सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 281, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 281

२४६ श्रीदासबोध. [ दशक
तथापि ब्रह्मीं कल्पिला । तरी तो शब्दचि वायां गेला । आत्मा निर्गुण
संचला । शब्दातीत ॥११॥ आत्मा निर्गुण वस्तु ब्रह्म । नाममात्र तितुका
भ्रम । करून लाविला संभ्रमें¹ । तरी लागणार नाहीं ॥१२॥ तथापि आग्रहें
लाविला । तरी धोंडा अंतरीं मारिला । आकाशावरी कुंथिला । तरी तें
तुटेना ॥ १३ ॥ तैसें ब्रह्म निर्विकार । निर्विकारीं लाविती विकार । विकार
नासे निर्विकार । जैसें तैसें ॥१४॥ आतां ऐकावा प्रत्यय । जाणोनि धरावा
निश्चय । तरीच पाविजे जय । अनुभवाचा ॥१५॥ मायाब्रह्मीं जो समीर² ।
त्यातें जाणता तो ईश्वर । ईश्वर आणि सर्वेश्वर । तयासचि बोलिजे ॥ १६॥
तोचि ईश्वर गुणास आला । त्याचा त्रिगुणभेद झाला । ब्रह्मा विष्णु महेश
उपजला । तये ठायीं ॥१७॥ सत्व रज आणि तम । हे त्रिगुण उत्तमोत्तम ।
त्यांच्या स्वरूपाचा अनुक्रम । मागां निरूपिला ॥ १८ ॥ जाणता विष्णु भ-
गवान । जाणता नेणता चतुरानन³ । नेणता महेश पंचानन⁴ । अत्यंत
भोळा ॥ १९ ॥ त्रिगुणीं त्रिगुण कालवले । कैसे होती वेगळाले । परी विशेष
न्यून भासले । ते बोलावे लागती ॥ २० ॥ वायुमध्यें विष्णु होता । तो
वायुस्वरूपचि तत्वतां । पुढें झाला देहधर्ता । चतुर्भुज ॥२१॥ तैसाच ब्रम्हा
आणि महेश । देह धरिती सावकाश । गुप्त प्रगट होतां तयांस । वेळ नाहा
॥ २२ ॥ आतां रोकडी प्रचीती । मनुष्यें गुप्त प्रगटती । मों⁵ त्या देवांच्या
मूर्ती । सामर्थ्यवंत ॥ २३ ॥ देव देवता भूतें दैवतें । चढतें सामर्थ्य आहे
येथें । येणेंचि न्यायें राक्षसांतें । सामर्थ्यकळा ॥ २४ ॥ झोटिंग वायुस्वरूप
असती । सवेंचि खुळखळां चालती । खोबरीं खारिका टाकोनि देती । अक-
स्मात ॥ २५ ॥ अवघेंच न्याल अभावें⁶ । तरी हें बहुतेकांस ठावें । आपुला-
ल्या अनुभवें । विश्वलोक जाणती ॥ २६ ॥ मनुष्यें धरिती शरीरवेष । नाना
परकाया प्रवेश । मग तो परमात्मा जगदीश । कैसा न धरी ॥ २७ ॥ म्ह-
णोन वायुस्वरूप देह धरिले । ब्रम्हा विष्णु महेश झाले । पुढें तेचि विस्तार-
लें । पुत्रपौत्रीं ॥ २८ ॥ अंतरींच स्त्रिया कल्पिल्या । तों त्या कल्पितांच
निर्माण झाल्या । परी तयांपासून प्रजा निर्मिल्या । नाहींत कदा ॥ २९ ॥
१. प्रपंचाचा व्याप. २. वायु. ३. महादेव. ४. शंकर. ५. मग. ६. अश्रद्धेनें.