दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 276, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१० वा. ] अंतःकरण. २४१
दशक दहावा.
१. अंतःकरण.
श्रीगणेशाय नमः ॥ सकळांचें अंतःकरण एक। किंवा एक नव्हे अनेक ।
ऐसें हें निश्चयात्मक । मज निरूपावें ॥ १ ॥ ऐसें श्रोत्यानें पुसिलें । अं-
तःकरण एक कीं वेगळें । याचें उत्तर ऐकिलें । पाहिजे श्रोतीं ॥ २ ॥ सम-
स्तांचें अंतःकरण एक । निश्चय जाणावा नेमक । हा प्रत्ययाचा विवेक ।
तुज निरूपिला ॥ ३ ॥ श्रोता म्हणे वक्त्यासी । अंतःकरण एक समस्तांसी ।
तरी मिळेना एकएकासी । काय निमित्त ॥ ४ ॥ एक जेवितां अवघे धाले ।
एक निवतां अवघे निवाले । एक मरतां अवघे मेले । पाहिजेत कीं ॥ ५ ॥
एक सुखी एक दुःखी । ऐसें वर्ततें लौकिकीं । एक अंतःकरणाची वोळखी ।
कैसी जाणावी ॥ ६ ॥ जनीं वेगळाली भावना । कोणास कोणीच मिळेना ।
म्हणोन हें अनुमाना । येत नाहीं ॥ ७ ॥ अंतःकरण एक असतें । तरी ए-
काचें एकास कळों येतें । कांहीं चोरितांच न येतें । गौप्य गुह्य ॥ ८ ॥ या-
कारणें अनुमानेना । अंतःकरण एक हें घडेना । विरोध लागला जना ।
काय निमित्त ॥९॥ सर्प डसाया येतो । प्राणी भिऊन पळतो । एक अंतःक-
रण तरी तो । विरोध नसावा ॥ १० ॥ ऐसी श्रोत्यांची आशंका । वक्ता
म्हणे चळों नका । सावध होऊन ऐका । निरूपण ॥ ११ ॥ अंतःकरण म्ह-
णिजे जाणीव । जाणीव जाणता स्वभाव । देहरक्षणाचा उपाव । जाणती कळा
॥ १२ ॥ सर्प जाणोनि दंखूं आला । प्राणी जाणोनि पळाला । दोहींकडे जा-
णिवेला । बरें पाहा ॥ १३ ॥ दोहींकडे जाणिवेसि पाहिलें । तरी अंतः-
करण एकचि जाहलें । विचारितां प्रत्यया आलें । जाणीवरूपें ॥ १४ ॥
जाणीवरूपें अंतःकरण । सकळांचें एक हें प्रमाण । जीवमात्रास जाणपण ।
एकचि असे ॥ १५ ॥ एक दृष्टीचें देखणें । एक जिव्हेचें चाखणें । ऐकणें
स्पर्शणें वास घेणें । सर्वत्रांस एक ॥ १६ ॥ पशु पक्षी किडा मुंगी । जीव-
मात्र निर्माण जगीं । जाणीवकळा सर्वांलागीं । एकचि आहे ॥ १७ ॥ सर्वांस
जळ तें शीतल । सर्वांस अग्नि तेजाळ । सर्वांस अंतःकरण केवळ । जाण-