सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 278, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 278

१० वा. ] देहाशंका. २४३
तो । ह्याहि प्रत्यय कैसा येतो । लिंगपुराणीं महिमा तों । विपरीत बोलिला
॥ ४ ॥ मूळमायेस कोणें केलें । हें तों पाहिजे कळलें । तिहीं देवांचें रूप
झालें । ऐलीकडे ॥ ५ ॥ मूळमाया लोकजननी । तयेपासून गुणक्षोभिणी ।
गुणक्षोभिणीपासून त्रिगुणीं । जन्म देवां ॥ ६ ॥ ऐसें बोलती शास्त्रकारक ।
आणि प्रवृत्तीचेहि लोक । प्रत्यय पुसतां कित्येक । आकांत करिती ॥ ७ ॥
म्हणोनि त्यांस पुसवेना । त्यांचेन प्रत्यय आणवेना । प्रत्ययेंविण प्रयत्न
नाना । ठकाठकी ॥ ८ ॥ प्रचीतीविण वैण म्हणवी । उगिच करी उठाठेवी ।
तया मूर्खाला गोवीं । प्राणिमात्र ॥ ९ ॥ तैसाच ह्याहि विचार । प्रत्ययें क-
रावा निर्धार । प्रत्यय नसतां अंधकार । गुरुशिष्यांशीं ॥ १० ॥ बरें लोकांसि
काय म्हणावें । लोक म्हणती तेंचि बरवें । परंतु स्वामींनीं सांगावें । विशेंद
करूनी ॥ ११ ॥ म्हणों देवीं माया केली । तरी देवांचीं रूपें मायेंत आलीं ।
जरी म्हणों मायेनें माया केली । तरी दुसरी नाहीं ॥ १२ ॥ जरी म्हणों
भूतीं केली । तरी ते भूतांचीच वळली । म्हणावी जरी परब्रह्मीं केली । तरी
ब्रह्मीं कर्तृत्व नाहीं ॥ १३ ॥ आणि माया खरी असावी । तरी ब्रह्मीं कर्तृत्वाची
गोंवी । माया मिथ्या ऐसी जाणावी । तरी कर्तृत्व कैंचें ॥ १४ ॥ आतां हें
अवघेंच उर्गवे । आणि मनासि प्रत्यय फाँवे । ऐसें केलें पाहिजे देवें । कृपा-
ळूपणें ॥ १५ ॥ वेद मातृकेविण नाहीं । मातृका देहाविण नाहीं । देह
निर्माण होत नाहीं । देहावेगळा ॥ १६ ॥ तया देहामध्यें नरदेहो । त्या
नरदेहांत ब्राह्मणदेहो । तया ब्राह्मणदेहांत पाहो । अधिकार वेदीं ॥ १७ ॥
असे वेद कोठून झाले । देह कासयांचे केले । देव कैसे प्रगटले । कोणत्या
प्रकारें ॥ १८ ॥ ऐसें बळावलें अनुमान । केलें पाहिजे समाधान । वक्ता
म्हणे सावधान । होईं आतां ॥ १९ ॥ प्रत्यय पाहतां सांकडी । अवघी
होते बिघडाबिघडी । अनुमानितां घडीनें घडी । काळ जातो ॥ २० ॥ लो-
कधाटी शास्त्रनिर्णय । येथें बहुविध निश्चय । म्हणोनियां एक प्रत्यय । ये-
णार नाहीं ॥ २१ ॥ आतां शास्त्रांची भीड धरावी । तरी सुटेना ही गाथा-
गोवी । गाथागोवी हे उगवी । तरी शास्त्रभेद दिसे ॥ २२ ॥ शास्त्र रक्षून
१. त्रिगुणांचा आविर्भाव करणारी. २. व्यावहारिक. ३. फजीत करी.
४. उघड. ५. गुंतागुंत. ६. उलगडावें. ७. येई. ८. अक्षरांवाचून.