सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

सार्थ तुकारामगाथा ४७९
हल्ला करील, तोच त्याचा पराभवही करू शकेल त्यालाच जय मिळेल ४ तुकाराम महाराज म्हणतात, या शूरत्वाच्या
गोष्टी नुसत्या बोलायच्या नसतात, तर मोठा निश्चय करून कार्यसिद्धी करणे हेच सेवेकऱ्याच्या सेवेचे सार्थक आहे ५
१०७२ जातीचा पाईक ओळखले पाइका । आदर तो एका त्याचे ठायीं ॥ १ ॥
धरितील पोटासाठीं हतियेरें । फळती तों खरें वेठोचींसों ॥ २ ॥
जातीचे ते असे खरें घायदाय । पारखिया काय पाशीं लोपे ॥ ३ ॥
तुका म्हणे नमूं देव म्हण जन । जालियाच्या खुणा जाणतसो ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- जातीचा-श्रेष्ठ प्रकारचा, खरा, खरें-गाढवे, वेठीचींसों-विगारीची, घायदाय-रीत,
डावपेच, पारखिया-पारस करणाऱ्या लोकांपाशी
अर्थ - जो खरा जातवंत सेवक असतो, तोच दुसऱ्या सेवकास ओळखतो त्यासच त्याच्या कार्याविषयी
आदर वाटतो १ व जे केवळ पोटासाठीच हातात हत्यारे धरून असतात, ती माणसे केवळ बिगारीच्या गाड्या-
प्रमाणेच नुसती हेतुशून्य होऊन राबतात असे समजावे २ जे जातीने खरे शूरवीर पुरुष आहेत, त्याचे डावपेच जो
पारखी असतो, त्याच्या दृष्टीतून सुटत नाहीत त्यास त्याची ओळख पटतेच ३ तुकाराम महाराज म्हणतात,
सर्वत्र देवाचीच वस्ती आहे, असे समजून आम्ही या सेवकास वंदन करूच, पण जे खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला गेलेले
आहेत, त्यांच्याही खुणा आम्ही जाणतोच ४
विवरण - तुकाराम महाराजांचे हे पाईकाचे अकरा अभंग अनेक दृष्टींनी महत्त्वाचे आहेत. परमेश्वर-
प्राप्तीच्या मार्गात अथवा भक्तिसाधनेत पाईकाच्या गुणाची कितीतरी आवश्यकता आहे आपले सर्व गुणसर्वस्व
आपल्या धन्यासाठी, स्वामीसाठी खर्च करण्याची प्रतिज्ञा या सेवकाने घेतलेली असते अशी ही निकराची भावना
भक्तीच्या वृत्तीस पोषकच आहे तुकाराम महाराजांच्या या विशेष अभंगाचा अर्थ दोन्ही प्रकारांनी लावता येण्या-
सारखा आहे शिवबा व त्याचे स्वराज्यसाधनाचे कार्य व त्यासाठी तळहातावर शीर घेऊन निघालेले वीर सेवक,
याच्या धैर्याचे व काहींच्या कुचराईचे वर्णन बुवांनी केले आहे हे सर्व वर्णन परमार्थाच्या मार्गावर निघालेल्या
विठ्ठलाच्या वीर पुरुषानाही यथार्थपणे लागू पडते
समोरील बाणाचा, तोफेच्या गोळ्याचा वर्षाव छाती पुढे करून झेलणे, शत्रूच्या चोरवाटा शोधणे, आपले
शरीर गवताप्रमाणे क्षुल्लक मानणे, सुवर्ण दगडाप्रमाणे मानून वागणे, आपल्या गुणवत्तेने पाईकाचे सेवकाचा नाईक
होणे, थोर प्रकारची सेवा, हेच खरे वतन मानणे, पाठीवर शत्रूचे घाव घेऊन पळून न येणे, सर्व धैर्य एकवटून शत्रूवर
तुटून हल्ला करणे, ही सर्व खऱ्या पाईकाची लक्षणे तुकारामबुवांनी दिली आहेत ती पाहून यावेळी त्याच्या भोवती
खरोखरच शिवबाचे शूरवीर शिपाई त्याची कथा ऐकण्यासाठी तत्पर झालेले असावेत असे वाटते तुकोबानी त्यांनाही
स्वदेशकार्यासाठी उत्तेजित केले व आपल्या भक्तांनाही परमार्थमार्गात पाईकपणाचे महत्त्व काय आहे हे विशद
करून सांगितले
किंवा असेही असेल की, प्रत्येकाने जस परमार्थमार्गात निपुण असावे, तसच देशकार्याचीही त्यास जाणीव
असावी हे दोन्ही मार्ग परस्पर दिसतात, तेवढे भिन्न नाहीत केवळ भक्तीमार्गी लोकांना व केवळ देशवीरांना उद्देशून
प्रत्येकाच्या वर्गास उपयोगी पडेल असा उपदेश या अभंगात आहे, असे म्हणण्यापेक्षा सरमिसळ करून प्रत्येक माणसाने
या दोनही अंगाचे महत्त्व समजावे अशीही कल्पना बुवाच्या मनात असेल ईश्वरप्राप्ती हेच जीविताचे ध्येय
तुकारामादी साधुसंतानी मानले होते, हे खरे असले तरी त्याचे लक्ष भोवती असावे असे वाटून त्याचे परमार्थज्ञान
एवढे संकुचित मानण्याचे काही कारण नाही त्याच्या आत्मज्ञानात सर्व विश्वाचा सामावेश होतो व त्यामुळे पीडलेल्या
प्रजेच्या पारमार्थिक अराजकाने ते जसे कळवळून गेले, तसेच त्याचे ऐहिक दुर्दैवही त्याना पाहावले नाही दोघाची
सांगड घालण्याचा प्रयत्न त्यानी केला

४८० सार्थ तुकारामगाथा
१०७३ बुद्धीचा पालट धरा रे कांहीं । मागुता नाहीं मनुष्यदेह ॥ १ ॥
आपुल्या हिताचे न होती सायास । गृहदाराआसधनवित्त ॥ २ ॥
अवचितें निधान लागलें हे हातीं । भोगावी विपत्ति गर्भवास ॥ ३ ॥
यावें जावे पुढें ऐसेचि कारण । भोगावें पतन नरकवास ॥ ४ ॥
तुका म्हणे घरीं आठव या देहीं । नाही तरि कांहीं बरें नव्हे ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - मागुता-यानंतर, दारा-बायको.
अर्थ :- लोकहो, तुम्ही तुमच्या बुद्धीत काही तरी पालट करावा कारण यानंतर हा मनुष्यदेह मिळेलच
असे नाही. १ आपल्या आयुष्याचे सर्व बाजूनी हित होईल, असे काही प्रयत्न तुम्ही करीत नाही तुमचे चित्त रात्र-
दिवस घर, बायको, पैसा याच्या आशेतच गुरफटून राहिले आहे. २ अवचितपणे मनुष्यदेहाचा हा ठेवा तुमच्या
हाताशी आला आहे मग विनाकारण गर्भवासाची विपत्ती पुन पुन' का भोगावी ? ३ एकदा हा मनुष्यदेह संपला
की मग सारख्या जन्ममृत्यूच्याच फेऱ्या सुरू होऊन नरकवास मात्र भोगावा लागेल. ४ तुकाराम महाराज म्हणतात,
तेव्हा तू याच जन्मी नीट आठवण प्रभूची ठेव. नाहीतर पुढे काही ठीक होणार नाही ५
१०७४ आम्हीं पतितांनीं घालावें सांकडें । तुम्हा लागे कोडें उगवणें ॥ १ ॥
आचरतां दोष न धरूं सांभाळ । निवाड उकल तुम्हां हाती ॥ २ ॥
न घेतां कवडी करावा कुढांवा । पाचारिता देवा नामासाठीं ॥ ३ ॥
दयासिंधु नाम पतितपावन । हैं आम्हा वचन सांपडले ॥ ४ ॥
तुका म्हणे करूं अन्यायाच्या कोटी । कृपावंत पोटीं तूंचि देवा ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- साकडें-संकट, उगवणें-सोडवणे, मोकळे करणे, कुढावा-रक्षण, पाचारिता-बोलविता.
अर्थ - देवा, आम्ही पातकी लोकांनी नाना पापे करून तुम्हास संकटात टाकावे व तुम्ही आम्हास त्या
संकटांतून मुक्त करावे. १ अनेक प्रकारच्या दोषांचे आचरण करिताना आम्ही कधीच आम्हास जपणार नाही पण
त्यातून मोकळे करण्याचे काम मात्र देवा, तुम्हास करावे लागते. २ देवा, तुमचे नुसते नाव घेऊन जरी तुम्हास कोणी
हाक मारिली, तरी तुम्ही एका कवडीची किंमत न घेता त्याचे रक्षण करता ३ तुमचे नावच दयेचा सागर व
पतितपावन असे आहे. असे तुम्ही आमच्या भक्ताना जे सांगितले आहे, तेच वचन आमच्या हाती आहे ४ तुकाराम
महाराज म्हणतात, आम्ही अनेक कोटी अन्याय करू तरी सुद्धा देवा, तुम्ही कृपावत आहात तसेच, आमच्या
अनुभवास येईल. ५
१०७५ जो भक्ताचा विसावा । उभा पाचारितो धांवा ॥ १ ॥
हातीं प्रेमाचे भातुके । मुखीं घाली कवतुकें ।
भवसिंधू सुखें । उत्तरी कासे लावूनि ॥ २ ॥
थोर भक्ताची आस । पाहे भोवताली वास ॥ ३ ॥
तुका म्हणे कृपादानी । फेडी आवडीची धणी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - पाचारितो-बोलावितो, भातुके-खाऊ, वास-वाट, धणी-तृप्ती.
अर्थ:- हा देव भक्तांसाठी किती तत्पर असतो पाहा. भक्ताचा विसावाच असणारा हा देव उभे राहून
आपल्या भक्ताना जवळ बोलवितो तरी त्याच्याकडे धाव घ्यावी १ त्याच्या हातात प्रेमाचा खाऊ असून तो मोठ्या
कौतुकाने भक्ताच्या मुखात तो खाऊ घालण्यास उत्सुक आहे. आपली कास आथरून हा देव आपल्या भक्ताचे रक्षण
या संसारसागरातून करीत असतो. २ याला आपल्या भक्ताची आवड फार मोठीच आहे. भोवताली दृष्टी ठेवून

सार्थ तुकारामगाथा ४८१
तो त्यांची वाट एकसारखी पाहात असतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, कृपेचे दान देणारा हा देव भक्तांवर
कृपा करून त्यांच्या विषयी आपल्या प्रेमाची तृप्ती करीत असतो. ४
१०७६ अखंड तुझी जया प्रीति । मज दे त्यांची संगति ।
मग मी कमळापति । तुज नाणीं कांटाळा ॥ १ ॥
पडोन राहेन ते ठायीं । उगाचि संतांचिये पायीं ।
न मागें न करों कांहीं । तुझी आण विठोबा ॥ २ ॥
तुम्ही आम्ही पीडों ज्यानें १ । दोन्ही वारती एकानें ।
बैसलों धरणें । हाका देत दारेशीं ॥ ३ ॥
तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला ।
न पाहिजे केला । अवघा² माझा आव्हेर ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- नाणों-न आणी, आणणार नाही, आण-शपथ.
अर्थ :- देवा, तुझ्यावर ज्यांची अखंड प्रीती असते, त्या साधुसंतांची व भक्तांची संगत मला द्यावी. कमला-
पती, मग सारखे सारखे मागून मी तुला कंटाळा येईल असे काही करणार नाही १ त्या संतांच्या पायांजवळच
पडून राहीन. मी काही करणार नाही. काही मागणारही नाही. देवा, याविषयी त्या विठ्ठलाची शपथ आहे. २
तुमच्या दाराशी हाका देऊन सारखे धरणे धरल्याने तुम्हास व आम्हांस अशी दुहेरी पीडा होत असते; ती यामुळे
आता दूर होईल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा विठ्ठला, माझ्या या बोलण्याकडे लक्ष द्यावे आता. माझा त्याग
तुम्ही करु नये. ४
१०७७ पुनीत केलें विष्णुदासीं । संगें आपुलिया दोपी ॥ १ ॥
कोण पाहे तयांकडे । वीर विठ्ठलाचे गाढे ।
अशुभ त्यांपुढें शुभ होऊनिया ठाके ॥ २ ॥
प्रेमसुखाचिया रासी । पाप नाहीं ओखदासी ॥ ३ ॥
तुका म्हणे त्यांनीं । केली वैकुंठ मेदिनी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- पुनीत-पवित्र, ओखदासी-औषधालासुद्धा, मेदिनी-पृथ्वी.
अर्थ :- या विष्णुदासांनी आपल्या पावन संगतीने भोवतीच्या सर्व पातकी लोकांना पवित्र केले आहे १
आता यांच्याकडे वाकड्या नजरेने कोण पाहील ? कारण ते या विठ्ठलाविषयी प्रेम धारण करणारे शूर वीर आहेत.
जर काही अशुभ असेल तर ते होऊनच त्यांच्या पुढे उभे राहते. २ त्यांच्या समोर श्रीहरीच्या प्रेमाचे पर्वताच्या पर्वत
उभे असून पाप औषधाला सुद्धा उरत नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या संत पुरुषांनी सर्व पृथ्वीच वैकुंठ-
रूपाची करून टाकली आहे. ४
१०७८ जन³ देव तरी पायांचि पडावें । त्याचिया स्वभावें चाड नाहीं ॥ १ ॥
अग्नीचें सौजन्य शीतनिवारण । पालवीं बांधोनि नेतां नये ॥ २ ॥
तुका म्हणे विंचु सर्प नारायण । वंदावे दुरोन शिवों नये ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा :- चाड नाहीं-पाहू नये, ध्यानात धरू नये, पालवीं-पदरात.
अर्थ :- सर्व लोक ही देवाचीच स्वरूपे आहेत, असे असले तरी त्यांचे अवगुण ध्यानात न धरता त्यांच्या पायां
पडावे. १ असे असले तरी हेही ध्यानात ठेवावे की, अग्नीचे काम शीतनिवारण आहे. थंडी दूर करणे, हे अग्नीचे
१ जन, २ आता, ३ जग.
तु गाथा...६१

सौजन्य असून यासाठी ह्याचा उपयोग आपणास मोठाच आहे म्हणून काही ह्याला आपल्या पदरात बांधून घेता
येत नाही २ तुकाराम महाराज म्हणतात, विंचू व सर्प ही नारायणाची रूपे, परंतु ह्यांना न शिवता दुरूनच
वंदन करावे ३

१०७९ भूत भविष्य फळो यावे वर्तमान । हे तो भाग्यहीन त्याची जोडी ॥ १ ॥
आम्ही विष्णुदासीं देव घ्यावा चित्ते । होणार ते होतें प्रारब्धें ॥ २ ॥
जगत्डीसाठीं घातले दुकान । जातो नारायण अतरोनि ॥ ३ ॥
तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा । थोरली ते पीडा ऋद्धिसिद्धी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - जोडो-प्राप्ती
अर्थ - आपणास भूतकाळातील व भविष्यकाळातील वर्तमान समजावे म्हणून पुष्कळ लोकांची खटपट
असते पण या ज्ञानाची प्राप्ती ही भाग्यहीन माणसांस होते म्हणजे ही प्राप्ती काही विशेष भाग्याची नव्हे १ आम्ही
विष्णुदासांनी मात्र निरंतर या देवाचेच चिंतन मनात करावे, व जे प्रारब्धानुसार असेल ते भोगावे २ केवळ
जगदंडीसाठीच भूतभविष्य समजणाऱ्या लोकांनी दुकान घालून धंदा सुरू केलेला आहे पण त्यामुळे परमेश्वराचे
पाय अंतरून जातात ना ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा प्रपंच मोठा गहन असून त्यात, ऋद्धिसिद्धींची पीडाही
फार मोठी असते ४

घोंगड्यांचे अभंग- १२

१०८० ठकिले काळा मारिली दडी । दिली कुडी टाकोनिया ॥ १ ॥
पाघुरलो बहु काळें । घोंगडें वळें सांडवले ॥ २ ॥
नये ऐसा लाग वरी । परते दुरी लपाले ॥ ३ ॥
तुका म्हणे आड सेवा । लाविला हेवा धाडली ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - ठकिले-फसविले, कुडी-देह, लाग-लाभ, हेवा-हाव
अर्थ - मी काळाला फसवून दडी देऊन लपून राहिलो देहभावाची वृत्तीही टाकून दिली १ पुष्कळ
दिवसांपर्यंत मी हे काळे घोंगडे पाघरले होते, ते मुद्दामच टाकून दिले आहे २ आता त्या काळात कसलाही लाभ
होणार नाही, अशा दूरच्या ठिकाणी जाऊन मी लपलो आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, बाह्य सेवा करण्याची
माझी वरवरची हाय होती, तिची आटकाठी मी या प्रकाराने खटपट दूर केली ४

१०८१ घोगडिपाचा पालट केला । मुलामुला आपुल्यात ॥ १ ॥
कान्होबा तो मीच दिसे । लाविले पिंसे सवगडिया ॥ २ ॥
तो बोले मी उगाच बैंसे । आनारिसे न दिसे ॥ ३ ॥
तुका म्हणे दिलें सोंग । नेदी व्यंग जाऊ देऊ ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - पिंसे-वेड, आनारिसे-वेगळेपणा
अर्थ - खेळताना या गोपाळाच्या मुलानी आपल्या घोंगड्याची अदलाबदल केली. १ प्रत्येकजणाने
कान्होबा मीच, असे सोंग घेऊन इतर सोबत्याना भलावणी केली. २ तो बोलतो व मी उगाच बसतो असे असले
तरी, त्याच्यात व आमच्यात वेगळेपणा नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीहरीने हे जे सोंग त्याना दिले
आहे, ते काही व्यर्थ वाया जात नाही ४

सार्थ तुकारामगाथा ४८३
१०८२ खेळों लागलों सुरकवडी । माझी घोंगडी हारपली ॥ १ ॥
कान्होबाचे पडिलों गळां । घेईं गोपाळा देईं झाडा ॥ २ ॥
मी तों हागे उघडा जालों । अवघ्या आलों बाहेरी ॥ ३ ॥
तुका म्हणे बुद्धि काची । नाहीं ठायोंची मजपाशीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- हारपली-हरवून गेली, काची-खोटी.
अर्थ :- देवा, सुरकवडीचा खेळ मी खेळू लागलो, तेव्हा माझ्या खांद्यावरची पोंगडी हरवून गेली. १ त्या
वेळी मी कान्होबाच्या गळघात पडून म्हणालो की, गोपालकृष्णा, तू माझी झडती घे व तूही तुझ्या अंगाची झडतो
दे. २ हा पाहा मी झडतीसाठी उघडा झालो आहे. सर्व उपाधी सोडून आलो आहे. सर्व वासनांतून मुक्त झालो
आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जवळ माझी मूळचीच बुद्धी काही छोटी नाही. ४
१०८३ घोंगडियांची एकी राशी । त्याचपाशीं तें ही होतें ॥ १ ॥
माझियाचा भाग दावा । केला गोवा उगवों द्या ॥ २ ॥
व्हावें ऐसें निसंतान । घेइन आन तुजपाशीं ॥ ३ ॥
तुका म्हणे लाहान मोठा । सांडा¹ ताठा हा देवा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- गोवा-गुंतवणूक, उगवो द्या-सोडवा, आन-शपथ
अर्थ :- देवा, तुझ्याजवळ अनेक लोकांच्या घोंगड्यांचे ढोगच्या ढीग होते. माझेही हे घोंगडे तेथेच होते. १
देवा, माझा मार्ग मला दाखवा ना. ज्या गुंतव्यात माझी गुंतवणूक झाली आहे त्यातून माझी सुटका करावी. २ माझ्या
वासनांचे व देहरूपी घोंगडीचे निसंतान व्हावे, अशी शपथ मी तुझ्यापाशी घेत आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात,
देवा, तुम्ही हा लहानमोठेपणाचा ताठा सोडून द्यावा. ४
१०८४ नाहीं तुझे उगा पडत गळां । पुढें गोपाळा जाऊं नको ॥ १ ॥
चाहाड तुझे दाविन घरों । बोलण्या उरी नाहीं ऐसी ॥ २ ॥
तुम्हा आम्हां पडदा होता । सरला आतां सरोबरी ॥ ३ ॥
तुका म्हणे उरती गोष्टी । पडिली मिठी न सुटे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- उगा-उगाच, सरोबरी-बराबरी, गोष्टी-हृद्‌गत, गोष्टी.
अर्थ :- देवा, गोपाळा, माझी घोंगडी तू घेतलीस, तेव्हा मी काही उगाचच गळ्यात पडलो म्हणून नव्हे.
गोपाळा, तू तसाच जाऊ नकोस १ तुझ्या बोलण्यात काहीच ताळतंत्र नाही असे तुझ्या घरी जाऊन सांगणारे
चहाडखोर मित्र मी तुला दाखवीन. २ आतापर्यंत तुमच्याआमच्यांत मर्यादेचा व भेदाचा पडदा होता, तो आता
संपला. आता तुझीआमची बराबरी झाली आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता त्या भेदाच्या नुसत्या
गोष्टींच उरतील. आता तुमच्या पायाशी जो मिठी पडली आहे, ती काही सुटणार नाही. ४
१०८५ तुम्हां आम्हां उरी तोंवरी । जनाचारी ऐसे तैसे ॥ १ ॥
माझें घोंगडें टाकून देईं । एके ठायीं मग असों ॥ २ ॥
विरोधानें पडे तुटी । कपट पोटीं नसावें ॥ ३ ॥
तुका म्हणे तूं जाणता हरी । मज वेव्हारों बोलविसी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- जनाचारी-लोकव्यवहार, लोकाचार.
अर्थ :- तुमच्यात व आमच्यात जोपर्यंत भेद आहे, मर्यादा आहे, तोपर्यंतच लोकव्यवहार असा तसाच
राहणार. १ देवा, माझे घोंगडे टाकून द्या ना. मग तुम्ही व आम्ही एकाच ठिकाणी असू. २ आपापसांत विरोध
१ माडवा.

४८२ सार्थ तुकारामगाथा
सौजन्य असून यासाठी त्याचा उपयोग आपणास मोठाच आहे म्हणून काही त्याला आपल्या पदरात बांधून घेता
येत नाही २ तुकाराम महाराज म्हणतात, विंचू व सर्प ही नारायणाची रूपे, परंतु त्यांना न शिवता दुरूनच
वंदन करावे ३
१०७९ भूत भविष्य कळो यावे वर्तमान । हे तो भाग्यहीन त्याची जोडी ॥ १ ॥
आम्ही विष्णुदासीं देव घ्यावा चित्ते । होणार ते होते प्रारब्धें ॥ २ ॥
जगरुडीसाठी घातले दुकान । जातो नारायण अंतरोनि ॥ ३ ॥
तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा । थोरली ते पीडा रिद्धिसिद्धी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - जोडी-प्राप्ती
अर्थ - आपणास भूतकाळातील व भविष्याळातील वर्तमान समजावे म्हणून पुष्कळ लोकांची खटपट
असते पण या ज्ञानाची प्राप्ती ही भाग्यहीन माणसास होते म्हणजे ही प्राप्ती काही विशेष भाग्याची नाही १ आम्हीं
विष्णुदासांनी मात्र निरंतर या देवाचेच चिंतन मनात करावे व जे प्रारब्धानुसार असेल ते भोगावे २ केवळ
जगरुडीसाठीच भूतभविष्य समजणाऱ्या लोकांनी दुकान घालून धंदा सुरू केलेला आहे पण त्यामुळे परमेश्वराचे
पाय अंतरून जातात ना ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा प्रपंच मोठा गहन असून त्यात, रिद्धीसिद्धींची पीडाही
फार मोठी असते ४
घोंगडयाचे अभंग- १२
१०८० ठकिले काळा मारिली दडी । दिली कुडी टाकोनिया ॥ १ ॥
पांघुरलो बहु काळें । घोगडें बळें सांडवले ॥ २ ॥
नये ऐसा लाग वरी । परते दुरी लपाले ॥ ३ ॥
तुका म्हणे आड सेवा । लाबिला हेवा धाडली ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - ठकिले-फसविले, कुडी-देह लाग-लाभ, हेवा-हाव
अर्थ - मी काळाला फसवून दडी देऊन लपून राहिलो देहभावाची वृत्तीही टाकून दिली १ पुष्कळ
दिवसांपर्यंत मी हे काळे घोंगडे पांघरले होते, ते मुद्दामच टाकून दिले आहे २ आता त्या काळास कसलाही लाभ
होणार नाही, अशा दूरच्या ठिकाणी जाऊन मी लपलो आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, बाह्य सेवा करण्याची
माझी वरवरची हाव होती, तिची आडकाठी मी या प्रकाराने झटपट दूर केली ४
१०८१ घोंगडियाचा पालट केला । मुलामुला आपुल्यात ॥ १ ॥
कान्होबा तो मीच दिसे । लाविले पिसे सवंगडिया ॥ २ ॥
तो बोले मी उगाच बैसे । आनारिसे न दिसे ॥ ३ ॥
तुका म्हणे दिले सोंग । नेदी व्यंग जाऊ देऊ ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - पिसे-वेड, आनारिसे-वेगळेपणा
अर्थ - खेळताना या गोपाळांच्या मुलानी आपल्या घोंगड्यांची अदलाबदल केली. १ प्रत्येकजणाने
कान्होबा मीच, असे सोंग घेऊन इतर सोबत्याना बतावणी केली २ तो बोलतो व मी उगाच बसतो असे असले
तरी, त्याच्यात व आमच्यात वेगळेपणा नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीहरीने हे जे सोंग त्याना दिले
आहे, ते काहीं व्यर्थ वाया जात नाही ४

सार्थ तुकारामगाथा ४८३
१०८२ खेळों लागलों सुरकवडी । माझी घोंगडी हारपली ॥ १ ॥
कान्होबाचे पडिलों गळां । घेईं गोपाळा देईं झाडा ॥ २ ॥
मी तों हारगे उघडा जालों । अवघ्या आलों बाहेरी ॥ ३ ॥
तुका म्हणे बुद्धि काची । नाहीं ठाणोची मजपाशीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - हारपली-हरवून गेली, काची-खोटी.
अर्थ :- देवा, सुरकबडीचा खेळ मी खेळू लागलो, तेव्हा माझ्या खांद्यावरची घोंगडी हरवून गेली. १ त्या
वेळी मी कान्होबाच्या गळ्यात पडून म्हणालो की, गोपालकृष्णा, तू माझी झडती घे व तूही तुझ्या अंगाची झडती
दे २ हा पाहा मी झडतीसाठी उघडा झालो आहे. सर्व उपाधी सोडून आलो आहे. सर्व वासनांतून मुक्त झालो
आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जवळ माझी मूळचीच बुद्धी काही खोटी नाही. ४
१०८३ घोंगडियांची एकी राशी । त्याचपाशीं तें ही होतें ॥ १ ॥
माझियाचा माग दावा । केला गोवा उगवों द्या ॥ २ ॥
व्हावें ऐसें निसंतान । घेइन आन तुजपाशीं ॥ ३ ॥
तुका म्हणे लहान मोठा । सांडा¹ ताठा हा देवा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- गोवा-गुंतवणूक, उगवो द्या-सोडवा, आन-शपथ
अर्थ :- देवा, तुझ्याजवळ अनेक लोकांच्या घोंगडयांचे डोंगऱ्या ढीग होते. माझेही हे घोंगडे तेथेच होते. १
देवा, माझा मार्ग मला दाखवा ना. ज्या गुंत्यात माझी गुंतवणूक झाली आहे त्यातून माझी सुटका करावी २ माझ्या
वासनांचे व देहरूपी घोंगडीचे निसंतान व्हावे, अशी शपथ मी तुझ्यापाशी घेत आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात,
देवा, तुम्ही हा लहानमोठेपणाचा ताठा सोडून द्यावा ४
१०८४ नाहीं तुझे उगा पडत गळां । पुढें गोपाळा जाऊं नको ॥ १ ॥
चाहाड तुझे वांचिन घरों । बोलण्या उरी नाहीं ऐसी ॥ २ ॥
तुम्हां आम्हां पडदा होता । सरला आतां सरोबरी ॥ ३ ॥
तुका म्हणे उरली गोठी । पडिली मिठी न सुटे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- उगा-उगाच, सरोबरी-बरोबरी, गोठी-हकीगत, गोष्टी
अर्थ :- देवा, गोपाळा, माझी घोंगडी तू घेतलीस, तेव्हा मी काही उगाचच गळ्यात पडलो म्हणून नव्हे.
गोपाळा, तू तसाच जाऊ नकोस १ तुझ्या बोलण्यात काहीच ताळतंत्र नाही असे तुझ्या घरी जाऊन सांगणारे
चहाडखोर मित्र मी तुला दाखवीन. २ आतापर्यंत तुमच्याआमच्यात मर्यादेचा व भेदाचा पडदा होता, तो आता
संपला. आता तुझीआमची बरोबरी झाली आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता ह्या भेदाच्या नुसत्या
गोष्टीच उरतील. आता तुमच्या पायाशी जी मिठी पडलो आहे, ती काही सुटणार नाही. ४
१०८५ तुम्हां आम्हां उरी तोंवरी । जनाचारी ऐसे तैसी ॥ १ ॥
माझें घोंगडें टाकून देईं । एके ठायीं मग असों ॥ २ ॥
विरोधानें पडे तुटी । कपट पोटीं नसावें ॥ ३ ॥
तुका म्हणे तूं जाणता हरी । मज वेव्हारीं बोलविसी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - जनाचारी-लोकव्यवहार, लोकाचार
अर्थ - तुमच्यात व आमच्यात जोपर्यंत भेद आहे, मर्यादा आहे, तोपर्यंतच लोकव्यवहार असा तसाच
राहणार. १ देवा, माझे घोंगडे टाकून द्या ना मग तुम्ही व आम्ही एकाच ठिकाणी असू. २ आपापसांत विरोध
१ सांडवा.

वाढला म्हणजे विनाकारण अंतर निर्माण होते, म्हणून देवा, पोटात कधी कपट ठेवू नये. ३ तुकाराम महाराज
म्हणतात, श्रीहरी, तू स्वतः जाणता आहेस पण मला मात्र व्यवहारातील बोलणे करायला उगाच लावतोस ४
१०८६ मूळींचा तुम्हा लागला चाळा । तो गोपाळा न संडा ॥ १ ॥
घ्यावे त्याचे देणेचि नाहीं । येचि वाहीं देखतसो ॥ २ ॥
माझी तरी घोंगडी मोठी । गांठीची लंगोटी सोडिस ना ॥ ३ ॥
तुका म्हणे म्या सांडिली आशा । हुगिला फांसा येथुनिया ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - वाहीं-प्रवाह, ओघ, रीत
अर्थ - देवा, तुम्हांला मूळचीच सवय लागली आहे, ती काही तुम्ही सोडीत नाही. १ ज्याचे तुम्ही एकदा
घेता, ते कधी परत देतच नाही हाचं प्रवाह तुमच्या येथील मी पाहात आहे २ तू माझी भली मोठी घोंगडी घेतलींस
तेवढी, पण स्वतःची लंगोटीसुद्धा देत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी तर आता आशाच सोडली
आहे अशा प्रकारचा पाश मी हुसून टाकून दिलेला आहे ४
१०८७ घोंगडियास घातली मिठी । न सोडी साटी केली जीवे ॥ १ ॥
हा गे चोर घरा धावा कोणी । घरात राहाटे चहू कोनी ॥ २ ॥
नोळखवे म्या धरिला हातीं । देहा दीप माय लाविली वाती ॥ ३ ॥
न पावे धावणे मारितो हाका । जनाचारीं तुका नागवला ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - साटी केली-सोडून दिला, राहाटे-फिरता आहे
अर्थ - या देवाने माझ्या घोंगड्यासच मिठी मारली आहे हो जीव गेला माझा तरी तो आता सोडणार
नाही १ लोकांहो, हा एक चोरच माझ्या घरात शिरून चारही कोपऱ्यातून फिरतो आहे धावा हो धावा याला
कुणी तरी धरा हो २ मी माझ्या देहाचा दीप मायची वात करून प्रज्वलित केला आहे, तरी मी त्याला काही
ओळखू शकत नाही त्याला हातात मात्र पकडून ठेविले आहे ३ हा तुकाराम यामुळे लोकव्यवहारदृष्टीने नागवला
जात असून, रक्षणासाठी लोकांना हाक मारीत असून त्याच्या मदतीसाठी कोणीही धावून येत नाहीत ४
१०८८ आता मी देवा पांघरो काई । भिकेचे तेही उरेचि ना ॥ १ ॥
सदैव दुबळें नेणे चोर । देखोनि सुनाट फोडितो घर ॥ २ ॥
नाही मजपाशीं फुटकी फोडी । पाचांनीं घोंगडी दिली होती ॥ ३ ॥
तुका म्हणे जना वेगळें जाले । एकचि नेले एकल्याचे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - सदैव-गुर्देवीं श्रीमान, सुनाट-उघडे फोडी-कवडी, सुपारीचे खांड, पाचांनी-
पंचमहाभूतांनी
अर्थ - देवा, आता मी पांघरू तरी काय रे ? एक घोंगडी मी भिक्षा मागून आणली होती, तीही तू नेलीस
आता माझ्यापाशी काहीच उरले नाही १ चोर चोरी करताना श्रीमान, सुदैवी अथवा दरिद्री, दुबळा असा फरक
कधीच करीत नाही घर उघडे पाहिले की तो फोडतो व चोरी करून निघून जातो तसेच माझे झाले २ माझ्या
पाशी तसे पाहिले तर फुटकी कवडीसुद्धा नाही, मला तेवढीच एक पंचमहाभूतांनी देहरूपी घोंगडी दिली होती ३
तुकाराम महाराज म्हणतात, त्या एका परमेश्वराने माझी एकट्याची घोंगडी नेऊन मला लोकाचारातून वेगळे केले ४
१०८९ मी माझें करित होतो जतन । भीतरिल्या चोरे घेतले¹ खाने ॥ १ ॥
मज आल्याविण आधींच होता । मज न कळता मज² माझी ॥ २ ॥
१ घेतली खाण, २ मजपाशी

सार्थ तुकारामगाथा ४८५
घोंगडें नेलें घोंगडें नेलें । उघडें केलें उघडेंच ॥ ३ ॥
तुका म्हणे चोरटाचि जाला साव । सहजचि न्याय नाहीं तेथें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - जतन-सांभाळ, खांनें-चोरी करून, साव-प्रतिष्ठित
अर्थ - माझे पंचमहाभूतात्मक देहाचे घोंगडे मी चांगले जपून ठेविले होते त्याचा सांभाळ चांगला केला
होता पण घरातल्या, हृदयामधील चोरानेंच चोरी करून ते पळवून नेले १ मी येथे यायच्या आधीपासूनच तो
इथे होता मला न कळताच तो माझ्याही हृदयात स्थान मिळवून बसला होता २ या देवाने माझे घोंगडे नेले हो,
घोंगडे नेले हो त्याने मला आता उघडे केले आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आणि नवल असे की, जो चोरटा
होता, तोच आता प्रतिष्ठित होऊन बसला आहे या ठिकाणी न्याय राहिलेला नाही, हे सहजच दिसते. ४
१०९० घोंगडें नेलें सागो मी कोणा । दुबळें माझें नाणीत मनां ॥ १ ॥
पुढें तें मज न मिळे आता । जवळो सत्ता दाम नाहीं ॥ २ ॥
सेटे महाजन ऐका कोणी । घोगडियाची करा शोधणी ॥ ३ ॥
घोगडियाचा करा बोभाट । तुका म्हणे जव भरला हाट ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा .- नाणीत-आणीत नाहीत, हाट-बाजार
अर्थ -- माझे देहरूपी घोंगडे नेले हे आता मी सांगू तरी कुणास ? मी दुबळा असल्याने कुणीच माझ्या-
विषयी मनात आणीत नाहीत १ आता यापुढे ते घोंगडे मला परत मिळेल, अशी आशा दिसत नाही कारण
माझ्याजवळ पैसा नाही, कसली सत्ता नाही २ अहो श्रीमान शेट सावकार, महाजन लोकहो, माझे कुणी तरी ऐका
हो कुणी तरी माझ्या घोंगड्याचा शोध करा ना ३ तुकाराम महाराज म्हणतात, लौकिकाचा हा बाजार भरला
आहे, तोपर्यंतच या माझ्या घोगड्याचा बोभाटा करून शोध करा ना तुम्ही ४
१०९१ माझें घोंगडें पहिलें ठायीं । माग तया पायीं सापडला ॥१ ॥
चोर तो भला चोर तो भला । पाठिसी घातला पुंडलिके ॥ २ ॥
चोर कुठोरि एकेचि ठायीं । वेगळें पाहावे न लगे काही ॥ ३ ॥
आणिकांचीं ही चोरलीं आधीं । माझें त्यामध्यें मेळविलें ॥ ४ ॥
आपल्या आपण शोधिले तींहीं । करीन मी ही तेचि परी ॥ ५ ॥
तुका म्हणे माझें हितचि जालें । फाटके जाऊन घडके आलें ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - मार्ग-शोध, कुठोरि-आश्रय देणारा काठारी
अर्थ - एवढा बोभाटा झाल्यावर माझे देहरूपी घोंगडे आहे त्या ठिकाणीच पडले आहे असे माझ्या
ध्यानात आले त्या विठ्ठलाच्या पायापासूनच मला याचा शोध लागला १ हा देव मोठाच चोर असून त्याला या
पुंडलिकाने आपल्या पाठीशी घातले आहे २ त्यामुळे चोर व त्यास आश्रय देणारा फोठारी एकाच ठिकाणी आहेत
दोघेजण एकत्र असल्याने त्यांना वेगळे पाहण्याची जरूरीच नाही ३ या चोराने माझ्याही आधी पुष्कळांची
घोंगडी चोरली होती त्याच्यातच माने घोंगडही मिसळून टाकले होते ४ ज्यानी आपण होऊन शोध घेतला, त्याना
त्याचे त्याचे घोगड मिळाले मीही त्याच्याप्रमाणेच शोध करुन माझ घोंगडे परत मिळविले ५ तुकाराम महाराज
म्हणतात, यात माझा फायदाच झाला कारण सतरा ठिकाणी फाटके असलेले माझ गरिवाचे घोंगडे जाऊन चांगले
ईश्वरी कृपेचे नये घोंगटे मला मिळाले ६
विवरण - तुकाराम महाराजाच ह यागडयाच अभग रुपकात्मक म्हणून प्रसिद्ध आहेत थीष्टप्यावरावर
रानात जाताना अनेक गोपाळ झाडावर काबळ किंवा घानडे घत असत त्याच अनव वेळ बनात गाई वर रागत्या
की होत असत त्यामध्ये एक्मेकाचे घायडे पळविणे, लपवून ठेवणे, असा थट्टेचाही प्रकार अस थीष्टपणाने आपल

४८६ सार्थ तुकारामगाथा
घोंगटें पलविले, ते पाहून गोपाळ गलगला करीत असत. श्रीमंत मुलांची धागडी चांगली असून त्यामुळे रुधी त्याचा
लोभ इतरांना वाटे याच घोंगडयाच्या खेळातून पुढे रूपकात्मक अर्थ तयार झाला असावा श्रीकृष्ण धागडे वाहून
घेतो, म्हणजे पंचमहाभूतांचे बनलेले हे शरीर नाहीसे करतो देहभाव नष्ट करतो इंद्रियादीच्या वृत्तीतून तो आपणास
मुक्त करतो हा देह म्हणजेच मी, अशी अहंकारार्थी भावना दूर करतो याच देहभावाला धागडे म्हटले आहे पंचमहा
भूताचे बनलेले हे घोंगडे केव्हा तरी मोडावयाचे, किंवा त्याच्या अंतर्यामी वसलेला त्याचा खराखुरा मालक ओळ
खावयाचा, अशी भाषा संतांच्या परिवारात रुढ झाली याही ठिकाणी तुकारामबुवांचे धागडे गोपाळकृष्णाने चोरून
नेले असाच बोभाटा आहे श्रीकृष्णाने देहभाव कमी केला, असा याचा अर्थ शेवटी घोंगडे सापडने, पण ते पहिल्यापेक्षा
कितीतरी पटींनी चांगले होते पहिले गरिबाचे सतरा ठिकाणी फाटलेले, किंवा ठिगळ लावलेले होत, तर आता हे नवे
भरजरीच होते कारण आता त्याला ईश्वरी कृपेची ऊब लाभली होती

या धागड्यापाठीमागे आणखीही एक संकेत असावा वारकरी भक्तांना आजही खांद्यावर कांबळे किंवा
धागडे टाकणे आवडत श्रीकृष्ण सांद्यावर घोंगडे किंवा कांबळे टाकून रानावनात गाईमागून जात अस, अशी कल्पना
आहे तोच धागा येथेही परिपुष्ट झालेला आहे पंढरपूरच्या यात्रेच्या निमित्ताने आजही बाजारात पासादना व
घोंगडया भरपूर प्रमाणात विकायला येतात पंढरपूरला आल्यावर विठ्ठलाचे दर्शन घेऊन घरी निघताना एखाद्या
भाविकाने धागडे विकत घेतले, तर त्यातील गरजेची व भावाची वृत्ती सहज समजून येण्यासारखी आहे ही प्रथा
ज्ञानेश्वरांच्या काळापासून चालत आली असावी श्रीसोपानदेवांनी 'घोंगडिया साठों पंढरीये पेठीं । वैणप्याची दाटी
होती तेथें' या ओळीने सुरू होणारा एक सुंदर अभंग रूपकाचा म्हणून लिहिलेला आहे या घोगडयाच्या बाजारात
सोपानदेवांनी एक धागडे घेतले व ते श्रीगुरुच्या चरणी अपण केल 'सोपान घोंगडी घडी केली । चरणीं राहिली
निवृत्तीच्या' म्हणून त्यांनी म्हटले आहे सर्व देहभाव देवाच्या अथवा श्रीगुरूच्या चरणी अर्पण करावा असाच भावार्थ
याचा आहे

श्रीज्ञानेश्वरांचेही 'घागडी' वर फार चांगले अभंग आहेत त्यांच्या तर घोंगडयावर ब्रह्माचा गाठा असून ते
त्यांना 'रखुमादेविवरें विठ्ठलें दिधलें' असल्यामुळे 'अमोलिक झाले मोलेविण' ज्ञानेश्वरांनीही पंढरीच्या घोंगड्याच्या
बाजाराचा उल्लेख केलेला आहू 'घोंगडी घेऊनि हाटासि जाये । पंढरिये आहे वस्ती आम्हा' या बाजारात आपणाम
मिळालेले घोंगडे कसले आहे ? ज्ञानदेवांनी वर्णन केले आह 'काळें ना सावळें ढवळें ना पिवळें । घोंगडें निराळें
लाधलो मी' इतकेच नव्हे तर तुकोबांना जशी 'फाटके जाऊन धडके आले' अशी प्रचीती आली तशीच ती ज्ञाने
श्वरानाही आली होती 'भागील रगडें झाडिले आता । पंढरीनाथा चरणा जवळीं। नवें नवधड हाता आलें । दृष्टी
पाहे तय मन हारपले । सहल फुलींवरी गोडा थोरु । घडतें दायो रखुमादेविवरू' असा त्यांनी या गोडेवाल्या धाग
डयाचा उल्लेख केलेला आहे खरे म्हणजे हे घोंगडे अद्वैत पठेतून आणलेले असते हे 'व्योमाकारें वेद प्रसिद्ध पाघुरवो'
असे असते

या धागड्यावरून ईश्वर व भक्त याचे ऐक्य प्रस्थापित व्हावे अशी ही एक कल्पना आहे ईश्वर मोठा व
मी भक्त लहान, पण दोघांचे धागडे एकच, अशी भाषा ज्ञानेश्वरांनी वापरलेली आह 'तू माझा स्वामी मी तुझा
रक । पाहता न दिसे वेगळिक ॥ मी तूं पण जाऊ दे दुरी । एकचि घोंगडे पाघरू हरी' असे ज्ञानश्वरानी म्हटले आहे
कधी श्रीकृष्णाची धागडी चांगली व आपली मान वाईट का ? अशी गमतीची तक्रारही आह 'कान्होबा तुझी
घोंगडी चांगली । आम्हासी का दिली वायली ?' अशी विचारणा एका गोपाळाने केलेली आहे

१०९२ सर्प भुलोन गुंतला नादा । गारुडियें फांदा घातलासे ॥
हिंडवूनि पोट भरी दारोदारीं । कोडुनि पेटारी असेतया ॥ १ ॥
तैसी परी मज जाली पांडुरंगा । गुंतलो तो मी गा सोडीं आता ॥
माझें मज काहीं न चलेसे जालें । कृपा तुज न करिता ॥ २ ॥

सार्थ तुकारामगाथा ४८७
आविसें मीन लावियेला गळीं । भक्ष तो गिळी म्हणउनियां ।
काढूनि बाहेरी प्राण घेऊं पाहे । तेथे बापमाये कवण रया ॥ ३ ॥
पक्षी पिलयां पातले आशा । देखोनियां फांसा गुंते बळें ।
मरण न भेये धांवोनि घोसरे । जीवित ना जालीं वाळें ॥ ४ ॥
गोडपणें मासी गुंतली लिगाडी । सांपडे फडफडी अधिकाधिक ।
तुका म्हणे प्राण घेतला आशा । पंढरीनिवासा धांव घालीं ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- फांदा-पाश, वरो-अवस्था, आविसे-आमिषाने, रया-रक्षण.
अर्थ :- गारुड्याची पुंगी वाजत असताना सर्प त्या नादास भुलला. त्याच वेळी त्या गारुड्याने त्याच्यावर
पाश टाकून त्याला पकडले. सर्पास पेट्याऱ्यात कोंडून दारोदारी तो हिंडतो व आपले पोट कसे तरी भरतो. काय त्या
सर्पाची किंमत असते ? १ पांडुरंगा, माझीही अशीच अवस्था झाली आहे. मीही आता या संसारपाशात गुंतून गेलो
आहे. मला आता त्यातून तू सोडव. तू जर कृपा केली नाहीस, तर माझे काहीच चालणार नाही. अशी स्थिती झाली
आहे. २ मासे धरणाऱ्या कोळ्याने मासे पकडण्यासाठी गळाच्या टोकास एक लहान मासा आमिष म्हणून लावला.
पाण्यातील माशाने ते चांगले भक्ष्य म्हणून तोंडात धरण्याचा प्रयत्न केला व त्यातच तो सापडला. मग कोळ्याने त्या
माशास बाहेर काढून त्याचा प्राणच घेण्यास सुरुवात केली. तेथे त्याचे रक्षण करणारे कोण आईबाप आहेत ? ३
घरट्यात असणाऱ्या आपल्या लहान लहान पिल्लांना पारध्याने पाशात पकडले आहे, असे मोठ्या आशेने आलेल्या
त्यांच्या आईबाप पक्ष्यांनी पाहिले. मग त्यांनी मरणाची फिकीर न करिता मायेने, पिल्लांवरील प्रेमाने त्यांनी त्या
जाळ्यात उडी घेतली. त्यामुळे त्यांची मुलेही वाचली नाहीत व त्यांचे जीवनही संपले. तेही पारध्याच्या हाती पिल्लां-
सहित सापडले. ४ गुळचट असणाऱ्या पदार्थावर माशी भुलली व तेथेच गुंतून राहिली. निसटण्यासाठी तिने आणखी
फडफड केली, तो ती अधिकच चिकटून राहिली. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, ही अशी आशा माझाही प्राण
घेऊ पाहात आहे. पंढरीनिवासा, पांडुरंगा, तू आता माझ्यासाठी धावत ये. ५
१०१३ यातिहीन मज काय तो अभिमान । मानी तुज जन नारायणा ॥ १ ॥
काय सुख मज तयाची हे खंती । आपुलाला घेती गुणभाव ॥ २ ॥
द्रव्यामुळें माथां वाहियेली चिंधी । होन जयामध्यें होता गांठी ॥ ३ ॥
तुका म्हणे जन वंदितो वेगळा । मजसी दुर्वळा काय चाड ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- यातिहीन-हीन जातीचा, होन-द्रव्य, चाड-इच्छा.
अर्थ :- देवा, मी तर हीन जातीचा असल्याने मला कसला आला आहे अभिमान ? नारायणा, तुम्हास
मात्र सर्व लोक मानतात. १ मला मान नाही, याची कसलीच चिंता वाटत नाही. कसलेच सुखदुःख नाही. जो तो
आपल्या गुणांप्रमाणे मान सन्मान होतोच. २ एखाद्या चिंधीत जर द्रव्य बांधले असेल, तर ती चिंधी त्या द्रव्यासाठी
मस्तकावर धारण केली जाते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, लोक ज्याला वंदन करतात, मानसन्मान देतात, तो
निराळाच आहे. मला दुबळ्याला मानाची काहीच चिंता नाही, इच्छा नाही. ४
१०१४ शीतळ साउली आमुची माउली । विठाई वोळली प्रेमपान्हा ॥ १ ॥
जाऊनि वोसंगा रिघेन वोरास । लागलें तें इच्छे पीइन वरी ॥ २ ॥
कृपा तनु माझी सांभाळी दुभूनि । अमृतजीवनें लोटलीसे ॥ ३ ॥
आनंदाचा ठाव नाहीं माझे चित्तीं । सागर तो किती उपमेसी ॥ ४ ॥

४८८ सार्थ तुकारामगाथा
सैर जाये पडे तयेसी साकडें । सांभाळीत पुढें मागें आस १ ॥ ५ ॥
तुका म्हणे चिंता कैसी ते मी नेणे । लडिवाळ तान्हे विठाईचे ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - वोळली-देत राहिली, चोसगा-कासेस, वोरस-स्नेहपूरित पान्हा, तनु-शरीर, सैर-
हवा तसा, वाकडा तिकडा
अर्थ - ही आमची विठाई माउली शीतळ अशा छायेप्रमाणे असून ती प्रेमाचा पान्हा देत राहिलेली आहे १
मी तिच्या कासेत तोंड खुपसून इच्छेस येईल त्याप्रमाणे मी तिच्या प्रेमाचा पान्हा चारीन, इच्छेस येईल तितके तिचे
कृपामृत पीत राहीन २ ही विठाई माउली मोठ्या कृपेने दुधाचा पाटा सोडून माझ्या शरीराचा सांभाळ करिते
तिच्यामुळे अमृताचे सजीवनौघ निर्माण झालेली आहे ३ या कृपेमुळे माझ्या चित्तात आनंदास एवढे भरते आले
आहे की, आणखी आनंदाला आता स्थानच उरलेले नाही या आनंदाच्या उधाणास सागराचीसुद्धा उपमा कशी पुरो
पडेल ? ४ मी जर येडावाकडा चालू लागलो तर, या आईसच त्याचे सकट पडते माझ्या मागेपुढे राहून ती माझे
रक्षण एकसारखे करीत असते ५ तुकाराम महाराज म्हणतात, यामुळे मला चिंता कशी माहीत नाही मी या
विठाई माउलीचे लडिवाळ असे तान्हे मूलच आहे ६
रामचरित्र—अभंग १४
१०९५ रामा वनवास । तेणे वसे २ सर्व देश ॥ १ ॥
केले नामाचे जतन । समर्थ तो नव्हे भिन्न ॥ २ ॥
वनांतरीं रडे । ऐसे पुराणीं पवाडे ॥ ३ ॥
तुका म्हणे ऋषिनेम । ऐसा कळोनि का भ्रम ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - ऋषिनेम-वाल्मीकी ऋषींनी सांगितल्याप्रमाण
अर्थ - श्रीरामचंद्राला वनवास घडला म्हणूनच दंडकारण्यात वसती वाढण्यास मदत झाली १ रामचंद्रांनी
आपल्या नावाचे सार्थक केले त्याच्याखेरीज समर्थपणा असा स्वतंत्र नाही २ स्वत ची पत्नी सीतादेवी हिला
रावणाने नेल्यावर शोकाने व्याकुळ होऊन रामचंद्रही शोकाने वनात रडत होते, असे पुराणांनी वर्णन केले आहे ३
तुकाराम महाराज म्हणतात, वाल्मीकी ऋषींनी जसे लिहून ठेविले होते, तसेच रामचंद्राचे वर्तन झाले असे समजत
असूनही तुमच्या मनात संभ्रम कशासाठी आहे ? ४
१०९६ राम म्हणे ग्रासोग्रासी । तोचि जेविला उपवासी ॥ १ ॥
धन्य धन्य ते शरीर । तीर्थाव्रताचे माहेर ॥ २ ॥
राम म्हणे करिता धंदा । सुखसमाधि त्या सदा ॥ ३ ॥
राम म्हणे वाट चाली । यज्ञ पाउलापाउली ॥ ४ ॥
राम म्हणे भोगीं त्यागी । कर्म न लिंपे त्या अंगीं ॥ ५ ॥
ऐसा राम जपे नित्य । तुका म्हणे जीवन्मुक्त ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - ग्रासोग्रासी-प्रत्येक घास घेताना
अर्थ - जेवताना प्रत्येक घासाच्या वेळी रामनाम जर घेतले तर, त्याला उपवासाचेच पुण्य लाभते १
त्याच्या शरीरास तीर्थांचे व व्रतांचे माहेरघर होण्याचे भाग्य लाभते, तो धन्यधन्य होय २ रोजचा व्यवसाय
करीत असताना राम राम असे नाम जर आपल्या मुखामधून येत राहिले तर समाधीचेच सुख आपणास मिळेल ३
वाटचाल करताना प्रत्येक पावलागणिक नामाचे उच्चारिले तर, यज्ञयाग केल्याचे श्रेय मिळेल ४ कोणत्याही
१ अस, २ असे

सार्थ तुकारामगाथा ४८९
भोगाच्या अथवा त्यागाच्या वेळी रामनाम जर मुखात असले, तर ते कर्म आपल्या अगी लागणार नाही आपण
त्यापासून निर्लेप राहू. ५ अशा प्रकारे जो रोज रामनामाचा सतत जप करीत असतो, त्यास तुकाराम महाराज
जीवन्मुक्तच म्हणतात ६
१०९७ तारी ऐसे जड । उदकावरी जो दगड ॥ १ ॥
तो हा न करी तें काई । का रे लीन नव्ह्हां¹ पायीं ॥ २ ॥
सीळा मनुप्य जाली । ज्याच्या चरणाचे चाली ॥ ३ ॥
वानरा हातीं लंका । घेवविली म्हणे तुका ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा -- उदकावरी-पाण्यावर, सीळा-दगड
अर्थ - या रामाचे महत्त्व असे आहे की, याच्या नावाने जड जड दगडही पाण्यावर सेतुबंधनाच्या वेळी
तरले १ असा हा रामप्रभू करणार नाही असे काय आहे ? त्याच्या पायांवर तुम्ही लीन का हो होत नाही ? २
याच रामाच्या पायाच्या स्पर्शाने अहल्या शिळा होऊन पडली होती, ती परत मनुष्यरूपास आली. ३ याच रामचंद्राने
वानरांच्या साह्याने सबंध लकेचे राज्य रावणापासून हिरावून घेतले व सीतेची मुक्तता केली ४
विवरण:- श्रीरामचंद्राच्या पावन व उद्बोधव चरित्रातील काही कथांचा उल्लेख तुकोवानी रामचरित्रपर
अभंगातून केलेला आहे सेतुबंधनास, रावणाशी लढण्यात वानराचे साहाय्य रामचंद्राना विशेष झाले असल्याचे प्रसिद्ध
आहे रामचंद्र वनवासास निघाल्यानंतर ज्या अनेक घटना झाल्या, त्यात अहल्येच्या उद्धाराची घटना महत्त्वाची होती.
रामाच्या चरणस्पर्शाने शिळा होऊन पडलेली, फत्तराप्रमाणे निर्विचार झालेली, अहल्या मनुष्य झाली, माणसात आली,
अशी कथा आहे अहल्या ही गौतम ऋषींची पत्नी ब्रह्मदेवाने ही आपली मानसकन्या गौतमास अर्पण केली इंद्र, अग्नी
वरुण इत्यादींचेही प्रेम हिच्यावर हान, इंद्राने गौतमाचे रूप धारण करून अहल्येचे पातिव्रत्य भग करण्याचा
प्रयत्न केला गौतमराग हे समजल्याने त्याने इंद्रास व अहल्येस दोघानाही शाप दिले अहल्या शिळा होऊन पडेल असा,
गौतमाचा शाप होता व प्रभू रामचंद्र जेव्हा बनात येतील, तेव्हा अहल्येचा उद्धार होईल असाही उ शाप तिला
मिळाला होता या संकेतानुसार प्रभू रामचंद्रांनी आपल्या पदम्पर्शाने शापित अहल्येचा उद्धार करून तिला मुक्त केले.
१०९८ राम म्हणता रामचि होइजे । पदीं बैसोन पदवी² घेइजे ॥ १ ॥
ऐसे सुख वचनीं आहे । विश्वासे अनुभव पाहे ॥ २ ॥
रामरसाचिया चवी । आन रस रुचती फेवीं ॥ ३ ॥
तुका म्हणे चाखोनि सांगे । मज अनुभव आहे अंगें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- आन-दुसऱ्या
अर्थ - या रामनामाचे माहात्म्य असे आहे की, जो कुणी त्याचा जप करितो तो स्वतःच रामरूप होऊन
जातो. १ असे अलौकिक सुख रामनामाच्या जपात आहे विश्वास ठेवून अनुभव घेऊन पाहा तुम्ही २ एकदा राम-
नामाच्या रसयसेची चव मिळाली की, मग दुसऱ्या चवींची आवडच संपून जाते ३ तुकाराम महाराज म्हणतात, हो
रामनामाची चव मी स्वतः चाखून पाहिली आहे मला स्वतःला जो अनुभव आला आहे, तोच मी तुम्हांस सांगत आहे ४
१०९९ रामराम उत्तम अक्षरें । कंठीं धरितीं आपण शंकरें ॥ १ ॥
केंसीं तारक उत्तम तिन्हीं लोकां । हळाहळ शीतळ केले शिवा देवा ॥ २ ॥
हाचि मत्र उपदेश भवानी । तिच्या चुकल्या गर्भादियोनि ॥ ३ ॥
जुनाट नागर नीच नये । तुका म्हणे म्या धरिले जीवें भावें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- हलाहल-हलाहल नावाचे उग्र विष, नीच-नित्य
१ व्हाना, पद पेविीजे
तु गाथा . ६२

४९० सार्थ तुकारामगाथा
अर्थ :- राम राम ही अक्षरे फार सामर्थ्यवान व उत्तम असल्यामुळेच शिवशंकरांनी आपल्या कंठात धारण
केली आहेत. १ ही अक्षरे उत्तम असून तीनही लोकांना तारणारी आहेत. शिवशंकरांना विषप्राशनामुळे जो त्रास
झाला, तो याच रामनामामुळे दूर झाला. त्यांच्या अंगाचा दाह रामनामामुळे थांबून शीतलता प्राप्त झाली. २ याच
राममंत्राचा उपदेश शिवांनो पार्वतीस केलेला असल्यामुळे, तिच्या अनेक जन्मांचे, गर्भवासाचे दुःख संपले. ३ तुकाराम
महाराज म्हणतात, अशी ही रामनामाची अक्षरे अत्यंत पुरातन असून पवित्र आहेत. शिवाय त्यांच्यात नित्य नवे
चैतन्य आहे; म्हणूनच मी हे मनोभावे धारण केले आहे. ४
११०० राम म्हणतां तरे जाणतां नेणतां । हो का यातिमलता कुळहीन ॥ १ ॥
राम म्हणतां न लगे आणीक सायास । केले महा दोष तेही जळती ॥ २ ॥
राम म्हणे तया जवळो नये भूत । फेंचा यमदूत म्हणतां राम ॥ ३ ॥
राम म्हणतां तरे भवसिंधुपार । चुके फेरझार म्हणतां राम ॥ ४ ॥
तुका म्हणे हे सुखाचें साधन । सेवीं अमृतपान एका भावें ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- यातिमलता- भलत्या जातीचा, कोणत्याही जातीचा
अर्थ - रामनामाचा उच्चार करिताच जाणते, नेणते सर्वचजण तरून जातात. कोणत्याही जातीचा अथवा
कुलहीन किंवा हीन कुळाचा असला तरी तो तरून जातो. १ रामनामाचा उच्चार करण्यास कसलाही त्रास पडत
नाही. काही महादोष आपल्या हातून घडलेले असतील, तर तेही जळून नष्ट होतात. २ रामनामाचा जप जर कुणी
करीत असतील, तर त्यांना भूतपिशाच्चाची बाधाही कधी होत नसते. रामनामाचा उच्चार करीत असताना यमदूतांचेही
काही चालत नाही. ३ रामनामाचा जप केल्यानंतर संसारसागर सहज तरून जाता येतो. रामनामाच्या उच्चारा-
मुळे जन्ममृत्यूंच्या फेऱ्या चुकतात ४ तुकाराम महाराज म्हणतात, असे हे रामनाम सुखाचे एकमेव साधन असून
एकनिष्ठ अशा भावाने या रामनाममृताचे सेवन सर्वांनी करावे. ५
११०१ पैल आला राम रावणासी सांगती । काय निदसुरा निजलासी भूपति ॥ १ ॥
अवघे लंकेमाजी जाले रामाचे दूत । व्यापिलें सयंत्र बाहेरी भीतरी आंत ॥ २ ॥
अवघे अंगलग तुझे वधियेले वीर । होई शरणागत किंवा युद्धासी सादर ॥ ३ ॥
तुका म्हणे एव्द्या भावें रामेंसी भेटी । करूनि घेई आता संबंधेंसी तुटी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - निदसुरा-अर्धवट झोपलेल्या, अज्ञानी, भूपती-रावण, अंगलग-जवळचे.
अर्थ -- रावणाचे दूत त्याला सांगू लागले, रामराय पलीकडेच येऊन उभे आहेत. अरे अर्धवट झोपलेल्या
अज्ञानी राजा रावणा, झोपून काय राहतोस ? उठ ना. १ या सर्व लंकेत जिकडे तिकडे रामाचेच दूत पसरून
राहिलेले दिसतात यांनीच सर्व लंका आतून बाहेरून व्यापलेली दिसते. २ तुझ्या जवळ शिरणारे मोठे मोठे वीर
पुरूष युद्धात मरण पावले आहेत तू त्या रामचंद्रास त्वरित शरण तरी जा, किंवा त्याच्याशी युद्धास तरी तयार हो. ३
तुकाराम महाराज म्हणतात, या दोन मार्गांपैकी एक असा की, एकचित्ताने तू रामाशीच भेट घ्यावीत व आपला
लौकिक प्रपंचाचा य ऐहिकाचा संबंध तोडून टाकायास. ४
११०२ समरंगणा आला । रामें रावण देखिला ॥ १ ॥
कैसे भेटतील दोन्ही । नांव सारुनियां रणीं ॥ २ ॥
प्रेमसुताचे संधान । बाणें निवारितो बाण ॥ ३ ॥
तुक्यास्वामी रघुनाथ । वर्म जाणोनि केली मात ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- समरंगणा-रणभूमीवर.

सार्थ तुकारामगाथा ४९१

अर्थ - रावण रणभूमीवर येऊन उभा राहिल्याचे प्रभू रामचंद्रांनी पाहिले १ या रणांगणावर आता
आपापली नावे विसरून हे दोघे एकमेकांना भिडतील २ परस्पराविषयी असणाऱ्या प्रेमसबधाच्या अनुसंधानामुळे
हे एकमेकांचे बाण निवारण करतील ३ तुकाराम महाराज म्हणतात, या रघुनाथाने रहस्य जाणून फार मोठा
पराक्रम केला ४
११०३ केला रावणाचा वध । अवघा तोडिला सबंध ॥ १ ॥
लकाराज्यें विभीषणा । केली चिरकाळ स्थापना ॥ २ ॥
औदार्याची सीमा । काय वर्णू रघुरामा ॥ ३ ॥
तुका म्हणे माझा दाता । रामें सोडविली सीता ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - चिरकाल-कायमची, दीर्घ कालपर्यंत
अर्थ - या रामप्रभूने मदमत्त रावणाचा वध केला व त्याच्या पूर्वकर्मांच्या सबंधापासून त्याला मुक्त केले १
नंतर लंकेचे राज्य रामचंद्राने विभीषणाला दिले त्या राज्यावर त्याची दीर्घकाळपर्यंत स्थापना केली २ या राम-
चंद्राच्या औदार्याची सीमा मी काय वर्णन करावी ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, असा हा माझा दाता प्रभू
रामचंद्र असून, त्याने सीतेची रावणाच्या बंदिवासातून मुक्तता केली ४
११०४ रामरूप केली । रामें कौसल्या माउली ॥ १ ॥
राम राहिला मानसीं । ध्यानीं चिंतनीं जयासी ।
राम होय त्यासी । संदेह नाहीं हा भरवसा ॥ २ ॥
अयोध्येचे लोक । राम जाले सकळीक ॥ ३ ॥
स्मरता जानकी । रामरूप जाले कपि ॥ ४ ॥
रावणेसी लंका । राम आपण जाला देखा ॥ ५ ॥
ऐसा नित्य राम ध्याय । तुका वंदी त्याचे पाय ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - कपि-वानर
अर्थ - अयोध्येस परत आल्यावर रामप्रभूंनी आपल्या कौसल्या मातेस रामरूप करून टाकले १ ज्याच्या
मनात सतत रामनाम आहे, ज्याच्या चिंतनात सतत रामनाम आहे, तो रामरूपासच जाऊन पोचेल, याविषयी कोणीही
संदेह धरू नये २ अयोध्येमधील सर्व प्रजाच रामरूप होऊन गेली ३ सीतादेवींचे व रामचंद्राचे स्मरण करता
करता सर्व वानरही रामरूप होऊन गेले ४ रावणाच्या लंकेतील सर्व राक्षसांनाही, या रामाचीच भीती एकसारखी
असल्यामुळे तेही रामरूपच बनून गेले ५ अशा प्रकारे नित्य जो रामनामाचे स्मरण करितो, त्याचे पायावर तुकाराम
महाराज डोके ठेवित्तांत ६
११०५ आनंदले लोक नरनारी परिवार । शंखभेरींतुरे वाद्याचे गजर ॥ १ ॥
आनंद जाला अयोध्येसी आले रघुनाथ । अवघा जयजयकार आळंगिला भरत ॥ २ ॥
फिरिती अक्षवाणे ओवाळिती रघुवीरा । लक्ष्मीसहित लक्ष्मण दुसरा ॥ ३ ॥
जाले रामराज्य आनंदलीं सकळें । तुका म्हणे गाईवत्से नरनारीबाळें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - अक्षवाणे-दिव्यांच्या आरतीने ओवाळण्याची मंगल क्रिया
अर्थ - रामचंद्र परत अयोध्येस आल्यानंतर सर्वत्र आनंद्दीआनंद झाला सर्व स्त्रीपुरुष नागरिक हर्षभरित
होऊन गेले शंख, भेरी, तुताऱ्या यांच्या जयनादांचा गजर झाला १ रघुनाथ अयोध्येस आल्यामुळे अवघ्या

आयोध्येत आनंदोआनंद होऊन गेला. सर्वत्र जयजयकार झाला. प्रभू रामचंद्रानी बंधू भरताला प्रेमाने आलिंगन दिले २
आयोध्येच्या नारी, रामलक्ष्मण व सीतामाई याना प्रीतीने ओवाळून ओक्षण करू लागल्या. ३ सर्वत्र रामराज्य
झाल्यामुळे आनंदी आनंद पसरला. गाई, वास्ने, स्त्री, पुरुष, मुले, सर्वांनाच आनंद झाला, असे तुकाराम महाराज
म्हणतात. ४
११०६ जाले रामराज्य काय उणे आम्हांसी । धरणीं घरी पीक¹ गाई वोळल्या म्हैसी ॥ १ ॥
राम वेळोवेळां आम्ही गाऊं ओविये । दळितां कांडितां जेवितां गे वाइये ॥ २ ॥
स्वप्नीं हो दुःख कोणी न देखे डोळां । नामाच्या गजरे भय सुटले काळा ॥ ३ ॥
तुका म्हणे रामें सुख दिलें आपुले । तयां गर्भवासी येणे जाणे खुंटलें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - वोळल्या-दूध देत्या झाल्या
अर्थ - आता रामाचे राज्य झाले असल्यावर मग आम्हास काय कमी आहे? पृथ्वीवर उत्तमपैकी पीक
वेळच्या वेळी येत राहिले. गाई म्हशी पुष्कळ दूध देत्या झाल्या १ आता या रामाचे ध्यान आम्ही आमच्या ओवीत
रोज रोज गाऊ दळताना, कांडताना, जेवण करिताना, याच रामनामाचा जप आम्ही करीत राहू. २ स्वप्नातसुद्धा
कुणासही दुःख दिसेनासे झाले. रामनामाच्या गजरामुळे प्रत्यक्ष यमासही भीतीने थरकाप सुटला. ३ तुकाराम
महाराज म्हणतात, या रामचंद्रानी आपले स्वसुख सर्वांना दिले असल्याने, त्याच्या गर्भवासाचे दुःख संपले आहे, असे
समजावे. जन्ममृत्यूच्या फेरा त्याना पडत नाहीत. ४
११०७ अहल्या जेणे तारिली रामें । गणिका परलोका नेली नामें ॥ १ ॥
रामहरे रघुराजहरे । रामहरे महाराजहरे ॥ २ ॥
कंठ शीतळ जपतां शूळपाणी । राम जपतां अविनाशभवानी ॥ ३ ॥
तारकमंत्रश्रवण काशी । नाम जपतां वाल्मीक ऋषि ॥ ४ ॥
नामजप बीजमंत्र नळा । सिंधु तरती ज्याच्या प्रतापें शिळा ॥ ५ ॥
नामजप जीवन मुनिजना । तुक्यास्वामी रघुनंदना ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - शूळपाणी-ज्याच्या हातात शूल आहे असा शंकर, भवानी-पार्वती
अर्थ - या रामनामाचे महत्त्व किती मोठे आहे पाहा या रामनामामुळे अहल्येचा उद्धार झाला. गणिका
याच नामामुळे उद्धरून गेली १ अशा या रामाच्या नावाचा, रामहरे रघुराजहरे असा जप एकसारखा करा ना. २
याच रामनामाचा जप केला, तेव्हा समुद्रमथनाच्या वेळी निघालेल्या हलाहल विषामुळे ज्याच्या कंठाची आग होत
होती, त्या महादेवाचा कंठ शीतल झाला याच रामनामाच्या जपामुळे पार्वतीदेवीसही अविनाशी पदाची प्राप्ती झाली. ३
काशीस राहून याच तारकमंत्राचा उच्चार केला असता, सर्वांचा उद्धार होतो. याच नामाचा जप वाल्मीकी ऋषींनी
करून स्वतःस पावन करून घेतले. ४ नळ नावाच्या वानरास हाच एक नाममंत्र बीजमंत्र म्हणून मिळाला होता.
याच रामनामाच्या सामर्थ्यामुळे समुद्रावर निर्जीव दगडसुद्धा तरले. ५ मुनिजनानाही याच रामनामामुळे जीवन
कृतार्थ वाटते. या तुकयाचाही स्वामी हाच थोरघुनंदन आहे ६
११०८ मी तो अल्प मतिहीन । काय वर्णूं तुझे गुण ।
उदकीं तारिले पाषाण । हे महिमान नामाचे ॥ १ ॥
नाम चांगले चांगलें । माझे कंठीं राहो भले ।
कपिकुळ उद्धरिले । मुक्त केले राक्षसां ॥ २ ॥
१ पिका

सार्थ तुकारामगाथा ४९३
द्रोणागिरि कपिहातीं । आणविला सीतापती ।
थोर केली ख्याति । भरतभेटीसमयीं ॥ ३ ॥
शिळा होती मनुष्य जाली । थोर कीर्ति वाखाणिली ।
लंका दहन केली । हनुमंतें काशानें ॥ ४ ॥
राम जानकीजीवन । योगियांचे निजध्यान ।
राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- मतिहीन-बुद्धीहीन, राजीवलोचन-कमळाप्रमाणे डोळे असणारा.
अर्थ :- माझी बुद्धी तर अतिशय तोकडी आहे. रामराया, मी तुझे वर्णन काय करावे ? पाण्यामध्ये दगड
तारण्याचे सामर्थ्य तुझ्या नामामध्ये आहे. १ रामचंद्रा, तुझे नाम अतिशय चांगले व पवित्र असल्याने ते नेहमी
माझ्या मुखात राहो. या तुझ्या नामानेच सर्व वानरकुळांचा उद्धार झाला असून राक्षसांनाही तूच मुक्त केलेस. २
हनुमंतांच्या हातून द्रोणागिरी पर्वत आणण्याचे महत्कार्य रामचंद्रा, तुम्हीच करविले. भरतभेटीच्या वेळी तुम्ही मोठीच
कीर्ती करून दाखविली. ३ गौतमाच्या शापाने दगड होऊन पडलेली अहल्या तुमच्याच प्रभावाने मनुष्यरूप झाली.
अशी तुमची कीर्ती अतिशय थोर व वाखाणण्यासारखी आहे. सर्व लंकेचे दहन रामचंद्रा, तुमच्याच बळावर हनुमंताने
केले. ४ असा हा श्रेष्ठ रामचंद्र सीतादेवीचे जीवनच असून योगीजनांचे ध्यान आहे. या रामाचे डोळे कमळांप्रमाणे
आहेत. हा तुकाराम त्याचे चरण मनापासून धरून ठेवीत आहे. ५
विवरण :-तुकाराम महाराजांनी गाइलेल्या या रामचरित्राचे महत्त्व विशेष आहे. श्रीविठ्ठल हे दैवत वारकरी
पंथीयांना व नामदेवतुकारामादी संतांना अतिशय प्रिय आहे. हे श्रीकृष्णाचे म्हणजे विष्णूचेच रूप होय. रामचंद्र
हाही विष्णूचाच अवतार होय. त्या दृष्टीने रामचंद्राचे व त्याच्या नामाचे माहात्म्य वारकरी संतांना विशेष वाटणे
स्वाभाविकच आहे. त्याच्या मंत्रात राम हेच नाम अगोदर आहे. 'राम कृष्ण हरि' या मंत्राची महिती मराठी
साधुसंतांनी व विठ्ठलभक्तांनी अनेक प्रसंगी गाइलेली आहे. तुकोबांनी या रामचरित्रपर अभंगातून रामाच्या
जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख केलेला आहे. वाल्मीकीच्या रामायणानंतर रामकथेवर इतरही कवीकडून
जे अनेक संस्कार झाले, त्याचा प्रभाव तुकोबांच्या मनावर असावा असे दिसते. रामनामानी जड दगड पाण्यावर
तरले, राम व रावण यांच्यात काही 'प्रेमसुखाचें संधान' असल्याने त्यांनी एकमेकांचे बाण बाणांनीच निवारण
केले. प्रभू रामचंद्राकडूनच आपणास मृत्यू येऊन आपणास मुक्ती मिळावी अशा हेतूने, विरोधी भक्ती करूनच रावण
रामचंद्राकडे आकर्षित झाला होता, वगैरे कल्पना पुढे भक्तीच्या क्षेत्रात बलवान ठरल्या. ऐतिहासिक वस्तुस्थितीच्या
दृष्टीने रामकथा पाहण्यापेक्षा, भक्तिभावाच्या परिपुष्टतेसाठीच त्या चरित्रकथेचा उपयोग पुढे पुढे होत राहिला.
अध्यात्मरामायणाचा प्रभाव भक्तिमार्गावर पुढच्या काळात विशेष रूपाने पडला असल्याचे स्पष्ट आहे
रावणाच्या वधानंतर रामचंद्रांनी स्वतः लंकेवर राज्य केले नाही. बंधू लक्ष्मण याजकडून त्यांनी रावणाचा
बंधू विभीषण याला राज्यावर बसविले ! हा भारतीय संस्कृतीचा एक आदर्श मानावयास हवा. कारण लंकेवर
स्वारी ही अन्यायाच्या परिमार्जनार्थ होती. मदोन्मत्त रावणशक्तीचा नाश करण्यासाठी तो एक महान प्रयत्न होता.
ऋषीमुनींचे यज्ञयाग सुरक्षित राहावेत व अबलांच्या शीलाचे रक्षण व्हावे, म्हणून ती एक योजना होती. स्वतःच्या
लहरीसाठी या बडेजावासाठी साम्राज्यविस्तार करण्याची ती महत्त्वाकांक्षा नव्हती, ती बेताल लालसा नव्हती.
मानवी संस्कृतीच्या इतिहासात 'लंकाराज्यें विभीषणा । केली चिरकाल स्थापना' हे एक लोकोत्तर व प्रगल्भ
मनाचे कृत्य मानावे लागेल. तुकोबांनी केलेल्या रामराज्याच्या सुखाच्या वर्णनासही रामायणात भरपूर आधार
सापडण्यासारखा आहे.
अभंगक्रमांक ११०७ मध्ये तुकोबांनी 'रामजप बीजमंत्र नळा' असा एक महत्त्वाचा उल्लेख केलेला आहे.
यातील नळ हा प्रसिद्ध नळ राजा न मानिता रामाच्या सैन्यातील एका वानराचे नांव नल होते, हाच संदर्भ महत्त्वाचा

४१४ सार्थ तुकारामगाथा

मानणे भाग आहे हवी ती वस्तू निर्माण करण्याची शक्ती याला वरप्रसादामुळे प्राप्त झालेली होती रामाच्या
आज्ञेवरून यानेच सेतूवधाचे काम पूर्ण केले, म्हणून या सेतूस नलसेतू असेही नाव आहे या नलाने जाह्नवी नदीत
एका ब्राह्मणाचे अनेक शालिग्राम विसर्जन केले होते त्यावेळी त्या ब्राह्मणाने 'तुझ्या हातून पाण्यात दगड तरतील'
असा वर त्याला दिला होता म्हणूनच याच्या हातून सेतू पूर्ण झाला
रामनाम हे बीजमंत्राने उपयुक्त आहे मनातील सर्व कामना या नामजपामुळे मिडीस जातात, अशुभाचे
निवारण होते, संकटाचा परिहार होतो, पातकाचा नाश होतो, प्रत्यक्ष यमाम दरारा वाटतो, वगैरे रामनामजपाचे
माहात्म्य संस्कृत, मराठी अशा ग्रंथातून पुष्कळानी वर्णन केले आहे 'एकैकमक्षर पुसा महापातकनाशनम् ' एकाच अक्षर
पापनाश करणारे आहे याचे वर्णन केले जाते अशा या रामनामाचा व रामजपाचा प्रभाव किती मोठा आहे, हे अनेक
ग्रंथातून व स्तोत्रातून प्रकट झालेले आहे रा या अक्षराचे रहस्य काय ? म या अक्षराचे रहस्य काय ? आकारातील
अर्धचंद्र व त्यावरील बिंदू यात 'राम ही अक्षरे कशी आहेत ? यासारख्या रहस्यमय वर्णनाचेही नमुने पुराणातून व
उपासनापर वाङ्मयातून पुष्कळ मिळतात ' श्रीराम' मधील श्री म्हणजे लक्ष्मी, राम म्हणजे आत्मा, जयजय म्हणजे
३६ या अंकाचा वाघ, ३६ म्हणजे छत्तीस तत्त्वानी युक्त असणारा हा देह, इत्यादी वर्णने मंत्रशास्त्रास धरूनही
पुष्कळानी केलेली आहेत
रामनामाचा मंत्रशास्त्रदृष्ट्या जो काय अर्थ होत असेल, तो कितीही महत्त्वाचा असला तरी, भागवत धर्मीय
संतानी त्याच्या जपाचे महत्व चित्तशुद्धीसाठी, स्वानुभवाच्या सुखासाठी, नामस्मरणाच्या आनंदासाठी रामनामाच
महत्त्व मान्य केले आहे याच हेतूने तुकोबानी 'रामनामाचे पोवाडे । अखंड ज्याची वाचा पडे । धन्य तो एक संसारी
रामनाम जो उच्चारी' (अभंग क्र ४४४१ ) अशा शब्दात रामनामाचे महत्त्व स्पष्ट केले आहे मागे ४१२
क्रमांकाच्या अभंगात 'रामनाम दोन्ही अक्षरें । सुलभ आणि सोपारें' म्हणून जो उल्लेख केलेला आहे तोही याच
संदर्भात महत्त्वाचा मानावा लागेल याच भूमिकेवरून साधुसंतानी रामाचे व रामनामाचे महत्त्व मानले आहे तो
विठ्ठलाहून वेगळा नाही त्याच्याच नावाशी रामनाम जोडून देऊन एकत्वाचाही बोध सहजगत्या देण्याचा प्रयत्न
संताचा होता दैवत नामरूपानी भिन्न असले तरी, बोधाने, तत्त्वरूपाने त्याचे स्वरूप एकच होते याच दृष्टीने एक
नाथानी 'भावार्थरामायणा' सारखा ग्रंथ लिहिलाच, 'श्रीरामनाममहिमा' असे एक स्वतंत्र प्रकरण रामनामाच्या
माहात्म्यासाठी लिहिलेले आहे त्यात 'सोपारे मंत्र राम अक्षरें दोन्ही । जपता चुके आयनी चौऱ्याशीची', 'सुख
रामनामें अपार । शंकर जाणे तोचि विचार', 'रामनाम उच्चार होतों । संसाराशी होय तुटी', 'धन्य मज रामनाम ।
उच्चारिता होय सकाम', 'जपता रामनामावळी । महादोषा होय होळी' यासारख्या अनेक ओळींतून एकनाथानी
रामाचे माहात्म्यकथन केले आहे 'रामकृष्णहरि' याच एका बीजभूत मंत्रात वारकरी पंथीयाची सर्व साधना
एकवटलेली आहे यातील मर्मही हेच होय की राम व कृष्ण हे एकच व त्याच्या नामजपाने नामस्मरणाने सर्व काही
साध्य होते, अशी त्याची निष्ठा होती ईश्वरापेक्षाही त्याच्या नामाचा महिमा कित्येकदा संतानी मोठा मानलेला आहे

श्लोकरूपी अभंग— ६

११०९ तुजवाचुनी मागणे काय कोणा । महीमंडळीं विश्वव्यापकजना ।
जीवभावना पूरवू कोण जाणे । तुजवाचुनी होत का रावराणे ॥ १ ॥
नसे मोक्षदाता तिहींमाजि लोका । भवतारकू तूजवाचुनि एका ।
मनीं मानसीं चिंता रूपनाम । पळे पाप ताप भयें नास' काम ॥ २ ॥
हरी नाम हे साच तूझें पुराणीं । हरीहातिचें काळगर्भादियोनी ।
करू मुखवाणी कैशी देशधडी । तुजवाचुनि वाणिता व्यर्थ गोडी ॥ ३ ॥

१ नासे काम

सार्थ तुकारामगाथा ४९५
भवभंजना व्यापका लोक तिन्ही । तुज वाणितां श्रमला शेषफणी ॥
असो भावे जीव तुझ्या सर्व पायीं । दुजें मागणें आणीक व्यर्थ काई ॥ ४ ॥
दिनानाथ हे साक्ष तूझी जनासी । दिनें तारिलीं पातकी थोर दोषी ।
तुका राहिला पांयि तो राख देवा । असे मागतसे तुझी चरणसेवा ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- महोमंडळी-भूतलावर, रावराणे-श्रीमंत, भवतारक-संसारसागरातून तारून नेणारा,
हरी-दुःख हरण करणारें, भवभंजना-संसारभावनेचा नाश करणारा, शेषफणी-शेष नावाचा नाग.
अर्थ :- देवा, तुझ्याशिवाय इतर कुणास आम्ही काय मागावे ? विश्वाला व्यापून राहणाऱ्या देवा, या
पृथ्वीवर तूच एक समर्थ असा आहेस. तुझ्यावाचून आम्हा जीवाच्या भावना कोण पुरवू शकणार रे देवा ? तुझ्याच
कृपेने लोक श्रीमंत राजे वगैरे होतात १ या तीनही लोकात देवा, तुझ्याशिवाय मोक्ष देणारा कुणीही नाही.
संसारातून तारणाराही तुझ्याखून कुणीही नाही. तुझ्या नामाचे व रूपाचे मनात चिंतन केले म्हणजे पाप व ताप
पळून जातात. तुझ्या भयाने कामादिक वृत्तीं उरत नाहीत २ दुख हरण करणारा म्हणून तुझे नाव हरी, असे जे
पुराणांत वर्णन केले आहे ते खरेच आहे. काळाच्या व गर्भादियोनींतून होणाऱ्या जन्माचा सर्व कारभार या श्रीहरीच्या
हातातच असतो. तुझ्या नामास न उच्चारिता देवा, ही माझी वाणी देशोधडीस कशी पाठवू ? तुझे गोड गोड जर तिने
वर्णन केले नाही तर सर्वच व्यर्थ आहे. ३ संसारवृत्तीचा नाश करणारा असा तू असून तिन्ही लोकांना तू भरून
राहिलेला आहेस तुझे वर्णन करताना शेष नावाचा नागही थकून गेला. हा माझा जीव सर्व भावानी तुझ्याच पायी
देवा, अर्पण केला आहे. याशिवाय दुसरे काही मागणे व्यर्थपणे मी कशासाठी करावे ? ४ देवा, तू दीनानाथ आहेस,
अशी साक्ष सर्व लोकांना पटलेली आहे. तू अनेक दीन, पातकी व दोषी असणाऱ्या लोकांचा उद्धार केला आहेस.
देवा, हा तुकाराम तुझ्या पायी शरण आला आहे, त्याचेही रक्षण करावेस तू, तो तुझी चरणसेवा मागीत आहे ५
१११० उभा भींवरेच्या तिरीं राहिलाहे । असे सन्मुख दक्षिणे मूस वाहे ।
महापातकांनो पळ कांप थोर । कैसे गर्जती घोष हे नामबीर ॥ १ ॥
गुणगंभीर हा धीर हास्यमुख । वदे वदनीं अमृत सर्वसुख ।
लागले मुनिवरा हे गोड चित्तीं । देहभावना तुटलियासि खंती ॥ २ ॥
ठसा घातला ये भूमिमाजी थोर । इच्छादाना हा धाययातो उदार ।
जया वोळगती सिद्धि सर्वठायीं । तुझें नाम हे चांगले गे विठाई ॥ ३ ॥
असे उघडा हा विटेवरि उभा । कटसूत्र हे धरुनि भक्तिलोभा ।
पुढें वाट दावी भवसागराची । थिटो माठली हे सिद्धसाधकांची ॥ ४ ॥
करा ये गुहा धरा पंथ आधीं । जया पार नाहीं सुज्ञा तेंच साधीं ।
म्हणे तुका पंढरीस सर्व आले । असे विश्व हे जीवनें त्याचि ज्यालें ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - भीवरेच्या-भिदरा नदीच्या काठावर, पळ काप-थरकाप, खंती-काळजी, वोळगती-
प्राप्त होतात, कटसूत्र-करगोटा, कटीवर हात ठेवून, ज्याले-जिवंत राहिले
अर्थ :- हा श्रीविठ्ठल देव भिवरा नदीच्या काठावर उभा राहिलेला असून त्याच्या समोरही भिवरा नदी
दक्षिणमुखी होऊन वहात आहे. याच्या नामामुळे महापातकांना सुद्धा मोठा थरकाप भरतो. या विठ्ठलाचे नामवीर,
नामघोष करणारे थोर पाहा कसा नामाचा घोष करीत आहेत. १ हा देव गुणगंभीर असून मोठ्या धैर्याचा आहे.
याच्या मुखावर हास्य आहे. अमृताप्रमाणे सुखदायक वाटणारे शब्द हा आपल्या मुखाने बोलत असतो सर्व मुनि-
श्रेष्ठांच्या चित्तात याचेच गोड रूप स्थिर झाले आहे. याची देहभावना सुटून सर्व काळज्या यांच्या दूर झाल्या आहेत. २
या भूतलावर हा मोठा थोर कीर्तिचा आहे, असा याचा गौरव सर्वत्र झालेला आहे. भक्तांना त्याच्या इच्छेप्रमाणे

४९६ सार्थ तुकारामगाथा
दान देण्यासाठी हा उदार असतो याच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त झालेल्या असतात विठाईमाउली,
तुझे नाम फारच चांगले आहे ग ३ हा विठ्ठल विटेवर उघडा होऊन उभा आहे त्याने आपले हात कमरेवर ठेविले
असून त्याला भक्तीचा लोभ मोठाच आहे भवसागरातून तरून जाण्याची पुढची वाट हा भक्तांना दाखवीत असतो
अनेक सिद्धांची व साधवांची ही विठाई माउलीच आहे ४ चला, लौकर त्वरा करून या पथाचा स्वीकार करा
ज्या सुखाला सीमा नाही, तेच सुख प्रथम साधा तुकाराम महाराज म्हणतात, या पंढरपुरांस सर्व प्रकारची सुखे
आलीच आहेत त्याच्यामुळेच हे विश्व जिवंत राहिलेले आहे ५
११११ धना गुंतले चित्त माझें मुरारी । मन घेउनी हिंडवी दारोदारीं ।
मरे हिंडता न पुरे यासि कांहीं । मही ठेंगणी परी ते तृप्त नाहीं ॥ १ ॥
न दिसे शुद्ध पाहाता निजमती । पुढे पडिलो इंद्रिया थोर घातीं ।
जिवा नास त्या संगतीं दड बेडी । हरी शीघ्र या दृष्टसंगासि तोडीं ॥ २ ॥
असों आणिके काय सांगो अनंता । मोहो पापिणी दृष्टमायाममता ।
क्रोध काम यातना थोर करी । तुजवाचुनी सोडवी कोण हरी ॥ ३ ॥
निज देखता निज हे दूरि जाये । निद्रा आळस दंभ या भीत आहे ।
तया वस्ति देहीं नको देउ देवा । तुजवाचुनी आणिक नास्ति हेवा ॥ ४ ॥
करों घात पात शंका लाज थोरी । असे सत्य भाव बहू भक्ति दूरी ।
नको मोकलूं दीनबंधु अनाथा । तुका वीनवी ठेवुनी पायि माथा ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - मुरारी-मुर नावाच्या दैत्याचा पराभव करणारा, श्रीकृष्ण, मही-पृथ्वी, दृष्टसंगासि-
दुष्ट अशा सोवतींस, नास्ती हेवा-हाव नसो, मोकलू-दूर सारू नकोस
अर्थ - हे मुरारी, माझे चित्त धनाच्या आशेत गुंतून राहिले आहे अशा या लोभी मनास बरोबर घेऊन
मी दारोदारी हिंडत आहे हिंडून हिंडून हे मरत आहे पण यास काही पुरे पडत नाही याची काही तृप्ती होत
नाही याच्या लोभापुढे सारी पृथ्वी ठेंगणी झाली तरी, हे तृप्त झालेले नाही १ माझी बुद्धी तशी पाहिली तर,
काही शुद्ध नाही इंद्रियसुखांच्या मोठ्याच संकटातही पुढे मी अडकून पडलो त्याच्या संगतीत माझ्या जीवाचा नाश
मात्र होत राहिला मोठाच घात झाला त्याच्या दडात व बेडीत फार त्रास झाला श्रीहरी, या दुष्ट संगतीस तू लौकर
तोडून टाकावेस २ अशा दशांचे आणखी अनंता, तुला काय सांगावे ? हा पापी मोह आणि ही पापिणी व दुष्ट माया
ममता यानी मला गांजले आहे फार काम क्रोध याच्याही यातना फार मोठ्याच आहेत या सर्वांतून श्रीहरी, तुझ्या
वाचून मला सोडविणार कोण आहे ? ३ निजसुखास मी पाहण्याची इच्छा करीत आहे, तो ते सुख दूर दूरच जात
आहे निद्रा, आळस, दंभ याना देवा, मी भीत आहे माझ्या या देहात त्याना वस्ती करू देऊ नकोस देवा, तुझ्या-
शिवाय मला आता दुसऱ्या कशाचीही हाव नाही ४ माझ्या मनात घातपाताची शंका येऊन मोठी लाज निर्माण
होत आहे माझ्यापासून भक्तिभाव व सत्यवृत्ती या गोष्टी दूर दूर होत आहेत असे वाटते दीनाचा बंधू असणाऱ्या
देवा, या अनाथास तू दूर सारू नकोस हा तुकाराम तुझ्या पायावर विनंती करून डोके ठेवीत आहे ५
१११२ पैल सायळें तेज पुंजाळ कंते । सिरों खुर्बिली साजिरीं मोरवीसे' ।
हरे त्यासि रे देखता ताप माया । भजा रे भजा यादवा योगिराया ॥ १ ॥
जया कामिनी लुब्धल्या सहस्रसोळा । सुकुमार ह्या गोपिका दिव्य बाळा ।
शोभे मध्यभागीं कळा चंद्रकोटी । रूपा मीनली साजिरी माळकंठीं ॥ २ ॥
१ मोरपीसें