सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 279, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 279

२४४ श्रीदासबोध. [ दशक
प्रत्यय आणिला । पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत पाहिला । शहाणा मूर्ख समजा-
विला । एका वचनें ॥ २३ ॥ शास्त्रींच पूर्वपक्ष बोलिला । पूर्वपक्ष म्हणावें
लटक्याला । विचार पाहतां आम्हांला । शब्द नाहीं ॥ २४ ॥ तथापि
बोलों कांहीं एक । शास्त्र रक्षून कौतुक । श्रोतीं सादरें विवेक । केला पा-
हिजे ॥ २५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दशमदशके देहाशंका-
निरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥
३. देहाशंका.
श्रीगणेशाय नमः ॥ उपाधीविणें जें कां आकाश । तेंचि ब्रह्म निराभास ।
ते निराभासीं मूळमायेस । जन्म जाहलें ॥ १ ॥ ते मूळमायेचें लक्षण ।
वायुस्वरूपचि जाण । पंचभूतें आणि त्रिगुण । वायुअंगीं ॥ २ ॥ आका-
शापासून वायु झाला । तो वायुदेव बोलिला । वायूपासून अग्नि झाला ।
तो अग्निदेव ॥३॥ अग्नीपासून झालें आप । तें नारायणाचें स्वरूप । आपा-
पासून पृथ्वीचें रूप । तें बीजाकारें ॥ ४ ॥ ते पृथ्वीचे पोटीं पाषाण । बहु-
दैवांचें लक्षण । नाना प्रचीत प्रमाण । पाषाणदेवीं ॥ ५ ॥ नाना काष्ठ वृक्ष
मृत्तिका । प्रचीत रोकडी विश्वलोकां । समस्त देवांचा थारा एका । वायूम-
ध्यें ॥ ६ ॥ देव यक्षिणी कात्यायनी । चामुंडा जखिणी मानविणी । नाना
शक्ति नाना स्थानीं । देहपरत्वें ॥ ७ ॥ पुरुषनामें कितीएक । देव असती
अनेक । भूतें दैवतें नपुंसक । नामें बोलिजेती ॥८॥ देव देवता देवतें भुतें ।
पृथ्वीमध्यें असंख्यातें । परंतु या समस्तांतें । वायुस्वरूप बोलिलें ॥ ९ ॥
वायुस्वरूप सदा असणें । प्रसंगें नाना देह धरणें । गुप्त प्रगट होणें जाणें ।
समस्तांसी ॥ १० ॥ वायुस्वरूपें विचरती । वायूमध्ये जगज्योती ।
जाणती कळा वासना वृत्ती । नाना भेदें ॥ ११ ॥ आकाशापासून वायु
झाला । तो दों प्रकारें विभागला । सावधपणें विचार केला । पाहिजे श्रोतीं
॥ १२ ॥ एक वारा सकळ जाणती । एक वायूमधील जगज्ज्योती । जग-
ज्योतीच्या अनंत मूर्ती । देवदेवतांच्या ॥ १३ ॥ वायु बहुत विकारला ।
परंतु दों प्रकारें विभागला । आतां विचार ऐकिला । पाहिजे तेजाचा ॥१४॥
वायूपासून तेज झालें । उष्ण शीतळ प्रकाशलें । द्विधारूप ऐकिलें । पाहिजे