सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 524, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 524

४८० सार्थ तुकारामगाथा
१०७३ बुद्धीचा पालट धरा रे कांहीं । मागुता नाहीं मनुष्यदेह ॥ १ ॥
आपुल्या हिताचे न होती सायास । गृहदाराआसधनवित्त ॥ २ ॥
अवचितें निधान लागलें हे हातीं । भोगावी विपत्ति गर्भवास ॥ ३ ॥
यावें जावे पुढें ऐसेचि कारण । भोगावें पतन नरकवास ॥ ४ ॥
तुका म्हणे घरीं आठव या देहीं । नाही तरि कांहीं बरें नव्हे ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - मागुता-यानंतर, दारा-बायको.
अर्थ :- लोकहो, तुम्ही तुमच्या बुद्धीत काही तरी पालट करावा कारण यानंतर हा मनुष्यदेह मिळेलच
असे नाही. १ आपल्या आयुष्याचे सर्व बाजूनी हित होईल, असे काही प्रयत्न तुम्ही करीत नाही तुमचे चित्त रात्र-
दिवस घर, बायको, पैसा याच्या आशेतच गुरफटून राहिले आहे. २ अवचितपणे मनुष्यदेहाचा हा ठेवा तुमच्या
हाताशी आला आहे मग विनाकारण गर्भवासाची विपत्ती पुन पुन' का भोगावी ? ३ एकदा हा मनुष्यदेह संपला
की मग सारख्या जन्ममृत्यूच्याच फेऱ्या सुरू होऊन नरकवास मात्र भोगावा लागेल. ४ तुकाराम महाराज म्हणतात,
तेव्हा तू याच जन्मी नीट आठवण प्रभूची ठेव. नाहीतर पुढे काही ठीक होणार नाही ५
१०७४ आम्हीं पतितांनीं घालावें सांकडें । तुम्हा लागे कोडें उगवणें ॥ १ ॥
आचरतां दोष न धरूं सांभाळ । निवाड उकल तुम्हां हाती ॥ २ ॥
न घेतां कवडी करावा कुढांवा । पाचारिता देवा नामासाठीं ॥ ३ ॥
दयासिंधु नाम पतितपावन । हैं आम्हा वचन सांपडले ॥ ४ ॥
तुका म्हणे करूं अन्यायाच्या कोटी । कृपावंत पोटीं तूंचि देवा ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- साकडें-संकट, उगवणें-सोडवणे, मोकळे करणे, कुढावा-रक्षण, पाचारिता-बोलविता.
अर्थ - देवा, आम्ही पातकी लोकांनी नाना पापे करून तुम्हास संकटात टाकावे व तुम्ही आम्हास त्या
संकटांतून मुक्त करावे. १ अनेक प्रकारच्या दोषांचे आचरण करिताना आम्ही कधीच आम्हास जपणार नाही पण
त्यातून मोकळे करण्याचे काम मात्र देवा, तुम्हास करावे लागते. २ देवा, तुमचे नुसते नाव घेऊन जरी तुम्हास कोणी
हाक मारिली, तरी तुम्ही एका कवडीची किंमत न घेता त्याचे रक्षण करता ३ तुमचे नावच दयेचा सागर व
पतितपावन असे आहे. असे तुम्ही आमच्या भक्ताना जे सांगितले आहे, तेच वचन आमच्या हाती आहे ४ तुकाराम
महाराज म्हणतात, आम्ही अनेक कोटी अन्याय करू तरी सुद्धा देवा, तुम्ही कृपावत आहात तसेच, आमच्या
अनुभवास येईल. ५
१०७५ जो भक्ताचा विसावा । उभा पाचारितो धांवा ॥ १ ॥
हातीं प्रेमाचे भातुके । मुखीं घाली कवतुकें ।
भवसिंधू सुखें । उत्तरी कासे लावूनि ॥ २ ॥
थोर भक्ताची आस । पाहे भोवताली वास ॥ ३ ॥
तुका म्हणे कृपादानी । फेडी आवडीची धणी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - पाचारितो-बोलावितो, भातुके-खाऊ, वास-वाट, धणी-तृप्ती.
अर्थ:- हा देव भक्तांसाठी किती तत्पर असतो पाहा. भक्ताचा विसावाच असणारा हा देव उभे राहून
आपल्या भक्ताना जवळ बोलवितो तरी त्याच्याकडे धाव घ्यावी १ त्याच्या हातात प्रेमाचा खाऊ असून तो मोठ्या
कौतुकाने भक्ताच्या मुखात तो खाऊ घालण्यास उत्सुक आहे. आपली कास आथरून हा देव आपल्या भक्ताचे रक्षण
या संसारसागरातून करीत असतो. २ याला आपल्या भक्ताची आवड फार मोठीच आहे. भोवताली दृष्टी ठेवून