दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
२५२ श्रीदासबोध. [ दशक
मध्यें चमत्कार होती । ऐसी यांची सद्यःप्रचीती । रोकडी पाहावी ॥ ५ ॥
तो तरी आपण नाहीं गेला । लोकीं प्रत्यक्ष देखिला । ऐसा हा चमत्कार
झाला । यास काय म्हणावें ॥ ६ ॥ तरी हा लोकांचा भावार्थ । भाविकां
देव यथार्थ । अन्यत्र कल्पना व्यर्थ । कुतर्काच्या ॥ ७ ॥ आवडे तें स्वप्नीं
देखिलें । तरी काय तेथूनि आलें । म्हणाल तेणें आठविलें । तरी द्रव्य कां
दिसे ॥ ८ ॥ एवं आपली कल्पना । स्वप्नीं येती पदार्थ नाना १। तरी ते
पदार्थ चालतीना । अथवा आठवू नाहीं ॥ ९ ॥ येथें तुटली आशंका । ज्ञा-
त्यास जन्म कल्पूं नका । उमजेना तरी विवेका । बरें पाहा ॥ १० ॥ ज्ञाते
मुक्त होऊन गेले । त्यांचें सामर्थ्य उगौचि चाले । कां जे पुण्यमागें चालिले ।
म्हणोनियां ॥ ११ ॥ या कारणें पुण्यमागें चालावें । भजन देवाचें वाढवावें ।
न्याय सोडून न जावें । अन्यायमागें ॥ १२ ॥ नाना पुरश्चरणें करावीं ।
नाना तीर्थाटनें फिरावीं । नाना सामर्थ्यं वाढवावीं । वैराग्यबळें ॥ १३ ॥
निश्चय बैपे वस्तुंकडे । तरी ज्ञानमागैंहि सामर्थ्य चढे । कोणी एक ऐकांत
मोडे । ऐसें न करावें ॥ १४ ॥ एक गुरु एक देव । कोठें तरी असावा भाव २।
भावार्थ नसतां वाव ३। सर्व कांहीं ॥ १५ ॥ निर्गुण ज्ञान झालें । म्हणोन
सगुण अलक्ष्य केलें । तरी तें ज्ञानें नागविलें । दोहींकडे ॥ १६ ॥ नाहीं
भक्ति नाहीं ज्ञान । मध्येंच पैसावलें अनुर्मान ४। म्हणोनियां जप ध्यान ।
सांडूंचि नये ॥ १७ ॥ सांडील सगुण भजनासी । तरी तो ज्ञाता परी अ-
पेशी । म्हणोनियां सगुण भजनासी । सांडूंच नये ॥ १८ ॥ निष्कामबुद्धी-
चिया भजना । त्रैलोकीं नाहीं तुळणा । सामर्थ्याविण घडेना । निष्काम
भजन ॥ १९ ॥ कामनेनें फळ घडे । निष्कामभजनें भगवंत जोडे । फळ-
भगवंतासी कोणीकडे । महदंतर ॥ २० ॥ नाना फळें देवापाशीं । आणि
फळ अंतरी भगवंतासी । या कारणें परमेश्वरासी । निष्काम भजावें ॥ २१॥
निष्काम भजनाचें फळ आगळें । सामर्थ्य चढे मर्यादेवेगळें । तेथें बापुडीं
फळें । कोणीकडे ॥ २२ ॥ भक्तें जें मनीं धरावें । तें देवें आपणाचि करावें ।
तेथें वेगळें भावावें । नलगे कदा ॥ २३ ॥ दोन्ही सामर्थ्यं एक होतां । का-
ळासि नाटोपे सर्वथा । तेथें इतरांची काय कथा । कीटकन्यायें ॥ २४ ॥
१. अन्य पदार्थ. २. निष्ठा. ३. मनांतून दूर. ४. संशय.
१० वा. ] प्रचीत. २५३
म्हणोनि निष्काम भजन । वरी विशेष ब्रह्मज्ञान । तयास तुळितां त्रिभुवन ।
उणे वाटे ॥ २५ ॥ येथे बुद्धीचा प्रकाश । आणिक न चढे विशेष । प्रताप
कीर्ति आणि यश । निरंतर ॥ २६ ॥ निरूपणाचा विचार । आणि हरिक-
थेचा गजर । तेथें होती तत्पर । प्राणिमात्र ॥ २७ ॥ जेथें भ्रष्टाकार घडेना ।
तो परमार्थहि बुडेना । समाधान बिघडेना । निश्चयाचें ॥ २८ ॥ सारासार
विचार करणें । न्याय अन्याय अखंड पाहणें । बुद्धि भगवंताचें देणें । पालटे-
ना ॥ २९ ॥ भक्त भगवंतीं अनन्य । त्यासि बुद्धि देतो आपण । यदर्थी
भगवद्वचन । सावध ऐका ॥ ३० ॥ श्लोकार्थ ॥ ददामि बुद्धियोगं तं येन मा-
मुपयांति ते ॥ म्हणोन सगुण भजन । वरी विशेष ब्रह्मज्ञान । प्रत्ययाचें समा-
धान । दुर्लभ जगीं ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दशमदशके
सगुणभजननिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥
८. प्रचीत.
श्रीगणेशाय नमः ॥ ऐका प्रचीतीचीं लक्षणें । प्रचीत पाहतील ते शा-
हाणे । येरें वेडे दैन्यवाणे । प्रचीतीविण ॥ १ ॥ नाना रत्ने नाना नाणीं ।
परीक्षून न घेतां होय हानी । प्रचीत न येतां निरूपणीं । बैसोंच नये ॥
२ ॥ तुरंग शस्त्र दमून पाहिलें । बरें पाहतां प्रचीतीस आलें । तरी मग
पाहिजे घेतलें । जाणते पुरुषीं ॥ ३ ॥ बीज उगवेल ऐसें पाहावें । तरी मग
द्रव्य घालून घ्यावें । प्रचीत भालिया ऐकावें । निरूपण ॥ ४ ॥ देहीं आ-
रोग्यता झाली । ऐसी जनास प्रचीत आली । तरी मग अगत्य घेतली ।
पाहिजे मात्रा ॥ ५ ॥ प्रचीतीविण औषध घेणें । तरी मग घडचि विघ-
डणें । अनुमानानें जें कार्य करणें । तेंचि मूर्खपण ॥ ६ ॥ प्रचीतीस नाहीं
आलें । आणि सुवर्ण करविलें । तरी मग जाणावें ठकिलें । देखत देखतां ॥
७॥ शोधून पाहिल्याविण । कांहीं तरी एक कारण । होणार नाहीं निर्वाणें ।
प्राणास घडे ॥ ८ ॥ म्हणोन अनुमानाचें कार्य । भल्यानें कदापि करूं
नये । उपाय पाहतां अपाय । नेमस्त घडे ॥ ९ ॥ पाण्यांतील म्हैसीची
साँटी । करणें हे बुद्धिच खोटी । शोधिल्याविण हिंपुटी । होणें घडे ॥ १०॥
१. इतर. २. घोडा अथवा शस्त्र फिरवून पाहिल्यावर. ३. नाश. ४. सवदा.
२५४ श्रीदासबोध. [ दशक
विश्वासें घर घेतलें । ऐसें कधीं नाहीं ऐकिलें । मैंदें¹ मैंदायें केलें । परी तें
शोधिलें पाहिजे ॥ ११ ॥ (शोधिल्याविण अन्नवस्त्र घेणें । तेणें प्राणास मु-
कणें । लटिक्याचा विश्वास धरणें । हेंचि मूर्खपण ॥ १२ ॥ संगती चोरांची
धरितां । घात होईल तत्वतां । ठक सिंतरू² शोधितां । ठायीं पडे) ॥ १३ ॥
गैरसालै³ तालमगिरी । कोणी नवी मुद्रा करी । नाना कपट परोपरी । शो-
धून पहावें ॥ १४ ॥ दिवाळखोराचा मोंड⁴ । पाहतां वैभवहि दिसे उदंड ।
परी तें अवघें थोतांड । भंड पुढें ॥ १५ ॥ तैसें प्रचीतीविण ज्ञान । तेथें
नाहीं समाधान । करून बहुतांचें अनुमान । अनहित केलें ॥ १६ ॥ मंत्र
यंत्र उपदेशिले । नेणते प्राणी गोचिले । जैसें झांकून मारिलें । दुखणाइत ॥
१७ ॥ वैद्य पाहिला परी काचा । तरी प्राण गेला पोराचा । येथें उपाय दुस-
ऱ्याचा । काय चाले ॥ १८ ॥ स्वदुःखें अंतरीं झिजे । आणि वैद्य पुसतां
लाजे । तरी मग तयासि साजे । आत्महत्यारेपण ॥ १९ ॥ जाणत्यावरी
गर्व गेला । परी तो नेणत्याकरितां बुडाला । येथें कोणाचा घात झाला ।
बरें पाहा ॥ २० ॥ पापाची खंडणा झाली । जन्मयातना चुकली । ऐसी
स्वयें प्रचीत आली । म्हणिजे बरें ॥ २१ ॥ परमेश्वरासि ओळखिलें । आ-
पण कोण ऐसें कळलें । आत्मनिवेदन झालें । म्हणिजे बरें ॥ २२ ॥ ब्रह्मांड
कोणें केलें । कासयाचें उभारलें । मुख्य कर्त्यास ओळखिलें । म्हणिजे बरें ॥
२३ ॥ जेथें अनुमान राहिलें । तरी परमार्थ केले ते वायां गेले । प्राणी
संशयीं बुडालें । प्रचीतीविण ॥ २४ ॥ हेंचि परमार्थाचें वर्म । लटिकें बो-
लेल तो अधम । लटिकें मानील तो अधमाधम । यथार्थ जाणावा ॥ २५ ॥
येथें बोलण्याची झाली सीमा । नेणतां न कळे परमात्मा । असत्य नाहीं
सर्वोत्तमा । तूंचि जाणसी ॥ २६ ॥ माझे उपासनेचा बडिवार । ज्ञान सां-
गावें साचार । मिथ्या बोलतां उत्तर । प्रभूसी लागे ॥ २७ ॥ म्हणोनि
सत्यचि बोलिलें । कर्त्यास पाहिजे ओळखिलें । मायोद्भवाचें शोधिलें । पा-
हिजे मूळ ॥ २८ ॥ तेंचि पुढें निरूपण । बोलिलें बोलिजे प्रमाण । श्रोतीं
सावध अंतःकरण । घातलेंचि घालावें ॥ २९ ॥ सूक्ष्म निरूपण लांगलें ।
तेथें बोलिलेंचि मागुती बोलिलें । श्रोतयांस पाहिजे उमजलें । म्हणोमिया
१. फांसेगारानें. २. फसव्या. ३. दुर्वर्तनी. ४. पसारा.
१० वा. ] प्रकृतिपुरुषनिदर्शन. २५५
॥ ३० ॥ प्रचीत पाहतां निकट । उडोन जाती परिपाठें । म्हणोन हे खट-
पट । करणें लागे ॥ ३१ ॥ परिपाठेंचि जरी बोलिलें । तरी प्रचीत समा-
धान बुडालें । प्रचीतसमाधान राखिलें । तरी परिपाठ उडे ॥ ३२ ॥ ऐसीं सा-
कडीं दोहींकडे । म्हणोनि बोलिलेंचि बोलणें घडे । दोन्ही राखोनियां कोडें ।
उकलून दावूं ॥ ३३ ॥ परिपाठ आणि प्रचीतप्रमाण । दोन्ही राखून निरूपण ।
श्रोते परम विचक्षण । विवरोत पुढें ॥ ३४ ॥ इति श्रीदासबोधे गुरु-
शिष्यसंवादे दशमदशके प्रचीतनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥
९. प्रकृतिपुरुषनिदर्शन.
श्रीगणेशाय नमः ॥ आकाशीं वायु झाला निर्माण । तैसी ब्रह्मीं मूळ-
माया जाण । त्या वायुमध्यें त्रिगुण । आणि पंचभूतें ॥ १ ॥ वटबीजीं असे
वड । फोडून पाहतां न दिसे झाड । नाना वृक्षांचे जुंबाड । बिजापासून
होती ॥ २ ॥ तैसी बीजरूप मूळमाया । विस्तार झाला तेथूनिया । तिचें
स्वरूप शोधूनिया । बरें पाहा ॥ ३ ॥ तेथें दोन्ही भेद दिसती । विवेकें
पाहावी प्रचीती । निश्चळीं जे चंचल स्थिति । तोचि वायु ॥ ४ ॥ तया-
मध्यें जाणीवकळा । जगज्ज्योतीचा जिव्हाळा । वायु जाणीव मिळोन मेळा ।
मूळमाया बोलिजे ॥ ५ ॥ सरिता म्हणतां बायको भासे । तेथें पाहतां
पाणीच असे । विवेकी हो समजा तैसें । मूळमायेसी ॥ ६ ॥ वायु जाणीव
जगज्योती । तयास मूळमाया म्हणती । पुरुष आणि प्रकृती । याचेंच नांव
॥ ७ ॥ वायूंस म्हणती प्रकृती । आणि पुरुष म्हणती जगज्ज्योती । पुरुष
प्रकृति शिव शक्ती । याचेंच नांव ॥ ८ ॥ वायुमध्यें जाणीव विशेष । तोचि
प्रकृतीमध्यें पुरुष । ये गोष्टीचा विश्वास । धरिला पाहिजे ॥ ९ ॥ वायु शक्ति जा-
णीव ईश्वर । अर्धनारी नटेश्वर । लोक म्हणती निरंतर । येणें प्रकारें ॥ १० ॥ वा-
यूमध्यें जाणीव गुण । तेंचि ईश्वराचें लक्षण । तयापासून त्रिगुण । पुढें झाले
॥ ११ ॥ तया गुणांमध्यें सत्वगुण । निखिल जाणीव लक्षण । त्याचा देह-
धारी आपण । विष्णु जाहला ॥ १२ ॥ त्याच्या अंगें जग चाले । ऐसें
भगवद्गीता बोले । गुंतलें तेंचि उगवलें । विचार पाहतां ॥ १३ ॥ एक
१. संप्रदाय. २. नदी. ३. उलगडलें.
२५६ श्रीदासबोध. [ दशक
जाणीव वांटली । प्राणिमात्रास विभागली । जाणजाणों वांचविली । सर्व
काया ॥ १४ ॥ तयेचें नांव जगज्योती । प्राणिमात्र तिचेनि जगती । याची
रोकडी प्रचीती । प्रत्यक्ष पाहावी ॥ १५ ॥ पक्षी श्वापद किडा मुंगी ।
कोणी एक प्राणी जगीं । जाणीव खेळे त्याचे अंगीं । निरंतर ॥ १६ ॥
जाणोन काया पळविती । तेणें गुणें प्राणी वांचती । दडती आणि लपती ।
जाणजाणों ॥ १७ ॥ अवघ्या जगास वांचविती । म्हणोन नामें जगज्योती ।
ते गेलिया प्राणी मरती । जेथील तेथें ॥ १८ ॥ मुळींच जाणीवेचा विकार ।
पुढें झाला विस्तार । जैसे उदकाचे तुषार । अनंत रेणू ॥ १९ ॥ तैसें देव
देवता भूतें । मिथ्या म्हणों नये त्यांतें । आपुलाल्या सामर्थ्ये ते । सृष्टिमध्यें
फिरती ॥ २० ॥ सदा विचरती वायुस्वरूपें । स्वइच्छा पालटती रूपें ।
अज्ञान प्राणी भ्रमे संकल्पें । त्यासि बाधिती ॥ २१ ॥ ज्ञात्यासि संकल्पाचि
असेना । म्हणोन त्यांचेनि बाधवेना । या कारणें आत्मज्ञाना । अभ्यासावें
॥ २२ ॥ अभ्यासिल्या आत्मज्ञान । सर्व कर्म होये खंडण । हे रोकडी
प्रचीत प्रमाण । संदेह नाहीं ॥ २३ ॥ ज्ञानेंविण कर्म विथेंडे । हें तों
कल्पांतीं न घडे । सद्गुरुविण ज्ञान जोडे । हेंहि अघटित ॥ २४ ॥ म्हणोन
सद्गुरु करावा । सत्संग शोधून धरावा । तत्वविचार विवरावा । अंतर्यामीं
॥ २५ ॥ तत्वें तत्व निरसोन जातां । आपला आपणचि तत्वतां । अनन्य-
भावें सार्थकता । सहजाचि जाहली ॥ २६ ॥ विचार न करितां जें जें केलें ।
तें तें वाउगेंचि व्यर्थ गेलें । म्हणोनि विचारीं प्रवर्त्तलें । पाहिजे आधीं ॥२७॥
विचार पाहील तो पुरुष । विचार न पाहे तो पशु । ऐसीं वचनें सर्वेश ।
ठायीं ठायीं बोलिला ॥ २८ ॥ सिद्धांत साधावयाकारणें । पूर्वपक्ष लागे
उठवणें । परंतु साधकांसी निरूपणें । साक्षात्कार ॥ २९ ॥ श्रवण मनन
निदिध्यास । प्रचीतीनें बाणतां विश्वास । रोकडा साक्षात्कार सायास ।
करणेंचि नलगे ॥३०॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दशमदशके प्रकृ-
तिपुरुषनिदर्शननिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥
१. फलशून्य होतें.
१० वा.] चलाचलः २५७
१०. चलाचल.
श्रीगणेशाय नमः ॥ गगनासारिखें ब्रह्म पोकळ । उदंड उंच अंतराळ ।
निर्गुण निर्मळ निश्चळ । सदोदित ॥ १ ॥ त्यास परमात्मा म्हणती ।
आणिक नामें सांगों किती । परी तें जाणिजे आदि अंतीं । जैसें तैसें ॥२॥
विस्तीर्ण पसरला पैस । भोंवता दाटला अवकाश । भासचि नाहीं निराभास ।
जैसें तैसें ॥ ३ ॥ चहूंकडे पाताळातळीं । अंतचि नाहीं अंतराळीं । कल्पांत-
काळीं सर्वकाळीं । संचलेंचि असे ॥ ४ ॥ ऐसें कांहींएक चंचळ । तें
अचंचळीं भासे चंचळ । त्यास नामेंही सकळ । विविध प्रकारें ॥ ५ ॥ न
दिसतां नाम ठेवणें । न देखतां खूण सांगणें । असों हीं जाणावयाकारणें ।
नामाभिधानें ॥ ६ ॥ मूळमाया मूळप्रकृती । मूळपुरुष ऐसें म्हणती । शिव-
शक्ति नामें किती । नाना प्रकारें ॥ ७ ॥ परी जें नाम ठेविलें जया ।
आधीं ओळखावें तया । प्रचीतीविण कासया । वल्गना करावी ॥ ८ ॥
रूपाची न धरितां सोय । नामासरिसें भरंगळों नये । प्रत्ययेंविण गळंगो¹
होय । अनुमानज्ञानें ॥ ९ ॥ निश्चळ गगनीं चंचल वारा । वाजों लागला
भरारा । परी त्या गगना आणि समीरा । भेद आहे ॥ १० ॥ तैसें निश्चळ
परब्रम्ह । चंचळ माया भासला भ्रम । त्या भ्रमाचा संभ्रम² । करून दावूं
॥ ११ ॥ जैसा गगनीं चालिला पवन । तैसें निश्चळीं झालें चळण । इच्छा
स्फूर्ति लक्षण । स्फुरणरूप ॥ १२ ॥ अहंपणें जाणीव झाली । तेचि मूळ-
प्रकृति बोलिली । महाकारण काया रचिली । ब्रह्मांडाची ॥१३॥ महामाया
मूळप्रकृती । कारण ते अव्याकृती । सूक्ष्म हिरण्यगर्भ म्हणती । विराट ते
स्थूळ ॥ १४ ॥ ऐसें पंचीकरण³ शास्त्रप्रमेय⁴ । ईश्वरतनुचतुष्टयें⁵ । म्हणोन हें
बोलणें होय । जाणीव मूळमाया ॥१५॥ परमात्मा परमेश्वर । परेश ज्ञानघन
ईश्वर । जगदीश जगदात्मा जगदीश्वर । पुरुष नामें ॥ १६ ॥ आत्मा अंतरात्मा
विश्वात्मा । द्रष्टा साक्षी सर्वात्मा । क्षेत्रज्ञ शिवात्मा जीवात्मा । देहीं कूटस्थ
बोलिजे ॥ १७ ॥ इंद्रात्मा ब्रम्हात्मा हरिहरात्मा । यमात्मा धर्मात्मा नैर्ऋ-
तात्मा । वरुण वायु कुबेरात्मा । ऋषिदेवमुनिधर्ता ॥ १८ ॥ गण गंधर्व
१. घोटाळा. २. खुलासा. ३. पंचतत्वांचें मिश्रण. ४. शास्त्राचे सिद्धांत.
५. विराट्, हिरण्यगर्भ, अव्याकृत व मूळ प्रकृति हे ब्रह्मांडांचे चार देह.
२५८ श्रीदासबोध. [ दशक
विद्याधर । यक्ष किन्नर नारद तुंबर । सर्व लोकांचें अंतर । तो सर्वात्मा
बोलिजे ॥ १९ ॥ चंद्र सूर्य तारामंडळें । भूमंडळें मेघमंडळें । एकविस स्वर्गे
सप्त पाताळें । अंतरात्माच वर्तवी ॥ २० ॥ गुप्तवल्ली पाल्हाळली ।
तिचीं पुरुषनामें घेतलीं । आतां स्त्रीनामें ऐकिलीं । पाहिजे श्रोतीं ॥ २१ ॥
मूळमाया जगदीश्वरी । परम विद्या परमेश्वरी । विश्वाविद्या विश्वेश्वरी ।
त्रैलोक्यजननी ॥ २२ ॥ अंतर्हेतु अंतर्कळा । मौन्यगर्भ जाणीवकळा ।
चपळा जगज्योति जीवनकळा । परा पश्यंती मध्यमा ॥ २३ ॥
युक्ति बुद्धि मति धारणा । सावधानता नाना चाळणा । भूत भविष्य
वर्तमाना । उकलून दावी ॥ २४ ॥ जागृति स्वप्न सुषुप्ति जाणे । तुर्या
तटस्थावस्था जाणे । सुख दुःख सकळ जाणे । मानापमान ॥ २५ ॥ ते प-
रम कठिण कृपाळू । ते परम कोमळ स्नेहाळू । ते परम क्रोधी लोभाळू ।
मर्यादेवेगळी ॥ २६ ॥ शांति क्षमा विरक्ति भक्ती । अध्यात्मविद्या सायुज्य-
मुक्ती । विचारणा सहजस्थिती । जयेचेनी ॥ २७ ॥ पूर्वी पुरुषनामें बोलि-
लीं । उपरि स्त्रीनामें निरूपिलीं । आतां नपुंसकनामें ऐकिलीं । पाहिजे
चंचळाचीं ॥ २८ ॥ सत्तारूप ज्ञानस्वरूप । प्रकाशरूप ज्योतिरूप । कार-
णरूप चिद्रूप १ । शुद्ध सूक्ष्म अलिप्त ॥ २९ ॥ जाणणें अंतःकरण चित्त । श्र-
वण मनन चैतन्य जीवित । येतें जातें सुचित्त । होऊन ऐका ॥ ३० ॥
मीपण तूं पण जाणपण । ज्ञातेपण सर्वज्ञपण । जीवपण शिवपण ईश्वरपण ।
अलिप्तपण बोलिजे ॥ ३१ ॥ ऐसी नामें उदंड असती । परी ते एकचि ज-
गज्योती । विचारवंत ते जाणती । सर्व अंतरात्मा ॥ ३२ ॥ आत्मा जग-
ज्योति सर्वज्ञपण । तिन्ही मिळोनि एकचि जाण । अंतर्कळाचि प्रमाण ।
ज्ञप्तिमात्र ॥ ३३ ॥ ढीग झाले पदार्थांचे । पुरुष स्त्री नपुंसक नामांचे ।
परंतु सृष्टिरचनेचे । किती म्हणोन सांगावे ॥ ३४ ॥ सकळां चालिता एक ।
अंतरात्मा वर्तवी अनेक । मुंगीपासून ब्रह्मादिक । तेणेंचि चालती ॥ ३५ ॥
तो अंतरात्मा आहे कैसा । प्रस्तुत ओळखाना आभासा । नाना प्रकारींचा
तमासा । येथेंचि आहे ॥ ३६ ॥ तो कळतो परी दिसेना । प्रतीत येते
परी भासेना । शरीरीं असे परी वसेना । एके ठायीं ॥ ३७ ॥ तीक्ष्णपणें २
१. ज्ञानस्वरूप २. सूक्ष्मपणें.
१० वा.] चलाचल. २४९
गगनीं भरे। सरोवर देखतांच पसरे। पदार्थ रक्षून उरे। चहूंकडे ॥ ३८ ॥
जैसा पदार्थ दृष्टीस दिसतो। तो त्या पदार्थासारिखाच होतो। वायूहून
विशेष तो। चंचळविषयीं ॥ ३९ ॥ कित्येक दृष्टीनें देखे। कित्येक रसनेनें
चाखे। कित्येक ते वोळखे। मनेंकरूनी ॥ ४० ॥ श्रोत्रीं बैसोन शब्द ऐ-
कतो। घ्राणेंद्रियें वास घेतो। त्वचेंद्रियें जाणतो। शीतोष्णादिक ॥ ४१ ॥
ऐशा जाणे अंतरकळा। सकळांमध्यें परी निराळा। पाहतां त्याची अगाध
लीला। तोचि जाणे ॥ ४२ ॥ तो पुरुष ना सुंदरी। बाळ तरुण ना कुमारी।
नपुंसकाचा देहधारी। परी नपुंसक नव्हे ॥ ४३ ॥ तो चालवी सकळ दे-
हांसी। करून अकर्ता म्हणती त्यासी। तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी। देहीं कूटस्थ
बोलिजे ॥ ४४ ॥ श्लोक ॥ द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च ॥ क्षरः
सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते ॥ १ ॥ टीका ॥ दोन्ही पुरुष लोकीं अ-
सती। क्षराक्षर बोलिजेती। सर्व भूतें क्षर म्हणती। अक्षर कूटस्थ बोलिजे
॥ ४५ ॥ उत्तम पुरुष तो आणिक। निष्प्रपंच आणि निष्कलंक। निरंजन
परमात्मा एक। निर्विकारी ॥ ४६ ॥ चारी देह निरसावे। साधकें देहा-
तीत व्हावें। देहातीत होतां जाणावें। अनन्य भक्त ॥ ४७ ॥ देहमात्र नि-
रसोन गेला। तेथें अंतरात्मा कैंचा उरला। निर्विकारीं विकारला। विका-
रचि नाहीं ॥ ४८ ॥ निश्चळ परब्रह्म एक। चंचळ जाणावें मायिकें। ऐसा
प्रत्यय निश्चयात्मक। विवेकें पाहावा ॥ ४९ ॥ येथें बहुत नलगे खळखळ।
एक चंचळ एक निश्चळ। शाश्वत कोण हें केवळ। ज्ञानें ओळखावें ॥ ५० ॥
असार त्यागून घेइजे सार। म्हणोन सारासार विचार। नित्यानित्य निरं-
तर। पाहती ज्ञानी ॥ ५१ ॥ जेथें ज्ञानाचें होतें विज्ञान। जेथें मनाचें
होतें उन्मन। तेथें कैंचें चंचळपण। आत्मयासी ॥ ५२ ॥ सांगणी वांग-
णीचें काम नव्हे। आपुल्या अनुभवें जाणावें। प्रत्ययेंविण सिणावें। तेंचि
पाप ॥ ५३ ॥ सत्याएवढें सुकृतें नाहीं। असत्याएवढें पाप नाहीं। प्रची-
तीविण कोठेंचि नाहीं। समाधान ॥ ५४ ॥ सत्य म्हणिजे स्वरूप जाण।
असत्य माया हें प्रमाण। येथें निरूपिलें पाप पुण्य। रूपांसहित ॥ ५५ ॥
दृश्य पाप वोसरलें। पुण्य परब्रह्म उरलें। अनन्य होतांच झालें। नामा-
१. कानामध्यें. २. नाकामध्यें. ३. त्वचेमध्यें. ४. खट. ५. पुण्य,
२६० श्रीदासबोध. [ दशक
तीतें ॥ ५६ ॥ आपण वस्तुच स्वतःसिद्ध । तेथें नाहीं देहसंबंध । पापराशी
होती दग्ध । येणें प्रकारें ॥ ५७ ॥ येन्हवीं ब्रह्मज्ञानेंविण । जें जें साधन तो
तो सिण । नाना दोषांचें क्षाळण । होईल कैसें ॥ ५८ ॥ पापाचें वळलें
शरीर । पापचि वढे तदनंतर । अंतरीं रोग वरी उपचार । काय करी ॥
५९ ॥ नाना क्षेत्रीं हें मुंडलें । नाना तीर्थीं हें दंडिलें । नाना निग्रहीं खं-
डिलें । ठायीं ठायीं ॥ ६० ॥ नाना मृत्तिकेनें घांसिलें । अथवा तप्तमुद्रेनें
डाँशिलें । जरी हें वरीवरी तासिलें । तरी शुद्ध नव्हे ॥ ६१ ॥ शेणाचे
गोळे गिळिले । गोमूत्राचे भौघे घेतले । माळा रुद्राक्ष घातले । काष्ठमणी
॥ ६२ ॥ वेष वरिवरी केला । अंतरीं दोष भरला । त्या दोषाच्या दहनाला ।
आत्मज्ञान पाहिजे ॥ ६३ ॥ नाना व्रतें नाना दानें । नाना योग तीर्था-
टणें । सर्वांहून कोटिगुणें । महिमा आत्मज्ञानाचा ॥ ६४ ॥ आत्मज्ञान
पाहे सदा । त्याच्या पुण्यास नाहीं मर्यादा । दुष्ट पातकांची बाधा । निर-
सोन गेली ॥ ६५ वेदशास्त्रीं सत्यस्वरूप । तेंचि ज्ञानियाचें रूप । पुण्य
झालें अमूर्प । सुकृतें सीमा सांडिली ॥ ६६ ॥ ह्या प्रचीतीच्या गोष्टी । प्र-
चीत पाहावी आत्मदृष्टी । प्रचीतीवेगळें कष्टी । होऊं नये ॥ ६७ ॥ अगा
हे प्रचीतीचे लोक हो । प्रतीत नसतां अवघा शोक हो । रघुनाथकृपेनें
राहो । प्रत्यय निश्चयाचा । ६८ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दश-
मदशकचे चलाचलनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी ३५४.
दशक अकरावा.
१. सिद्धान्त.
श्रीगणेशाय नमः ॥ आकाशापासून वायु होतो । हा तों प्रत्यय येतो ।
वायूपासून अग्नि होतो । सावध ऐका ॥ १ ॥ वायूची कठिण धैसणी । येथें
निर्माण झाला वँन्ही । मंद वायु शीतळ पाणी । तेथून जाहलें ॥ २ ॥ आँ-
पापासून झाली पृथ्वि । ते नाना बीजरूप जाणावी । बीजापासून उत्पत्ति
१. नामरहित. २. डागलें. ३. एक मातीचें भांडें. ४. पुष्कळ. ५. घर्षण. ६.
अग्नि. ७. जलापासून.
११ वा.] सिद्धान्त. २६१
व्हावी । हा स्वभावचि आहे ॥ ३ ॥ मुळीं सृष्टि कल्पनेची । कल्पना आहे
मुळींची । तयेपासून देवेंत्रयांची । काया जाहली ॥ ४ ॥ निश्चळामध्यें चं-
चळ । तेचि कल्पना केवळ । अष्टधा प्रकृतीचें मूळ । कल्पनारूप ॥ ५ ॥
कल्पनेचि अष्टधा प्रकृति । अष्टधा तेचि कल्पनामूर्ति । मूळाग्रापासून उत्प-
त्ती । अष्टधा जाणा ॥ ६ ॥ पंच भूतें तीन गुण । आठ झालीं दोनी मिळोन ।
म्हणोनि अष्टधा प्रकृति जाण । बोलिजेते ॥ ७ ॥ मुळीं कल्पनारूप झाली ।
पुढें तेचि फांपावली । केवळ जडत्वा आली । सृष्टिरूपें ॥ ८ ॥ मुळीं झाली
ते मूळमाया । त्रिगुण झाले ते गुणमाया । जडत्व पावली ते अविद्यामाया ।
सृष्टिरूपें ॥ ९ ॥ पुढें चारी खाणी झाल्या । चारी वाणी विस्तारल्या ।
नाना योनि प्रगटल्या । नाना व्यक्ति ॥ १० ॥ ऐसी झाली उभारणी ।
आतां ऐका संहारणी । मागिले दशकीं विशद करुनी । बोलिलें असे ॥११॥
परंतु आतां संकलित । बोलिजेल संहारसंकेत । श्रोते वक्ते एकचित्त ।
होऊन ऐका ॥ १२ ॥ शत वर्षे अनावृष्टि । तेणें आटेल जीवसृष्टी । ऐशा
कल्पाताच्या गोष्टी । शास्त्रीं निरूपिल्या ॥ १३ ॥ बारा कळीं तपे सूर्य ।
तेणें पृथ्विीची रक्षा होय । मग रक्षा विरोन जाय । जळांतरीं ॥१४॥ तें जळ
शोषी वैश्वानर । वन्हि झडपी समीर । समीर वितुळे निराकार । जैसें तैसें
॥ १५ ॥ ऐसी सृष्टिसंहारिणी झाली । मागें विस्तारें बोलिली । माया-
निरासें उरली । स्वरूपस्थिती ॥ १६ ॥ तेथें जीव शिव पिंड ब्रह्मांड । आ-
टोनि गेलें थोतांड । माया अविद्येचें बंड । वितळोन गेलें ॥ १७ ॥ विवे-
केंचि बोलिला क्षय । ह्मणोन विवेकप्रळय । विवेकी जाणती सोय । मूर्खास
कळेना ॥ १८ ॥ सृष्टि शोधितां सकळ । एक चंचल एक निश्चळ । चंच-
ळास कर्ता चंचल । चंचळरूपी ॥ १९ ॥ जो सकळ शरीरीं वर्ते । सकळ
कर्तृत्वास प्रवर्तें । करून अकर्ता हा वर्ते । शब्द जया ॥ २० ॥ राव रंक
ब्रह्मादिक । सकळांमध्यें वर्ते एक । नाना शरीरीं चाळक । इंद्रियद्वारें ॥२१॥
त्यास परमात्मा बोलती । सकळकर्ता ऐसें म्हणती । परी तो नासेल प्र-
चीती । विवेकें पाहावी ॥ २२ ॥ जो श्वानामध्ये गुरगुर करितो । जो सूक-
रामध्यें कुंकुरतो । गाढवीं भरोन भुंकितो । अट्टहासयें ॥ २३ ॥ लोक नाना
१. ब्रह्माविष्णुमहेशांची. २. जारज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज्ज हे चारप्रकार.
२६२ श्रीदासबोध. [ दशक
देह देखती । विवेकी देहांतर पाहती । पंडित समदर्शनें घेती । येणें प्रकारें
॥ २४ ॥ श्लोक ॥ विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ॥ शुनि चैव
श्वपाके च पंडिताः समदर्शिनः ॥१॥ देह पाहतां वेगळाले । परंतु अंतर एकचि
झालें । प्राणिमात्र देखिलें । एका अंतरें ॥२५॥ अनेक प्राणी निर्माण होती ।
परी एकचि कळा वर्तती । तया नांव जगज्योती । जाणती कळा ॥ २६ ॥
श्रोत्रीं नाना शब्द जाणे । त्वचेमध्यें शीतोष्ण जाणे । चक्षूमध्यें पाहों जाणे ।
नाना पदार्थ ॥ २७ ॥ रसनेमध्यें रस जाणे । घ्राणामध्यें वास तो जाणे ।
कर्मेंद्रियामध्यें जाणे । नाना विषयस्वाद ॥ २८ ॥ सूक्ष्मरूपें स्थूळ रक्षी ।
नाना सुखदुःखें परीक्षीत । त्यास म्हणती अंतरसाक्षी । अंतरात्मा ॥ २९ ॥
आत्मा अंतरात्मा विश्वात्मा । चैतन्य सर्वात्मा सूक्ष्मात्मा । जीवात्मा शि-
वात्मा परमात्मा । द्रष्टा साक्षी सत्तारूप
११ वा. ] चत्वार देव. २६३
पक्ष । अप्रत्यक्षास कैंचें प्रत्यक्ष । असोन नाहीं ॥ ४३ ॥ असोन मायिक
उपाधी । तोंच सहजसमाधी । श्रवणें बळावली बुद्धी । निश्चयाची ॥
४४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकादशदशके सिद्धांतनिरूपणं
नाम प्रथमः समासः ॥ १ ॥
२. चत्वार देव.
श्रीगणेशाय नमः ॥ एक निश्चळ एक चंचल । चंचळीं गुंतलें सकळ ।
निश्चळ तें निश्चळ । जैसें तैसें ॥ १ ॥ पाहे निश्चळाचा विवेक । ऐसा
लक्षामध्यें एक । निश्चळाऐसा निश्चयात्मक । निश्चळचि तो ॥ २ ॥ या
निश्चळाच्या गोष्टी सांगती । पुनः चंचळाकडे धांवती । चंचलचक्रीं १ नि-
घोन जाती । ऐसे थोडे ॥ ३ ॥ चंचळीं चंचल जन्मलें । चंचळामध्यें
वाढलें । अवघें चंचळचि बिंबलें । जन्मवरी ॥ ४ ॥ पृथ्वी अवघी चंच-
ळाकडे । करणें तितुकें चंचळीं घडे । चंचल सांडून निश्चळीं पैवाडे २ । ऐसा
कैंचा ॥ ५ ॥ चंचल कांहीं निश्चळेना । निश्चळ कदापि चलेना । नित्या-
नित्य विवेकें जना । उमजे कांहीं ॥ ६ ॥ कांहीं उमजलें तरी नुमजे ।
कांहीं समजलें तरी न समजे । कांहीं बुझे तरी निर्बुजे । किंचिन्मात्र
॥ ७ ॥ संदेह अनुमान आणि भ्रम । अवघा चंचळामध्यें श्रम । निश्चळीं
कदा नाहीं वर्म । समजलें पाहिजे ॥ ८ ॥ चंचळाकार तितुकी माया ।
मायिक जाय विलया । लहान थोर म्हणावया । कार्य नाहीं ॥ ९ ॥ सगट ३
माया विस्तारली । अष्टधा प्रकृति फांपावली । चित्रविचित्र विकारली ।
नाना रूपें ॥ १० ॥ नाना उत्पत्ति नाना विकार । नाना प्राणी लहान थोर ।
नाना पदार्थचमत्कार । नाना रूपें ॥ ११ ॥ विकारवंत विकारलें । सूक्ष्म
जडत्वास आलें । अमर्याद दिसों लागलें । कांहींच्या बाही ॥ १२ ॥ मग
नाना शरीरें निर्माण झालीं । नाना नामाभिधानें ठेविलीं । भाषापरत्वें
कळों आलीं । कांहीं कांहीं ॥ १३ ॥ मग नाना रीती नाना दंडकें ४ । आचार
एकाहूनि एक । वर्तों लागले सकळ लोक । लोकाचारें ॥ १४ ॥ अष्टधा
प्रकृतीचीं शरीरें । निर्माण झालीं लहान थोरें । पुढें आपल्या प्रकारें । वर्तों
१. मायेच्या चक्रांतून. २. प्रवेश करील. ३. सर्व प्रकारें. ४. परंपरा.
२६४ श्रीदासबोध. [ दशक
लागलीं ॥१५॥ नाना मतें निर्माण झालीं । नाना पाखांडें वाढलीं । नाना
प्रकारचीं उठिलीं । नाना बंडें ॥ १६ ॥ जैसा प्रवाह पडिला । तैसाच लोक
चालिला । कोण वारील कोणाला । एक नाहीं ॥ १७ ॥ पृथ्वीचा झाला
गळांठा । एक लहान एक मोठा । कोण खरा कोण खोटा । कोण जाणे
॥ १८ ॥ आचार बहुचेंकींत पडिला । कित्येक पोटासाठीं बुडाला । अवघा
वरेंपंगचि झाला । साभिमानें ॥ १९ ॥ देव झाले उदंड । देवांचें मांडिलें
भेंड । भूतां देवतांचें थोतांड । एकचि जाहलें ॥ २० ॥ मुख्य देव तो
कळेना । कशास कांहींच मिळेना । एकास एक वळेना । अनावर ॥ २१ ॥
ऐसा नासला विचार । कोण पाहतो सारासार । कैंचा लहान कैंचा थोर ।
कळेचि ना ॥ २२ ॥ शास्त्रांचा बाजार भरला । देवांचा गलबला झाला ।
लोक कामनेच्या व्रताला । झोंबोन पडती ॥ २३ ॥ ऐसें अवघें नासलें ।
सत्यासत्य हारपलें । अवघें अनायक झालें । चहूंकडे ॥ २४ ॥ मतामतांचा
गलबला । कोणी पुसेना कोणाला । जो जे मतीं सांपडला । तयासी तेंचि
थोर ॥ २५ ॥ असत्याचा साभिमान । तेणें पाविजे पतन । म्हणोनियां ज्ञा-
ते जन । सत्य शोधिती ॥ २६ ॥ लोक वर्तती सकळ । तें ज्ञात्यांस करतळामळ ।
आतां ऐका केवळ । विवेकी हो ॥ २७ ॥ लोक कोणत्या पंथें जाती । आणि
कोणत्या देवास भजती । ऐसी हे रोकडी प्रचीती । सावध ऐका ॥ २८ ॥
मृत्तिका धातु पाषाणादिक । ऐसिया प्रतिमा अनेक । बहुतेक लोकांचा
दंडकें । प्रतिमा देवीं ॥ २९ ॥ नाना देवांचे अवतार । चरित्रें ऐकती एक
नर । जप ध्यान निरंतर । करिती पूजा ॥ ३० ॥ एक सकळांचा अंतरा-
त्मा । विश्वीं वर्तें जो विश्वात्मा । द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा । मानिती एक
॥ ३१ ॥ एक ते निर्मळ निश्चळ । कदापि नव्हेति चंचल । अनन्यभावें
केवळ । वस्तुच ते ॥ ३२ ॥ एक नाना प्रतिमा । दुसरा अवतारमहिमा ।
तिसरा तो अंतरात्मा । चौथा तो निर्विकारी ॥ ३३ ॥ ऐसे हे चार देव ।
सृष्टीमधील स्वभाव । या वेगळा अंतर्भाव । कोठेंच नाहीं ॥ ३४ ॥ अवघें
एकचि मानती । ते साक्षं देव जाणती । परंतु अष्टधा प्रकृती । वोळखिली
१. टवाळी करण्यांत. २. बाह्यात्कारी. ३. बेवंदशाही. ४. हातचे आंबळ्यासारखें
स्पष्ट. ५. पूजनाचा परिपाठ. ६. पोटभाग. ७. प्रत्यक्ष.
११ वा. ] शिक्षा. २६५
पाहिजे ॥ ३५ ॥ प्रकृतीमधील देव । तो प्रकृतीचा स्वभाव । भावातींत
महानुभाव । विवेकें जाणावा ॥ ३६ ॥ जो निर्मळास ध्याईल । तो निर्म-
ळचि होईल । जो जयास भजेल । तो तद्रूप जाणावा ॥ ३७ ॥ क्षीर नीर
निवडिती । ते राजहंस बोलिजती । सारासार जाणती । महानुभाव ॥ ३८॥
अरे जो चंचळास भजेल । तो सहजचि चलेल । जो निश्चळास भजेल ।
तो निश्चळचि ॥ ३९ ॥ प्रकृतीसारिखें चालावें । परी अंतरीं शाश्वत
ओळखावें । सत्ये होऊन वर्तावें । लोकांऐसें ॥ ४० ॥ इति श्रीदासबोधे
गुरुशिष्यसंवादे एकादशदशके चत्वारदेवनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥२॥
३. शिक्षा.
श्रीगणेशाय नमः ॥ बहुतां जन्मांचा शेवट । नरदेह सांपडे अवचट ।
येथें वर्तावें चोखट । नीतिन्यायें ॥ १ ॥ प्रपंच करावा नेमका । पाहावा
परमार्थ विवेक । जेणें करितां उभयलोक । संतुष्ट होती ॥ २ ॥ शत
वरुषें वय नेमिलें । त्यांत बाळत्व नेणतां गेलें । तारुण्य अवघें वेंचलें ।
विषयांकडे ॥ ३ ॥ वृद्धपणीं नाना रोग । भोगणें लागे कर्मभोग । आतां
भगवंताचा योग । कोणे वेळे ॥ ४ ॥ राजिकें दैविक उद्वेग चिंता । अन्न
वस्त्र देह ममता । नाना प्रसंगें अवचिता । जन्म गेला ॥ ५ ॥ लोक मर-
मरौं जाती । वडिलें गेलीं हे प्रचीती । जाणत जाणत निश्चितीं । काय मा-
निलें ॥ ६ ॥ अग्नि गृहासि लागला । आणि सावकास निजला । तो कैसा
म्हणावा भला । आत्महत्यारा ॥ ७ ॥ पुण्यमार्ग अवघा बुडाला । पापसं-
ग्रह उदंड झाला । यमयातनेचा झोला । कठीण आहे ॥ ८ ॥ तरी आतां
ऐसें न करावें । बहुत विवेकें वर्तावें । इहलोक परत्र साधावें । दोहींकडे
॥ ९ ॥ आळसाचें फळ रोकडें । जांभया देऊन निद्रा पडे । सुख म्हणोन
आवडे । आळसी लोकां ॥ १० ॥ साक्षेप करितां कष्टती । परंतु पुढें सुर-
वोडती । खाती जेविती सुखी होती । यत्नेंकरूनि ॥ ११ ॥ आळस उदास
नागवणा । आळस प्रयत्नबुडवणा । आळसें करंटपणाच्या खुणा । प्रकट
होती ॥ १२ ॥ म्हणोन आळस नसावा । तरीच पाविजे वैभवा । अरेंत्रीं
१. ब्रम्हरूप. २. इहपरलोक. ३. राजकारण. ४. सुख पावतात. ५. इहलोकीं.
२६६ श्रीदासबोध. [दशक
परत्रीं जीवा । समाधान ॥ १३ ॥ प्रयत्न करावा तो कोण । हेंचि ऐका
निरूपण । सावध करूनि अंतःकरण । निमिष एक ॥ १४ ॥ प्रातःकाळीं
उठावें । कांहीं पाठांतर करावें । यथानुशक्ति आठवावें । सर्वोत्तमासी ॥१५॥
मग दिशेकेंडे जावें । जें कोणासींच नव्हे ठावें । शौच आचमन करावें ।
निर्मळ जळें ॥ १६ ॥ मुखमार्जन प्रातःस्नान । संध्या तर्पण देवतार्चन ।
पुढें वैश्वदेव उपासन । यथासांग ॥ १७ ॥ कांहीं फळाहार घ्यावा । मग
संसार धंदा करावा । सुशब्दें राजी राखावा । सकळ लोक ॥ १८ ॥
ज्याचा जो ब्यापार । तेथें असावें खबरदार । दुश्चित्तपणें तरी पोर ।
वेढा लावी ॥ १९ ॥ चुके ठके विसरे सांडी । आठवण झालिया चर-
फडी । दुश्चित आळसाची रोकडी । प्रचीत पहा ॥२०॥ या कारणें सावधान ।
एकाग्र असावें मन । तरी मग जेवितां भोजन । गोड वाटे ॥ २१ ॥ पुढें
भोजन झालियावरी । कांहीं देवाची चर्चा करी । एकांतीं जाऊन विवरी ।
नाना ग्रंथ ॥ २२ ॥ तरीच प्राणी शाहणा होतो । नाहीं तरी मूर्खचि
राहतो । लोक खाती आपण पाहतो । दैन्यवाणा ॥ २३ ॥ ऐसें सदैवै-
पणाचें लक्षण । रिकामा जाऊं नेदी क्षण । प्रपंच व्यवसायाचें ज्ञान । बरें
पाहे ॥ २४ ॥ कांहीं मिळवी मग जेवी । गुंतल्या लोकांस उगवी । शरीर
कारणीं लावी । कांहीं तरी ॥ २५ ॥ कांहीं धर्मचर्चा पुराण । हरिकथा नि-
रूपण । वाया जाऊं नेदी क्षण । दोहोंकडे ॥ २६ ॥ ऐसा जो सर्वसावध ।
त्यास कैंचा असेल खेद । विवेकें तुटला संबंध । देहबुद्धीचा ॥ २७ ॥ आहे
तितुकें देवाचें । ऐसें वर्तणें निश्चयाचें । मूळ तुटलें उद्वेगाचें । येणें रीतीं
॥ २८ ॥ प्रपंचीं पाहिजे सुवर्ण । परमार्थीं पंचीकरणें । महावाक्याचें विव-
रण । करितां सुटे ॥ २९ ॥ कर्म उपासना आणि ज्ञान । येणें राहे समा-
धान । परमार्थाचें साधन । तेंचि ऐकत जावें ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे
गुरुशिष्यसंवादे एकादशदशके शिक्षानिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥
———
४. विवेक.
श्रीगणेशाय नमः ॥ ब्रह्म म्हणिजे निराकार । गगनासारिखा विचार ।
१. परलोकीं. २. शौचास. ३. भाग्याचें ४. सोडवी. ५. पंचभूतांचा विचार.
विकार नाहीं निर्विकार । तेंचि परब्रह्म ॥ १ ॥ ब्रह्म म्हणिजे निश्चळ । अंत-
रात्मा तो चंचळ । द्रष्टा साक्षी केवळ । बोलिजे तया ॥ २ ॥ तो अंतरात्मा
म्हणिजे देव । त्याचा चंचळ स्वभाव । पाळिताहे सकळ जीव । अंतरीं
वसोनी ॥ ३ ॥ त्या वेगळे जड पदार्थ । तेणेंविण देह व्यर्थ । तेणेंचि कळे
परमार्थ । सकळ कांहीं ॥ ४ ॥ कर्ममार्ग उपासनामार्ग । ज्ञानमार्ग सिद्धांत-
मार्ग । प्रवृत्तिमार्ग निवृत्तिमार्ग । देवचि चालवी ॥ ५ ॥ चंचळेंविण निश्चळ
कळेना । चंचळ तरी स्थिरावेना । ऐसे विचार नाना । बरे पाहा ॥ ६ ॥
चंचळनिश्चळांची संधी । तेथें भांबावते बुद्धी । कर्ममार्गाचा जो विधी ।
तो मग ऐलीकडे ॥ ७ ॥ देव या सकळांचें मूळ । देवास मूळ ना डाळ ।
परब्रह्म तें निश्चळ । निर्विकारी ॥ ८ ॥ निर्विकार आणि विकारी । एक म्ह-
णेल तो भिकारी । विचाराची होते वैरी । देखत देखतां ॥ ९ ॥ सकळ
परमार्थांचें मूळ । पंचीकरण महावाक्य केवळ । तें विवरावें प्रांजळ । पुनः-
पुन्हा ॥ १० ॥ पहिला देह स्थूलकाया । आठवा देह मूळमाया । अष्ट देह
निरसलिया । विकार कैंचा ॥ ११ ॥ या कारणें विकारी । साचाऐशी बां-
जिगिरी । एक समजे एक खरी । मानिताहे ॥ १२ ॥ उत्पत्ति स्थिति सं-
हार । यां वेगळा निर्विकार । काळायासी सारासार । विचार केला ॥ १३ ॥
सार असार दोन्ही एक । तेथें कैंचा उरला विवेक । परीक्षा नेणती रंक ।
पापी करंटे ॥ १४ ॥ जो एकचि विस्तारला । तो अंतरात्मा बोलिला ।
नाना विकारीं विकारला । निर्विकारी ॥ १५ ॥ ऐसें प्रगटचि आहे । आ-
पुल्या प्रत्ययें पाहे । काय राहे काय न राहे । हेंहि कळेना ॥ १६ ॥ तें अ-
खंड होत जातें । जें सर्वदा संहारतें । रोकडें प्रचीतीस येतें । जनांमध्यें
॥ १७ ॥ एक रडे एक चरफडी । एकाची एक घरी नरडी । एकमेकां झों-
बती बैराडी । डुकळले जैसे ॥ १८ ॥ नाहीं न्याय नाहीं नीती । ऐसे
हे लोक वर्तती । आणि अवघेंच सार म्हणती । विवेकहीन ॥ १९ ॥ धोंडे
सांडून सोनें घ्यावें । माती सांडून अन्न खावें । आणि अवघेंच सार म्हणावें ।
बाष्कळपणें ॥ २० ॥ म्हणोन हा विचार करावा । सत्य मार्ग तोचि धरावा ।
लाभ जाणोन घ्यावा । विवेकाचा ॥ २१ ॥ सारें गारें एकचि सरी । तेथें
१. प्रपंच. २. परमार्थ. ३. समाप्ति. ४. गारुड. ५. अधाशी. ६. थोर लहान.
२६८ श्रीदासबोध. [ दशक
परीक्षेस कैंची उरी । या कारणें चतुरीं । परीक्षा करावी ॥ २२ ॥ जेथें परी-
क्षेचा अभाव । तेथें दे घाव घे घाव । सगट सारिखा स्वभाव । लौंदेपणाचा
॥ २३ ॥ घेऊं ये तेंचि घ्यावें । घेऊं नये तें सांडावें । उंच नीच ओळखावें ।
या नांव ज्ञान ॥ २४ ॥ संसार संतेसि आलें । एक लाभें अभरें³ झाले ।
एक ते करंटे ठकले । मुद्दल गेलें ॥ २५ ॥ जाणत्यानें ऐसें न करावें । सार
तेंचि शोधून घ्यावें । असार तें जाणोन त्यागावें । वमन जैसें ॥ २६ ॥ तें
वमन करी प्राशन । तरी तें श्वानाचें लक्षण । तेथें शुचिष्मंत ब्राह्मण । काय
करी ॥ २७ ॥ जिहीं जैसें संचित केलें । तयांस तैसेंच घडलें । जें अभ्यासीं
पडोन जडलें । तें तों सुटेना ॥ २८ ॥ एक दिव्यान्नें भक्षिती । एक विष्ठा
सावडिती । आपल्या वडिलांचा घेती । साभिमान ॥ २९ ॥ असो विवेकें-
विण । बोलणें तितुका क्षीण । कोणी एकें श्रवण मनन । केलेंचि करावें
॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकादशदशके विवेकनिरूपणं
नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥
५. राजकारण.
श्रीगणेशाय नमः ॥ कर्म केलेंचि करावें । ध्यान धरलेचि धरावें । विव-
रलेंचि विवरावें । पुनः निरूपण ॥ १ ॥ तैसें आम्हांस घडलें । बोलिलेचि
बोलणें पडिलें । कां जें विघडलेंचि घडलें । पाहिजे समाधान ॥ २ ॥ ⁴अनन्य
राहे समुदाय । इतर जनांस उपजे भाव । ऐसा आहे अभिप्राय । उपायाचा
॥ ३ ॥ एक हरिकथा निरूपण । दुसरें तें राजकारण । तिसरें तें सावधपण ।
सर्वविषयीं ॥ ४ ॥ चौथा अत्यंत साक्षेप । फेडावे नाना आक्षेप । अन्याय
थोर अथवा अल्प । क्षमा करीत जावे ॥ ५ ॥ जाणावें पराचें अंतर । उदा-
सीनता निरंतर । नीति न्यायांस अंतर । पडोंच न द्यावें ॥ ६ ॥ ⁶संकेतें
लोक वेधावा । एकें अनेक बोधावा । प्रपंचहि सांवरावा । यथानुशक्त्या
॥ ७ ॥ प्रसंग समय ओळखावा । धीर बहुत असावा । संबंध पडों न
द्यावा । अतिपरिचयाचा ॥ ८ ॥ उपाधीस विस्तारावें । उपाधींत न सांप-
डावें । नीचत्व पहिलें घ्यावें । आणि मूर्खपण ॥ ९ ॥ दोष देखोन झांकावे ।
१.आळसाचा. २.बाजारास. ३.श्रीमान्. ४.एकनिष्ठ. ५.विश्वास. ६.चातुर्यानें.
११ वा.] महंतलक्षण. २६९
अवगुण अखंड न बोलावे । दुर्जन सांपडोन सोडावे । परोपकार करूनी
॥ १० ॥ तन्हे भरोंच नये । सुचावे नाना उपाय । नव्हे तेंचि करावें कार्य ।
दीर्घ प्रयत्नें ॥ ११ ॥ फड नासोंच न द्यावा । पडिला प्रसंग सांवरावा ।
अति वाद न करावा । कोणी एकासी ॥ १२ ॥ दुसऱ्याचें अभीष्ट जाणावें ।
बहुतांचें बहुत सोसावें । न सोसे तरी जावें । दिगंतरासी ॥ १३ ॥ दुःख
दुसऱ्याचें जाणावें । ऐकोन तरी वांटून घ्यावें । बरें वाईट सोसावें । समु-
दायाचें ॥ १४ ॥ अपार असावें पाठांतर । सन्निध असावा विचार । सर्वदा
असावें तत्पर । परोपकारासी ॥ १५ ॥ शांति करून करवावी । तन्हे सांडून
सांडावी । क्रिया करून करवावी । बहुतांकरवीं ॥ १६ ॥ करणें असला
अपाय । तरी बोलोन दाखवूं नये । परस्परेंचि प्रलय । प्रचीतीस आणावा
॥ १७ ॥ जो बहुतांचें सोसीना । त्यास बहुत लोक मिळेना । बहुत सो-
सितां उरेना । महत्व आपुलें ॥ १८ ॥ राजकारण बहुत करावें । परंतु
कळोंच न द्यावें । परपीडेवरी नसावें । अंतःकरण ॥ १९ ॥ लोक पारखून
सोडावे । राजकारणें अभिमान झाडावे । पुन्हा मेळवूनि घ्यावे । दुरिल्या
दोरें ॥ २० ॥ हिरवटासि दुरी धरावें । कचराटासि न बोलावें । संबंध
पडतां सांडूनि जावें । एकीकडे ॥ २१ ॥ ऐसें असे राजकारण । सांगतां तें
असाधारण । सुचित्त असतां अंतःकरण । राजकारण जाणिजे ॥२२॥ वृक्षा-
रूढास उचलावें । युद्धकर्त्यास ढकलून द्यावें । कारभाराचें सांगावें । अंग
कैसें म्हणोनी ॥ २३ ॥ पाहतां तरी सांपडेना । कीर्ति करूं तरी राहेना ।
आलें वैभव अभिलाषीना । कांहीं केल्या ॥ २४ ॥ एकाची पाठी राखणें ।
एकास देखों न शकणें । ऐसीं नव्हेत कीं लक्षणें । चातुर्याचीं ॥ २५ ॥
न्यायें बोलतांहि मानेना । हित तेंचि न ये मना । येथें कांहींच चालेना ।
त्यागाविण ॥ २६ ॥ श्रोतीं कळोन आक्षेपिलें । म्हणोनि बोलिलेंचि बो-
लिलें । न्यून पूर्ण क्षमा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ २७ ॥ इति श्रीदासबोधे
गुरुशिष्यसंवादे एकादशदशके राजकारणनिरूपणं नाम पंचमः समासः ॥५॥
६. महंतलक्षण.
श्रो गणेशाय नमः ॥ शुद्ध नेटकें ल्याहावें । लिहोन शुद्ध शोधावें । शोधून
२७० श्रीदासबोध. [ दशक
शुद्ध वाचावें । चुकों नये ॥ १ ॥ विस्कलित मातृका नेमस्त कराव्या । धो-
ट्या जाणोनि सदृढ धराव्या । रंग राखोन भराव्या । नाना कथा ॥ २ ॥
जाणायाचें सांगतां न ये । सांगायाचें नेमस्त न ये । समजल्याविण कांहींच
न ये । कोणी एक ॥ ३ ॥ हरिकथा निरूपण । नेमस्तपणें राजकारण । वर्ता-
याचें लक्षण । तेंहि असावें ॥ ४ ॥ पुसों जाणे सांगों जाणे । अर्थांतर
करूं जाणे । सकळिकांचें राखो जाणे । समाधान ॥ ५ ॥ दीर्घसूचने आ-
धींच कळे । सावधपणें तर्क प्रबळे । जाणजाणोनि वळे । यथायोग्य ॥ ६ ॥
ऐसा जाणे जो समस्त । तोचि महंत बुद्धिवंत । या वेगळें अंतवंत । सकळ
कांहीं ॥ ७ ॥ ताल वेळ तान मानें । प्रबंध कविता जाड वचनें । मजा-
लैसी नाना चिन्हैं । सुचत जावीं ॥ ८ ॥ जो एकांतास तत्पर । आधीं करी
पाठांतर । अथवा शोधी अर्थांतर । ग्रंथगर्भीचें ॥ ९ ॥ आधींच शिकोन जो
शिकवी । तोचि पावे श्रेष्ठ पदवी । गुंतल्या लोकांस उगवी । विवेकबळें
॥ १० ॥ अक्षर सुंदर वाचणें सुंदर । बोलणें सुंदर चालणें सुंदर । भक्ति
ज्ञान वैराग्य सुंदर । करूनि दावी ॥ ११ ॥ जयास प्रयत्नाचि आवडे ।
नाना प्रसंगीं पवाडे । धीटपणें प्रगटे दडे । ऐसा नव्हे ॥ १२ ॥ सांकडीं-
मध्यें वर्तो जाणे । उपाधीमध्यें मिळों जाणे । अलिप्तपणें राखो जाणे । आ-
पणासी ॥ १३ ॥ आहे तरी सर्वां ठायीं । पाहों जातां कोठेंच नाहीं । जैसा
अंतरात्मा ठायींचा ठायीं । गुप्त जाहला ॥ १४ ॥ त्या वेगळें कांहींच नसे ।
पाहों जातां तो न दिसे । न दिसोन वर्तवीतसे । प्राणिमात्रांसी ॥ १५ ॥
तैसाचि हााहि नानापरी । बहुत जनांसि शाहणे करी । नाना विद्या त्या
विवरी । स्थूळ सूक्ष्म ॥ १६ ॥ आपणाकरितां शाहाणे होती । ते सहजचि
सोयें धरिती । जाणतेपणाची महंती । ऐसी असे ॥ १७ ॥ राखो जाणे
नीति न्याय । न करी न करवी अन्याय । कठिन प्रसंगीं उपाय । करूं जाणे
॥ १८ ॥ ऐसा पुरुष धारणेचा । तोचि आधार बहुतांचा । दास म्हणे रघुना-
थाचा । गुण घ्यावा ॥ १९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकादशदशके
महंतलक्षणनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥
१. अक्षरें. २. दूरवर विचार. ३. सभा. ४. शिरतो. ५. अगत्य. ६. निश्चयी.
११ वा. ] चंचळ नदी. २७१
७. चंचळ नदी.
श्रीगणेशाय नमः ॥ चंचळ नदी गुप्त गंगा । स्मरणें पावन करी जगा ।
प्रचीत रोकडी पहा गा । अन्यथा नव्हे ॥ १ ॥ केवळ अचंचळीं निर्माण
झाली । अधोमुखें बळें चालिली । अखंड वाहे परी देखिली । नाहींच
कोणीं ॥ २ ॥ लवणे वाकाणें भोवरें । उखळया तरंग झरे । लादा लाटा
कातरे । ठायीं ठायीं ॥ ३ ॥ शुष्क जलाचे चळाळ । धारा धबावे खळाळ ।
चिपळया चळक्या भळाळ । चपळ पाणी ॥ ४ ॥ फेनें¹ फुगे हेलावे । सैरा-
वैरा उदक धांवे । थेंब भुईं मोजावे । अणुरेणु किती ॥ ५ ॥ वोसणे वाहती
उदंड । झोलावे दर्कुटे² दगड । खडके बेटें आड । वळसा³ उठे ॥ ६ ॥ मृदु
भूमि तुटोन गेल्या । कठिण तैशाच राहिल्या । ठायीं ठायीं उदंड पाहिल्या ।
सृष्टीमध्यें ॥ ७ ॥ एक ते वाहतचि गेले । एक ते वळशामध्यें पडिले । एक
सांकडींत अडकले । अधोमुखें ॥ ८ ॥ एक आपट आपटोनच गेलीं । एक
चिरड चिरडोनीच मेलीं । कितीएक तीं फुगलीं । पाणी भरलें ॥ ९ ॥ एक
बळाचे निवडिले । ते पोहतचि उगमासि गेले । उगमदर्शनें पवित्र झाले ।
तीर्थरूप ॥ १० ॥ तेथें ब्रह्मादिकांचीं भुवनें । ब्रह्मांडदेवतांचीं स्थानें । उफ-
राटी गंगा पाहतां मिळणें । सकळांस तेथें ॥ ११ ॥ त्या जळाऐसें नाहीं
निर्मळ । त्या जळाऐसें नाहीं चंचळ । आपो⁴नारायण केवळ । बोलिजे त्यासी
॥ १२ ॥ महानदी परी अंतराळीं । प्रत्यक्ष वाहे सर्वकाळीं । स्वर्गमृत्युपा-
ताळीं । पसरली पाहा ॥ १३ ॥ अधोध्र्व अष्टहि दिशा । तिचें उदक करी व-
ळसा⁵ । जाणते जाणती जगदीशा- । सारिखीचि ते ॥ १४ ॥ अनंत पात्रीं
उदक भारिलें । कोठें पाझरपाझरोनि गेलें । कितीएक तें वेंचलेँ । संसारासी
॥ १५ ॥ एकासंगें तें कडवट । एकासंगें तें गुळवट । एकासंगें तिखट । तुरट
खार ॥ १६ ॥ ज्या ज्या पदार्थास मिळे । तेथें तद्रूपचि मिसळे । सखोल
भूमीस तुंबळे⁶ । सखोलपणें ॥ १७ ॥ विषामध्यें विषचि होतें । अमृता-
मध्यें मिळोन जातें । सुगंधीं सुगंध तें । दुर्गंधीं दुर्गंध ॥ १८ ॥ गुणीं अव-
गुणीं मिळे । ज्याचें त्यापरी निवळे । त्या उदकाचा महिमा न कळे । उद-
केंविण ॥ १९ ॥ उदक वाहे अपरंपार । न कळे नदी कीं सरोवर । जळ-
१. फेस. २. पाचोळा. ३. भोंवरा. ४. जलरूप ईश्वर. ५. वेष्टण. ६. सांचतें.