सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

२३२ श्रीदासबोध. [ दशक

हें प्रवृत्तींचें बोलणें । प्रत्ययास आणि उणें । प्रत्यय पाहतां श्लाघ्यवाणें ।
होणार नाहीं ॥ ११ ॥ ब्रम्हास कोणें जन्मास घातलें । विष्णूस कोणें प्रति-
पाळिलें । रुद्रास कोणें संहारिलें । महाप्रळयीं ॥ १२॥ म्हणोनि हा सृष्टिभाव ।
अवघा मायेचा स्वभाव । कर्ता म्हणों निर्गुण देव । तरी तो निर्विकारी
॥ १३ ॥ म्हणावें माया जन्मास घाली । तरी हे आपणाचि विस्तारली ।
आणि विचारितां थारैली । हेंहि घडेना ॥ १४ ॥ आतां जन्मतो कोण ।
कैसी त्याची वोळखण । आणि संचिंताचें लक्षण । तेंहि निरूपावें ॥ १५ ॥
पुण्याचे कैसें रूप । आणि पापाचें कैसें स्वरूप । याहि शब्दाचा ऑक्षेप ।
कोण कर्ता ॥ १६ ॥ हें कांहींच न ये अनुमाना । म्हणती जन्म घेते वा-
सना । तरी ते पाहतां दिसेना । ना धरितां न ये ॥ १७॥ वासना कामना
आणि कल्पना । हेतु भावना मति नाना । ऐशा अनंत वृत्ति जाणा । अं-
तःकरणपंचकाच्या ॥ १८ ॥ असो हें अवघें जाणीवयंत्र । जाणीव म्हणजे
स्मरणमात्र । त्या स्मरणास जन्मसूत्र । कैसें लागे ॥ १९ ॥ देह निर्माण
पांचभूतांचा । वायु चाळक तयाचा । जाणणें हा मनाचा । मनोभाव ॥२०॥
ऐसें हें सहजचि घडलें । तत्त्वांचें गुंथाडें झालें । कोणास कोणें जन्मविलें ।
कोणत्या प्रकारें ॥ २१ ॥ तरी हें पाहतां दिसेना । म्हणोनि जन्मचि अ-
सेना । उपजला प्राणी येईना । मागुती जन्मा ॥ २२ ॥ कोणासीच जन्म
नाहीं । तरी संतसंगें केलें कार्यी । ऐसा अभिप्राय सर्वेही । श्रोत्यांचा
॥ २३ ॥ पूर्वी स्मरण ना विस्मरण । मध्येंचि हें झालें स्मरण । अंतर्यामी
अंतःकरण । जाणती कळा ॥ २४ ॥ सावर्धान आहे तों स्मरण । विकळ
होतां विस्मरण । विस्मरण पडतां मरण । पावती प्राणी ॥ २५ ॥ स्मर-
ण विस्मरण राहिलें । मग देहास मरण आलें । पुढें जन्मास घातलें ।
कोणास कोणें ॥ २६ ॥ म्हणोनि जन्मचि असेना । आणि यातनाहि दि-
सेना । अवघी व्यर्थचि कल्पना । बळावली ॥ २७ ॥ म्हणोनि जन्मचि
नाहीं कोणासी । श्रोत्यांची आशंका ऐसी । मरोन गेलें तें जन्मासी । मा-
गुर्ती न ये ॥ २८ ॥ वाळलें काष्ठ हिरवळेना । पडिलें फळ पुन्हा लागेना ।
तैसें पडिलें शरीर येइना । जन्मास मागुतें ॥ २९ ॥ मडकें अवाचितें फु-

१. लोकरीतीचें. २. बरें. ३. टिकली. ४. पूर्वकर्माचें. ५. विचार. ६. सावध.

९ वा. ] विकल्पनिरसन. २३३
टलें । फुटलें तें फुटोनीच गेलें । तैसेंचि पुन्हा जन्मलें । नाहीं मनुष्य ॥३०॥
येथें अज्ञान आणि सज्ञान । सारिखेंचि झालें समान । ऐसें बळावलें अनु-
मान । श्रोत्यांसी ॥ ३१ ॥ वक्ता म्हणे हो ऐका । अवघें थोतांड करूं
नका । सावध होऊन विवेका । अवलोकावें ॥३२॥ प्रयत्नेंविण कार्य झालें ।
जेविल्याविण पोट भरलें । ज्ञानेंविण मुक्त झालें । हें तों घडेना ॥ ३३ ॥
स्वयें आपण जेविला । त्यास वाटे लोक धाला । परंतु हें समस्तांला । घ-
डलें पाहिजे ॥ ३४ ॥ पोहणें शिकला तो तरेल । पोहणें नेणे तो बुडेल ।
येथेंहि अनुमान करील । ऐसा कवण ॥ ३५ ॥ तैसें जयांस ज्ञान झालें ।
ते ते तितुकेच तरले । ज्याचें बंधन तुटलें । तोचि मुक्त ॥ ३६ ॥ मोकळा
ह्याणे नाहीं बंधन । आणि प्रत्यक्ष बंदीं पडिले जन । त्यांचें कैचें समाधान ।
तें तुम्ही पाहा ॥ ३७ ॥ नेणे दुसऱ्याची तळमळ । तें मनुष्य परदुःखशी-
तळ । तैसाचि हाही केवळ । अनुभव जाणावा ॥ ३८ ॥ जयास आत्मज्ञान
झालें । तत्त्वें तत्व विवंचिलें । खुणेसि पावतां बाणलें । समाधान ॥ ३९ ॥
ज्ञानें चुके जन्ममरण । सगट बोलणें अप्रमाण । वेद शास्त्र आणि पुराण ।
मग कासयासी ॥ ४० ॥ वेदशास्त्र विचारखोली । महानुभावांची मंडळी ।
भूमंडळीं लोक सकळी । हें तों मानीतना ॥ ४१ ॥ अवघें होतां अप्रमाण ।
मग आपुलेंच काय प्रमाण । म्हणोनि जेथें आत्मज्ञान । तोचि मुक्त ॥४२॥
अवघेच मुक्त पाहतां नर । हा हि ज्ञानाचा उद्धार । ज्ञानेंविण तो उद्धार ।
होणार नाहीं ॥ ४३ ॥ आत्मज्ञान कळों आलें । म्हणोनि दृश्य मिथ्या
झालें । परंतु वेढा लाविलें । सकळांस येणें ॥ ४४ ॥ आतां प्रश्न फिटला ।
ज्ञानी ज्ञानें मुक्त झाला । अज्ञान तो बांधला । आपुले कल्पनेनें ॥ ४५ ॥
विज्ञानासारिखें अज्ञान । आणि मुक्तासारिखें बंधन । निश्चयासारिखें अ-
नुमान । मानूंचि नये ॥ ४६ ॥ बंधन ह्मणिजे कांहींच नाहीं । परी वेढां
लाविलें सर्वही । यासि उपायचि नाहीं । कळल्यावांचूनी ॥ ४७ ॥ कांहींच
नाहीं आणि बांधी । हेंचि नवल पाहतां आधीं । मिथ्या जाणिजेना बंधीं ।
म्हणोनि बद्ध ॥ ४८ ॥ भोळा भाव सिद्धीस जाव । हा उधाराचा उपाव ।
रोकडा मोक्षाचा अभिप्राय । विवेकें जाणावा ॥ ४९ ॥ प्राणी व्हावया मो-
कळा । आधीं पाहिजे जाणीवकळा । सकळ जाणतां निराळा । सहजचि

होय ॥ ५० ॥ कांहींच नेणिजे तें अज्ञान । सकळ जाणिजे तें ज्ञान । जा-
णीव राहतां विज्ञान । स्वयेंचि आत्मा ॥ ५१ ॥ अमृत सेवून अमर झाला ।
तो म्हणे मृत्यु कैसा येतो जनाला । ऐसा विवेकी म्हणे बद्धाला । जन्म तो
कैसा ॥ ५२ ॥ जाणता म्हणे जनांतें । तुम्हांस भूत कैसें झडपितें । तुम्हांस
विष कैसें चढतें । निर्विष म्हणे ॥ ५३ ॥ आधीं बद्धासारिखें व्हावें । मग
हें नलगेचि पुसावें । विवेक दूरी ठेवून पाहावें । लक्षण बद्धाचें ॥ ५४ ॥
निजल्यास चेइला तो । म्हणे हा कांरे वोसणैतो । अनुभव पाहणोंचि आहे
तो । तरी मग निजोन पाहावा ॥ ५५ ॥ ज्ञात्याची उठावली वृत्ती । बद्धा-
ऐसी न पडे गुंती । भुकेल्याची अनुभवप्राप्ती । धाल्यास न ये ॥ ५६ ॥
इतुकेन आशंका तुटली । ज्ञानें मोक्षप्राप्ति झाली । विवेक पाहतां बाणली ।
अंतरस्थिती ॥ ५७ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नवमदशके विक-
ल्पनिरसननिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥
८. देहातीत.
श्रीगणेशाय नमः ॥ ज्ञानी सुटला ज्ञानमतें । परंतु जन्म कैसा बद्धांतें ।
बद्धाचें काय जन्मतें । अंतकाळीं ॥ १ ॥ बद्ध प्राणी मरोन गेले । तेथें
कांहींच नाहीं उरलें । जाणिवेचें विस्मरण झालें । मरणापूर्वी ॥ २ ॥
ऐसी घेतली आशंका । याचें उत्तर ऐका । आतां दुश्चित होऊं नका । म्हणे
वक्ता ॥ ३ ॥ पंचप्राण स्थळें सोडिती । प्राणरूप वासनावृत्ती । वासना-
मिश्रित प्राण जाती । देह सोडुनियां ॥ ४ ॥ वायूसरिसी वासना गेली ।
ते वायुरूपेंचि राहिली । पुन्हा जन्म घेऊनि आली । हेतुपरत्वें ॥ ५ ॥
कित्येक प्राणी निःशेष मरती । पुन्हा मागुते जीव येती । टाकून दिल्हे तेणें
दुखवती । हस्तपादादिक ॥ ६ ॥ सर्पदंश झालियावरी । तीन दिवसां
उठवी धन्वंतरी । तेव्हां ते माघारीं । वासना येते कीं ॥ ७ ॥ कित्येक
शवें होऊन पडती । कित्येक तयांस उठविती । यमलोकींहून आणिती ।
माघारे प्राणी ॥ ८ ॥ कित्येक पूर्वी शापिले । ते शापदेह पावले । उःशाप-
काळीं पुन्हा आले । पूर्वदेहीं ॥ ९ ॥ कित्येकीं बहु जन्म घेतले । कित्येक
१. ब्रह्मानुभवाचें ज्ञान. २. भितों.

९ वा. ] देहातीत. २३५
परकाया प्रवेशले । ऐसे आले आणि गेले । बहुत लोक ॥ १० ॥ फुंकिल्या-
सरिसा वायु गेला । तेथें वायुसुत निर्माण झाला । म्हणोन वायुरूप वास-
नेला । जन्म आहे ॥ ११ ॥ मनाच्या वृत्ति नाना । त्यांत जन्म घेते वासना ।
वासना पाहतां दिसेना । परंतु आहे ॥ १२ ॥ वासना जाणिजे जाणीवहेतु ।
जाणीव मूळींचा मूळतंतु । मूळमायेंत असे मिश्रित । कारणरूपें ॥ १३ ॥
कारणरूपें आहे ब्रह्मांडीं । कार्यरूपें वर्ते पिंडीं । अनुमानीतां तांतडी ।
अनुमानेना ॥ १४ ॥ परंतु आहे सूक्ष्मरूप । जैसें वायूचें स्वरूप । सकळ
देव वायुरूप । आणि भूतसृष्टी ॥ १५ ॥ वायूमध्यें विकार नाना । वायु तरी
पाहतां दिसेना । तैसी जाणीव वासना । अति सूक्ष्म ॥ १६ ॥ त्रिगुण आणि
पंचभूतें । हीं वायूमध्यें मिश्रितें । अनुमानेना म्हणोनि त्यांतें । मिथ्या
म्हणों नये ॥ १७ ॥ सहज वायु चाले । तरी सुगंध दुर्गंध कळां आले । उष्ण
शीतळ तप्त निवाले । प्रत्यक्ष प्राणी ॥ १८ ॥ वायूचेनि मेघ वोळती ।
वायूचेनि नक्षत्रें चालती । सकळ सृष्टीची वर्तती गती । सकळ तो वायु
॥ १९ ॥ वायुरूपें दैवतें भूतें । अंगीं भरती अकस्मातें । वध केलिया प्रेतें ।
सावध होती ॥ २० ॥ राहणें ब्राह्मणसंबंध जाती । राहणें ठेवणीं सांपडती ।
नाना गुंतले उसवती । प्रत्यक्ष राहणें ॥ २१ ॥ वारें निराळें न बोले ।
देहामध्यें भरोन डोले । आळी घेऊन जन्मा आले । कित्येक प्राणी ॥ २२ ॥
ऐसा वायूचा विकार । एवंच कळेना विस्तार । सकळ कांहीं चराचर ।
वायुमुळें ॥ २३ ॥ वायु स्तब्धरूपें सृष्टिधर्ता । वायु चंचलरूपें सृष्टिकर्ता ।
न कळे तरी विचारो प्रवर्ता । म्हणिजे कळे ॥ २४ ॥ मुळापासून शेवट-
वरी । वायुचि सकळ कांहीं करी । वायुवेगळें कर्तृत्व चतुरीं । मज निरूपावें
॥ २५ ॥ जाणीवरूप मूळमाया । जाणीव जाते आपुल्या ठाया । गुप्त प्रगट
होऊनियां । विश्वीं वर्ते ॥ २६ ॥ कोठें गुप्त कोठें प्रगटे । जैसें जीवन उफों-
ळे आँटे । पुढें मागुतां ओघ लोटे । भूमंडळीं ॥ २७ ॥ तैसाच वायूमध्यें
जाणीवप्रकार । उमटे आटे निरंतर । कोठें विकारे कोठें समीरें । उगाच
वाजे ॥ २८ ॥ वारीं अंगावरून जाती । तेणें हात पाय वाळती । वारा
१. वायूपासून झालेला, अग्नि. २. अंगांत दैवत आणवून बोलविणें, त्यायोगें.
३. वासना. ४. चढतें-उतरतें. ५. विकार पावतो. ६. वायु.

वाजतां करपती । आलीं पिकें ॥ २९ ॥ नाना रोगांचीं नाना वारीं । पडिा
करिती पृथ्वीवरी । वीज कडाडी अंबरीं १ । वायूसुळें ॥ ३० ॥ वायूकारितां
रागोद्गार २ । कळे वोळखीचा निर्धार । दीप लागे मेव पडे हा चमत्कार ।
रागोद्वारीं ॥ ३१ ॥ वायु फुंकितां धुली पडती । वायु फुंकितां खोडकें
करपती । वायूकारितां चालती । नाना मंत्र ॥ ३२ ॥ मंत्रीं देव
प्रगटती । मंत्रीं भूतें आवरती । बैजागिरी वोडंबरै करिती । मंत्रसामर्थ्यें
॥ ३३ ॥ राक्षसांची मावरचना । ते हे देवादिकां कळेना । विचित्र सामर्थ्यें
नाना । स्तंभनमोहनादिकें ॥३४॥ धडचि पिसें करावें । पिसेंच उमजवावें ।
नाना विकार सांगावे । किती म्हणोनी ॥ ३५ ॥ मंत्रीं संग्राम देवाचा ।
मंत्रीं साभिमान ऋषींचा । महिमा मंत्रसामर्थ्याचा । कोण जाणे ॥ ३६ ॥
मंत्रीं पक्षी आटोपिती । मूषकें श्वापदें बांधिती । मंत्रीं महासर्प खिलोती ।
आणि धनलाभ ॥३७॥ आतां असो हा प्रश्न झाला । बद्धाचा जन्म प्रत्यया
आला । मागील प्रश्न फिटला । श्रोतयांचा ॥ ३८ ॥ इति

९ वा. ] संदेहवारण. २३७
कैसें झालें । विचारून पाहिजे बोलिलें । ऐसें श्रोतीं आक्षेपिलें । आक्षेप-
वचनें १ ॥ ९ ॥ आतां याचें प्रत्युत्तर । सावध ऐका निरुत्तर । येथें पडिले
कीं विचार । संदेहाचे ॥ १० ॥ ब्रह्मांड नाहीं म्हणौं तरी दिसे । आणि
दिसे म्हणों तरी नासे । आतां हें समजती कैसे । श्रोतेजन ॥ ११ ॥ तंव
श्रोते झाले उदितें २ । आह्नों म्हणती सावचित्त । प्रसंगें बोलों उचित । प्रत्युत्तर
॥ १२ ॥ आकाशीं दीपास लाविलें । दीपें आकाश परतें केलें । हैं तौं घ-
डेना पाहिलें । पाहिजे श्रोतीं ॥ १३ ॥ आप तेज अथवा पवन । सारूं न
शकती गगन । गगन पाहतां सघन । चळेल कैसें ॥ १४ ॥ अथवा कठिन
झाली मेदिनी ३ । तरी गगनें केली चाळणी । पृथ्विचें सर्वांग भेदूनी । राहिलें
गगन ॥ १५ ॥ याची प्रचीत ऐसी असे । जें जडत्वा आलें तितुकें नासे ।
आकाश जैसें तैसें असे । चळणार नाहीं ॥ १६ ॥ वेगळेपणें पाहावें । तयास
आकाश म्हणावें । अभिन्न होतां स्वभावें । आकाश ब्रह्म ४ ॥ १७ ॥ तस्मात्
आकाश कळेना । भेद गगनाचा कळेना । भासलें ब्रह्म यास जाणा । आ-
काश म्हणावें ॥ १८ ॥ निर्गुण ब्रह्मसें भासलें । कल्पूं जातां अनुमानलें ।
म्हणोन आकाश बोलिलें । कल्पनेसाठीं ॥ १९॥ कल्पनेसी भासे भास । ति-
तुकें जाणावें आकाश । परब्रह्म निराभास । निर्विकल्प ॥ २० ॥ पंचभूतां-
मध्यें वास । म्हणोनि बोलिजे आकाश । भूतांतरीं ५ जो ब्रह्मांश । तेंचि गगन
॥ २१ ॥ प्रत्यक्ष होतें आणि जातें । अचळ कैसें म्हणावें त्यातें । म्हणोनियां
गगनातें । भेदिलेंच नाहीं ॥ २२ ॥ पृथ्वि विरोन उरे जीवन । जीवन
नसतां उरे अग्न । अग्नि विझतां उरे पवन । तोहि नासे ॥ २३ ॥ मिथ्या
आलें आणि गेलें । तेणें खरें तें भंगले । ऐसें हें प्रतीतीस आलें । कोणे परी
॥ २४ ॥ भ्रमें प्रत्यक्ष दिसतॆं । विचार पाहतां काय तेथें । भ्रममूळ या
जगांतें । खरें कैसें म्हणावें ॥ २५ ॥ भ्रम शोधितां कांहींच नाहीं । तेथें भे-
दिलें कोणे ठाईं । भ्रमें भेदिलें म्हणतां ठायीं । भ्रमचि मिथ्या ॥ २६ ॥
भ्रमाचें रूप मिथ्या झालें । मग सुखें म्हणावें भेदिलें । मुळीं लटिकें त्याणें ६
केलें । तेंहि तैसें ॥ २७ ॥ लटिक्यानें उदंड केलें । तरी आमुचें काय गेलें ।

१. शंकावचनानें. २. तयार. ३. पृथ्वी. ४. वेगळें होऊन पाहिल्यास आकाश,
व एकरूपतेनें अनुभव घेतल्यास तेंच ब्रह्म होय. ५. पंचभूतांमध्ये. ६. जो नाहीं त्यानें.

केलें म्हणतांच ना॑थिलें । शाहणे जाणती ॥ २८ ॥ सागरामध्ये खसखस ।
तैसें परब्रह्म दृश्य । मतीसारिखा मतिप्रकाश । अंतरीं वाटे ॥ २९ ॥ मति
करितां विशाल । कवळों लागे अंतराळ । पाहतां भासे ब्रह्मगोल । कविंठ
जैसें ॥ ३० ॥ वृत्ति त्याहूनि विशाल । करितां ब्रह्मांड बदरिफळ । ब्रह्मा-
कार होतां केवळ । कांहींच नाहीं ॥ ३१ ॥ आपण विवेकें विशाळला ।
मर्यादे वेगळा झाला । मग ब्रह्मगोल देखिला । वटबीजैन्यायें ॥३२॥ होतां
त्याहून विस्तीर्ण । वटबीज कोटिप्रमाण । आपण होतां परिपूर्ण । कांहींच
नाहीं ॥ ३३ ॥ आपण भ्रमें लाहानला । केवळ देहधारी झाला । तरी मग
ब्रह्मांड त्याला । कवळेळ कैसें ॥ ३४ ॥ वृत्ति ऐसी वाढवावी । पसरून
नाहींच करावी । पूर्णब्रह्मास पुरवावी । चहूंकडे ॥ ३५ ॥ जवें एक सुवर्ण
आणितां । तेणें ब्रह्मांड मढवितां । कैसें होईल तत्वतां । बरें पाहा ॥ ३६ ॥
वस्तु वृत्तीस कँवळे । तेणें वृत्ति फाटोन वितुळे । निर्गुण आत्मा निवळे ।
जैसा तैसा ॥ ३७ ॥ येथें फिटली आशंका । श्रोते हो संदेह धरूं नका ।
अनुमान असेल तरी विवेका । अवलोकावें ॥ ३८ ॥ विवेकें तुटे अनुमान ।
विवेकें होतें समाधान । विवेकें आत्मनिवेदन । मोक्ष लाभे ॥ ३९ ॥ केली
मोक्षाची अपेक्षा । विवेकें सारिलें पूर्वपक्षां । सिद्धांत आत्मा प्रत्यक्षा । प्र-
माण नलगे ॥ ४० ॥ हीं प्रचितीचीं उत्तरें । कळती सारासार विचारें । म-
ननध्यासें साक्षात्कारें । पावन होइजे ॥४१॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्य-
संवादे नवमदशके संदेहवारणनिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥
१०. अलिप्त स्थिति.
श्रीगणेशाय नमः ॥ देउळामध्यें जगन्नाथ । आणि देउळावरी बैसला
काकें । तरी तो देवाहून अधिक । म्हणों नये ॥ १ ॥ सभा बैसली राज-
द्वारीं । आणि मर्कट बैसलें स्तंभावरी । परी तें सभेहून श्रेष्ठ चतुर्रीं ।
कैसें मानावें ॥ २ ॥ ब्राह्मण स्नान संध्या करून गेले । आणि बर्क तसेचि
१. नाहीं. २. बोराएवढें. ३. वटवृक्षाचे तुलनेनें त्यांचें बीज फारच लहान
असते, या विचारसरणीनें. ४. जवभार. ५. वृत्तीला ब्रह्माचें आकलन झाल्यावर
वृत्ति लय पावते. ६. भ्रामक विचारास. ७. कावळा. ८. बगळा.

बैसले । परी ते ब्राह्मणापरीस भले । कैसे मानावे ॥३॥ ब्राह्मणांमध्यें कोणी
नेमस्त । कोणी जाहले अस्ताव्यस्त । आणि श्वान सदा ध्यानस्त । परी तें
उत्तम नव्हे ॥ ४ ॥ ब्राह्मण लक्ष्यमुद्रा¹ नेणे । मार्जार लक्ष्याविशीं शहाणें ।
परी ब्राह्मणापरीस विशेष कोणें । म्हणावें तयासी ॥५॥ ब्राह्मण पाहे भेदा-
भेद । मक्षिका सर्वांसी अभेद । परी तसि जाहला ज्ञानबोध । हें तों न
घडे ॥ ६ ॥ उंच वस्त्रें नीच ल्याला । आणि समर्थ उघडाच बैसला । परी तो
आहे परीक्षिला । परीक्षकवंतीं ॥ ७ ॥ बाह्यात्कार केला अधिक । परी तो
अवघा लौकिक । येथें पाहिजे मुख्य एक । अंतर्निष्ठ ॥ ८ ॥ लौकिक बरा
संपादिला । परी अंतरीं सावध नाहीं जाहला । मुख्य देवास चुकला । तो
आत्मघातकी ॥ ९ ॥ देवास भजतां देवलोक । पित्रांस भजतां पितृलोक ।
भूतांस भजतां भूतलोक । पाविजेती ॥ १० ॥ जेणें जयास भजावें । तेणें
त्या लोकास जावें । निर्गुणीं भजतां व्हावें । निर्गुणचि स्वयें ॥ ११ ॥ निर्गु-
णाचें कैसें भजन । निर्गुणीं असावें अनन्य² । अनन्य होतां होइजे धन्य ।
निश्चयेंसी ॥ १२ ॥ सकळ केलियाचें सार्थक । देव ओळखावा एक । आ-
पण कोण हा विवेक । पाहिला पाहिजे ॥ १३ ॥ देव पाहतां निराकार ।
आपला तो मायिक विचार । सोहं आत्मा हा निर्धार । बाणोन गेला ॥१४॥
आतां अनुमान तो कांई । वस्तु आहे वस्तूच्या ठायीं । देहभाव कांहींच
नाहीं । ढांडोळितां ॥ १५ ॥ सिद्धास आणि साधन । हें तों अवघेंच अ-
नुमान । मुक्तास आणि बंधन । आठळेना ॥ १६ ॥ साधनें जें कांहीं सा-
धावें । तें तो आपणचि स्वभावें । आतां साधनाच्या नांवें । शून्याकार
॥ १७ ॥ कुलौल³ पावला राज्यपदवी । आतां रासभें⁴ कासया राखावीं ।
कुलालपणाची उठाठेवी । कासया पाहिजे ॥ १८ ॥ तैसा अवघा वृत्तिभाव ।
नाना साधनांचा उपाव । साध्य झालिया कैंचा ठाव । साधनासी ॥ १९ ॥
साधनें काय साधावें । नेमें काय फळ द्यावें । आपण वस्तु⁵ भरंगळावें ।
कासयासी ॥ २० ॥ देह तरी पांचा भूतांचा । जीव तरी अंश ब्रह्माचा ।
परमात्मा तरी अनन्याचा । ठाव पाहा ॥२१॥ उगेंच पाहतां मीपण दिसे ।
शोध घेतां कांहींच नसे । तत्वें तत्व निरसे । पुढें निखिल आत्मा ॥ २२ ॥


१. चित्तैक्याची एक रीत. २. एकनिष्ठ. ३. कुंभार. ४. गाढवें. ५. ब्रम्ह.

२४० श्रीदासबोध. [ दशक
आत्मा आहे आत्मपणें । जीव आहे जीवपणें । माया आहे मायापणें । वि-
स्तारली ॥ २३ ॥ ऐसें हें अवघेंच आहे । आणि आपणहि कोणी एक
आहे । हें सकळ शोधून पाहे । तोचि ज्ञानी ॥ २४ ॥ शोधूं जाणे सकळां-
सी । परी पाहों नेणे आपणासी । ऐसा ज्ञानी एकदेशी । वृत्तिरूपें ॥ २५ ॥
व वृत्तिरूप जरी पाहिलें । तरी मग कांहींच नाहीं राहिलें । प्रकृतिनिरासें
अवघेंच गेलें । विकारवंत ॥ २६ ॥ उरलें तें निखिल निर्गुण । विवंचितां
तेंचि आपण । ऐसी हे परमार्थाची खूण । अगाध आहे ॥ २७ ॥ फळ एक
आपण एक । ऐसा नाहीं हा विवेक । फळाचें फळ कोणी एक । स्वयेंचि
होइजे ॥ २८ ॥ रंक होता तो राजा जाहला । बरें पाहतां प्रत्यय आला ।
रंकपणाचा गलवला । रंकीं करावा ॥ २९ ॥ वेद शास्त्रें पुराणेँ । नाना सा-
धनें निरूपणें । सिद्ध साधु त्या कारणें । नाना सायास करिती ॥ ३० ॥ तें
ब्रह्मरूप आपणचि अंगें । सारासार विचार प्रसंगें । करणें न करणें वाउगें ।
कांहींच नाहीं ॥ ३१ ॥ रंक राजाज्ञेसि भ्यालें । तेचि पुढें राजा जाहलें । मग
तें भयाचि उडालें । रंकपणासरिसें ॥ ३२ ॥ वेदें वेदाज्ञेनें चालावें । सच्छास्त्रें
शास्त्र अभ्यासावें । तीर्थे तीर्थास जावें । कोणत्या प्रकारें ॥ ३३ ॥ अमृतें से-
वावें अमृत । अनंतें पाहावा अनंत । भगवंतें लक्षावा भगवंत । कोणत्या
प्रकारें ॥ ३४ ॥ संतें¹ असंतें त्यागावें । निर्गुणें निर्गुणास भावावें । स्वरूपें
स्वरूपों रंगावें । कोणत्या प्रकारें ॥ ३५ ॥ अंजनें ल्यावें अंजन । धनें साधावें
धन । निरंजनें निरंजन । कैसें अनुभवावें ॥ ३६ ॥ साध्येंचि करावें साध-
नासी । ध्येयेंचि धरावें ध्यानासी । उन्मनें आवरावें मनासी । कोणत्या प्रै-
कारें ॥ ३७ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नवमदशके अलिप्तस्थिति-
निरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी ४२७.
१. नित्य वस्तूनें. २. अनित्य. ३. वेद, शास्त्र, तीर्थ, अमृत इत्यादि हीं सर्व
(ओंवी ३३ ते ३६) आत्मरूपच असल्यामुळे आपण आपलेंच सेवन कसें
करावें? सारांश, स्वरूपतः सर्व एकरस आहे. ४. कल्पावें.

१० वा. ] अंतःकरण. २४१
दशक दहावा.
१. अंतःकरण.
श्रीगणेशाय नमः ॥ सकळांचें अंतःकरण एक। किंवा एक नव्हे अनेक ।
ऐसें हें निश्चयात्मक । मज निरूपावें ॥ १ ॥ ऐसें श्रोत्यानें पुसिलें । अं-
तःकरण एक कीं वेगळें । याचें उत्तर ऐकिलें । पाहिजे श्रोतीं ॥ २ ॥ सम-
स्तांचें अंतःकरण एक । निश्चय जाणावा नेमक । हा प्रत्ययाचा विवेक ।
तुज निरूपिला ॥ ३ ॥ श्रोता म्हणे वक्त्यासी । अंतःकरण एक समस्तांसी ।
तरी मिळेना एकएकासी । काय निमित्त ॥ ४ ॥ एक जेवितां अवघे धाले ।
एक निवतां अवघे निवाले । एक मरतां अवघे मेले । पाहिजेत कीं ॥ ५ ॥
एक सुखी एक दुःखी । ऐसें वर्ततें लौकिकीं । एक अंतःकरणाची वोळखी ।
कैसी जाणावी ॥ ६ ॥ जनीं वेगळाली भावना । कोणास कोणीच मिळेना ।
म्हणोन हें अनुमाना । येत नाहीं ॥ ७ ॥ अंतःकरण एक असतें । तरी ए-
काचें एकास कळों येतें । कांहीं चोरितांच न येतें । गौप्य गुह्य ॥ ८ ॥ या-
कारणें अनुमानेना । अंतःकरण एक हें घडेना । विरोध लागला जना ।
काय निमित्त ॥९॥ सर्प डसाया येतो । प्राणी भिऊन पळतो । एक अंतःक-
रण तरी तो । विरोध नसावा ॥ १० ॥ ऐसी श्रोत्यांची आशंका । वक्ता
म्हणे चळों नका । सावध होऊन ऐका । निरूपण ॥ ११ ॥ अंतःकरण म्ह-
णिजे जाणीव । जाणीव जाणता स्वभाव । देहरक्षणाचा उपाव । जाणती कळा
॥ १२ ॥ सर्प जाणोनि दंखूं आला । प्राणी जाणोनि पळाला । दोहींकडे जा-
णिवेला । बरें पाहा ॥ १३ ॥ दोहींकडे जाणिवेसि पाहिलें । तरी अंतः-
करण एकचि जाहलें । विचारितां प्रत्यया आलें । जाणीवरूपें ॥ १४ ॥
जाणीवरूपें अंतःकरण । सकळांचें एक हें प्रमाण । जीवमात्रास जाणपण ।
एकचि असे ॥ १५ ॥ एक दृष्टीचें देखणें । एक जिव्हेचें चाखणें । ऐकणें
स्पर्शणें वास घेणें । सर्वत्रांस एक ॥ १६ ॥ पशु पक्षी किडा मुंगी । जीव-
मात्र निर्माण जगीं । जाणीवकळा सर्वांलागीं । एकचि आहे ॥ १७ ॥ सर्वांस
जळ तें शीतल । सर्वांस अग्नि तेजाळ । सर्वांस अंतःकरण केवळ । जाण-

२४२ श्रीदासबोध. [ दशक
ती कळा ॥ १८ ॥ आवडे नावडे ऐसें जाहलें । तरी देहस्वभावावरी गेलें ।
परी हें कळों आलें । अंतःकरणयोगें ॥ १९ ॥ सर्वांचें अंतःकरण एक ।
ऐसा निश्चय निश्चयात्मक । जाणती याचें कौतुक । चहूकडे ॥ २० ॥ इत्तु-
केन फिटली आशंका । आतां अनुमान करूं नका । जाणणें तितुकें एका ।
अंतःकरणाचें ॥ २१ ॥ जाणोन जीव चारा घेती । जाणोन भिती लपती ।
जाणोनियां पळोन जाती । प्राणिमात्र ॥ २२ ॥ किडामुंगीपासून ब्रह्मादिक ।
समस्तांस अंतःकरण एक । ये गोष्टीचें कौतुक । प्रत्ययें जाणावें ॥ २३ ॥
थोर लहान तरी अग्नी । थोडें बहुत तरी पाणी । न्यून पूर्ण तरी प्राणी ।
अंतःकरण जाणती ॥ २४ ॥ कोठें उणें कोठें अधिक । परंतु जिन्नस मासला
एक । जंगम १ प्राणी कोणी एक । जाणिल्याविण नाहीं ॥ २५ ॥ जाणीव
म्हणजे अंतःकरण । अंतःकरण विष्णूचा अंश जाण । विष्णु करितो प्रति-
पाळण । येणें प्रकारें ॥ २६ ॥ नेणतां प्राणी संहारितो । नेणीव तमोगुण
बोलिजे तो । तमोगुणें रुद्र संहारितो । येणें प्रकारें ॥ २७ ॥ कांहीं जाणीव
कांहीं नेणीव । हा रजोगुणाचा स्वभाव । जाणतां नेणतां जीव । जन्मास
येती ॥ २८ ॥ जाणिवेनें होतें सुख । नेणिवेनें होतें दुःख । सुखदुःख आव-
श्यक । उत्पत्तिगुणें ॥ २९ ॥ जाणण्या नेणण्याची बुद्धी । तोचि देहीं जा-
णावा विधी २ । स्थूळदेहीं ब्रह्मा त्रिशुद्धी ३ । उत्पत्तिकर्ता ॥ ३० ॥ ऐसा उत्पत्ति
स्थिति संहार । प्रसंगे बोलिला विचार । परंतु याचा निर्धार । प्रत्ययें पा-
हावा ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दशमदशके अंतःकरण-
निरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥
२. देहाशंका.
श्रीगणेशाय नमः ॥ स्वामीनें विचार दाखविला । तेथें विष्णूचा अभाव
दिसोन आला । ब्रह्मा विष्णु महेश्वराला । उरी नाहीं ॥ १ ॥ उत्पत्ति
स्थेंति संहार । ब्रह्मा विष्णु महेश्वर । यांचा पाहतां विचार । प्रत्यय नाहीं
॥ २ ॥ ब्रह्मा उत्पत्तिकर्ता चौमुखाचा । येथें प्रत्यय नाहीं त्याचा । पालन-
कर्ता विष्णु चौभुजांचा । तोहि ऐकोनि जाणों ॥ ३ ॥ महेश ५ संहार करि-
१. सचेतन. २. ब्रह्मदेव. ३. निश्चयपूर्वक. ४. पालन. ५. शंकर.

१० वा. ] देहाशंका. २४३
तो । ह्याहि प्रत्यय कैसा येतो । लिंगपुराणीं महिमा तों । विपरीत बोलिला
॥ ४ ॥ मूळमायेस कोणें केलें । हें तों पाहिजे कळलें । तिहीं देवांचें रूप
झालें । ऐलीकडे ॥ ५ ॥ मूळमाया लोकजननी । तयेपासून गुणक्षोभिणी ।
गुणक्षोभिणीपासून त्रिगुणीं । जन्म देवां ॥ ६ ॥ ऐसें बोलती शास्त्रकारक ।
आणि प्रवृत्तीचेहि लोक । प्रत्यय पुसतां कित्येक । आकांत करिती ॥ ७ ॥
म्हणोनि त्यांस पुसवेना । त्यांचेन प्रत्यय आणवेना । प्रत्ययेंविण प्रयत्न
नाना । ठकाठकी ॥ ८ ॥ प्रचीतीविण वैण म्हणवी । उगिच करी उठाठेवी ।
तया मूर्खाला गोवीं । प्राणिमात्र ॥ ९ ॥ तैसाच ह्याहि विचार । प्रत्ययें क-
रावा निर्धार । प्रत्यय नसतां अंधकार । गुरुशिष्यांशीं ॥ १० ॥ बरें लोकांसि
काय म्हणावें । लोक म्हणती तेंचि बरवें । परंतु स्वामींनीं सांगावें । विशेंद
करूनी ॥ ११ ॥ म्हणों देवीं माया केली । तरी देवांचीं रूपें मायेंत आलीं ।
जरी म्हणों मायेनें माया केली । तरी दुसरी नाहीं ॥ १२ ॥ जरी म्हणों
भूतीं केली । तरी ते भूतांचीच वळली । म्हणावी जरी परब्रह्मीं केली । तरी
ब्रह्मीं कर्तृत्व नाहीं ॥ १३ ॥ आणि माया खरी असावी । तरी ब्रह्मीं कर्तृत्वाची
गोंवी । माया मिथ्या ऐसी जाणावी । तरी कर्तृत्व कैंचें ॥ १४ ॥ आतां हें
अवघेंच उर्गवे । आणि मनासि प्रत्यय फाँवे । ऐसें केलें पाहिजे देवें । कृपा-
ळूपणें ॥ १५ ॥ वेद मातृकेविण नाहीं । मातृका देहाविण नाहीं । देह
निर्माण होत नाहीं । देहावेगळा ॥ १६ ॥ तया देहामध्यें नरदेहो । त्या
नरदेहांत ब्राह्मणदेहो । तया ब्राह्मणदेहांत पाहो । अधिकार वेदीं ॥ १७ ॥
असे वेद कोठून झाले । देह कासयांचे केले । देव कैसे प्रगटले । कोणत्या
प्रकारें ॥ १८ ॥ ऐसें बळावलें अनुमान । केलें पाहिजे समाधान । वक्ता
म्हणे सावधान । होईं आतां ॥ १९ ॥ प्रत्यय पाहतां सांकडी । अवघी
होते बिघडाबिघडी । अनुमानितां घडीनें घडी । काळ जातो ॥ २० ॥ लो-
कधाटी शास्त्रनिर्णय । येथें बहुविध निश्चय । म्हणोनियां एक प्रत्यय । ये-
णार नाहीं ॥ २१ ॥ आतां शास्त्रांची भीड धरावी । तरी सुटेना ही गाथा-
गोवी । गाथागोवी हे उगवी । तरी शास्त्रभेद दिसे ॥ २२ ॥ शास्त्र रक्षून
१. त्रिगुणांचा आविर्भाव करणारी. २. व्यावहारिक. ३. फजीत करी.
४. उघड. ५. गुंतागुंत. ६. उलगडावें. ७. येई. ८. अक्षरांवाचून.

२४४ श्रीदासबोध. [ दशक
प्रत्यय आणिला । पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत पाहिला । शहाणा मूर्ख समजा-
विला । एका वचनें ॥ २३ ॥ शास्त्रींच पूर्वपक्ष बोलिला । पूर्वपक्ष म्हणावें
लटक्याला । विचार पाहतां आम्हांला । शब्द नाहीं ॥ २४ ॥ तथापि
बोलों कांहीं एक । शास्त्र रक्षून कौतुक । श्रोतीं सादरें विवेक । केला पा-
हिजे ॥ २५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दशमदशके देहाशंका-
निरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥
३. देहाशंका.
श्रीगणेशाय नमः ॥ उपाधीविणें जें कां आकाश । तेंचि ब्रह्म निराभास ।
ते निराभासीं मूळमायेस । जन्म जाहलें ॥ १ ॥ ते मूळमायेचें लक्षण ।
वायुस्वरूपचि जाण । पंचभूतें आणि त्रिगुण । वायुअंगीं ॥ २ ॥ आका-
शापासून वायु झाला । तो वायुदेव बोलिला । वायूपासून अग्नि झाला ।
तो अग्निदेव ॥३॥ अग्नीपासून झालें आप । तें नारायणाचें स्वरूप । आपा-
पासून पृथ्वीचें रूप । तें बीजाकारें ॥ ४ ॥ ते पृथ्वीचे पोटीं पाषाण । बहु-
दैवांचें लक्षण । नाना प्रचीत प्रमाण । पाषाणदेवीं ॥ ५ ॥ नाना काष्ठ वृक्ष
मृत्तिका । प्रचीत रोकडी विश्वलोकां । समस्त देवांचा थारा एका । वायूम-
ध्यें ॥ ६ ॥ देव यक्षिणी कात्यायनी । चामुंडा जखिणी मानविणी । नाना
शक्ति नाना स्थानीं । देहपरत्वें ॥ ७ ॥ पुरुषनामें कितीएक । देव असती
अनेक । भूतें दैवतें नपुंसक । नामें बोलिजेती ॥८॥ देव देवता देवतें भुतें ।
पृथ्वीमध्यें असंख्यातें । परंतु या समस्तांतें । वायुस्वरूप बोलिलें ॥ ९ ॥
वायुस्वरूप सदा असणें । प्रसंगें नाना देह धरणें । गुप्त प्रगट होणें जाणें ।
समस्तांसी ॥ १० ॥ वायुस्वरूपें विचरती । वायूमध्ये जगज्योती ।
जाणती कळा वासना वृत्ती । नाना भेदें ॥ ११ ॥ आकाशापासून वायु
झाला । तो दों प्रकारें विभागला । सावधपणें विचार केला । पाहिजे श्रोतीं
॥ १२ ॥ एक वारा सकळ जाणती । एक वायूमधील जगज्ज्योती । जग-
ज्योतीच्या अनंत मूर्ती । देवदेवतांच्या ॥ १३ ॥ वायु बहुत विकारला ।
परंतु दों प्रकारें विभागला । आतां विचार ऐकिला । पाहिजे तेजाचा ॥१४॥
वायूपासून तेज झालें । उष्ण शीतळ प्रकाशलें । द्विधारूप ऐकिलें । पाहिजे

१० वा. ] बीजलक्षण. २४५
तेजाचें ॥ १५ ॥ उष्णापासून झाला भानु । प्रकाशरूपें दैदीप्यमान ।
सर्वभक्षक हुताशन १ । आणि विद्युल्लता ॥१६॥ शीतळापासून आप अमृत ।
चंद्र तारा आणि शीत । आतां परिसा सावचित्त । होऊन श्रोते ॥ १७ ॥
तेज बहुत विकारिलें । परंतु द्विधाच बोलिलें । आपहि द्विधाच निरूपिलें ।
आप आणि अमृत ॥ १८ ॥ ऐका पृथ्वीचा विचार । पाषाण मृत्तिका निरं-
तर । आणिक दुसरा प्रकार । सुवर्ण परिस नाना रत्ने ॥ १९ ॥ बहुरत्ना
वसुंधरा २ । कोण खोटा कोण खरा । अवघें कळे विचारा- । रूढ होतां
॥ २० ॥ मनुष्यें कोठून झालीं । हे मुख्य आशंका राहिली । पुढें वृत्ति
सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ २१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
दशमदशके देहाशंकानिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥
४. बीजलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ आतां पाहों जातां उत्पत्ती । मनुष्यापासून मनुष्यें
होती । पशूपासून पशु निपजती । प्रत्यक्ष आतां ॥ १ ॥ खेचरें ३ आणि
भूचरें ४ । वनचरें आणि जळचरें ५ । नानाप्रकारचीं शरीरें । शरीरापासून
होती ॥ २ ॥ प्रत्यक्षास आणि प्रमाण । निश्चयास आणि अनुमान । मार्ग
सांडून आडरान । घेऊंच नये ॥३॥ विपरीतापासून विपरीत होती । परी
शरीरें बोलिजेती । शरीरावांचून उत्पत्ती । होणार नाहीं ॥ ४ ॥ तरी हे
उत्पत्ति कैसी झाली । कासयाची कोणें केली । जेणें केली त्याची निर्मिली ।
काया कोणें ॥ ५ ॥ ऐसें पाहतां उदंड लांबलें । परी मुळीं शरीर कैसें
झालें । कासयाचें उभारिलें । कोणें कैसें ॥ ६ ॥ ऐसी हे मागील आशंका ६ ।
राहत गेली ते ऐका । कदापि जाजूं घेऊं नका । प्रत्यय आल्यानें ॥ ७ ॥
प्रत्ययचि आहे प्रमाण । मूर्खास वाटे अप्रमाण । पिंडें प्रचीत शब्दें जाण ।
विश्वासासी ॥ ८ ॥ ब्रह्मीं मूळमाया झाली । तेचि अष्टधा ७ प्रकृति बोलिली ।
भूतीं त्रिगुणीं कालवली । मूळमाया ॥९॥ ते मूळमाया वायुस्वरूप । वायू-
मध्यें जाणीवेचें रूप । तेचि इच्छा परी आरोप । ब्रह्मीं न घडे ॥ १० ॥
१. अग्नि. २. पृथ्वी. ३. पक्षी. ४. जनावरें. ५. मासे वगैरे. ६. संशय. ७. पंच-
महाभूतें व मन, बुद्धि, आणि अहंकार मिळून आठ प्रकारची.

२४६ श्रीदासबोध. [ दशक
तथापि ब्रह्मीं कल्पिला । तरी तो शब्दचि वायां गेला । आत्मा निर्गुण
संचला । शब्दातीत ॥११॥ आत्मा निर्गुण वस्तु ब्रह्म । नाममात्र तितुका
भ्रम । करून लाविला संभ्रमें¹ । तरी लागणार नाहीं ॥१२॥ तथापि आग्रहें
लाविला । तरी धोंडा अंतरीं मारिला । आकाशावरी कुंथिला । तरी तें
तुटेना ॥ १३ ॥ तैसें ब्रह्म निर्विकार । निर्विकारीं लाविती विकार । विकार
नासे निर्विकार । जैसें तैसें ॥१४॥ आतां ऐकावा प्रत्यय । जाणोनि धरावा
निश्चय । तरीच पाविजे जय । अनुभवाचा ॥१५॥ मायाब्रह्मीं जो समीर² ।
त्यातें जाणता तो ईश्वर । ईश्वर आणि सर्वेश्वर । तयासचि बोलिजे ॥ १६॥
तोचि ईश्वर गुणास आला । त्याचा त्रिगुणभेद झाला । ब्रह्मा विष्णु महेश
उपजला । तये ठायीं ॥१७॥ सत्व रज आणि तम । हे त्रिगुण उत्तमोत्तम ।
त्यांच्या स्वरूपाचा अनुक्रम । मागां निरूपिला ॥ १८ ॥ जाणता विष्णु भ-
गवान । जाणता नेणता चतुरानन³ । नेणता महेश पंचानन⁴ । अत्यंत
भोळा ॥ १९ ॥ त्रिगुणीं त्रिगुण कालवले । कैसे होती वेगळाले । परी विशेष
न्यून भासले । ते बोलावे लागती ॥ २० ॥ वायुमध्यें विष्णु होता । तो
वायुस्वरूपचि तत्वतां । पुढें झाला देहधर्ता । चतुर्भुज ॥२१॥ तैसाच ब्रम्हा
आणि महेश । देह धरिती सावकाश । गुप्त प्रगट होतां तयांस । वेळ नाहा
॥ २२ ॥ आतां रोकडी प्रचीती । मनुष्यें गुप्त प्रगटती । मों⁵ त्या देवांच्या
मूर्ती । सामर्थ्यवंत ॥ २३ ॥ देव देवता भूतें दैवतें । चढतें सामर्थ्य आहे
येथें । येणेंचि न्यायें राक्षसांतें । सामर्थ्यकळा ॥ २४ ॥ झोटिंग वायुस्वरूप
असती । सवेंचि खुळखळां चालती । खोबरीं खारिका टाकोनि देती । अक-
स्मात ॥ २५ ॥ अवघेंच न्याल अभावें⁶ । तरी हें बहुतेकांस ठावें । आपुला-
ल्या अनुभवें । विश्वलोक जाणती ॥ २६ ॥ मनुष्यें धरिती शरीरवेष । नाना
परकाया प्रवेश । मग तो परमात्मा जगदीश । कैसा न धरी ॥ २७ ॥ म्ह-
णोन वायुस्वरूप देह धरिले । ब्रम्हा विष्णु महेश झाले । पुढें तेचि विस्तार-
लें । पुत्रपौत्रीं ॥ २८ ॥ अंतरींच स्त्रिया कल्पिल्या । तों त्या कल्पितांच
निर्माण झाल्या । परी तयांपासून प्रजा निर्मिल्या । नाहींत कदा ॥ २९ ॥
१. प्रपंचाचा व्याप. २. वायु. ३. महादेव. ४. शंकर. ५. मग. ६. अश्रद्धेनें.

१० वा.] बीजलक्षण. २४७
इच्छून पुत्र कल्पिले । ते ते प्रसंगीं निर्माण झाले । येणें प्रकारें वर्तले ।
हरिहरादिक ॥ ३० ॥ पुढें ब्रम्हयानें सृष्टि केली । इच्छेसरीसी सृष्टि झाली ।
जीवसृष्टि निर्माण केली । ब्रम्हदेवें ॥ ३१ ॥ नानाप्रकारचे प्राणी कल्पिले ।
इच्छेसरीसे निर्माण झाले । अवघें जोडेंचि उदेलेँ । अंडजें १ जारं२जादिक ॥ ३२ ॥
थुक जलस्वेदा३पासून झाले । ते प्राणी स्वेदज बोलिले । एक वायूकरितां
झाले । अकस्मात उद्भिज्जें ४ ॥ ३३ ॥ मनुष्याची गौड ५ विद्या । राक्षसांची वो-
डंबरी ६ विद्या । ब्रह्मयाची सृष्टिविद्या । येणें प्रकारें ॥ ३४ ॥ कांहींएक मनु-
ष्यांची । त्याहून विशेष राक्षसांची । त्याहून विशेष ब्रह्मयाची । सृष्टिवि-
द्या ॥ ३५ ॥ जाणते नेणते प्राणी निर्मिले । वेद वदोन मार्गी लाविले ।
ब्रह्मयानें निर्माण केले । येणें प्रकारें ॥ ३६ ॥ मग शरीरापासून शरीरें । सृ-
ष्टि वाढिली विकारें । सकळ शरीरें येणें प्रकारें । निर्माण जाहलीं ॥ ३७ ॥
येथें आशंका फिटली । सकळ सृष्टि विस्तारली । विचार पाहतां प्रत्यया
आली । यथान्वयें ॥ ३८ ॥ ऐसी सृष्टि निर्माण केली । पुढें विष्णूनें कैसी
अतिपाळिली । हेहि विवंचना पाहिली । पाहिजे श्रोतीं । ३९ सकळ
प्राणी निर्माण झाले । ते मूळरूपें जाणोन पाळिले । शरीरें दैत्य निर्दाळिले ।
नानाप्रकारींचे ॥ ४० ॥ नाना अवतार धरणें । दुष्टांचा संहार करणें । धर्म
स्थापावयाकारणें । विष्णूस जन्म ॥ ४१ ॥ म्हणोन धर्मस्थापनेचे नर । तेहि
विष्णूचे अवतार । अभक्त दुर्जन रजनीचरें ७ । सहजचि झाले ॥ ४२ ॥ आ-
तां प्राणी जे जन्मले । ते नेणोन संहारले । मूळरूपें संहारिले । येणें प्रकारें
॥ ४३ ॥ शरीरें रुद्र खवळेल । तैं जीवसृष्टि संहारेल । अवघें ब्रह्मांडचि
जळेल । संहारकाळीं ॥ ४४ ॥ एवं उत्पत्ति स्थिति संहार । यांचा ऐसा
आहे विचार । श्रोतीं होऊन तत्पर । अवधान द्यावें ॥ ४५ ॥ कल्पांतीं
संहार घडेल । तोचि पुढें सांगिजेल । पंच प्रलय ओळखेल । तोचि ज्ञानी
॥ ४६ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दशमदशके बीजलक्षणनिरूपणं
नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥
१. पक्षी. २. मनुष्य वगैरे. ३. घामापासून. ४. वनस्पती. ५. गौडबंगाल.
६. मायावी. ७. राक्षस.

२४८ श्रीदासबोध. [ दशक
५. पंचप्रलय.
श्रीगणेशाय नमः ॥ ऐक प्रलयाचें लक्षण । पिंडीं दोन प्रलय जाण ।
एक निद्रा एक मरण । देहांतकाळीं ॥ १ ॥ देहधारक तीन मूर्ती । निद्रा
जेव्हां संपादीती । तो निद्राप्रलय श्रोतीं । ब्रम्हांडींचा जाणावा ॥ २ ॥
तिही मूर्तीस होईल अंत । ब्रम्हांडास माडेल कल्पांत । तेव्हां जाणावा नेम-
स्त। ब्रम्हप्रलय जाहला ॥ ३ ॥ दोन्ही पिंडीं दोन्ही ब्रम्हांडीं । चारी प्रलय
नवखंडीं । पांचवा प्रलय उदंडीं । जाणिजे विवेकाचा ॥ ४ ॥ ऐसे हे पांच
प्रलय । सांगीतले यथान्वयें । आतां हें अनुभवास ये । ऐसें करूं ॥ ५ ॥
निद्रा जेव्हां संचरे । तेव्हां जागृतिव्यापार सरे । सुषुप्ति अथवा स्वप्न भरे ।
अकस्मात अंगीं ॥ ६ ॥ या नांव निद्राप्रलय । जागृतीचा होय क्षय ।
आतां ऐका देहांतसमय । म्हणिजे मृत्युप्रलय ॥ ७ ॥ देहीं रोग बळावती ।
अथवा कठिण प्रसंग पडती । तेणें पंचप्राण जाती । व्यापार सांडूनी ॥ ८ ॥
तिकडे गेला मनपवन । इकडे राहिली नुसती तनू । दुसरा प्रलय अनुमाने ।
असेचिना ॥ ९ ॥ तिसरा ब्रम्हा निजेला । तों हा मृत्युलोक गोळा झाला ।
अवघा व्यापार खुंटला । प्राणिमात्रांचा ॥ १० ॥ तेव्हां प्राण्यांचे सूक्ष्मांश ।
वायुचक्रीं करिती वास । कित्येक काळ जातां ब्रम्हयास । जागृती घडें
॥ ११ ॥ पुनः मागुती सृष्टि रची । विसंचले जीव मागुते संची । सीमा हो-
तां आयुष्याची । ब्रम्हप्रलय मांडे ॥ १२ ॥ शतवरुषें मेघ जाती । तेणें प्राणी
मृत्यु पावती । असंभाव्य तडके क्षिती । मर्यादे वेगळी ॥ १३ ॥ सूर्य तपे बारा
कळीं । तेणें पृथ्वीची होय होळी । अग्नि पावतां पाताळीं । शेष विष वमीं ॥१४॥
आकाशीं सूर्यांच्या ज्वाला । पाताळीं शेष वमी गरळा । दोहींकडून जळतां
भूगोळा । उरी कैंची ॥ १५ ॥ सूर्यास खडतरता चढे । हलकल्लोळ चहूंकडे ।
कोसळती मेरूचे कडे । गडगडायमान ॥ १६ ॥ अमरावती सत्यलोक ।
वैकुंठ कैलासादिक । यांहि वेगळे नानालोक । भस्मोन जाती ॥ १७ ॥ मेरु
अवघाच सरे । तेथील महिमाच वोसरे । देवसमुदाय बावरे । वायुचक्रीं
॥ १८ ॥ भस्म झालिया धरित्री । पर्जन्य पडे शुंडाधारीं । मही विरे
जळांतरीं । निमिषमात्रें ॥ १९ ॥ पुढें नुसतें उरेल जळ । तयास शोषील
१. झोंप. २. संशय. ३. विस्कळित झालेले जमवितो. ४. ओकतो.

अनळ । पुढें एकवटतील ज्वाळ । मर्यादेवेगळे ॥ २० ॥ समुद्रांचा वडवान-
ळ । शिवनेत्रींचा नेत्रानळ । सप्तकंचुकीं२चा आवरणानळ । सूर्य आणि वि-
द्युल्लता ॥ २१ ॥ ऐसे ज्वाळ एकवटती । तेणें देव देह सोडिती । पूर्वरूपीं
मिळोन जाती । प्रभंजनीं ॥ २२ ॥ तो वारा झडपी वैश्वानरा । वेन्हि वि-
जेल एकसरां । वायु धांवे सैरावैरा । परब्रह्मीं ॥ २३ ॥ धूम्र वितळे आ-
काशीं । तैसें होईल समीरासी । बहुतांमध्ये थोडियासी । नाश बोलिला
॥ २४ ॥ वायु वितळतां जाण । सूक्ष्म भूतें आणि त्रिगुण । ईश्वर सांडी
अधिष्ठान । निर्विकल्पीं ॥ २५ ॥ तेथें जाणीव राहिली । आणि जगज्ज्योत
निमाली । शुद्ध सारांश उरली । स्वरूपस्थिती ॥ २६ ॥ जितुकीं कांहीं
नामाभिधानें । तये प्रकृतीचेनि४ गुणें । प्रकृति नसतां बोलणें । कैसें बोलावें
॥ २७ ॥ प्रकृति असतां विवेक कीजे । त्यास विवेकप्रलय बोलिजे । पांचहि
प्रलय वोजें५ । तुज निरूपिले ॥ २८ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
दशमदशके पंचप्रलयनिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥
६. भ्रम.
श्रीगणेशाय नमः ॥ उत्पत्ति स्थिति संहार । यांचा निरूपिला व्यवहार ।
परमात्मा निर्गुण निराकार । जैसा तैसा ॥ १ ॥ होतें वर्ततें आणि जातें ।
यांचा संबंध नाहीं तेथें । आदि मध्य अवसानीं तें । संचलेंचि आहे ॥ २ ॥
परब्रह्म असतांचि असे । मध्येंच हा भ्रम भासे । भासे परंतु अवघा नासे ।
कालांतरीं ॥ ३ ॥ उत्पत्ति स्थिति संहारत । मध्यें हें अखंड होत जात ।
पुढें शेवटीं कल्पांत । सकळांस आहे ॥ ४ ॥ यांमध्ये ज्यास विवेक आहे ।
तो आधींच जाणताहे । सारासार विचारें पाहे । म्हणोनियां ॥ ५ ॥ बहुत
भ्रमिष्ट मिळाले । त्यांत उमजल्याचें काय चाले । सृष्टीमध्यें उमजले । ऐसे
थोडे ॥ ६ ॥ त्या उमजल्याचें लक्षण । कांहीं करूं निरूपण । भ्रमाहून
विलक्षण । महापुरुष ॥ ७ ॥ भ्रम हा नसेल जयासी । मनीं वोळखावें
तयासी । ऐका आतां भ्रमासी । निरूपिजेल ॥ ८ ॥ एक परब्रह्म संचलें ।
कदापि नाहीं विकारलें । त्या वेगळें जें भासलें । तें भ्रमरूप ॥ ९ ॥ जयास
१. अग्नि. २. ब्रह्मांडाचा. ३. वायूचे ठिकाणीं. ४. मायेचे. ५. स्पष्टपणें.

बोलिला कल्पांत । त्रिगुण आणि पंचभूत । हें अवघेंच समस्त । भ्रमरूप
॥ १०॥ मी तूं हा भ्रम । उपासनाहि भ्रम । ईश्वर हा हि भ्रम । निश्चयें सी
॥ ११ ॥ श्लोक ॥ भ्रमेणाहं भ्रमेण त्वं भ्रमेणोपासका जनाः । भ्रमेणेश्वर-
भावत्वं भ्रममूलमिदं जगत् ॥ १॥ टीका ॥ या कारणें सृष्टि भासत ।
परंतु भ्रमचि हा समस्त । यामध्यें जे विचारवंत । तोचि धन्य ॥ १२॥ आ-
तां भ्रमाचा विचारू । अत्यंतचि प्रांजळ करू । दृष्टांतद्वारें विवरूं । श्रोत-
यांसी ॥ १३॥ भ्रमण करितां दूरदेशीं । दिशाभुली आपणाशी । कां ओ-
ळखी मोडे जिवलगांसीं । या नांव भ्रम ॥ १४ ॥ कां उन्मत्तद्रव्य सेविलें ।
तेणें अनेक भासों लागलें । नाना व्यथा कां झडापिलें । भूतें तो भ्रम ॥ १५॥
दशावतारीं वाटती नारी । कां ते मांडिली बाजीगिरी । उगाच संदेह अं-
तरीं । या नांव भ्रम ॥ १६ ॥ ठेवला ठाव तो विसरला । कां मार्गीं जातां
चुकला । पट्टणामध्यें भांभावला । या नांव भ्रम ॥ १७॥ वस्तु आपणा-
पासीं असतां । गेली म्हणोन होय दुश्चिता । आपुलें आपण विसरता । या
नांव भ्रम ॥१८॥ कांहीं पदार्थ विसरोन गेला । कां जें शिकला तें विसरला ।
स्वप्नदुःखें बाविरा झाला । या नांव भ्रम ॥१९॥ दुश्चिन्ह अथवा अपशकुन ।
मिथ्या वार्तेनें भंगे मन । दचके पदार्थ देखोन । या नांव भ्रम ॥२०॥ वृक्ष
काष्ठ पशु देखिले । मनांत वाटे भूत आलें । कांहींच नसतां हडबडिलें । या
नांव भ्रम ॥२१॥ आतां कांच म्हणोन उदकांत पडे । कां सभा देखोन दर्पणी
वावडे । द्वार चुकोन भलतीकडे । या नांव भ्रम ॥२२॥ एक असतां एक वाटे ।
एक सांगतां एक निर्बटे । एक दिसतां एक उठे । या नांव भ्रम ॥२३॥ आतां
जें जें दीजेतें । तें तें पुढें पाविजेतें । मेलें माणूस भोजना येतें । या नांव
भ्रम ॥ २४ ॥ ये जन्मींचें पुढिले जन्मीं । कांहीं एक पावेन मी । प्रीति गुं-
तली मनुष्याचे नामीं । या नांव भ्रम ॥ २५ ॥ मेलें मनुष्य स्वप्नीं आलें ।
तेणें कांहीं मागीतलें । मनीं अखंड बैसलें । या नांव भ्रम ॥ २६ ॥ अवघें
मिथ्या म्हणोन बोले । आणि सामर्थ्यांवरी मन चाले । ज्ञाते वैभवें दड-
पिले । या नांव भ्रम ॥ २७ ॥ कर्मठपणें ज्ञान विटे । कां ज्ञातेपणें बळेंचचि
१. उघड. २. मादक पदार्थ. ३. जादुगिरी. ४. मोठ्या शहरामध्यें. ५. आर-
सेमहाल. ६. शिरतो. ७. घडलें.

अष्टे । कोणी एक सीमा फिटे । या नांव भ्रम ॥२८॥ देहाभिमान कर्माभि-
मान । जात्याभिमान कुळाभिमान । ज्ञानाभिमान मोक्षाभिमान । या नांव
भ्रम ॥ २९ ॥ कैसा न्याय तो न कळे । केला अन्याय तो नाढळे । उगाच
अभिमानें खवळे । या नांव भ्रम ॥ ३० ॥ मागील कांहीं आठवेना । पुढील
हीं सुचेना । अखंड आरूढ अभिमाना । या नांव भ्रम ॥ ३१ ॥ प्रची-
तीवीण औषध घेणें । प्रचीत नसतां पथ्य करणें । प्रचीतीविण ज्ञान सांगणें ।
या नांव भ्रम ॥ ३२ ॥ फळश्रुतीविण प्रयोग । ज्ञानेंविण नुसता योग । उ-
गाच शरीरें भोगी भोग । या नांव भ्रम ॥ ३३ ॥ ब्रह्मा लिहितो अदृष्टीं १ ।
आणि वाचून जाते संटी २ । ऐशा प्रकारच्या गोष्टी । या नांव भ्रम ॥ ३४ ॥
उदंड भ्रम विस्तारला । अज्ञानजनीं पैलावला । अल्पसंकेतें बोलिला ।
कळावयाकारणें ॥३५॥ भ्रमरूप विश्व स्वभावें । तेथें काय म्हणोन सांगावें ।
निर्गुण ब्रह्मावेगळें आघवॆं । भ्रमरूप ॥ ३६ ॥ ज्ञात्यास नाहीं संसार । ऐसे
बोलती अपार । गत झाल्यांचे चमत्कार ३ । या नांव भ्रम ॥ ३७ ॥ येथें आ-
शंका उठिली । ज्ञात्यांची समाधि पूजिली । तेथें कांहीं प्रचीत आली ।
किंवा नाहीं ॥ ३८ ॥ तैसेचि अवतार संपले । त्यांचेंहि सामर्थ्य उदंड चाले ।
तरी ते काय गुंतले । वासना धरूनी ॥ ३९ ॥ ऐसी आशंका उद्भवली ।
समर्थे पाहिजे निरूपिली । इतुकेन हे संपली । कथा भ्रमाची ॥ ४० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दशमदशके भ्रमनिरूपणं नाम षष्ठः
समासः ॥ ६ ॥


७. सगुणभजन.
श्रीगणेशाय नमः ॥ अवतारादिक ज्ञानी संत । सारासार विचारें मुक्त ।
त्यांचें सामर्थ्य चालत । कोणत्या प्रकारें ॥ १ ॥ हे श्रोत्यांची आशंका ।
पाहतां प्रश्न केला निका । सावध होऊन ऐका । म्हणे वक्ता ॥ २ ॥ ज्ञानी
मुक्त होऊन गेले । मागें त्यांचें सामर्थ्य चाले । परंतु ते नाहीं आले । वास-
ना धरूनी ॥ ३ ॥ लोकांस होतो चमत्कार । लोक मानिती साचार । परंतु
याचा विचार । पाहिला पाहिजे ॥ ४ ॥ जित असतां नेणों किती । जना-


१. कपाळावर. २. सटवी. ३. अलौकिक कृत्यें.