दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 84, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंतेणें दुःखें आंदोळे । रडे पडे कां पोळे । अग्निसंगें ॥ ७ ॥ शरीर रक्षितां
न ये । घडती नाना अपाय । खोडी आधांतरीं होय । अवयवहीन बालक
॥ ८ ॥ अथवा अपाय चुकले । पूर्व पुण्य पुढें ठाकलें । मातेसि वोळखूं
लागलें । दिवसेंदिवस ॥ ९ ॥ क्षणभरी मातेसि न देखे । तरी आक्रंदोनि
रुदन करी दुःखें । ते समयीं मातेसारिखें । आणिक कांहींच नाहीं
॥ १० ॥ आस करूनि वासें पाहे । मातेविण कदा न राहे । वियोग पळ-
मात्र न साहे । स्मरण झाल्यानंतर ॥ ११ ॥ जरी ब्रह्मादिक देव आले ।
अथवा लक्ष्मीनें अवलोकिलें । तरी न वचे बुझाविलें । मातेवांचुनी ॥ १२ ॥
कुरूप अथवा कुलक्षण । सकळांहूनि करंटेपण । तरी नाहीं ती-
समान । भूमंडळीं कोणी ॥ १३ ॥ ऐसें तें केविलवाणें । मातेविण दिसें
उणें । रागें परतें केलें तिणें । तरी आक्रंदोनि मिठी घाली ॥ १४ ॥
सुख पावे मातेजवळी । दुरी करितांचि तळमळी । अति प्रीति तये काळीं ।
मातेवरी लागली ॥ १५ ॥ तंव ते मातेसि मरण आलें । प्राणी पोरटें
जाहलें । दुःखें झुरणी लागलें । आई आई म्हणोनी ॥ १६ ॥ आई पाहतां
दिसेना । दीनरूप पाहे जना । आस लागलीसे मना । आई येईल म्हणोनी
॥ १७ ॥ माता म्हणोनि मुख पाहे । तंव ती आपुली माता नोहे । मग हिंव-
सेंलेंसें राहे । दैन्यवाणें ॥ १८ ॥ मातावियोगें कष्टलें । तेणें मानसीं दुःख झालें।
देहहि क्षीणत्व पावलें । अतिशयेंसी ॥ १९ ॥ अथवा माताहि वांचली । माय-
लेंकरां भेटी झाली । बाळदशा ते राहिली । दिवसेंदिवस ॥ २० ॥ बाळपण
जाहलें उणें । दिवसेंदिवस होय शहाणें । मग तें मायेचें अत्यंत पेखणें ।
होतें तें राहिलें ॥ २१ ॥ पुढें लोभ लागला खेळाचा । कळप मेळवी पोरांचा ।
आल्या गेल्या डौयाचा । आनंद शोक वाहे ॥ २२ ॥ मायबापें शिकविती
पोटें । तयाचें दुःख परम वाटे । चट लागली न सुटे । संगति लेंकुरांची
॥ २३ ॥ लेंकुरांमध्यें खेळतां । नाठवे माता आणि पिता । तंव तेथेंहि अव-
चिता । दुःख पावला । २४ ॥ पडिले दांत फुटला डोळा । मोडला पाय
झाला खुळां । गेला माज अवकळा । ठाकोनि आली ॥ २५ ॥ निघाल्या देवी
१. कांपतो. २. मध्येंच. ३. वाट. ४. दूर. ५. हिरमुसलेंसें. ६. भोळा, लळा.
७. डावांचा. ८. पोटाच्या काळजीमुळे. ९. लंगडा.