सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 525, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ४८१
तो त्यांची वाट एकसारखी पाहात असतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, कृपेचे दान देणारा हा देव भक्तांवर
कृपा करून त्यांच्या विषयी आपल्या प्रेमाची तृप्ती करीत असतो. ४
१०७६ अखंड तुझी जया प्रीति । मज दे त्यांची संगति ।
मग मी कमळापति । तुज नाणीं कांटाळा ॥ १ ॥
पडोन राहेन ते ठायीं । उगाचि संतांचिये पायीं ।
न मागें न करों कांहीं । तुझी आण विठोबा ॥ २ ॥
तुम्ही आम्ही पीडों ज्यानें १ । दोन्ही वारती एकानें ।
बैसलों धरणें । हाका देत दारेशीं ॥ ३ ॥
तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला ।
न पाहिजे केला । अवघा² माझा आव्हेर ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- नाणों-न आणी, आणणार नाही, आण-शपथ.
अर्थ :- देवा, तुझ्यावर ज्यांची अखंड प्रीती असते, त्या साधुसंतांची व भक्तांची संगत मला द्यावी. कमला-
पती, मग सारखे सारखे मागून मी तुला कंटाळा येईल असे काही करणार नाही १ त्या संतांच्या पायांजवळच
पडून राहीन. मी काही करणार नाही. काही मागणारही नाही. देवा, याविषयी त्या विठ्ठलाची शपथ आहे. २
तुमच्या दाराशी हाका देऊन सारखे धरणे धरल्याने तुम्हास व आम्हांस अशी दुहेरी पीडा होत असते; ती यामुळे
आता दूर होईल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा विठ्ठला, माझ्या या बोलण्याकडे लक्ष द्यावे आता. माझा त्याग
तुम्ही करु नये. ४
१०७७ पुनीत केलें विष्णुदासीं । संगें आपुलिया दोपी ॥ १ ॥
कोण पाहे तयांकडे । वीर विठ्ठलाचे गाढे ।
अशुभ त्यांपुढें शुभ होऊनिया ठाके ॥ २ ॥
प्रेमसुखाचिया रासी । पाप नाहीं ओखदासी ॥ ३ ॥
तुका म्हणे त्यांनीं । केली वैकुंठ मेदिनी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- पुनीत-पवित्र, ओखदासी-औषधालासुद्धा, मेदिनी-पृथ्वी.
अर्थ :- या विष्णुदासांनी आपल्या पावन संगतीने भोवतीच्या सर्व पातकी लोकांना पवित्र केले आहे १
आता यांच्याकडे वाकड्या नजरेने कोण पाहील ? कारण ते या विठ्ठलाविषयी प्रेम धारण करणारे शूर वीर आहेत.
जर काही अशुभ असेल तर ते होऊनच त्यांच्या पुढे उभे राहते. २ त्यांच्या समोर श्रीहरीच्या प्रेमाचे पर्वताच्या पर्वत
उभे असून पाप औषधाला सुद्धा उरत नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या संत पुरुषांनी सर्व पृथ्वीच वैकुंठ-
रूपाची करून टाकली आहे. ४
१०७८ जन³ देव तरी पायांचि पडावें । त्याचिया स्वभावें चाड नाहीं ॥ १ ॥
अग्नीचें सौजन्य शीतनिवारण । पालवीं बांधोनि नेतां नये ॥ २ ॥
तुका म्हणे विंचु सर्प नारायण । वंदावे दुरोन शिवों नये ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा :- चाड नाहीं-पाहू नये, ध्यानात धरू नये, पालवीं-पदरात.
अर्थ :- सर्व लोक ही देवाचीच स्वरूपे आहेत, असे असले तरी त्यांचे अवगुण ध्यानात न धरता त्यांच्या पायां
पडावे. १ असे असले तरी हेही ध्यानात ठेवावे की, अग्नीचे काम शीतनिवारण आहे. थंडी दूर करणे, हे अग्नीचे
१ जन, २ आता, ३ जग.
तु गाथा...६१