐकिलें । परी ते समयीं नाहीं कळलें ।
मन हें बुडोन गेलें । रतिसुखाचिया डोहीं ॥ ४३ ॥ हीं सखीं वाटती परी
पिसुनें । मिळालीं वैभवाकारणें । रितें जातां लाजिरवाणें । अत्यंत वाटे
॥ ४४ ॥ आतां भलतैसें करावें । परी द्रव्य मिळवून न्यावें । रितें जातां
स्वभावें । दुःख आहे ॥ ४५ ॥ ऐसी विवंचना करी । दुःख वाटलें अंतरीं ।
चिंतेचिया महापुरीं । बुडोनि गेला ॥ ४६ ॥ ऐसा हा देह आपुला । अस-
तांचि पराधीन केला । ईश्वरीं कानकोंडा झाला । कुटुंबकोंबाडी ॥ ४७ ॥
या एका कामासाठीं । जन्म गेला आटाआटी । वय वेंचलया शेवटीं ।
एकलेंचि जावें ॥ ४८ ॥ ऐसा मनीं पस्तावला । क्षण एक उदास झाला ।
सवेंचि प्राणी झेंळंबला । मायाजाळें ॥ ४९ ॥ कन्या पुत्र आठवलीं । मनीं-
हुनि क्षिती१० वाटली । ह्मणे लेंकुरें अंतरलीं । माझीं मज ॥ ५० ॥ मागील
दुःख आठवलें । जें जें होतें प्राप्त झालें । मग रुदन आरंभिलें । दीर्घ स्वरें
॥ ५१ ॥ अरणीं रुदन करितां । कोणी नाहीं बुझावितों । मग होय वि-
चारिता । आपुले मनीं ॥ ५२ ॥ आतां कायसा रडावें । प्राप्त होतें तें
भोगावें । ऐसें बोलोनियां जीवें । धारिष्ट केलें ॥ ५३ ॥ ऐसा दुःखें दग-
दगला । मग विदेशाप्रति गेला । पुढें प्रसंग कैसा वर्तला । तो सावध
ऐका ॥ ५४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृतीयदशके संपत्ति-
वेधनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥
१. बायका. २. कामामुळे. ३. तंटा. ४. शत्रु. ५. सोबत. ६. चोरटा.
७. कुटुंबाचा भार वाहणारा. ८. दगदगीनें. ९. गुंडाळून गेला. १०. खंती. ११.
समजावणी करणारा.
५८ श्रीदासबोध. [ दशक
५. कांताहरण.
श्रीगणेशाय नमः ॥ पुढें गेला विदेशासी । प्राणी लागला आपुल्या
व्यासंगासी । आपुल्या जीवें सोसी । नाना श्रम ॥ १ ॥ ऐसा दुस्तर संसार ।
करितां कष्टला थोर । पुढें दोनी चारी संवत्सर । द्रव्य मिळविलें ॥ २ ॥
सर्वंचि आला देशासी । तों अवर्षण पडलें देशीं । तेणें गुणें मनुष्यांसी ।
बहुत कष्ट जाहले ॥ ३ ॥ एकांच्या बैसल्या अमृतकळौ । एकांस चंद्री ला-
गेली डोळां । एक कांपती चळचळां । दैन्यवाणी ॥४॥ एक दीनरूप बैसलीं ।
एक सुजलीं आणि मेलीं । ऐसीं कन्यापुत्रें देखिलीं । अकस्मात डोळां ॥ ५ ॥
तेणें बहुत दुःखी झाला । देखोनिदां उमर्डे आला । प्राणी आक्रंदों लागला ।
दैन्यवाणें ॥ ६ ॥ तंव तीं अवघीं सावध झालीं । म्हणती बाबा जेवूं घालीं ।
अन्नालागीं मिटंकलीं । झर्डी घालिती ॥ ७ ॥ गांठोडें सोडोनि पाहती ।
हातां पडलें तेंच खाती । कांहीं तोंडीं कांहीं हातीं । प्राण जाती निघोनियां
॥ ८ । तांतडी तांतडी जेऊं घाली । तों जेवितां जेवितां कांहीं मेलीं ।
कांहीं होतीं धांदावलीं । तींही मेलीं अजीर्णे ॥ ९ ॥ ऐसीं बहुतेंक मेलीं ।
एक दोन मुलें उरलीं । तींही दैन्यवाणीं झालीं । आपुले मातेवांचूनी ॥१०॥
ऐसें अवर्पण आलें । तेणें घरचि बुडालें । पुढें देशीं सुभिक्षं झालें । अति-
शयेंसी ॥ ११ ॥ लेंकुरा नाहीं वाढवितें । अन्न करावें लागे आपुलेनि हातें ।
बहु त्रास घेतला चित्तें । स्वयंपाकाचा ॥ १२ ॥ लोकीं भरीस घातलें ।
पुनः मागुतें लग्न केलें । द्रव्य होतें तें वोंचिलें । लग्नाकारणें ॥ १३ ॥ पुन्हा
विदेशासि गेला । द्रव्य मेळवूनि आला । तंव घरीं कलहो लागला । साव-
त्र पुत्रांसी । १४ ॥ स्त्री झाली न्हाती धुती । पुत्र देखों न शकती । भ्रता-
राची गेली शक्ती । वृद्ध झाला ॥ १५ ॥ सदा भांडण पुत्रांचें । कोणी
नायकती कोणाचें । वनिता अतिप्रीतीचें । प्रीतिपात्र ॥ १६ ॥ किंतु
बैसला मना । एके ठाईं पटेना । म्हणोनियां पांचजणां । मेळविलें ॥ १७ ॥
पांचजण वांटे करिती । तों ते पुत्र नायकती । निवाडा नव्हेचि अंतीं ।
भांडण लागलें ॥ १८ ॥ बापलेंकांचें भांडण झालें । लेंकीं बापास मारिलें ।
१. उद्योगास. २. गालफडा. ३. ताटकळा आली. ४. गहिवर. ५. आशाळलेलीं.
६. उद्व ईनें. ८. मुकेलेलीं. ९. सुकाळ. १०. बायको. ११. अविश्वास.
३ रा. ] कांताहरण. ५९
तंव तें मातेनें घेतलें । शंखेतीर्थ ॥ १९ ॥ ऐकोनि मिळाले लोक । उभे
पाहती कौतुक । म्हणती बापास लेंक । कामा आले ॥ २० ॥ ज्यांकारणें
केले नवस । ज्यांकारणें केले सायास । ते पुत्र मातापितयांस । मारिती
पाहा ॥ २१ ॥ ऐसी आली पापकळी । आश्चर्य मानिलें सकळीं । उभे
तोडिती केंळी । नागरिक लोक ॥ २२ ॥ पुढें बैसोन पांचजण । वांटे केले
तत्समान । बापलेकांचें भांडण । तोडिलें तींहीं ॥ २३ ॥ बापास वेगळें
घातलें । खोंपट बांधोनि दिधलें । मन कांतेचें लागलें । स्वार्थबुद्धीं ॥२४॥
कांता तरुण पुरुष वृद्ध । दोघांस पडिला संबंध । खेद सांडूनि आनंद ।
मानिला तींहीं ॥ २५ ॥ स्त्री सांपडली सुंदर । गुणवंत आणि चतुर । म्हणे
माझें भाग्य थोर । वृद्धपणीं ॥ २६ ॥ ऐसा आनंद मानिला । दुःख सर्व
विसरला । तंव तो गलबला झाला । परचक्र आलें ॥ २७ ॥ अकस्मात
धाडी आली । कांता बंदीं धरूनि नेली । वस्तभावही गेली । प्राणियाची
॥ २८ ॥ तेणें दुःख जाहलें भारी । दीर्घस्वरें रुदन करी । मनीं आठवे
सुंदरी । गुणवंत ॥ २९ ॥ तंव तिची वार्ता आली । तुमची कांता भ्रष्ट-
विली । ऐकोनियां अंग घाली । पृथिवीवरी ॥ ३० ॥ सव्य अपसव्य लोळे ।
जळें पाझरती डोळे । आठवितां चित्त पोळे । दुःखानळें ३ ॥ ३१ ॥ द्रव्य
होतें मेळविलें । तेंहि लभ्रास वेंचिलें । कांतेसहि धरून नेलें । दुराचारीं
॥ ३२ ॥ मजहि वृद्धपण आलें । लेंकीं वेगळें घातलें । आहा देवा ओढवलें
अदृष्ट माझें ॥ ३३ ॥ द्रव्य नाहीं कांता नाहीं । ठाव नाहीं शक्ति नाहीं ।
देवा मज कोणीच नाहीं । तुजवेगळें ॥ ३४ ॥ पूर्वी देव नाहीं पूजिला ।
वैभव देखोनि भुलला । सेखीं प्राणी पस्तावला । वृद्धपणीं ॥ ३५ ॥ देह
अत्यंत खंगला । सर्वांगें वाळोनि गेला । वात पित्तें उसळला । कंठ दाटला
कफें ॥ ३६ ॥ बळे जिभेची बोबडी । कफें कंठ घडघडी । दुर्गंधी सुटली
तोंडीं । नाकीं श्लेष्मा ५ वाहे ॥ ३७ ॥ मान कांपे चळचळां । डोळे गळती
भळभळां । वृद्धपणीं अवकळा । ठाकोनि आली ॥ ३८ ॥ दंतपाटी उखळली ।
तेणें बोचरखिंडी पडली । मुखीं लाळ गळों लागली । दुर्गंधीची ॥ ३९ ॥
डोळां पाहतां दिसेना । कानीं शब्द ऐकेना । दीर्घस्वरें बोलवेना । दम
१. शंख करणें. २. तंटा. ३. दुःखाग्नीनें. ४. दव. ५. शेंबूड.
३० श्रीदासबोध. [ दशक
दाटे ॥ ४० ॥ शक्ति पायांची राहिली । बैसवेना मुरकुंडी घाली । बृहती
वाजौं लागली । तोंडाच ऐसी ॥ ४१ ॥ क्षुधा लागतां आवरेना । अन्न स-
मयीं मिळेना । मिळालें तरी चावेना । दांत गेले ॥ ४२ ॥ पित्तें जिरेना अन्न ।
भक्षितांचि होय वमन । तैसेंच जाय निघोन । अपानद्वारें ॥ ४३ ॥ विष्ठा
मूत्र आणि बळस । भोंवता वमनें केला नास । दुरोन जातां कोंडे श्वास ।
विश्वजनांचा ॥ ४४ ॥ नाना दुःखें नाना व्याधी । वृद्धपणीं चले बुद्धी ।
तरी पुरेना अवधी । आयुष्याची ॥ ४५ ॥ पापण्या भोंवयांचे केश । पिको-
नि झडले निःशेष । सर्वांगीं लोंबे मांस । चिरगुटासारिखें ॥ ४६ ॥ देह
सर्व पारिखें झालें । सवंगडे निःशेष राहिले । सकळ प्राणिमात्र बोले ।
मरेना कां ॥ ४७ ॥ जे जन्मोनि पोशिलीं । तेचि फिरोनि पडिलीं । अंतीं
विषैम वेळ आली । प्राणियासी ॥ ४८ गेलें तारुण्य गलें बळ । गेलें संसाराचें
सळै । वाताहत झालें सकळ । शरीर आणि संपत्ती ॥ ४९ ॥ जन्मवरी
स्वार्थ केला । तितुकाही व्यर्थ गेला । कैसा विषम काळ आला । अंतकाळीं
॥ ५० ॥ सुखाकारणें झुरला । सेखीं दुःखें कष्टी झाला । पुढें मागुती धोका
आला । यमयातनेचा ॥ ५१ ॥ श्लोक ॥ जन्मदुःखं जरादुःखं नित्यदुःखं
पुनः पुनः ॥ संसारसागरे दुःखं तस्माज्जागृहि जागृहि ॥ १ ॥ टीका ॥
जन्म अवघा दुःखमूळ । लागती दुःखाचे पिंगळ । म्हणोनियां तात्काळ ।
स्वहित करावें ॥ ५२ ॥ असो ऐसें वृद्धपण । सकळांस आहे दारुण । म्हणो-
नियां शरण । भगवंतासि जावें ॥ ५३ ॥ पुढें वृद्धास तत्वतां । गर्भी पस्ता-
वा होता । तोचि आला मागुता । अंतकाळीं ॥ ५४ ॥ म्हणोनि मागुतें
जन्मांतर । प्राप्त मातेचें उदर । संसारें हा अति दुर्धर । तोचि ठाकोनि
आला ॥ ५५ ॥ भगवद्भजनावांचुनी । चुकेना हे जन्मयोनी । तापत्रयाची
जाचणी । सांगिजेल पुढें ॥ ५६ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृतीय
दशके कांताहरण नाम पंचमः समासः ॥ ५ ॥
६. आध्यात्मिक ताप.
श्रीगणेशाय नमः ॥ ॥ तापत्रयाचें लक्षण । आतां सांगिजेल निरूपण ।
१. सर्व लोकांचा. २. कठीण. ३. भरभराट. ४. जन्ममरण.
श्रोतीं करावें श्रवण । एकाग्र होऊनी ॥ १ ॥ जो तापत्रयीं पोळला । तो
संतसंगें निवाला । आर्तभूत तोषला । पदार्थै जेवीं ॥ २ ॥ क्षुधाक्रांतास
मिळे अन्न । तृषाक्रांतास जीवन । बंदीं पडिला त्याचें बंधन । तोडितां
सुख ॥ ३ ॥ महापुरें जाजावला¹ । तो पैलतीरास नेला । कां तो स्वप्नींचा
चेइला² । स्वप्नदुःखी ॥ ४ ॥ कोणी एकासि मरण । येतां दीधलें जीवदान
संकटास निवारण । केलिया सुख ॥ ५ ॥ रोगियासि औषध । सप्रचीत
आणि शुद्ध । तयासि होय आनंद । आरोग्य होतां ॥ ६ ॥ तैसा संसारदुः-
खें दुखवला । त्रिविधतापें पोळला । तोचि अधिकारी जाहला । परमार्था-
सी ॥ ७ ॥ ते त्रिविधताप कैसे । आतां बोलिजेती तैसे । त्यांविषयीं एक
असे । वाक्याधार ॥ ८ ॥ श्लोक ॥ देहेंद्रियमनःप्राणैः सुखं दुःखं यदा-
प्यते ॥ इममाध्यात्मिकं तापं विजानीयाद्धि देहिनाम् ॥ १ ॥ सर्वभूतैर्देहयो-
गात् सुखं दुःखं यदाप्यते ॥ द्वितीयं तं विजानीयात्संतापं चाधिभौति-
कम् ॥ २ ॥ शुभाशुभैःकर्मभिस्तैर्देहांते यमयातना ॥ स्वर्गनरकादिभोक्त-
व्यमिदं विद्ध्यधिदैविकम् ॥ ३ ॥ टीका ॥ एक ताप आध्यात्मिक ।
दुजा तो आधिभौतिक । तिसरा आधिदैविक । ताप जाणावा ॥ ९ ॥
आध्यात्मिक तो कोण । कैसी त्याची वोळखण । आधिभौतिकाचें ल-
क्षण । जाणिजे कैसें ॥ १० ॥ आधिदैविक तो कैसा । कवण तयाची
दशा । तेंही विशदें³ कळे ऐसा । विस्तार कीजे ॥ ११ ॥ हां जी
म्हणोनि वक्ता । जाहला कथा विस्तारिता । आध्यात्मिक ताप आतां ।
सावध ऐका ॥ १२ ॥ देह इंद्रियें आणि प्राण । यांचेनि योगें आपण । सुख-
दुःखें शिणे जाण । या नांव आध्यात्मिक ॥ १३ ॥ देहामधून जें आलें ।
इंद्रियप्राणें दुःख झालें । तें आध्यात्मिक बोलिलें । तापत्रयीं ॥ १४ ॥ देहा-
मधूनि काय आलें । प्राण्यास कोण दुःख झालें । आतां हें विशदें³ केलें ।
पाहिजे कीं ॥ १५ ॥ खरूज खवडे पुळिया नारू । नखुरड्या मांजरी देवी
गोवरू । देहामधील विकारू । या नांव आध्यात्मिक ॥ १६ ॥ काख-
मांजरी केंसतोड । वोखटे वैर्ण⁴ काळफोड । व्याधि मूळव्याधि महाजड ।
या नांव आध्यात्मिक ॥ १७ ॥ अंगुळेंवेढें गालफुगी । कंड⁵ उठे जे वाउगी ।
१. त्रासका. २. जागा झाला. ३. स्पष्ट. ४. व्रण, क्षत. ५. कांडूं.
हिरडी सुजे भरे वर्णगी । या नांव आध्यात्मिक ॥ १८ ॥ वाउगे फोड
उठती । कां ते सुजे अंगकांती । वात आणि तिडका लागती । या नांव
आध्यात्मिक ॥ १९ ॥ नायटे अंदुं गजकर्ण । पेहांचें पोट विस्तीर्ण । बैसलें
टाळें फुटती कर्ण । या नांव आध्यात्मिक ॥ २० ॥ कुष्ठ आणि ओला कुष्ठ ।
पंडुरोग अतिश्रेष्ठ । क्षयरोगाचे कष्ट । या नांव आध्यात्मिक ॥ २१ ॥ वाँटी
वटकें वायगोळा । हातीं पायीं लागती कळा । भोवंडी लागे वेळोवेळां ।
या नांव आध्यात्मिक ॥ २२ ॥ वोलंडा आणि वळ । पोटशूळाची तळमळ ।
अर्धशिशी उठे कपाळ । या नांव आध्यात्मिक ॥ २३ ॥ दुखे मार्ज आणि
मान । पैंष्ठी ग्रीर्वा आणि वदन । अस्थि मांसें दुखती जाण । या नांव
आध्यात्मिक ॥ २४ ॥ कुळीकें तरळें कामिणी । मुहम सुंठरें ११ मौळिणी ।
विदेशीं लागे पाणी । या नांव आध्यात्मिक ॥ २५ ॥ जळशोष आणि
हिवँरें । गिरगिरी आणि अंधारें । ज्वर पाचाव आणि शौरें १४ । या नांव
आध्यात्मिक ॥ २६ ॥ शैत्य उष्ण आणि तृषा । क्षुधा निद्रा आणि दिशाँ ।
विषयतृष्णेची दुर्दशा । या नांव आध्यात्मिक ॥ २७ ॥ आळशी मूर्ख आणि
अपेशी । भय उपजे मानसीं । विसराळू दुश्चित अहर्निशीं । या नांव आध्या-
त्मिक ॥ २८ ॥ मूत्रेकौंडे आणि परमें । रक्तपिती आणि रक्तपरमे । खडा-
चढौंचेनि श्रमे । या नांव आध्यात्मिक ॥ २९ ॥ सुरडा हगवण । उन्हाळे ।
दिशाँ कोंर्डेतां १८ आंदोळे । एक व्यथा असोन न कळे । या नांव आध्यात्मिक
॥ ३० ॥ गांठ ढळली झाले जंत । पडे आंव आणि रक्त । अन्न तैसेंचि
पडत । या नांव आध्यात्मिक ॥ ३१ ॥ उचकी लागली डशीतें गेलों । पित्त
उसळलें उलट झाला । खरें पडसें आणि खोकला । या नांव आध्यात्मिक
॥ ३२ ॥ पोटफुगी आणि तडस । भरला हीरें २२ लागला घांस । फोडी ला-
१. कण, कसपट. २. झाब्यावर्ण. ३. पोटफुगीचें. ४. गुडघी. ५. लहान मूल
दूध पिऊन लहान लहान गोळ्या होऊन ओकतें तो रोग. ६. कंबर. ७. पाठ.
८. गळा. ९. मोडशी. १० हागओक. ११. गळबें. १२. नाकांत फोड होतो
तो. १३. हिंवताप. १४. शहारे. १५. हगवण. १६. मूतखडा. १७. पोटांत मळाचा
खडा होऊन शौचाचे वेळीं दुःख होतें, त्यानें. १८. मलावरोध होतां. १९. कापू
लागतो. २०. गळ्यांत घांस अडकला. २१. जीभकांते. २२. लचक.
३ रा. ] आध्यात्मिक ताप. ६३
गतां कासाविस । या नांव आध्यात्मिक ॥ ३३ ॥ उसळला दम आणि
धाप । पडजीभ डेंसीं¹ । आणि कफ । मोठा वातज्वर आणि संताप । या
नांव आध्यात्मिक ॥ ३४ ॥ कोणीं सेंदूर घातला । तेणें प्राणी निर्बुजलां² ।
घशामध्यें फोड आला । या नांव आध्यात्मिक ॥ ३५ ॥ गळसोळ्या³ आणि
जीभ झडे । सदा मुखीं दुर्गंधी पडे । दंतहीन लागती किडे । या नांव
आध्यात्मिक ॥ ३६ ॥ जरंडी⁴ घोलाणीं⁵ गंडमाळा । अवचितां स्वयें फुटे
डोळा । आपणचि कापी अंगुळा । या नांव आध्यात्मिक ॥ ३७ ॥ कळा
तिडका लागती । कां ते दंत उन्मळती । अधर जिव्हा रगडती । या नांव
आध्यात्मिक ॥ ३८ ॥ कर्णदुःख नेत्रदुःख । नाना दुःखें घडे शोक । गर्भाध
आणि नपुंसक । या नांव आध्यात्मिक ॥ ३९ ॥ फुलें वडस⁶ आणि पडळें⁷ ।
कीड गैतां⁸ रातांधळें । दुश्चित अमिष्ट आणि खुळें । या नांव आध्यात्मिक
॥ ४० ॥ मुकें बधिर राखोडें⁹ । थोंटें चळलें आणि वेडें । पांगुल कुन्हें¹⁰ आणि
पोंवडें¹¹ । या नांव आध्यात्मिक ॥ ४१ ॥ तौरेसें¹² थुलें¹³ कान केरें¹⁴ । गोरोळें¹⁵
जमुन¹⁷ टॉपरें¹⁸ । पडांगुळें¹⁹ गेंगाणें²⁰ विदरें²¹ । या नांव आध्यात्मिक ॥ ४२ ॥
दांतरें बोतरें घाणाळें²² । घ्राणहीन श्रोत्रहीन बैरेंळ²³ । अतिकृश अतिस्थूळ । या
नांव आध्यात्मिक ॥ ४३ ॥ तोतिलें बोबडें निर्बळ । रोगी कुरूप कुटिल ।
मत्सरी खादाड तपिळ । या नांव आध्यात्मिक ॥ ४४ ॥ संतापी अनुतापी
मत्सरी । कामिक हेवा तिरस्कारी । पापी अवगुणी विकारी । या नांव आ-
ध्यात्मिक ॥ ४५ ॥ उसव ताठा²⁴ करक । आवंटलें²५ आणि चरकें²६ । सुजी आणि
चाळकें । या नांव आध्यात्मिक ॥ ४६ ॥ सलें²⁷ आडवें गर्भपात । स्तन गुंतलें
१. कोरटा खोकला. २. घाबरला. ३. गळ्यापाशीं होणारा रोग. ४. पानथरी.
५. बुणबुणा. ६. हिरड्यांतून सुटतात. ७. मोतीबिंदु. ८. डोळे चांगले असून दिसत
नाहीं तो रोग. ९. जन्मतः ओंठतुटकें. १०. कुबडें. ११. पांगळें. १२. तारडोळें.
१३. मान तुलकावीत पाहणारें. १४. काणें. १५ तिरखें, चकणें. १६. घारेडोळें. १७.
ढेंगणें. १८. ठेंचाळत चालणारें. १९. सहाबोटांचें. २०. नाकांतून बोलणारें
२१. कुरूप. २२. मोठ्या नाकाचें. २३. बडबटणारें. २४. मान ताठरणें. २५.
जबड्याची सूज. २६. पायाचे सांधे धरतात तो रोग. २७. वाढ खुंटलेला
पोटांतील गर्भ.
६४ श्रीदासबोध. [ दशक
सन्निपात । संसारकोडें अपमृत्यु । या नांव आध्यात्मिक ॥ ४७ ॥ नखविष
आणि हिंगुरडें । ब्राचड आणि बावडें । उगीच दांतखीळ पडे । या नांव आ-
ध्यात्मिक ॥ ४८ ॥ झडती पाँती सुजती भोंवया । नेत्रीं होती रांजणवाडया ।
चाळसी लागे प्राणिया । या नांव आध्यात्मिक ॥ ४९ ॥ वांगें तिल सुरुमे
लाँसें । चामखीळ गलंडे म्हैंसे । चुंकुर होईजे मानसे । या नांव आध्या-
त्मिक ॥ ५० ॥ नाना फुगे आणि आवाळें । अंगीं दुर्गंधी प्रबळे । चाईंचाटी
लाळ गळे । या नांव आध्यात्मिक ॥ ५१ ॥ नाना चिंतेचीं १० काजळी ।
नाना दुःखें चित्त पोळी । व्याधीवांचून तळमळी । या नांव आध्यात्मिक ॥५२॥
वृद्धपणींच्या आपदा । नाना रोग होती सदा । देह क्षीण सर्वथा । या
नांव आध्यात्मिक ॥ ५३ ॥ नाना व्याधि नाना दुःखें । नाना भोग नाना
खांडकें । प्राणी तळमळी शोकें । या नांव आध्यात्मिक ॥ ५४ ॥ ऐसा आ-
ध्यात्मिक ताप । पूर्वपापाचा संताप । सांगतां सरेना अमूप । दुःखसागर
॥ ५५ ॥ बहुत काय बोलावें । श्रोतीं संकेतें जाणावें । पुढें बोलिलें स्वभा-
वें । आधिभौतिक ॥ ५६ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृतीय-
दशके आध्यात्मिकतापनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥
७. आधिभौतिक ताप.
श्रीगणेशाय नमः ॥ मागां झालें निरूपण । आध्यात्मिकाचें लक्षण ।
आतां आधिभौतिक तो कोण । सांगिजेल ॥ १ ॥ श्लोक ॥ सर्वभूतैर्देहयोगा-
त्सुखं दुःखं यदाप्यते ॥ द्वितीयं तं विजानीयात्संतापं चाधिभौतिकम् ॥ १ ॥
टी० ॥ सर्व भूतांचेनि संयोगें । ताप होतां मन भंगे । सुखदुःख उपजों
लागे । या नांव आधिभौतिक ॥ २ ॥ तरी आधिभौतिकाचें लक्षण । प्रांज-
ळ करूं निरूपण । जेणें अनुभवास ये पूर्ण । वोळखी तापत्रयाची ॥ ३ ॥
ठेंचा लागती मोडती कांटे । वाजती शस्त्रांचे घायें १२ बोंबे । सलें शिळका आणि
१. संसारांतील अडचणी. २. एक तऱ्हेचा फोड. ३. पापण्या. ४. मुरमाच्या
पुळ्या. ५. पांढरे चट्टे. ६. लासरूं. ७. मांसाचा एक प्रकारचा फुगा. ८.
अरिष्ट. ९. केंस झडतात तो रोग. १०. चिंतेनें येणारा काळसरपणा. ११.
पुष्कळ. १२. घाव. १३. अंगांत घस अडकून राहणें.
३ रा.] आधिभौतिक ताप. ६५
सरांटे । या नांव आधिभौतिक ॥ ४ ॥ आग्या आणि काचकुहिरी । अैवचट
लागे शरीरीं । गांधील येऊन दंश करी । या नांव आधिभौतिक ॥ ५ ॥
मासी गोमासी मोहळमासी । मुंगी तेलमुंगी डांस दंशी । सोट जळू लागे
पायांसीं । या नांव आधिभौतिक ॥ ६ ॥ पिसा पिसोळें चांचणें । कुसळें
सुंगळे देंकूण । विसीफें भौंवर गोंचीउ जान । या नांव आधिभौतिक
॥ ७ ॥ गोमी विंचू आणि विखार । व्याघ्र लांडगे आणि सूँकर । गोसांयाल
आणि सॉमर । या नांव आधिभौतिक ॥ ८ रानगाई रानम्हैसे । रानशकटें
आणि रिक्षें१० । रानहस्ती लांवपिसें । या नांव आधिभौतिक ॥ ९ ॥ सुस-
रीनें ओढून नेलें । कां तें अवचित बुडालें । अथवा खळाळीं पडिलें । या
नांव आधिभौतिक ॥ १० ॥ नाना विखारें अजगर । नाना मगर जळचर ।
नाना वनचरें अपार । या नांव आधिभौतिक ॥ ११ ॥ अश्व वृषभ आणि
खैर१२ । श्वान सूकर जंबूक१३ मार्जार । ऐसीं बहुविध क्रूर । या नांव आधिभौ-
तिक ॥ १२ ॥ ऐसीं कर्कशें भयानकेँ । बहुविध दुःखदायकें । दुःख दारुण
अनेकें । या नांव आधिभौतिक ॥ १३ ॥ भिंती माळवदें पडती ।
कडे भुयारीं कोसळती । वृक्ष अंगावर मोडती । या नांव आधिभौ-
तिक ॥ १४ ॥ कोणी एकाचा शाप जडे । कोणी एकें केलें चेडें१५ ।
अधांतरीं होती वेडे । या नांव आधिभौतिक ॥ १५ ॥ कोणी
एकें चाळविलें । कोणी एकें भ्रष्टविलें । कोणी एकें धरूनि नेलें । या
नांव आधिभौतिक ॥ १६ ॥ कोणी एकें दिधलें विष । कोणी एकें
लाविले दोष । कोणी एकें घातले पाश । या नांव आधिभौतिक ॥ १७ ॥
अवचितां शेर लागला । नेणो बिबवा चिडला । प्राणी धुरें जाजावला१६ ।
या नांव आधिभौतिक ॥ १८ ॥ इंगळावरी पाय पडे । शिळेखालीं हात
सांपडे । धावतां अडखळोनि पडे । या नांव आधिभौतिक ॥ १९ ॥ वाँपी
१. एक पाला, यानें अंगाची आग होते. २. खाजरी कुयरी, हिने अंगास
खाज सुटते. ३. अकस्मात. ४. चिलट. ५. इसव. ६. रानडुक्कर. ७. साळू पक्ष्याची
जात. ८. सांबर. ९. गवे १०. अस्वलें. ११. डंखिणीपासून लागलेलें वेड. १२.
माढव. १३. कोल्हा. १४. धाब्याचें छप्पर. १५. चेटक. १६. कासावीस झाला.
१७. विहीर.
६६ श्रीदासबोध. [ दशक
कूपें सरोवर । गैतां कडा नदीतीर । अवचितें पडे शरीर । या नांव आधि-
भौतिकु ॥ २० ॥ दुर्गाखालें कोसळती । तेणें दुःखें आक्रंदती । झाडावरुनि
पडती । या नांव आधिभौतिक ॥ २१ ॥ शीतें ओंठ तडकती । हात पाय
टांचा फुटती । चिखल्याँ जिव्हाळ्या लागती । या नांव आधिभौतिक ॥
२२ ॥ अशनपानाचिये वेळे । उष्णरसें जिव्हा पोळे । दांत करकरे आणि
हरळे । या नांव आधिभौतिक ॥ २३ ॥ पराधीन बाळपणीं । कुशब्मार
जाचणी । अन्नवस्त्रांविण आळणी । या नांव आधिभौतिक ॥ २४ ॥ सासुर-
वास गांलोरे । ठणके लोंसगें चिमोरे१० । आलें रुदन न धरे । या नांव
आधिभौतिक ॥ २५ ॥ चुकतां कान पिळिती । कां डोळां हिंग घालिती ।
सर्वकाळ धारकीं धरिती । या नांव आधिभौतिक ॥ २६ ॥ नानाप्रकारचे
मार । दुर्जन मारिती अपार । दुरी अंतरे माहेर । या नांव आधिभौतिक ॥
२७ ॥ कर्ण नासिक विंधिलें । बळेंचि धरूनि गोंदिलें । खोडी जाया पोळ-
विलें । या नांव आधिभौतिक ॥ २८ ॥ परचक्रीं धरूनि नेलें । नीच यातीस
दधिलें । दुर्दशा होऊनि मेलें । या नांव आधिभौतिक ॥ २९ ॥ नाना रोग
उद्भवले । जे आध्यात्मिकीं बोलिले । वैद्य पंचाक्षरी आणिले । या नांव
आधिभौतिक ॥ ३० ॥ नाना व्यथेचें निरसन । व्हावया औषध दारुण ।
बलात्कारें देती जाण । या नांव आधिभौतिक ॥ ३१ ॥ नाना वल्लींचे रस ।
काढे गरगोंडे कर्कश । घेतां होय कासाविस । या नांव आधिभौतिक ॥ ३२ ॥
ढाळ आणि उळाळें देती । पथ्य कठिण सांगती । अनुपान चुकतां वि-
पत्ती । या नांव आधिभौतिक ॥ ३३ ॥ फाड रक्त आणि फांसैणी१३ । गुल-
डागोंची जाचणी । तेणें दुःखें दुखवे प्राणी । या नांव आधिभौतिक ॥ ३४ ॥
रुचिकें विबवे घालिती । नाना दुःखें दडपे देती । शिरा तोडिती जळवा
लाविती । या नांव आधिभौतिक ॥ ३५ ॥ वहु रोग बहु औषधें । सांगतां
अपार अगाधें । प्राणी दुखवे तेणें खेदें । या नांव आधिभौतिक ॥ ३६ ॥
१. कुवा. २. खाडा. ३. पाण्यांत बागण्यानें बोटांच्या मधील जागा सडते,
तो रोग ४. खाण्यापिण्याचे. ५. वेगळा होतो. ६. सुकून जाणे. ७. गालगुच्चे. ८.
ठोसे. ९. डागणें. १०. चिमटे. ११. पुष्कळ वाने घालून केलेले पातळ औषध.
१२. उलटीचें औषध. १३. शस्त्राने गांठी चिरणे. १४ चोंचे. १५. रुईचा चीक.