सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 537, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 537

सार्थ तुकारामगाथा ४९१

अर्थ - रावण रणभूमीवर येऊन उभा राहिल्याचे प्रभू रामचंद्रांनी पाहिले १ या रणांगणावर आता
आपापली नावे विसरून हे दोघे एकमेकांना भिडतील २ परस्पराविषयी असणाऱ्या प्रेमसबधाच्या अनुसंधानामुळे
हे एकमेकांचे बाण निवारण करतील ३ तुकाराम महाराज म्हणतात, या रघुनाथाने रहस्य जाणून फार मोठा
पराक्रम केला ४
११०३ केला रावणाचा वध । अवघा तोडिला सबंध ॥ १ ॥
लकाराज्यें विभीषणा । केली चिरकाळ स्थापना ॥ २ ॥
औदार्याची सीमा । काय वर्णू रघुरामा ॥ ३ ॥
तुका म्हणे माझा दाता । रामें सोडविली सीता ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - चिरकाल-कायमची, दीर्घ कालपर्यंत
अर्थ - या रामप्रभूने मदमत्त रावणाचा वध केला व त्याच्या पूर्वकर्मांच्या सबंधापासून त्याला मुक्त केले १
नंतर लंकेचे राज्य रामचंद्राने विभीषणाला दिले त्या राज्यावर त्याची दीर्घकाळपर्यंत स्थापना केली २ या राम-
चंद्राच्या औदार्याची सीमा मी काय वर्णन करावी ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, असा हा माझा दाता प्रभू
रामचंद्र असून, त्याने सीतेची रावणाच्या बंदिवासातून मुक्तता केली ४
११०४ रामरूप केली । रामें कौसल्या माउली ॥ १ ॥
राम राहिला मानसीं । ध्यानीं चिंतनीं जयासी ।
राम होय त्यासी । संदेह नाहीं हा भरवसा ॥ २ ॥
अयोध्येचे लोक । राम जाले सकळीक ॥ ३ ॥
स्मरता जानकी । रामरूप जाले कपि ॥ ४ ॥
रावणेसी लंका । राम आपण जाला देखा ॥ ५ ॥
ऐसा नित्य राम ध्याय । तुका वंदी त्याचे पाय ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - कपि-वानर
अर्थ - अयोध्येस परत आल्यावर रामप्रभूंनी आपल्या कौसल्या मातेस रामरूप करून टाकले १ ज्याच्या
मनात सतत रामनाम आहे, ज्याच्या चिंतनात सतत रामनाम आहे, तो रामरूपासच जाऊन पोचेल, याविषयी कोणीही
संदेह धरू नये २ अयोध्येमधील सर्व प्रजाच रामरूप होऊन गेली ३ सीतादेवींचे व रामचंद्राचे स्मरण करता
करता सर्व वानरही रामरूप होऊन गेले ४ रावणाच्या लंकेतील सर्व राक्षसांनाही, या रामाचीच भीती एकसारखी
असल्यामुळे तेही रामरूपच बनून गेले ५ अशा प्रकारे नित्य जो रामनामाचे स्मरण करितो, त्याचे पायावर तुकाराम
महाराज डोके ठेवित्तांत ६
११०५ आनंदले लोक नरनारी परिवार । शंखभेरींतुरे वाद्याचे गजर ॥ १ ॥
आनंद जाला अयोध्येसी आले रघुनाथ । अवघा जयजयकार आळंगिला भरत ॥ २ ॥
फिरिती अक्षवाणे ओवाळिती रघुवीरा । लक्ष्मीसहित लक्ष्मण दुसरा ॥ ३ ॥
जाले रामराज्य आनंदलीं सकळें । तुका म्हणे गाईवत्से नरनारीबाळें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - अक्षवाणे-दिव्यांच्या आरतीने ओवाळण्याची मंगल क्रिया
अर्थ - रामचंद्र परत अयोध्येस आल्यानंतर सर्वत्र आनंद्दीआनंद झाला सर्व स्त्रीपुरुष नागरिक हर्षभरित
होऊन गेले शंख, भेरी, तुताऱ्या यांच्या जयनादांचा गजर झाला १ रघुनाथ अयोध्येस आल्यामुळे अवघ्या