सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 529, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ४८३
१०८२ खेळों लागलों सुरकवडी । माझी घोंगडी हारपली ॥ १ ॥
कान्होबाचे पडिलों गळां । घेईं गोपाळा देईं झाडा ॥ २ ॥
मी तों हारगे उघडा जालों । अवघ्या आलों बाहेरी ॥ ३ ॥
तुका म्हणे बुद्धि काची । नाहीं ठाणोची मजपाशीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - हारपली-हरवून गेली, काची-खोटी.
अर्थ :- देवा, सुरकबडीचा खेळ मी खेळू लागलो, तेव्हा माझ्या खांद्यावरची घोंगडी हरवून गेली. १ त्या
वेळी मी कान्होबाच्या गळ्यात पडून म्हणालो की, गोपालकृष्णा, तू माझी झडती घे व तूही तुझ्या अंगाची झडती
दे २ हा पाहा मी झडतीसाठी उघडा झालो आहे. सर्व उपाधी सोडून आलो आहे. सर्व वासनांतून मुक्त झालो
आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जवळ माझी मूळचीच बुद्धी काही खोटी नाही. ४
१०८३ घोंगडियांची एकी राशी । त्याचपाशीं तें ही होतें ॥ १ ॥
माझियाचा माग दावा । केला गोवा उगवों द्या ॥ २ ॥
व्हावें ऐसें निसंतान । घेइन आन तुजपाशीं ॥ ३ ॥
तुका म्हणे लहान मोठा । सांडा¹ ताठा हा देवा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- गोवा-गुंतवणूक, उगवो द्या-सोडवा, आन-शपथ
अर्थ :- देवा, तुझ्याजवळ अनेक लोकांच्या घोंगडयांचे डोंगऱ्या ढीग होते. माझेही हे घोंगडे तेथेच होते. १
देवा, माझा मार्ग मला दाखवा ना. ज्या गुंत्यात माझी गुंतवणूक झाली आहे त्यातून माझी सुटका करावी २ माझ्या
वासनांचे व देहरूपी घोंगडीचे निसंतान व्हावे, अशी शपथ मी तुझ्यापाशी घेत आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात,
देवा, तुम्ही हा लहानमोठेपणाचा ताठा सोडून द्यावा ४
१०८४ नाहीं तुझे उगा पडत गळां । पुढें गोपाळा जाऊं नको ॥ १ ॥
चाहाड तुझे वांचिन घरों । बोलण्या उरी नाहीं ऐसी ॥ २ ॥
तुम्हां आम्हां पडदा होता । सरला आतां सरोबरी ॥ ३ ॥
तुका म्हणे उरली गोठी । पडिली मिठी न सुटे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- उगा-उगाच, सरोबरी-बरोबरी, गोठी-हकीगत, गोष्टी
अर्थ :- देवा, गोपाळा, माझी घोंगडी तू घेतलीस, तेव्हा मी काही उगाचच गळ्यात पडलो म्हणून नव्हे.
गोपाळा, तू तसाच जाऊ नकोस १ तुझ्या बोलण्यात काहीच ताळतंत्र नाही असे तुझ्या घरी जाऊन सांगणारे
चहाडखोर मित्र मी तुला दाखवीन. २ आतापर्यंत तुमच्याआमच्यात मर्यादेचा व भेदाचा पडदा होता, तो आता
संपला. आता तुझीआमची बरोबरी झाली आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता ह्या भेदाच्या नुसत्या
गोष्टीच उरतील. आता तुमच्या पायाशी जी मिठी पडलो आहे, ती काही सुटणार नाही. ४
१०८५ तुम्हां आम्हां उरी तोंवरी । जनाचारी ऐसे तैसी ॥ १ ॥
माझें घोंगडें टाकून देईं । एके ठायीं मग असों ॥ २ ॥
विरोधानें पडे तुटी । कपट पोटीं नसावें ॥ ३ ॥
तुका म्हणे तूं जाणता हरी । मज वेव्हारीं बोलविसी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - जनाचारी-लोकव्यवहार, लोकाचार
अर्थ - तुमच्यात व आमच्यात जोपर्यंत भेद आहे, मर्यादा आहे, तोपर्यंतच लोकव्यवहार असा तसाच
राहणार. १ देवा, माझे घोंगडे टाकून द्या ना मग तुम्ही व आम्ही एकाच ठिकाणी असू. २ आपापसांत विरोध
१ सांडवा.