सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 536, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 536

४९० सार्थ तुकारामगाथा
अर्थ :- राम राम ही अक्षरे फार सामर्थ्यवान व उत्तम असल्यामुळेच शिवशंकरांनी आपल्या कंठात धारण
केली आहेत. १ ही अक्षरे उत्तम असून तीनही लोकांना तारणारी आहेत. शिवशंकरांना विषप्राशनामुळे जो त्रास
झाला, तो याच रामनामामुळे दूर झाला. त्यांच्या अंगाचा दाह रामनामामुळे थांबून शीतलता प्राप्त झाली. २ याच
राममंत्राचा उपदेश शिवांनो पार्वतीस केलेला असल्यामुळे, तिच्या अनेक जन्मांचे, गर्भवासाचे दुःख संपले. ३ तुकाराम
महाराज म्हणतात, अशी ही रामनामाची अक्षरे अत्यंत पुरातन असून पवित्र आहेत. शिवाय त्यांच्यात नित्य नवे
चैतन्य आहे; म्हणूनच मी हे मनोभावे धारण केले आहे. ४
११०० राम म्हणतां तरे जाणतां नेणतां । हो का यातिमलता कुळहीन ॥ १ ॥
राम म्हणतां न लगे आणीक सायास । केले महा दोष तेही जळती ॥ २ ॥
राम म्हणे तया जवळो नये भूत । फेंचा यमदूत म्हणतां राम ॥ ३ ॥
राम म्हणतां तरे भवसिंधुपार । चुके फेरझार म्हणतां राम ॥ ४ ॥
तुका म्हणे हे सुखाचें साधन । सेवीं अमृतपान एका भावें ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- यातिमलता- भलत्या जातीचा, कोणत्याही जातीचा
अर्थ - रामनामाचा उच्चार करिताच जाणते, नेणते सर्वचजण तरून जातात. कोणत्याही जातीचा अथवा
कुलहीन किंवा हीन कुळाचा असला तरी तो तरून जातो. १ रामनामाचा उच्चार करण्यास कसलाही त्रास पडत
नाही. काही महादोष आपल्या हातून घडलेले असतील, तर तेही जळून नष्ट होतात. २ रामनामाचा जप जर कुणी
करीत असतील, तर त्यांना भूतपिशाच्चाची बाधाही कधी होत नसते. रामनामाचा उच्चार करीत असताना यमदूतांचेही
काही चालत नाही. ३ रामनामाचा जप केल्यानंतर संसारसागर सहज तरून जाता येतो. रामनामाच्या उच्चारा-
मुळे जन्ममृत्यूंच्या फेऱ्या चुकतात ४ तुकाराम महाराज म्हणतात, असे हे रामनाम सुखाचे एकमेव साधन असून
एकनिष्ठ अशा भावाने या रामनाममृताचे सेवन सर्वांनी करावे. ५
११०१ पैल आला राम रावणासी सांगती । काय निदसुरा निजलासी भूपति ॥ १ ॥
अवघे लंकेमाजी जाले रामाचे दूत । व्यापिलें सयंत्र बाहेरी भीतरी आंत ॥ २ ॥
अवघे अंगलग तुझे वधियेले वीर । होई शरणागत किंवा युद्धासी सादर ॥ ३ ॥
तुका म्हणे एव्द्या भावें रामेंसी भेटी । करूनि घेई आता संबंधेंसी तुटी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - निदसुरा-अर्धवट झोपलेल्या, अज्ञानी, भूपती-रावण, अंगलग-जवळचे.
अर्थ -- रावणाचे दूत त्याला सांगू लागले, रामराय पलीकडेच येऊन उभे आहेत. अरे अर्धवट झोपलेल्या
अज्ञानी राजा रावणा, झोपून काय राहतोस ? उठ ना. १ या सर्व लंकेत जिकडे तिकडे रामाचेच दूत पसरून
राहिलेले दिसतात यांनीच सर्व लंका आतून बाहेरून व्यापलेली दिसते. २ तुझ्या जवळ शिरणारे मोठे मोठे वीर
पुरूष युद्धात मरण पावले आहेत तू त्या रामचंद्रास त्वरित शरण तरी जा, किंवा त्याच्याशी युद्धास तरी तयार हो. ३
तुकाराम महाराज म्हणतात, या दोन मार्गांपैकी एक असा की, एकचित्ताने तू रामाशीच भेट घ्यावीत व आपला
लौकिक प्रपंचाचा य ऐहिकाचा संबंध तोडून टाकायास. ४
११०२ समरंगणा आला । रामें रावण देखिला ॥ १ ॥
कैसे भेटतील दोन्ही । नांव सारुनियां रणीं ॥ २ ॥
प्रेमसुताचे संधान । बाणें निवारितो बाण ॥ ३ ॥
तुक्यास्वामी रघुनाथ । वर्म जाणोनि केली मात ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- समरंगणा-रणभूमीवर.