दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 277, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२४२ श्रीदासबोध. [ दशक
ती कळा ॥ १८ ॥ आवडे नावडे ऐसें जाहलें । तरी देहस्वभावावरी गेलें ।
परी हें कळों आलें । अंतःकरणयोगें ॥ १९ ॥ सर्वांचें अंतःकरण एक ।
ऐसा निश्चय निश्चयात्मक । जाणती याचें कौतुक । चहूकडे ॥ २० ॥ इत्तु-
केन फिटली आशंका । आतां अनुमान करूं नका । जाणणें तितुकें एका ।
अंतःकरणाचें ॥ २१ ॥ जाणोन जीव चारा घेती । जाणोन भिती लपती ।
जाणोनियां पळोन जाती । प्राणिमात्र ॥ २२ ॥ किडामुंगीपासून ब्रह्मादिक ।
समस्तांस अंतःकरण एक । ये गोष्टीचें कौतुक । प्रत्ययें जाणावें ॥ २३ ॥
थोर लहान तरी अग्नी । थोडें बहुत तरी पाणी । न्यून पूर्ण तरी प्राणी ।
अंतःकरण जाणती ॥ २४ ॥ कोठें उणें कोठें अधिक । परंतु जिन्नस मासला
एक । जंगम १ प्राणी कोणी एक । जाणिल्याविण नाहीं ॥ २५ ॥ जाणीव
म्हणजे अंतःकरण । अंतःकरण विष्णूचा अंश जाण । विष्णु करितो प्रति-
पाळण । येणें प्रकारें ॥ २६ ॥ नेणतां प्राणी संहारितो । नेणीव तमोगुण
बोलिजे तो । तमोगुणें रुद्र संहारितो । येणें प्रकारें ॥ २७ ॥ कांहीं जाणीव
कांहीं नेणीव । हा रजोगुणाचा स्वभाव । जाणतां नेणतां जीव । जन्मास
येती ॥ २८ ॥ जाणिवेनें होतें सुख । नेणिवेनें होतें दुःख । सुखदुःख आव-
श्यक । उत्पत्तिगुणें ॥ २९ ॥ जाणण्या नेणण्याची बुद्धी । तोचि देहीं जा-
णावा विधी २ । स्थूळदेहीं ब्रह्मा त्रिशुद्धी ३ । उत्पत्तिकर्ता ॥ ३० ॥ ऐसा उत्पत्ति
स्थिति संहार । प्रसंगे बोलिला विचार । परंतु याचा निर्धार । प्रत्ययें पा-
हावा ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दशमदशके अंतःकरण-
निरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥
२. देहाशंका.
श्रीगणेशाय नमः ॥ स्वामीनें विचार दाखविला । तेथें विष्णूचा अभाव
दिसोन आला । ब्रह्मा विष्णु महेश्वराला । उरी नाहीं ॥ १ ॥ उत्पत्ति
स्थेंति संहार । ब्रह्मा विष्णु महेश्वर । यांचा पाहतां विचार । प्रत्यय नाहीं
॥ २ ॥ ब्रह्मा उत्पत्तिकर्ता चौमुखाचा । येथें प्रत्यय नाहीं त्याचा । पालन-
कर्ता विष्णु चौभुजांचा । तोहि ऐकोनि जाणों ॥ ३ ॥ महेश ५ संहार करि-
१. सचेतन. २. ब्रह्मदेव. ३. निश्चयपूर्वक. ४. पालन. ५. शंकर.