सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

९० सार्थ तुकारामगाथा
वांकुलिया ब्रह्मादिकां । उत्तम लोकां दाखवूं ॥ ३ ॥
तुका म्हणे भूमंडळीं । आम्ही बळी वीर गाढे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- कंठी-वाणीत, गळ्यात, कृष्णमणी-कृष्णाच्या नामाचा अलंकार, गाढे-प्रतापी.
अर्थ :- ज्याने आपल्या वाणीत कृष्णरूपी मण्याचा अलंकार धारण केलेला आहे त्याचा प्रकाश सर्व लोकांत
एकदम पसरतो. १ वैष्णवांच्या मेळाव्यात काल्याचा प्रसाद एकमेकांना वाटू. २ आणि या काल्याच्या सुखामुळे
ब्रह्मलोकादी जे श्रेष्ठ लोक आहेत त्यांनाही येथून वेडावण दाखवू. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या जगतात
आम्ही भक्तच मोठे बलवान असे प्रतापी वीर पुरुष आहोत. ४
१८० कवळाचिया सुखें । परब्रह्म जालें गोरखें ।
हात गोऊनि माप मुखें । बोटासांदीं लोणचें ॥ १ ॥
कोण जाणे तेथें । कोण लाभ कां तें । ब्रह्मादिकां दुर्लभ ॥ २ ॥
घाली हुमामा हुंबरी । पांवा वाजवी छंदें मोहरी ।
गोपाळांचे फेरी । हरि छंदें नाचतसे ॥ ३ ॥
काय नव्हतें त्या घरीं खावया । रिघे लोणी चोरावया ॥ ४ ॥
तुका म्हणे सर्वैं तया । आम्ही ही सांकलों ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- कवळ-घास, गोरर्खे-गुरे राखणारे, सोकलों-मोकावलो.

सार्थ तुकारामगाथा - ९१
शब्दार्थ व टीका :- गोवळों-गवळी, गुरे राखणारे, कांबळें-पांघरूण
अर्थ:-पुष्कळ काळ झाला, आम्ही त्या श्रीकृष्णाच्या संगतीत वावरणारे गुराखी आहोत. १ त्याच्या शिदोरीमधील भाताचा आम्हांस कधींच तोट येत नाही. त्याच्या संगतीनेच आम्ही जेवणही करतो. २ यानेच माझे पांघरुणही पुष्कळकाळापर्यंत पांघरले होते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आमचे असे काहीच नाही; सर्व काही त्या प्रभूचे, श्रीकृष्णाचेच आहे. ४
१८३ बहु बरा बहु बरा । यासांगातें मिळे चारा ॥ १ ॥
म्हणोनि जीवेंसाठों । घेतली कान्होयाची पाठी ॥ २ ॥
वरवा वरवा दिसे । समागम याचा निमिषें ॥ ३ ॥
पुढती पुढतो तुका । सोंकला सोंकवितो लोकां ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीका - वरवा-चांगला, निमिषें-क्षणभरही.
अर्थ - या श्रीकृष्णाची संगत फार चांगली दिसते. कारण याच्या संगतीत गाईगुरांना चाराही चांगला मिळतो. १ म्हणून माझ्या जीवाने या कान्होबाच्या पाठीमागे एकसारखे राहायचे ठरविले आहे. २ याचा सहवास एक क्षणभर जरी झाला तरी तो फारच चांगला वाटतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, पुढे पुढे तर मी याच्या संगतीसच चटावलो व तो लोभ इतरांनाही लाविला. ४
१८४ घेती पाण्यासों हुंबरों । त्यांचें समाधान करी ॥ १ ॥
ऐसी गोपाळांची सवे । जाती तिकडे मागें धांवे ॥ २ ॥
स्थिरावली गंगा । पांगविली म्हणे उगा ॥ ३ ॥
मोहरी पांवा काठी । तुका म्हणे याजसाठीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीका :- सवे-सवय.
अर्थ - हुंबरोचा खेळ करून करून यमुनेच्या पाण्याचा प्रवाहही थांबविण्यावा म्हणजे त्याच्या आवाजावर मात करण्याचा प्रयत्न ज्या गोपाळांनी केला त्याचे समाधान श्रीकृष्णाने केले. १ या गोपाळांची सवय त्या श्रीहरीला फार मोठ्या प्रमाणावरची असल्याने तो ते तिकडे जातील तिकडे जात असतो २ या गोपाळांच्या हुंबरोने व श्रीकृष्णाच्या मुरलीच्या स्वरांनी प्रत्यक्ष यमुना नदीही स्थिर झाली. ती वहायची थांबली; मग श्रीकृष्णाने पांगलेल्या सोबत्यांना उगे राहण्यास सांगितले ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवाने पावा, मुरली, काठी यांना या आपल्या भक्त गोपाळांसाठीच धारण केले आहे. ४
१८५ वळी गाई धावे घरा । आमच्या करी येरझारा ॥ १ ॥
नांव घेतां तो जवळी । बहु भला कान्हो बळी ॥ २ ॥
नेदी पडो उणें पुरें । म्हणे अवघेंचि बरे ॥ ३ ॥
तुका म्हणे चित्ता । वाटे न व्हावा परता ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीका - परता-दूर.
अर्थ - हा श्रीकृष्ण आमच्या इंद्रियरूपी गाई वळण्यासाठी आमच्या घरी धावत येतो व आम्हांस जवळ धरण्यासाठी याच्या सारख्या येरझारा चाललेल्या असतात. १ हा कान्हा फार बलवान असून चांगला आहे. तो त्याचे नाव घेताच आमच्याजवळ येतो २ तो आम्हांला काहीच उणे पडू देत नाही; सर्व काही चांगले आहे असेच तो म्हणतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, तो दूर व्हावा असे माझ्या चित्तास कधीच वाटत नाही. ४
१८६ म्हणती घालों धणीवरी । आतां न लगे शिदोरी ।
नये क्षणभरी । आतां यासि विसंबों ॥ १ ॥

९२ सार्थ तुकारामगाथा
चाल चाल रे कान्होबा खेळ मांडूं रानीं ।
बैसवू गोठणीं गाई जमा करुनि ॥ २ ॥
न लगे जावे घरा । चुकलीया येरझारा ।
सज्जन सोयरा । मायबाप तूं आम्हा ॥ ३ ॥
तुका म्हणे धाले पोट । आता कशाचा घोभाट ।
पाहाणे ते वाट । मागें पुढें राहिली ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - धाले-सतुष्ट झालो, घणोवटो-मालणावर
अर्थ - सर्व गोपाळ म्हणू लागले की आता या आमच्या प्रभूवर, स्वामीवर आम्ही पूर्णपणे संतुष्ट झालो
आहोत्त, आता आम्हांला दिवसोरीघोषुद्धा जरुरी नाही आता याला एक क्षणभरसुद्धा सोडता कामा नये १ अरे
कान्होबा आता चल ना, रानामध्ये जाऊन आपण आता चांगला खेळ मांडू सर्व गाई एकत्र करुन गोठणात बसवू २
आता घराकडे जाणे सुद्धा नको वाटते देवा तुझ्या संगतीत जन्ममृत्यूच्या येरझारो संपल्या तूच आता आमचा सज्जन,
सोयरा, मायबाप आहेस ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता आम्ही संतुष्ट झालो आहोत आता कसलीच
तक्रारही नाही मागची पुढची वाट पाहण्याचेही कारण उरले नाही ४
१८७ तुझिये संगति । जाली आमुची निश्चिति ॥ १ ॥
नाहीं देखिले तें मिळे । भोग सुखाचे सोहळे ॥ २ ॥
घरीं ताकाचे सरोवर । येथें नवनीताचे पूर ॥ ३ ॥
तुका म्हणे आतां । आम्ही न वजों दवडितां ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - न वजो-जाणार नाही
अर्थ - देवा तुझ्या संगतीत आम्हांला भरपूर सुख मिळून आम्ही निश्चित झालो आहोत १ जे सुख
आम्ही कधी पाहिलेही नाही ते आम्ही मिळविले आहे सर्व सुखाचे भोग आम्ही भोगले आहेत २ घरी आमच्या
ताक भरपूर आहे पण येथे कृष्णाच्या संगतीत मात्र चांगल्या लोण्याचे पूर आहेत ३ तुकाराम महाराज म्हणतात,
आता या श्रीहरीने आम्हांला दूर दवडिले तरी आम्ही जाणार नाही. ४
१८८ कामें पीडिलों माया । बहु मारी नाहीं दया ॥ १ ॥
तुझ्या राहिलों आधारें । जालें आपेपेचि बरें ॥ २ ॥
तुझे लागलो संगती । आता येतों काकुळती ॥ ३ ॥
तुका म्हणे तुझ्या भिडा । कान्होबा हे गेली पीडा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - कामें-वासनेन भिडा-भिडेन
अर्थ - आम्ही वासनेने फार त्रासलेलो होतो, तिच्या भाम्याखाली बंतगून गलो होतो तिला काही
दयामाया नाही १ पण देवा, आता तुझ्या आधाराने राहिलो तेव्हा मात्र सर्व काही ठीक झाले २ तुझ्या संगतीत
राहिलो म्हणूनच देवा, आता मोठ्या काकुळतेने आम्ही तुला विनवू शकतो ३ तुकाराम महाराज म्हणतात
कान्होबा, तुझ्या भिडेने आमच्यामागची सर्व पीडा नाहीशी झाली ४
टिपरी-अभंग ७
१८९ खेळ माडियेला वाळवंटीं घाईं । नाचती वैष्णव भाई रे ।
क्रोध अभिमान केला पावटणी । एक एका लागतोल पायीं रे ॥ १ ॥

नाचती आनंदकल्लोळीं । पवित्र गाणें नामावळी ।
कळिकाळावरि घातलीसे कास । एक एकाहूनी बळी रे ॥ २ ॥
गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा । हार मिरवती गळां ।
टाळ मृदंग घाई पुष्पवरुपाव । अनुपम्य सुखसोंहळा रे ॥ ३ ॥
लुब्धलीं नादीं लागली समाधी । मूढ जन नर नारी लोकां ।
पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सिद्धसाधकां रे ॥ ४ ॥
वर्णाभिमान विसरली याति । एकाएकां लोटांगणीं जाती ।
निर्मळ चित्तें जालीं नयनींतें । पाषाणा पाझर सुटती रे ॥ ५ ॥
होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे ।
तुका म्हणे सोपी केली पायवाट । उतरावया भवसागर रे ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा.- पावटणी-पायाखालची पायरी, अनुपम्य-ज्याला दुसरी तुलना नाही असा, महानुभाव-
श्रीचक्रधराच्या पंथातील साधक, अंबर-आकाश.
अर्थ:-या वाळवंटात भाई हो, वैष्णवांनी घाईघाईने खेळाला आरंभ केला आहे. नाचताना ते तल्लीन
झाले आहेत. या संतानी क्रोध, अभिमान वगैरे विकारांना पायांखालची पायरी करुन सोडले आहे. १ परमेश्वर-
प्रेमाच्या आनंदकल्लोळात ते नाचत असून त्याच्या पवित्र नामावळीचा जयघोष करुन गाणे गात आहेत. यांनी या
नामाच्या जोरावर प्रत्यक्ष यमावरही मात करण्यासाठी कास कसली आहे. एकापेक्षा एक बलवान असे हे वैष्णववीर
आहेत. २ यानी आपल्या अंगाला गोपीचंदनाची उटी लावली आहे. गळयात तुळशीच्या माळा घातलेल्या आहेत,
हारही घालून ते मिरवीत आहेत. आणि भजनाच्या निमित्ताने टाळ, मृदुंग, फुलांचा वर्षाव यांची एकच घाई उडत
आहे येथे. या सुखसोहळ्याचे वर्णनही करता येणार नाही. ३ या नामघोषाच्या नादास लुब्ध होऊन मूढ जनांपासून
सर्व स्त्रीपुरुषांचीच समाधी लागलेली दिसते. पंडित, ज्ञानी, योगी, महानुभावी, सिद्ध, साधक, यांचे चित्त एकतेने
ईश्वराशी जडलेलॆ दिसते. ४ प्रत्येकजण आपल्या वर्णाचा अभिमान, जातीचा अभिमान विसरून गेलेले आहेत; ते
एकमेकांची जात विसरून एकमेकांस लोटांगण घालतात; या प्रकारामुळे त्यांचे चित्त लोण्याहूनही मऊ व शुद्ध
बनले आहे. त्यांच्या संगतीने पाषाणासही प्रभुप्रेमाचा पाझर फुटणार आहे. ५ यांच्या ईश्वरनामाच्या गर्जनेने सारे
आकाश गर्जून राहिले असून हे वैष्णव वीर भक्तित्सुखाच्या नशेत जणू मत्त झालेले दिसतात; तुकाराम महाराज
म्हणतात, यांनी भवसागर तरून जाण्यासाठी भक्तीची ही सोपी अशी पाऊल वाटच तयार केलेली आहे ६
१९० एके घाईं खेळतां न पडसी डाईं । दुचाळचानें ठकसील भाई रे ।
त्रिगुणांचे फेरी थोर कष्टी होसी । या चोंघांची तरी घरीं सोई रे ॥ १ ॥
खेळ खेळोनियां निराळाचि राही । सांडी या विषयाची घाई रे ।
तेणेंचि खेळें बसवंत होसी । ऐसें सत्य जाणें माझ्या भाई रे ॥ २ ॥
शिंपियाचा पोर एक खेळिया नामा । तेणें विठ्ठल बसवंत केला रे ।
आपुल्या संवगडिया शिकवूनि घाईं । तेणें संतांतर फड जागविला रे ।
एक घाईं खेळतां तो न चुकेचि फोडें । तया संत जन मानवले रे ॥ ३ ॥
ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा । सोपान आनंदें खेळती रे ।
कान्हो गोवारी त्यांनों बसवंत केला । आपण भोंवतीं नाचती रे ।
सकळिकां मिळोनि एकी च घाईं । त्याच्या ब्रह्मादिक लागती पायीं रे ॥ ४ ॥
रामा बसवंत कबीर खेळिया । जोडा बरवा मिळाला रे ।

९४ सार्थ तुकारामगाथा

पांचां संवगडिया एकचि घाई । तेथें नाद वरवा उमटला रे ।
ब्रह्मादिक सुरवर मिळोनियां त्यांनीं । तो हो खेळ निवडिला रे ॥ ५ ॥
ब्राह्मणाचा पोर खेळिया एका भला । तेणें जन खेळकर केला रे ।
जनार्दन बसवंत करूनियां । तेणें वैष्णवांचा मेळ मेळविला रे ।
एकचि घाई खेळतां खेळतो । आपणचि बसवंत जाला रे ॥ ६ ॥
आणीक खेळिये होउनिया गेले । वर्णावया वाचा मज नाहीं रे ।
तुका म्हणे गढे हो हुशारुनि खेळा । पुढिलांचि धरूनियां सोई रे ।
एकचि घाई खेळतां जो चुकला । तो पडेल संसारडाई रे ॥ ७ ॥

शब्दार्थ व टीपा - दुचाळपानें-द्वैताच्या भावनेने, बसवंत-उपास्य दैवत, संक्तर-स्वतंत्र.

अर्थ - एकत्वाच्या भावनेने, अद्वैताच्या वृत्तीने तू जर खेळ खेळलास तर मग मात्र संसाराच्या डावात
किंवा चवरात तू सापडणार नाहीस. द्वैताच्या भावनेने खेळशील तर भाई, फसशील रे बाबा. तू यामुळे सत्त्व रज, तम
या त्रिगुणांच्या चवरात सापडून फारच कष्टो होशील. म्हणून पुढे दिलेल्या चौघांची उदाहरणे नीट ध्यानात धरून तू
वाग १ जगातील संसाराचा जरी तू खेळ खेळलास तरी तू अलिप्त राहा बाह्य विषयांची भारी संगत तू सोडून दे.
अशाच खेळामुळे तू प्रत्यक्ष ईश्वर होऊन जाशील हे माझे सत्यवचन भाई, तू नीट समजावून घे. २ पंढरपुरात
एका शिंप्याचा पोर नामदेव नावाचा एक थोर खेळगडी होऊन गेला त्याने श्रीविठ्ठलासचे आपले आराद्य दैवत
बनविले व आपल्या सर्व सोबत्यांना याच मार्गाची त्याने शिकवण दिली व वारकरी पथाचा स्वतंत्र फड पंढरीच्या
वाळवंटात निर्माण केला याने एकत्वाच्या वृत्तीने खेळ खेळल्यामुळे त्याची कुठेच फसवंत झाली नाही, की तो कुठे
चुकला नाही. त्यामुळे त्याला मत लोकही मान्य झाले ३ ज्ञानदेव, मुक्ताबाई, चांगदेव वटेश्वर, सोपानदेव यांनी
आनंदाने खेळ सुरू करून कान्होबा गवळी यास आपले उपास्य दैवत बनविले. त्याच्या भोवती फेर धरून ते नाचले.
त्या सर्वांना मिळून एवढमच आपल्या प्रभूविषयी आवड निर्माण झालेली पाहून ब्रह्मादिक देवही त्याच्या पायांवर
नम्र होण्यास तत्पर झाले. ४ प्रसिद्ध साधू कबीरदास याने रामचंद्रास उपास्य दैवत वरून खेळ करावा लाधला.
कबीर व राम याची जोडी फार चांगली जमली. या पाच सोंगड्यांनी खेळाची एवच घाई धरून ईश्वरभजनाचा
नाद फार श्रेष्ठ प्रकारचा निर्माण केला. ब्रह्मादी व श्रेष्ठ देव यांनी सर्व खेळात यांचा हा खेळच निवडला ५
पैठणच्या ब्राह्मणाचा पोर एकनाथ हा एक असाच थोर खेळगडी होऊन गेला ह्याने जनार्दनास खेळगडी बनविले
जनार्दन स्वामीस उपास्य दैवत बनविले व वैष्णवांचा मेळा पुनः जमा केला व एकच अशा खेळाच्या घाईत आपण
स्वतःच तो जनताजनार्दन स्वरूपी होऊन गेला ६ आणखीही पुष्कळ खेळगडी पोर थोर होऊन गेले; त्यांचे
वर्णनही करायला समर्थ अशी वाणी मजजवळ नाही. तुकाराम महाराज म्हणतात, गड्यांनो, चांगले सावध राहून
खेळ खेळा आधी होऊन गेलेल्या सत खेळाडयाचा मार्ग ध्यानात धरून खेळा एकच घाई करीत असताना जर
खेळगडी चुकला तर मात्र तो संसाराच्या डावात पुरता फसेल. ७

सार्थ तुकारामगाथा . १५
संप्रदायावर नामदेवाच्या भक्तितत्त्वाची छाप मोठी असून त्याच्या ग्रंथसाहेब या पवित्र ग्रंथात या नामदेवाची अनेक
पदे आहेत. या नामदेवाचा व तुकोबाचा संबंध प्रसिद्धच आहे नामदेवानी स्वप्नात दृष्टान्त देऊन आपली कवित्वाची
प्रतिज्ञा पूर्ण करण्याचा आदेश दिला असा एक प्रसिद्ध अभंग तुकोबाचा आहे
यानंतर तुकारामबुवानी ज्ञानदेव, सोपान-मुक्ताबाई याना थोर खेळगडी म्हणून उल्लेख केला आहे
ज्ञानदेव ( १२७५-१२९६ ) हे तर भागवत संप्रदायाचे आद्य संघटक यांनी गीतेवर मराठीत भाष्य लिहून संस्कृता-
मधील उच्च तत्त्वज्ञान प्रथम मोठ्या प्रमाणावर मराठी भाषेत आणले. यांच्या भावार्थदीपिकेसारखा तत्त्वज्ञानाचा,
भक्तीचा, काव्याचा ग्रंथ अजूनही झालेला नाही असे जाणते सांगतात याच भावार्थदीपिकेस ज्ञानदेवी किंवा
ज्ञानेश्वरी अशी लोकप्रिय नावे आहेत अनुभवामृत, चांगदेवपासष्टी अभंगरचना इत्यादी वाङ्मय ज्ञानदेवांचे म्हणून
प्रसिद्ध आहे यांनीच समकालीन संताचा मेळावा जमवून भक्तिमार्गाची पुनर्स्थापना केली याची भगिनी मुक्ताबाई
( १२७९-१२९७ ) हीही फार अधिकारसंपन्न अशी गाययित्री असून हिने आपल्या बोधाने प्रसिद्ध योगीपुरुष
चांगदेव यानाही आपले शिष्य बनविले आपल्या भावडानाही ही प्रसंगी उपदेश देत असे हिचे 'ताटीचे अभंग'
प्रसिद्ध असून त्यात भक्तीचा कळवळा व थोर तत्त्वज्ञान यांचे उत्कृष्ट दर्शन होते सोपानदेव ( १२७७-१२९७ )
हे निवृत्तिज्ञानदेवांचे धाकटे बंधू यांचेही परमार्थ-निरूपणावर काही अभंग प्रसिद्ध असून सोपानदेवी नावाची गीतेवर
एक समश्लोकी टीका यांची आहे चांगा वटेश्वर ( समाधी १३२५ ) हेही प्रसिद्ध तापीतीरचे योगीपुरुष वटेश्वर हे
स्वतंत्र न मानता चांगा वटेश्वर हे एकच मानून वटेश्वर हे त्यांच्या गुरूचे किंवा दैवताचे नाव मानण्याकडे संशोध-
काचा कल आहे या योगीपुरुषाने शेवटी भक्तिमार्गातील मुक्ताबाईंचे शिष्यत्व पत्करले .
कबीर ( पंधरावे शतक ) हे एक उत्तर भारतातील प्रसिद्ध सद्पुरुष होत यांच्यावर हिंदू व मुसलमान याचे
संमिश्र संस्कार असून नाथ संप्रदाय व सूफी पंथ याचीही थोडी छाप यांच्या विचारांवर दिसते यांचे उपास्य दैवत
राम. हा राम सगुण की निर्गुण असा वाद नेहमी उपस्थित होतो कारण दशरथाचा जो मुलगा रामचंद्र त्याहून माझ्या
रामाचे मर्म निराळेच आहे असे यांनी म्हटले आहे 'दशरथ सुत तिहूँ लोक बखाना । रामनामका मर्म है आना' अशी
यांची ओळ असली व 'निर्गुणं मेरा पीव' असा याचा पुकारा असला तरी सगुण भक्तीसही लाजवील असे प्रेम यांनी
निर्गुण रामावर केले आहे एकनाथ ( १५३१-१५९९ ) हे भागवत संप्रदायाचे सजीवन पैठणास राहात असत
ज्ञानेश्वरानंतरच्या काळात मुसलमानी राजवटीत जी सांस्कृतिक वाताहत झाली तीन ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ गुप्त
होण्याची वेळ आली तेव्हा ज्ञानेश्वरांच्या प्रेरणेने यांनी ज्ञानेश्वरीचे संशोधन केले रामायणभागवतावर ग्रंथरचना
केली ज्ञानेश्वरीच्या खालोखाल यांच्या भागवतास वारकरी संप्रदायात मान आहे यांची पदे व अभंग प्रसिद्ध आहेत
यांचे गुरू दौलतावाद येथील श्रीजनार्दनस्वामी यांचे भारूडवाङ्मय हे मराठीतील खरोखुरे लोकवाङ्मय असून
जनतेतील जनार्दन जागृत करण्यास या वाङ्मयाचा फार मोठा उपयोग होत राहिला आहे
१९१ बाराही सोळा गडियांचा मेळा । सतरावा बसवंत खेळिया रे ।
जतिस पद राखो जेणे टिपरिया घाई । अनुहाते वाद्ये मादळा रे ॥ १ ॥
नाचत पंढरिये जाऊं रे खेळिया । विठुल रखुमाई पाहू रे ॥ २ ॥
सा चहूँ वेगळा अठराही निराळा । गाऊ वाजवूं एक चाळा रे ।
विसरती पक्षी चारा घेणे पाणी । तारुण्य देहभाव वाळा रे ॥ ३ ॥
आनंद तेथिचा मुकियासि वाचा । बहिरे ऐकती कानी रे ।
आंधळयासि डोळे पांगळासि पाय । तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - जतीस-यतीचे, वाद्ये-ध्वनी, मादळ-मृदंग
अर्थ :- बारा अथवा सोळा खेळगड्यांचा समुदाय मिळवून सतरावा गडी प्रत्यक्ष श्रीकृष्ण देवच आहे रे
या टिपऱ्याच्या घाईगर्दीत यतीचे पद मात्र रक्षण करा येथे मृदंगाचा अनुहाताचा ध्वनी उमटत आहे. १ अरे

१६ सार्थ तुकारामगाथा
खेळगडघा, आपण नाचत नाचतच पढरपूरला जाऊ व तेथील विठ्ठलरखुमाईस डोळे भरून पाहू २ हा विठ्ठल सहा
शास्त्रे, चार वेद, अठरा पुराणे याच्याहून वेगळाच आहे त्यालाच आपण गाऊ व त्याच्याच रूपाचे स्मरण करू
याच्या नादाने पक्षीसुद्धा चारापाणी घेण्याचे विसरतात व तरुण स्त्रीपुरुष आपला देहभावही विसरून जातात ३
येथील आनंद काय वर्णन करावा ? येथे मुक्याला वाचा फुटते, बहिन्याला ऐकू येते, आधळयाना चांगले दिसू लागते
व पागळघासही पाय फुटतात तुकाराम महाराज म्हणतात या विठ्ठलाच्या नामगजरात म्हातारी माणसेही तारुण्याने
बेहोष होऊन जातात ४
१९२ दोन्ही टिपेरीं एकचि नाद । सगुण निर्गुण नाहीं भेद रे ।
कुसरी अंगें मोडितोल परी । मेळविति एका छंदें रे ॥ १ ॥
कांहींच न वजे वाया रे । खेळिया एकचि थसवंत अवघिया रे ।
सम विषम तेथें होऊंच नेदी । जाणऊनि आगळिया रें ॥ २ ॥
सत महंत सिद्ध खेळतील घाई । तेच सांभाळी माझ्या भाई ये ।
हात राखून हाणिती टिपन्या । टिपरे मिळोनि जाय त्याची सोई रे ॥ ३ ॥
विताळाचे अवघें जाईल वाया । काय ते शृंगारूनि काया रे ।
निवडूनि बाहेर काढिती निराळा । जो न मिळे सतांचिया घाई रे ॥ ४ ॥
प्रकाराचे काज नाहीं सोडी लाज । निःशंक होउनिया खेळें रे ।
नेणतों नेणतोंच एके पावलीं मान । विठ्ठल नामाचिया बळें रे ॥ ५ ॥
रोमाच गुडिया डोलविती अंगें । भावबळें खेळविती सोंगें रे ।
तुका म्हणे कठ सद्गदित वाटे । या विठोबाच्या अगसगें रे ॥ ६ ॥
शब्दार्थ य टीपा - नाद-ध्वनी, कुसरी-कौशल्यान, विताळ-चुकलेला बसूर टाळ
अर्थ - अरे सोंगड्यानो टिपऱ्या दोन असतात पण त्याचा नाद किंवा ध्वनी एकच असतो ना ? त्याप्रमाणेच
सगुण व निर्गुण ही दोन रूपे वेगळी दिसत असली तरी त्याच्यात भेद दिसतच नाही नृत्याच्या भरात नाना
कौशल्याने अग मोडून विविध भाव दर्शविले तरी त्या सर्वांचे लक्ष एका श्रीहरीकडेच असते १ खेळणाऱ्याचे काहीच
वाया जात नाही, सर्व खेळगडघाचे दैवत एकच असते या श्रेष्ठ ईश्वराकडे जेव्हा त्याचे लक्ष असते तेव्हा सम विषम
असा फरक उरतच नाही या भेदारोरीज असणाऱ्या परमेश्वरास तू जाण २ भाई, या ईश्वराच्या नादाने अनेक
सत, महत सिद्ध खेळ खेळतील, त्याच मार्गाने तूही खेळाचा रग सांभाळ रे स्वरूपरूपाचा हात राखून त्या साधु
सतानी टिपरीचा खेळ खेळला, नाही तर टिपरी मिळून त्याचा काय उपयोग ? ३ टिपरीचा किंवा टाळाचा ठेका
सुकून सारे वाया जाईल असे करू नकोस बाह्य शरीरशृगाराचा उपयोग काय रे ? साधुसगतीत जो मिसळून
जाणार नाही त्यास या मेळ्यातून निपटून बाहेर काढला जाईल ४ वेगवेगळया बाह्य रंगाचे किंवा डोलाचे काय
काम ? तू सर्व लज्जा सोडून, शका सोडून या खेळात भाग घ प्रथम न जाणणारी असतात पण पुढे या खेळात
विठ्ठलाच्या नामस्मरणामुळे एकात्वास पावतात ५ भावभक्तीच्या सामर्थ्यावर खेळ खेळणाऱ्या व नाना सोंगे धारण
करणाऱ्या भक्ताच्या अगावर भक्तिप्रेमाच्या रोमाच्याच्या गुढघा उभ्या राहतात तुकाराम महाराज म्हणतात, या
विठ्ठलाच्या अगसगामुळे भक्तिरसाने कठ भरून येतो ६
१९३ या रे गडे हो धरूं घाई जाणता हीं नेणता ।
नाम गाऊ टाळी वाहू आपुलिया हिता ॥ १ ॥
फावले तें घ्यारे आता प्रेमदाता पाडुरग ।
आजि दिवस सोनियाचा बोडवला रग ॥ २ ॥

सार्थ तुकारामगाथा १७
हिंडती रानोरान भुजंगांत कांटेघावन ।
सुख तपांहून आम्हां गातां नाचतां रे ॥ ३ ॥
तुका म्हणे ब्रह्मादिकां सांवळें दुर्लभ सुखा ।
आजि येथें आलें फुका नाम १मुखा कीर्तनीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- भुजंग-सर्प
अर्थ :- गडयांनो, कळो, न कळो, पण हरिनामाची ओढ धरू व आपलेच हित साधण्यासाठी टाळी वाजवू. १
आज जो लाभ होत आहे तो पदरात पाडून घ्या भक्तिप्रेमाचा दाता पांडुरंग कृपा करायला तत्पर आहे. आज
मोठा सोन्याचा दिवस उगवला असून भक्तिप्रेमाला रग चढला आहे. २ या रानावनात कित्येक ठिकाणी काट्यां-
कुट्यांतून, सर्पांच्या स्थानातून हिंडणे झाले तरी त्यातही या प्रभुप्रेमाचे सुख काही वेगळेच व अद्वितीय असे आहे
अशा अवघड ठिकाणी जाण्यापेक्षा हरिनामात दंग होणे अधिक चांगले नाही का ? ३ तुकाराम महाराज म्हणतात,
या सावळ्या श्रीकृष्णाचे सुख ब्रह्मादिकांनासुद्धा दुर्लभ आहे. पण आज येथे कीर्तनात व नामस्मरणात सहजासहजी
फुकट हे सुख मिळत आहे ते का नाही घेत ? ४
१९४ भीमातीरीं एक वसलें नगर । त्याचे नाव पंढरपुर रे ।
तेथील मोकासी चार भुजा त्यासी । बाइला सोळा हजार रे ॥ १ ॥
नाचत जाऊं त्याच्या गांवा रे खेळिया । सुख देईल विसावा रे ।
पुढें गेले ते निधाई जाले । वाणितील त्याची सीमा रे ॥ २ ॥
वळियां आगळा पाळी लोकपाळां । रीघ नाहीं कळीकाळा रे ।
पुंडलीक पाटील केली फुळवाडी । तो जाला भवदुःखा वेगळा रे ॥ ३ ॥
संतसज्जनों माडिलीं दुकानें । जया जें पाहिजे तें आहे रे ।
भुक्तिमुक्ति२ फुकाच साठीं । कोणी तयाकडे न पाहे रे ॥ ४ ॥
दोन्हीच हाट भरले घनदाट । अपार मिळाले वारकरी रे ।
न वजो म्हणती आम्ही वैकुंठा । जिहीं देखिली पंढरी रे ॥ ५ ॥
बहुत दिस होती मज आस । आजि घडले सायासों रे ।
तुका म्हणे होय तुमचेनी पुण्यें । भेटी तया पायांसीं रे ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- मोकासी-मालक, इनामदार, निधाई-संतुष्ट, हाट-बाजार
अर्थ - भीमा नदीच्या काठावर एक नगर वसले आहे रे. त्याचे नाव पंढरपूर असून तेथील मालक जो
श्रीकृष्ण किंवा विठ्ठल आहे त्यास चार हात असून सोळा हजार स्त्रिया आहेत १ गड्यांनो, आपण हसत, नाचत
त्याच्या गावी जाऊ तो आपणास सुखाचा विसावा देईल या मार्गाने जे आधी गेले त्याची चांगलीच तृप्ती झाली.
त्याचे वर्णनही करता येणे शक्य नाही २ या ठिकाणचा मालक अतिशय बलाढ्य असून लोकांचे रक्षण करणारा
आहे येथे यमाच्या दूताना शिरकाव करण्यास वावच नाही येथील पाटील पुंडलीक असून त्याने देवाच्या शेतवाडीची
फुलवाडी केली आहे. त्याने भक्तांना संसाराच्या दुःखातून मोकळे केले आहे ३ या क्षेत्रात साधुसंतानी व सज्जनानी
आपापली भक्तीची दुकाने मांडली आहेत ज्याला जे हवे ते इथे आहे भोग व मोक्ष हे येथे गुलाममुखी व फुकटात
मिळतात. पण त्यांच्याकडे कुणीच कसे पाहात नाही रे ? ४ वर्षातून दोनदा आषाढी व कार्तिकी एकादशीस या
ठिकाणी फार मोठे बाजार भरतात व या निमित्ताने अनेक वारकरी जमा होतात. हे वारकरी म्हणतात की, आम्ही
१ सुखा, २ मुक्ति भुक्ति तेथें
तु गाथा १३

या पंढरीपुढे वैकुंठालासुद्धा जाण्याचे भय करणार नाही ५ तुकाराम महाराज म्हणतात, मलाही हे सुख पाहण्याची
पुष्कळ दिवसाची इच्छा होती ती आज मोठ्या प्रयत्नाने सत हो, तुमच्या पुण्याईने सफल होत आहे त्याच्या
पायाची भेट आज होत आहे ६
विवरण - या एका उत्कृष्ट अभंगात तुकारामबुवा पंढरपूर क्षेत्राचे मोठ्या डौलाने रूपकात्मक अस वर्णन
करीत आहेत भीमेच्या तीरावरचे हे गाव पंढरपूर तेथील मालक श्रीविठ्ठल व त्याचा कुळवाडी किंवा पाटील
पुंडलीक आहे संत सज्जनांनी येथे भगवद्भक्तीच्या पेठा बसविल्या असून आषाढीकार्तिकीस येथे मोठेच बाजार
भरतात अशा डौलदार भाषेत तुकारामबुवानी पंढरीचे माहात्म्य या अभंगात चटमदार पद्धतीने रंगविले आहे
अभंग क्र ११३ वरील विवरणात पंढरपूरच्या ऐतिहासिक व पौराणिक महत्त्वाचे विवेचन विस्ताराने केले असून
पंढरपूरच्या चंद्रभागा नदीस भीमा, भिवरा अशीही नावे असून यथेच पुंडलीकाने भक्तांसाठी विठ्ठलास स्थिर केले
अशी कथा आहे
या भीमा नदीचेही माहात्म्य पुराणातून सांगितले आहे त्रिपुरासुराच्या नाशाच्या वेळी जे धम झाले त्यातून
शंकराच्या कृपेने ही भीमा नदी निर्माण झाली ही भीमा फारच भयंकर स्वरूपाची होती, पण क्षेत्रस्थ लोकांनी
भैरवाची प्रार्थना करून या भीमा नदीस शांत केल पांडुरंगकृपेने ही भीमा येथे शांत झाली भीमा नदी ही वारकऱ्याना
गंगेपक्षाही श्रेष्ठ व पवित्र वाटत हिलाच पुढे चंद्रभागा असे नाव असून पापनाशन अशी सर्व तीर्थे तिच्यात आहेत
अशी भाविकांची श्रद्धा आहे या भीमातीरावरच आईबापाच्या सेवेत रमलेल्या पुंडलिकाने श्रीविठ्ठल देवास विटेवर
उभ केल्याची कथा प्रसिद्धच आहे
१९५ पंढरी चोहटा मांडियेला खेळ । वैष्णव मिळोनि सकळ रे ।
टाळ टिपरी मादळे एक नाद रे । जाला बसवंत देवकीचा बाळ रे ॥ १ ॥
चला ते कवतुक भाई रे । पाहो डोळा कामी गुंतलेति काई रे ।
भाग्यवंत कोणी गेले सांगाति । ऐसे सुख त्रिभुवनी नाहीं रें ॥ २ ॥
आनंदाचे वाद सुखाचे संवाद । एक एका दाखविती छंद रे ।
साहो अठरा चारी घालुनियां घाई । नाचती फेरी टाळशुद्ध रे ॥ ३ ॥
भवतांचीं भूषणे मुद्रा आभरणे । शोभती चंदनाच्या उट्या रे ।
सत्य सुंदर कास घालूनी फुसरी । गर्जती नाम बोभाटीं रे ॥ ४ ॥
हरि हर ब्रह्मा तीर्थासहित भीमा । देव कोटी तेहतीस रे ।
विस्मित होऊनि ठाकले सकळ जन । अमरावती केली ओस रे ॥ ५ ॥
वाणितील थोरी वैकुंठीची परी । न पवे पंढरीची सरी रे ।
तुकयाचा दास म्हणे नका आळस करूं । सांगतो नरनारींस¹ रे ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - चोहटा-बाजार चव्हाटा, आभरणे-अलंकार अमरावती-इंद्राची नगरी
अर्थ - या पंढरपूरच्या चव्हटाच्या बाजारपेठेत भक्त वैष्णवानी हा भक्तीचा खेळ मांडलेला आहे
आणि याचे उपास्य दैवत देवकीचा बाळ श्रीकृष्ण झाला आहे रे १ बंधूनो, चला त्या वाळवंटात जाऊ य डोळ्यानी
ते कौतुक पाहू दुसऱ्या कामात तर गुंतलेले नाहीस ना तुम्ही ? जे त्याच्या संगतीत गेले ते खरोखरच भाग्यवान
ठरले त्यांना मिळालेले सुख त्रिभुवनात दिसणार नाही २ या ठिकाणी वादविवादही मोठ्या आनंदाचे व सवाद
सुखाचे होतात एकमेव एकमेकांना आपापले छंद दाखवितात सहा शास्त्रे, चार वेद, अठरा पुराण घाईत यातूनही
याचा बोध होणार नाही तो एका टाळाच्या व नाचाच्या फेरीत शुद्धत्वाने होईल ३ कपाळावर मुद्रा हीच भक्तांची
भूषणे व अलंकार होत त्याच्या अंगावरील चंदनाची उटी त्यांना शोभून दिसते या भक्तॉनी सत्याची सुंदर कास
१ नारीबाळास

सार्थ तुकारामगाथा ९९
मोठ्या कौशल्याने घातलेली असते, आणि मोठघाने नामाची गर्जना ते करीत असतात. ४ या क्षेत्रात हरी, हर, व
ब्रह्मदेव यांच्या बरोबर सर्व तीर्थासह भीमा नदी असून तेहतीस कोटी देवाची वस्तीही येथेच आहे या क्षेत्रातील
सर्व थाट पाहून सर्वजण विस्मित होतात व त्यांना देवाची नगरी अमरावतीही ओस पडली असे मनापासून वाटते. ५
लोक वैकुंठाची थोरवी वर्णन करीतात, पण त्याची बरोबरी पंढरपुराशी कधीच होणार नाही. तुकाराम महाराज
म्हणतात, स्त्रीपुरुपानो, कसलाही आळस न करता या पंढरपूरच्या विठ्ठलावर चित्त ठेवा. ६
१९६ ब्रह्मादिकां न कळे खोळ । ते हे आकळ धरिली ॥ १ ॥
मोहरी पांवा वाहे काठी । धांवे पाठीं गाईंचे ॥ २ ॥
उच्छिष्ट न लभे देवा । तें हे सदेवां गोवळ्यां ॥ ३ ॥
तुका म्हणे जोड झाली । ते हे माउली आमुची ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- खोळ-पांघरुण, आकळ-न कळण्यासारखा.
अर्थ :- या श्रीकृष्णाच्या रूपाची ओळख ब्रह्मादिकांनाही होत नाही. या विठ्ठलाने न कळण्यासारखे पांघरुण
जणू घेतले आहे. १ याच्या हातात पावा, मुरली व काठी असून तो गाईंच्या पाठीमागे धावत असतो. २ याच्या
उष्टघासाठी देवादिप प्रयत्न करतात, पण त्यांनाही ते मिळत नाही. पण या गोपाळांना मात्र नेहमीच ते मिळत
राहते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मोठ्या भाग्याने याची जोड होऊन ही थोर माऊली आम्हास मिळाशी आहे. ४
१९७ कान्होबा तूं आलगट । नाहीं लाज बहु धीट ।
पाहिले वाईट । बोलोनिया खोटें ॥ १ ॥
परि तूं न संडिसी खोडी । करिसी केली घडीघडी ।
पाडिसी रोकडी । तुटो माये आम्हांसी ॥ २ ॥
तूं ठायींचा गोवळ । अविचारी अनर्गळ ।
चोरटा शिंदळ । ऐसा पिटूं डांगोरा ॥ ३ ॥
जरी तुझी आई । आम्ही घालूं सर्वा ठायीं ।
तुका म्हणे तेंही । तुज वाटे भूषण ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - आलगट-दांडगा, खोडकर, अनर्गळ-स्वच्छंदी.
अर्थ :- कान्होबा, तू मोठा दांडगा असून तुला काही लाजलज्जा नाही तू फारच धीट आहेस तुला आम्ही
वाईट बोलून पुष्कळ पाहिले. १ पण तू आपली खोड काही सोडीत नाहीस. जे आजवर केलेस तेच पुनः पुनः आत्ताही
करीत आहेस. अशा या तुझ्या करण्याने तू तुझ्याआमच्यांत अंतर मात्र पाडशील हे ध्यानात धर. २ खरे म्हणजे
तू मूळचा गवळीच. अगदी अविचारी व स्वच्छंदी आहेस. तू पक्का चोर आहेस, वाईट चालीचा आहेस असा तुझा
लौकिक आम्ही सर्वत्र पसरवू. ३ जरी तुझी आई सर्वांच्या खाली घातली तरी तेही तुला भूषणच वाटेल असे
वाटते. ४
१९८ भोजनाच्या काळों । कान्हो माडियेली आळी ।
फाला करी वनमाळी । अन्न एकवटा ।
देईं निवडुनी । माते म्हणतो जननी ।
हात पिटूनि मेदिनी । वरि अंग घाली ॥ १ ॥
कंसा आळी घेसी । नव्हे तेचि करविसी ।
घेईं दुसरे तयेसी । यारी म्हणे नको ॥ २ ॥

१०० | सार्थ तुकारामगाथा
आता काय करू । नये यासि हाणू मारूं ।
नव्हे बुझाविता स्थिरु । काहीं करीना हा ।
त्याचि केले एके ठायी । आता निवडूनि खाईं ।
आम्हा जाचितोसी काई । हरिसि म्हणे माता ॥ ३ ॥
त्याचे तयाकुन । करविता तुटे भान ।
तब जाले समाधान । उठोनिया बैसे ।
माते बरें जाणविले । अग चोरूनि आपुलें ।
तोडियले एका बोले । कैंसे सुखदुःख ॥ ४ ॥
ताट पालवे झाकिले । होतें तैसे तेथें केले ।
भिन्नाभिन्न निवडिले । अन्नें वेगळालीं ।
विस्मित जननी । भाव देखोनिपा मनीं ।
म्हणे नाहीं ऐसा कोणी । तुज सारिखा रे ॥ ५ ॥
हरुषली माये । सुख अगीं न समाये ।
कवळूनि बाहे । देती आलिंगन ।
आनद भोजनीं । तेथें फिटलीसे धणी ।
तुका म्हणे कोणी । साडा शेष मज ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - आळी-हट्ट, मेदिनी-पृथ्वी, पालवें-पदरानें
अर्थ - एकदा भोजन करीत असतांना श्रीकृष्णानें विचित्र हट्ट धरला वाढलेले अन्न त्याने एकत्र केले व
आईस म्हणू लागला की हे आता फिरून मला वेगळे करून दे श्रीकृष्णाने रागाने पृथ्वीवर लोळण घेतली १ मग
त्याची आई यशोदा त्याला म्हणाली, कृष्णा, कसला रे हा हट्ट तुझा, नसल्या गोष्टी करतोस मी तुला दुसरे पदार्थ
वाढते पण तो तिला ढुंकोच म्हणाला २ मग यशोदा मनाशीच म्हणाली, आता काय करू तरी काय ? याला तर
हाणमार करता येत नाही याची समजूत कशीही केली तरी पटत नाही ती म्हणाली, कृष्णा, तूच तुझ्या हाताने
पदार्थ एकत्र केलेस, आता तूच ते निवडून खा आम्हाला का विनाकारण त्रास देतोस ? ३ त्या कृष्णाचे समाधान
त्याच्याच शब्दात केल्यानंतर मात्र त्याची समजूत पडली, त्याचा हट्टही थामला मग तो जमिनीवर उठून बसला
तेव्हा आईसही बरे वाटले मग तो श्रीकृष्ण स्वत चे अग चोरून आईस म्हणाला, आई, एकाच शब्दात माझे सुखदुःख
जाणून तू माझा हट्ट कसा ग दूर केलास ? ४ त्यावर श्रीकृष्णाने पदराने झाकलेले ताट पाहिले व सर्व पदार्थ
पहिले होते तसे वेगवेगळ निवडून ठेवले कृष्णाचे ते सामर्थ्य पाहून त्याची आई मनात चकित झाली त्याची भावना
पाहून ती त्यास म्हणाली, तुझ्या सारखा या त्रिभुवनात कुणी नाही ५ यशोदा माता आनदून गेली तिच्या अंगात
पुत्रप्रेमाचे सुख मायेनासे झाले आपले दोन्ही हात पसरून तिने श्रीकृष्णास पोटाशी धरले दोघांनीही मोठ्या
आनंदाने भोजन केले दोघांच्याही मनाची तृप्ती झाली तुकाराम महाराज म्हणतात, या भोजनातील काही शिल्लक
राहिलेला भाग आपणास मिळावा ६
१९९ चला वळू गाई । बैसों जेऊ एके ठायीं ॥ १ ॥
बहु केली वणवण । पायपिटी जाला सिण ॥ २ ॥
सादीं मार पोटीं भुक । काय खेळायाचे सुख ॥ ३ ॥
तुका म्हणे धावे । मग अवघें बरवे ॥ ४ ॥

सार्थ तुकारामगाथा १०१
शब्दार्थ व टीपा :- बरवें-उत्तम.
अर्थ :- चला आपण सर्व गाई वळून आणू व एका ठिकाणीं बसू. १ आज पुष्कळ पायी चालणे झाल्या-
मुळे व पळपळ फार झाल्यामुळे फारच त्रास वाटत आहे. २ खांद्यावर शिदोरीचे ओझें व पोटांत कडाडून लागलेली
भूक या अवस्थेंत खेळण्याचे सुख कसले ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा वेळीं श्रीहरीकडे धावून जावे, मग
सर्व उत्तमच होईल. ४
२०० नेणों वेळा काळ । धांलों तुस्यानें सफळ ॥ १ ॥
नाहीं नाहीं रे कान्होबा भय आम्हापाशीं ।
वळूनि पुरविसी गाई पोटा खावया ॥ २ ॥
तुजपाशीं भये । हें तों बोलों परी नये ॥ ३ ॥
तुका म्हणे बोल । आम्हा अनुभवें फोल ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- फोल-व्यर्थ.
अर्थ :- श्रीकृष्णा, आम्हांस काळवेळ कांही समजत नाही. केवळ तुझ्या संगतीत आम्ही संतुष्ट झालो
आहोत. १ अरे कृष्णा, आता आम्हांस कसलेही भय नाही. कारण तू आमच्याच गाई रक्षण करून वर आम्हास
खायलाही देतोस. २ तुझ्या भीतीने इतके शब्दही आम्ही खरे म्हणजे बोलू नयेत; ३ कारण तुकाराम महाराज
म्हणतात, असे बोलणेही व्यर्थ आहे असा आमचा अनुभव आहे. ४
विटीदांडू अभंग १
२०१ सारा विटूडांडू । आणीक कांहीं खेळ मांडूं ॥ १ ॥
बहु अंगा आले डाव । स्थिर नाहीं कोठें पाव ॥ २ ॥
कोली हाणे टोला । झेली तेणें तो गोविला ॥ ३ ॥
एकमेकां हाफा मारी । सेल जाळी एक घरी ॥ ४ ॥
राजी आलें नांव । फेरा न चुकेचि घांव ॥ ५ ॥
पुढें एक पाटी । एक एकें दोघां आटी ॥ ६ ॥
एका सोस पोटीं । एक धांवे हात पिटी ॥ ७ ॥
तुका म्हणे आतां । खेळ मोडावा परता ॥ ८ ॥
शब्दार्थ व टीपा - पाव-पाय, गोविला-गुंतून राहिला, सेल-उत्तम घाटा.
अर्थ :- विटीदांडूचा हा खेळ आता मोडू या. दुसरा काही तरी खेळ खेळू आता आपण. १ सारे डाव
अंगावर आले. पाय कुठेच स्थिर नाही. २ विटी एकदा कोलल्यानंतर व एकदा टोला मारल्यावर ती जो झेलतो
तो गुंतून राहतो. ३ गडी एकमेकांस हाका मारतात व खेळका घाटा हातात धरतात ४ ज्यांच्यावर राज्य आले
किंवा जे खेळण्यास तयार झाले त्यांची धावपळ काही चुकत नाही. ५ एक पुढे धावतो, दुसरा मागे धावतो, दोघांनाही
धावांवे लागतेच ६ कित्येकांना धावण्याची हौस असते तर कित्येकांना धावताना हात पिटावा लागतो. त्यांना
त्याचा शीण होतो. ७ तुकाराम महाराज म्हणतात, हा खेळ आता मोडून टाकावा हे बरे. ८
२०२ पाहातां गोवळी । लाय त्यांची उपटावळी ॥ १ ॥
करिती नामाचें चिंतन । गडी कान्होवाचें ध्यान ॥ २ ॥
आली द्यावी डाई । धांवे वळत्या मागें गाई ॥ ३ ॥
एके ठायीं काला । तुका म्हणे भाविकाला ॥ ४ ॥

१०२ सार्थ तुकारामगाथा
शब्दार्थ व टोपा :- गोवळी-गवळी, गोपाळ.
अर्थ - या श्रीकृष्णाचे प्रेम एवढे मोठे की तो गोपाळांचे उष्टेही खात आहे. १ या कृष्णाचे सोबती
त्याच्या नामाचे चितन व ध्यान करतात. २ त्यांनी आलेल्या डावाचे रक्षण करून वळणाऱ्या गाईंच्या मागेही
धावावे. ३ तुकाराम महाराज भाविकाला म्हणतात, सर्व काळा एका ठिकाणी करा ४
२०३ पैल आली आगी कान्हो काय रे करावें ।
न कळे तें कैसें आजि वांचों आम्ही जीवें ॥ १ ॥
धांव रे हरी सांपडलों संधीं ।
दोणव्याचे मधीं बुद्धि कांहीं करावी ॥ २ ॥
अवचितां जाळ येतां देखियेला वरो ।
परतोनि पाहतां आधीं होतों पाठमोरी ॥ ३ ॥
सभोवता फेर रीग न पुरे पळतां ।
तुका म्हणे जाणसी तें करावें अनंता ॥ ४ ॥
शब्दार्थ व टोपा - आगी-आग, संधीं-सकटात, रीग-शिरकाव
अर्थ - अरे श्रीकृष्णा, पलीकडे आग पेटली आहे आता आम्ही काय करावे ? आज आमचे जीव कसे
वाचणार हे काही समजत नाही १ अरे श्रीहरी, तू धाव आता. आम्ही मोठ्याच संकटात सापडलो आहोत. या
आगीच्या प्रलयात आम्ही काय करावे हेच आम्हास समजत नाही. तूच काही तरी कर व आम्हांस वाचव २
आम्ही आधी पाठमोरेच होतो, पण वळून पाहताच आगीच्या ज्वाला आम्हास दिसल्या. ३ सगळीकडे आगो एवढा
पसरला आहे की बाहेर पडण्यासाठी शिरकाव करायला कुठे जागाच नाही तुकाराम महाराज म्हणतात, अनंता,
.आता तुला समजेल तसे तू कर. आमचे रक्षण या अग्नीपासून कर. ४
२०४ भिऊं नका बोले झाकुनियां राहा डोळे ।
चालवील देव धाक नाहीं येणें वेळे ॥ १ ॥
बाप रे हा देवांचाही देव कळों ।
नेदी माव काय करी करवो ते ॥ २ ॥
पसरुनि मुख विश्वरूप खाय जाळ ।
सारुनियां संधी अवघे पाहाती गोपाळ ॥ ३ ॥
तुका म्हणे आम्ही मागें भ्यालों वांयांविण ।
कळो आले आतां या सांगातें नाहीं शिण ॥ ४ ॥
शब्दार्थ व टोपा :- माव-माया, चमत्कार, संधी-बोटाच्या फटीतून
अर्थ :- ह्यावर श्रीकृष्ण म्हणाला, तुम्ही मुळीच भिऊ नका. डोळे मात्र झाकून घ्या. हे सर्व संकट देव आता
निवारण करील. यावेळी काही भीती नाही. १ मग गोपाळ मनाशी समजले की अरे बाप रे, हा तर देवांचा ही
देव दिसतो हेच खरे. काय चमत्कार करील ते काही सांगवत नाही. २ मग श्रीकृष्ण विश्वरूप पसरवून सर्व
आग तोंडाने गिळून टाकीत आहे असे सर्व गोपाळांनी हाताच्या बोटाच्या फटीतून पाहिले. ३ तुकाराम महाराज
म्हणतात, आम्ही मग मागे उगीचच भ्यालो, या श्रीहरीच्या संगतीत कसलाच शीण नाही हे आता आम्हांस कळून
चुकले ४

सार्थ तुकारामगाथा १०३
विवरण - श्रीकृष्णच्या बालचरित्रातील ज्या अद्भुत गोष्टी पुराणातून वर्णन केल्या आहेत त्यात दावाग्नी-
भक्षणाची कथा या दोन अभंगात बुवानीं वर्णन केलेली दिसत. पूतनावध, धेनुकासुरवध, इद्रगर्वहरण, रासक्रीडा,
कालियामर्दन, अघासुरवध, वत्सवध इत्यादी विभाग कृष्णचरित्रात महत्त्वाचे असून त्याच्या या बाललीलांचे
कौतुकाने वर्णन केले जाते. एकदा उन्हाळ्याच्या रात्री सर्व मंडळी थकून झोपलेली असताना एकाएकी सर्वत्र आग
लागली गोकुळातील लोक घाबरले या वणव्यात अनेक स्त्रीपुरुष व गाईवासरे सापडल्यामुळे सर्वत्र हाहाकार
उडाला मग सर्वजण मनोभावे श्रीकृष्णास शरण गेले त्यांनी आपले अग्नीपासून रक्षण व्हावे म्हणून श्रीकृष्णाची
प्रार्थना केली ती आर्त प्रार्थना ऐकून भगवान श्रीकृष्णाने तो दावाग्नीच आपल्या मुखाने गिळून टाकला व
बनवासियाचे संकट दूर केले अशी कथा आहे.
२०५ नेणती तयासि साच भाव दावी हरी ।
लाज नाहीं नाचे पावा वाजवी मोहरी ॥ १ ॥
चला रे याच्या पाया लागो आता ।
राखिले जळता महा आगीपासुनि ॥ २ ॥
कैंसी रे कान्होबा एवढी गिळियेली आगी ।
न देखो पोळला तुज तोडीं कोठें अगीं ॥ ३ ॥
तुका म्हणे तुम्ही का रे करिता नवल ।
आमची सिदोरी खातो त्याचे आले बळ ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - साच-खरोखर.
अर्थ - एवढी मोठी आग श्रीकृष्णांनी गिळून टाकल्यावर सर्वांना नवल वाटून ते म्हणू लागले, जे याचे
सामर्थ्य जाणीत नाहीत त्यांना खरोखर हा श्रीकृष्ण असाच प्रत्यय आणून देतो मग त्याच्या मनात कसलीही
लाज नसते तो सुखाने पावा अथवा मुरली वाजवीत नाचत राहतो १ चला रे, गोपाळ लोकहो त्याच्या पायावर
मस्तक ठेवू या या मोठ्या वणव्यापासून केवळ याच्या कृपेने आपण बचाबलो आहोत २ अरे श्रीकृष्णा, तू एवढी
मोठी आग कशी रे गिळलीस ? तुझे तोंड किंवा अग कुठे पोळले नाही का रे? ३ तुकाराम महाराज म्हणतात,
गोपाळ हो, तुम्ही या कृष्णाचे काय एवढे नवल सांगता ? हा आमची शिदोरी खातो म्हणूनच त्याला एवढे बळ
प्राप्त झाले आहे. ४
२०६ त्यानीं घणोवरी संग केला हरीसवे ।
देऊनि आपुले तोचि देईल तें खावे ॥ १ ॥
न घेयी आभार प्रेमाचा भुकेला ।
बहु दिवस संग हाचि निर्धार त्याला ॥ २ ॥
कान्होबा तू जेवीं घासोघासीं म्हणती ।
आरुष गोपाळें त्याची बहु देवा प्रीती ॥ ३ ॥
तुका म्हणे आता जाऊ आपुलिया घरा ॥
तोय वाचविले ऐसे सांगो रे दातारा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - घणोवरी-तृप्त होईपर्यंत, आद्यप-अडाणी, तोय-तेव्हा
अर्थ - या गोपाळमित्रांनी मनाचे समाधान होईपर्यंत त्या श्रीहरीची सोबत केली. त्यांनी आपल्या शिदोऱ्या
त्याला दिल्या व तो जे देईल तेच ते खाऊ लागले. १ त्यालाही या गोपाळांची संगत फार दिवसांची असल्यामुळे

१०४ सार्थ तुकारामगाथा
व तोही प्रेमाचाच भुकेला असल्यामुळे त्याने त्याचे उपकार ठेवले नाहीत २ प्रत्येक घास घेत असतांना सर्व गोपाळ
श्रीकृष्णा, तू जेव ना असे म्हणत असत. हे भावडे व अडाणी गोपाळ मोठे कृष्णप्रेमी होते यांची देवालाही मोठीच
प्रीती होती ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता आपण आपापल्या घरो जाऊ व या दात्या श्रीकृष्णाने आपणास
वणव्याच्या संकटातून तेव्हा वाचविले असे घरच्या माणसाना सांगू ४
२०७ घ्या रे भोकरे भाकरी । दहीभाताची शिदोरी ।
ताक साडी दुरी । असेल ते तयापें ॥ १ ॥
येथें द्यावे तैसे घ्यावे । थोडें परी निरें व्हावे ।
सांगतो हे ठावे । कसो द्या रे सकळां ॥ २ ॥
माझें आहे तैसे पाहे । नाही तरी घरा जाये ।
चोरोनिया माये । नवनीत आणावे ॥ ३ ॥
तुका म्हणे घरों । माझें कोणी नाहीं हरी ।
नका करु दुरी । मज पाया वेगळें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - निरें-खरे शुद्ध
अर्थ - गोपाळानो, ही भाकरी व हे भोकराचे लोणचे घ्या ही दहीभाताची शिदोरी घ्या तुम्ही ज्याच्याजवळ
ताक असेल तर ते त्याने दूर सारावे १ येथे जसे द्यावे तसे घ्यावे असे असल्यामुळे जरी थोडे मिळविले तरी
ते शुद्ध व चागले असेल मी सर्व हे सांगतो त्याची नीट माहिती असू द्या तुम्हाला २ माझी जशी शिदोरी चांगली,
शुद्ध व ताजी आहे तशी तुम्ही आहे की नाही हे तू पाहा व मग घरी जा आईला न सांगता घरातील लोणी चोरून
घेऊन ये ३ तुकाराम महाराज म्हणतात, मला मात्र माझ्या घरी कुणीही नाही तेव्हा श्रीकृष्णा मला तुझ्या
पायापासून दूर करु नकोस ४
२०८ काल्याचिये आसे । देव जळी जाले मासे ।
पुसोनिया हासे । तिरीसांगाते हात ॥ १ ॥
लाजे त्यासि वाटा नाहीं । जाणे अतंरींचे तेंही ।
दीन होता काहीं । होऊ नेदी वेगळें ॥ २ ॥
उपाय अपाय यापुढें । खोटे निवडिता फुडे ।
जोडोनिया पुढें । हात उभे नुपेशी ॥ ३ ॥
तें घ्या रे सावकाशें । जया फावेल तो तैसे ।
तुका म्हणे रसें । प्रेमाचिया आनंदें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - आसे-आशेने
अर्थ - श्रीकृष्ण आणि गोपाळ यानी जो काला केला त्याचा एखादा लहानसा भाग मिळावा म्हणून
आशेने प्रत्यक्ष देवही नदीच्या पाण्यातील मासे बनले त्यावेळी श्रीकृष्ण व गोपाळ यानी हसून आपले हात तिरींना
पुसून टाकले १ जो कुणी इथे लज्जित होईल त्यास शिदोरीचा वाटा मिळणार नाही पण त्याच्या मनातील हेही
जाणा की जो दीन होऊन मागतो त्यास काही तरी मिळाल्याशिवाय राहात नाही २ या श्रीकृष्णापुढे उपाय व
अपाय हे दोन्ही व्यर्थ होतात, खोटे ठरतात त्याच्यापुढे हात जोडून उभे राहावे, तो कधीही उपेक्षा करणार नाही ३
ज्याला जसे साधेल तसे त्याने या देवापासून जे हवे ते प्राप्त करून घ्यावे तुकाराम महाराज म्हणतात, प्रेमरसाच्या
आनंदात असावे ४

सार्थ तुकारामगाथा १०५
२०९ गोपाळ म्हणती कान्होवा या रे कांहीं मागों ।
आपुलाले आम्ही जीवीची तया आवडी सांगों ।
एक म्हणती उगे रे उगे मागेंचि लागों ।
निजों नका कोणी घरीं रे आजि अवघेचि जागों ॥ १ ॥
जाणोनि नेणता हरि रे मध्यें उगाचि बैसे ।
नाइकोनि बोल आइकै कोण कोणाचे कैंसे ।
एक एकाच्या संवादा जाणे न मिळेची ऐसें ।
पोटींचें होटा आणवी देतो तयांसि तैसें ॥ २ ॥
एक म्हणति बहु रे आम्हीं पीडिलों माया ।
नेदी दहींभातशिदोरी ताक घालिती पिया ।
तापलों वळितां गोधनें नाहीं जोवन छाया ।
आतां मागों पोटभरी रे याच्या लागोनि पायां ॥ ३ ॥
एक म्हणति तुमचें अरे पोट ते किती ।
मागों गाई म्हैसो घोडे रे धन संपत्ति हत्ती ।
देव गडी कान्हो आमुचा आम्हां काय विपत्ती ।
कन्याकुमरें दासो रे बाजावरी सुपती ॥ ४ ॥
एक म्हणती वेडे हो कोण करी जतन ।
गाढव तैसेंचि घोडें रे कोण तयाचा मान ।
लागे भवरोग वाहतां पांदीं चवघे जण ।
हातीं काठघा डोया बोडक्या हिंडों मोकळे राण ॥ ५ ॥
एक म्हणती रानीं रे बहु सावजें फार ।
फाडफाडूं खाती डोळे रे पाय नेतील फर ।
राखोनि राखे आपणा ऐसा कइंचा शूर ।
बैसोनि राहों घरीं रे कोण करी हे चार ॥ ६ ॥
घरीं बैसलिया बहुते बहु सांगती काम ।
रिकामें कोणासि नावडे ऐसे आम्हांसि ठावें ।
चौघांमध्ये बरें दिसेसें तेथें नेमक व्हावे ।
लपोनि सहज खेळतां भले गडियांसवें ॥ ७ ॥
एक म्हणती गडी ते भले मिळती मता ।
केली तयावरी चाली रे बरी आपुली सत्ता ।
नसावे ते तेथें तैसे रे खेळ हाणिती लाता ।
रडी एकाएकीं गेलिया गोंधळ उडती लाता ॥ ८ ॥
एक म्हणती खेळतां उभीं राहतों पोरें ।
ऐसें काय घडों शके रे कोणी लहान थोरें ।
तु गाथा. १४

१०६ सार्थ तुकारामगाथा


अवघीं येती रागा रे एका म्हणतां बरें ।
संगें वाढे कलह हरावा एकाएकींच खरें ॥ ९ ॥
एक म्हणती एकला रे तूं जासील कोठें ।
सांडी मांडी हैं वाउगें तुझे बोलचि खोटे ।
ठायीं राहा उगे ठायींच कांरे सिणसी वाटे ।
अवघियांची शिदोरी तुझे भरली मोटे ॥ १० ॥
तुका म्हणे काय काहण्या अरे सांगाल गोष्टी ।
चाटावे तुमचे बोल रे भुका लागल्या पोटीं ।
जागा करूं या रे कान्होया मागो कवळ ताटीं ।
घाले गडी तुका ढेकर देतो विठ्ठल कंठीं ॥ ११ ॥

शब्दार्थ व टीपा - तापलों-दृष्टी झालो, विपत्ती-दारिद्र्य, सुपती-झोपतात

अर्थ - कान्होबास काही आपण मागावे असे सर्व गोपाळ म्हणू लागले आपल्या आवडीची अशी जी गोष्ट
असेल ती त्यास प्रेमाने मागू. एक म्हणू लागला आपण उगाचच त्याच्या मागे लागू. कुणीही आज घरी झोपू नका
आपण सर्वजण जागे राहू. १ हा श्रीहरी सर्व जाणणारा असला तरी नेणता होऊन सर्व गोपाळांच्या मध्ये उगाच
बसला; आणि कोण कोण काय काय बोलत आहे हे ऐकत राहिला एकमेकाचे बोलणे एकमेकाच्या मतास जुळत
नसल्याचे त्याने पाहिले मग जे ज्याच्या हृदयात होते ते ज्याच्या त्याच्या ओठावर पाहून श्रीहरीने त्याचे मनोरथ पूर्ण
केले २ कुणी एक म्हणायला लागले की आम्ही या गायेने फार त्रस्त झालो आहोत कुणीही आम्हास दहीभाताची
शिदोरी न देता नुसते ताकच प्यायला देतात आम्ही या गाई वळता वळता फार कष्टी झालो कुठे विसाव्याला
सावली नाही की तहान भागवायला पाणीही नाही आता या श्रीकृष्णाच्या पायाशी लागून पोटभर तरी मागून घेऊ ३
दुसरे काही गोपाळ म्हणू लागले, अरे तुमचे पोट तरी किती आहे ? आपण त्या कान्होबास गाई, म्हशी, घोडे, हत्ती,
अशी धनसंपत्ती मागू. तो देवच आपला धनी असल्यामुळे आपणास दारिद्र्य कसले आहे ? आपली मुले, मुली, दाती
वगैरे सर्वजण आरामाने याच्या कृपेने पलंगावर झोपतील. ४ दुसरे कुणी म्हणू लागले ही सर्व संपत्ती कुणी जतन
करावी ? असे गाढव तसेच घोडे. त्याचा मान वेगळा कशास हवा ? या साऱ्या संपत्तीचा भार खांद्यावर वाहता
वाहता क्षयरोग मात्र आपणास जडेल त्यापेक्षा हातात काठ्या घेऊन बोडक्या डोक्याने साऱ्या रानात मोकळेपणाने
भटकू ना ! ५ मग दुसरे काही म्हणू लागले, रानावनात नको रे बाबा, तेथे फार भयानक पशू असतात ते साडून
खातील, आपले डोळे, हस्तपाद, कान फार खाऊन टाकतील त्याच्या तावडीतून स्वतःचे रक्षण करील असा आपल्यात
कोण आहे ? म्हणून आपला घरीच बसून राहा ना. कुणी हा नसता उद्योग सांगितला आहे ? ६ पण घरात बसले
की मग सर्वजण खूप कामे सांगतात कुणी रिकामे बसले की घरी कुणास आवडत नाही हे आम्हाला माहीत आहे
जी गोष्ट चारचौघांना पटेल तीच आपण नीट रूच आपल्या गड्याबरोबर भलेपणाने लपून छपूनच खेळले पाहिजे. ७
त्यावर काही म्हणू लागले की आपल्या मताशी मिळणारे गडी फार चांगले. कारण आपण त्याच्यावर सत्ता
केली तरी मग चालते अरे, असा प्रकार या खेळाच्या ठिकाणी असू नये. या खेळात एखाद्या वेळेस आघाही बसतील
एकमेकांवर रागावून रडी घाल्यावर मग लाथाळी होऊन गोंधळ उडतो ८ मग काहीजण म्हणू लागले की खेळ
खेळताना ही पोरे उगीच राहतात खेळात का कुणी लहान, थोर असे कधी पडू शकते ? एकाला चांगले
म्हटले की दुसरी पोरे रागवतात. अशा समयेत मग भांडणच वाढीस लागते. ते टाळण्यासाठी एकटेच राहणे मग
बरे. ९ त्यावर दुसरे म्हणतात, अरे तू एकटाच मग कुठे जाशील ? मी हे सोडून देईन, हे घेईन हे बोलणेच खोटे व
व्यर्थ आहे. अरे, तू जागच्या जागो स्वस्थच राहा ना. उगाच या मार्गात का श्रमतोस ? सर्वांची शिदोरी तुझ्याच
गाठोड्यात भरलेली आहे. १० तुकाराम महाराज म्हणतात, अरे, कसल्या या गोष्टी सांगता ? तुमचे बोल फुकट
आहेत. इथे आम्हाला पोटात भूक लागली आहे तिथे तुमच्या बडबडीस काय चाटावयेच ? या सर्वजण, आपण या

कान्होबाला जागे करू व आपल्या ताटात त्याला घास भागू मग सर्व गडी संतुष्ट होऊन विठ्ठलनामाचे फेर देऊ
असे तुकारामबुवा म्हणतात ११
२१० आजि ओस अमरावती । काला पाहावया येती ।
देव विसरती । देहभाव आपुला ॥ १ ॥
आनंद न समाये मेदिनी । चारा विसरल्या पाणी ।
तटस्थ त्या ध्यानौँ । गाई जाल्या श्वापदें ॥ २ ॥
जें या देवांचें दैवत । उभें आहे या रंगात ।
गोपाळांसहित । क्रीडा करी कान्होबा ॥ ३ ॥
तया सुखाची शिराणी । तींच पाउले मेदिनी ।
तुका म्हणे मुनी । धुंडितां न लामती ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - मेदिनी-पृथ्वी, शिराणी-कळस
अर्थ - या गोपाळांचा काला पाहण्यासाठी सारे देव आल्यामुळे आज अमरावतीही ओस पडलेली आहे
त्याचे देहभान हरपून गेले आहे १ काल्याचा आनंद या सबंध पृथ्वीवरही मावत नाही वनातील सर्व गाई व
श्वापदे चारा खायचे व पाणी प्यायचे विसरून गेल्या त्याच्या सर्वं वृत्ती या श्रीहरीच्या ठिकाणी एकवटून आल्या २
या सर्व देवांचे दैवतच आज या काल्याच्या आनंदाच्या रंगात उभे आहे, हा श्रीकृष्ण गोपाळांबरोबर आज क्रीडा
करीत आहे ३ सर्व सुखाचा कळस म्हणजे पृथ्वीवरील याची पाऊले होत तुकाराम महाराज म्हणतात, या पावलां-
साठी ऋधिमुनी सर्व जग धुंडतात पण त्याना ही सापडत नाहीत ४
२११ चला बाई पांडुरंग पाहूं वाळवंटीं ।
माडियेला काला भोवती गोपाळाची दाटी ॥ १ ॥
आनंदें कवळ देती एकामुखीं एक ।
न म्हणती सान थोर अवघीं सकळिक ॥ २ ॥
हुगामा हुबरी पावा वाजविती मोहरी ।
घेतलासे फेर माजी घालुनिया हरी ॥ ३ ॥
लुब्धल्या नारी नर अवघ्या पशुयाती ।
विसरलीं देहभाव शंका नाहीं चित्तीं ॥ ४ ॥
पुष्पाचा वरषाव जाली आरतियाची दाटी ।
तुळसी गुफोनिया माळा घालितील कंठीं ॥ ५ ॥
यादवाचा राणा गोपीमनोहर कान्हा ।
तुका म्हणे सुख वाटे देखोनिया मना ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - कवळ-घास
अर्थ - चला बायांनो, वाळवंटात जाऊन पाडुरंगाचे दर्शन घेऊ या विठ्ठलाने काल्याचा खेळ मांडून
समोवती गोपाळांची दाटी निर्माण केली आहे १ मोठ्या आनंदाने हे गोपाळ एकमेकाना घास देऊ लागले कुणी
कुणास लहान थोर मानीत नव्हते २ सर्व गोपाळ मध्यभागी श्रीकृष्णाला ठेवून त्याच्या भोवती फेर धरतात,
हुगामा, हुबरीचे खेळ करतात, पावा किंवा बासरी वाजवितात. ३ या क्रीडेमुळे सर्व स्त्रीपुरुष व प्राण्याच्या सर्व
जाती लुब्ध होऊन गेल्या. त्याचा देहभाव विसरून गेला यात शंकाच नाही ४ यावेळी आकाशातून पुष्पाचा

१०८ सार्थ तुकारामगाथा
वर्षाव झाला आरती करणारांची दाटी झाली सर्व गोपाळ तुळशीच्या माळा तयार करून पाडुरंगास घालू लागले ५
या देवाचा राजा व गोपांचा प्रियकर श्रीकृष्ण माझ्या मनात किती सुख देतो म्हणून सांगू ? असे तुकाराम
महाराज म्हणतात ६
२१२ माझे गडी कोण कोण । निवडा भिन्न यातुनी ॥ १ ॥
आपआपणामध्ये मिळो । एक खेळो एकाशीं ॥ २ ॥
घाबरियाच्या मोडा काड्या । धाडा भाड्या वळतिया ॥ ३ ॥
तुका म्हणे देवापाशीं । विटाळशीं नसावो ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - काड्या मोडणे-खेळातून काढणे, भाड्या-भित्र्या
अर्थ - माझे सोबती कोणकोण आहेत ते सांग पाहू गोपाळांच्या मेळाव्यातून हे मला निवडून द्या पाहू १
आपण आपल्या स्वरूपातच मिळून एकमेकाशी खेळू या २ या खेळात जे गडी घावरतील त्यांना खेळातून काढून
टाका अशा भित्र्या गड्याना इंद्रियरूपी गाई वळापला पाठवून देऊ ३ तुकाराम महाराज म्हणतात, या देवापाशी
ज्याच्या चित्तात विटाळ झाला आहे असा मनुष्य नसावा ४
२१३ हेचि अनुवाद सदा सर्वकाळ । करुनिया गोपाळकाला सेवू ॥ १ ॥
वोरसले कामधेनूचे दुभते । सपूर्ण आइतें गगनभरी ॥ २ ॥
सत सनकादिक गोमट्या परवडी । विभाग आयडी इच्छेचिये ॥ ३ ॥
तुका म्हणे मधीं घालू नारायण । मग नव्हे सीण कोणा खेळें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - अनुवाद-स्मरण वोरसले-प्राप्त झाले, गोमट्या-चांगल्या परवडी-प्रकारांनी
अर्थ - भगवंताच्या स्वरूपाचे स्मरणच सर्वकाळ करून या गोपाळांच्या बरोबर आपण या काल्याचे सेवन करू
या १ आज कामधेनूचे हे दुभते आपणास प्राप्त झाले आहे या दुग्धामृताने पूर्णपणे सारे आकाश भरून गेले आहे २
सनकादिक संतानी विविध अशा चांगल्या प्रकारानी व मोठ्या प्रमाने त्याचा लाभ आपल्या इच्छेप्रमाणे घ्यावा ३
तुकाराम महाराज म्हणतात, मध्यभागी नारायणाला ठेवून खेळ केला म्हणजे मग कसलाही क्षीण कधी आपणास
होत नाही ४
२१४ अधिकाचा मज काटाळा । तुम्हा गोपाळा संगति ॥ १ ॥
काय नाही तुम्हापाशीं । सकळाविशीं सपन्न ॥ २ ॥
उद्योगाचा नेघें भार । लागल्या सार पुरते ॥ ३ ॥
तुका म्हणे अधीर जिणे । नारायणे न करावे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - अधिकाचा-ऐश्वर्याचा
अर्थ - नारायणा, तुमच्या व या गोपाळांच्या संगतीमुळे मला ऐश्वर्याचा व संपत्तीचा कंटाळाच आलेला
आहे १ तुमच्या संगतीत काय मिळण्यासारखे नाही? सर्व संपत्तीचा साठा यथ आहे २ कोणत्याही व्यावहारिक
कामाचा भार आपण घेण्याची जरुरी नाही येथे आल्याचे सुख हेच समाधानाचे सार आहे ३ तुकाराम महाराज
म्हणतात नारायणा, माझे जिणे इतके अधीर करू नका ४
२१५ जालो आता एके ठायीं । न वचू काहीं एकमेका ॥ १ ॥
सरलो हेगे देउनि मोट । कटकट काशाची ॥ २ ॥
सोडोनििया गांठीं पाहें । काय आहे त्यात ते ॥ ३ ॥
तुका म्हणे जालो निराळा । आता गोपाळा देऊ गोमा ॥ ४ ॥

सार्थ तुकारामगाथा १०९
शब्दार्थ व टीपा - यंचूं-सोडू, हेंगे-इकडे, बोभा-हाक
अर्थ :- आता देव व मी एकच झालो आहोत. आता आम्ही एकमेकाना सोडून देणार नाही. १ ही सर्व
देहाची मोटकुळी श्रीहरीला इकडे अर्पण करून मी आता मुक्तच झालो आहे. आता कसली फटफट आली आहे ? २
आता हृदयग्रंथी सोडून त्यात काय काय आहे याचा तपास घेऊ लागलो आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता
मी सर्व व्यावहारिक बाबींतून मोकळा झालो. आता श्रीकृष्ण्णास हाक मारणे एवढेच काम उरले आहे. ४
२१६ या रे करूं गाई । जमा निजलेती काई ।
बोभाट्यानें आई । घरा गेल्या मारील ॥ १ ॥
घाला घाला रे फुकारे । ज्याची तेणेचि मोहरे ।
एवढेचि पुरे । केल्यानें सावध ॥ २ ॥
नेणोनियां खेळा । समय समपाच्या वेळा ।
दुश्चिताजवळ । मिळालेति दुश्चित ॥ ३ ॥
तुका म्हणे शीक । न धरिता लागे भीक ।
धरा सकळीक । मनेरी धांवा वळतियां ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- फुकारे-मोठ्या हाका, ओरडा, मनेरी-मनरूपी गाय
अर्थ :- गोपाळांनो, चला आपण आपल्या गाई आता जमा करू. बेसावधपने झोपलात काय ? उठा ना.
गाई नीट सापडल्या नाहीत तर बोभाटा होईल आणि मग घरी गेल्यावर आपली आई आपणास मार देईल. १
ज्याने त्याने आपापल्या गाईस मोठ्याने हाका माराव्यात रे एवढ्याच ओरडण्याने गाईंना सावध करून परत बोलाव्या. २
आता घरी परतायची वेळ झाली आहे हे न समजून तुम्ही, समयाचे महत्त्व न ओळखून तुम्ही खेळ खेळत बसता,
आणि एका अवगुणी गोपाळाजवळ आणखी अवगुणी मित्र जमा होतात. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी तुम्हास
अनेकदा शिकविले आहे, ते जर तुम्ही ध्यानात धरले नाही तर मग भीक मागण्याचा प्रसंग येईल यासाठी तुमची
मनोरूपी गाय तुम्ही प्रथम आवरून धरा. कारण तीच धावपळ मोठ्या ओढाळपणे करते; तिला सर्वांनी सावरून
धरावे. ४
२१७ वोळलीचा दोहूँ पान्हा । मज कान्हा सांगितला ॥ १ ॥
घ्या जि हेंगे क्षीर हातीं । निगुतीने वाढावे ॥ २ ॥
सांगितले केले काम । नव्हे धर्म सत्याचा ॥ ३ ॥
तुका म्हणे नवे जुने॑ । ऐसे कोणे सोसावें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - वोळली-वळलेली, हेंगे-दूध, निगुतीने-सावधतेने, सत्याचा-स्वतःचा
अर्थ :- ही गाय वळलेली असून हिची धार काढ असे श्रीकृष्णाने मला सांगितले आहे. हेच दूध सर्वांना
मिळावे म्हणून मोठ्या सावधतेने मी ते सर्वांना वाढणार आहे. २ ईश्वराने जे काम मला सांगितले ते मी केले.
हा काही माझा स्वतःचा धर्म म्हणून सांगितला नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता नव्याजुन्याचे कष्ट
पुन्हास सहन होण्यासारखे आहेत ? ४
२१८ येईल ते घेइन भागा । नव्हे जोगा दुसराया ॥ १ ॥
आवडी ते तुम्ही जाणा । बहु गुणांसारिखी ॥ २ ॥
मज घेती डागवरी । सर्वे हरि नसलिया ॥ ३ ॥
तुका म्हणे राबवा देवा । करीन सेवा सांगितली ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - डांगवरी-काठीने मारण्यास.