सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 530, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 530

वाढला म्हणजे विनाकारण अंतर निर्माण होते, म्हणून देवा, पोटात कधी कपट ठेवू नये. ३ तुकाराम महाराज
म्हणतात, श्रीहरी, तू स्वतः जाणता आहेस पण मला मात्र व्यवहारातील बोलणे करायला उगाच लावतोस ४
१०८६ मूळींचा तुम्हा लागला चाळा । तो गोपाळा न संडा ॥ १ ॥
घ्यावे त्याचे देणेचि नाहीं । येचि वाहीं देखतसो ॥ २ ॥
माझी तरी घोंगडी मोठी । गांठीची लंगोटी सोडिस ना ॥ ३ ॥
तुका म्हणे म्या सांडिली आशा । हुगिला फांसा येथुनिया ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - वाहीं-प्रवाह, ओघ, रीत
अर्थ - देवा, तुम्हांला मूळचीच सवय लागली आहे, ती काही तुम्ही सोडीत नाही. १ ज्याचे तुम्ही एकदा
घेता, ते कधी परत देतच नाही हाचं प्रवाह तुमच्या येथील मी पाहात आहे २ तू माझी भली मोठी घोंगडी घेतलींस
तेवढी, पण स्वतःची लंगोटीसुद्धा देत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी तर आता आशाच सोडली
आहे अशा प्रकारचा पाश मी हुसून टाकून दिलेला आहे ४
१०८७ घोंगडियास घातली मिठी । न सोडी साटी केली जीवे ॥ १ ॥
हा गे चोर घरा धावा कोणी । घरात राहाटे चहू कोनी ॥ २ ॥
नोळखवे म्या धरिला हातीं । देहा दीप माय लाविली वाती ॥ ३ ॥
न पावे धावणे मारितो हाका । जनाचारीं तुका नागवला ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - साटी केली-सोडून दिला, राहाटे-फिरता आहे
अर्थ - या देवाने माझ्या घोंगड्यासच मिठी मारली आहे हो जीव गेला माझा तरी तो आता सोडणार
नाही १ लोकांहो, हा एक चोरच माझ्या घरात शिरून चारही कोपऱ्यातून फिरतो आहे धावा हो धावा याला
कुणी तरी धरा हो २ मी माझ्या देहाचा दीप मायची वात करून प्रज्वलित केला आहे, तरी मी त्याला काही
ओळखू शकत नाही त्याला हातात मात्र पकडून ठेविले आहे ३ हा तुकाराम यामुळे लोकव्यवहारदृष्टीने नागवला
जात असून, रक्षणासाठी लोकांना हाक मारीत असून त्याच्या मदतीसाठी कोणीही धावून येत नाहीत ४
१०८८ आता मी देवा पांघरो काई । भिकेचे तेही उरेचि ना ॥ १ ॥
सदैव दुबळें नेणे चोर । देखोनि सुनाट फोडितो घर ॥ २ ॥
नाही मजपाशीं फुटकी फोडी । पाचांनीं घोंगडी दिली होती ॥ ३ ॥
तुका म्हणे जना वेगळें जाले । एकचि नेले एकल्याचे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - सदैव-गुर्देवीं श्रीमान, सुनाट-उघडे फोडी-कवडी, सुपारीचे खांड, पाचांनी-
पंचमहाभूतांनी
अर्थ - देवा, आता मी पांघरू तरी काय रे ? एक घोंगडी मी भिक्षा मागून आणली होती, तीही तू नेलीस
आता माझ्यापाशी काहीच उरले नाही १ चोर चोरी करताना श्रीमान, सुदैवी अथवा दरिद्री, दुबळा असा फरक
कधीच करीत नाही घर उघडे पाहिले की तो फोडतो व चोरी करून निघून जातो तसेच माझे झाले २ माझ्या
पाशी तसे पाहिले तर फुटकी कवडीसुद्धा नाही, मला तेवढीच एक पंचमहाभूतांनी देहरूपी घोंगडी दिली होती ३
तुकाराम महाराज म्हणतात, त्या एका परमेश्वराने माझी एकट्याची घोंगडी नेऊन मला लोकाचारातून वेगळे केले ४
१०८९ मी माझें करित होतो जतन । भीतरिल्या चोरे घेतले¹ खाने ॥ १ ॥
मज आल्याविण आधींच होता । मज न कळता मज² माझी ॥ २ ॥
१ घेतली खाण, २ मजपाशी