दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 282, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१० वा.] बीजलक्षण. २४७
इच्छून पुत्र कल्पिले । ते ते प्रसंगीं निर्माण झाले । येणें प्रकारें वर्तले ।
हरिहरादिक ॥ ३० ॥ पुढें ब्रम्हयानें सृष्टि केली । इच्छेसरीसी सृष्टि झाली ।
जीवसृष्टि निर्माण केली । ब्रम्हदेवें ॥ ३१ ॥ नानाप्रकारचे प्राणी कल्पिले ।
इच्छेसरीसे निर्माण झाले । अवघें जोडेंचि उदेलेँ । अंडजें १ जारं२जादिक ॥ ३२ ॥
थुक जलस्वेदा३पासून झाले । ते प्राणी स्वेदज बोलिले । एक वायूकरितां
झाले । अकस्मात उद्भिज्जें ४ ॥ ३३ ॥ मनुष्याची गौड ५ विद्या । राक्षसांची वो-
डंबरी ६ विद्या । ब्रह्मयाची सृष्टिविद्या । येणें प्रकारें ॥ ३४ ॥ कांहींएक मनु-
ष्यांची । त्याहून विशेष राक्षसांची । त्याहून विशेष ब्रह्मयाची । सृष्टिवि-
द्या ॥ ३५ ॥ जाणते नेणते प्राणी निर्मिले । वेद वदोन मार्गी लाविले ।
ब्रह्मयानें निर्माण केले । येणें प्रकारें ॥ ३६ ॥ मग शरीरापासून शरीरें । सृ-
ष्टि वाढिली विकारें । सकळ शरीरें येणें प्रकारें । निर्माण जाहलीं ॥ ३७ ॥
येथें आशंका फिटली । सकळ सृष्टि विस्तारली । विचार पाहतां प्रत्यया
आली । यथान्वयें ॥ ३८ ॥ ऐसी सृष्टि निर्माण केली । पुढें विष्णूनें कैसी
अतिपाळिली । हेहि विवंचना पाहिली । पाहिजे श्रोतीं । ३९ सकळ
प्राणी निर्माण झाले । ते मूळरूपें जाणोन पाळिले । शरीरें दैत्य निर्दाळिले ।
नानाप्रकारींचे ॥ ४० ॥ नाना अवतार धरणें । दुष्टांचा संहार करणें । धर्म
स्थापावयाकारणें । विष्णूस जन्म ॥ ४१ ॥ म्हणोन धर्मस्थापनेचे नर । तेहि
विष्णूचे अवतार । अभक्त दुर्जन रजनीचरें ७ । सहजचि झाले ॥ ४२ ॥ आ-
तां प्राणी जे जन्मले । ते नेणोन संहारले । मूळरूपें संहारिले । येणें प्रकारें
॥ ४३ ॥ शरीरें रुद्र खवळेल । तैं जीवसृष्टि संहारेल । अवघें ब्रह्मांडचि
जळेल । संहारकाळीं ॥ ४४ ॥ एवं उत्पत्ति स्थिति संहार । यांचा ऐसा
आहे विचार । श्रोतीं होऊन तत्पर । अवधान द्यावें ॥ ४५ ॥ कल्पांतीं
संहार घडेल । तोचि पुढें सांगिजेल । पंच प्रलय ओळखेल । तोचि ज्ञानी
॥ ४६ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दशमदशके बीजलक्षणनिरूपणं
नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥
१. पक्षी. २. मनुष्य वगैरे. ३. घामापासून. ४. वनस्पती. ५. गौडबंगाल.
६. मायावी. ७. राक्षस.