दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 285, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंबोलिला कल्पांत । त्रिगुण आणि पंचभूत । हें अवघेंच समस्त । भ्रमरूप
॥ १०॥ मी तूं हा भ्रम । उपासनाहि भ्रम । ईश्वर हा हि भ्रम । निश्चयें सी
॥ ११ ॥ श्लोक ॥ भ्रमेणाहं भ्रमेण त्वं भ्रमेणोपासका जनाः । भ्रमेणेश्वर-
भावत्वं भ्रममूलमिदं जगत् ॥ १॥ टीका ॥ या कारणें सृष्टि भासत ।
परंतु भ्रमचि हा समस्त । यामध्यें जे विचारवंत । तोचि धन्य ॥ १२॥ आ-
तां भ्रमाचा विचारू । अत्यंतचि प्रांजळ करू । दृष्टांतद्वारें विवरूं । श्रोत-
यांसी ॥ १३॥ भ्रमण करितां दूरदेशीं । दिशाभुली आपणाशी । कां ओ-
ळखी मोडे जिवलगांसीं । या नांव भ्रम ॥ १४ ॥ कां उन्मत्तद्रव्य सेविलें ।
तेणें अनेक भासों लागलें । नाना व्यथा कां झडापिलें । भूतें तो भ्रम ॥ १५॥
दशावतारीं वाटती नारी । कां ते मांडिली बाजीगिरी । उगाच संदेह अं-
तरीं । या नांव भ्रम ॥ १६ ॥ ठेवला ठाव तो विसरला । कां मार्गीं जातां
चुकला । पट्टणामध्यें भांभावला । या नांव भ्रम ॥ १७॥ वस्तु आपणा-
पासीं असतां । गेली म्हणोन होय दुश्चिता । आपुलें आपण विसरता । या
नांव भ्रम ॥१८॥ कांहीं पदार्थ विसरोन गेला । कां जें शिकला तें विसरला ।
स्वप्नदुःखें बाविरा झाला । या नांव भ्रम ॥१९॥ दुश्चिन्ह अथवा अपशकुन ।
मिथ्या वार्तेनें भंगे मन । दचके पदार्थ देखोन । या नांव भ्रम ॥२०॥ वृक्ष
काष्ठ पशु देखिले । मनांत वाटे भूत आलें । कांहींच नसतां हडबडिलें । या
नांव भ्रम ॥२१॥ आतां कांच म्हणोन उदकांत पडे । कां सभा देखोन दर्पणी
वावडे । द्वार चुकोन भलतीकडे । या नांव भ्रम ॥२२॥ एक असतां एक वाटे ।
एक सांगतां एक निर्बटे । एक दिसतां एक उठे । या नांव भ्रम ॥२३॥ आतां
जें जें दीजेतें । तें तें पुढें पाविजेतें । मेलें माणूस भोजना येतें । या नांव
भ्रम ॥ २४ ॥ ये जन्मींचें पुढिले जन्मीं । कांहीं एक पावेन मी । प्रीति गुं-
तली मनुष्याचे नामीं । या नांव भ्रम ॥ २५ ॥ मेलें मनुष्य स्वप्नीं आलें ।
तेणें कांहीं मागीतलें । मनीं अखंड बैसलें । या नांव भ्रम ॥ २६ ॥ अवघें
मिथ्या म्हणोन बोले । आणि सामर्थ्यांवरी मन चाले । ज्ञाते वैभवें दड-
पिले । या नांव भ्रम ॥ २७ ॥ कर्मठपणें ज्ञान विटे । कां ज्ञातेपणें बळेंचचि
१. उघड. २. मादक पदार्थ. ३. जादुगिरी. ४. मोठ्या शहरामध्यें. ५. आर-
सेमहाल. ६. शिरतो. ७. घडलें.